वीकांताचे बंड
केबिनमध्ये ऑफिसाच्या / खर्डेघाशी तासाताशी
आठवडा तो गेला काशी / संध्याकाळी शुक्रवारी
कातरलेल्या मिशिचा तो / पुलावरी निषेध करू
उभे राहून उडी मारू/ पाण्यामध्ये धबाकदिशी
थंड पाणी गार-शार / मूत्रपिंडांनाही मार
आणि पोलिसांची कार / असे लुप्त कोठेतरी
पोहत पोहत बाहेर येऊ/ कसेबसे घरी जाऊ
आणि एकटेच खाऊ / चिकन विंग लहानथोर
किंवा पार्टीमध्ये जाऊ / प्रौढांचा तो काढू खाऊ
सर्व करतील मग बाऊ / चरसाच्या बिस्किटाचा
किंवा कविताही गाऊ / "देवळात उभे राऊ "
किंवा "पावसात माऊ / भिजली पहा भयंकर"
पण आनंदात राहू/ आनंदा त्या डोळा पाहू
दुपारी मग घरी जाऊ / विचित्र पार्टी सोडोनीया
रविवार संध्याकाळ / सोमवार उभा काळ
लागो आग किंवा जाळ / मायझया नोकरीला
असे म्हणोन जातो कोठे / कसे अन्न तुजसी भेटे
अरे कष्ट असती मोठे / चार पैसे मिळावया
दात घास, मिस्त्रि कर / कपडे धुवून इस्त्री कर
नको कर, नको डर / खवीस बॉस प्रसन्न तो !
आणि ऐकले आहे नको / सेवेकरी मुद्रा बाशी
पहाटेचि तेंव्हा मिशी / कातरून पुढे हो !
पाच दिवस जाती खोटे/ अन्न ब्रह्म तेंव्हा भेटे
वीकांती तरी मोठे/ बंड अमुचे भयंकर !
काही सुधारणा
दात घास, मिस्त्री कर /
.......मिस्री हवे ना? (खरं तर मशेरी, पण ठीक.)
मर्ढेकर म्हणे नको / सेवेकरी मुद्रा बाशी
पहाटेचि तेंव्हा मिशी / कातरून पुढे हो !
.......मर्ढेकर नव्हे, आरती प्रभूंची कविता आहे ती -
सेवेकरी मुद्रा असो नये बाशी
पहाटेच नेमे कातरावी मिशी
फाइलीची फीत रक्ताहून लाल
बाइलेशी प्रीत सेकंदाशी तोल.
नको उमटाया स्तनांवर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ..... वगैरे वगैरे.
अन्न ब्रम्ह तेंव्हा भेटे
....ब्रह्म
जबर हो जबर मिलिंद राव एकदम
हे गाण बघितलय का हो तुम्ही अशीच थीम आहे काहीशी गो गोआ गॉन सिनेमाच २०१३
एल्ले, फिर आ गया तू सेस उठा के
दम लेगा क्या मेरी जान खाके
खून चूसने तू आया खून चूसने
ब्लडी खूनी मंडे क्यूँ आया खून चूसने
तू जा रे जा रे जा कबूतर जा
मैं नहीं जाना, मैं नहीं जाना
मैं नहीं जाना बिस्तर को छोड़ के
खून चूस ले तू मेरा खून चूस ले
ब्लडी खूनी मंडे तू चाहे चूस ले
मैं नहीं जाना, मैं नहीं जाना
मैं नहीं जाना बिस्तर को छोड़ के
खून चूस ले तू मेरा खून चूस ले
ब्लडी खूनी मंडे तू चाहे खून चूस ले
माना तेरे नाम में हैं मन एक बार
तो तू मन की करेगा क्या रे मंडे
काहे पाए ना करार जब तक तू ना यार
गाड़े सन्डे की खबर पर झंडे
अस्सी खून के शिकारी सोमवार
मैं नहीं जाना, मैं नहीं जाना
मैं नहीं जाना बिस्तर को छोड़ के
खून चूस ले तू मेरा खून चूस ले
ब्लडी खूनी मंडे तू चाहे खून चूस ले
सन्डे हैं दिलदार देके मईया का प्यार
मुझे लोरिया गाके जो सुलाए
पर तेरा हैं विचार के मैं शंख हु यार
पूरे पॉवर से मुझे बजाये
अस्सी खून के शिकारी सोमवार
कान खुजाना, कान खुजाना
कान खुजाना उंगली घुसोड के
खून चूस ले तू मेरा खून चूस ले
ब्लडी खूनी मंडे तू चाहे खून चूस ले
विकांताला खरच शेर असतो .
विकांताला खरच शेर असतो :). आहाहा उद्या तसाही शुक्रवार आहेच.