'फेमिनाझीं'नी नाडलेल्या सर्व बालकांना एक खुला ढोस
सतत स्वतःला एमसीपी म्हणून रडारड, मेलोड्रामा आणि पॅसिव्ह-अग्रेसिव्हपणा करणाऱ्या सगळ्या बालकांना,
मातृत्वगुण अजिबात नसलेल्या अदितीकडून आशीर्वाद मिळणार नाहीत. फार तर 'मोठे व्हा' असा अनाहूत सल्ला द्यायचा आहे. आत्तापर्यंत अशा प्रतिसादांकडे, लेखनाकडे, स्वाक्षऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं होतं. ह्यापुढेही करेन. पण फक्त एकदाच (हिलरीची मैत्रीण) मिशेल ओबामाचा सल्ला ह्या बाबतीत नाकारत्ये. एकदा हा गुन्हा करून घेतेच.
मुलगी शिकल्यावर प्रगती झाली आणि अदिती ही मुलगी उलट उत्तरंही द्यायला शिकली. उलट उत्तरं देण्यामुळे तिला कोणी छळू शकत नाहीत आणि हगल्यापादल्या तिचा अपमानही होत नाही. मुलगी शिकली आणि म्हणून ती "When they go low, we go high," ह्याचा अर्थही शिकली. मुलगी शिकली आणि तुमच्या कुबड्यांची तिला गरज नाही राहिली.
'फेमिनाझी' हा शब्द ऐकून जुना झाला. माझ्यासाठी तरी. असल्या शब्दांच्या बाबतीत मी LGBTQ चळवळीकडून एक गुण घेतलेला आहे. त्यांनी शिव्या दिल्या तर आपण त्या बिरूद म्हणून मिरवाव्यात. क्विअर ह्या शब्दाला आता नकारात्मक अर्थ उरलेला नाही. तुम्ही जेवढ्या जास्त वेळा 'फेमिनाझी' हा शब्द वापराल, तेवढ्या वेळा मी तो मिरवेन आणि तो शब्द घासून गुळगुळीत होईल. तुम्ही मला 'फेमिनाझी' म्हणता तेव्हा मी मनात म्हणते, "मोगँबो, खुश हुआ." मुलगी शिकली आणि तिची कातडी जाड झाली. माझ्याबद्दल एवढंच पुरे. कारण तुम्हाला माझ्याबद्दल चिकार माहिती आहे; माझे काही विचार पटले नाहीत की लगेचच तुम्ही मला किती जवळून ओळखता हे 'फेमिनाझी' शब्दातून तुम्ही दाखवून देताच.
अदिती ही मुलगी असली आणि शिकलेलीही असली तरी तीसुद्धा एक व्यक्ती आहे; सगळ्या मर्त्य मानवांसारखी ती सुद्धा स्खलनशील आहे. कधीतरी तिचाही संयम संपतो, तेव्हा ती ढोस देते. तर आता खरा ढोस.
'मेल शॉव्हनिस्ट पिग'पणा करताना तुम्ही जर इतर स्त्रियांना, लोकांना हिणवत असाल, त्यांचं मूल्यमापन करत असाल तर तुमचंही कोणीतरी मूल्यमापन करणार आणि तुम्हालाही हिणवणार ह्याची तयारी ठेवा. दोन दिले तर दोन घ्यायची तयारी ठेवा. सतत 'ही पाहा मला कशी नावं ठेवते' अशी रडारड करून आपण अजूनही मोठे झालोच नाहीत, ह्याची जाहिरात करायची तर करा. पण तुमच्या बोबड्या बोलांकडे कोण, किती गांभीर्याने लक्ष देणार ह्याचा विचार करा. जमल्यास विचार करा; सक्ती नाही. तशीही माझ्या डोक्यात 'लाफ्टर क्लब'सारख्या एखाद्या 'क्राय-बेबी क्लब'ची कल्पनाही येते ... फक्त तुमच्या सेवेसाठीच!
हे जाहीररीत्या लिहून मी दोन दिले आहेत. माझ्यासारख्यांची जालावर असणारी अल्पसंख्या पाहता, मला दोन नाही दोनशे मिळणार आहेत, ते ही बऱ्याच धाग्यांवर, फेसबुक पोस्ट्सवर आणि बराच काळ मिळणार आहेत, ह्याची खात्री आहे. पण पुन्हा मिशेल ओबामाचं तेच वाक्य माझा प्रतिसाद असेल - "When they go low, we go high." पण, पण, पण ... कोण किती खालच्या थराला जाऊ शकतं ह्याचा अभ्यास, 'प्रबोधनाची गरज' वगैरे गोष्टी तश्शाच राहतात.
(पत्र संपत आल्याचं समजावं म्हणून) कळावे,
लोभ असण्यानसण्याबद्दल अजिबात आग्रह नाही.
(आगाऊ, तोंडाळ, फटकळ, फेमिनाझी ... शिवाय आपापल्या स्वादानुसार विशेषणं वाचावीत) अदिती
;-)
खवचटपणा अॅट मॅक्स!
---
खवचटपणाचा संदर्भ - ९ ऑक्टोबरला झालेल्या दुसऱ्या डिबेटमध्ये हिलरीने मिशेल ओबामाचा उल्लेख 'माझी मैत्रीण' असा केला आणि हेच विधान उद्धृत केलं. तेव्हा ट्रंपने 'चार वर्षांपूर्वी तुमचं काय नातं होतं ते माहित्ये' अशा छापाची काहीतरी मल्लीनाथी केली; ते बऱ्यापैकी खरंच आहे. काल मिशेल ओबामाने न्यू हँपशरमध्ये एक भाषण दिलं; ते भाषण हिलरीच्या कोणत्याही भाषणापेक्षा अधिक लोकप्रिय आणि माणसांना जोडणारं होतं, अशी चर्चा आता आहे.
खरंतर 'मुलगी शिकली, फेमिनाझी
खरंतर 'मुलगी शिकली, फेमिनाझी झाली' अशी म्हण व्हायला पाहिजे.
गंमत जाऊदेत, पण मला खरोखर प्रश्न पडतो की फेमिनाझी म्हणजे नक्की कोण? त्यांची काय लक्षणं असतात? दोनचार नावं, उदाहरणं सांगता येतील का? की हा कोणी एमसीपी म्हटलं की फेकायचा शब्द आहे? आग्नेयास्त्रावर वरुणास्त्र सोडण्यासारखा?
फेमिनाझी म्हणजे नक्की कोण?
फेमिनाझी म्हणजे नक्की कोण? त्यांची काय लक्षणं असतात?
हा शब्द गुगल केला असता असे सापडले की - स्त्री-पुरुष समानता असे व इतकेच धेय न ठेवता ज्या स्त्रिया पुरुषांवरती वर्चस्व स्थापू इच्छितात त्या म्हणे फेमिनाझी.
.
खरं तर पुरुषच एकमेकांवर इतकं वर्चस्व गाजवु पहातात की त्यांनाच "फेमिनाझी" लक्षणे लागू पडतायत.
सतत स्वतःला फेमिनिस्ट लिबरल
सतत स्वतःला फेमिनिस्ट लिबरल सेक्युलर म्हणून प्रबोधन, प्रवचन आणि प्रसारण करणाऱ्या सगळ्या थेरड्यांना,
शिकण्याची नि समजून घेण्याची अजिबात इच्छा नसलेल्या ह्या म्यानच्याईल्डकडून अजिबात प्रतिसाद मिळणार नाही. फार तर 'गोडगोड नोस्टाल्जिक धर्माभिमानी राष्ट्राभिमानी अस्मिताधारक भावनामिरवक व्हा' असा अनाहूत सल्ला द्यायचा आहे. आत्तापर्यंत तुमच्या खचचटपणा, मार्मिकपणा, प्रवचन, प्रबोधन, प्रसारणाकडे दुर्लक्ष केलेलं होतं. ह्यापुढेही करू. पण पुन्हा एकदा एकदा (मार्ला-इव्हानाचा एक्स, मेलानियाचा नौरा) डोनल्ड ट्रम्पचा सल्ला ह्या बाबतीत देतो. बस यही अपराध मैं हरबार करता हूं वगैरे
---- Please insert the good stuff as per your own convenience इत्यादि वगैरे. ---
हे जाहीररीत्या लिहून आम्ही दोनेकशे दिले आहेत. आमच्यासारख्यांची जालावर असणारी संख्या पाहता, मला दोन पैशेही मिळणार नाहीयेत - अगदी या धागावर सुद्धा ह्याची खात्री आहे. पण पुन्हा डॉनल्ड्चंच वाक्य आमचा प्रतिसाद असेल - "Grab Them By The Pussy" पण, पण, पण ... आम्ही किती खालच्या थराला जाऊ शकतो ह्याचा अभ्यास, 'लाईव्ह माईक्रोफोनची गरज' वगैरे गोष्टी तश्शाच राहतात.
(पत्र संपत आल्याचं समजावं म्हणून) कळावे,
२७० इलेक्टोरल व्होट्स मिळायचा वांझ आग्रह मात्र आहेच.
(बिगटेड, मिसॉजिनिस्ट, रेसिस्ट, लाईंग... शिवाय आपापल्या स्वादानुसार विशेषणं वाचावीत) मुक्तट्रंप
>>गंमत जाऊदेत, पण मला खरोखर
>>गंमत जाऊदेत, पण मला खरोखर प्रश्न पडतो की फेमिनाझी म्हणजे नक्की कोण? त्यांची काय लक्षणं असतात? दोनचार नावं, उदाहरणं सांगता येतील का? की हा कोणी एमसीपी म्हटलं की फेकायचा शब्द आहे? आग्नेयास्त्रावर वरुणास्त्र सोडण्यासारखा?>>
शॅावनिझम म्हणजे एकप्रकारचा दुराग्रह,हट्टीपणा जो दोन्हींकडे असू शकेल.पुरुष अथवा स्त्रीमध्ये .पिग् म्हणजे दुटप्पीपणा जो "Animal Farm"-George Orwell च्या कादंबरीत आहे.तो एक मोठ्या समाजसंस्थेचा आहे. थोडक्यात त्यात बय्राच पातळ्या आणि आवाका आहे पण फ्लेवर एकच.लांडग्यांच्या कळपात,माकडांच्या टोळीत अथवा अगदी झाडाझुडपांतही दिसतो.कोणाच्या घरावर पाटी नसेल तशी तरी आत अतिरेकी असू शकतात."इथे mcp,fmcp राहातात" वगैरे.
पिग् म्हणजे दुटप्पीपणा जो
पिग् म्हणजे दुटप्पीपणा जो "Animal Farm"-George Orwell च्या कादंबरीत आहे.तो एक मोठ्या समाजसंस्थेचा आहे.
मुसलमानांमधे पिग् ला निशिद्ध का मानलेले आहे त्यामागचे कारण मला असे सांगण्यात आले (बरोबर की चूक हा मुद्दा नाही) की पिग् मधला नर जो आहे तो आपल्या मादीवर नियंत्रण ठेवत नाही. तिला कसेही कुठेही जाऊ देतो. व म्हणून पिग् हा निशिद्ध. पुनश्च - हे योग्य्/अयोग्य आहे की नाही याबद्दल मी बोलत नाहिये. पण हे असे कारण दिले गेले एवढेच नमूद करत आहे.
फेमिनाझींचा नवीन बळी -
फेमिनाझींचा नवीन बळी - ट्रंप.
कोणत्याही बाईला आपण काहीही करू शकतो असा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या गरीब बिचाऱ्या ट्रंपला या फेमिनाझी 'हा आमच्याबरोबर भलतंसलतं वागला' असं म्हणून सतावत आहेत. त्या बायकांनाही माहिती आहे की ट्रंपची कॅंपेन ही अमेरिकेच्या इतिहासातली सर्वात श्रेष्ठ चळवळ आहे. तरीसुद्धा या दुष्ट बायका त्याचा छळ करत आहेत. फेमिनाझी कुठल्या.
"As you have seen, I am a victim of one of the great political smear campaigns in the history of our country," he said at a rally in Charlotte, North Carolina, on Friday night. "They are coming after me to try and destroy what is considered by even them the greatest movement in the history of our country."

हिलरीची मैत्रीण?
मिशेल ओबामाचा उल्लेख, 'हिलरीची मैत्रीण' ही तिची प्राथमिक ओळख असल्यासारखा का केला जातोय?