Skip to main content

भगवान देता है तो छप्पर फाडके देता है...

अलीकडील वैचारिक पुस्तकं वाचत असताना वाचकांना एका प्रकारच्या नैराश्याने वेढल्यासारखे वाटू लागते. त्यातील घटना, घटनाक्रम, घटनेवरील मल्लीनाथी, विश्लेषण आपल्याला थक्क करून सोडत असले तरी मुळात माहितीचा आघातच फार मोठा असतो. याच मालिकेतील मीरा नंदा यांचे गॉड्स मार्केट (God’s market) हे पुस्तक वाचत असताना आपला समाज कुठल्या दिशेने प्रवास करत आहे, याबद्दल रुखरुख वाटू लागते. पुस्तकाच्या उपशीर्शकात उल्लेख केल्याप्रमाणे How Globalisation is making India more Hindu हे मत आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवत आहे. मीरा नंदा यांनी गेल्या ६० – ७० वर्षाच्या कालावधीतील सामाजिक स्थितीगतीचा विचार करत करत जागतिकीकरणामुळे कुणाचे भले झाले असेल तर ते हिंदू देव-देवतांचे, त्यांच्या मंदिरांचे आणि परमेश्वराच्या अधिकृत/ अनधिकृत प्रतिनिधींचे (दलालांचे) असे त्यांना वाटत आहे.

मीरा नंदा यांनी आपल्या या पुस्तकात उदारीकरणपूर्व व उदारीकरणानंतरच्या कालखंडाचे पाच भाग केलेले असून त्या त्या कालखंडातील राजकीय व धार्मिक घडामोडीकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न ते करत आहेत. पहिल्या भागात १९४७ सालच्या लोकशाही, कल्याणकारी राष्ट्राच्या वाटचालीकडील दुर्दम्य आशावादानी भारलेल्या समाजाचा थोडक्यात दिलेली माहिती आहे. शेकडो अयशस्वी प्रयत्नानंतर जागतिकीकरणाचे वारे सुटले. समाजाचे खासगीकरणाकडील ओढ वाढू लागली. उदारीकरण म्हणजे शिक्षणातून उद्योगावकाश हा नेहमीचा रूढ अर्थ न घेता परमेश्वराचे आणि बाबाबुवांचे बाजारीकरण या अर्थानेसुद्धा घेतले जाऊ लागले. या तथाकथित नवस्वातंत्र्याचा कालखंड म्हणजे शासनव्यवस्थेचा देशाच्या अर्थकारणावरील नियंत्रण कमी कमी करत करत वंचित, गरीब व दलित यांना वाऱ्यावर सोडलेला कालखंड असे म्हणता येईल. त्यामुळे संपूर्ण समाज भांबावलेल्या अवस्थेतून जात होता. व ही अवस्था धर्माचे गोडवे गाणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी होती. मतपेटीसाठी लोकानुनय करणारे राजकारणी हिंदुत्वाच्या प्रचार/प्रसार यात मोठ्या हिरिरीने सहभागी झाले. बाबा-बुवांच्या करिष्म्याने अगतिक जनसामान्य मोहित होऊन परमेश्वराला नको तितकी प्रसिद्धी देऊ लागले.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात मध्यम वर्गाच्या वाढत्या धार्मिकीकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. कदाचित हे धार्मिकीकरण जाणून बुजून वा ठरवून केलेले नसेलही; परंतु पुरावे मात्र धार्मिकीकरणाची गडद छाया मध्यमवर्गावर पसरलेली होती, याची खात्री देतात. मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती व संख्या ज्याप्रमाणात वाढत गेली त्याच प्रमाणात भारतीय समाजावर (हिंदू) धर्माची आपली पकड आणखी घट्ट होऊ लागली. मीरा नंदाच्या मते हे वाढते धार्मिकीकरण पूर्वीच्यापेक्षा जास्त प्रतिगामी, व प्रसंगी जीव घेणारी ठरत होती. जागतिकीकरणाच्या वाहत्या प्रवाहात अनेकांनी हात धुऊन घेतले; मिळालेल्या संधीचा फायदा घेतला; अनेक जण पुढे सरसावले; गर्दी केली. परंतु या गर्दीतूनही वाट काढत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्यात परमेश्वराचे प्रतिनिधी आघाडीवर होते. परमेश्वर हे एक विक्रेय व प्रदर्शनीय वस्तु आहे याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यातल्या त्यात हिंदूंचा परमेश्वर हा उच्चकोटीचा, तारणहार, सखा, प्रेमी असे सर्व काही होता. त्यामुळे (मध्यस्थामार्फत) संवाद करण्यास काही अडचण नाही याची सर्व भक्तांना खात्री होती. त्यासाठी फक्त खिसा रिकामा करण्याची तयारी हवी एवढीच माफक इच्छा या मध्यस्थांची असे. कदाचित बदलत्या सामाजिक – आर्थिक मानसिकतेची गरज पूर्ण करण्यासाठी परमेश्वराचा व (त्यांच्या मध्यस्थांचा) आधार वाटत असल्यामुळे कुठलीही किंमत देण्याचे गणित त्यामागे असावे.

भारतातील शहरी तरुण वर्गाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकर्षणाबरोबरच धार्मिक रूढी, परंपरा, भारताचा वेदकालीन इतिहास, धर्माचे उदात्तीकरण, धर्मश्रद्धा यांचेही आकर्षण का वाटावे हे न सुटलेले कोडे ठरेल. हिंदुत्वाचे हे आधुनिक रूप मंदिरांच्या गाभाऱ्यातून कार्पोरेट ऑफिसच्या बोर्डरूमपर्यंत पोचले. ऑफिसच्या वातावरणात उत्सव, धार्मिक समारंभ साजरा करण्यात काही गैर नाही असेच सर्व संबंधिताना वाटू लागले. या नवीन कार्पोरेट संस्कृतीला खत पाणी घालण्यात माता अमृतानंदमयी, स्वामी दयानंद, श्रीश्री रवी शंकर, बाबा रामदेव यांचा पुढाकार होता.

उत्क्रांतीत ज्या प्रकारे परस्पर पूरक बाबीतून उद्दिष्ट सफल होत असतो तसाच काहीसा प्रकार येथेही घडत असावा. जागतिकीकरणाला धर्मसंस्थांचा आधार व धर्मसंस्थांना कार्पोरेट्सचा टेकू असे हे स्वरूप असावे. परंतु जागतिकीकरणाची भलावण करत करत आपली जबाबदारी झटकणाऱ्या शासनाला धर्मसंस्थेच्या या नवीन स्वरूपाला शरण जावेसे वाटले असावे. त्यामुळे मीरा नंदा यांना धर्मसंस्था व कार्पोरेट्स बरोबरच स्टेटलासुद्धा या युतीत जोडण्यासाठी फार विचार करावेसे वाटले नसेल. शासन-मंदिर-कार्पोरेट्सची युती (State-Temple-Corporate Complex ) भारतीय समाजाला गिळंकृत करत आहे.

आधुनिक लोकशाही राष्ट्रं धर्मनिरपेक्षतेच्या (Secularism) कोनशिलेवर भक्कमपणे उभे आहेत. त्या राष्ट्रांच्या लिखित वा अलिखित घटनेमध्ये याचा उल्लेख आढळतो. शासन-प्रशासन व्यवस्थेत धर्माची, धर्मसंस्थाची, धार्मिक नेतृत्वाची लुडबुड खपवून घेणार नाही याची हमी येथे दिलेली असते. सार्वजनिक ठिकाणी वा शासनाच्या खर्चाने धर्माचे उदात्तीकरण होत असल्यास राष्ट्रातील न्यायपालिका जाब विचारू शकते. वाटेल तसे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काढता येत नाही. परंतु आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेची थट्टा होत आहे की काय अशी स्थिती आहे. गंमत म्हणजे धर्माच्या संबंधातील बहुसंख्य अल्पसंख्यांकाची तुष्टीकरण होत आहे म्हणून शासनावार दोषारोप करत असतात व अल्पसंख्य धर्माच्या बाबतीत बहुसंख्यांचा दबाव वाढत आहे असे तक्रार करत असतात. शासनाच्या या सेक्युलर धोरणामुळे हिंदू धार्मिकांना दुखवून अन्य धार्मिकांचे पारडे जड केले जात आहे, अशी बहुसंख्य हिंदू धार्मिकांची भावना आहे. परंतु लेखिकेच्या मते यात काही तथ्य नाही. कागदोपत्री शासन व्यवस्था अजूनही सेक्युलर आहे; परंतु निवडणुकीच्या वेळी बहुसंख्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी आसुसलेले राजकीय नेते व त्यांचे लांगूलचालन करणारे अभिजन यांच्या वाढत्या दबावामुळे शासन हतबल होत आहे (की लोकानुनयासाठी उत्तेजन देत आहे?) आणि शासन व धर्म याची सुप्त (अभद्र) युती समाजात दिसत आहे. कट्टर हिंदूंनाही या युतीतुन वारेमाप फायदा होत असल्यामुळे तेच नेहमी हिंदूना सापत्निक वागणूक मिळते म्हणून गळा काढत असतात.

शासन-मंदिर-कार्पोरेट्सच्या युतीचे मूळ शोधत असताना लेखिकेने युतीच्या आर्थिक व्यवहाराकडे बारकाईने निरीक्षण केले. ही युती म्हणजेच एक उद्योग व्यवस्था असून हा उद्योग चांगलाच भरभराटीत आहे, याची ग्वाही कुणीही देऊ शकेल. पुस्तकाच्या एका प्रकरणात या युतीमुळे संस्कृतीवर – विशेष करून शिक्षण, धर्म, नीती, आरोग्य, कला, साहित्य इ.इ. वर – कशा प्रकारे अनिष्ट परिणाम होत आहेत याचा सविस्तर उल्लेख आहे. धार्मिक रूढी - परंपरांना शासनाचा राजकीय व आर्थिक पाठिंबा हा पुरोगाम्यांसाठी चिंतेचा विषय होत आहे. देशभरातील उदाहरणं देत मीरा नंदा, धर्माचा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, कॉलेजेस, विद्यापीठ यांच्यावर कशाप्रकारे प्रभाव होत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

गंमत म्हणजे राष्ट्रवाद व धर्मवाद यांचीसुद्धा सांगड घालण्याचा येथे प्रयत्न होत आहे. काही प्रमाणात इस्लाम वा ख्रिश्चन धर्मग्रंथ त्यांच्या अनुयायांना एकसंधपणे जीवन जगण्याची शिकवण देत असतात. तद्विरुद्ध हिंदू धर्म रूढी, परंपरा, उत्सव, पुराण कथा, पौराणिक प्रसंग वा स्थळ इत्यादीवर आधारित जीवनशैली असण्यावर भर देते. सुट्या सुट्या बारीक सारीक धाग्यांना पीळ देऊन घट्ट दोरा विणल्यासारखे विविध धार्मिक विधी व निष्ठा हिंदू यातून हिंदू मानसिकता विकसित होते व हेच धर्माची ओळख म्हणून जपली जाते. परंतु या प्रकारच्या कर्मकांडामुळे व कर्मकांडानाच धर्म म्हणून ओळखण्याच्या मानसिकतेमुळे हिदू धर्माची मूळ शिकवण विसरली जाते, हे हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांच्या लक्षात येत नसावे. धार्मिक रूढी-परंपरा, उत्सव, यात्रास्थळे, इत्यादीत जखडून घेतलेले सामान्य हिंदू धार्मिक आणि युतीचे अंग असलेले शासन, मंदिरांचे व्यवस्थापक व यांच्या जिवावर जगणारे कार्पोरेट्स, एका प्रकारचा खेळ खेळत आहेत की काय असे वाटू लागते. रूढी, परंपरांच्या जंजाळात संपूर्ण समाजाला अडकून ठेवण्यात ही युती पूर्णपणे यशस्वी होत आहे.

एका प्रकरणात मीरा नंदा यानी भारतीयांच्या आपल्या संस्कृतीबद्दलच्या अवास्तव कल्पनेबद्दल ताशेरे ओढले आहेत. जगातला आमचाच धर्म पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हणणाऱ्यात भारतीयांचाच प्रथम क्रमांक लागेल यात शंका नसावी. स्वातंत्र्योत्तर काळात या मानासिकतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर वर्षी कॉलेजेसमधून बाहेर पडणाऱ्या आय टी प्रशिक्षित इंजिनीयर्सच्या प्रचंड संख्येवरून व जागतिक बाजारपेठेतील त्यांची पत व त्यांच्यावर होत असलेल्या पैशाच्या वर्षावावरून हे गृहितक उत्तरोत्तर भारतीयांच्या गौरवाचा विषय होत आहे. संगणक तज्ञ, महत्वाच्या पदावरील अनेक भारतीय वा विचारवंत या सर्वांना हिंदुत्वामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय संगणक तज्ञ जगभर पसरलेले आहेत, असे खरोखरच वाटत आहे. परंतु मीरा नंदा मात्र काही ठळक उदाहरणं देत या मिथकाचा पर्दाफाश करत आहेत. आणि या संबंधातील वास्तव अगदीच वेगळे आहे असे सुचवतात.

शेवटच्या प्रकरणात मीरा नंदा यांनी विद्वेष सिद्धांत (Theory of hatred) हा शब्द प्रयोग करून हिंदुत्व ‘सेना’ फॅसिझमला खतपाणी घालत आहे, या निष्कर्षाप्रत ते पोचतात. ही ‘थेअरी ऑफ हेट्रेड’ आपण (आणि आपला हिंदू धर्म) अन्य धर्म वा धार्मिकाबाबत किती सहिष्णू आहोत हे फक्त हिंदू धर्मामुळेच शक्य झाले, यावर भर देत आहे. इतर धर्मीयाबद्दलचा हा द्वेष भारतीयांचा गुणविशेष ठरत आहे. वरचेवर उफाळून येणारा हा विद्वेष अल्पसंख्यांकांना कायमचेच भीतीच्या दडपणाखाली जगण्यास भाग पाडत आहे. हिंदू अभिजन वा विचारवंतांची निष्क्रियता या फॅसिस्ट वृत्तीला उपकारक ठरत आहे. काही तथाकथित हिंदू विचारवंतांच्या दबावामुळे माध्यमातूनही हाच आवाज प्रतिध्वनित होत आहे. मुस्लिम व इतर धर्मीय हे उपरे असून त्यांनी दुय्यम नागरिकत्व पत्करले पाहिजे हाच प्रयत्न येथे होत आहे. खरे पाहता हिंदू धर्म वा जीवनशैली म्हणून प्रभाव नसलेले सेक्युलरिझमच भारताला प्रगतीपथावर नेऊ शकेल असा आत्मविश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.

जागतिकीकरणाच्या या कालखंडात जगातील इतर देश, धर्म वा सेक्युलरिझमकडे ज्या दृष्टीने बघतात याचाही ऊहापोह लेखिकेने केला आहे. एक मात्र खरे की गेल्या वीस – तीस वर्षाच्या उदारीकरणाच्या झंझावातात धर्माचा प्रभाव अजिबात कमी न होता उलट वाढतच आहे. याचे प्रमुख कारण सांस्कृतिक संघ, संस्था व संघटनांकडून सेक्युलरिझमचा चुकीचा काढलेला अर्थ असावा. विशेषकरून भारतीयांचा सेक्युलरिझम हा इतर प्रगत लोकशाही राष्ट्रांपेक्षा फारच वेगळा आहे, असे जाणवते. जागतिकीकरणाच्या वातावरणात धर्माचा वाढता प्रभाव आणि धर्मनिरपेक्षतेला तिलांजली असा काहीसा प्रकार येथे होत आहे. जागतिकीकरण व सेक्युलरिझम मधील दरी वाढत आहे.

पीटर बर्गर या समाजशास्त्रज्ञाचा संदर्भ देत लेखिकेला धर्म आणि राष्ट्र हे दोन्ही संस्कृतीच्या अधिष्ठानासाठी एकमेकासमोर स्पर्धक म्हणून उभे आहेत अशी आताची स्थिती आहे, असे वाटते. खरे पाहता विवेक, तर्क, मानवता, सहानुभूती, सहिष्णुता इत्यादींचा प्रभाव जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात असण्याची गरज आहे. त्यातूनच मानवतावादी संस्कृतीचे संवर्धन होऊ शकते. परंतु धर्मव्यवहारच आता जनसामान्यांच्या जीवनात वरचढ ठरत आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा प्रभाव असलेल्या या बदलत्या परिस्थितीत धर्माचरण हे एक निरुपयोगी कर्मकांड असायला हवे होता. व एव्हाना कालबाह्य व्हायला हवे होते. परंतु धर्माचे पुरस्कर्ते शासनाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदतीने जबरदस्तीने समाजावर धर्माचरण लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात या धर्माचरणात चमत्कार, अतींद्रियशक्ती, वा मिथकं इत्यादींचेच उदात्तीकरण केलेले असते. त्याला कुठलाही, तार्किक, वैज्ञानिक वा नैतिक आधार नाही. भौतिक सुखाच्या शोधासाठी अत्यंत अनुकूल ठरत असलेल्या जागतिकीकरणात यांचाही मागमूसही नसावा, अशी अपेक्षा असते.

धर्म व जागतिकीकरण यांच्यातील घनिष्ठ संबंधाप्रमाणे धर्म आणि अर्थकारण यांच्यातील संबंधाविषयीसुद्धा लेखिकेने विश्लेषण केले आहे. मुळात धर्माला चिकटून असलेल्या समाजात कमालीचे दारिद्र्य असते, असे तिचे मत आहे. आणि त्या समाजात श्रीमंत व गरीब यांच्यात फार मोठी दरी असते. ही विषमता गरीबांना धर्माचरणाकडे खेचते. जागतिक बाजारपेठेत मागणी तसा पुरवठा या तत्वाचा दबाव असल्यामुळे प्रत्येक धर्म बाजारपेठेतील वाट्यासाठी स्पर्धा करत असतात. भारतीय बाजारपेठ त्या तुलनेने फारच मोठा असल्यामुळे हिंदू धर्माची चांगलीच चलती आहे. व परमेश्वर त्याच्या व्यापाऱ्यांना ‘छप्पर फाडके’ देत आहे.

कदाचित समाजाला सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावेसे वाटल्यास अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या व शोषणाला उत्तेजन देणाऱ्या धर्माला उतरती कळा लागेल. त्यासाठी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे तंतोतंत पालन हवे व धर्माला चार भिंतीतच रहायला भाग पाडायला हवे.

मीरा नंदा यांचे हे पुस्तक मानवता, विज्ञान व धर्मनिरपेक्षता या सारख्या संकल्पनाबद्दल व त्यांचा व्यवहारात उपयोग करायला हवे यासाठी आस्था असणाऱ्या सर्वांसाठी आहे. कट्टर धार्मिकतेच्या या पोषक वातावरणात विवेकी विचारांना थारा देणे अत्यंत कठिण काम आहे असे वाटत असले तरी त्याला पर्याय नाही. मीरा नंदा यांचे हे पुस्तक (व त्यांची इतर पुस्तकं) वाचताना विकासाची दिशा विवेकवादी असलेच पाहिजे हे जाणवते. मीरा नंदा व रोमिला थापर याच गोष्टींचा पाठपुरावा करत असून या सत्याला सामोरे जाण्याचा आव्हान करत आहेत. लेखिका गॉड्स मार्केट या त्यांच्या पुस्तकातून आपल्याला धार्मिकतेचे प्रदूषण कशा प्रकारे वाढत आहे व त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला नेमकी कुठली भूमिका घ्यायला हवी हे आवर्जून सांगत आहेत.

गॉड्स मार्केट
(हाउ ग्लोबलायजेशन इज मेकींग इंडिया मोर हिंदू)
मीरा नंदा
रँडम हौस इंडिया प्रकाशन
किंमतः ३९५ रू पाः २३९

समीक्षेचा विषय निवडा

अनुप ढेरे Sun, 23/04/2017 - 16:21

न‌क्की प्रोब्लेम स‌म‌ज‌ला नाही.

गरीब व दलित यांना वाऱ्यावर सोडलेला कालखंड असे म्हणता येईल.

१९९१ न‌ंत‌र‌ ग‌रिबी भ‌र‌पूर‌ क‌मी झाली आहे. याव‌र‌ अनेक‌ लेख‌, पेप‌र‌ आहेत‌. त‌री यांना वाऱ्याव‌र‌ सोड‌ल‌ं हे क‌शाचा आधाराव‌र‌ म्ह‌ण‌तात‌ लेखीका?

भारतातील शहरी तरुण वर्गाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकर्षणाबरोबरच धार्मिक रूढी, परंपरा, भारताचा वेदकालीन इतिहास, धर्माचे उदात्तीकरण, धर्मश्रद्धा यांचेही आकर्षण का वाटावे हे न सुटलेले कोडे ठरेल.

इत‌र‌ जगाशी स‌ंब‌ंश‌ आल्याने असेल मेबी प‌ण आप‌ले स‌ण‌, प‌र‌ंप‌रा यांची केव‌ळ‌ लाज‌च‌ बाळ‌ग‌ली पाहिजे अस‌ं नाही हे स‌म‌जल‌ं असाव‌ं.

ऑफिसच्या वातावरणात उत्सव, धार्मिक समारंभ साजरा करण्यात काही गैर नाही असेच सर्व संबंधिताना वाटू लागले.

यात‌ न‌क्की प्राब्लेम‌ काये? आणि ब‌ऱ्याच‌ देशांत‌ ह‌पिसात‌ नाताळ‌ पार्टी अस‌ते. सो धार्मिक‌ स‌ण‌ ह‌पिसात‌ साज‌रे क‌र‌णे केव‌ळ‌ इथेच न‌व्याने सुरू झाले असे नाही. इत‌र‌ जगाशी स‌ंब‌ंध‌ वाढ‌ल्याव‌र‌ "अरेच्या! आप‌ण‌ही क‌रू अस‌ं" हे वाट‌ल्यास‌ न‌व‌ल‌ नाही. चूक‌ देखील‌ नाही.

हिदू धर्माची मूळ शिकवण विसरली जाते, हे हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांच्या लक्षात येत नसावे.

हिंदू ध‌र्माची मूळ‌ शिक‌व‌ण‌ काये न‌क्की?

विचारवंतांची निष्क्रियता

पिव‌ळा पितांब‌र‌?

चिमणराव Sun, 23/04/2017 - 17:36

पुस्तक परीक्षण आवडले॥ लेखिकेशी प्रत्येक बाबतीत सहमत नाही. विशेषत: अनुमाने कशावरून काढली.
राज्यकर्ते आणि कार्पोरेट/मोठ्या गुंतवणकदार कंपन्या यांचे धोरण अर्थातच आपली सत्ता/नफा बळकट करण्यासाठी प्रभाव पडणाय्रा गोष्टी सुरू करायच्या ,ठेवायच्या असे असते.निव्वळ स्वार्थच. वैयक्तिक पातळीवर गरीब श्रीमंत काही गोष्टी स्वत:च्या स्वार्थासाठी ठरताना कधीकधी त्याचे मन आपण चुकीच्या गोष्टी करतो असा गंड निर्माण होऊ लागला की देवाच्या प्रतिनिधींचा धार्मिक आचरणाचा आसरा घेऊ पाहतो.

राजेश घासकडवी Sun, 23/04/2017 - 19:34

शरद म्हणतात तसंच, परीक्षण आवडलं पण लेखिकेची सर्वच मांडणी पटली असं नाही. किंबहुना हिंदवीकरण होतं आहे म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच होतं पण आता पुढे आलेलं आहे. जोपर्यंत प्रचंड गरीबी होती, तोपर्यंत धार्मिक अजेंडा त्यामानाने महत्त्वाचा नव्हता. आता पोटोबा थोडा भरलेला असताना विठोबाचा विचार होतो आहे.

लेखिकेने एके ठिकाणी 'मूळ हिंदू शिकवण विसरली जात आहे' असं म्हटलं आहे. ही शिकवण नक्की काय? पुरुषप्रधानता, जाती/वर्णव्यवस्था आणि पुनर्जन्मावर विश्वास या तीन गोष्टी सोडल्या तर मला तरी वेगळी हिंदू धर्माची अशी खास शिकवण माहीत नाही.

चिमणराव Sun, 23/04/2017 - 21:40

In reply to by राजेश घासकडवी

देवाचा ,देवाधर्माचा बाजार याचा विस्तार करताना थोडी स्वत:ची पक्की मते लिहून टाकली असतील. बाजारची बैठक मागणी पुरवठा भावचढउतार यावर आहे ती देवाधर्माच्या बाजाराला कशी लागू आहे हे वाढवायला हवे.

गब्बर सिंग Mon, 15/05/2017 - 21:26

In reply to by चिमणराव

बाजारची बैठक मागणी पुरवठा भावचढउतार यावर आहे ती देवाधर्माच्या बाजाराला कशी लागू आहे हे वाढवायला हवे.

उदा ब‌घा - हिंदु ध‌र्मात देवांची मोनोपोली नाही. अनेद देव आहेत्. इत‌र अनेक ध‌र्मांत देवांची/प्रेषितांंची मोनोपोली आहे. म्ह‌ंजे अनेक देवांचा पुर‌वठा आहे. व त्यांच्याम‌धे स्प‌र्धा आहे. अनेक देव हे स्व‌त्:ला इत‌रांच्या तुल‌नेत differentiate क‌र‌तात्. उदा. श‌क्तिदेव‌ता, विद्यादेवता, स‌ंगीत‌देव‌ता, ध‌नाची देव‌ता व‌गैरे.

--

सिरिय‌स‌ली - देव‌ध‌र्माचा बाजार अस‌णे हे योग्य‌च आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 13/05/2017 - 22:38

In reply to by राजेश घासकडवी

लेखिकेने एके ठिकाणी 'मूळ हिंदू शिकवण विसरली जात आहे' असं म्हटलं आहे. ही शिकवण नक्की काय? पुरुषप्रधानता, जाती/वर्णव्यवस्था आणि पुनर्जन्मावर विश्वास या तीन गोष्टी सोडल्या तर मला तरी वेगळी हिंदू धर्माची अशी खास शिकवण माहीत नाही.

पुस्तक वाचलेलं नाही; वाचण्याची इच्छा होत आहे. पण अंदाज ... विशेषतः 'द केस फॉर क्राईस्ट' बघण्याचा अनुभव मिळवल्यावर ... आमचा देव हाच खरा देव असा अनुदारमतवाद हिंदूंमध्ये नाही. महिना बदलला की देव बदलतात, भाद्रपदात गणपती असतो, अश्विनात देवी असते. त्यातही उच्चवर्णीय आणि कनिष्ठवर्णीयांची दैवतं निराळी असली तरीही देऊळ, देव म्हटल्यावर हिंदूंना नमस्कार करायला अडचण नसते. आणि असं करण्याच्या आड देवळांतले भटजीही येत नाहीत. पुरेसे अनुयायी गोळा करून कोणीही बाबा-बुवा बनू शकतात. कोणतं धर्मपीठ गल्लीबोळांतल्या गणपतींना किंवा बाबा-बुवांना परवानगी द्यायला नसतं.

किंवा उद्या कोणी म्हटलं की माझा देव म्हणजे आवारात सापडलेला हा दगड, तर त्यावर कोणी आक्षेप घेत नाहीत. उलट तिथे नवीन दैवत तयार होऊ शकतं. अब्राहमिक धर्मांत ही सोय नाही.

मुद्दा हा, हिंदू धर्म उदारमतवादी आहे. आपापले देव मानण्याची सोय त्यात आहे. सर्वसमावेशकता आहे. (तरीही जाती, भेदभाव चिकार आहेत, हे खरंच.)

बॅटमॅन Sun, 14/05/2017 - 15:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आय‌डी हॅक झाल्याचे उदाह‌र‌ण‌ म्ह‌णून हा प्र‌तिसाद म‌आंजाच्या इतिहासात गोल्ड‌न क‌ल‌र‌ हेच‌टीएमेल‌ने लिहिल्या जावा.

अनुप ढेरे Sun, 14/05/2017 - 20:22

In reply to by बॅटमॅन

हा हा हा +१.

'आज‌चे दिन‌वैशिष्ट्य‌'म‌ध्ये या प्र‌तिसादाची नोंद‌ घेण्यात यावी अशी व्य‌वस्थाप‌कांना विन‌ंती कर‌तो.

"१४ मे
(२०१७) अच्छे दिन आले."

अशी

बॅटमॅन Mon, 15/05/2017 - 02:13

In reply to by अनुप ढेरे

अग‌दी अग‌दी =)) =)) =))

त्यासोब‌त‌च‌ "(ख‌रोख‌र‌चे)" हेही जोडावे अशी एक पोट‌शिफार‌स‌ही सुच‌व‌ण्यात येत‌ आहे.

बाय‌द‌वे हा विचार‌ ज‌र‌ १६ मे रोजीच आला अस‌ता त‌र ती ऐसी-इतिहासातील‌ अतिश‌य‌ प्र‌तीक‌संपृक्त‌ घ‌ट‌ना ठ‌र‌ली अस‌ती. आत्ताचेही टाय‌मिंग एक‌द‌म ज‌ब‌ऱ्या आहेच म्ह‌णा, फ‌क्त‌ दोन दिव‌स अगोद‌र‌.

अबापट Sun, 14/05/2017 - 18:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आहे असे. धर्मात सोय आहे . ( असावी) तुमच्या देशातील सहकार्यांना "नास्तिक मंडळींना पण हिंदू धर्मात जागा आहे "असे सांगून त्यांचे गोंधळलेले चेहरे बघायला मजा यायची. आपल्या धर्माची ढाबळ मोठी आहे . ( ते जिझस आणि मोहम्मद आले नाही इकडे म्हणून राहून गेले, नाहीतर ११ वा आणि १२ वा म्हणून बुद्ध करून टाकला असता ) अशी तुलना कुठल्याही stuctured पोथीनिष्ठ धर्म आणि हे धर्म अतित्वात यायच्या आधीच्या व्यवस्था यात केल्यास हेच चित्र दिसते .पण एकदा धार्मिक/पंथीक अस्मितां मधे आल्या की गोंधळ चालू होत असावा .

'न'वी बाजू Sun, 14/05/2017 - 19:13

In reply to by अबापट

ते जिझस आणि मोहम्मद आले नाही इकडे म्हणून राहून गेले, नाहीतर...

मुहम्मदाचे माहीत नाही, पण येशू मरायला काश्मिरात आला होता, अशी एक थियरी ऐकलेली आहे. (बाकी, मुहम्मदाचा केस की काय तो तोसुद्धा काश्मिरात सापडतो, नाही? तो कसा आला असावा, ते कळत नाही. कदाचित नेहरूंचे कपडे धुलाईसाठी स्वित्झर्लंडला की कुठेसे जायचे म्हणतात, तद्वत मुहम्मद (पत्याशांदे) हेअरकटकरिता काश्मिरास येत असावा काय? नि तेथील त्याच्या बाय-स्पेशल-अपॉइंटमेंट-टू-द-वन-अँड-ओन्ली-प्रॉफेट-मुहम्मद पर्सनल हजामाने श्मश्रूनंतर झाडता झाडता हळूच (म्हातारपणी नातवंडांना ष्टोऱ्या रंगवून सांगता येण्याकरिता प्रॉप म्हणून) त्यातला एखादा केस उचलून बाजूला ठेवला असावा काय?)

(बाकी, मुहम्मदाला कितवासा 'अवतार' म्हणणे वुड प्रॉबेब्ली बी कन्सिडर्ड द अल्टिमेट ब्लास्फेमी, नाही काय? सबब, जरा जपून!)

गब्बर सिंग Mon, 15/05/2017 - 21:16

In reply to by राजेश घासकडवी

लेखिकेने एके ठिकाणी 'मूळ हिंदू शिकवण विसरली जात आहे' असं म्हटलं आहे. ही शिकवण नक्की काय? पुरुषप्रधानता, जाती/वर्णव्यवस्था आणि पुनर्जन्मावर विश्वास या तीन गोष्टी सोडल्या तर मला तरी वेगळी हिंदू धर्माची अशी खास शिकवण माहीत नाही.

मी सांग‌तो ना - हिंदु ध‌र्माची खास शिक‌व‌ण ही की - व्य‌क्तीच्या क‌र्मा च्या आधाराव‌र तिचे मूल्य‌माप‌न केले जावे. व्य‌क्ती कोणाच्या पोटी ज‌न्माला आली त्याच्या आधाराव‌र न‌ क‌र‌ता. ही शिक‌व‌ण आच‌र‌णात आण‌णारा भ‌र‌त राजा. म्ह‌णून भ‌र‌त‌भूमिला भार‌त असे स‌ंबोध‌ले जाते.

( हे स‌ग‌ळेज‌ण आच‌र‌णात आण‌तात असे म‌ला म्ह‌णाय‌चे नाही. प‌ण हिंदु ध‌र्माची ही मूळ, ओरिजिन‌ल शिक‌व‌ण आहे. )

उडन खटोला Mon, 01/05/2017 - 22:52

असे एखादे अभ्यासात्म‌क पुस्त‌क ज‌ग‌भ‌रातील ख्रिश्च‌न लॉबी आणि च‌र्चना अनेक उद्योगान्क‌डून मिळ‌णारे प्र‌च‌न्ड डोनेश‌न आणि त्याचा भार‌तासार‌ख्या हिन्दुब‌हुल देशात ख्रिश्च‌न ध‌र्म‌प्र‌सारासाठी होत अस‌लेला उप‌योग याब‌द्द‌ल का ब‌रे नाही लिहिले या म्याड‌म नी?
अथ‌वा म‌ध्य‌पूर्वेतील तेल उत्पाद‌क राष्ह्ट्रान्क‌डून आय‌सिस व तालिबान सार‌ख्या स‌ङ्घ्ह‌ट‌नाना जिहादी द‌ह‌श‌त‌वादी कार‌वाया क‌र‌न्यासाठी जे आर्थिक पाठ‌ब‌ळ व श‌स्त्र‌पुर‌व‌ठा होतो त्याचा अभ्यास का ब‌रे क‌रीत नाहीत या मीराबाई?

किम्वा म‌ग भार‌तातील अनेक फुक‌ट्या एन जी ओ'ज ना प‌र‌देशातून मिळ‌णारा प्र‌च‌न्ड पैसा आणि त्याचा देशात अराज‌क माज‌व‌ण्यासाठी / न‌क्श‌ली कार‌वायासाठी आणि जे एन यु त‌ल्या डाव्या देश‌द्रोही कार‌वाय‌न्साठी क‌सा हा पैस्सा युटिलाइझ होतो याब‌द्द‌ल ही लिहा की न‌न्दा म्याड‌म्

राजेश घासकडवी Tue, 02/05/2017 - 06:19

In reply to by उडन खटोला

मी काय म्हणतो, त्यांनी हे का लिहिलं नाही, असं विचारण्यापेक्षा तुम्हीच त्या विषयांवर का लिहीत नाही?

प्रकाश घाटपांडे Tue, 02/05/2017 - 09:39

In reply to by राजेश घासकडवी

या मालिकेत अजून‌ही काही प्र‌श्न‌ येतात‌. उदा.
लोक‌प्र‌तिनिधींचे दोष वा त्रुटी दाख‌व‌ण्यापेक्शा तुम्हीच‌ का निव‌डून येउन लोक‌प्र‌तिनिधी होत‌ नाही?
गायनाच्या मैफिलित‌ ग‌व‌ईबुवांचे गाय‌न‌ हे 'त्या' उंचीला यावेळी पोहोच‌ल नाही असे म्ह‌ण‌णाऱ्या द‌र्दी श्रोत्याला ग‌व‌याने म्ह‌णावे म‌ग‌ तुम्हीच‌ का गात‌ नाही?

बॅटमॅन Tue, 02/05/2017 - 12:15

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रेग्न‌न्सीब‌द्द‌ल काही लिहिले की "तुम्हीच‌ का प्रेग्नंट‌ होत‌ नाही?" छापाचे प्र‌श्न‌.

राजेश घासकडवी Thu, 04/05/2017 - 16:10

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे थोडं वेगळं आहे. 'गायकाने तीन राग गायले, पण चौथा का गायला नाही?' असा काहीसा प्रश्न विचारणं आहे. म्हणजे गायकाच्या गायकीबद्दल तक्रार नसून ती 'गायकाने अमुकच गायलच्च पाहिजे' असा तो हट्ट आहे. 'किशोरीबाईंनी सहेला रे गायलं, पण त्यांना रंबा हो हो हो म्हणायला सांगा की' असलं चमत्कारिक म्हणणं आहे.

अजो१२३ Tue, 09/05/2017 - 12:20

मीरा नंदा यांनी गेल्या ६० – ७० वर्षाच्या कालावधीतील सामाजिक स्थितीगतीचा विचार करत करत जागतिकीकरणामुळे कुणाचे भले झाले असेल तर ते हिंदू देव-देवतांचे, त्यांच्या मंदिरांचे आणि परमेश्वराच्या अधिकृत/ अनधिकृत प्रतिनिधींचे (दलालांचे) असे त्यांना वाटत आहे.

एवढे वाचून मीरा बाईच्या भजनांत काय असेल ते कळेल. https://en.wikipedia.org/wiki/Meera_Nanda इथला अल्प परिचय वाचल्यावर यांची बाकीची कथांनी वाचायची गरज नाही हे कळते. It takes completely vacant cranium to say what has been quoted above.

प्रभाकर नानावटी Wed, 10/05/2017 - 12:05

In reply to by अजो१२३

माझ्या अल्पबुद्धीला कळल्याप्रमाणे या प्रतिसादातील मतितार्थ 'मीरा (नंदा)बाईचे भजन' हा बिनडोकपणाचा कळस असल्यामुळे (बुद्धीवंत) वाचकांनी तिचे काहीही वाचण्याची गरज नाही. असे असावे असे वाटते. याविषयी कदाचित मतभेद असू शकतील. परंतु मीरा नंदा केवळ हिंदू संस्कृतीच्या बाजारीकरणाबद्दलच लिहित नसून इतर धर्मांच्या बाजारीकरणाबद्दलही तेवढ्याच पोटतिडिकीने लिहितात. अजो यांनी उल्लेख केलेल्या संदर्भातील
However, Nanda has pointed out that her criticism was equally applicable to all "resurgent religious-political movements" not only among Hindus, but also Christians and Muslims. The Bush White House's recruitment of Christian evangelicals and corporate scientists to shape policies on issues such as open support for Biblical Flood geology and stem cell research was very similar to the state support for Vedic astrology by the Hindu nationalists.
हे वाक्य त्याची साक्ष देतात.
आपल्या 'महान हिंदू संस्कृती'बद्दल असल्या प्रकारचे अनुद्गार काढणे हा गुन्हा असल्यास भजन कर्त्या मीरा नंदा(बाई)ना योग्य शिक्षा देण्यात यावे. परंतु वाचकांनी त्यांचे काही (पुढचे) वाचू नये हा आदेश वाचकांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. (चू. भू. दे. घे.)

अजो१२३ Wed, 10/05/2017 - 14:22

In reply to by प्रभाकर नानावटी

प्र‌श्न हिंदू वा अन्य असा नाहि, मूळात जाग‌तिकिक‌र‌णाचे तोटार्थि स्थानिक ध‌र्म आहेत्. या बाई असं जे म्ह‌ण‌त आहेत ते काहि अभ्यासापोटि मानावं त‌र त्यांचं रेप्युटेश‌न आड येतं.

बॅटमॅन Wed, 10/05/2017 - 14:23

In reply to by प्रभाकर नानावटी

नंदाबाईंनी इस्लाम‌ब‌द्द‌ल काय लिहिले हे पाह‌णे रोच‌क ठ‌रेल‌. हिंदू ध‌र्म आणि अलीक‌डे ख्रिश्च‌न‌ ध‌र्म ही सोपी टार्गेट्स आहेत‌.

गब्बर सिंग Wed, 17/05/2017 - 02:11

In reply to by बॅटमॅन

नंदाबाईंनी इस्लाम‌ब‌द्द‌ल काय लिहिले हे पाह‌णे रोच‌क ठ‌रेल‌.

म‌ला आडाखा बांध‌ता येतोय त्यांच्या इस्लाम ब‌द्द‌ल‌च्या म‌तांब‌द्द‌ल : "इस्लाम हा प‌र‌फेक्ट चा स‌मानार्थी श‌ब्द आहे व हिंदूंना उगीच‌च इस्लामोफोबिया आहे" अशा छापाची म‌ते अस‌णार‌ आहेत.

अनुप ढेरे Wed, 10/05/2017 - 14:34

1990/91चं जागतिकीकरण आणि बाजारीकरण याचे भारताला नक्की तोटे काय झालेत याचा अभ्यास आहे का कुठे? म्हणजे मटिरिअल गोष्टींबाबत जसं की भुक, आरोग्य, घरं एकूणच आयुष्याची क्वालिटी आदीबद्दल. (चंगळवाद वगैरे फ्लफी गोष्टी नकोत. )

नानवटींच्या दोन्ही लेखाता यावर भाष्य आहे म्हणुना विचारलं.

राजेश घासकडवी Sat, 13/05/2017 - 18:25

In reply to by अनुप ढेरे

जागतिकीकरणामुळे की इतर कशामुळे ते माहीत नसलं तरी बहुतेक सगळेच निर्देशांक सुधारलेले आहे. आयुर्मान, सुबत्ता, गरीबीचं प्रमाण, साक्षरता, गुन्हेगारी, अन्न उत्पादन, फर्टिलिटी रेट, बालमृत्यू या व अशा इतर अनेक बाबींत प्रगतीच आहे.

अनुप ढेरे Sat, 13/05/2017 - 21:57

In reply to by राजेश घासकडवी

मग‌ लेखिका पुस्त‌कात‌

वंचित, गरीब व दलित यांना वाऱ्यावर सोडलेला कालखंड असे म्हणता येईल.

हे विधान‌ न‌क्की क‌शाचा आधाराव‌र‌ क‌र‌तात‌? का हे विधान‌ धागाक‌र्त्याने अॅड‌ केलेल‌ं आहे?

आणि आप‌ले अजो जे म्ह‌ण‌तात‌ की जुना काल‌च‌ चांग‌ला होता, त्या म‌तात‌ आणि लेखिकेच्या "नव्या काळात‌ ग‌रिब, द‌लितांसाठी काही नाही" या म‌तात काय फ‌र‌क‌ आहे?

राजेश घासकडवी Sun, 14/05/2017 - 06:02

In reply to by अनुप ढेरे

अशी विधानं अनेक लोकं करतात. म्हणून ती खरी ठरत नाहीत. जर त्यावरून जुनं ते सोनं असा निष्कर्ष कोणाला काढायचा असला तर ती त्यांची खाजगी बाब आहे. विदा हेच दर्शवतो की 1990 पासून सर्वसाधारण आयुष्य सुधारलेलं आहे. 1990 पूर्वी किती लोकांकडे सेलफोन होते?

गब्बर सिंग Mon, 15/05/2017 - 20:36

In reply to by राजेश घासकडवी

विदा हेच दर्शवतो की 1990 पासून सर्वसाधारण आयुष्य सुधारलेलं आहे. 1990 पूर्वी किती लोकांकडे सेलफोन होते?

साधु साधु !!!

स‌र्व‌साधार‌ण‌प‌णे बोलाय‌चे त‌र् क्लासिक‌ल लिब‌र‌लिझ‌म चे मूल‌त‌त्व १९९१ च्या आर्थिक सुधार‌णांमागे होते. म‌मोसिंची कृपा म्ह‌णावी.

--

म‌ला हे आश्च‌र्य वाट‌तंय की ... "सेल‌फोन‌मुळे पोट भ‌र‌त नाही ओ !!!" असला डाय‌लॉग अजून कुणीही क‌साकाय मार‌ला नाही ??

अनु राव Wed, 17/05/2017 - 10:05

In reply to by गब्बर सिंग

म‌मोसिंची कृपा म्ह‌णावी.

म‌मोचा काहीही संबंध नाही रे. तो फ‌क्त काग‌द‌प‌त्र‌ त‌यार क‌र‌णारा माणुस होता.

अनुप ढेरे Wed, 17/05/2017 - 10:14

In reply to by अनु राव

ममो सिँगाबद्द्लची मतं इग्नोर केली तरी अलिकडेच वाचल्याप्रमाणे या सुधारणाँचे श्रेय चंद्रशेखर यांना द्यायला हवं म्हणे. 91च्या बजेटात त्याचं सरकार या सुधारणा सादर करणार होतं. पण रा.गा (सिनियर) यांनी पाठिंबा काढणार आहे हे सांगितलं आणि त्यामुळे या सुधारणा तेव्हा झाल्या नाहीत. राव सरकार आल्यावर लगेच या सुधारणा जाहिर झाल्या जुन का जुलै मधल्या बजेट्मध्ये. हे बजेट फेब्रुआरीमध्ये आलं असतं तसच होतं म्हणे. नक्की कुठे वाचलं ते नाही आठवत.

गब्बर सिंग Wed, 17/05/2017 - 10:32

In reply to by अनुप ढेरे

ढेरेशास्त्री, अनु राव ची स‌म‌स्या ही आहे की लिब‌र‌लाय‌झेश‌न चे १००% श्रेय तिला फ‌क्त राव या आड‌नावाच्या व्य‌क्तीला द्याय‌चं आहे.

आम‌चं म्ह‌णणं हे आहे की आम्हि पामूल‌पार्थ् यांचे श्रेय नाकार‌त नाही. त्यांचं राज‌कीय क‌स‌ब होतंच्. प‌ण म‌मोसिं हे त्यावेळी ख‌रे सार‌थी होते. ज‌सं कुरुक्षेत्राच्या युद्धाचे ख‌रे चाण‌क्य र‌ण‌छोड‌भाई होते त‌से. दृष्ट‌द्युम्न हा सेनाप‌ती असला त‌री.

ब‌घाच तुम्ही ...आता ती ल‌गेच म्ह‌णेल‌च की - न‌र‌सोबाचेच श्रेय होते/आहे ते.

अनु राव Wed, 17/05/2017 - 12:05

In reply to by गब्बर सिंग

ढेरेशास्त्री, अनु राव ची स‌म‌स्या ही आहे की लिब‌र‌लाय‌झेश‌न चे १००% श्रेय तिला फ‌क्त राव या आड‌नावाच्या व्य‌क्तीला द्याय‌चं आहे.

ग‌ब्बु, तुझ्या प्र‌तिसादाच्या आधीच मी सिन्हा आड‌नावाच्या माण‌साला क्रेडीट दिले होते. त्यामुळे तुझा आरोप बेस‌लेस आहे.

प‌ण म‌मोसिं हे त्यावेळी ख‌रे सार‌थी होते. ज‌सं कुरुक्षेत्राच्या युद्धाचे ख‌रे चाण‌क्य र‌ण‌छोड‌भाई होते त‌से.

कैच्या कै. ह्याच म‌मो नी पुर्वी स‌माज‌वादी धोर‌णांची काग‌द‌प‌त्र‌ ब‌न‌व‌ली होती. काल, आज, उद्या त्यांना काही लाख लोकांना गॅस‌चेंब‌र म‌धे माराय‌ची काग‌द‌प‌त्र‌ त‌यार क‌राय‌ला सांगित‌ली त्यांच्या क‌र‌ंट एम्प्लोय‌र नी त‌री ती क‌रुन मिळ‌तील्.
स‌ब्जेक्ट मॅट‌र, किंवा पॉलिसी अॅग्नोस्टीक क‌से असावे ह्याचे हा माणुस म्ह‌ण‌जे मुर्तीमंत उदाह‌र‌ण आहे. काहीही क‌रुन खुउर्ची टिक‌ली पाहिजे, इत‌केच धोर‌ण आहे.
आत्ता मोदीनी अजुन मोठ्ठी खुर्ची दिली त‌र गाईंना मार‌णाऱ्यांना ताब‌ड‌तोब फाशी देण‌ऱ्या काय‌द्याचा म‌सुदा सुद्धा म‌मो १५ दिव‌सात पाडेल्.

गब्बर सिंग Mon, 15/05/2017 - 22:17

In reply to by अनुप ढेरे

1990/91चं जागतिकीकरण आणि बाजारीकरण याचे भारताला नक्की तोटे काय झालेत याचा अभ्यास आहे का कुठे? म्हणजे मटिरिअल गोष्टींबाबत जसं की भुक, आरोग्य, घरं एकूणच आयुष्याची क्वालिटी आदीबद्दल.

(१) जाग‌तिकीक‌र‌णाव‌र प्र‌मुख आरोप हा की त्याच्यामुळे भार‌तात् आर्थिक विषम‌ता वाढ‌लिये. जोसेफ स्टिग्लिट्झ यांची एक‌दोन् पुस्त‌के याबाब‌त आहेत्. स्टिग्लिट्झ हे मान्य‌व‌र अर्थ‌शास्त्री आहेत.

(२) Ian Fletcher यांनी असा आरोप केला होता की काम‌गारांच्या सुर‌क्षित‌तेस मार‌क अस‌लेल्या प‌द्ध‌ती भार‌तात वाप‌र‌ल्या जात आहेत. म्ह‌ंजे असं की सेफ्टि मेझ‌र्स ही म‌हाग‌डी अस‌ल्यामुळे कॉस्ट्स वाच‌व‌ण्यासाठी काम भार‌तात ट्रान्स‌फ‌र केले जाते की जिथे अशा प‌द्ध‌ती वाप‌र‌ल्या जातात की ज्या विक‌सित देशांत अनेक द‌श‌कांपूर्वी बेकाय‌देशीर ठ‌र‌व‌ल्या गेल्या होत्या व‌गैरे.

(३) स्वेट शॉप्स्.

--

डिस्क्लेम‌र - मी जाग‌तिकीक‌र‌णाचा अतिम‌हाप्र‌च‌ंड स‌म‌र्थ‌क आहे. म्ह‌ंजे मी बिकाऊ आहे. जोडीला मी - द‌लाल, कॉर्पोरेट्स, ब‌हुराष्ट्रीय क‌ंप‌न्या, ध‌न‌दांड‌गे यांचा थेट स‌म‌र्थ‌क आहे. (यात न‌वीन काहीच नाही. प‌ण वाच‌क‌व‌र्गातले लोक न‌वीन असू श‌क‌तात म्ह‌णून खुलासा.)

अनुप ढेरे Mon, 15/05/2017 - 22:18

In reply to by गब्बर सिंग

ओके, मुद्दा क्र‌. २ प‌ट‌ण्यासार‌खा आहे. शिप‌ ब्रेकिंग‌ म्ह‌णे खूप रिस्की अस‌त‌ं प‌ण भार‌तात‌ भ‌र‌पूर होत‌ अस‌ं ऐक‌ल‌ं आहे.

===

बाकी विषम‌ता जास्त‌ं ग‌ंभीर‌ आहे का ग‌रिबी? माझ्याम‌ते ग‌रिबी.

गब्बर सिंग Wed, 17/05/2017 - 03:07

In reply to by अनुप ढेरे

आण‌खी एक उदाह‌र‌ण. भोपाळ गॅस दुर्घ‌ट‌नेब‌द्द‌ल. मिथाईल आय‌सोसाय‌नेट या गॅस ची ग‌ळ‌ती ची निर्देश‌क उप‌क‌र‌णे युनिय‌न कार्बाईड च्या अमेरिक‌न प्लॅंट म‌धे तैनात होती प‌ण भोपाळ म‌ध‌ल्या प्लॅंट म‌धे न‌व्ह‌ती. हा लेख‌ January 28, 1985 रोजी प्रकाशित झाला होता.

The Bhopal plant does not have the computer system that other operations, including the West Virginia plant, use to monitor their functions and quickly alert the staff to leaks, employees said. The management, they added, relied on workers to sense escaping methyl isocyanate as their eyes started to water. That practice violated specific orders in the parent corporation's technical manual, titled ''Methyl Isocyanate,'' which sets out the basic policies for the manufacture, storage and transportation of the chemical. The manual says: ''Although the tear gas effects of the vapor are extremely unpleasant, this property cannot be used as a means to alert personnel.''

१४टॅन Mon, 15/05/2017 - 11:58

उदारीकरण म्हणजे शिक्षणातून उद्योगावकाश हा नेहमीचा रूढ अर्थ न घेता परमेश्वराचे आणि बाबाबुवांचे बाजारीकरण या अर्थानेसुद्धा घेतले जाऊ लागले.

स्प‌ष्ट क‌रेल का कोणी? किंब‌हुना आज‌काल स‌ग‌ळ्या ल‌ग्न-पूजादि स‌मारंभांम‌ध्ये पारंप‌रिक गोष्टींचं प्र‌माण फार वेगाने कमी होत आहे. अस‌लेले (उर‌लेले) विधी खूप संपाद‌न क‌रून केले जात आहेत. हिंदू बाबाबुवांविरुद्ध हिंदूच प‌हिले, विद्युद्वेगाने तावातावाने आर‌डाओरडे सुरू क‌र‌त आहेत. काय पाय‌जे काय अजून?

मतपेटीसाठी लोकानुनय करणारे राजकारणी हिंदुत्वाच्या प्रचार/प्रसार यात मोठ्या हिरिरीने सहभागी झाले.

हे मात्र अग‌दीच मान्य. किंब‌हुना, ध‌र्म,जात,भाषेव‌रुन भाव‌नीक आवाह‌नं फार वाढीस लाग‌ली, हे मान्य‌ क‌रावंच लागेल.

बाबा-बुवांच्या करिष्म्याने अगतिक जनसामान्य मोहित होऊन परमेश्वराला नको तितकी प्रसिद्धी देऊ लागले.

प्पण हे क्काये? म्ह‌ण‌जे आधी तितकी दिली जात न‌व्ह‌ती का? किंब‌हुना आज‌काल हिंदू सुशिक्षित लोकांत निरीश्व‌रवाद किंवा अज्ञेय‌वाद जोम ध‌रु लाग‌ला आहे. अग‌दी पार गोनीदांपासून प‌र‌ंप‌रा इ. ख‌णून काढल्या जात आहेत. (बापाचा काष्ट्या सुटाय‌चा म्ह‌णून हाही फेड‌तो... इ.)

भारतातील शहरी तरुण वर्गाला जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकर्षणाबरोबरच धार्मिक रूढी, परंपरा, भारताचा वेदकालीन इतिहास, धर्माचे उदात्तीकरण, धर्मश्रद्धा यांचेही आकर्षण का वाटावे हे न सुटलेले कोडे ठरेल.

सोप्पंय. मी म‌ला का वाट‌तं ते सांग‌तो. मी ब‌ऱ्यापैकी 'श‌ह‌री त‌रूण' क्याटेग‌रीत येतो. ब‌ऱ्याच प‌र‌ंप‌रा, रुढी ह्या येडप‌ट किंवा प्राचीन कालात‌च शोभ‌ण्यासारख्या आहेत ह्याव‌र माझा ठाम विश्वास आहे. त‌रीही, हे ज्योतिषी लोक काग‌दाव‌र आक‌डेमोड क‌रून सूर्य‌/चंद्रग्र‌ह‌ण कोण‌त्या दिव‌शी, किती वाज‌ता, कुठून दिसेल हे क‌सं सांग‌तात, हे ग‌णित किती पुरात‌न आहे, ह्याब‌द्द‌ल म‌ला आद‌र वाट‌तो. आज‌प‌र्यंत कोणाव‌र‌ही आक्र‌म‌ण न केलेल्या काही ध‌र्मांपैकी एक म्ह‌णून म‌ला माझ्या ध‌र्माचा आद‌र वाट‌तो.

काही प्रमाणात इस्लाम वा ख्रिश्चन धर्मग्रंथ त्यांच्या अनुयायांना एकसंधपणे जीवन जगण्याची शिकवण देत असतात. तद्विरुद्ध हिंदू धर्म रूढी, परंपरा, उत्सव, पुराण कथा, पौराणिक प्रसंग वा स्थळ इत्यादीवर आधारित जीवनशैली असण्यावर भर देते.

उग्गीच. मुंब‌ईच्या आर्द्र‌तेत न आंघोळ क‌र‌ता आठ‌व‌डाभ‌र राह‌णे काय फार शहाण‌प‌णाचे आहे काय? आणि मोर्चे काढ‌ताना मेण‌ब‌त्त्यांचीच काय ग‌र‌ज? लाखो लोक दिव‌सातून पाच वेळा व‌झू क‌र‌ताना जे द‌र‌रोज पाणी वाया घाल‌व‌तात, द‌र शुक्र‌वारी र‌स्त्यात ब‌सून वाह‌तूक कोंडी क‌र‌तात, मोठ्ठ्याने गेंगाणे आवाज द‌र‌रोज ऐक‌व‌तात; त्याचं काय?

मुळात या धर्माचरणात चमत्कार, अतींद्रियशक्ती, वा मिथकं इत्यादींचेच उदात्तीकरण केलेले असते. त्याला कुठलाही, तार्किक, वैज्ञानिक वा नैतिक आधार नाही.

हे काय स‌ग‌ळ्याच ध‌र्मांत नाही? त्याच ध‌र्माचे लोक त्याविरुद्ध कितीसे बोल‌तात? हे प्र‌माण हिंदूंत किती आहे? म‌द‌र तेरेसांचं संत‌प‌द हा काय प्र‌कार होता? मुळात त्यांच्याव‌र‌च्या आरोपांचं स्प‌ष्टीक‌र‌ण क‌धी मिळ‌णार? असो.

पीटर बर्गर या समाजशास्त्रज्ञाचा संदर्भ देत लेखिकेला धर्म आणि राष्ट्र हे दोन्ही संस्कृतीच्या अधिष्ठानासाठी एकमेकासमोर स्पर्धक म्हणून उभे आहेत अशी आताची स्थिती आहे, असे वाटते.

हे ख‌रंत‌र कोण‌त्या ध‌र्माला जास्त लागू आहे, घ‌ट‌ना विरुद्ध ध‌र्म‌ग्र‌ंथ हा जुनापुराणा वाद कोणत्या ध‌र्मात आज‌काल पुन्हा उफाळून आलेला आहे हे स्प‌ष्ट आहेच. किंब‌हुना आसिन्धु सिन्‍धु पर्यन्‍ता... (आणि ह्या ध‌र्तीचं काहीही) हे फ‌क्त कोण‌त्या ध‌र्मात म्ह‌ट‌लं गेलंय, हेही अध्याहृत आहे.

जगातला आमचाच धर्म पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हणणाऱ्यात भारतीयांचाच प्रथम क्रमांक लागेल यात शंका नसावी.

अग‌दीच मान्य. प‌ण आप‌ला राष्ट्र‌वाद‌ही अग‌दी त‌साच, किंब‌हुना त्याहुन‌ही जास्तच आहे की!

असो. वाढ‌वावं त‌र ब‌रंच वाढ‌व‌ता येईल.

गब्बर सिंग Wed, 17/05/2017 - 03:36

In reply to by १४टॅन

स्प‌ष्ट क‌रेल का कोणी? किंब‌हुना आज‌काल स‌ग‌ळ्या ल‌ग्न-पूजादि स‌मारंभांम‌ध्ये पारंप‌रिक गोष्टींचं प्र‌माण फार वेगाने कमी होत आहे. अस‌लेले (उर‌लेले) विधी खूप संपाद‌न क‌रून केले जात आहेत. हिंदू बाबाबुवांविरुद्ध हिंदूच प‌हिले, विद्युद्वेगाने तावातावाने आर‌डाओरडे सुरू क‌र‌त आहेत. काय पाय‌जे काय अजून?

सेक्युल‌रिझ‌म चा ज‌य‌घोष‌ क‌र‌ताना ध‌र्माच्या अस्तित्वाव‌र‌च आक्षेप घ्याय‌ची घाणेर‌डी प्र‌वृत्ती आहे आप‌ल्या स‌माज‌धुरिणांची. मार्क्स‌ने सुद्धा याच घाणेर‌ड्या प्र‌वृत्तीला ख‌त‌पाणी घात‌ले होते.

ध‌र्माला मागे रेटून उभे राहिलेल्या प्र‌जातांत्रिक स‌र‌कार‌ने अनेक काय‌दे क‌र‌ताना थेट् ध‌र्मातून क‌ंटेंट उच‌लून त्याचे म‌सूदे ब‌न‌वून केले. आता ल‌गेच ध‌र्माव‌र भुंकाय‌ला सुरुवात.

--

हे मात्र अग‌दीच मान्य. किंब‌हुना, ध‌र्म,जात,भाषेव‌रुन भाव‌नीक आवाह‌नं फार वाढीस लाग‌ली, हे मान्य‌ क‌रावंच लागेल.

ध‌र्म,जात,भाषेव‌रुन भाव‌नीक आवाह‌नं (राज‌कार‌ण्यांनी केलेली ज‌न‌तेला अजिबात न‌को आहेत असं आहे ?