Skip to main content

टंकनपद्धत आणि त्यांमागचे विचार

'ऐसी'वर टंकनपद्धत थोडी बदलल्यामुळे झालेल्या चर्चेसंदर्भात -

'ऐसी अक्षरे' संस्थळ ड्रूपाल ७वर नेणं गरजेचं वाटत होतं. आता ड्रूपाल ७वर असलं तरीही बराच जास्त वेळ लावला असं माझं मत आहे. कारण जुनं ऐसी मोबाईल, टॅबलेटवरून वापरण्यासाठी सोयीचं नव्हतं. आडवं स्क्रोलिंग आणि टंकाचा आकार मोठा करण्याची आवश्यकता होती. आता ड्रूपालच त्याची काळजी वाहतं आणि कोणत्याही उपकरणावरून ऐसी बघितलं तरीही टंकाचा आकार आणि आडवं स्क्रोलिंग या अडचणी येत नाहीत. (आमच्या मायक्रोवेव्हमध्ये 'ऐसी' दिसत नाही, अशी तक्रार असल्यास कृपया कल्याणीदेवी उर्फ केलीअॅन कॉनवे यांच्याकडे तक्रार करावी.)

सर्वच मराठी संस्थळांवर आत्तापर्यंत 'गमभन' हे मॉड्यूल वापरून टंकनाची सोय केली होती. 'गमभन' ड्रूपाल ७साठी उपलब्ध नाही. 'इंडिक स्क्रिप्ट' नावाचं मॉड्यूल ड्रूपाल ७वर आहे. माझ्या अंदाजानुसार, मायबोली आणि मिसळपाव या संस्थळांनी 'गमभन'चं मॉड्यूल स्वतःच ड्रूपाल ७साठी लिहिलं आणि वापरत आहेत. मग ते ऐसीवर का नाही?

१. त्याचा कोड सर्वांसाठी, पब्लिकली उपलब्ध नाही.

२. मग तो स्वतःला लिहिता येईल. पण -
अ. तेवढ्यासाठी जावास्क्रिप्ट वगैरे शिकणं आणि मॉड्यूलं लिहिणं, हा मला माझ्या वेळेचा योग्य उपयोग वाटत नाही.
आ. पर्याय म्हणून दुसरं मॉड्यूल उपलब्ध आहे; ते बहुतांशी गमभनसारखं चालवता येतं. शिवाय ते मॉड्यूल इतर काही बाबतीत गमभनपेक्षा सरस आहे.
इ. मुख्य म्हणजे, चाकाचा शोध पुन्हापुन्हा लावण्यात मला काहीही हशील दिसत नाही, म्हणून मी ते करणारही नाही.
यातला उपमुद्दा - ज्यांना हौस, वेळ, आणि विषयात गती असेल त्यांनी 'गमभन'चं मॉड्यूल ड्रूपाल ७साठी लिहावं, किंवा आहे ते मॉड्यूल ठीकठाक करून द्यायला मदत करावी आणि इंडिक स्क्रिप्ट/गमभनपैकी एक सदस्यांना निवडता येईल याची सोय करून द्यावी.

३. 'इंडिक स्क्रिप्ट'मध्ये बोलनागरी आणि इनस्क्रिप्ट वापरणाऱ्यांचीही सोय होत आहे. यात गूगल इनपुट वाढवता आलं तर सोन्याहून पिवळं. (पण ते माझ्या पेग्रेडच्या बाहेरचं आहे.)

४. अनेकांना 'गमभन'ची सवय आहे, हा मुद्दा मला मान्य आहे. पण त्यात खूप जास्त बटणं दाबावी लागतात. थोडक्यात 'गमभन' एफिशियंट नाही. उदाहरण म्हणून च आणि छ चं घेता येईल. टंकताना क+ह = ख, ज+ह = झ, प+ह = फ होतं; पण च+ह= छ होत नाही. 'गमभन'चं लॉजिक च-छ यांच्या टंकनात गंडलेलं आहे. 'ऐसी'वर ते चालत नाही, कारण त्याचं गंडकं लॉजिक कसं प्रोग्रॅमला कसं समजावायचं, हे मला समजत नाहीये.

प्रोग्रॅमिंग, तर्क, इत्यादी विषयांत रस असणाऱ्या लोकांनी हे कोडं सोडवावं. (देवनागरी युनिकोड इथे सापडतील.) त्यासाठी इंडिक स्क्रिप्ट कसं चालतं याची माहिती. व्यंजनांची बटणं दाबली की व्यंजनाचा युनिकोड आणि हलन्त दोन्ही येतात. हे उदाहरण -

k = u0915 + u090D = क+हलन्त
u0915 + u090D + h = u0916 + 0914 = ख + हलन्त = (क चा कोड + h) असं इनपुट.

ch = c
असं चालत नाहीये; तसं करायचा प्रयत्न केला तर ch टंकल्यावर च्ह् उमटत आहे.

एखाद्या बटणाला काहीही इनपुट नसेल तर त्याजागी रोमन अक्षर उमटतं. म्हणजे फक्त c टंकल्यावर काहीच उमटणार नाही, असं करता येणार नाही. आता च आणि छच्या बाबतीत हा कोड कसा लिहावा?

हलन्तांच्या बाबतीतही हेच. शब्दाच्या मध्ये आलेला अ टंकावा लागतो, पण शब्दाच्या शेवटी आलेला अ टंकावा लागत नाही, यात काही तरी तर्क आहे. पण ते प्रोग्रॅमला समजावणं आणि प्रोग्रॅमने आपल्या इच्छेनुसार वागणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत.

व्यक्तिशः मला 'गमभन' अजिबात आवडत नाही; कारण त्यात शब्दाच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येक अकारान्त व्यंजनानंतर अ टंकावा लागतो. साो अशासारखे शब्द टंकता येत नाहीत. मी गेली चारेक वर्षं बोलनागरी वापरत्ये. मी नेहमीच स्वतःचा कंप्युटर वापरते, त्यामुळे मला हवी ती ओएस आणि टंकनपद्धत त्यात डकवण्याचा पर्याय मला आहे. त्यामुळे मी सध्या या गमभनच्या प्रश्नाकडे तर्काचा प्रश्न म्हणून बघत्ये.

शनिवारी सकाळी साडेसहाला उठून दोन तास च आणि छ च्या तर्कावरून प्रोग्रॅमशी मारामारी करूनही मला हा प्रश्न सुटलेला नाही. आता या (न-)तर्कावर घालवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; म्हणून हा धागा आणि (न-)तर्काचं क्राऊडसोर्सिंग.

डबल इ आणि डबल ओ वापरून ईकार आणि ऊकार टंकण्यासाठी झगडायला आणखी वेळ लागेल. तो मिळेल तेव्हा त्याचे अपडेट्स देईनच. पण आता मला माझं आयुष्य जगण्याची गरज आहे.

रावसाहेब म्हणत्यात Sat, 01/04/2017 - 21:25

जे रेग्युलर आहेत आणि कम्प्युटर वापरत असाल तर गुगल मराठी ट्राय करा.

१) फक्त एकदा इथे जाऊन मराठी टिक करा आणि डाउनलोड करा
Google Marathi

२) On Windows, (mac वाले तुमचं corresponding setting फिगर आउट करा)
Go to Control Panel --> Region and Language --> Keyboards and Language --> Change Keyboards --> Advanced Key Settings. तिथे मग English ला Ctrl+1 आणि मराठी ला Ctrl+2 असा शॉर्टकट द्या. Done

आता Ctrl+1 केलं कि इंग्लिश, Ctrl+2 केलं कि मराठी. आणि टाईपिंग पण एकदम intuitive आणि सोप्पं आहे. मारामारी करायला लगत नाही किंवा लक्षात ठेवायला लागत नाही.

Let me know in case of any questions or concerns. I can try to resolve.

१४टॅन Sat, 01/04/2017 - 22:10

ते च आणि छ चं एक‌वेळ सोडून द्या. होईल स‌व‌य ह‌ळूहळू. प्र‌त्येक अक्ष‌रान‌ंत‌र‌चा अ ही ठीके.
आत्ता न‌वीन अप‌डेट‌म‌ध्ये ड‌ब‌ल यू सुद्धा ऊ होता, तो ज‌री प‌र‌त मिळाला त‌री पुरे. कारण ड‌ब‌ल आय हा ई आहे अजून‌ही, मात्र ड‌ब‌ल यू चा ऊ न‌ष्ट झालाय.

गुग‌ल म‌राठी इन‌पुट म‌हाझंझ‌ट आहे. एखादा इंग्र‌जी श‌ब्द म‌राठीत टंकाय‌चा झाला, उदा. कॅमेरा, आर्थ्रोपॉड्स पासून इन्स्टिट्यूट प‌र्यंत, त‌र ते ऑन-स्क्रीन कीबोर्ड म‌ध‌ली अक्ष‌रं चिव‌ड‌त लिहावं लाग‌तं.

ही प्र‌तिसादाची खिड‌की मात्र ज‌रा मोठी क‌र‌ता आली त‌र प‌हा. स्क्रोलिंग ऑटोमॅटिक न‌स‌ल्याने द‌र चार ओळींनंत‌र स्क्रोल क‌रून पहावं लाग‌तं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/04/2017 - 01:28

सध्या मला तर्क, प्रोग्रॅमिंगसंदर्भात मदत हवी आहे; ती करता आली तर बघणे, ही विनंती. गणितं, कोडी यांत रुची असणाऱ्या लोकांसाठी हा प्रश्न आणि टंकनाच्या पद्धतींमधला तत्त्वाचा प्रश्न यांत रस असणाऱ्यांसाठी हा धागा आहे. उदाहरणार्थ, c टंकल्यावर काहीच नाही, c+h = च आणि c +h +h = छ यांतला तर्क मला समजावून सांगितला तरीही काम सोपं होईल. ज्यांना देवनागरी टंकनाची एफिशियन्सी (मराठी?) या विषयाच्या चर्चेत रस आहे, त्यांनीही लिहावं.

गूगल इनपुट, इनस्क्रिप्ट, बोलनागरी आणि पापण्यांनी टंकन करण्याच्या पद्धती किंवा काही वापणाऱ्या लोकांसाठी पुरेशा सूचना, माझ्या मते, देऊन झालेल्या आहेत. ज्यांना ऐसीवरचं 'गमभन'-सदृश टंकन वापरायचं आहे, ते होतं तसंच हवं आहे, त्यांच्या सोयीसाठी हा धागा आहे. गूगल कसं वापरायचं, ही इथे अवांतर असणारी चर्चा अन्यत्र करता येईलच.

प्रतिसादाच्या खिडकीच्या उजव्या बाजूला खाली तीन तिरप्या रेषा आहेत. तिथे माऊस ओढला की खिडकी हवी तेवढी मोठी करता येते.

आदूबाळ Sun, 02/04/2017 - 02:08

क‌ंप्यारिज‌न‌

इंग्रजी अक्षर गमभन (मिपा व्हर्जन) ऐसी
c च्
ch छ्
chh छ्ह्
C C
Ch Cह्
Chh छ्ह Cह्ह्

लाल‌ अक्ष‌रांत‌लं लॉजिक वाप‌राय‌ची म‌ला स‌व‌य‌ आहे.

म्ह‌ण‌जे:

c टंकल्यावर काहीच नाही, c+h = च आणि c +h +h = छ

हा त‌र्क‌ चुकीचा वाट‌तो आहे. त्याऐव‌जी
c = च्
ch = च
chh = छ

हे आण‌ल्यास‌ स‌म‌स्या सुटावी.

आदूबाळ Sun, 02/04/2017 - 02:57

ट‌ंक‌न‌पद्ध‌तींत‌ल्या त‌र्कांविषयी

म‌ला काय‌ वाट‌त‌ं, की प्राथ‌मिक त‌त्त्व (first principle) "बोले तैसा चाले" असाव‌ं. म‌राठीत‌ व्य‌ंज‌नं ही मूल‌त: ह‌ल‌न्त‌ अस‌तात‌. म्ह‌ण‌जे त्यात‌ कोण‌तात‌री स्व‌र‌ कोंब‌ल्याशिवाय‌ त्यांचा उच्चार‌ क‌र‌ता येत नाही. (क‌ = क् + अ, का = क् +आ, व‌गैरे.)

हेच‌ त‌त्त्व ट‌ंक‌नात‌ वाप‌राय‌चं त‌र :
ch = च्
cha = च‌
chh = छ्
chha = छ‌

असं ह‌व‌ं.

व‌र‌ लिहिलेल्यापेक्षा हे ज‌रा वेग‌ळं आहे, प‌ण म‌ला त‌री ही प‌द्ध‌त जास्त‌ निर्दोष वाट‌ते. (भाषाशास्त्र‌ज्ञ‌ जास्त‌ अधिकाराने सांगू श‌क‌तील‌.)

ऑन‌ सेक‌ंड‌ थॉट्स: ब‌हुदा फ्रेंच‌ भाषेत‌ h स्व‌रासार‌खा वाप‌र‌तात‌. (मी क‌साब‌सा पास‌ झालो होतो, त्यामुळे या ज्ञानाची चड्डी तोक‌डी आहे.) या लॉजिक‌ने ch = च हेही ब‌रोब‌र‌ ठ‌रावं.

----------------
द‌र‌ अक्ष‌रामागे एका स्व‌राचा chaperone काय‌म‌ अस‌णं आणि तो आव‌र्जून‌ ट‌ंकावा लाग‌णं हे जास्त‌ द‌म‌व‌णार‌ं आहे हा अदितीचा आक्षेप‌ स‌ंपूर्ण‌प‌णे मान्य‌ आहे. प‌ण म‌ला वैय‌क्तिक‌रीत्या "सोय‌ विरुद्ध‌ त‌ंत्र‌शुद्ध‌ता" या वादात‌ त‌ंत्र‌शुद्ध‌तेच्या पार‌ड्यात‌ व‌ज‌न‌ टाकाव‌ंस‌ं वाट‌तं. म‌ग‌ द‌र‌ खेपेला a e i o u ट‌ंकाय‌ला लाग‌ले त‌री बेहेत्त‌र‌! जास्तीत‌ जास्त‌ काय‌ होईल‌, ती पाच‌ ब‌ट‌णं मोड‌तील‌. प‌ण myम‌राठीव‌र अस‌ले श‌ंभ‌र‌ कीबोर्ड‌ कुर‌बाण आहेत‌. जोर‌ से बोलो जैमातादी.

नितिन थत्ते Mon, 03/04/2017 - 10:11

In reply to by आदूबाळ

+१
म‌ध‌ल्या स्व‌राविषयी.
म‌ला क‌र्ण‌ लिहाय‌च‌ं आहे की क‌र‌ण‌ हे ऐसी अक्ष‌रेला क‌से क‌ळेल‌?
मी ग‌म‌भ‌न‌ सोडून‌ फ‌क्त‌ ब‌राहा वाप‌र‌ले आहे. ब‌राहाचे सुद्धा ३.१ व्ह‌र्ज‌न‌ वाप‌र‌तो मोबाइल‌व‌र‌ गूग‌ल‌ इंडिक‌ कीबोर्ड‌ वाप‌र‌तो.
त‌र‌ ग‌म‌भ‌न‌ आणि ब‌राहा ३.१ यात‌ ऑल‌मोस्ट‌ काही फ‌र‌क‌ नाही. ऱ्ह‌, ज्ञ, अॅ, ऑ हे सोड‌ले त‌र‌. तिथेही म‌ध‌ला अकार‌ ट‌ंकावा लाग‌तो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/04/2017 - 08:23

In reply to by आदूबाळ

रोमन लिपीतल्या मराठीच्या शास्त्रशुद्धतेबद्दल बोलण्यासाठी मी नालायक आहे. मराठीची लिपी रोमन नाही, देवनागरी आहे; हे माझ्या डोक्यात प्रचंड साचेबद्ध पद्धतीनं बसलेलं आहे. त्यामुळे रोमन लिपीत मराठी लिहिलेलं दिसलं तर मी क्षणभरही वाया न घालवता नजर दुसरीकडे फिरवते. त्यामुळेच का काय, c म्हणजे च नाही, ch म्हणजेच च हे मला झेपत नाही.

मला सध्या प्रोग्रॅमिंगची सोय आणि तर्क बघायचे आहेत; वेळ होईल तसं ते सुधारण्याचा बदलण्याचा प्रयत्न करेनच.

ज्ञ या जोडाक्षराचा मराठी उच्चार द्+न्+य असा असला तरीही त्याचा युनिकोड ज+्+ञ असा आहे. ती माझी निवड आणि मर्यादा नाही.

नितिन थत्ते Tue, 04/04/2017 - 09:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>c म्हणजे च नाही, ch म्हणजेच च हे मला झेपत नाही.

मान्य‌. अक्ष‌राव‌र‌ मात्रा दिली की त्याचा उच्चार‌ ए होतो आणि काना देऊन‌ म‌ग‌ मात्रा दिली की उच्चार‌ ओ होतो अस‌ं का हे म‌ला प‌ण‌ झेप‌त‌ नाही.

प‌ण‌ काय‌ क‌र‌णार‌? आहे ख‌र‌ं त‌स‌ं. थोड‌ं क्वेर्टी कीबोर्ड‌सार‌ख‌ं !!

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 30/04/2017 - 18:43

In reply to by नितिन थत्ते

म्हणूनच मी बोलनागरी वापरते. त्यात कीस्ट्रोक्स कमी होतात, असा माझा अंदाज आहे.

असो. डबल e आणि डबल o चे अनुक्रमे दीर्घ ईकार आणि ऊकार झाले आहेत. च, छ आणि ष च्या बाबतीत मी सध्या सुट्टी घेत आहे. कोणी सुधारणा सुचवणार असलास तर स्वागतच आहे.

ज्यांना कोड बघण्याची हौस आहे, त्यांना तो इथे मिळेल. (दुवा) त्यात या सदरातला कोड गमभन-साठी वापरला जात आहे -

'hi_en' : {
'method' : 'gamabhana',
'maxchar' : '4',

हा कोड अगदी अस्ताव्यस्त पसरलेला आहे; कॉमेंट्सही फार नाहीत. त्यामुळे वाचायला त्रास होईल, तसदीबद्दल क्षमस्व.

आदूबाळ Sun, 02/04/2017 - 02:30

'ज्ञ‌' ची ग‌ड‌ब‌ड‌

माझ्या डोक्यात ज्ञ‌ = द् + न् + य् + अ. त्यामुळे d+n+y+a हे जास्त‌ लॉजिक‌ल‌ वाट‌तं. (प‌हिली तीन‌ ह‌ल‌न्त‌ व्य‌ंज‌नं, आणि शेव‌टी उच्चारात आण‌ण्यासाठी एक‌ स्व‌र‌.)

स‌ध्या ऐसीव‌र‌ j + Y अस‌ं दाबून ज्ञ उम‌ट‌तो आहे. त्यात‌ला j ब‌हुदा हिंदीच्या प्र‌भावामुळे आला असावा.

आदूबाळ Sun, 02/04/2017 - 02:50

म‌राठी स्व‌र‌

स्व‌र‌ प‌द्ध‌त‌१ प‌द्ध‌त‌२
a -NA-
aa A
i -NA-
I ee
u -NA-
U oo किंवा uu
e -NA-
ai -NA-
o -NA-
au -NA-
अं aM -NA-
अ: याला युनिकोड टंक नाही. कोलन वापरून कोलावा लागतो. याला युनिकोड टंक नाही. कोलन वापरून कोलावा लागतो.
अ‍ॅ E -NA-
O -NA-

"बोले तैसा चाले" चे ख‌रे पाईक‌ प‌द्ध‌त‌२ जास्त‌ वाप‌र‌तात‌.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 30/04/2017 - 18:51

In reply to by आदूबाळ

विसर्गासाठी युनिकोड आहे - 0903 वापरून विसर्ग येतो; अः (अ+विसर्ग) यासाठी स्वतंत्र - एकच युनिकोड नाही, अ आणि विसर्ग टंकावे लागतात. ऐसीवर 'गमभन'सारख्या पद्धतीत कॅपिटल एच वापरून विसर्ग टंकता येतो.

अॅ, ऑकारासाठी पूर्वीच्या 'गमभन'प्रमाणेच कॅपिटल इ आणि कॅपिटल ओ वापरता येतील.

---

'ज्ञ'ची गडबड मुळात युनिकोडातच आहे. ज+ञ आवडत नसतील तर इतर दोन व्यंजनं एकत्र करून ज्ञ टंकण्याची सोय करता येईल, पण द+न+य हे चालवणं कठीण होईल; कुठे मासोकिझममध्ये शिरायचं!