Skip to main content

मवाळ मुसल्मानांवरील नैतिक जबाबदारी: एक गद्य कविता

माझे दोन मुसल्मान मित्र आहेत एक बिन-दाढीवाला तुर्क पेट्रोल भरतो दुसरा दाढीवाला अरब मुन्सिपाल्टीत कारकून आहे त्याला दाढी असली तरी तो कविता वगैरे लिहितो म्हणजे तो मवाळच तर मी त्या दोघांस सज्जड दम भरला की आयसीस ने शिरच्छेद केलेल्या जाळलेल्या बोको हरामने गोळ्या घातलेल्या अल शबाब ने ठार केलेल्या सर्व विशेषतः गैर-मुसलमानांच्या हत्त्यांचा सतत निषेध करण्याची नैतिक जबाबदारी तुमची आहे यावर ते वाकून म्हणाले होय साहेब व न्यूयॉर्क मधल्या मोठ्या मशिदीसमोर उभे राहून हे चूक आहे हे चूक आहे असे म्हणू लागले त्यामुळे मुसलमान समाजाची धर्माची गरज नष्ट झाली तसेच मुसल्मान्नांमधील गरिबी , उपासमारी, बेकारी, रोगराई तसेच पश्चिमी राष्ट्रांचा त्यांच्यावरील साम्राज्यवादी वरचष्मा हे सर्व नष्ट झाले व सर्व मुसलमान आता अमेरिकी, जपानी अधिपत्याखालील सुंदर फाक्ट्र्यांमध्ये दिवस्भर सपाटून मेहनत करतात व रात्री हलकेफुलके हॉलीवूड - बॉलीवूड चे सिनेमे बघतात असे कळते .

पिवळा डांबिस Tue, 24/05/2016 - 22:28

In reply to by मिलिन्द

सैन्य घुसवायला अमेरिका, पाश्चिमात्य राष्ट्रे आणि स्थानिक मुसलमान राष्ट्रे यांची इतकी का फाटते आहे हा एका वेगळा लेखाचा मुद्दा होईल.

लेखापेक्षा एक कविता येऊंद्या. तुमच्या कवितेत जास्त मज्जा असते!! :)

या लोकांचा "निषेध" वगैरे करून काही होणार नाही तर सैन्य घुसवून त्यांना नष्टच करावे लागेल एव्हढाच माझ्या पोस्टेड कवितेचा मुद्दा होता. सैन्य घुसवायला अमेरिका, पाश्चिमात्य राष्ट्रे आणि स्थानिक मुसलमान राष्ट्रे यांची इतकी का फाटते आहे हा एका वेगळा लेखाचा मुद्दा होईल.

हे म्हणजे तुम लडो, हम दोनो बाजूसे टीका करनेके लिये तैय्यार है असं झालं!
म्हणजे त्या 'फाटलेल्या' देशांनी सैन्य घुसवलं की त्यांच्यावर घुसखोरीचा/ साम्राज्यशाहीचा आरोप करायचा आणि नाही घुसवलं तर तर त्यांची फाटते म्हणायचं! आपण मात्र ठो ठो शिमगा करायला तयार, हो की नाही? :)

गब्बर सिंग Tue, 24/05/2016 - 22:59

In reply to by पिवळा डांबिस

म्हणजे त्या 'फाटलेल्या' देशांनी सैन्य घुसवलं की त्यांच्यावर घुसखोरीचा/ साम्राज्यशाहीचा आरोप करायचा आणि नाही घुसवलं तर तर त्यांची फाटते म्हणायचं! आपण मात्र ठो ठो शिमगा करायला तयार, हो की नाही?

बात यहा पर रुकती नही है.

अमेरिकेची फाटत असो वा नसो पण हिंदुविरोधक स्वतः मात्र भारतातल्या मुसलमानांना पण टरकून असतात (पाकिस्तानी मुसलमान सोडाच). भारतातल्या मुसलमानांनी पाकी मुसलमानांबरोबर हातमिळवणी करून घाऊक दहशतवादी हल्ले केलेले असले तरी हिंदुविरोधक मंडळी "हिंदु फंडामेंटलिझम" चा खतरा आहे असा आरडाओरडा करायला पुढे आणि जोडीला "मुसलमानांवर दहशतवादीपणा चा आरोप करणं हे जनरलायझेशन आहे असं पण म्हणायला पुढे. हिंदुविरोधकांची भारतातल्या मुसलमानांसमोर अशी काही "देढ फूट की फटती है ... और जु** होते है" की पूछो मत.

हेच हिंदुविरोधक -- पाकिस्तानवर आक्रमण करायचं म्हंटलं की लगेच "नको ओ, भारताला युद्ध परवडणार नाही, आपण गरीब आहोत. आणि युद्ध हे कोणत्याही समस्येवरचा तोडगा नसते" वगैरे ट्या ट्या ट्या सुरु करतात. पण पाकिस्तानी मुसलमानांनी भारतीय मुसलमानांशी हातमिळवणी करून केलेल्या हल्ल्यात ह्याचे परमप्रिय गरीबच बहुतेक वेळा मरत असतात.

मिलिन्द Wed, 25/05/2016 - 00:59

In reply to by गब्बर सिंग

""मुसलमानांवर दहशतवादीपणा चा आरोप करणं हे जनरलायझेशन आहे असं पण म्हणायला पुढे":
भारतात सुमारे १५.५ कोटी मुसलमान आहेत . त्यांच्यातले ०.०१ टक्के (१५.५ हजार ) जरी हिंसक दहशतवादी झाले तरी भारताची प्रचंड हानी होईल . आणि जिवावर उदार झालेल्यांना कोणतेही पोलिस किंवा सैन्य थांबवू शकत नाही हे जगभर आज दिसतेच आहे.

आणि जिवावर उदार झालेल्यांना कोणतेही पोलिस किंवा सैन्य थांबवू शकत नाही हे जगभर आज दिसतेच आहे.

अगदी.

इस्रायल च्या सुद्धा हे लक्षात आले की हमास, हिजबुल्लाह, इस्लामिक जिहाद या संघटना जर जिवावर उदार होऊन हल्ले करायला लागल्या तर इस्रायली सैन्य त्यांना रोखू शकणार नाही. व म्हणून हमास, हिजबुल्लाह, इस्लामिक जिहाद या संघटनांच्या प्रमुखांच्या चरणी लीन होऊन इस्रायली नेत्यांनी त्यांना विनंती केली की असं करू नका. आणि हमास, हिजबुल्लाह, इस्लामिक जिहाद या संघटनांच्या प्रमुखांनी ती लगेचच मान्य केली. आणि इस्रायल विरोधी दहशतवाद थांबलाच ... लगेचच.

---

भारतात सुमारे १५.५ कोटी मुसलमान आहेत . त्यांच्यातले ०.०१ टक्के (१५.५ हजार ) जरी हिंसक दहशतवादी झाले तरी भारताची प्रचंड हानी होईल .

अगदी बरोबर.

फक्त हिंदूंनी तेवढं असं काही म्हणायचं नाही. हिंदु ८० कोटीपेक्षा जास्त असले तरी.

मिलिन्द Thu, 26/05/2016 - 06:56

In reply to by गब्बर सिंग

येथे सर्वत्र "हिंदू' च्या जागी "मूठभर श्रीमंत उच्चवर्णीय हिंदू पुरुष " घातले कि सत्य स्थितीच्या जवळ पोचाल! बाकी सगळ्यांच्या दृष्टीने (गरीब हिंदू-सकट) हिंदुत्व-वाद हा एक प्रचंड fraud आहे .

बॅटमॅन Mon, 30/05/2016 - 01:07

In reply to by मिलिन्द

तथाकथित सेकुलरवाद तरी दुसरे काय आहे? मूठचिमूटभर लोकांना त्याच्या नावे ओरडण्याचा पैसा मिळतो. झालंच तर चार पुस्तके अन दहा पेपर पब्लिश झाले की बौद्धिक माज वगैरे करता येतो. बाकी इतरांकरिता काय आहे?

गब्बर सिंग Mon, 30/05/2016 - 01:27

In reply to by बॅटमॅन

तथाकथित सेकुलरवाद तरी दुसरे काय आहे? मूठचिमूटभर लोकांना त्याच्या नावे ओरडण्याचा पैसा मिळतो. झालंच तर चार पुस्तके अन दहा पेपर पब्लिश झाले की बौद्धिक माज वगैरे करता येतो. बाकी इतरांकरिता काय आहे?

ब्याट्याचे त्रिशतक.

आमचे एक मित्र आम्हास विचारते झाले की "हिंदुत्ववादाची व्याख्या नेमकी बहुसंख्य हिंदुत्ववाद्यांनासुद्धा करता येणार नाही".

माझे प्रत्युत्तर - सेक्युलरवादाची व्याख्या नेमकी काय ते हिंदुत्ववाद्यांना, सेक्युलरवाद्यांना, आणि "माहीती-नाही-वाद्यांना" सुद्धा करता येणार नाही.

मिलिन्द Wed, 25/05/2016 - 00:54

In reply to by पिवळा डांबिस

आयसीस ने आत्तापर्यंत इतक्या भयानक गोष्टी केल्या आहेत, की कोणीही त्यांच्याविरुद्ध सैन्य उतरवले तर जग त्याचे स्वागतच करील: कोणीही त्याला "साम्राज्यवाद" म्हणणार नाही . (इराणचे साठ हजार लढवय्ये आज आयसीस बरोबर सिरीयामध्ये लढत आहेत . सिरीया हा आज इराणचा एक प्रांत झाला आहे (इराक चीही जवळपास तीच परिस्थिती आहे !) आणि यांना रशियाचे उत्तम हवाई सहाय्य आहे . पण पुतीनला कोणी "साम्राज्यवादी" म्हणत नाही आहे .

गब्बर सिंग Wed, 25/05/2016 - 01:23

In reply to by मिलिन्द

आयसीस ने आत्तापर्यंत इतक्या भयानक गोष्टी केल्या आहेत, की कोणीही त्यांच्याविरुद्ध सैन्य उतरवले तर जग त्याचे स्वागतच करील: कोणीही त्याला "साम्राज्यवाद" म्हणणार नाही .

अगदी. आज भारतातून अनेक "युवक" या धर्मयुद्धाने प्रेरित होऊन तिकडे जात आहेत हे सुद्धा स्वागतार्ह च आहे. आता फक्त फेसबुकावर कारवाई करणे ही शेवटची अत्यंत साधी सोपी बाब उरलेली आहे. ते एकदा झाले की आयसिस सम्पलीच म्हणून समजा.

ग्रेटथिंकर Wed, 25/05/2016 - 12:19

एकंदर इथे प्रत्येक गोष्टीत उपकृमी लॉजिक लावणार्या लोकांना इस्लामोफोबिया झाला आहे हे स्पष्टच आहे.
इस्लाम चा अर्थ शांती आहे,पवित्र कुराण ए शरीफमध्येही शांतीचा संदेश दिला गेला आहे ,त्यामुळे मुठभर लोकांच्या नालायकपणासाठी इस्लामला व पवित्र कुराण ए शरिफला दोष देणं हे तर्कात बसत नाही.

गब्बर सिंग Wed, 25/05/2016 - 13:08

In reply to by ग्रेटथिंकर

त्यामुळे मुठभर लोकांच्या नालायकपणासाठी इस्लामला व पवित्र कुराण ए शरिफला दोष देणं हे तर्कात बसत नाही.

फक्त हिंदुधर्माच्या बाबतीत मात्र असं नाही. हिंदूंनी रिसिव्हिंग एंड ला असलं तरी आणि त्यातल्यात्यात मुसलमानांच्या हस्ते हजारो हिंदु मुलं, स्त्रिया मेलेली असली तरी हिंदुत्ववादीच शिव्यांना पात्र ठरतात.

इस्लामचे मुठभर हिंस्र शिलेदार हे जिहादी शहीद असतात. व हिंदुत्ववाद्यांनी त्यामानाने अत्यंत कमी गुन्हे केलेले असले तरी ते धोकादायक ठरतात (उदा. गुहा यांचा लेख. वर दुवा दिलेला आहेच.)

आडकित्ता Wed, 25/05/2016 - 22:29

In reply to by गब्बर सिंग

हिंदुत्ववाद्यांनी त्यामानाने अत्यंत कमी गुन्हे केलेले असले

विदा?

एक भला मोठा "हिंदू" जाती समुदाय बोंबलत "धर्म" सोडून गेला, त्यापाठी कोणतेही "गुन्हे" नव्हते बरं का, गब्बर.

वेक अप प्लीजच.

गब्बर सिंग Wed, 25/05/2016 - 22:53

In reply to by आडकित्ता

विदा?

(१) हिंदुत्ववाद्यांनी किती हिंदु मारले ? (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन).
(२) हिंदुत्ववाद्यांनी (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन) किती दहशतवादी हल्ले करून निरपराध माणसं मारली ?
(३) हिंदुत्ववाद्यांनी किती मुसलमान मारले ? (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन).

( संभाव्य आक्षेप - नेहमीचाच घिसापिटा - एल्टीटीई, उल्फा हे हिंदु दहशतवादीच आहेत. )

--

एक भला मोठा "हिंदू" जाती समुदाय बोंबलत "धर्म" सोडून गेला, त्यापाठी कोणतेही "गुन्हे" नव्हते बरं का, गब्बर.

हाहाहा.

हिंदु-मुस्लिम प्रश्नामधे "जात" चा मुद्दा आणून हा प्रश्न धर्माचा नाहीच व जातीचा आहेच असा कैच्याकै दावा करण्याचा केविलवाणा यत्न.

(१) जणूकाही इंडियन मुजाहिद्दीन हे भारतातल्या जातीव्यवस्थेचे विरोधक आहेत, जातीव्यवस्थेने गांजलेले आहेत ! व म्हणून भारतात हल्ले घडवून आणतात.
(२) जणूकाही पाकिस्तानी हिजबूल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद हे भारतातल्या जातीव्यवस्थेचे विरोधक आहेत, जातीव्यवस्थेने गांजलेले आहेत व म्हणून भारतातल्या मुसलमानांशी हातमिळवणी करून भारतात हल्ले घडवून आणतात.

----

वेक अप प्लीजच.

तुम्ही झोपू सुद्धा नका. झोपेचं सोंग घेऊन पडून रहा.

नेहमीप्रमाणे - मुसलमानांवर आरोपपत्र सुद्धा दाखल होऊन द्यायचं नाही हा अट्टाहास. निष्पाप हे विशेषण फक्त मुसलमानांसाठीच जन्मास आलेले आहे असा आविर्भाव.

नितिन थत्ते Thu, 26/05/2016 - 06:43

In reply to by गब्बर सिंग

>>(१) हिंदुत्ववाद्यांनी किती हिंदु मारले ? (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन).

शून्य. हिंदू हे बाय डिफॉल्ट सहिष्णु असतात.

(२) हिंदुत्ववाद्यांनी (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन) किती दहशतवादी हल्ले करून निरपराध माणसं मारली ?

शून्य. कारण त्यांनी माणसं मारली तर ती 'रिअ‍ॅक्शन' म्हणून मारली असणार. म्हणजे जे मेले ते निरपराध नसणारच (बाय डिफॉल्ट)

(३) हिंदुत्ववाद्यांनी किती मुसलमान मारले ? (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन).

शून्य. फाळणीच्या वेळी, त्यापूर्वी आणि नंतर ज्या विविध दंगली झाल्या त्यात एकही मुसलमान हिंदुत्ववाद्यांनी मारलेला नाही. मारला गेला असेलच तर तो वरीलप्रमाणेच रिअ‍ॅक्शन म्हणून मारला गेला आहे.

मिलिन्द Thu, 26/05/2016 - 06:49

In reply to by नितिन थत्ते

हे आपण विनोदाने, उपहासाने लिहिले असेल अशी आशा आहे. कारण वस्तुस्थिती याहून फारच वेगळी आणि विरुद्ध आहे !

नितिन थत्ते Thu, 26/05/2016 - 07:07

In reply to by मिलिन्द

नाय हो. सिरिअसलीच लिहिलं आहे. ;)

शिवाय ते पुरोहित वगैरे मुद्दाम आकसाने अडकवलेले लोक आहेत. ते निष्पाप आहेत हे अलिकडेच सिद्ध झाले आहे.

वेलकम टु ऐसी अक्षरे.

ऋषिकेश Thu, 26/05/2016 - 10:13

In reply to by नितिन थत्ते

कैच्या कै हं चाचा रिअ‍ॅक्शन म्हणूनही इतरांना मारावे इतका कुठला दम!

१. हिंदु कुठले इतरांना मारायला.. उलट स्वतःच टिपूच्या काळात मुसलमान नैतर रे.टिळकांसारखे बाटून ख्रिश्चन झालेत

२. हिंदु हे हल्ला कुठले करणार - पुचाट एत! साधा पाकिस्तानवर रीअ‍ॅक्शन म्हणूनही हल्ला नै करवत यांना. हल्लाच नै तर माणसे मरणार कुठून.

३. मुसलमान कशाला उलट हिंदू हिंदूनाच मारतात. 'गांधीवधा'नंतर बघितलंत ना?

गब्बर सिंग Thu, 26/05/2016 - 10:30

In reply to by ऋषिकेश

>>(१) हिंदुत्ववाद्यांनी किती हिंदु मारले ? (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन).
शून्य. हिंदू हे बाय डिफॉल्ट सहिष्णु असतात.

अगदी फाळणीपासूनचा डेटा काढा ना. हिंदुत्ववाद्यांनी किती हिंदु मारले व मुसलमान मारले ?

हिंदुविरोधकांचा दावा तसा नसतो. त्यांचा अध्याहृत दावा असतो की सहिष्णु हे विशेषण फक्त मुसलमानांसाठीच जन्मास आलेले आहे.

----

(२) हिंदुत्ववाद्यांनी (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन) किती दहशतवादी हल्ले करून निरपराध माणसं मारली ?
शून्य. कारण त्यांनी माणसं मारली तर ती 'रिअ‍ॅक्शन' म्हणून मारली असणार. म्हणजे जे मेले ते निरपराध नसणारच (बाय डिफॉल्ट)

खवचटपणा कराच. पण अ‍ॅक्शन व रिअ‍ॅक्शन दोन्हीचा डेटा द्या. मग हवा तो खवचटपणा करा.

=====

(३) हिंदुत्ववाद्यांनी किती मुसलमान मारले ? (हिंदु धर्म ही प्रेरणा घेऊन).

फाळणी पासून व फाळणी नंतर = सांगा !!!
१९८९ मधे काश्मिर मधे दहशतवाद सुरु झाला. त्यानंतरचा डेटा काढा वाटल्यास.

अनु राव Thu, 26/05/2016 - 10:48

In reply to by नितिन थत्ते

प्रसिद्ध कोट आहे. ज्याला लागु होईल त्याने घ्यावे. ज्याला लागु होणार नाही त्यानी का पर्वा करावी.

अनु राव Thu, 26/05/2016 - 11:27

In reply to by नितिन थत्ते

हे माहीती असुन वर लोक मला आज्जी ठरवुन मोकळे झालेत ना. म्हणुन मुद्दाम सांगावे लागते.

ऋषिकेश Thu, 26/05/2016 - 11:44

In reply to by अनु राव

मझ्या माहितीत पंचविशीतल्या आहेत असे सांगणार्‍य महिला आजी हीआहेत. आजी असण्याचा नी वय पंचवीस सांगण्याचा काय संबंध! :प

नितिन थत्ते Thu, 26/05/2016 - 10:44

In reply to by गब्बर सिंग

>>सहिष्णु हे विशेषण फक्त मुसलमानांसाठीच जन्मास आलेले आहे.

असे कोण म्हणते ते पहायला आवडेल. (गब्बर सिंग किंवा बॅट्या उपरोधाने म्हणतात ते नव्हे).

गब्बर सिंग Wed, 25/05/2016 - 22:33

"अल्पसंख्यांकांना" आता मोदींवर विश्वास वाटू लागलेला आहे असं नजमा हेपतुल्ला म्हणतात. - नज्मा बाई, ऐकलं का ? मुख्य प्रश्न तो नैय्ये. मुख्य प्रश्न हा आहे की बहुसंख्यांना "अल्पसंख्यांबद्दल" विश्वास वाटतो का ? का अल्पसंख्य हे स्वतः नाठाळपणे वागणार (ते सुद्धा पाकिस्तान्यांशी हातमिळवणी करून) आणि वर उलटा चोर कोतवाल को डांटे सारखे तुम्ही आम्हाला परकं वागवता, असहिष्णुतेने वागवता, पद्धतशीरपणे बदनाम करता वगैरे ट्या ट्या ट्या करणार ??

मिलिन्द Thu, 26/05/2016 - 22:15

तसेच १५.५ कोटी लोकांना "मुसलमान" या एकाच कोटीत गोवणेही हास्यास्पद आहे . त्यांच्यात प्रचंड वैविध्य आहे . हे साधारण बिहार किंवा उप्र मध्ये हिंदू गुंड आहेत त्यामुळे "सर्व हिंदू गुंड आहेत" असा निष्कर्ष काढण्यासारखे आहे.

तसेच १५.५ कोटी लोकांना "मुसलमान" या एकाच कोटीत गोवणेही हास्यास्पद आहे .

मुहम्मद नामक व्यक्तीवर टीका केल्यावर हे सगळे लोक एक होतात.

मिलिन्द Fri, 27/05/2016 - 02:13

In reply to by बॅटमॅन

मुहम्मदाच्या अपमानावरून चार्ली हेब्डो हत्याकांड झाल्यावर त्याच्या निषेधार्थ फ्रेंचांनी जो प्रचंड मोर्चा काढला होता त्यात हजारो "फ्रेंच" मुस्लिम (डुकराचे मांस खाणारे, रेड वाइन पिणारे ) सामील झाले होते.

मोर्चा काढणारे बहुसंख्य आणि जीव घेणारे अल्पसंख्य यांच्या कृत्यांची व्याप्ती पाहिली तर अधिक व्याप्तीवाले अल्पसंख्यच आहेत.

'न'वी बाजू Fri, 27/05/2016 - 08:04

In reply to by बॅटमॅन

... बाळ ठाकरे नामक व्यक्तीस शिव्या दिल्यास देणाऱ्याची हाडे खिळखिळी करावयास एकत्र येणाऱ्यांची संख्याही एके काळी लक्षणीय असे. आता, बाळ ठाकरे नामक व्यक्तीचे अनुयायी बहुसंख्येने मुसलमान असल्याबद्दल निदान ऐकलेले तरी नाही.

शिवाय, मुहम्मद नामक व्यक्तीवर टीका केल्यास एकत्र येणाऱ्या जमावाचा आकार आणि (जवळपास जागतिक) व्याप्ती, शिवाय मुहम्मद नामक व्यक्तीच्या मृत्यूनंतर कित्येक शतकांनंतरही त्याच्या नावावर जमाव जमण्याइतका प्रभाव (बाळ ठाकरे नामक व्यक्तीचे अनुयायी आतापावेतो थंडावलेले दिसतात), वगैरे केपीआयांवर मुहम्मद नामक व्यक्तीची आणि बाळ ठाकरे नामक व्यक्तीची कोठेही तुलना नाही, हे मान्यच आहे, परंतु त्याला कारण बाळ ठाकरे नामक व्यक्तीची 'पहुँच' (मुहम्मद नामक व्यक्तीच्या तुलनेत) तितपतच होती, एवढेच आहे.

असो चालायचेच.