ही बातमी समजली का - भाग १९४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

('न'बा, ते कदाचित बनियनातही असतील, पण आपल्याला माहीत नाही.)
FAA Installs 36,000-Foot-Tall Air Traffic Lights

रडार ढग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे विमानांसाठी फारच सोयीचे ठरेल, विशेषत: पाऊस-वादळ-ढग असताना जेव्हा खालच्या लोकांना विमान दिसू शकत नाही.

एक शंका - ढगांमुळे शत्रूला आपली विमाने दिसणार नाहीत- हे पटले, पण आपल्या वैमानिकांनाही (ढगांमुळेच) खालचे काही दिसणार नाही - मग "अचूक लक्ष्यभेद" (उर्फ सर्जिकल स्ट्राईक) कसा काय करता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'डोळ्यांनी बघून' हल्ला/मारा करणे १२००किमी/तासाने जाणाऱ्या विमानांतून शक्य नसणारच. जिपीएस आधारित लक्ष्य असणार.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरच की. मार्मिक दिलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

लहान होतो आम्ही तेव्हा. बहुधा इयत्ता पहिलीत असू. बांग्लादेशचे युद्ध (१९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध) नुकतेच पेटले होते. रेडियोवरून युद्धाच्या बातम्या येत असत, असे अंधुकसे आठवते. परंतु त्याहीपेक्षा, पुण्यात (आणि बहुधा मुंबईतसुद्धा - चूभूद्याघ्या.) रात्री अनेकदा वेळीअवेळी एअररेड वॉर्निंगचे भोंगे वाजू लागत. मग घरोघरी ब्लॅकाउट करावा लागे. बोले तो, घरातले सगळे दिवे बंद करून बसावे लागे. अशा वेळी घरात लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाशसुद्धा चुकूनही बाहेरून दिसू नये म्हणून खिडक्यांच्या काचांना काळा कागद लावून ठेवलेला असे. (एकदा 'तुमच्या घरातल्या मेणबत्तीचा प्रकाश बाहेरून दिसतोय' म्हणून तंबी द्यायला एक सद्गृहस्थ दारी आले होते, असेही स्मरते. सदर सद्गृहस्थ बहुधा स्वयंसेवक असावेत, अशी आता शंका येते. परंतु ते असो.) मग अर्ध्यापाऊण तासानंतर सवडीने एकदा का 'ऑल क्लियर'चे भोंगे वाजले, की पुन्हा दिवे लावून आपापली कामे करायला मोकळे.

एकंदरीत कटकट असायची. त्यामुळे, पाकिस्तान्यांचा राग यायचा. वाटायचे, हे लेकाचे आपल्यावर बाँब टाकायला येतात काय, आपणही जाऊन यांच्यावर एखादा बाँब टाकून यावे. फक्त, बाँब टाकण्याच्या मोडस ऑपरंडीबद्दल किंचित घोळ होता. बोले तो, पाकिस्तानवर हवेतून बाँब टाकायचा, तर तेथे जायला नि वरून बाँब टाकायला किमानपक्षी एखादे विमान (आणि एखादा बाँब) एवढे साहित्य तरी लागेल, याची अंधुकशी कल्पना होती, परंतु आपली सेनादले ही सामुग्री आपल्याला उदार मनाने पुरवितील, असा विश्वास होता. पुढचा प्रश्न म्हणजे नॅव्हिगेशनचा - तेथे जायचे कसे? याची काय तजवीज केली होती, ते आता आठवत नाही, परंतु बहुधा निघण्यापूर्वी रस्ता विचारून घेऊ, असा काही प्लान असावा. सरतेशेवटी, तेथे पोहोचल्यावर (१) तेथे पोहोचलो, हे, आणि (२) बाँब नक्की कोठे टाकायचा, हे कसे समजणार? तर त्याला उपाय अतिशय सोपा होता. त्या भागात पोहोचल्यावर वरून रेल्वेस्टेशन शोधायचे, नि त्यावरची पाटी वाचायची. तेथे पिवळ्या रंगाच्या पाटीवर देवनागरीतून छानपैकी 'पा-कि-स्ता-न' असे स्टेशनाचे नाव लिहिलेले असेलच. ते वाचून खात्री झाली, की द्यायचा टाकून बाँब, नि काय! नि मग शांतपणे परत यायचे.

पुढे मोठे झाल्यावर आम्ही भारतीय वायुसेनेत दाखल झालो नाही. दे डोंट नो व्हॉट दे मिस्ड. देअर लॉस, नॉट माइन. असो चालायचेच.

..........

, पाकिस्तानातल्या रेल्वेस्टेशनच्या नावाच्या पाट्या भारताप्रमाणे पिवळ्या रंगाच्या नसतात, तसेच, त्यांवर तूर्तास देवनागरीतून मजकूर लिहिण्याची प्रथा नाही, याची आम्हांस तेव्हा कल्पना नव्हती. अर्थात, प्राथमिक शाळेत असताना आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याकारणाने, जुजबी इंग्रजी आम्हांस तेव्हासुद्धा वाचता येत असेच, त्यामुळे अडचण अशी आली नसतीच. परंतु तरीही, वन वुड हॅव थॉट दॅट द पाकिस्तानीज़ वुड हॅव बीन दॅट मच ओब्लायजिंग. एक साधी पाटी देवनागरीतून टाकायला काय जाते त्यांना, कळत नाही. शिवसेनावाले याकडे लक्ष देतील काय? मराठी पायलट जेथे बाँब टाकायला जाणार, तेथे देवनागरीतून पाटी नको?

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बांग्लादेशचे युद्ध (१९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध) नुकतेच पेटले होते. रेडियोवरून युद्धाच्या बातम्या येत असत, असे अंधुकसे आठवते. परंतु त्याहीपेक्षा, पुण्यात (आणि बहुधा मुंबईतसुद्धा - चूभूद्याघ्या.) रात्री अनेकदा वेळीअवेळी एअररेड वॉर्निंगचे भोंगे वाजू लागत. मग घरोघरी ब्लॅकाउट करावा लागे. बोले तो, घरातले सगळे दिवे बंद करून बसावे लागे. अशा वेळी घरात लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाशसुद्धा चुकूनही बाहेरून दिसू नये म्हणून खिडक्यांच्या काचांना काळा कागद लावून ठेवलेला असे. (एकदा 'तुमच्या घरातल्या मेणबत्तीचा प्रकाश बाहेरून दिसतोय' म्हणून तंबी द्यायला एक सद्गृहस्थ दारी आले होते, असेही स्मरते. सदर सद्गृहस्थ बहुधा स्वयंसेवक असावेत, अशी आता शंका येते. परंतु ते असो.) मग अर्ध्यापाऊण तासानंतर सवडीने एकदा का 'ऑल क्लियर'चे भोंगे वाजले, की पुन्हा दिवे लावून आपापली कामे करायला मोकळे. एकंदरीत कटकट असायची.

रोहिंग्टन मिस्त्रीची 'Such A Long Journey' नावाची, (शिंव्हाच्या छाव्याच्या छाव्याने काही काळ बॅन करवलेली कादंबरी) याच सुमारास मुंबईत घडते. त्यातला मध्यमवयीन पारशी कुटुंबप्रमुख १९६२ - १९६५ असं सारखं सारखं घर लाईटप्रूफ करून वैतागतो आणि लावलेले काळे कागद काढायच्या फंदातच पडत नाही (आणि परिणामी १९७१च्या युद्धातली एक कौटुंबिक कटकट टाळतो) - असं खास पारसी विक्षिप्त ढंगातलं चित्रण त्यात आहे, ते आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाँब नक्की कोठे टाकायचा, हे कसे समजणार? तर त्याला उपाय अतिशय सोपा होता. त्या भागात पोहोचल्यावर वरून रेल्वेस्टेशन शोधायचे, नि त्यावरची पाटी वाचायची. तेथे पिवळ्या रंगाच्या पाटीवर१ देवनागरीतून२ छानपैकी 'पा-कि-स्ता-न' असे स्टेशनाचे नाव लिहिलेले असेलच. ते वाचून खात्री झाली, की द्यायचा टाकून बाँब, नि काय! नि मग शांतपणे परत यायचे.

एवढे कष्ट करण्या पेक्षा फक्त वरून आवाज द्यायचा ए अब्दुल, कि चार सहा लोक हा भाई जान म्हणून आवाज देतील तेव्हा टाकायचा बॉम्ब हाकानाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

ग्रंपी कॅटची माॅडेल गेली. सात वर्षांची होती.

grumpy cat death

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतीय मांजरींच्या ( बोक्यांचेही धरा) चेहऱ्यावर १) केविलवाणे, २)अगतिक, ३)सुस्ती आलीय हे भाव दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

कळव्यातील कामगारांच्या मजूरीचे दर समजले का ?
जर बाई पेंटर असेल तर दर काय ? ७०० की ५०० ?
बाप्याचा दर काय ?
image

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लुव्र आणि इतर इमारतींचा आकिटेक्ट १०२ वयाला काल गेला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार मोदीच येणार.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शांत व्हा, ढेरे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अहो, एक व्हिडो एम्बेड करयचा प्रयत्न करत होतो. नाही जमलं. Sad

पण मेन त्यातला मुद्दा असा की त्या नेल्सन का कायशाशा पोलवाल्या माणसाने असं सांगितलं
"फार जास्तं लोक भाजपाला मत दिलं असं म्हणत होते सो आम्ही आकडे थोडे अड्जस्ट केले आहेत."
अरे!?

"आमच्या मते लोक घाबरुन आम्ही भाजपला मत दिलं असं सांगत होते. त्यामुळे आम्ही आकडे थोडे ॲडजस्ट केले आहेत्"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अहो, एक व्हिडो एम्बेड करयचा प्रयत्न करत होतो. नाही जमलं.

एंबेड होत नसेल तर दुवा द्या. लोक दुवा देतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे घ्या. हा बघा व्हिडो.

https://twitter.com/AB_BJP/status/1130189856716419073

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सगळे खवचट मी दिले आहेत हो ढेरे !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज पासून गोबर मिट्टी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे ! अशी स्वाक्षरी ठेवा मग Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

गोबर मिट्टी खायेंगे, पाकिस्तान को खतम करेंगे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनिल अंबानींनी कॉंग्रेसवर दाखल केलेले खटले निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी का मागे घेतले असतील?
Anil Ambani to withdraw ₹5000 crore worth defamation suits against Congress leaders, National Herald

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्या पोराशी पंगा घेतला, तोच वर्गातला मॉनिटर झाला तर?
रिस्क नको. आधीच धाकल्या अंबानींच्या गंजीफ्राकात काय कमी भोकं आहेत की अजून एक परवडेल?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिफेमेशन खटले कोणते किती निर्णायक झालेत झटपट? मोठमोठे कीसपाडणारे वकील पोसायचे. गंजीची भोकं वाढवायची? पण आताच का हा प्रश्न चक्रावणाराच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आतापर्यंत जे कल जाहीर झाले आहेत त्यानुसार जनमताचा कौल स्पष्टपणे 'फिर एक बार मोदी सरकार'कडे असल्याचे दिसत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मोदी विरोधकान्ना पुढ्ल्या ५ वर्शान्साठी शुभेच्छा! आरोग्य साम्भाळा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

थँक्स!
- एक मोदी विरोधक.
- पण भाजपा विरोधक नाही
- पण काँग्रेस सपोर्टरही नाही
-पण रा.स्व.संघ विरोधक

असो. जिमला जाणारे उद्यापासून परत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थँक्स!
- एक मोदी सपोर्टर.
- भाजपा सपोर्टर्
- फॅनॅटिझम विरोधक
- पण काँग्रेस सपोर्टरही नाही
-रा.स्व.संघ - न्युट्रल्

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको