नोबेल पारितोषिक - २०१९

ह्या वर्षीचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जेम्स पीबल्स, मायकेल मेयर आणि दिदियर किलोझ (उच्चारात चूभूदेघे) ह्या तीन खगोलशास्त्रज्ञांना विभागून मिळाले आहे. प्रेस रिलीझ.

सध्या प्रचलित असलेले विश्वनिर्मितीचे महास्फोटाचे प्रारूप मांडण्यात जेम्स पीबल्स ह्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. महास्फोटानंतर कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात तयार झाली असतील ह्याचे अचूक अंदाज आणि वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वप्रारणाचे स्पष्टीकरण ही त्यांच्या अनेक कामांपैकी प्रमुख कामे.

नोबेल भौतिकशास्त्र

मेयर आणि किलोझ ह्या जोडीने 1995 साली सूर्यासारख्या इतर ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध पहिल्यांदा लावला. ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे जसे ग्रह ताऱ्याभोवती फिरतात, तशाच प्रकारे ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताराही (जोडीच्या गुरुत्वमध्याभोवती) फिरतो. जर ग्रह पुरेसा मोठा असेल तर त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्याचा बदलणारा वेग आपल्याला मोजता येईल इतका मोठा असू शकतो व हा वेग किती आणि कसा बदलतोय ह्यावरून आपण ग्रहाच्या गुणधर्मांबद्दल (उदा. वस्तुमान आणि ताऱ्यापासूनचे अंतर) अनुमान करू शकतो. 1995 साली अशा प्रकारे ग्रह सापडल्यानंतर पद्धतशीरपणे सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्याचा मार्ग उपलब्ध झाला. आज ही पद्धत (radial velocity method) आणि अधिक्रमण पद्धत (ताऱ्यासमोरून ग्रह जात असताना ताऱ्याची प्रकाशमानता कमी होणे) ह्या दोन प्रमुख आणि काही इतर पद्धती वापरून सुमारे चार हजारांपेक्षा जास्त सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध लागलेला आहे.

---
रसायनशास्त्राचे नोबेल लिथियम-आयन बॅटरीच्या शोधाबद्दल John B. Goodenough, M. Stanley Whittingham आणि Akira Yoshino ह्यांना मिळाले आहे. प्रेस रिलीझ.

व्यवस्थापकीय नोंद - मूळ प्रतिसाद इथून उचलून नव्या धाग्यात रूपांतरित केला आहे.

field_vote: 
0
No votes yet

जड धातु चंद्र, मंगळावर, इतर ठिकाणी असतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सौरमालेबाहेरचे ग्रह शोधण्यासाठी ह्या लोकांनी कोणत्या प्रकारच्या दुर्बिणी वापरल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Nobel Memorial Prize in Economic Sciences/Winners (2019) - Michael Kremer, Abhijit Banerjee, Esther Duflo

टाळ्या!!!!
_______________
अभिजीत बॅनर्जी यांची पत्नी तर नोबल प्राइझ विनर आहेच. पण त्यांची आई हीसुद्धा इकॉनॉमिस्ट आहे. त्या म्हणतात "अभिजीत थिअरॉटीकल इकॉनॉमिक्स पेक्षा प्रॅक्टिकल आस्पेक्टवरती जास्त भर देतात."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सौरमालेबाहेरील ग्रह शोधणं भारी वाटलं!
-------
अभिजीत बॅनर्जींच्या बातमीत भारतीय आणि परदेशी कव्हरेजमधे किती फरक आहे!
आपल्याइथले मथळे म्हणजे "डिमोनेटायझेशनला विरोध करणाऱ्या...." किंवा "काँग्रेसची न्याय योजना बनवणाऱ्या...."
आणि मग त्यावरून पुन्हा धुमशांग. शॉट.
---------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो हे न्याय वगैरे जरातरी रिलेव्हंट आहे. ट्विटृरवर एका वॉनाबी विचारवंत बाईने बंगाली लोक कसे मासे,मटण इइ खातात आणि नोबेल जिंकतात म्हणुन मासे श्रेष्ठ आणि ढोकळा, खांडवी कसं भिकार हे विधान करुन चर्चा ढोकळा वि. मासा अशी नेली ROFL

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माशांत फॉस्फरस असते, जेणेकरून मेंदूची वृद्धी होते, हे सत्यच आहे.

मात्र, शून्यास कशानेही गुणले, तरी परिणती शून्यच होते, हेही तितकेच अतिबेसिक सत्य आहे.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोंबलात बराच जास्तं असतो हे माहिती होते पण बंगाली लोक बोंबील खातात खुप हे माहिती नव्हते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छ्या। खाऱ्या पाण्यातले मासे नाही खात. गोड्या पाण्यातले फडफडीत. तेही टबातल्या पाण्यात जिवंत ठेवलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुल गांधीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात न्याय योजनेचा उल्लेख केला तेव्हा अवतीभवतीचे सुप्रिमसिस्ट सुमारुद्दीन पेटू लगेच पेटून उठले होते.
तेव्हा शॉट लागलाच होता. आता ह्या मथळ्यांनी थोडं परिमार्जन झालं.

दुर्दैवाने प्रिव्हिलेज्ड लोकांच्या बिहेवियरचा मात्र अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. वर्षाला लाखो डॉलर्स कमावणाऱ्या लोकांना तरीही आपल्या मुलांनी आयव्ही लीगमध्ये जावं असं वाटतच असतं; परंतु अत्यंत गरीब असलेल्या माणसाला बारा हजार रुपये दिल्यास तो लगेच कामधाम सोडून फुकटचं खात बसेल, त्याचा आत्मसन्मान वाढणार नाही व त्याला आपल्या मुलांनी शिकावं, आणखी चांगल्या शाळेत जावं, मोठं व्हावं अशी ॲस्पिरेशनच नसेल असं मत कोणताही प्रयोग न करता बाळगणाऱ्यांची सहानुभौतिक गरीबी कशी कमी करावी त्यावर बिहेवियरल इकॉनॉमिक्सच काय, सायकियाट्रीलाही उत्तर सापडलेले नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>>>>>>>>>त्याचा आत्मसन्मान वाढणार नाही व त्याला आपल्या मुलांनी शिकावं, आणखी चांगल्या शाळेत जावं, मोठं व्हावं अशी ॲस्पिरेशनच नसेल असं मत कोणताही प्रयोग न करता बाळगणाऱ्यांची सहानुभौतिक गरीबी कशी कमी करावी त्यावर बिहेवियरल इकॉनॉमिक्सच काय, सायकियाट्रीलाही उत्तर सापडलेले नाही.>>>>>>>> रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख कदाचित तुम्हाला आवडेल - Is Meritocracy Making Everyone Miserable?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद.
वेस्टर्न देशांमध्ये किमान असे आर्टिकल्सतरी येतात.
https://www.huffpost.com/entry/the-glass-floor-is-keeping-americas-richest-idiots-at-the-top_n_5d9fb1c9e4b06ddfc516e076

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशिष नंदी आठवतात? त्यांनी जयपूर लिटफेस्टमध्ये 'अश्लील विधान करणार आहे' अशी पूर्वकल्पना देऊन काही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला होता... ? त्यावर टीव्ही-पत्रकारिता-सम्राट आशुतोष कसा पेटला होता? त्या 'अश्लील' विधानाचा थेट संबंध ह्या मेरिटोक्रसीशी लावता येतो.

Ashis Nandy’s remarks at Lit-Fest draw ire

आपल्याकडे न्यू यॉर्कर किंवा हफपोस्टसारखी, मध्यमवर्गीय प्रकाशनं नाहीत. ही गुंतागुंतीची विधानं सोपी करून लोकांना सांगण्याची आपल्याकडे परंपरा, पद्धत नाही. विद्यापीठांमध्ये काय संशोधन चालतं हे लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांना महत्त्वाचं वाटत नाही. पुस्तकं लिहिणं, ती विकत घेऊन वाचणं, ही परंपरा नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटोग्राफीसाठी {इंग्रजीत} better PHOTOGRAPHY होतं असं सोपं करून सांगणारं टाटा पब्लिकेशनचं. इंग्रजी वाचता न येणारेही कुणाकडून समजवून घेत.
'मी आणि माझा बाप' प्रसिद्ध नरेन्द्र जाधव काही या नोबेल विषयावर बोलतील/लिहितील अशी अपेक्षा आहे. किंवा आपले नेहमीचे चंद्रशेखर टिळक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या लेखात कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. (काही महिन्यांपूर्वी मी जो लेख वाचला होता, तो चटकन सापडत नाहीये. विषय आणि स्पष्टीकरण हेच होतं.)
Why Rich Kids Are So Good at the Marshmallow Test

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म्म...उत्तम लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

मुबलक अन्न हा प्रकार फार तर औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाला असावा. त्यातही 'ले मिझराब्ल'सारखी उदाहरणं वेगळंच काही सांगतात.

जनुकांमध्ये होणारे बदल शब्दशः लाखो पिढ्यांनंतर होतात. मेंदूत होणारे बदल कदाचित कमी काळात होत असतील; पण तरीही हजारो वर्षं लागतात. हा माझा अंदाज; कारण शेतीचा शोध गेल्या दहा-बारा हजार वर्षांतला आणि त्यामुळे विचारपद्धतींत झालेले बदल दिसतात. ह्याला मेंदूत होणारे बदल म्हणायचं का, माहीत नाही.

आपल्याच वर्तन-विचारांतल्या विसंगती दाखवून दिल्या तर मान्य करणारे लोक फारच कमी. ह्या फोटोतली विसंगती अनेकांना आपण होऊन समजेल. पण मग मतदान करताना त्याचा विचार करा, म्हणलं तर चालेल का?
‌विदा विसंगती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी बरोबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅनर्जी ह्यांच्या कामाबद्दल लोकसत्तामध्ये जे काही तुटपुंजं वाचलं त्यामुळे अर्थशास्त्राचा, विशेषतः behavioral economicsचा प्राथमिक अभ्यास करावासा वाटला. कुणाला काही सोपे संदर्भ किंवा कोर्सेरा, इडीएक्सवरचे कोर्सेस माहीत आहेत का? काही शिफारशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुप्ता म्हणतात बॅनर्जींची दोन्ही पुस्तके वाचायला सोपी आहेत. ती बघा वाटल्यास.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरीबी हटवण्याचे उपाय भारतातही बऱ्याच लोकांना माहीत असतील पण ते अमलात आणणे भारतात अवघड आहे.
याचं एक कारण अर्थकारण आणि श्रद्धा एकमेकांचे शत्रू आहेत.

दुसरे म्हणजे परंपरावाद आणि काही प्रयोग करून बघणे यास समाजाकडून टिंगल टवाळी आणि कडाडून विरोध होतो.
आम्ही असंच करणार, अम्हाला नका शिकवू.

तिसरं म्हणजे राजकीय हेतू, निवडून येण्याची संभाव्यता गमवावी लागेल असे कोणतेही प्रकल्प होऊ द्यायचे नाहीत. (उदा. बंगालातला नानो प्रकल्प.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मदत सरकारी असो वा खाजगी... दिलेली मदत "इफेक्टीव्ह" असायला हवी.. यासाठी करून पाहिलेले छोटे छोटे प्रयोग.. २०१० चा टेड टॉक आहे पण आवडला.

https://www.youtube.com/watch?v=0zvrGiPkVcs

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Universal Basic Income In Developing World

सेक्शन २ व ३.३ मध्ये काही वागणुकीसंबंधी व मानसिक मर्यादांविषयी लिहिले आहे.

टारगेटेड स्कीम्सला अनुकूल मत नाहीय; पण युनिवर्सल इनकम देणे गरीब देशांना परवडणारे नाहीय हेही मान्य करतात.
इथल्या तज्ज्ञांनी आधीच वाचलेले असल्यास कृपया दुर्लक्ष करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0