शब्द वेध

श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली.
अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच. माझ्याप्रमाणे जे इतरही शब्दप्रेमी इथे असतील त्यांना या धाग्याची ही एक हक्काची खुंटी मिळाल्यास आवडलेला रोचक शब्द टांगायला सोपे होइल असे मला वाटते. शब्द बरेचदा नविन भेटतात तेव्हा डोक्यात फिरत राहतात कधी अर्थ शोधले जातात कधी स्मृतीतुन निघुन जातात कधी एकदम वीज चमकल्यासारखा त्यांचा अर्थ दिसु लागतो कधी कोणी नेहमीच्या अतीपरीचीत शब्दांचा अनोखा वापर करतांना दिसतो. या सर्वांची मजा असते. एक एक शब्द आनंद देउन जातो समृद्ध करुन जातो, शब्दांना लगडलेले संदर्भ काळ त्यांचा उगम इतिहास नेहमी खुणावत राहतो कधी धागा सापडतो कधी काहीच गवसत नाही पण मागोवा घेण्यात त्यांच्च्याशी खेळण्यात भरपुर आनंद मिळतो इतके नक्की आणि इतकेच पुरेसे आहे.
असा धागा काढतांना शब्दवेध हा आवडलेला शब्द पहील्यांदा आठवला तो चंद्रकांत काळे यांच्या संचाच नाव शब्दवेध होत त्यामुळे. याच नावाच एक पुस्तक विद्युल्लेखा अकलुजकर यांनी लिहीलेलं आहे अस कुणीतरी सांगितल म्हणुन हे पुस्तक बुकगंगावर शोधतांना ( मी अजुन वाचलेले नाही ) याच्या पानावर फार सुंद र ओळ रेडीमेड सापडली जी माझ्या भावना अचुक व्यक्त करते. ती अशी.
शब्द-वेध म्हणजे शब्दांचा मागोवा. भाषेच्या घनदाट जंगलात घुसून केलेला नादाचा/शब्दांचा/अर्थांचा पाठपुरावा.

तर सुरुवात करतो व नंतर जमेल तसे प्रतिसादातुन एकेक शब्द घेत पुढे सरकतो

खस्ता

एक दिवस विदर्भातील कुठल्याशा गावातुन एस टी महामंडळाच्या बसने जात होतो. शेजारचा माणुस गप्प बसलेला. मला गप्पा मारायची सवय गप्प बसता येत नाही. मी हळु हळु काडी टाकत टाकत संवाद वाढवु लागलो. गडी खवय्या होता गप्पा खाण्यावर आल्या म्हणाला "अरे शेगाव कचोरी भुल जाएंगे आप ये ये यहॉ की कचोरी खाओ " मी सहज विचारलं कैसी है वो कचोरी ? तो म्हणाला " अरे बहोत बढीया एकदम खस्ता " खस्ता ??? कचोरी खस्ता ? माझ्या डोक्यात हा शब्द दोन ठिकाणी आदळलेला होता.
एक गालिब चा प्रसिद्ध शेर माहीत होता
'ग़ालिब"-ए-ख़स्ता के बग़ैर कौन से काम बन्द हैं
रोइये ज़ार-ज़ार क्या कीजिये हाय-हाय क्यूँ
यातला खस्ता हाल ट्रॅजीक गालिब माहीत होता. दुसरा " संसारासाठी मी इतक्या खस्ता (?) खाल्या आणि शेवटी हे नशिबी आलं " हे डायलॉग खुप वेळा ऐकलेले. पण खस्ता कचोरी पहील्यांदाच ऐकली ( खाल्ली नाही ) मग अर्थ शोधला खस्ता चा तिथे रीतसर पहीला अर्थ होता. दुर्दशाग्रस्त जो आपला वरील शेर मधला गालिब. पण हा खस्ता म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी खस्ताच्या विरोधी अर्थाने कडक कचोरी कोणाला आवडेल. तोंडात सहज तुडवली जाईल अशी खस्ता कचोरी किंवा असा कोणताही खाद्यपदार्थ जो ही क्वालिटी बाळगतो तो.
वि० [फा०खस्तः] १. बहुत थोड़ी दाब में टूट जानेवाला। भुरभुरा। २. जो कान में मुलायम तथा कुरकुरा हो। जैसे– खस्ता कचौड़ी, खस्ता पापड़। ३. टूटा-फूटा। भग्न। ४. दुर्दशा-ग्रस्त
कल्लोलिनी

श्री माधव ज्युलियन यांचे छंदोरचना हे सुंदर पुस्तक आहे. यात पहिल्यांदा हा शब्द माझ्या वाचनात आला. यात एके ठिकाणी ते म्हणतात " गद्यातही रमणीय आंदोलन असते. एखाद्या गद्यगंगाधराच्या ( हा पण रोचक शब्द आहे मराठीतले गद्यगंगाधर गाडगीळांचे नाव गंगाधर आहे हा योगायोग म्हणावा का ? ) भाषेत जेव्हा लेखन एकप्रकारच्या जेव्हा समाधीतच झाले असावे असे वाटते आणि भाषा ही कल्लोलिनीप्र्माणे भरपुर ओढाळ आणि नादवती होते तेव्हा तीत एक प्रकारचे श्रेष्ठ गुढ आंदोलन प्रत्ययास येते."
कल्लोलिनी म्हणजे अशी नदी ज्यात भरपुर लाटा तरंग उठतात किंवा अशा लाटा तरंगाचा कल्लोळ करत वाहणारी कल्लोलिनी नदी. नदी किंवा सरीता या नेहमीच्या गरीब शब्दांना किती सुंदर नादमय पर्यायी शब्द आहे हा. आणि हा असा प्रचाराबाहेर का गेला असावा ? माहीत नाही. मग हा शब्द जेव्हा अजुन शोधला तेव्हा श्री रुद्राष्टकम मध्ये सापडला तो असा

तुषाराद्रि संकाश गौरं गम्भीरं। मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरं।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गंगा। लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजंगा॥3॥ याचा दिलेला अर्थ खालील प्रमाणे होता
व्याख्या - जो हिमाचल समान गौरवर्ण व गम्भीर हैं, जिनके शरीर में करोड़ों कामदेवों की ज्योति एवं शोभा है, जिनके सर पर सुंदर नदी गंगा जी विराजमान हैं, जिनके ललाट पर द्वितीय का चंद्रमा और गले में सर्प सुशोभित है ॥3॥

इथे कल्लोलिनी शब्दावरुन हलकल्लोळ शब्द आठवुन माझ्या मनात विचारांचा कल्लोळ माजला. मला अजुन ऑनलाइन मराठी डिक्शनरी अजुन नीट शोधता येण्याची प्रॅक्टीस नाही. नबाच्या प्रतिसादावरुन आता दाते त शब्द थोडा थोडा शोधता येतो पण अजुन ते व्यवस्थित जमत नाही. म्हणजे मराठी टायपुन मग शोधावा की कसे म्हणुन सध्या गुगलुनच शोधतो तर इथे हिंदी अर्थात कल्लोलिनी चा अर्थ अधिक स्पष्ट करणारे विवरण असे आढळले
जल का वह प्राकृतिक प्रवाह जो किसी पर्वत से निकलकर निश्चित मार्ग से होता हुआ समुद्र या किसी दूसरे बड़े जल प्रवाह में गिरता है

तर मोठा सुंदर नादमय शब्द आहे मला खुप आवडला.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक गाणं आहे मनीषा कोइरालावर चित्रीत झालेलं जावेद अख्तर च गाणं आहे त्याच्या ओळी अशा आहे
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
आता यात दोन्ही प्रेमी जीवांना एकमेकांच्या ह्रद्यी फुललेला वसंत कळलेला आहे. एकमेकांच्या भावना क़ळलेल्या आहे. आणि त्या शब्दांनी व्यक्त करुन त्यातला आनंद त्यांना घालवण्यात अजिबातच रस नाही. तर मराठी ताणून आपण म्हणु शकतो की दोन प्रेमी मौनरागमग्न आहेत. ठिकाय बस्स पण Mamihlapinatapai हा एक शब्द आहे Yaghan भाषेतला. हा भाषांतर करण्यासाठी फार कठिण शब्द मानला जातो. ही भाषा मला माहीत नाही अजिबात पण शब्द त्याच्या अर्थामुळे भारी वाटला. याचा जो एक अर्थ दिलेला आहे तो खालीलप्रमाणे

"It is that look across the table when two people are sharing an unspoken but private moment. When each knows the other understands and is in agreement with what is being expressed. An expressive and meaningful silence."

दुसरा अर्थ असा
"A look that without words is shared by two people who want to initiate something, but neither start" or "looking at each other hoping that either will offer to do something which both parties desire but are unwilling to do
हा अर्थातच थोडासा चावट अनुभवाकडे निर्देश करतो
प्रत्येकाने कधीना कधी याचा अनुभव घेतलेला असावा
आता मराठीत याचा अनुवाद कसा करता येइल?
आणि त्यांची नजरानजर झाली मग पुढे काय झाल ? जुन्या अगदी जुन्या गरीब चित्रपटांत गरीब दिग्दर्शक दोन फुल दाखवायचे मग ती एकमेकांवर आदळायची बस झाल.
नजरानजर हा शब्द मान्यताप्राप्त आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या दोघांत नेत्रपल्लवी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा अर्थ फार जवळ जातो. पण वर जो शब्दाचा पहीला अर्थ आहे आहे तो किंचीत वेगळा आहे. म्हणजे बघा नेत्रपल्लवी ही अचानक होते जसे वासंती आणि माधव यांची अंगणात नेत्रपल्लवी झाली इथे थोडा चोरटा कटाक्ष टाकला असे वाटते. त्यापुढे मात्र गाडी सरकत नाही म्हणजे चोरट्या कटाक्षात कंटीन्युइटी नाही. वरच्या अर्थात दोन्ही एकमेकांकडे एकटक बघत आहे सॅव्हर करत आहे असे वाटते. म्हणजे बघा एक गाणे आहे
आजा डुब जाऊ तेरी आखो के ओशन मे
स्लो मोशन मे ..
पण भाषा फारच परकी असल्याने थांग लागत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां कळलं मला, जवळजवळ शब्देविण संवादु. किंचित्काळ ......., सलग काही वेळ ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महान कवि सुमित्रानंदन पंत यांच्या " पतझर" कवितेत हा शब्द येतो. या सुंदर कवितेच्या या ओळी बघा अगोदर्
झरो झरो झरो
जंगम जग प्रांगण मे, जीवन संघर्षण मे
नवयुग परीवर्तन मे , मन के पीले पत्तो
झरो झरो झरो
या ओळीत पण बघा " जंगम " शब्द जनरली आपण मराठीत् हा सरकारी शब्द "स्थावर व जंगम मालमत्ता " इतका रुक्ष वापरतो त्याचा असा काव्यात्मक वापर
क्वचितच आढळतो.
नंतर बघा
तुम पतझर तुम मधु....जय !
पीले दल , नव किसलय
तुम्ही सृजन, वर्धन, लय
आवागमनी पत्तो
सरो सरो सरो
किसलय चा अर्थ असा आढळतो [सं-पु.] - 1. पौधों में निकलने वाले नए पत्ते; कोंपल; नवपल्लव; कल्ला 2. अँखुआ; अंकुर।
इथे नव किसलय हा नव्या पालवी कडे निर्देश आहे.

याच्या अर्थात दिलेला अँखुआ हा ही बघा मस्त शब्द आहे जणु नवी पाने म्हणजे झाडाचे डोळे याचा ही अर्थ अंकुर च . पण नवी कोवळी पाने अशोक च्या झाडाची कोवळी मऊ मुलायम पाने आठवातात ? अजुन एक यात जो पतझड साठी मधु जय शब्द वापरला आहे तो बघा
हिन्दीत मधुमास म्हणजे वसंत ऋतु चैत्रमास इथे पतझड साठी वापरलेला आहे.इथे मी थोडा कन्फ्युज होतोय असो
रजनीश यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे " कोंपलें फिर फूट आँई"

फ़रहत शहज़ाद च्या या सुंदर ओळी बघा

कोंपलें फिर फूट आँई शाख पर कहना उसे

वो न समझा है न समझेगा मगर कहना उसे

वक़्त का तूफ़ान हर इक शय बहा के ले गया

कितनी तनहा हो गयी है रहगुज़र कहना उसे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा!! _/\_

कल नई कोंपलें फूटेंगी, कल नए फूल मुस्काएंगे
और नई घास के नए फर्श पर नए पांव इठलाएंगे
वो मेरे बीच नहीं आए, मैं उनके बीच में क्यों आऊं
उनकी सुबह और शामों का मैं एक भी लम्हा क्यों पाऊँ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी वाचलेल्या कोणत्यातरी अगदी रँडम गोष्टीत "आवाळू" आणि "लासरू" हे दोन शब्द आले होते. कोणाची तरी खरी ओळख पटवताना त्या व्यक्तीच्या केसांत (डोक्यात, scalp वर) एक आवाळू आणि एक लासरू होतं असा काहीसा उल्लेख होता (खूण).

शब्दवेध या निमित्ताने काही शब्द आठवताना एकदम अचानक हे एरवी कधीही न ऐकलेले दोन शब्द आठवले. आता त्या खुणा म्हणजे नेमकं काय (खड्डा, गळू, चामखीळ, तीळ, टेंगूळ) त्याचा शोध लागला तर इथे अपडेटवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवाळू -
कुणाच्या गळ्याला एक मोठा फुगा असतो. चांगला टेनिस बॉलएवढा मोठा. त्यास आवाळू म्हणतात. शरिराचाच तो एक भाग असतो असं म्हणण्याचं कारण गळ्यातून/मानेतून ज्या नसा, रक्तवाहिन्या जातात त्या त्यातून फिरून गेलेल्या असतात. अर्थात ते कापून काढून टाकता येत नाही. वय वाढते तसं आवाळूही वाढते आणि वीस वयानंतर आहे तेवढेच राहाते. तसं निरोगीच पण दिसण्यात व्यंग.

लासरू - कातडीवर लहान भाजलेल्याची/जळलेल्याची जागा दाखवणारी खूण. कोंकणी भाषेतून शब्द आलेला वाटतो. आग लागून जळणे वगैरे - लासवप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Adam's apple ला आवाळू शब्द असेल असं वाटलं नव्हतं. कोणतेही गळू किंवा गठठू या अर्थाने असावा.

लासरु कोंकणी उगमाचा शब्द नसावा. अन्यथा लहानपणी कानावरून गेला असता आसपास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) Adam's apple ला नाही, बाजुला एक गोळा येतो.
२) कोंकणी ( गोंयचा इ पेपर भांगरभूय ) पेप्रात आतासुद्धा आग लागून दुकानं जळली वगैरे बातमीत लासल्यात वगैरे येतं. माझा कोणत्याच कोंकणीशी ( कारवार, मंगळुर,गोवा) संबंध आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरिराचाच तो एक भाग असतो असं म्हणण्याचं कारण गळ्यातून/मानेतून ज्या नसा, रक्तवाहिन्या जातात त्या त्यातून फिरून गेलेल्या असतात. अर्थात ते कापून काढून टाकता येत नाही.

मग कोणाला डोक्यावर आवाळू कसे असेल? कारण, गविंनी ज्या आवाळूच्या उल्लेखाचा उल्लेख केला आहे, त्यात ते आवाळू डोक्यावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यूरोफायब्रोमा सदृश असावे

कुठेही उगवू शकणारे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दवेध फक्त मराठीत सापडणाऱ्या शब्दांसाठी मर्यादित ठेवणार आहे/नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोल्स्वर्थच्या मराठी डिक्शनरीसाठी खालचा दुवा पहा.
https://dsalsrv04.uchicago.edu/dictionaries/molesworth/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावरान

अलिकुल वहनाचे वहन आणीत होते
शशिधर वहनाने ताडिली मार्गपन्थे
महिपती रिपू ज्याचा तात भंगोनी गेला
रविसुत महिसंगे फार दु:खित झाला

ह्याचा अर्थ असा आहे:
अलिकुल म्हणजे भुंग्यांचा थवा. ते अलिकुलाचे वहन म्हणजे कमळ. कमण पाण्यावर असते. पहिल्या ओळीचा अर्थ म्हणजे मी पाणी आणीत होते.
शंकराच्या मस्तकावर चन्द्र असतो म्हणून तो शशिधर. त्याचे वाहन म्हणजे बैल. दुसऱ्या ओळीचा अर्थ 'वाटेत बैलाने मारले.'
मही म्हणजे पृथ्वी. तिचा पति म्हणजे सागर. त्याचा शत्रु अगस्ति. त्याचा तात म्हणजे बाप तो म्हणजे घडा. बैलाने धडक मारल्यामुळे घडा पडून फुटला.
रविसुत म्हणजे सूर्यपुत्र अर्थात कर्ण पण येथे कान असा अर्थ घ्यायचा. पडल्यामुळे कान जमिनीवर आपटला आणि दुखला.

अगस्ति कुम्भामधून जन्मला ह्या कल्पनेचा वापर करून पुढील चित्रकाव्य निर्मिले आहे.

का पाण्डुपत्नी कुलभूषणं किं को रामशत्रु: किमगस्ति जन्म|
क: सूर्यपुत्रो विपरीतपृच्छा कुन्तीसुतौ रावणकुभकर्णौ||

पाण्डुपत्नी कोण? कुन्ती. कुळाचे भूषण काय? पुत्र. रामाचा शत्रु कोण? रावण. अगस्ति कोठे जन्मला? कुम्भामध्ये. सूर्यपुत्र कोण? कर्ण. हा उलटा प्रश्न आहे कारण प्रश्नांची उत्तरे सरळ लिहिल्यास कुन्तीपुत्र हे रावण आणि कुंभकर्ण आहेत असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोल्सवर्थच्या शब्दकोशाच्या दोन्ही आवृत्त्या (१८३१ आणि १८५५) archive.org येथून pdf format मध्ये विनामूल्य उतरवून घेता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या शब्दाचा नक्की (प्रिसाइझ) अर्थ तथा उद्गम काय? ही एका प्रकारची ग्लानी/गुंगी/ट्रान्स अशातला प्रकार असावा, इतपत अर्थाबाबतचा गोलमाल अंदाज आहे, परंतु नक्की अर्थच्छटा काय? आणि हा शब्द कोठून/कसा आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


श्री अनिरुद्ध कुलकर्णी त्यांच्या ब्लॉगमध्ये Toska या रशियन शब्दा संदर्भात झपुर्झा चा उल्लेख करतात हे रोचक आहे अवश्य पहावे. त्यांच्या मते Toska एक
it is a sensation of great spiritual anguish आहे. आणि झपुर्झा हा मराठी शब्द याच प्रकारची अर्थछटा दाखवतो.

http://searchingforlaugh.blogspot.com/2012/09/is-toska-zapurza.html


उगमा बद्दल बोलायच तर माझ्या मते हा शब्द केशवसुतांनी नव्यानेच निर्माण केलेला आहे. यामागे कारण असे असावे की सहसा आध्यात्मिक अनुभुती च्या प्रांतात किंवा त्या श्रेणीतला अनुभव कवीला आलेला असेल तर तिथे एक समस्या असते. म्हणजे असा जो " पल्याड चा अनुभव " असतो तो भाषेतील उपलब्ध शब्दांच्या व त्यांना चिकटलेल्या रुढ अर्थांमधुन व्यक्त च होऊ शकत नाही असे कवीला वाटत असावे. म्हणुन त्यांना उपलब्ध जुन्या शब्दापैकी एक वापरण्यात अडचण असावी कारण तो चुकीचा अर्थ पोहोचवेल. मग आपली अनुभुती पोहोचवण्यासाठी कवीला नवाच शब्द निर्माण करण्याची गरज निर्माण होत असावी. या उर्मीतुन अशा विलक्षण शब्दाची निर्मीती झाली असावी होत असावी.
नेती नेती या मार्गानेही जसा ते हे नाही ते ते हे ही नाही असे करत करत ते काय असावे याकडे निर्देश करत तिथपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो. इथेही कवी त्याचा अनुभव पोहोचवण्याचा डेस्परेटली प्रयत्न करत आहे. मात्र इथे तो नविन शब्दनिर्मीती ही करुन मदत करतोय.
हर्षखेद ते मावळते,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! १

आता झपुर्झा हा शब्द कुठुन सुचला असेल ते फारसे महत्वाचे यासाठी वाटत नाही की त्यांना एक युनिक लेबलींग त्यांच्या युनिक अनुभुतीसाठी हवे होते हे महत्वाचे आहे तरी गुगलल्यावर हे सापडले.
उद्गा . ( काव्य ) जा , पोरी , जा , हें वाक्य झपाटयानें उच्चारलें असतांना होणारा ध्वनि , शब्द . हा शब्द केशवसुत कवीनें प्रत्यानंदाच्या सीमेचा वाचक याअर्थी रूढ केला . झपूर्झा ! गडे झपुर्झा ! - केक १०६ .

अजुन एक पर्याय असतो
That whereof we cannot speak, thereof we must remain silent’,
पण असे कवीच्या बाबतीत अवघड असावे कदाचित. एक "गुंगे का गुड" संकल्पना आहे ती अशीच एखाद्या मुक्या माणसाने गुड खाल्ला तर आता त्याने त्याचा गोडवा कसा वर्णावा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डु.प्र. का.टा.आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डु.प्र.का.टा.आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डु.प्र.का.टा.आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक राजकारणी शशी थरुर हे कठिण विलक्षण असामान्य इंग्रजी शब्दांचा वापर त्यांच्या लेखनात बोलण्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधांनावरुन बरेचदा वाद होत असतात. फार पुर्वी एकदा त्यांच्या cattle class च्या विधानावर मोठी राळ उडाली होती. तर मागे एकदा त्यांनी एक ट्वीट करुन त्यांच्या अशा लांब कठीण इंग्रजी शब्दवापरासाठी वाचकांची माफी मागितलेलेली होती त्यातही त्यांनी एक विलक्षण शब्द वापरुन उपहासात्मक टोमणा मारला ते ट्वीट असे होते.
I'm sorry if one of my tweets y'day gave rise to an epidemic of hippopotomonstrosesquipedaliophobia!
[Don't bother looking it up: it's just a word describing a fear of long words].
But #TheParadoxicalPrimeMinister contains no words longer than Paradoxical!
या शब्दाचा अर्थ ही त्यांनी दिलेला अजुन खणायचे तर या सस्थळावर बघु शकता इथे विविध प्रकारच्या फोबियांची विस्तृत माहीती आहे. या भीतीचे परीणाम या भितीच्या एका सर्वेक्षणाचा अहवाल वगैरे ही आहे. ( पॅरॉडॉक्सीकल प्राइम मिनिस्टर हे त्यांचे मोदींवरील पुस्तक आहे ) वरील वाक्यात एकिकडे हा लांब शब्द देतात मात्र y'day हे लघुरुप वापरतात ही पण एक गंमतच आहे कदाचित हा प्रचंड हिप्पो चिमणीच्या अंगणात मावत नसावा म्हणून काल वर करवत चालवली असावी.

https://www.fearof.net/fear-of-long-words-phobia-hippopotomonstrosesquip...

People suffering from Hippopotomonstrosesquippedaliophobia tend to experience a great deal of anxiety when faced with long words. It is indeed ironical that the scientific name given to this phobia is such a long one

इथपर्यंत ठिक होते पण हे कमी होते की काय त्यांच्या या वरील ट्वीट ला जयेश गोपीनाथन नावाच्या व्यक्तीने उत्तर दिले ते म्हणजे कहर च होते ते असे

Being a sesquipedalian, Mr. Tharoor is quite ebullient in gasconading about his habit of circumlocution. Little does he show any perspicaciousness or excogitate before assuming rest of the people are saxicolous. This is idiosyncratic with his personality of being anomalistic!

माझी लांब शब्दांची भिती वाढुन मला सध्या घाम फुटलेला आहे मला पॅनिक अटॅक आलेला आहे. सायटीत दाखवलेली खालील लक्षणे मी अनुभवतोय काय म्हणावे या स्थितीला ? पळुन जा गडे पळुंजा !!!
People suffering from Hippopotomonstrosesquippedaliophobia tend to experience a great deal of anxiety when faced with long words. It is indeed ironical that the scientific name given to this phobia is such a long one

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शाळेत (२री) असताना asafoetida हा माझ्यासाठी खूप मोठा असणारा शब्द पाठ करून वर्गात शब्दांच्या भेंड्यात मुद्दाम सांगत असे. हे बी तसच काहीसं असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

Queen चा प्रचलित अर्थ एखाद्या स्वतंत्र राज्याची स्त्री शासक किंवा राजाची पत्नी असा आहे. जो सर्वात जास्त प्रचलित आहे.
दुसरा एक अर्थ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एक यशस्वी श्रेष्ठ स्त्री उदा. ब्युटी क्विन टेनिस क्विन इ. असा ही एक प्रचलित वापर आढळतो तर या व्यतिरीक्त
याचा जो समलैंगिक संदर्भातील अर्थ आहे व शब्द आहेत ते बघु या. शब्दकोशात दिलेला अर्थ असा
a homosexual man, especially one regarded as ostentatiously effeminate.

How the Homosexuals Saved Civilization: Cathy Crimmins
या पुस्तकात लेखिका या शब्दाचा मागोवा घेते.त्यात खालील शब्दांचा उल्लेख येतो.

१- Drag Queen
a man who ostentatiously dresses up in women's clothes.
या प्रकारचा समलैंगिक पुरुष स्त्रीयांची वस्त्रे पोषाख घालुन वावरतो.
२-Size Queen
A man who prefers large penises
3-Curry Queen
a white Caucasian man who exclusively prefers to date South Asian (Indian, Pakistani etc.) men.

यात लेखिकेचे एक् असे रोचक मत आहे की Queen हा शब्द कालांतराने हेट्रोंच्या विश्वात संक्रमित झालेला आहे त्या म्हणतात की या शब्दाचा आता जो अर्थ स्थिर झालेला आहे तो असा की
" To be a queen means you are particularly intense about something इथे उदा. ज्याला सिनेमाचं वेड आहे त्याला मुव्ही क्विन म्हणू शकतो.
त्यांच्या मते हेट्रोंच्या हद्दीत हा शब्द ( या शब्दाचा वापर ) हा गेल्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे Drama Queen हा शब्द आहे.
याच्या प्रत्यक्ष वापराचे एखादे उदाहरण आढळल्यास शोधुन टाकतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑस्टिनात एक 'द ड्रॅग' हा भाग आहे. एका रस्त्याचा साधारण अर्धा किमी लांब पट्टा म्हणजे 'द ड्रॅग'. त्याचा आणि ड्रॅग क्वीनांचा काही संबंध नसावा; पण फुकट्यांसाठीचे शब्द विकिपानावर पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शब्दवेध फक्त मराठीत सापडणाऱ्या शब्दांसाठी मर्यादित ठेवणार आहे/नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दवेध फक्त मराठीत सापडणाऱ्या शब्दांसाठी मर्यादित ठेवणार आहे/नाही?

तशी मर्यादा ठेवण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.

Mamihlapinatapai हा शब्द मराठी भाषेत नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दवेध फक्त मराठीत सापडणाऱ्या शब्दांसाठी मर्यादित ठेवणार आहे/नाही?

चटजी
मराठी व्यतिरीक्त इतर भाषेतही रोचक शब्द आहेत आणि बरेचदा प्रत्येकाला किमान २ ते ३ भाषा येतच असतात. शिवाय काही शब्दांचे इंटरकनेक्शन ही असते. तर मला असे प्रामाणिकपणे वाटते की अशी काही भाषामर्यादा नको ज्या कोणत्या भाषेतील जो कोणता शब्द रोचक वाटेल तो इथे दिला तर आनंदात वाढ च होइल. वरील धाग्यातही मी वेगवेगळ्या भाषेतील शब्द घेतलेले आहेत.
तर मराठीच शब्द अशी काही मर्यादा नकोच्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायको आणि मैत्रीण क्राफर्ड मार्केटजवळच्या बाजारात फिरत असताना दोन फारिनरानी विचारले डु यु नो इंग्लीश? आणि वेर डु वी गेट टिश्यु? अर्थबोध झाला नाही. मग त्या बाईने साडीला हात लावून विचारले धिस टिश्यु.
परदेशात कुठे कॉटन्सला टिश्यू म्हणतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तमाम परदेशांची ग्वाही देऊन शकत वा इच्छीत नाही, परंतु संयुक्त संस्थानांपुरते बोलायचे झाले, तर 'टिश्यू' हा शब्द सामान्य व्यवहारात १. (हात, तोंड, नाक, चेहरा वगैरे पुसण्याकरिता वापरण्यात येणारे) पेपर नॅपकिन्स, आणि २. ढुंगण पुसण्याकरिता वापरण्यात येणारे कागद, या दोन संदर्भात वापरला जातो, असे निरीक्षण आहे. (अन्य कोणत्या अर्थाने सामान्य व्यवहारात वापरला गेलेला ऐकलेला तरी नाही.)

बाकी जगभरात निरनिराळ्या देशांत इंग्रजीचे निरनिराळे बाज आहेत, त्यामुळे अन्यत्र कोठे काही अन्य अर्थ(सुद्धा) लागू होत असल्यास कल्पना नाही. (अशक्य नाही, परंतु ऐकलेले नाही, इतकेच.)

(कदाचित बाईंना हातरुमाल हवा असू शकेल काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हातरुमाल असेल. मंगळदास मार्केटला साडीसाठी पाठवलं, तिथून जवळच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा आणि आबाबा, टिश्यु हा साडीचा प्रकार आहे बाबांनो ! पण फारिनर महिलांना तो आवर्जून कोणी घ्यायला सांगितला असेल ते मंगळदास जाणे !!
For example: See the link.
https://medias.utsavfashion.com/media/catalog/product/cache/1/small_imag...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ठाऊक नव्हते!

(बाकी, नबांना किंवा आबाबांना 'टिश्यू' हा साडीचा प्रकार माहीत नसणे हे एक वेळ समजू शकतो, परंतु मिसेस आबाबांनासुद्धा तो माहीत नसावा, याचे नवल वाटते.)

..........

अर्थात, भारतीय/भारतवंशीय स्त्री आहे, म्हणजे साड्यांचे प्रकार माहीत असलेच पाहिजेत, असे काही नाही, हे आगाऊ मान्य आहे. फॉर्दॅट्मॅटर, (विचारून पाहिले नाही, परंतु) 'टिश्यू' हा साडीचा प्रकार मिसेस नबांना१अ ठाऊक असल्याचे कळल्यास खुद्द नबांना आश्चर्याचा धक्का बसेल. असो.

१अ मिसेस नबांचे सोडा. इथे ऐसीवर किती जणींना (या प्रतिसादापूर्वी) 'टिश्यू' नावाचा साडीचा प्रकार (निदान ऐकून तरी) ठाऊक असेल, याचे सर्वेक्षण केल्यास ते रोचक ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजस्थान,केरळमध्ये फिरताना टुअरवाले तिकडच्या दुकानांत नेतातच. नको म्हटले तरी "बघून तरी या" मागे लागतात. तर या साड्या पाहिल्या आहेतच. पण टिश्यु नावाने प्रसिद्ध हे माहीत नव्हते. शिताफल झाड की साडी, केले के फत्ते की साडी हेच दुकानदार इथल्या फर्यटकांस सांगतात.
पण भारतीय लोक अशीच वस्त्रे घालत असावेत हा परदेशींचा भाबडा समज असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बां नी म्हटलं तसं किती जणींना तर मला नव्हतंच माहिती. आपल्याकडे नीधप सारख्या वस्त्रोद्योगात मुरलेल्या स्त्रियाही आहेत. साड्या काय, ड्रेसेस काय हा गप्पांचा विषय असू शकणाऱ्या गटात मी मोडत नाही. टिश्यू हा साडीचा (कापडाचा) प्रकार ही ज्ञानात भरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शान्तादुर्गा , ते चित्र दाखवते आणि लिंक मधले वर्णनाप्रमाणे 'कसावा' नावाच्या झाडाची मुळे रताळ्यासारखी असतात त्यापासून स्यागो sago उर्फ साबूदाणा बनतो. त्या झाडाच्या सालीपासूनच्या बनवलेल्या धाग्यास टिश्यू म्हटले आहे. कर्नाटकात केळीच्या सोपटाची आणि राजस्थानात सिताफळ झाडाच्या सालीच्या धाग्याची साडी उदयपूर,चितोडगढास मिळते.
यास टिश्युसाडी म्हणणे योग्यच.
तर तुम्ही म्हणता तसे या फारिनरांना कुणी सुचवले हे आनंदच. हल्ली फारिनर एथनिक वस्तू पाहातात घेतात.
तुमचे उत्तर पटले.
आम्ही इकडचेच लोक असल्या साड्या,वस्त्रे घेत नाही!!

(( Tissue : natural fibre other than cotton. Ok))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द वेध हा धागा चांगला आहे. पण विचार करू जाता शब्दांपेक्षा मला वाक्प्रचार, वाक्यरचना यांतल्या विचक्षण बाबीच अधिक आठवतात, जाणवतात. कदाचित त्यातून स्वतंत्र धागाही निघेल. सध्या मनन करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण विचार करू जाता शब्दांपेक्षा मला वाक्प्रचार, वाक्यरचना यांतल्या विचक्षण बाबीच अधिक आठवतात, जाणवतात.

त्यांचाही विचार व्हावयास प्रत्यवाय असण्याचे काही कारण दृग्गोचर होत नाही.

कदाचित त्यातून स्वतंत्र धागाही निघेल.

या धाग्यात, नाहीतर वेगळ्या धाग्यात. कसेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्सुकता वाढलेली आहे.
तुमचं या विषयावरील लेखन वाचायला नक्कीच आवडेल.
कृपया जरुर लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवकालीन महसुल व्यवस्थेवरील एका पुस्तकात खालील माहीती आढळली.शिवरायांच्या राज्यकारभारात त्याचे अष्टप्रधान मंडळ होते. या अष्टप्रधान मंडळाच्या हाताखाली खालील १८ कारखाने होते त्यांची नावे अशी

१-खजिना २- जवाहिरखाना ३-अंबरखाना ४-शरबतखाना ५- तोफखाना ६-दफ्तरखाना ७- जामदारखाना ८-जिरातखाना ९- मुतबखखाना १०-उष्टरखाना
११-नगारखाना १२- तालीमखाना १३-पीलखाना १४-फरासखाना १५-दारुखाना १६-शरतखाना

या व्यतिरीक्त या व्यवस्थेत १२ महाल होते ते असे

१- पोते २- सौदागिर ३- पालखी ४-कोठी ५- इमारत ६ -बहिली
७-पागा ८-शेरी ९- दरुनी १०-थट्टी ११-टांकसाळ १२-छबिना

यातील वेगळा वाटला व आजही रीलेट करता येइल असे दोन अगोदर घेउ.

पीलखाना -फिलखाना
हैद्राबादेत जुन्या हैद्राबादेत एक भाग आहे बहुधा बेगम बजार च्या जवळ त्याचे नाव पीलखाना असे आजही आहे. तेथे प्लास्टीक जनरल ट्रेडींग चे मोठे सेंटर आहे अनेक ठोक किरकोळ दुकाने असलेला हा व्यापारी भाग आजही आहे.
तर याचा अर्थ हत्ती ठेवण्याची जागा असा होतो. म्हणजे इथे सैन्यासाठी वा इतर राज्याचे जे हत्त्ती आहे ते इथे ठेवले जात असावेत. याचा अचुक उच्चार फिलखाना असा आहे फिल हा अरेबिक फारशी उगम असलेला शब्द आहे फिल चा अर्थ हत्ती असा दिलेला आहे. यावरुन हा शब्द फिलखाना असा आहे.
आता वरती अजुन एक अंबरखाना हा शब्द आहे.याठिकाणी हत्तीवरील सामान अंबारी संबंधित शस्त्रे इत्यादी बाळगणे साठी हा आहे ( उत्पादनही होत असावे कदाचित माहीत नाही )

फरासखाना

पुणे नगरीत एका पोलिस चौकीचे नाव " फरासखाना पोलिस चौकी " असे आहे. फरासखाना चा अर्थ जो मला सापडलाय एका शब्दकोशात तो वस्तुभांडार या अर्थाने आहे.म्हणजे मंडप सामाना या अर्थाने मला वाटते कदाचित सैन्या साठी चे तंबु व ते उभारण्यासाठीचे कापड दोरखंड बांबु हा सेट फरासखान्यात ठेवला बनविला जात असावा.

उष्टरखाना म्हणजे उंट व त्याच्या संबंधित सामानाच्या कारखान्याचे नाव.
शरबतखाना हा शब्द रोचक वाटला. शरबत ही आपली मर्यादीत ओळख सध्याची आहे. एक प्रकारचे फळाचा अर्क असलेले गोड पेय जसे रुह अफजा इत्यादी. पण शरबत चा म्हणजे या द्रावणाचा या शरबत ला एक औषधी अर्थाची छटाही आहे. खर म्हणजे शरबत ची व्याख्या फार व्यापक आहे. शब्दकोशात शरबत चा अर्थ डिस्पेन्सरी असाही दिलेला आहे. हा इथे डिटेल अर्थ बघावा पुर्ण अर्थ अनेक बाबी दाखवतो न्ह्वाव्या कडील एक परंपराही त्यात येते.

P شربت sharbat (for A. شربة, n. of un. fr. sharb, inf. n. of شرب 'to drink'), s.m. A draught (of water, &c.), drink, beverage, cup; sherbet, sugar and water (the most com. signification); a dose of medicine, draught, potion:—sharbat pilānā (-ko), To give (a barber) sherbet to drink (and so seal the betrothal which he has arranged):—sharbat-pilāʼī, s.f. The present made by a bride and bridegroom to the barber who arranged the marriage:—sharbat-ḵẖāna, s.m. A dispensary:—sharbat-dār, s.m. A servant who has charge of the water, wine, &c.; a butler:—sharbat-ke-se ghūṅṭ pīnā, To gulp down as sherbet; (fig.) to suffer meekly.

यातील एक किती छान आहे बघा शरबत के से घुट पीना चा अर्थ तो म्हणतो to suffer meekly. ( हे सिद्ध करते की शरबत हा कडु औषधी काढा सारखेही असेल की जे सहन करणे अवघड असावे त्यावरुन हा वाकप्रचार आलेला असावा. सध्याच्या शरबत च्या रुह अफजा इमेज चे हे शरबत नाही )
तर वरील शरबत चा व्यापक अर्थ बघितल्यावर शरबत खाना हा १८ पैकी एक कारखाना असण्याइतका महत्वाचा विषय का होता याची कल्पना येते.

महालापैकी
बहिली चा अर्थ रथ असा दिलेला आहे याचा अर्थ रथाशी संबंधित काही कारखाना असावा इतकेच आकलन होते.
तसेच थट्टी चा अर्थ गोठा इतकाच दिलेला आहे यावरुन फारसा बोध होत नाही
मात्र लक्ष वेधुन घेतले ते दरुनी ने अर्थ दिलेला आहे अन्त:पुर या शब्दाचा शोध घेतला तर मजेदार माहीती कळते. एक दरुनी म्हणजे आंतील असा एक लिटरल अर्थ उर्दु शब्दकोश दाखवतो आता बघा अंदरुनी हा प्रचलित शब्द पण हाच अर्थ दाखवतो म्हणजे लिंक बरी लागते. दुसरा अर्थ उर्दु शब्दकोशात सरळ सरळ जनाना जनानखाना असाच दिलेला आहे. गंमत म्हणजे अंत;पुर हा ही शब्द सरळ सरळ सारखाच अर्थ दाखवतो. ते काही त्याला जनानखानाच आहे असे म्हणत नसावेत त्यांच्या दृष्टीने आंतील कार्ये करण्याची जागा स्थान इतकेच्

महालातील पोते चा निर्देश खजिना असा केलेला आहे. हे सांभाळणारा व्यक्ति "पोतदार" हा म्हणजे धातुपरीक्षक अधिकारी होता अशी जुजबी माहीती मिळते.
सध्या पण पोतदार हे आडनाव आढळते.
पण रोचक बाब म्हणजे दरुनी महाल शिवाजी महाराजांच्या ऑफिशीयल कारभाराचे एक अभिन्न अंग होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहिती!

ह्या सगळ्या शब्दांना राजव्यवहार कोशात कोणते प्रतिशब्द दिले आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वीचे हिंदू राजे आणि राजसत्ता गेल्यावर फारसी शब्द आले. मग ब्रिटीश काळात डिपार्टमेंट्स. भारत स्वतंत्र झाल्यावर हिंदी मराठी प्रतिशब्द प्रमाण केलेत ती वेबसाईटव पाहिल्याचं आठवतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. परंतु, माझा रोख हा शिवाजीने राज्याभिषेकानंतर करवून घेतलेल्या राजव्यवहार कोशाकडे होता. त्यात सदर शब्दांसाठी कोणते प्रतिशब्द सुचवण्यात आले होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक कॉलेजात प्रोफेसर/फ्याकल्टी मेंबर आहे म्हणण्यापेक्षा टीचर/लेक्चरर म्हणणे योग्य वाटते ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समरसता
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, १४ एप्रिल २०१६ रोजी साजरा करण्यात आलेल्या १२५व्या जयंती दिवसापासूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने शासकीय कामकाजात ‘सामाजिक समता’ ऐवजी ‘सामाजिक समरसता’ या शब्दाचा वापर सुरू केला असून यापुढे त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक समरसता दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे
संघाचा जाणीवपुर्वक समता या शब्दाला विरोध आहे त्याच्या मते समरसता हेच अधिक योग्य असे मुल्य आहे. या मागे असलेली विचारसरणी डॉ. भालचंद्र मुणगेकर खालील शब्दात व्यक्त करतात ते म्हणतात्

"रा.स्व.संघाला अभिप्रेत ‘समरसता’चा अर्थ ‘विषमतेसह सहजीवन’ (co-life with inequality). आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रामुख्याने सामाजिक जीवनात जात, लिंग, भाषा, धर्म यांच्या आधारे प्रचंड असमानता अथवा विषमता असली तरीही सहजीवन जगले पाहिजे, हे विषमतेने पोळून निघालेल्यांना सांगणारा मंत्र म्हणजे ‘समरसता.’ विषमतेविरुद्ध आंदोलन अथवा संघर्ष न करता तिचे भक्ष्य ठरलेल्यांनी समाजपुरुषाला वंदनीय मानून त्याच्याशी तादात्म्य पावणे म्हणजे समरसता. हाताची पाचही बोटे सारखी नसतात; परंतु ती एकसंध असल्यामुळे ती जशी हाताचे कार्य पार पाडतात, त्याप्रमाणे समाजपुरुषाचे असमान वा विषम स्तरांवर असलेले समाजघटक परस्परांशी सहकार्याने आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात, हे मनावर बिंबवणारी विचारसरणी म्हणजे समरसता. ‘तुम्हीही आमचेच आहात, एकत्र राहण्यातच समाजपुरुषाचे हित आहे’ असे सांगत जातीव्यवस्थेची दाहकता विसरायला लावणारी विचारप्रणाली म्हणजे समरसता."
वरील बहुतांश भाग संघाच्या एकुण विचारसरणीस पाहता पटण्याजोगा आहे. संघाची समता या सरळ शब्दाला पर्याय म्हणून समरसता शब्दाची निवड अचुक वाटते.
मात्र हा जो समरसता शब्द आहे याचा शोध घेतल्यावर एक जयशंकर प्रसाद यांच्या कवितेत हा शब्द वा त्याच पुस्तकात अर्थ ही दिलेला आढळला त्या कवितेच्या ओळी अशा
विषमता की पीडा से व्यस्त , हो रहा स्पंदित विश्व महान ; यही दु:ख सुख विकास का सत्य, यही भुमा का मधुमय दान्
नित्य समरसता का अधिकार, उमडता कारण जलधि समान; व्यथा से नीली लहरो बीच बिखरते सुखमणी गण ध्युतिमान्

इथे मात्र जो समरसता या शब्दाचा अर्थ दिलेला आहे तो वेगळा वाटतो.
" समरसता = दो तत्वो की ऐसी स्थिती मे आ जाना कि दोनो की सत्ता रहते हुए भी दोनो के सभी प्रकार के भेद समाप्त हो जाए."
प्रसाद यांनी स्वत: या शब्दाच्या व्याख्येत " बोधसार" चा खालील श्लोक दिलेला आहे.
" जाते समरसानंदे द्वैतमप्यमृतोपमम , मित्रयोरिच दाम्पत्यो जीवात्मपरमात्मन:"
( जिस प्रकार दम्पति का द्वैत समरसावस्था मे- सब प्रकार के भेदो के मिट जाने के कारण - आनन्ददायक होता है उसी प्रकार जीवात्मा और परमात्मा के समरस हो जाने पर द्वैत भी अमृतोपम आनन्द देनेवाला हो जाता है )
या शब्दाचा हा अर्थ बघितल्यावर हा तितकासा बोचत नाही . दुसरी एक रोचक बाब म्हणजे संघ इथे नेहमीसारखा दांभिक दिसत नाही म्हणजे सरळ आम्ही समता मानत नाही आम्ही इतर वेगळेच आहेत हे मान्य करु फक्त समरस होण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडुन केला जाईल असे आश्वासन जणु या शब्दामार्फत दिलं जातं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचे विविध अर्थ आढळतात यातला दग्ध हा भाग अगोदर बघा पटकन आठवणारा शब्द पश्चातापदग्ध याचा अर्थ पश्चतापाच्या अग्नित जळालेला
तसेच दाते शब्दकोशातील विदग्ध चे विविध अर्थ खालील प्रमाणे दिलेले आहेत.
1) विदग्ध (p. 2830) विदग्ध—धावि. १ करपलेलें; जळलेलें. 'शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें का विदग्धें ।' -ज्ञा १५.९.
२ अर्धकच्चें; अर्धवट शिजलेलें (अन्न).
३ अर्धवट करपलेलें व अर्धवट कच्चें (अन्न).
४ दुउत्तम शिजलेलें; चांगलें भाजलेलें (अन्न वगैरे). 'शुष्कसुपक्व विदग्ध । चतुर्विंध अन्नें उत्तम खाद्य ।'
५ (ल.) कुशल; चतुर; हुशार; निष्णात. [सं. वि + दह्-दग्ध]
६-विदग्धाजीर्ण-न. अन्न अर्धवट पचल्यामुळें होणारें अजीर्ण. यांत घशाशीं आंबट येतें. टार प्रकारच्या अजीर्णांपैकीं एक प्रकार.

यातील चतुर कुशल या अर्थाने एक शब्द आढळतो विदग्धपरिषद म्हणजे अशा चतुर लोकांची सभा
याच अर्थाने बोलण्यात चतुर माणसासाठी वाग्विदग्ध व वचनासाठी विदग्धवचन इ.
आता एक मोठे कन्फ्युजन इथे असे आहे की एकाच शब्दाचा अर्थ एकदम परस्परविरोधी अन्नाच्या बाबतीत दिलेला आहे.
एकीकडे ३ अर्धवट करपलेलें व अर्धवट कच्चें (अन्न).
दुसरीकडे उत्तम शिजलेलें; चांगलें भाजलेलें (अन्न वगैरे).
याची काही जोडणी लावता येत नाही. असो
तर विदग्धा चा अर्थ ब्रह्मा ने जिची निर्मीती केलेली आहे अशी एक अप्सरा असा ही आहे.
आणखी एक अर्थ Vidagdha (विदग्ध) चा .—One who is expert in the art of attracting women. म्हणजे प्ले बॉय या अर्थानेही होतो.

https://www.wisdomlib.org/definition/vidagdha
तसेच
2) विदग्ध वाड्मय (p. S0222) विदग्ध वाड्मय—न. अभिजात वाड्मय; ललित व उच्च दर्जाचें वाड्मय [सं.] हा ही एक अर्थ आहे.
या संदर्भात मा.गो. वैद्य म्हणतात
" कालदृष्ट्या वाड्मयाचे दोन भाग आहेत. एक आहे आर्ष म्हणजे ऋषिनी लिहिलेले अर्थात प्राचीनतम . प्रथम भाषा आली आणि नंतर व्याकरण, अलंकार वगैरे आले. व्याकरणाचे नियमच तयार झालेले नसल्यामुळे प्रचलित नियम न पाळता लिहेले गेलेले जे वाड्मय ते झाले आर्ष. इंग्रजीत अशा वाड्मयाला archaic म्हटले जाते. व नंतर जे उत्तरकालीन सुघटित वाड्मय निर्माण झाले त्याकरीता इंग्रजी शब्द आहे classical आणि या classical साठी आपण वापरलेला शब्द आहे " विदग्ध" कच्चे अन्न चांगले नसते. "दग्ध" म्हणजे जळालेलेही अन्न चांगले नसते. जे विशेष प्रकारे , तेल , फोडणी, मसाले, कोथिंबीर इत्यांदींचा वापर करुन रुचकर बनविलेले असते ते " विदग्ध" जे खाद्य पदार्थांच्या बाबतीत तेच वांड्गमयाच्या बाबतीतही लागु होते."

( टंकन दोषासाठी क्षमा असावी काही अक्षर मला अजुनही टाइप करता येत नाही )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षापुर्वी मकरंद साठे यांच्या मुलाखतीत पहिल्यांदा हा शब्द ऐकला होता. त्यात त्यांनी पिपीलीका मार्ग हा एक भारतीय तत्वद्न्यानातील मार्ग आहे असे म्हटलेले होते. तर पिपीलीका चा बेसीक अर्थ मुंगी लाल मुंगी. काळ्या मुंगी साठी मार्कटपिपीलिका हा शब्द.
शैव संप्रदायानुसार एकुण पाच चक्रापैकी दुसरे चक्र खेचरीचक्र त्या खेचरीचक्राच्या दुसऱ्या सोममंडलातील एकुण ३२ देवतांपैकी एक देवता पिपीलीका
अधिक रोचक माहीती इथे https://www.wisdomlib.org/definition/pipilika

पिपीलीका मार्ग संदर्भात्

According to Vignana there are three ways of Transmission of Spiritual Power and they can be explained through example. Of the three, Vihangam Marg is the shortest (fastest) way to achieve the Final Reality:

Suppose there is a sweet and ripe fruit at the top of a tree. To enjoy the taste of the fruit,

PIPILIKA MARG: An ant slowly comes to the trunk of a tree, slowly marches forward to the branch and enjoys the taste of the fruit. The way is known as Pipilika Marg (Ant-path).

MARKAT MARG: Jumping from one tree to another a monkey comes from a distance to the branch of the tree and directly starts tasting the fruit. This way is known as Markat Marg (Monkey-Path).

VIHANGAM MARG: A bird flying in the sky, directly pecks at the fruit with its beak and starts eating. This is known as Vihangam Marg (the Birds-Path, the Birds' Sky-w

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाली पडलेली पिकलेली फळे मिळण्याच्या शोधात. हा आमचा मार्ग म्हणजे फक्त झाडाखाली बसणे आणि वाट पाहाणे. तासाभरात एकही फळ न पडल्यास दुसरे झाड शोधणे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका खटल्याच्या मजकुरात "सरस निरस मनाने"* वाटणी असा उल्लेख वारंवार वाचला. हा शब्द कायदेशीर नेमकेपणा व्यक्त करत असेल असं वाटलं नाही. नेमका अर्थही कळला नाही.

अनेक शब्द, जे कायदेशीर भाषेत (निकालपत्रात, फिर्यादीत) दिसतात ते नेमकेपणाऐवजी मोघमपणा आणतात की काय असं वाटतं. Mutatis mutandis टाईप.

*सरस निरस 'मनाने' की 'मानाने' याबद्दल शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय कायदा हा मोठ्या प्रमाणावर ब्रिटीश कायद्याने प्रभावित झालेला आहे व ब्रिटीश कायद्या वर रोमन कायद्याचा प्रभाव आहे. म्हणून लॅटीन लीगल टर्म्स या थेट इथपर्यंत पोहोचतात.पण त्या लॅटीन लीगल टर्म्स माझ्या अल्प माहीतीनुसार त्यांच्या कायद्यातील निकालातील दिर्घ काळातील वापरामुळे वेल एस्टॅब्लीश झालेल्या आहेत असे वाटते. मग Mutatis mutandis या सारख्या टर्म्स मध्ये मोघमपणा का जाणवतो ?
म्हणजे जजला जरी समजा सखोल द्न्यान नसले तरी संदर्भ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जो कधीही ताडुन पाहीला जाऊ शकतो. अनेक लॅटीन लीगल टर्म्स च्या डिक्शनऱ्या ही उपलब्ध आहेत. मग अशी संदिग्धता का निर्माण होत असावी ? असा प्रश्न पडतो.
मराठी सरस निरस बाबतीत असे होण्याची शक्यता मात्र दाट आहे कारण मराठी शब्दांचा असा दीर्घकालीन सातत्याने वापर निकालात झालेला नसावा
एक आपला अंदाज जास्त माहीती नाही या विषयी
म्हणजे मराठी संदिग्धता समजु शकतो पण लॅटीन संदिग्धता पचनी पडत नाहीये.
या संदर्भातील माहीती या चर्चेत आढळली.
https://www.quora.com/Why-are-there-so-many-words-in-Latin-in-Indian-law

इथे एक रोचक उत्तर बघा
Because Indian law has been derived from the erstwhile British law, which had a lot of Latin jargon. The use of a dead language ensured the consistency of meaning over time and Latin was the one most popular dead language in Europe. Also, other non English speaking countries that use Latin jargon can maintain consistency of definitions.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mutatis Mutandis Law and Legal Definition. Mutatis mutandis is a Latin phrase that means "by changing those things which need to be changed.” The phrase can also mean “having substituted new terms.” ..

ही टर्म कायदेशीर विधानात वाक्यापूर्वी घालण्यात केवळ "मी एक डिस्क्लेमर टाकून मोकळा" असा भाव वाटत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The use of a dead language ensured the consistency of meaning over time and Latin was the one most popular dead language in Europe. Also, other non English speaking countries that use Latin jargon can maintain consistency of definitions.

रोचक खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांडाळ
चांडाल भारत में व्यक्तियों का एक ऐसा वर्ग है, जिसे सामान्यत: जाति से बाहर तथा अछूत माना जाता है। यह एक प्राचीन अन्त्यज, नीच और बर्बर जाति है। इसे श्मशान पाल, डोम, अंतवासी, थाप, श्मशान कर्मी, अंत्यज, चांडालनी, पुक्कश, गवाशन, चूडा, दीवाकीर्ति, मातंग, श्वपच आदि नामों से भी पुकारा जाता है।[1]
someone who deals with disposal of corpses
यांचे प्रमुख काम प्रेताची विल्हेवाट लावणे हे आहे. हे चांडाळ इतके तिरस्करणीय का मानले जात ? हे अत्यंत तिरस्करणीय संबोधन आजही वापरात आहे. अरे चांडाळा हा एक प्रकारच्या शिवी सारखा उपयोग अत्यंत नीच व्यक्तीसाठी केला जातो. त्याचे एक स्पष्टीकरण अनुलोम प्रतिलोम विवाह आणि त्यातुन उत्पन्न झालेल्या संतती च्या साठी वापरलेल्या नावातुन मिळते. याकडे पाहण्याचा सनातन दृष्टीकोण यामागचा तिरस्कार उघड करतो.
खालील मराठी विश्वकोशा चे उतारे बघा
वर्णव्यवस्था : चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र होत. ब्राह्मण सर्वांत उच्च. त्याच्या खालोखाल क्षत्रिय. क्षत्रियाच्या खालोखाल वैश्य व वैश्याच्या खाली शुद्र, असा हा उच्चनीच भाव धर्मशास्त्राने गृहीत धरला आहे. या चार वर्णांचा समाज बनतो. या चार वर्णांचा अनुलोम विवाहाने होणारा संकर निषिद्ध नाही. या चार वर्णांचा प्रतिलोम संकर निषिद्ध आहे. अनुलोम संकर म्हणजे उच्चवर्णाचा पुरुष व खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह. वरच्या वर्णाची स्त्री व खालच्या वर्णाचा पुरुष यांचा संभोग व निर्माण झालेली संतती म्हणजे प्रतिलोम संकर होय. या अनुलोम-प्रतिलोम संकरांच्या योगाने भारतीय समाज बनला आहे.

समान वर्णाच्या स्त्री-पुरुषांपासून समान वर्णाचीच संतती होते, हा समान वर्णाचा अत्यंत प्रशस्त मानला आहे. ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांच्यापासून ‘मूर्धावसिक्तनामक’ जाती निर्माण होते. ब्राह्मण पुरुष आणि वैश्य स्त्री यांच्यापासून ‘अंबष्ठ’ या नावाची जाती निर्माण होते. ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्या विवाहातून ‘पारशव’ किंवा ‘निषाद’ नावाची जाती उत्पन्न होते. क्षत्रियापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी ‘माहिष्यनामक’ जाती निर्माण होते व शूद्र स्त्रीच्या ठिकाणी क्षत्रियापासून जी संतती होते, तिला ‘उग्र’ जाती असे म्हणतात. वैश्य पुरुषापासून शूद्र स्त्रीच्या ठिकाणी जी संतती निर्माण होते, ती जाती ‘करण’ होय. ही अनुलोम संकरासंबंधी माहिती झाली.
क्षत्रिय पुरुषापासून ब्राह्मण स्त्रीच्या ठिकाणी निर्माण झालेली संतती ‘सूत’ जाती होय. वैश्यापासून निर्माण झालेली ‘वैदेहक’ जाती होय. ब्राह्मणीच्या ठिकाणी शूद्र पुरुषापासून जी संतती निर्माण होते, ती ‘चंडाल’ होय. ती अत्यंत नीच व बहिष्कृत होय, असे मानीत. क्षत्रिय पुरुषापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी जी संतती होते, ती ‘माहिष्य’ जाती होय. वैश्य पुरुषापासून शूद्र स्त्रीच्या ठिकाणी ‘करणी’ नामक जाती उत्पन्न होते. त्या करणीच्या ठिकाणी माहिष्यय पुरुषापासून ‘रथकार’ नामक जाती निर्माण होते.
म्हणजे एक पुरुषसत्ताक समाजव्यवस्था त्यात पुन्हा वर्ण व्यवस्थेची उतरंड यात सर्वात खालच्या स्थानावर चा जो शुद्र पुरुष आहे तो सर्वात वरच्या स्थानावरील ब्राह्मण स्त्री शी विवाह करुन जेव्हा त्यांना संतती होते ती वर्ण वाइज व पुरुषसत्ताक वाइज दोन्ही बाजुने अर्थातच अत्यंत तिरस्करणीय मानली जाणार यात संशय नाही.
चंड -
या शब्दाच्या मुळा विषयी इतकीच माहीती मिळाली
Sri Chandi is the Goddess who is the Patta Mahishi of Parabrahman. The word ‘Chanda’ hints at extraordinary traits and thus refers to the Parabrahman, who is extraordinary due to his complete independence w.r.t time and space. The word Chandi (arising from the Dhatu Chadi meaning anger) also refers to the fiery power of anger of the Brahman. The Sruti says, “mahadbhayaM vajramudyataM’, wherein the word ‘vajra’ means not any weapon but the supreme Brahman. Thus, Chandi represents the Shakti of Brahman.

चंडअशोक हे संबोधन बुद्ध धर्म स्वीकारापुर्वीच्या पुर्वकालीन सम्राट अशोकाला वापरले जात असे. याचे कारण त्याने टॉर्चर चेंबर ची निर्मीती केलेली होती. व तो त्यात अत्यंत क्रुरतेने निर्दयतेने विरोधकांची हत्या करत असे या प्रकारच्या लीजंड्स आहेत याविषयी ची अधिक माहीती इथे
https://en.wikipedia.org/wiki/Ashoka%27s_Hell
इथे चंडअशोक वर अजुन माहीती मिळते.
https://www.indiaforums.com/forum/topic/4608368

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्लाघ्य चा अर्थ आहे - स्तुतीयोग्य, प्रशंसनिय
मला अर्थ बरोब्बर उलटा वाटे.
_____________
मना राघवेवीण आशा नको रे| मना मानवाची नको कीर्ती तू रे|
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे| तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परोक्ष, अपरोक्ष हेही नेमके उलट वापरले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर धागा!
(खालील परिच्छेद ‘शब्दवेध’ धाग्याशी सुसंगत आहे की नाही याबद्दल मनात शंका आहे.)
स्वयंपाकाशी संबंधित असलेल्या शब्दांची यादीः
निवडणे, चाळणे, पाखडणे, कांडणे, कुटणे, दळणे, चिरणे.
कापणे , चोचणे, मळणे, भिजवणे, तिंबणे, थापणे, लाटणे,
भाजणे, परतणे, वळणे, उलथणे, आंबवणे, धुणे, शिजवणे,
उकडणे, वाफवणे, किसणे, खोवणे, गाळणे, चुरडणे, ठेचणे,
वाटणे, उकळणे, तापवणे, कालवणे, मिसळणे, निथळणे, उपसणे,
फेटणे, घुसळणे, फेसणे, कोळणे, भुरभुरणे, पेरणे, घोटणे,
ढवळणे, कुसकरणे, आटवणे, कढवणे, खरवडणे, मुरवणे, सोलणे इ.इ.
................. (माधुरी पुरंदरे यांच्या लिहावे नेटके या पुस्तकावरून)
स्वयंपाक करताना एवढ्या गोष्टी घडत असतात याचे आश्चर्य वाटते.
पाकक्रियेचा हा शब्दसंग्रह व प्रत्येक शब्दागणिक होत असलेली क्रिया व त्यातील बारकावे यंत्रयुगात लोप पावण्याची शक्यता जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांडणे वरुन मिरची कांडप यंत्र मधला कांडप शब्द आला असावा. मिरची कांडप मशिनी पाहिलेल्या आहेत
खोवणे ओला नारळ कवीट सोडुन अजुन काय खोवले जात असावे ? किसणे आणि खोवणे तला फरक कळतोय पण शब्दात नाही मांडता येत.
चोचणे एकदम डोक्यावरुन गेला क्लीन बोल्ड चोचणे म्हणजे काय म्हणे ?
बाकी छान लीस्ट आहे आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काकडी कोचतात. विळीवर अशी एका विशिष्ठ कृतीने काकडी कोचली/चोचली जाते.
>>>किसणे आणि खोवणे तला फरक कळतोय>>>>> किसणीवरती किसतात. विळीवरती खोवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे काकडी चोचवतात .. कोशिंबिरीसाठी

खोवणे म्हणजे खरवडणे असे होउ शकेल. नारळाची अर्धी वाटी वेळणीवर खोवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

चोचवतातच असेल. मला नीट आठवत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही शब्द वापरले जातात. काकडी क ने सुरू होत असल्याने कोचली असा पाठभेद बनला असेल. चिबूड असतं तर चोचवलं असतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोक्कस..

(कचर्योभेद:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विळीला तुम्ही वेळणी म्हणता का? मस्त शब्द आहे. वेळावलेलीच (वेलांटीसम) असते खरच्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची आजी (आईची आई (दिवंगत); कऱ्हाडे ब्राह्मण; उद्गम: जिल्हा सिंधुदुर्ग) 'झाकणी' अशा अर्थाने 'वेळणी' हा शब्द वापरत असे, असे आठवते. (ती चिमट्याला 'गावी' आणि गांडुळाला 'काडू' म्हणत असे, असेही आठवते, परंतु ते येथे अप्रस्तुत आहे.)

नारळ खवण्यासाठीची वेळणी पहिल्यांदाच ऐकतोय.

----------

आमची दुसरी आजी (वडिलांची आई; जन्मतः कऱ्हाडे ब्राह्मण; उद्गम: बहुधा जिल्हा कोल्हापूर) गांडुळाला 'दानवे' ('दानवं') म्हणत असे.१अ

१अ गांडुळाला 'गांडूळ' म्हणणारी एक आजी आम्हांस लाभती, तर शपथ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकी शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

घरी विळी अथवा वेळी च

हा एक वाचीव शब्दं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

घरी विळी अथवा वेळी च

वेळी म्हणत असतीलही कदाचित. (म्हणजे, मी ऐकलेले नाही, परंतु तुमच्या घरी म्हणतात असे तुम्हीच म्हणताय, तर म्हणत असतीलही. मला कल्पना नाही.)

मात्र, वेळणी वेगळी. पूर्णपणे वेगळी. तिचा विळीशी (किंवा वेळीशी) काहीही संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विळीला तुम्ही वेळणी म्हणता का? मस्त शब्द आहे. वेळावलेलीच (वेलांटीसम) असते खरच्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी आई झाकणी जी असते, जिचे काठ आत वळलेले नसतात त्याला वेळणी म्हणते.
काठाची असते ती नुसतीच झाकणी,
वेळणीत जेऊ नये असे ही ती सांगते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अच्छा! मी वेळणी कधी काही पाहीली नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

velani

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अरे हां हे पाहीले आहे. धन्यवाद Smile
___________
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4...
इथे काही हद्दपार शब्द दिलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यातले ८०% शब्द माझ्या घरी तरी वापरले जातात

त्यात काही
१. पंचपात्री - फुलपात्रा सारखे पण जे आचमनाला / तिर्थासाठी वापरतात त्याला आम्च्याकडे पंचपात्री म्हणतात
२. डेचकी - त्रिकोणी भांडे, यात खिचडी छान होते
३. भगूणं - कोणत्याही भांड्याला विदर्भात भगूणं म्हणतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

फिरकीच्या तांब्याचा फोटो छान आहे.
आजकाल पितळेचे तांबे दिसत नाहीत. सारे काही स्टेनलेस स्टील. आणि त्यावर फिरकी नसते.

केळकर संग्रहलयात अशा वस्तु बघायला मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

हा "मर्मभेद" पुस्तकातील उतारा-
त्या प्रचंड शस्त्रागाराचे अनेक विभाग पडले होते. पहीला भाग होता खड्गांचा.अनेक आकारांची ती करवले पाहून, कृष्णांताचे नेत्र चमकले. बृहतसंहिता आणि मुक्ततरुकल्प ग्रंथात वर्णन केलेल्या कमलपाणी,चंद्रकोरी आणि कन्हेरपत्री खड्गांचा तेथे खच पडला होता. पट्टापान, चिमटेदार कत्त्या, दुधारी कम्मे, गद्दर, डाव, सखेला, धोप आणि नंतरच्या काळात "पेशकब्ज" या खड्गांच्या वर्णनाला जुळणार्‍या अनेक प्रकारच्या उत्कृष्ट तलवारी त्यांच्या गुणक्रमा़कानुसार तेथे रचण्यात आल्या होत्या. त्या खडगांची कामगिरी उत्कृष्ट होती.काही तेजधार वंगदेशीय होत्या, काही कठीण शूर्पारकी घडणावळीच्या होत्या. त्यांच्यासाठी वापरलेले पोलाद उत्कृष्ट चंद्रवत आणि हत्तीपागी जातीचे होते.त्या जातीच्या पोलादावर कोणतीही कानस साधा ओरखडाही उमटविण्यास असमर्थ ठरते असा त्या पोलादाचा सार्थ लौकिक होता.
.
दुसरा विभाग होता मुष्टिकांचा. अनेक प्रकारचे जंबिये, सुरे तेथे व्यवस्थित ठेवले होते. अनेक कट्यारी, निमचे,अरुंदपानी किराच, पिंपलपानी कट्यारी यांचा त्या विभागात समावेश होता.
.
नंतरचा विभाग भाले अन बरच्यांचा होता. त्यातील काही निरंग आणी संग दोन्ही जातीच्या लोहापासून बनविलेल्या होत्या. भाल्यामध्ये य्द्धात हत्तेवरुन फेकण्याचे "गजकुंट", अश्वांवरुन फेकण्याचे "अश्वकुंट" आनि पायदळात उपयोगी ते "पादातिकुंट" हे सर्वच प्रकार तेथे होते.
.
नंतरच्या विभागात होती सर्व प्रकारची मुद्गले आणी गदा. वजनवारीने त्यांची मांडाणी केली होती.
.
पुढच्या विभागातील सर्वांग-कवचे, शिरस्त्राणे, ढाली, मुखाच्छादने वगैरे गोष्टी युद्धात स्वसंरक्षणार्थ वापरायच्या होत्या.
.
कल्पक, धनुर्विद्या भागापर्यंत पोचला होता. कृष्णांत त्याला सांगू लागला. हा अरामुख-हा कोणत्याही कठीण धालीचे तुकडे करतो. हा क्षुरप-शत्रूचे मनगट जायबंदी करण्याचे एकमेव साधन. हा गोपुच्छ-कोणत्याही पदार्थाचा भेद करण्याची यामध्ये शक्ती आहे. हा सूचिमुख-कसल्ञाही उत्कृष्ट कारागिरीच्या चिलखताचा भेद करावा तर या बाणाने. हा अर्धचंद्र-हां हां म्हणता म्हणताशत्रूचे शिर धडावेगळे करुन उंच आकाशात उडविण्याचे सामर्थ्य याच्यामध्ये आहे. ह्याला म्हणतात वत्सदंत-शत्रूच्या हातातील धनुष्याच्या प्रत्यंचेचा अचूक वेध घ्यावा तर यानेच. ह्या बाणाचे नाव द्विमाला - शत्रूने सोडलेल्या बाणांचे अंतराळातच तुकडे करण्यासाठी हा वापरतात. ही कर्णिका-शत्रूने सोडलेल्या बाणाचे बरोब्बर दोन तुकडे करण्यासाठी उपयोगात आणली जाते. हा मल्ल किंवा भल्ल-अचूक वेध घेऊन शत्रूच्या हृदयात घुसून त्याचा मर्मभेद करणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लुटणे शब्द हळदीकुंकवातून विलायतेला जाऊन परत आला ?
किंवा चंबळच्या खोऱ्यातून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्याची संकल्पना चांगली आहे.

तुम्ही उधृत केलेले शब्द आणि त्यांची माहिती पण वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

बोली भाषेतील पक्ष्यांची नावेसुद्धा फार मजेशीर असतात. उदाः चिखल्या, वटवट्या, खाटिक, काकण, धोबी, शराटी, सातभाई, गप्पीदास, चष्मेवाला, वंचक, भिंगरी, गंदम, शिंपी, सुतार, शेकाट्या, लेवा, लोव्वा इ.इ.
या नावांचा मागोवा घेणे, या शब्दांचा इतिहाश शोधणे फारच जिकिरीचे असू शकेल. या पक्ष्यांना कसे काय ओळखत असतील हाही संशोधनाचा विषय होऊ शकेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातली, लोकल भाषेतली नावं ही बहुतांश (अपवाद वगळता) लकबी, वागणूक, स्वभाव, सवयी यांवर म्हणजे सलग निरीक्षणावर आधारित असतात. (धोबी, वटवट्या, सातभाई (सातचा ग्रुप करून राहण्याची सवय), शिंपी (शिवण घालून घरटं), पाणकोळी, वेडा राघू, फुलचुख्या)

आणि इंग्रजी, स्टँडर्ड केलेली नावं ही दृश्य इनपुटवर आधारित असतात. रंग, आकार, पंखविस्तार, दिसणं वगैरे वर्णन (रेड मुनिया, रेड चिकड बुलबुल, स्कारलेट मिनिवेट, ग्रेट इंडियन बस्टर्ड, स्मॉल ब्लु किंगफिशर, ब्लॅक बर्ड)

टेलर बर्ड, कोपरस्मिथ अशीही नाव इंग्रजीत असतात पण रूढ नाव वेगळं असतं. बार्बेट किंवा आणखी काही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी नावं भारतीय करण्याचा केलेला प्रयत्न मारुती चितमपल्ली यांनी केला तो पक्षीकोशा'त दिला आहे.
सलीम अली म्हणाले शक्य आहे पण प्रमाणिकरण करावे लागेल नावांचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

clicktivism
हा अलीकडच्या काळात प्रचलित झालेला शब्द आहे. ऑक्सफर्ड च्या वर्ड ऑफ इयर की शॉर्ट लिस्ट मध्ये आलेला. हा शब्द click आणि activism या दोन शब्दांच्या संयोगाने तयार झालेला आहे. याचा अर्थ खालीलप्रमाणे
The practice of supporting a political or social cause via the Internet by means such as social media or online petitions, typically characterized as involving little effort or commitment.
याचा मराठी अनुवाद आपण कळबडवणेवाद असा करु शकतो कदाचित. यात ज्या ज्या मोहीमा प्रामुख्याने इंटरनेटवरुन फेसबुक आदी सोशल मिडीयाचा वापर करुन राबविल्या जातात त्याकडे निर्देश आहे. यात क्लीक करुन आपले मत नोंदवणे यापलीकडे काही नसते. म्हणजे हायवेवर उतरुन रास्तारोको न करता इनफॉर्मेशन हायवेवर उभे ( नव्हे बसुन ) कळ दाबणे हे अपेक्षित आहे. आता यात एक रोचक बाब अशी आहे की गेल्या पिढीतील रस्त्यावर उतरुन संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांना ( ज्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आंदोलनाची किक बसत नसे झिंग चढत नसे ) त्यांना clicktivism जरी शुद्र वाटला व त्याकडे जरी ते तुच्छतेने बघत असले तरी त्यांना नव्या जगाच्या माध्यमाची ताकद कळली नाही असे म्हणावेसे वाटते. clicktivism म्हणजे विशिष्ट उद्देशाने सोशल मिडीया सोजिरांनी दिलेला लढा. शब्दाच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर छोटेखानी लेख इथे जरुर बघावा
https://blog.oup.com/2014/11/slacktivism-clicktivism-real-social-change/
सध्या ऐसी अक्षरे वर सुरु असलेली नाव नोंदणी या संदर्भात रोचक आहे इथे दोन्ही पिढ्यांचे दोन्ही मार्ग वापरलेले दिसतात म्हणजे मी सहमत आहे म्हणुन clicktivism आणि प्रत्यक्ष मैदानावर जाऊन जंग लढण्याचा ही पर्याय उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या शब्दाचा उगम Cuckoo ( कोकिळ ) वरुन आलेला आहे. कोकिळा जी इतर पक्ष्याच्या कावळ्याच्या घरट्यात स्वत:ची अंडी टाकते व ती तो पक्षी स्वत:चे समजुन सांभाळतो. cuckold चा अर्थ
In evolutionary biology, the term is also applied to males who are unwittingly investing parental effort in offspring that are not genetically their own तसेच हा अर्थ की
a man whose wife is sexually unfaithful, often regarded as an object of derision. ज्याची पत्नी व्याभिचारी आहे तो पति.

किरण नगरकर यांच्या एका विख्यात कादंबरीचे नाव cuckold आहे. ज्यात महाराज कुमार हे संत मीराबाई च्या पति वर आधारीत मध्यवर्ती पात्र आहे. याच्या मराठी अनुवादाचे नाव मात्र " प्रतिस्पर्धी" असे ठेवलेले आहे. जे गालिब च्या फार तर रकिब च्या जवळ जाणारे आहे (जिक्र उस परी-वश का और फिर बयां अपना बन गया रकीब आखिर, था जो राजदा अपना ) पण हा मला वाटते की cuckold चा अचुक अनुवाद करत नाही. कारण cuckold हा पत्नीच्या व्याभिचाराप्रति अनभिज्ञ असलेला पुरुष अशा अर्थाने आहे जसे कोकिळ चे अंडे असण्याविषयीची कावळ्याची अनभिज्ञता. या मराठी पुस्तकाच्या टायटलमध्ये कोणाला गृहीत धरलेले आहे ? जर कृष्ण हा मिरेचा प्रेमी या अर्थाने महाराजकुमार चा प्रतिस्पर्धी आहे तर तो मुळ cuckold चा अर्थ पुर्णपणे गंडतो. पण मग इथे दुसरा रोचक प्रश्न उपस्थित होतो तो असा की

विकीपेडीया वर या शब्दाचा विस्तृत अर्थ दिलेला आहे. त्यात एक फेटीश अर्थाने जे bdsm life style चा भाग या अर्थाने cuckold चा अर्थ वेगळा आहे.
Unlike the traditional definition of the term, in fetish usage a cuckold or wife watching is complicit in their partner's sexual "infidelity"; the wife who enjoys cuckolding her husband is called a cuckoldress
यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पतिच्या समोर त्याच्या संमतीने केले जाते The fetish fantasy does not work at all if the cuckold is being humiliated against their will. म्हणजे इथे वरील प्रमाणे अनभिज्ञता नाही. तर महाराज कुमार ला तर मिराबाई च्या कृष्णप्रेमा विषयी पुर्ण माहीती होती इथे सरळ अर्थाप्रमाणे अनभिज्ञता नव्हती.
मग प्रश्न असा आहे की किरण नगरकरांनी जे cuckold नाव् निवडलं पुस्तकासाठी त्यात त्यांना " जाणता राजा " अभिप्रेत होता का ? असे जर असेल तर जे
नाव किरण नगरकर निवडतात ते कुठली अर्थछटा दाखवण्याचा प्रयत्न करताहेत फेटीश ? की हा एक अजुन एक orientalism किंवा exotica वगैरे चा अवलंब करुन माल विकण्यासाठी आहे ?
असल्यास काही हरकतही नाही नसल्यास ही नाही फक्त रोचक वाटले इतकेच्
https://en.wikipedia.org/wiki/Cuckold

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" सात मुकाम होते है इश्क मे..... दिलकशी, उन्स ,मोहब्बत,अकीदत,इबादत,जुनुन और..."

‛उर्दू - मराठी शब्दकोश’ (संकलन - श्रीपाद जोशी) याच्या आधारे शोधलेले अर्थ :

1) दिलकशी - आकर्षकपणा, सौंदर्य, मोहकता.

2) उन्स - प्रेम, माया, प्रीती, ममता.

3) मुहब्बत - १) प्रेम; प्रणय; वात्सल्य; २) मैत्री.

4) अकी(क्री)दत - १) धार्मिक श्रध्दा, निष्ठा
२) धर्मातील मूलभूत गोष्ट.

5) इबादत - उपासना; पूजाअर्चा; नमाज; तपस्या;
आराधना.

6) जुनून - १) वेड; खूळ; चळ; उन्माद २) प्रेम
३) क्रोध ४) नाद; छंद.

7) मौत - १) मृत्यू, मरण २) विनाश ३) दुर्दशा.

संदर्भ - डेढ़ इश्किया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

सध्या पुण्या मुंबईत क्राफ्ट/मायक्रो ब्रूअरी वगैरे मधे उगाचच माहीत झालेल्या या शब्दाचा देवळालीशी असलेला संबंध कुणा कुणाला माहीत नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The slang word ‚doolally‘ or ‚doolali‘ is used to describe someone who is ‚out of one’s mind‘ or ‚crazy‘. It is a derivation of ‚doolali-tap‘ and originates from the latter part of the nineteenth century. The first part of this phrase is derived from the name of a small military town in the Indian state of Maharashtra called Deolali. The second part is a Hindustani word for fever, often ascribed to malaria, although in Sanskrit, ‚tapa‘ means simply heat or torment. Taken literally, it is best translated as ‚camp fever‘. By the time of the Second World War, the term had been shortened to ‚doolally‘.

Frank Richards wrote, ‚The well known saying among soldiers when speaking of a man who does queer things, „Oh, he’s got the Doo-lally tap,“ originated, J think, in the peculiar way men behaved owing to the boredom of that camp‘ (2). While this may have been true at times, the reason that Deolali became synonymous with mental illness has more to do with the limitations imposed on troop movements by the seasons, the debilitating effect of the summer climate, alcoholism, venereal diseases, malaria, and the difficulties of treating mental illness in the colonies.
हे इथे सापडलं इथे एकदम डिटेल स्टोरी दिलेली आहे देवळाली शी असलेल्या या संबंधाची
https://www.gaebler.info/2013/04/the-madness-at-deolali/

shampoo हा शब्द देखील वरीलप्रमाणेच भारतीय उगम असलेला आहे हे अनेकांना माहीत नसते
The word shampoo entered the English language from the Indian subcontinent during the colonial era.[1] It dates to 1762 and is derived from Hindi chāmpo (चाँपो [tʃãːpoː]),[2][3] itself derived from the Sanskrit root chapati (चपति), which means to press, knead, soothe.[4][5]
त्याचप्रमाणे juggernaut हा पुरीच्या जगन्नाथ यात्रे शी

https://en.wikipedia.org/wiki/Juggernaut

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

doolally, shampoo या शब्दांची ओळख आजच झाली. juggernaut ची ओळख अगोदर झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय आहे संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवळाली ला ब्रिटिश आर्मीचा ट्रान्झित कॅम्प होता. तिथे म्हणे (कंटाळून की असंच) लोकांचे(सैनिकांचा) काटा हाले.
थोडंस डोकं फिरणे या अर्थी.
तेव्हापासून एखाद्याचा doolally झाला , म्हणजे तो थोडा हाफम्याड झाला/वागतोय या अर्थाने हा शब्द वापरला जातो .
आपल्याकडे ठाणे/येरवड्याला जसा विशेष मान आहे तसा विलायती भाषेत देवळालीला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...मायक्रोब्रूवरीज़शी त्याचा संबंध काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने