आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
'लव्हिंग व्हिन्सेंट' या चित्रपटाची अनेक चोखंदळ ऐसीकरांनी स्तुती केली आहे. पुणेकरांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायची संधी उद्या मिळणार आहे. पुण्यात केवळ दोन खेळ दिसत आहेत. अधिक माहिती 'बुक माय शो'वर मिळेल.
Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे - ३_१४ विक्षिप्त अदिती
तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट ! - सर्व_संचारी
माहितीमधल्या टर्म्स
मुद्रितशोधन आणि संपादनकौशल्य कार्यशाळा - अरुण फडके
एडिट मित्र तर्फे
मराठी मुद्रितशोधन आणि संपादनकौशल्य कार्यशाळा
दिनांक १७ ते २२ डिसेंबर २०१८ (सोमवार ते शनिवार)
वेळ : सकाळी ११.०० ते ५.००
शास्त्र + प्रात्यक्षिके + अभ्याससाहित्यासह
मार्गदर्शक : श्री अरुण फडके
शुल्क : ₹ ४८००/-
नोंदणीसाठी संपर्क -
अस्मिता - ९८ २३ ४१ ७३ ९४
चिन्मया - ८६ ९८ ९१ ५१ ९०
नोंदणीची अंतिम तारीख - १३ डिसेंबर
स्रोत
उच्चार - दुसरी बाजू
इंग्रजीच्या चष्म्यातून फ्रेंच भाषेचे उच्चार पाहिले की होणारे घोटाळे नवीन नाहीत. माझ्या बाबतीत उलटं घडलं होतं.
सिम्बायसिस कॉलेजच्या समोरच्या बाजूला बालभारतीजवळ एक कापडी फलक होता. त्या चढाच्या रस्त्यावर चालताना माझ्या डोळ्यांच्या रेषेत त्या फलकाची खालची ओळ आली. मी वाचून पाहिली - ल जाय्यॉंज ! ल जाय्यॉंज ! छे ! काही केल्या उमगेना. मग जरा वर पहिल्या ओळीकडे पाहिलं आणि प्रकाश पडला. तो मजकूर होता -
Dilwale Dulhaniya
Le Jayenge
कुणी मार्गदर्शन करावे
१) फोटो शेअरिंग लेखाप्रमाणे करून पुन्हा लिंक घ्या, अथवा
२) aise rasik या फेसबुक ग्रुप पेजवर
फोटो टाकले कुणी तरी इथे आणता येतील.
नक्कीच.
In reply to +११११११ by १४टॅन
मुंबै-ठाण्यात कट्टा झाला तर मी माझ्या आतेभावाला पाठवणार आहे.