मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद जवळपास १०० झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
आगी का लागतात - बरीच कारणं,
आगी का लागतात - बरीच कारणं, पण मुख्य म्हणजे अतिकोरडी हवा, ठिणग्या (विजेच्या तारा, घर्षण, सुका कचरा, सिग्रेटी, कँपफायर, अग्निकैफी लोकं (arsonist) ) अशी अनेक कारणं
अशा ठिकाणी का रहावं - खाडीची जमीन वापरून बांधलेल्या ठिकाणची इमारत बेकायदा असते हे माहिती असूनही लोकं तिथे नवे कोरे फ्ल्याट घेतातच की.
मग पूर्वापार एखाद्या ठिकाणी रहाणाऱ्या लोकांना असं सोडून थोडीच जाता येतं घर...
वीज का वापरायची? असं कसं
वीज का वापरायची? असं कसं विचारेन?
माझा प्रश्न -श्रीमंतांसाठी घरं बांधण्याची ही जागा निवडण्याचं कारण काय आहे? निसर्ग सौंदर्य/लोक त्रास देणार नाहीत अशी दूरची जागा/किंवा आणि काय? तिकडे लाकडी प्यानेल्स वापरून आतील भाग सजवतात ती लाकडं पेटत असतील. पण मोठमोठे विला बरेच मोठे अंगण सोडून बांधत असतील मग एका घराची आग दुसऱ्यात कशी पोहोचते? वाइल्ड फायर उर्फ वणवा पेटल्यावर उडालेले जळके तुकडे सगळीकडे पडत असतील.
जर्मन लोकांकडून बंकर्स बांधून घेतले पाहिजेत.
फक्त खवचटपणा नाही.
'वीज का वापरायची?' हा फक्त खवचटपणा नाही.
तंत्रज्ञान, नवीन गोष्टी वापरल्याशिवाय त्यांचे तोटे समजत नाहीत. औषधांचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) समजण्यासाठी बहुतेकदा त्याचा उपयोग करावा लागतो. औषधांच्या बाबतीत सोपं असतं, एक औषध झेपत नसेल तर दुसरं वापरता येतं.
घर आणि शहर बदलणं तेवढं सोपं नसतं. हे मीच चार ठिकाणी, ८ घरांत राहून झाल्यावर म्हणत्ये. नोकरी, व्यवसाय, मैत्रमंडळ, सवयीच्या गोष्टी, ह्या सगळ्याच बाबी स्वतःचा, आयुष्याचा भाग बनतात. एकदोनदा आग लागली म्हणून सोडून जाणं सोपं नसतं. आमच्या ठाण्याच्या घरातच, मी २००३पर्यंत राहिले; १९८८-२००३ ह्या १६ पावसाळ्यांत तिथे किमान ८ वेळा घरात पाणी घुसलं असेल; आम्ही ते सगळं नॉर्मल आयुष्याचा भाग समजून तिथेच राहिलो.
कारण ह्याशिवाय वेगळं आयुष्य असतं आणि ते आपण तयार करायला पाहिजे, हे समजण्यासाठी वेळ लागतो. ते समजल्यावर मान्य करायला काही काळ जातो. जेव्हा मान्य होतं, तेव्हा वेगळं आयुष्य परवडलं पाहिजे.
कालच ऐसीवरच्या सिद्धीशी बोलणं झालं. तिनं जन्मगाव, जन्मदेश सोडून दुसरीकडे राहायला जाण्याची तुलना फाळणीच्या विस्थापितांशी केली - आपल्याला अजूनही आपल्या मूळ गावी, मूळ ठिकाणी परत जाता येणं शक्य आहे. फाळणीच्या वेळी विभागलेल्या बुटालियांच्या कुटुंबाला ते शक्य नाही - ती म्हणाली.
'तरीही तिथे का राहता' असा प्रश्न, तत्त्वतः, प्रगत देशांत राहणारे कोणीही भारतात राहणाऱ्या लोकांना दररोज विचारू शकतात. पण असं कोणी विचारत नाहीत. इतरांच्या व्यक्तिगत आयुष्याच्या निर्णयांबद्दल असे प्रश्न विचारत नाहीत. इतरांच्या अशा निर्णयांबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा लोक सर्वसाधारणपणे आपापलं आयुष्य सुधारण्यात स्वतःची वेळ आणि ऊर्जा खपवतात.
इतर काही लोक - बॅनर्जी, डफ्लो, इत्यादी - असे प्रश्न स्वतःलाच विचारतात आणि त्यांची उत्तरं आपापल्या परीनं शोधतात.
घराची रचना आणि संभाव्य धोके -
घराची रचना आणि संभाव्य धोके - जर कुठे वाइल्ड फायर पोहोचण्याचा संभाव्य धोका आहेच तर तसे विरोधक घर हवं ना? आणि जर गिऱ्हाईक वाढत्या खर्चाला ना म्हणणारे आहे तर?
एका नातेवाइकाचे घर दुरून झोपडीसारखे शाकारलेल्या उतरत्या छपराचे आहे. तो म्हणाला इकडे( फ्लोरिडा?) टोर्नाडो आणि भयानक पावसाची शक्यता असते. बराच भाग तळघरात आहे.
कर्नाटकात एक घर पाण्याचा मोठा हौद करून त्यात खांबांवर दोन फुटांवर बांधले आहे. पुढच्या पायऱ्या अखंड जिन्यात नाहीत. कारण वाळवी फार आहे. ती वर येऊ शकत नाही.
गंभीर तत्वचर्चेत महान व्यक्तिंची मते, वक्तव्ये, पुस्तकातले वेचे
गंभीर तत्वचर्चेत महान व्यक्तिंची मते, वक्तव्ये, पुस्तकातले वेचे क्वोट करणे कितपत योग्य?
माणूस एखादे वक्तव्य करून जातो, त्याच्यामागे सारासार विचार असतोच असे नाही. कित्येकदा भावनेच्या ओघात माणूस बोलून जातो किंवा तात्कालिक अल्प माहितीवर घाईत मत तयार केलेले असू शकते. महान व्यक्तिंनीदेखिल वेळोवेळी व्यक्त केलेली मते किंवा त्यांची वक्तव्ये यांच्याबाबतही असे असू शकते.(अर्थात सामान्यांपेक्षा खुप कमी). महान व्यक्ति बोलून, लिहून(पत्रे, भाषणे, पुस्तके या सर्वांतून) ठेवतात, त्यातून एक सलग सूत्र प्रस्थापित होत असते, निदान विचारव्युहाची दिशा स्पष्ट होत असते, अशा वेळेला त्यांची काही वक्तव्ये किंवा भुमिका ह्या aberration म्हणावे इतक्या भिन्न, विरूद्ध भासतात. अश्या भुमिका आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तविक घटना यात तीव्र विरोधाभास दिसतो. कधीकधी त्यांच्या लिखाणात असे विरोधाभासी विचार दिसतात. त्यामुळे प्रश्न असा की महान व्यक्तिंची मते, वक्तव्ये गंभीर चर्चेत उद्धृत कराव्यात का? त्या विश्वसनिय मानल्या जाव्यात का?
+१
प्रकाशित लेख, पुस्तकातलं विधान ससंदर्भ वापरणं योग्य वाटतं. एरवी गप्पांमध्ये मांडलेली कोणाचीही मतं फार मनावर घेऊ नयेत.
दुसरं असं की वक्तव्यांची काळवेळही बघावी. म्हणजे सकाळी-संध्याकाळ भेद नव्हे. तरुण वयात मांडलेले विचार पुढे बदलले असण्याचीही शक्यता असते.
उसंत
इतक्यात कधीतरी - सतत कामात व्यस्त असणं माणसाची नव-निर्मिती क्षमता कशी क्षीण करतं किंवा संपवतं, हे सांगणारा एक लेख वाचनात आला. त्यावरून इम्तियाझ अलीचा "तमाशा" आठवला आणि त्यातली रणबीरची तडफड सुद्धा. आताच्या जगात “finding one’s passion” वगैरे कितपत सत्य आहे? किती लोक हे करू शकतात ? किती लोक पोटापाण्यासाठी करावा लागणारा उद्योग निरुपायाने करतात?
धन्यवाद आणि ही लिंक बरोबर आहे
धन्यवाद आणि ही लिंक बरोबर आहे का?
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5009556173619575582
?
कांघाई kāṅghāī f कांघाव or वें n कांगाव or वें n Loud bellowing (upon slight hurt, or to move compassion).
कांघाईखोर or कांघावखोर kāṅghāīkhōra or kāṅghāvakhōra c One that roars loudly and wildly (upon slight injury &c.)
(मोरेश्वरभटाच्या जालीय आवृत्तीतून साभार.)
मोरेश्वरभटाचा शब्दकोश १८५७चा. भाषा बदलते. काही शब्दांत फेरफार व्हायचेच.
बाकी, द्रोह सापडतो, द्रोहचिंतन सापडते, द्रोहीसुद्धा सापडतो; मात्र, देशद्रोह, राजद्रोह, राष्ट्रदोह, झालेच तर विद्रोह, विद्रोही वगैरे मातब्बर मंडळी सापडत नाहीत.
द्रोह drōha m (S) Malice, mischievousness, mind to injure.
द्रोहचिंतन drōhacintana n S Devising of evil; harboring of malice; malice prepense.
द्रोही drōhī a (S) Spiteful, vengeful, malicious.
दिलेल्या अर्थावरून द्रोह हा प्रकार माफक चावटपणापेक्षा अधिक गंभीर असू शकेल अशी धारणा तेवढी होत नाही. असो चालायचेच.
गूगल ट्रान्सलेट!!!
गू.ट्रा.द्वारे Mary had a little lambचे मराठी भाषांतर करून पाहिले. चक्क 'मेरीजवळ एक छोटे कोकरू होते' असे आले. हेही नसे थोडके!
काही वर्षांपूर्वी हेच भाषांतर 'मेरी एक छोटे कोकरू होती' असे काहीसे यायचे, असे आठवते. त्यामानाने ही खूप मोठी आणि महत्त्वाची सुधारणा आहे.
तरीही, Mary had a little lambमागील 'मेरीने थोडेसे कोकरू१ खाल्ले', 'मेरीला छोटेसे कोकरू झाले', 'मेरीने छोट्या कोकराबरोबर संभोग केला' या अर्थच्छटा सक्षमपणे मांडणे तर सोडाच, परंतु त्यांचा साधा वरवर उल्लेखसुद्धा करण्याचा प्रयत्न झालेला नाही, याबद्दल आत्यंतिक वाईट वाटते.
असो. हेही दिवस जातील, नि याही सुधारणांचा सूर्य तळपेल, अशी आशा बाळगून आहे.
..........
१ बोले तो, कोकरापासून बनविलेल्या पाककृतीचा अल्पांश. जसे की, घासभर रोगन जोश (अथवा कोकराची सागुती वा रस्सा), किंवा भाजलेल्या कोकराच्या तंगडीचा एखादाच चावा वा लचका, किंवा तत्सम काही.
रास्त अपेक्षा
तुमच्या अपेक्षा रास्त आहेत; भाषांतरात अशा गंमती आणणं मुळातच कठीण असतं. "Mary had a little lamb" ह्याचं तुम्ही सुचवता तसं चपखल भाषांतर मला सुचलं नाही. सध्या तरी भाषांतर करताना एवढ्या अपेक्षा ए.आय.कडून ठेवू नयेत.
गमतीशीर विचार मनात आला. समजा अशी भाषांतर मोठ्या प्रमाणावर ए. आय.ला शिकवली तर भाषांतर करण्याचं काम आणखी किती कठीण होईल. भाषांतर करताना ते करणारीला काय अर्थ लागला आहे, ह्यानुसार भाषांतर होतं. मूळ लेखिकेच्या मनात काही निराळंच असेल आणि ते भाषांतर करताना लक्षात आलं नाही तर तो अर्थ लोपून जाईल. पण ए. आय. असे योग्य अर्थ सुचवेल आणि भाषांतर करण्याचं काम आणखी कठीण होईल. मूळ लेखन करताना नक्की काय विचार होता, ह्याचा आणखी जास्त खोलवर विचार करावा लागेल, होईल.
ह्या वेळच्या दिवाळी अंकात मानस रेंच्या मूळ लेखात वाक्य आहे, The camels were coming ... The camel finally arrived. ह्या वाक्यांचा स्वतंत्र अर्थ लागत होता. पण संदर्भात ते काही बसत नव्हतं. गूगलल्यावर समजलं की हा जुन्या करारातला संदर्भ आहे. मराठी लोकांच्या बोलण्यात जुन्या कराराचे संदर्भ येत नाहीत. म्हणजे निराळं भाषांतर करणं अपेक्षित होतं. आगेमागे किती मजकूर बघून ठरवावं की ही वाक्यं वाक्प्रचारासारखी आली आहेत. संस्कृती, धार्मिक संदर्भांची भाषांतरं सोपी नसतात. हे विदाविज्ञानाला कसं शिकवायचं, मला माहीत नाही.
(सवांतर)
गूगलल्यावर समजलं की हा जुन्या करारातला संदर्भ आहे.
यावरून आठवले. येशू स्वतःस "परमेश्वराचे कोकरू" म्हणवून घेत असे, असे नव्या करारावरून समजते. आता, त्याच्या आईचे नाव मेरी होते, पक्षी, त्याच्या आईला म्हणजे मेरीला कोकरू झाले१, असे म्हणावयास वाव आहे. (किंवा, साध्यासुध्या अर्थानेच जायचे झाले, तरीही, त्याच्या आईकडे एक कोकरू२ होते, असा दावा कोणी केल्यास त्यातही काही वावगे ठरू नये.३) मात्र, 'मेरी हॅड अ लिट्ल लँब' हे बालगीत मेरीमाता आणि येशूवरून प्रेरित असावे, असा कोणताही दावा अथवा नोंद कोठेही आढळत नाही. त्यामुळे, हा निव्वळ योगायोग समजावा काय?
..........
१ कौमार्यावस्थेत, हा तपशील येथे गौण आहे.
२ खुद्द येशू.
३ इतर अर्थांच्या अनुषंगाने कोणतेही विधान आम्ही केलेले नाही आणि करू इच्छीतही नाही, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. आगाऊ आभार.
तुम्ही काय शोधता आणि अपेक्षित
तुम्ही काय शोधता आणि अपेक्षित आहे हे तुमच्या ब्राउजिंग हिस्ट्री/फेसबुक पोस्ट पाहून आधारित उत्तरं मिळू लागण्याचा काळ फार दूर नाही. त्याला काय नाव द्याल ते.
गुगल असिस्टंट अमुक फोनवर उत्तम चालते असे म्हणतात तेव्हा हँडसेटवाल्याने बरेच ब्लोटवेर भरून ठेवलेले असावे.
त्यांची / काहींची स्टोरेज आणि मेमरी तपासल्यावर - उदाहरणार्थ 32GB (18GB available); RAM 3GB (680MB available) हे फार सूचक आहे. तर इतर काही स्टॉक android फोनात -
32GB (26GB available); RAM 3GB (2 GB available).
आता या कमी अधिक स्टोरेज/मेमरी नेमके कशाचे द्योतक आहेत हा एक तर्कही आहे हे मान्य करतो.
शोध उत्तरासाठी करंट टॉपिक्स, हिस्ट्री धुंडाळले जाण्याची शक्यता टाळता येत नाही.
मग नबा किंवा आचरटबाबास आवडती पर्यायी उत्तरे मिळतील.
टॉपिक वाहवत चालला असेल तर जाऊ द्या. दुसरीकडे वळतो.
कमळीची लावणी
कमळीची लावणी
पाहुनी सुकता सत्तेचा मळा
सुकून जाई माझाही गळा
हरहुन्नरी साजण माझे
दाखवा मज तुमची कला
अन् राया आता, तुम्हीच सु-सिंचन घाला
अहो दादा आता, तुम्हीच सु-सिंचन घाला
ईडी-पीडाही जाईल हो टळून
सगळे किल्मिष जाईल गळून
काहीच ना केले पाप तुम्ही बै
केलाच नाही तो घोटाळा
अन् राया आता, तुम्हीच सु-सिंचन घाला
अहो दादा आता, तुम्हीच सु-सिंचन घाला
तुम्हांस हिणवून आले गादीवर
सोवळे सोडून आले खादीवर
गेली गादी अन् गेले सोवळे तर
झाकू सांगा कशी मी मला
अन् राया आता, तुम्हीच सु-सिंचन घाला
अहो दादा आता, तुम्हीच सु-सिंचन घाला
दवणे वपु वगैरे का झोडपले जातात ?
म्हणजे एक प्रश्न आहे पुर्वीही पण सध्याच्या काळात दवणे वा वपु हे विशेषकरुन ललित लेखक का जास्त झोडपले जातात ? यांच्या लेखनावर वा या टाइपच्या कुठल्याही लेखनावर टीका का होत असावी ? याची जी काय उत्तरे मला सुचतात ती अशी
१- दवणे आदी मंडळी जे काय लिहितात ते सध्याच्या वास्तवा पासुन कदाचित फार दुर झालेले असावे म्हणजे लोक जे काय भयंकर वास्तव जगतात भोगतात त्यात त्यांना ते या मंडळीच लेखन कुठेच रीलेट च करता येत नसावे कदाचित.
२- या मंडळींच लेखन शैली सर्वातच पुनुरुक्ती नाविन्याचा अभाव असल्याने वाचकाला अगोदरच कल्पना येते की आता हे पुढे काय लिहिणारं म्हणजे प्रेडिक्टेबल झालेलं लेखन लोकांना आवडत नसावे.
३- गोडव्याचा सकारात्मकतेचा सौंदर्याचाही एक विशिष्ट प्रकारचा कंटाळा येत असतो तसे काही होत असावे का ?
४- वाचकांची भुक आता वाढलेली आहे त्यांना व्यामिश्रता अधिक भावत आहे त्यांना त्रास झाला तरी चालेल पण काहीतरी सकस अस्सल सखोल अनुभव देणारं विचारप्रवृत्त करणारचं लेखन आता आकर्षीत करत आहे .
५- या प्रकारच्या लेखकांच्या तंत्राचा उबग आलेला आहे शैलीचा उबग आलेला आहे की अजुन काही आहे ?
म्हणजे काय आहे कारणे ? काय असावीत ? यावर अजुन जाणुन घ्यायला आवडेल्
बेगडीपणा.
माझं ममव आयुष्य, वास्तव भयंकर वगैरे अजिबातच नाही. व्यक्तिगत आयुष्यात सगळं सुखात सुरू असतं. प्रश्न असतीलच तर फार जास्त पर्याय असल्यामुळे तयार झालेले आहेत. मी लौकिकार्थानं यशस्वी वगैरे आहे. पण हे दवणे-वपु वगैरे जे जीवनमंत्र सांगतात त्यांतलं बहुतेकसं मी लहान वयातली निरागसता म्हणून फार तर केलं असेल. उदाहरणार्थ, बाहेरचं आणून/जाऊन खाण्याचा गंड बाळगणं; प्रश्न तत्त्वाचा करणं वगैरे; त्यामुळे दवणे-वपु बेगडी वाटतात.
वपु-दवणे ज्या वर्गातले लोक आहेत, त्यांची बदललेली मूल्यं आणि जीवनपद्धती लेखनात दिसत नाहीच. शिवाय जगण्यातली गुंतागुंतही वाढलेली आहे ती एका ट्वीटमध्ये मावत नाही. तरीही सगळं-सगळं एका ट्वीट/वाक्यामध्ये बसवण्याचा हव्यास निरर्थक ठरतो.
त्यात विनोदही नाही; राखी सावंत स्वतःला अजिबात सिरीयसली घेत नाही, तसंही काही ह्या लोकांचं नाही. तरीही लोक त्यांचं लेखन, तसलं लेखन 'वा-वा-चान-चान' म्हणून डकवत फिरतात. म्हणून ह्या लोकांची टिंगल होते. अडगळीत पडले असते आणि ह्याच ममवंनी दवणे-वपुंना डोक्यावर घेतलं नसतं तर कोणी टिंगल करण्याच्या फंदातही पडलं नसतं.
महाग्रुंची टिंगल होते त्याचं हेच कारण. वारेमाप प्रसिद्धी, "प्रथमपुरुषी, मीवचनी" वर्तन, त्या हिशोबात क्वालिटी अजिबातच नाही.
नबा ही कित्श ची संकल्पना मिलन कुंदेरा च्या
मिलन कुंदेरा च्या अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग या विलक्षण कादंबरी मध्ये लेखक ही संकल्पना डिस्कस करतो. ही कादंबरी मुळातुन वाचण्यासारखी अत्यंत अप्रतिम अशी आहे. यातील कुंदेरा चे हे कादंबरीतील संबंधित परीच्छेद जरुर बघावेत. फार वेगळ्या दिशेने केलेला हा विचार आहे असे मला वाटते.
Behind all the European faiths, religious and political, we find the first chapter of Genesis, which tells us that the world was created properly, that human existence is good, and that we are therefore entitled to multiply. Let us call this basic faith a categorical agreement with being.The fact that until recently the word shit appeared in print as s— has nothing to do with moral considerations. You can't claim that shit is immoral, after all! The objection to shit is a metaphysical one. The daily defecation session is daily proof of the unacceptability of Creation. Either/or: either shit is ac-ceptable (in which case don't lock yourself in the bathroom!) or we are created in an unacceptable manner. It follows, then, that the aesthetic ideal of the categorical agreement with being is a world in which shit is denied and everyone acts as though it did not exist. This aesthetic ideal is called kitsch.
Kitsch is a German word born in the middle of the senti-mental nineteenth century, and from German it entered all Western languages. Repeated use,however, has obliterated its original metaphysical meaning: kitsch is the absolute denial of shit, in both the literal and the figurative senses of the word; kitsch excludes everything from its purview which is essentially unacceptable in human existence.
Sabina's initial inner revolt against Communism was aesthetic rather than ethical in character. What repelled her was not nearly so much the ugliness of the Communist world (ruined castles transformed into cow sheds) as the mask of beauty it tried to wear—in other words, Communist kitsch. The model of Communist kitsch is the ceremony called May Day.
Those of us who live in a society where various political tendencies exist side by side and competing influences cancel or limit one another can manage more or less to escape the kitsch inquisition: the individual can preserve his individuality; the artist can create unusual works. But whenever a single polit-ical movement corners power, we find ourselves in the realm of totalitarian kitsch.
When I say totalitarian, what I mean is that everything that infringes on kitsch must be banished for life: every display of individualism (because a deviation from the collective is a spit in the eye of the smiling brotherhood); every doubt (be-cause anyone who starts doubting details will end by doubting life itself); all irony (because in the realm of kitsch everything must be taken
quite seriously); and the mother who abandons her family or the man who prefers men to women, thereby calling into question the holy decree Be fruitful and multiply.In this light, we can regard the gulag as a septic tank used by totalitarian
kitsch to dispose of its refuse.In the realm of totalitarian kitsch, all answers are given in ad-vance and preclude any questions. It follows, then, that the true opponent of totalitarian kitsch is the person who asks questions. A question is like a knife that slices
through the stage backdrop and gives us a look at what lies hidden behind it.
प्रतिसाद आवडला
शिवाय जगण्यातली गुंतागुंतही वाढलेली आहे ती एका ट्वीटमध्ये मावत नाही. तरीही सगळं-सगळं एका ट्वीट/वाक्यामध्ये बसवण्याचा हव्यास निरर्थक ठरतो.
हे वाक्य विशेष आवडलं यावरुन वपुंचे सुविचार जे लायब्ररींच्या पुस्तकात अंडरलाइन केलेले असतात द्यायचा मोह आवरत नाही.
गंमत पाहा!
पहिल्या वाक्यात जे म्हणलं आहे, त्या गोष्टींचा त्रास मला खरंच नाही. पण पकाऊ लोक भेटतात; नोकरी जाते, ती पुन्हा मिळवावी लागते; कामाच्या ठिकाणी मनानं सरळ पण जरा भोळसट किंवा अशाच काय-काय विसंगती असणारे लोक भेटतात; शहरातलं प्रदूषण आणि ट्रॅफिकचे त्रास वाढले आहेत; मायबाप मधूनच नोटाबंदी लादतात; आजूबाजूचे लोक उगाच समाजमाध्यमांवर भांडत असतात... अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. त्यांतल्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं पण तेही शिकावं लागतं. प्रदूषण, पर्यावरणऱ्हास, लोकांमध्ये वाढत चाललेली दरी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं म्हणलं तरी करता येत नाही.
माझ्याच बाबतीत व्हिजाच्या गंमतीजंमती; नवनवीन शिकण्याची आणि त्याचा वापर करण्याची, लिहिण्याची हौस; समजत नाही तोवर त्याचा डोक्याला त्रास, समजलं की त्याबद्दल लिहिण्याची खाज अशा गोष्टी घडत असतात. अशा गुंतागुंती एका वाक्यात, ट्वीटमध्ये कशा माववणार? मी दुःखात वगैरे अजिबात नाही; पण सोपं-सोपं आयुष्य मला फार कंटाळवाणं, रटाळ आणि नकोसं होईल.
दवणे - वपु* टाइपच्या लेखनाची
दवणे - वपु* टाइपच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये किंवा त्यात ठराविक क्लिशे असतात. पुलंनी सुद्धा लोकानुनयासाठी हे क्लिशे वापरले आहेत.
१. पूर्वीचे लोक संस्कारी होते, आता नाहीत
२. पूर्वीच्या लोकांना अडचणी जास्त असल्या तरी ते हसतमुखाने त्याला सामोरे जायचे.
३. पूर्वीच्या लोकांकडे पैसा नसेल पण प्रेम होते
४. आमच्या लहानपणी विशिष्ट प्रकारे सण समारंभ साजरे होत. त्यात आम्हाला खूप मजा वाटे. त्या प्रकारे सण आता साजरे होत नाहीत.
५. संस्कृती बुडत चालली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीच्या लोकांकडे प्रेम होतं वगैरे विधानं फारच बेगडी आहेत.
दुसरे म्हणजे दवणे/वपु आणि त्यांचे वाचक पन्नास वर्षापूर्वी कनिष्ठ मध्यम वर्गात [अल्पशिक्षित-अल्प उत्पन्न असलेले नोकरदार] मोडत होते. त्या वाचकवर्गाची मुले नातवंडे त्या कनिष्ठ मध्यम वर्गातून वरच्या वर्गात गेली आहेत. खर्डेघाशी कारकुनांची मुले इंजिनिअर डॉक्टर मॅनेजर्स झाली आहेत. या आर्थिक सामाजिकअभिसरणाची दखल घेतली जात नाही. त्या वेळच्या ममव समाजातील ९० टक्के मंडळी कारकून असतील तर आजच्या ममव समाजातील पन्नास टक्क्याहून अधिक मंडळी वर सरकलेली आहेत. पण त्या वर सरकलेल्यांनी पूर्वीसारखेच वागत रहावे अशी काहीतरी विचित्र अपेक्षा हे वपु दवणे लोक करतात. म्हणून ते झोडपले जातात.
अवांतर: वपु हे खरे म्हणजे मुंबईचा जावईचे लेखक बोले तो चाळीतील राहणीत होणारी कुचंबणा मांडणारे लेखक.
गवि सहीए असचं पाप जी. ए. कुलकर्णींनी ही केलेलं आहे
जी.ए. कुलकर्णींच्या कथेतही पात्रे बेअरींग सोडुन फिलॉसॉफी झाडु लागतात्
खर म्हणजे त्यांच्या मुखावाटे जी.ए. कैकदा ( कथेला व पात्राच्या तोंडात् एकुण रचनेत अनैसर्गिक वाटेल अशी कृत्रिम दिसणारी ) फिलॉसॉफी बळेच झाडुन जी.ए. स्वत:चाच कॅथार्सिस करुन घेताहेत की काय. असे जाणवत राहते. पण जी.ए. पवित्र अभिजाततेच्या फडताळात असल्याने ते धकुन गेले असावे. मला तर कधी कधी वाटत जी.ए. नी कथा या आपली फिलॉसॉफी सरळ निबंधात रुक्ष वाटेल मांडायला म्हणुन शिवाय त्यांच्यात ललितभुक ही होतीच तर असे दोन्ही साध्य करण्यास फिलॉसॉफी कथेच्या माध्यमातुन लिहीलेल असेल.
वपु बिचारे फसले.
म
वि. स. खांडेकर देखील असेच.
वि. स. खांडेकर देखील असेच. ययाती/अमृतवेल झालंच तर पहिले प्रेम यातील जी त्यांच्या ‛सु’विचार-वजा वाक्यांनी इतकं गारुड केलेलं असतं की, लोकांना वाक्य कुठलं हे माहीत नसतानादेखील ते महान विचार असल्यासारखं सर्रास फेकत असतात. त्या वाक्यांचा इतका उबग येतो, की नकोसं होतं. ‛पहिले प्रेम’च्या प्रस्तावनेत त्यांनी केलेली प्रेमाची समीक्षा ही त्यांची वैचारिक मर्यादा असावी असं आता वाटतं. पण त्याकाळी थोडा-बहुत तिरकस/बंडखोर विचार डोक्यावर घेणं ह्यात नवल असावं. असो.
म्याडम, म्हणतात तशा कोट्सचा उबग आलेला आहेच; पण आता तशा कोट्स माझ्याच्याने वाचवतदेखील नाही.
युनिकोड.
युनिकोड.
मटा किंवा इतर ठिकाणी " तुमचा लेख २००-२५० शब्दांत युनिकोडमध्ये टाइप करून इथे इमेल करा" वगैरे सूचना दिसते.
प्रश्न - android app - google keep/color note. किंवा word मध्ये टाइप केलेलं हे युनिकोडमध्ये/ दुसऱ्या कोणत्या फॉन्टमध्ये आहे हे कसं कळणार?
((color note.मध्ये लिहून इथे कॉपीपेस्ट करतो.))
ॲपल, गूगल, मायक्रोसॉफ्ट
प्रश्न - android app - google keep/color note. किंवा word मध्ये टाइप केलेलं हे युनिकोडमध्ये/ दुसऱ्या कोणत्या फॉन्टमध्ये आहे हे कसं कळणार?
जर मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर गूगलचा किंवा ॲपलचा कळफलक, गूगल इनपुट टूल्स, मायक्रोसॉफ्ट कळफलक वगैरे आधुनिक साधनं वापरून टंकलं असेल तर ते युनिकोडातच असतं. श्रीलिपी किंवा तत्सम बाबा आदमच्या जमान्यातली साधने वापराल, तर तुमचे हाल तुम्हाला लखलाभ :-)
धन्यवाद!
धन्यवाद!
नवीन फोन, वेळोवेळी अपडेट केलेलेच android apps वापरतो.
------------
शंका -
html5test_dot_com ही साईट रन केली की " you are using xxx browser, xxx version and html5 compatibility store is 520/555 वगैरे मिळतं तशा धर्तीवर टाईप केलेलं कुठेतरी पेस्ट करून "you are using xxx code, xxx version, times sans font" वगैरे जाणून घेण्याचा ठोकळा असतो का ही उत्सुकता होती.
आता महाराष्ट्राच्या वहिनी कुठल गाणं गातील ?
आता अमृता फडणवीस महाराष्ट्राच्या वहिनी ( हे त्या स्वत:ला म्हणवुन घेतात मी नाही ) कुठल गाण गातील ( त्या गायिका आहेत अस लोक म्हणतात मी नाही )
१-लौट के आ लौट के आ लौट के आ , आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते है मेरा सुना पडा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते है.
२-पाखरा कधी येशील रे परतुन ?
३-जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम वो फिर नही आते
वहीनींची व्हरायटी कितीही असो देवेंद्र भावोजी आपली सिंग्नेचर ट्युन सोडणार नाहीत ते एकच म्हणतील फार तर भाषा वगैरे बदलतील पण
मुद्दा सोडणार नाही भावोजी गातील
मैं वापस आऊंगा, घर अपने गाँव में
उसी की छांव में, कि माँ के आँचल से
गाँव की पीपल से, किसी के काजल से
किया जो वादा था वो निभाऊंगा
मैं एक दिन आऊंगा...
काळ सोकावतो.
फडण२० हरल्याचं (थोडंसंच) दु:ख सोडलं तर जास्त त्रास होतो आहे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा.
आता हे ठाकरे वरिजनल जाळपोळ ठाकऱ्यांपेक्षा बरेच सुधारलेयत
तरीही गेल्या २० वर्षांत मुंबै महानगरपालिका हातात असून मुंबैचा ह्यांनी जो चिखल केलाय तो पहाता पोटात गोळा आलेला आहे.
त्यात पुन्हा पवार आणि काँग्रेस सोबत म्हणजे आणखी नाटकं.
त्यापेक्षा फडण२०, परत या.
१) कॉमन मिनि प्रो ठरला तरी
१) कॉमन मिनि प्रो ठरला तरी परवा "मी हिंदुत्व सोडणार नाही" हे एका सभेत सांगितलं.
२)एक तारखेचा सामना अग्रलेख मुतऱ्या अजित पवारास समर्पित केला होता!!लायकी काढून झाली.
३)भाजपबरोबर असताना त्यांचा कोथळा बाहेर काढला होता.
या प्रवृत्ती एक राजकीय पक्षापेक्षा शाळेतली वाटतात.
त्यापेक्षा सोनुबाईंचा संयमितपणा चांगला वाटतो.
मलाही असंच वाटतंय.
मलाही असंच वाटतंय.
पण - परंतु- यदाकदाचित असंही होईल-
अश्लाघ्य शब्दांत, शेलक्या शब्दांत टीका करणं, सदानकदा म्यानातून तलवारी पाजरण्याची, कोथळे काढण्याची भाषा करणं ह्यापेक्षा सरकार चालवणं आणि काहीतरी सकारात्मक करणं हे फार कठीण काम आहे हे उद्धव ठाकरेंना कळेल.
केजरीवालांनी नाही का सुरूवातीला स्वत:च्याच सरकारविरोधी आंदोलन वगैरे केलं होतं, मग ते सगळं नाटक बंद करून ते गुमान सरकार चालवायला लागले,- त्यातले निर्णय आणि त्यांची योग्यायोग्यता ही वायली गोष्ट.
तद्वत महाराष्ट्रातही कामाला मुख्यमंत्री आणि भुंकायला राऊत असं होण्याची आशा आहे.
----
नाहीतर आहेच पुन्हा मुंबै महानगरपालिका पॅटर्न.
|| जय श्री बिनाबजेटबेटीबचाओबाबा प्रसन्न ||
|| जय श्री बिनाबजेटबेटीबचाओबाबा प्रसन्न ||
जोपर्यंत पॅट्रिआर्किच्या वळचणीला आपापल्या मालकांच्या सुखरूप पंखाखाली बसलेल्या चिमण्या डेथ पेनल्टी पाहिजे असल्याचा चिल्लर चिवचिवाट करत होत्या तोवर लक्ष देण्याची गरज नव्हती. कठुआतल्या कृष्णकर्मीयांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या किंवा सेंगरभावोजींना पाठीशी घालणाऱ्या किंवा चिरकुट चिन्मयानंदचे चीप चाळे खपवून घेणाऱ्या पार्टीचे अनुयायी ज्यांचे मालक आहेत, त्या ह्या चिमण्या फीलगुडसाठी आर्मचेअर उबवत चिवचिवल्या, तर कोणाला त्रास असायचे कारण नाही.
परंतु, ज्यांनी राज्यसभेत कायदा निर्माण करायच्या जड जबाबदारीने जडावून जायला हवे त्या जडबुद्धी जयाबाई (बोल)बच्चन ह्यांनी डायरेक्ट कायद्याला काडीमोड देऊन लिंचिंग नामक परदेशस्थ कल्पनेचा पुरस्कार केला हे पाहून अगदी संत्ररसचावक वाॅलरसकाकांच्याही मिशा किंचित नापसंतीने थरथरल्या असाव्यात.
जयाबाई ज्या महान उद्योगातून राज्यसभेपर्यंत पोचल्या त्याच उद्योगातली काही उदाहरणे जयाबाईंच्या जुळ्या डोळ्यांच्या परिघात बसत नाहीत ह्याचे आश्चर्य नाही; पण विषाद अवश्य वाटू शकतो. म्हणजे बघा २०१७ मध्ये आपल्याच सहकारिणीचा लैंगिक छळ करणाऱ्या विकास बहल नामक नरपुंगवाला रिलायन्सच्या अत्यंत निष्पक्षपाती अशा अतर्गत तक्रार निवारण समितीने (हसू नका) त्यांच्या सुपर थर्टी पिक्चरच्या रिलीजपूर्वीच क्लीन चीट दिली, किंवा अन्नू मलिक ह्या एरवी महान प्रतिभाशाली असलेल्या पण केवळ कडक काॅपीराईट कायद्यामुळे धंदा बसलेल्या संगीतकाराविरुद्ध सात तक्रारी असूनही “इंडियन आयडाॅल (बाॅलीवुडी उच्चार: आयडल)” नामक कार्यक्रमात पुनरेकदा परीक्षक म्हणून सन्मानाने पाचारण केले गेले; तेव्हा जयाबाई (बोल)बच्चन यांचा घसा बहुतेक पनामा पेपर्स चावून गिळल्यामुळे सुकला असावा.
ह्या अशा महान एलीटांच्या सहवासासाठी लोटांगण घालणाऱ्या महान प्राण्यांच्या कळपात आपण राहतो हे आपले नशीब!
ह्या नशीबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी खालील मंत्राचे सहस्रावर्तन करावे असे शास्त्रात लिहीले आहे.
“बहुत हुआ नारी पे वार
अब की बार मोदी सरकार”
ॐ शांती ॐ
स्वत:चा इतिहास स्वत:च
स्वत:चा इतिहास स्वत:च लिहिणाऱ्यांच्या परंपरेतल्या काकांनी जाहीर केले आहे की लींचिंग ही परदेशी कल्पना आहे.
येशू क्रिस्ताने “ज्याने स्वत: कधीच पाप केलेले नाही त्याने पहिला दगड मारावा” असे सांगितल्याची गोष्ट आहे; त्या गोष्टीवरून हेच सिद्ध होते की दगडाने ठेचून मारणे ही वाळवंटातल्या मागास लोकांची सर्वसामान्य परंपरा तेव्हापासून आहे.
स्वत: कृष्ण भगवान क्रिस्त बनून तिकडे गेले व ते थांबवण्याचा प्रयत्न केला. भगवान कृष्ण अपयशी ठरल्याचेही हे एकमेवच उदाहरण.
भारतात जे चालतं ते लींचिंग नाही असे काका म्हणतात. अखलाक, पहलू खान, सोहराबुद्दीन, जज लोया इत्यादी लोकांना कोणीही मारलेले नाही हे न्यायालयांनी सिद्ध करून काकांच्या मताला पुष्टीच दिली आहे.
ज्याप्रमाणे एकलव्याने स्वत:हून अंगठा कापून दिला, ज्याप्रमाणे कर्णाचा रथ आपोआप दलदलीत रुतला, ज्याप्रमाणे अध्यात्मिक मुक्तीसाठी लोक बंद गटारांमध्ये स्वखुशीने उतरतात त्याप्रमाणे बलात्काऱ्यांनीही स्वखुशीने प्राण सोडावे असे जयाबाईंनी म्हणायला हवे होते.
नशापाणी न करता
नशापाणी न करता जेव्हा एखादा योनीभंजक असे नाव धारण करतो तेव्हा या पुरुषधार्जिण्या जगात त्यांच्या अशा उद्दाम, मस्तवालपणा द्योतक वागण्याकडे सरसकट उच्चारस्वातंत्र्य या नावाखाली दुर्लक्ष करणे हे सर्वार्थसाधक मौन मनाला नैराश्य आणते.
(यावरून आलेला प्रतिसाद बातमी धाग्यातून इथे हलवला आहे.)
अर्थ एकच की...
‛योनीभंजक’ला योनीनाशक, योनी नाशकर्ता, योनी मोडणारा, योनीवर उतारा देणारा, योनीदोषापहारक, योनी प्रतिकारक, योनीखंडन की योनी फोडणे/तोडणे यापैकी (वा इतर) नेमका कोणता अर्थ इथं गृहीत धरलेला असावा... म्हणजे तसा अर्थ नेमका कोणता असेल हे सद्सद्विवेक बुद्धीला कळत असलं तरी मला तसं म्हणायचं नव्हतं, वगैरे म्हणायला तरी संधी का द्यावी...
केशवसुतांच्या मूर्तिभंजन या
>>> योनीभंजक’ला योनीनाशक, योनी नाशकर्ता, योनी मोडणारा, योनीवर उतारा देणारा, योनीदोषापहारक, योनी प्रतिकारक, योनीखंडन की योनी फोडणे/तोडणे यापैकी (वा इतर) नेमका कोणता अर्थ इथं गृहीत धरलेला असावा... म्हणजे तसा अर्थ नेमका कोणता असेल हे सद्सद्विवेक बुद्धीला कळत असलं तरी मला तसं म्हणायचं नव्हतं, वगैरे म्हणायला तरी संधी का द्यावी...
---
केशवसुतांच्या मूर्तिभंजन या कवितेवरून मला योनीभंजक हे सदस्यनाम सुचलं.
कृपया गैरसमज नसावा.
नो कॉमेंट्स...
>>>
नशापाणी न करता जेव्हा एखादा योनीभंजक असे नाव धारण करतो तेव्हा या पुरुषधार्जिण्या जगात त्यांच्या अशा उद्दाम, मस्तवालपणा द्योतक वागण्याकडे सरसकट उच्चारस्वातंत्र्य या नावाखाली दुर्लक्ष करणे हे सर्वार्थसाधक मौन मनाला नैराश्य आणते.
---
काही बाबतीत ऐसीवर उच्चार स्वातंत्र्य आहे. हे सदस्यनाम मी मिपावर घेऊ नाही शकणार.
जाऊद्या ना राव / जाऊद्या ना
जाऊद्या ना राव / जाऊद्या ना बाई -
मी जो मूळ मुद्दा मांडला त्याबद्दल बोला ना.
---
हवं तर मी माझं सदस्यनाम बदलून योनीवर्धक असं करू का?
नाहीतर, माझ्या सदस्यनामावर आक्षेप घेणाऱ्यांनी दुसरे एक सदस्यनाम सुचवावं, ते मी स्वीकारीन.
---
But don't shoot the Messenger.
हेच म्हणायचं होतं...
आता एवढं करून माझ्या नावावरच घसरायचं असेल तर माझं आडनाव जोशी; झुत्शी-जोशी बहना-बहना असा आरोप सहज करता येईल!
माझ्या प्रतिक्रियेला
माझ्या प्रतिक्रियेला शांतादुर्गा यांच्या लेखाचा संदर्भ होता, पण मी ते त्यांना प्रतिसाद म्हणून न लिहिता स्वतंत्रपणे लिहिले, त्यामुळे नंतर "नशापाणी न करता" हे का लिहिले असा प्रश्न पडू शकतो. हा वाक्प्रयोग कायदेशीर मसुद्यांमध्ये जबाबदारीने केलेले विधान या अर्थी वापरतात.
आपल्या खऱ्या, प्राप्त नावाखेरीज कोणते नाव घ्यायचे हा शेवटी मानसिकता दर्शक निर्णयच असतो आणि हे असले नाव धकवणे हे शौर्य !!!
...
हा वाक्प्रयोग कायदेशीर मसुद्यांमध्ये जबाबदारीने केलेले विधान या अर्थी वापरतात.
धन्यवाद.
आपल्या खऱ्या, प्राप्त नावाखेरीज कोणते नाव घ्यायचे हा शेवटी मानसिकता दर्शक निर्णयच असतो
वेल... इनॅज़्मच ॲज़ मनुष्याला ज्यात चॉइस आहे अशा कोणत्याही बाबतीत मनुष्याने (स्वेच्छेने, नशापाणी न करता, कोणत्याही दडपणाखाली न येता, वगैरे वगैरे नेहमीचे लीगॅलीज़ गॉबलडीगूक१) घेतलेला निर्णय वा केलेली कृती ही अंतिमतः मानसिकतादर्शकच असते, हाही निर्णय मानसिकतादर्शक असल्यास आश्चर्य नाही.
मात्र,
हे असले नाव धकवणे हे शौर्य !!!
यात शौर्य असे काही असण्याबद्दल साशंक आहे.
असो.
..........
१ अरे हो! मनुष्यास 'कायद्याने सज्ञान' म्हणून क्वालिफाय करायचे विसरलो.
सूचना
ऐसी अक्षरेवर उदारमतवाद आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य असावं ह्याबद्दल व्यवस्थापक आणि संस्थळाचे सर्व हितचिंतक आग्रही आहेत. मात्र इतरांना त्रास होईल असे हिंसक विचार वा सदस्यनामं वापरणं ही गोष्ट व्यवस्थापक आणि ऐसीच्या अनेक हितचिंतकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याखाली खपवून घ्यावी असं वाटत नाही. तेव्हा 'योनीभंजक' हे सदस्यनाम ऐसीवर चालणार नाही.
सदर सदस्यानं आपलं नाव बदलावं; अन्यथा तीन दिवसांनी सोमवारी, ९ डिसेंबरला सदर सदस्यखातं गोठवण्यात येईल.
हो हो अगदी अगदी मी सुद्धा फार मिस कर्तोय्
आर्थिक प्रश्न व त्यावर हिरीरीने चर्चा करणारे मेंबर सध्या दिसतच नाहीत.
त्यामुळे एक मेजर विषय कमी होउण ऐसीच्या अष्टपैलुत्वाला एक तडा जाऊन एक पैलु कमी झालाय्
पोकळी जाणवतेय्
शिवाय परंपरेच्या बाजुने हिरीरीने बाजु मांडणारेही अजो सारखे काही मेंबर सक्रिय नसल्याने अजुन एक पैलु कमी झालाय्
एकुण ऐसीचे भाजपीकरण होतेय विरोधीपक्षच नसेल तर काय मजा ?
ऐसी प्रेडीक्टेबल होत चाललय दिवसोंदिवस
अनु राव का येत नाहीत माहिती
अनु राव का येत नाहीत माहिती नाही. त्या आर्थिक विषयात प्रतिसाद देणाऱ्यांपैकी एक होत्या.
या विषयात सहभाग घेणारे दुसरे सदस्य गब्बर सिंग यांना ऐसी व्यवस्थापनाने त्यंच्या प्रक्षोभक* प्रतिसादांमुळे ताकीद दिली म्हणून ते आता इथे प्रतिसाद देत नाहीत. यात ऐसी व्यवस्थापनाची चूक नाही.
*गरीब व कामगार यांणा क्रूरपणे ठेचून काढले पाहिजे वगैरे विधाने
प्रश्न - वोडाफोनसंबंधी आणि
प्रश्न - वोडाफोनसंबंधी आणि टेलिकॉम लायसन फी.
नेटवर्क लायसन फी ही टेलिकॉम कोअर बिझनेसच्या रेवेन्युवर (परसेंटेज) असावी असे मत आणि वोडाफोन कंपनीचा दावा होता. सरकारी मागणी संपूर्ण रेवेन्यु - इंटरेस्ट, भाडं वगैरे धरून.
एपेक्स कोर्ट बसवून सरकारी दावा बरोबर असा निर्णय झाला.
- तर वोडाफोन कंपनीचा नान कोअर ( टेलिकॉम बिझनेस) इन्कम इतका प्रचंड की पन्नास हजार कोटींची तरतूद ( प्रविजन) करावी लागली ?? (त्यात सात आठ वर्षाची साचलेली पेएबलही असावी).
वोडाफोनचे लीगल/फिस्कल डिपार्टमेंटही हे लवकर समजु का शकले नाही?
टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ
टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ होता असे सकृद्दर्शनी वाटते.
https://telecom.economictimes.indiatimes.com/news/agr-issue-heres-the-c…
या बातमीनुसार टेलिकॉम कंपन्यांनी विकलेले हँडसेट्स, इतकेच काय तर रोमिंग चार्जेसही कोअर इन्कममध्ये धरले जात नव्हते (टेलिकॉम कंपन्यांच्या हिशोबाने). त्यामुळे द्यावी लागणारी लायसन्स फी वगैरे खूपच कमी होती. आता कॅपिटल गेन्स आणि इन्श्युरन्स क्लेम सोडता सर्व काही मूळ व्यवसायातून मिळणारे उत्पन्न धरण्यात यावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याने बांबू लागला आहे. कारण २००३ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने संपूर्ण उत्पन्नावर व्याज आणि दंडासकट लायसन्स फी भरावी लागणार आहे. व्होडा-आयडिया (सुमारे ५०,००० कोटी) आणि एयरटेल (सुमारे ४०,००० कोटी) आधीच तोट्यात असल्याने गाळात जाण्याची शक्यता अधिक आहे. सगळ्यात सेफ जियो आहे, कारण त्यांना सर्वात कमी पैसे भरायला लागणार आहेत.
रोमिंग चार्जेस* ठीक आहे पण
रोमिंग चार्जेस* ठीक आहे पण "रेव्हेन्यू शेअरिग" हे स्पेक्ट्रम ॲलोकेशनशी संबंधित असल्याने स्पेक्ट्रमच्या वापरातून मिळालेला रेव्हेन्यू शेअर व्हायला पाहिजे. हॅण्डसेट विक्री, कॉलर ट्यून इत्यादिमधून मिळालेला रेव्हेन्यू हा शेअरिंग मध्ये धरायला नको.
*माझ्या माहितीप्रमाणे रोमिंग चार्जेस हा प्रकार तसाही आठ दहा वर्षापूर्वीच बंद झाला आहे.
आगी का लागतात,पसरतात, आणि
आगी का लागतात,पसरतात, आणि त्या ठिकाणी घरं का बांधतात?
Los Angeles fires.