पूर्ण बुरख्यावर बंदी
https://www.washingtonpost.com/world/europe/germanys-merkel-backs-sweep…
पूर्ण बुरख्यावर बंदी आणा असे जर्मनीच्या चान्सलर म्हणताहेत.
ऐसीवर दुखवटा जाहीर केला पाहिजे.
(हेही वाचा : फ्रान्स आणि बुरखा बॅन, निधर्मीपणा, व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे)
इस्लामी पितृशाहीविरुद्ध लढण्यासाठी मुस्लिम स्त्रियांना पाठिंबा
स्त्रीच्या अंगावरचा बुरखा प्रत्येक स्त्रीला मालमत्ता आणि पुरुषाला संशयित बलात्कारी बनवितो. बुरख्यात लपवून बॉम्ब आणता येतात ते वेगळेच (इराक मध्ये असे अनेक मेले आहेत!). मुख्य म्हणजे फॅसिस्ट इस्लामी पितृशाहीविरुद्ध लढण्यासाठी मुस्लिम स्त्रियांना अशा कायद्यामुळे पाठिंबा मिळतो. मर्केल-बाईंचे अभिनंदन!
आता यावर हसुही येत नाही :(
हो ना! त्याच बरोबर स्त्री च्या कपाळावरील कुंकू (आनि गळ्यातील मंगळसुत्रही) प्रत्येक स्त्रीला मालमत्ता बनवितो. साड्यांत, पंजाबी ड्रेसेसमध्ये लपवून बॉम्ब आणता येतात ते वेगळेच (राजीव गांधी असेच मेले आहेत!). मुख्य म्हणजे फॅसिस्ट हिंदू पितृशाहीविरुद्ध लढण्यासाठी हिंदू स्त्रियांना अशा बंदीमुळे पाठिंबा मिळेल. तेव्हा साडी, कुंकु, मंगळसूत्र, टिकल्या, हिरवा चुडा, मेंदी यावरही बंदी आलीच्च पाहिजे! हो की नै?
फॅसिस्ट हिंदू पितृशाहीविरुद्ध लढण्यासाठी : +१
स्त्री च्या कपाळावरील कुंकू (आनि गळ्यातील मंगळसुत्रही) प्रत्येक स्त्रीला मालमत्ता बनवितो. येस, +१
साड्यांत, पंजाबी ड्रेसेसमध्ये लपवून बॉम्ब आणता येतात ते वेगळेच ; येस +१
(राजीव गांधी असेच मेले आहेत!).येस + १
तेव्हा साडी, कुंकु, मंगळसूत्र, टिकल्या, हिरवा चुडा, मेंदी यावरही बंदी आलीच्च पाहिजे! : नाही, याऐवजी ही सर्व मूर्ख सिम्बॉल्स हिंदू समाजच हळूहळू नष्ट करेल . त्यांचा बॉम्ब साठी उपयोग केला गेल्याचे राजीव सोडून इतर उदाहरण ऐकिवात नाही .
हा मुलाखत घेणारा फारच डोक्यात
हा मुलाखत घेणारा फारच डोक्यात जातो आहे. समोरच्या माणसाला तो बोलूही देत नाहीये. मात्र तो क्वोट करत असलेली वाक्यं डॅम्निंग आहेत. मला या मुलाखतीतून फक्त आरडाओरडा ऐकू आला. यात जिझॅकचं मत नक्की काय आहे हे समजावून सांगाल का? वी आर इन द मिड्स्ट ऑफ अ कल्चरल क्लॅश - वेस्ट व्हर्सेस इस्लाम. इथपर्यंत कळलं. ते एका प्रमाणापर्यंत बरोबरही आहे. पण त्यापुढची मारामारी नीट कळली नाही.
झिझेकचं मत नक्की काय
>>यात जिझॅकचं मत नक्की काय आहे हे समजावून सांगाल का?
ह्याचा उपयोग होईल कदाचित. मात्र वरच्या व्हिडिओपेक्षा कमी सनसनीखेज आहे.
क्रायसिस तीव्र होत जाईल, , क्रांतीची शक्यता वाढत जाईल.
झिझेकचे मत असे: जगभर भांडवलशाहीची दडपशाही , दुष्कृत्ये वाढत आहेत (पण दुसरा पर्याय दृष्टीपथात नाही!). याचेच गरीब अमेरिकन्सही बळी आहेत. वॉशिंग्टनमधल्या सध्याच्या सत्ताधारी एलीटने ही परिस्थिती घडवून आणली आहे . क्रायसिस इतक्या तीव्रतेला पोचत आहे की काहीतरी "डावे" उत्तर त्यातून निघणारच आहे . ट्रम्पने ही सर्व परिस्थिती (डावे उत्तर सोडून!) लोकांसमोर आणली आणि वॉशिंग्टन हादरविले . पण हा क्रायसिस संपविणे याबाबत तो काही करू शकत नाही, करणारही नाही . उलट त्याच्या अधिपत्याखाली क्रायसिस अधिकाधिक तीव्र होत जाईल आणि क्रांतीची शक्यता वाढत जाईल . त्यामुळे तो ट्रम्प च्या निवडणुकीचे (कृतक) स्वागत करतो (झिझेक तुमचे लक्ष खिळवून ठेवण्यासाठी सनसनाटी विधाने करण्यात प्रसिद्ध आहे). हिलरी याउलट वॉशिंग्टन एलिटचीच प्रतिनिधी होती .
क्रायसिस अधिकाधिक तीव्र होत
क्रायसिस अधिकाधिक तीव्र होत जाईल आणि क्रांतीची शक्यता वाढत जाईल .
सत्ता हीच उजवी संकल्पना, क्रांती येईल वगैरे बाष्कळ बडबड करणार्या अनार्किस्टांनी पासपोर्ट सरेंडर करून पायरेट्स म्हणून राहिले पाहिजे. नपेक्षा त्यांच्या उमाळ्यांना काहीच अर्थ नाही. हे निवडणुकांमधूनही दिसतेच आहे. लवकरच ही कीड पूर्णपणे धुतली जाईल. आमेन!
Slavoj Žižek's Interview by
Slavoj Žižek's Interview by Rosanna Greenstreet
What is the most important lesson life has taught you?
That life is a stupid, meaningless thing that has nothing to teach you.
Tell us a secret.
Communism will win.
---
टायलर कोवेन यांचे मत ... झिझेक बद्दल ....
He can’t simply admit: "I was a fool to follow Mao and Stalin" but instead he has to push the line "I just need to reinterpret everybody more and I will still find some movement for "egalitarian terror" [those two words are his] to sign on to." Grow up, I say, yet he is almost sixty years old.
पुरोगाम्यांनी काय लक्षात घ्यायला हवं?
वरची / खालची चर्चा माझ्या मूळ मुद्द्यापासून भरकटली आहे. मूळ मुद्दा पुन्हा एकदा इथून उद्धृत -
On the refugee crisis, we should drop the patronising “They are warm people.” No, there are murderers among them in the same way there are among us. The liberal left prohibit writing anything bad about refugees, which results in the anti-immigrant right monopolising.
माझ्या मते हे लक्षात घेणं पुरोगाम्यांसाठी महत्त्वाचं आहे.
ह्ये नक्की कंच्या टायपचं
ह्ये नक्की कंच्या टायपचं बांडगूळ हाये??
https://www.theguardian.com/world/2014/dec/26/ireland-court-rules-brain… असा काहीतरी प्रकार आहे का?
की मतिमंद??
की सिवीअर ऑटीस्टीक???
की "गर्भलिंगपरीक्षेत तिसरादेखील मुलगाच आहे कळल्यावर माझ्या आईने पपई खाऊन मला अबॉर्टायचा प्रयत्न केला त्यामुळे जगातल्या कुठल्याच स्त्रिने गर्भपात केला नाय पायजेऽऽ भ्याऽ भ्याऽऽ भ्याऽऽऽ" रडणार्या चाळीशीतही 'बांडगुळ मनस्थितीतच अडकलेल्या'चा डुआयडी आहे हा?
बरोबर आहे तुमचं.
मान्य आहे. ऐसीवर बुरख्यांचं पूर्ण समर्थन झालंच पाहिजे. ऐसीवर बुरखे चालवून घेतले नाहीत तर सदस्यसंख्या निम्म्यावर आणि प्रतिसादसंख्या दशांशावर येईल.