दत्तक मुलीचे एकल पालकत्व
नमस्कार, माझ्या एका मैत्रिणीला मुलगी दत्तक घ्यायची आहे. सध्या तिचे वय 30 असून, तिला लग्न वगैरे करण्याची इच्छा नाही. हा निर्णय घेण्यासाठी जवळपास 3 वर्ष लागली, आणि निर्णय अगदी ठाम आहे. मी बऱ्याच चर्चा यासंदर्भात वाचल्या असून काही गोष्टी फारशा क्लिअर झालेल्या नाहीत. इथे कुणाला या संदर्भात अनुभव असेल / कुणाच्या पाहण्यात एकल पालकत्वाचे उदाहरण असेल / adoption procedure बद्दल माहिती असेल तर कृपया प्रतिक्रियांमध्ये नोंदवा.
या संदर्भात इथे किंवा इतर संस्थळावर चर्चा झाली असेल तर त्याचा दुवा द्यावा.
धन्यवाद.
हा प्रतिसाद या धाग्यावर
हा प्रतिसाद या धाग्यावर अवांतर असेल तर मछोमोवि धाग्यावर हलवा.
एकंदरच मुल दत्तक घेण्याबद्दल माझी वैयक्तिक मतं मांडली आहेत पटली तर घ्या नाहीतर सोडून द्या.
• मुल जन्माला घालण्यापेक्षा त्याला वाढवण्यात नक्कीच जास्त वेळ, पैसा, श्रम लागतो.
• त्यामुळे ज्यांची मुल वाढवण्याची तयारी असते त्यांनी शक्य असेल तर स्वतःचीच मुलं जन्माला घालावीत.
• आर्थिकदृष्टया शक्य असेल तर वीर्यदान बँक, ivf, सरोगसी वगैरेचा वापर करा.
• पैसा नसेल पण बोल्ड असाल तर ओळखितल्याशी तेवढ्यापुरते शरीरसंबंध ठेवून मुल जन्माला घाला (हे भारतात सर्वसामान्य मुलीला जवळपास अशक्य आहे याची कल्पना आहे)
• उगाच दुसर्याची मुलं सांभाळण्यात काय अर्थ आहे? एकतर यात biological advantage काही नाही. दुसरं म्हणजे अनाथ मुलं भरपूर संख्येने आहेत असेदेखील नाही. त्यामुळे आपण आपली (नसलेली) सामाजिक जबाबदारी उचलतोय या कल्पनेलादेखील काही अर्थ नाही.
• त्यापेक्षा आपण स्वतःवरच पैसा खर्च करावा. ऐषोआरामात राहावं, जगभ्रमंती वगैरे करावी, काही मुलींच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घ्यावी, शेजारच्या मुलांना खेळायला आणावं आणि परत सोडून द्यावं.
• वर एका प्रतिसादात दिलेल्या लिंकमधे वाचलं कि सध्या 2000 अनाथ मुलं आहेत त्यातली 50% खास गरज (wtf शब्द आहे हा) असलेली आहेत.
• या मुलांच्या special conditions दत्तक घेताना नीट सांगतात का? आणि त्या पालकांना नीट कळल्या असतात का?
• ओळखीतल्या एका जोडीने नुकतीच एक मुलगी दत्तक घेतली आहे. दत्तक घेतली तेव्हा दोनेक महिन्याची होती. त्या बाळाला भूक लागल्यावर रडायचं याचा सेन्स नव्हता. माझ्यामते हा बेसिक सेन्स आहे. जर हेच त्या बाळात नसेल तर पुढे ते सर्वसामान्यासारखे वाढेल का? हे पुढचे complications दत्तक देताना स्पष्टपणे सांगतात का?
• त्याच लिंकमधे सध्या 16000 जोडपी/एकल दत्तक घेण्यासाठी लायनीत आहेत असं लिहलंय.
• 12 आठवड्यानंतर गर्भपात करण्यास ठरावीक सरकारी दवाखान्यातच परवानगी आहे. या क्लिनिकच आणि त्या लायणीतल्याचं काही coordination आहे का? ते त्या गर्भपात करायला गेलेल्या मुलीला घरी आणून, सगळा खर्च उचलून, नंतर मुल सांभाळण्याची ऑफर/पर्याय देऊ शकतात का? (तो हा आयटम यावर काम करेल का? गर्भपात करू नये असा पो टाकत फिरण्याऐवजी....)
• या जोडप्यांमधल्या एकातच problem असेल तर तो दुसऱ्याला 'आपले नाही तरी फक्त तुझे का होईना मुल biologically एकाचे असुदे' असे सांगतो व त्यादृष्टीने प्रयत्न करायला लावतो का?
अजून आठवेल तसे लिहिते....
बहुतांशी प्रत्येक पॉइंटला +१.
बहुतांशी प्रत्येक पॉइंटला +१.
ड्यू प्रोसेसने दत्तक घेतले असेल तर दत्तक देणाऱ्या संस्थेकडे आरोग्यविषयक, माइलस्टोन डेव्हलपमेंटबद्दलची माहिती असते. ती फाईल "ग्राहकांना" दाखवली जाते.
ड्यू प्रोसेसने दत्तक न घेता, "कुसुम मनोहर लेले" पद्धतीने दत्तक घेतले तर ही माहिती मिळण्याचा प्रश्नच नाही कारण त्या मेथडमध्ये मूल जन्मत:च तुम्हाला मिळालेले असते.
>>• 12 आठवड्यानंतर गर्भपात करण्यास ठरावीक सरकारी दवाखान्यातच परवानगी आहे. या क्लिनिकच आणि त्या लायणीतल्याचं काही coordination आहे का? ते त्या गर्भपात करायला गेलेल्या मुलीला घरी आणून, सगळा खर्च उचलून, नंतर मुल सांभाळण्याची ऑफर/पर्याय देऊ शकतात का?
इथेच कुसुम मनोहर लेले* स्कीम काम करते. (पांढरा ठसा सुरू) तर सुजता देशमुख ही एक होणारी अनवेड मदर असते कुसुम मनोहर लेले या बैन्ना मूल होत नसतं (मनोहरमुळे असेल किंवा कुसुममुळे असेल). सुजाता देशमुख गर्भपात करायला हॉस्पिटलात जाते. तिथेच आपल्या लेलेबै/लेलेबुवा वंध्यत्वावर उपचार घेत असतात. मग त्या हॉस्पिटलचे लोक लेलेबै आणि देशमुखबैंना ऑफर देतात. देशमुखबै गर्भपात न करता मूल ज्न्माला घालायचे ठरवतात. त्या जेव्हा प्रसूतीसाठी ॲडमिट होतात तेव्हा ॲडमिशन आईचे नाव -कुसुम लेले ; वडिलांचे नाव मनोहर लेले असे नोंदले जाते. प्रसूती झाल्यावर लेलेबै ते मूल आपले म्हणून घरी घेऊन जातात. देशमुखबैंच्या डोक्यावर कसलाच कलंक रहात नाही. (लेलेबैंना** पण आता कुणी वांझ म्हणू शकत नाही). यात देशमुख, लेले आणि हॉसिटल यांच्यात योग्य तो व्यवहार होतो.
* कुसुम मनोहर लेले या नाटकाचा प्लॉट फसवणुकीचा म्हणून आहे. इथे परस्परसंमतीने सर्व होते. हॉस्पिटलात लेले बैंच्या नावाने डिस्चार्जकार्ड बनणे इतकेच नाटकाच्या कथेशी साम्य.
** लेलेबैंची कथा अधिक कॉम्प्लेक्स असते. पण ते इथे अवांतर होईल. (पांढरा ठसा संपला)
पांढऱ्या ठशातील माहिती अनधिकृत आहे.
ड्यू प्रोसेसने दत्तक घेतले
ड्यू प्रोसेसने दत्तक घेतले असेल तर दत्तक देणाऱ्या संस्थेकडे आरोग्यविषयक, माइलस्टोन डेव्हलपमेंटबद्दलची माहिती असते. ती फाईल "ग्राहकांना" दाखवली जाते. >> फाईल दाखवली होती; पण ती condition आणि त्याचे भविष्य त्यांना कितपत कळले होते याबद्दल मला शंका आहे. अनाथालयात कसे रडणाऱ्या बाळाच्या तोंडात बाटली खुपसली जाते. हि रडतच नव्हती त्यामुळे आया कधी आठवेल तेव्हा दूध देणार. त्यामुळे किडमीडित पोर. फोटो बघून निवडली यांनी. बाकी डिटेल माहित नाही. secondary ओळख आहे माझी. स्वतःचे मुल जन्माला घालायचा प्रयत्नच न करता सामाजिक जबाबदारी म्हणून दत्तक घेणारे तिशीच्या आतले जोडपे.
परस्पर संमतीने होत असेल, फसवणूक नसेल तर कु.म.ले. स्कीम चांगलीच आहे! त्याला कायदेशीर करून घ्यावे सरकारने. किंवा सरकारला मधे न आणता नीट legal contract करून तीनही पार्टीने हे करावे.
लग्न केलेल्या जोडप्यासही
लग्न केलेल्या जोडप्यासही मुलगी दत्तक मिळायला तीन वर्षे लागतात तर एकल पालकांचे काय?
सिनेनटनट्यांची गोष्ट वेगळी आहे. एखाद्या मुलींच्या शाळेत काही कलावगैरे( हस्तव्यवसाय,चित्रकला,गायन,शिवणकाम,अभिनय) शिकवून थोडा मानसिक आधार नक्कीच मिळवता येईल.