मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०६
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
हो
क्रोम मधे होते. (विंडोज १० आणि अँड्रॉईड) .
माझ्या फायरफॉक्समधे "नोस्क्रिप्ट" आणि "यू व्लॉक" लावलेले आहेत (कदाचित त्यामुळे) - तिथे असे होत नाही.
माझ्या मोबाईल / लॅपटॉप मध्ये व्हायरस / ॲडवेअर / मालवेअर नाही याची खात्री केली आहे. दोन्हीकडे क्रोम अनइन्स्टॉल / रीइन्स्टॉल करूनही उपयोग झाला नाही.
आता मेन बोर्डावर या
आता मेन बोर्डावर या धाग्यापुढे ६ प्रतिसाद ३ नवीन असे दिसले. त्या तीन वर क्लिक केल्यावर हे पेज उघडलं.
https://playoverlyprogressivefreeware.icu/EOzP-gRnrldballRz5Kju2Id_9ioZ…
https://aisiakshare.com
थत्ते तुम्ही https://aisiakshare.com वापरताय ना? कारण, ते https झाल्यापासून जाहिरातींची पानं उघडल्याचा अनुभव मला अद्याप तरी आलेला नाही.
खरंय
मलाही अशा साईटची गरज आहे.
बोले तो दर्दभरी वा भावना-बंबाळ करणाऱ्या गाण्यांबाबत आपल्याला म्हणायचंय का? म्हणजे अशी गाणी बघून अजून दर्द कळावं म्हणून पुन्हा पिच्चर पाहायचे असे उद्योग काही काळापूर्वी केले होते. आता ते सगळं बेचव वाटतं.
माझ्या मते, गाण्याची परिस्थिती कळली तरी गाण्याच्या रसात फारशी वाढ होत नाही. उलट कधी कधी असलेला वा बनलेला रसच ऐन गाण्याच्या वेळी धोका देण्याचा संभव असतो. असो.
भारत ग्रीस होण्याच्या वाटेवर
भारत ग्रीस होण्याच्या वाटेवर आहे का? पुढे काय?
--
टेलिफोन आणि इतर काही छोट्या कंपन्यांना लायसन फी भरण्याची कोर्टाची मुदत आता (१४-२- मध्यरात्री ) संपली. वोडाफोन, एरटेल,टाटाटेली यांचेच ९२ ह कोटी आहेत. बजेटमध्ये येणे रक्कम सवालाखकोटी सितामाईंनी अगोदरच धरली आहे.
जिएसटीचे एस्टीमेट बोंबलत आहे म्हणतात.
बरंच काही गुपचुप चालले आहे का?
बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती
बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती देणारे हे विकीपान संपादित करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत या पानावरचा मजकूर पाकिस्तानी + सिक्यूलर् दृष्टीने लिहिलेला आहे. या पानावर, The perpetrator of the attack was from Indian-administered Kashmir सारखे अनेक अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आहेत.
इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेचं
इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेचं (रोलिंग स्टॉकसहित). सेवा खासगी (सध्या तरी आय आर सी टी सी). खासगी कंपनी रेल्वेला इन्फ्रा वापरण्यासाठी भाडं देणार. सगळं जाऊन वर जो काही प्रॉफिट उरेल तो खा.कं.चा. यात रेल्वेला फायदा असा की सबसिडी द्या वगैरे भानगड नाही. हे रूळ, हे सिग्नल, हे डबे, ही इंजिनं... वापरा आणि पैसे द्या. गाडीत काय सुविधा पुरवायच्या वगैरे ते तुम्ही बघा. म्हणजे थोडक्यात प्रवासी वाहतुकीचं मालवाहतुकीकरण. अपघाताच्या लायाबिलिटीज वगैरे कशा मॅनेज करणारेत ते ठाऊक नाही.
हिंदी लेखनामध्ये नाम विभक्ती
हिंदी लेखनामध्ये नाम विभक्ती प्रत्यय वेगळे लिहिण्याचे कधी सुरू झाले? हे प्रमाणलेखन कोणी कधी बदलले?
मुंबईमें - मुंबई में
उत्तर भारतके राजपूत वंशोंमें - उत्तर भारत के राजपूत वंशों में
राष्ट्रकूटकी सत्ता कनौजसे रामेश्वरतक फैली हुई थी। - राष्ट्रकूट की सत्ता कनौज से रामेश्वर तक फैली हुई थी। -
((कल्याण मासिकांत जुन्या आणि नव्या अंकांतील हिंदी लेखनात हा फरक दिसतो. ))
कोरोना विषयी किंवा कोरोना काळात विनोदी लाइट लिहायचं
तर कुठे लिहाव ? म्हणजे तो कोरोना बखरचा धागा आहे तो
एकतर फार सिरीयस अनुभवांनी संवेदनशील अनुभवांनी ऐतिहासिक सोनेरी क्षणांच्या साक्शीदारांनी भविष्यकालीएन पिढ्यांची सांस्कृतिक तरतुदही आंतरीक अभिव्यक्ती सोबत होत राहीली पाहीजे या बाण्याने लिहिलेला आहे.
बरे पहीले पाच प्रतिसादानंतर धाग्याचा मुड आणि दिशा निश्चित होत असते आता आपली तिच दिशा असेल तर प्रॉब्लेम नसतो
पण समजा आपण उलट दिशेचे ( नेहमीच बहुधा ) असलो किंवा सिनीकल किंवा विक्शिप्तच म्हणा असलो तर
किंवा खाज म्हणा हव तर
आपल्याला वेगळ्याच चावट वाटा दाखवणारा ड्रमर खुणावत असेल्
आपल्याला प्रंचड सेन्टी वातावरणात प्र्चंड ॲन्टी सेन्टी विनोद डोक्यात निर्माण होत असतील तर
माह्या सारख्यासनी
कुठे
लिहाव
हा
?
पडलाय्
उदा. मला पॉर्न हब ने प्रिमीयम कंटेट खुला केलाय्
भारतात कंडोमचा सेल वाढलाय्
टीप टीप बरसा पानी या गाण्यावर नाचत असलेल्या बाईचा व्हिडियो बघतांना तिने पाठीवर दाखवलेल्या वाघाचे टॅटु हे चक्क शिवसेनेच्या ढाण्या वाघ सिम्बॉल च्या टॅटु सारखे बघुन हा त्याचा
सुंदरबन के मेले मे बिछडा हुआ भाऊ आहे का असे प्रश्न पडताय्
आम्ही कुठे जाऊन काशी करावी
एक धागा नको का स्वतंत्र आमच्यासारख्य्यांसाठी
ईमान म्हणजे काय?
झायराजी ज्या ईमान बद्दल बोलत आहेत, ते ईमान म्हणजे काय? आणि त्यांची praise त्यांच्या ईमानासाठी त्या म्हणत आहेत तसं "डेंजरस" कशी?
https://twitter.com/ZairaWasimmm/status/1251218460656365569/photo/1
Iman is that you believe in God...
>>> ते ईमान म्हणजे काय?
त्याचबरोबर हेही -
A Muslim is not the friend of a kafir- 3:28
टोकाचे विचार
अपर्णा रामतीर्थकर गेल्याची बातमी खरडफळा आणि फेसबुकवर वाचली.
ह्या बातमीमुळे माझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये. त्यांच्यासारख्या टोकाचे मागास विचार मांडणाऱ्या कोणत्याही माणसाच्या जिवंतपणीसुद्धा, त्यांचे जवळचे नातेवाईक, सगेसोयरे वगळता इतर कोणाच्याही आयुष्यात फरक पडू नये; अशी इच्छा. करोनासारख्या संकटाला आपण सगळेच तोंड देत असताना मागास, अवैज्ञानिक आणि कोणत्याही व्यक्तीला, व्यक्तीसमूहांना हिणवणारे विचार मांडणाऱ्या कोणाकडेही लोकांनी लक्ष देणं बंद करावं, अशी इच्छा.
ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर
माध्यमांतून -
अपर्णा रामतीर्थकर यांना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईशचरणी प्रार्थना.
अवांतर
ऐसी च्या RSS FEED ची लिंक मिळेल का ? हे काय असतं मलासुद्धा माहित नाही आहे.
कशासाठी हवंय -
कॅलिबर नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये कुठल्याही संस्थळाच्या FEED ची लिंक दिल्यावर ebook रुपात कॅलिबर आपल्याला संस्थळावरच्या सगळ्या बातम्या/आर्टिकल्स किंडल वर डिलिव्हर करतो.
प्रतिक्रिया योग्य त्या ठिकाणी चिटकवावी ही विनंती.
RSS FEED
RSS FEED
हा प्रकार २०१०मध्ये नोकियाच्या ( बटण फोनात) वापरत होतो. पेपराच्या नवीन बातम्या येत.
--–
Android फोनात - Feedly Classic app मध्ये ऐसी अक्षरेची RSS FEED ची लिंक टाकून चालू केले. दुसऱ्या दोन फीडही घेतल्या.
--------
फोनात साइटवर जाऊन मेन बोर्डावरचे लेख पाहतोच. लॉगिनमध्ये असल्याने नवीन लेख / प्रतिसाद हाइलाइट होऊन दिसतात त्यामुळे RSS FEED चा विशेष फरक ऐसीसाठी तरी जाणवणार नाही.
----------
पेपरच्या हव्या असलेल्या फील्डची ( स्पोर्ट्स/ टेक इत्यादी) लिंक add केल्यास फक्त त्या विषयाच्याच नवीन बातम्या दाखवल्या जातात.
नोटिफिकेशनची सोय तपासली नाही. पण ते आल्यास काम सोपे होईल. पेपरसाठी उत्तम.
----------
बाकी डिवाईसचा डिस्प्ले चांगला असल्यास काही कॉन्टेट पाहण्यास मजा नक्कीच येईल.
-------------
((नोकियाच्या feature phone नंतर विंडोज फोनला RSS FEED सपोर्ट नसल्याने बंद झालं होतं.))
माझा अनुभव लिहिला. समीक्षा नाही.
स्वतःची जाहिरात
हा व्हिडिओचा दुवा. काल फेसबुकनी मलाच त्याची जाहिरात दाखवली. माझी अन्नदाती कंपनी, माझा (आणि इतर तिघं आहेत) व्हिडिओ मलाच दाखवण्यासाठी फेसबुकला पैसे देत्ये.
विषय - आम्ही काय काम करतो.
आमची कंपनी घरं विकणारे लोक आणि घरं खरेदी करणारे लोक ह्यांची भेट घडवून आणते - रियल इस्टेट ब्रोकर आहे. कंपनीच्या ॲनॅलिटिक्स विभागात आम्ही तिघं काम करतो. आम्ही काय काम करतो आणि सध्या कोणत्या प्रकल्पांवर काम सुरू आहे असा विषय होता.
टीममधला विदा-विश्लेषक आणि माझा न-मॅनेजर, ॲनॅलिटिक्स डिरेक्टर सध्याच्या परिस्थितीवर काम करत आहेत. कोव्हिडमुळे व्यवसायात जे बदल झाले, प्रत्यक्ष जाऊन घर बघायचं ह्याजागी व्हिडिओ कॉलवरून बघायचं, त्याचे आकडे कसे दिसत आहेत; आता पुन्हा बंधनं किंचित ढिली झाल्यावर हे व्हर्च्युअल घर बघणं सुरू राहील का, ह्यावर ते दोघं काम करत आहेत.
मी आणि न-मॅनेजर भविष्यात किती उत्पन्न मिळेल ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहोत. आज जाहिरातीवर पैसा खर्च केला तर २ ते ४ महिन्यांनी उत्पन्न मिळतं. ह्यात अध्येमध्ये चिकार गुंतागुंत आहे. आम्ही त्यासाठी प्रारूप (मॉडेल) बनवत आहोत, ज्यात ही सगळी गुंतागुंत ध्यानात घेतली जाईल आणि हे प्रारूप कसं काम करतं हे सहज मांडता येईल.
आता explainable AI ह्या प्रकाराला बरे दिवस यायला लागले आहेत. हे प्रारूप त्या प्रकारचं असेल.
भाकितं होतातच ...
अमेरिकेत epidemiologists कधीपासून भाकितं करत होते, की करोना-कोव्हिडसारखं काही होऊ शकतं. कुणीही त्यांच्याकडे फार लक्ष दिलं नाही. रियल इस्टेट कंपनीला epidemiologists आणि सरकारी धोरणं ठरवणारे लोक नोकरीला ठेवणं परवडत नाही. उद्या एखादं भीषण चक्रीवादळ येऊन अमेरिकेची पूर्व किनारपट्टी उध्वस्त होऊ शकते. त्यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेणारे लोक नोकरीला ठेवणं परवडणारं नाही ...
अनॅलिटिक्स म्हणजे आपल्याला ज्या विषयात काहीही समजत नाही, त्याची भाकितं करणं नाही. आपल्याला ज्या विषयात थोडं काही समजतं, त्यातल्या तज्ज्ञांशी बोलून व्यवसायाची प्रारूपं लिहून भाकितं करणं म्हणजे अनॅलिटिक्स.
आहे त्यात समाधान मानून राहणारे मागेच पडतात. साधारण दहा वर्षांपूर्वी नोकिया अशीच गडगडायला लागली. पंधरा वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट. अशी भाकितं करण्यासाठी सांख्यिकी, अनॅलिटिक्सची काही गरज नाही. आपापल्या क्षेत्राचा अभ्यास केला तरी समजतं.
हे ट्वीट आपण पाहिलेत का?
The 5 stages of every Modi scheme
1) Masterstroke
2) Visionary
3) Some Temporary Hardship will be there
4) Why others are always negative
5) Hai bechara Modi at least he tried— Shiv Ramdas (@nameshiv) June 10, 2020
निदर्शनं
काल एका मोठ्या रस्त्याच्या सिग्नलला तीन तरुण पोरं दिसली. दोन काळ्या मुलींच्या हातात "Black Lives Matter" लिहिलेले फलक होते. मुलगा गोरा होता, त्याच्या हातात फलक होता - "Fuck the police, fuck their abuses ..." आणि काही तरी. गाडी चालवताना सगळं वाचता आलं नाही. आज जमलं तर जाऊन फोटो काढून येईन.
वैज्ञानिक ?
तरुण भारत या पेपरांत, दर बुधवारी, भविष्याबरोबर एक ज्योतिष, खगोलीय घटना यासंबंधी लेख असतो. त्यातली परस्पर विरोधी विधाने पहा.
चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर विरोधी गुरुत्वाकर्षणामुळे या काळात हवामानात अत्यंत सूक्ष्म असे कोटय़वधी विषारी जीवजंतू निर्माण होत असतात. त्यांचा अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी ग्रहण काळात खाणेपिणे निषिद्ध मानलेले आहे. गर्भवती महिलांवर ग्रहणाचा परिणाम होण्याची शक्मयता असते. त्यासाठी या काळात ‘संतान गोपाल मंत्रा’चा सतत जप करावा. इतरांनी मृत्युंजय मंत्राचा जप करावा. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास ग्रहणाबद्दलची भीती पूर्ण नष्ट होईल. दर्भ किंवा कुशासन मिळत असेल तर ते जवळ ठेवावे, म्हणजे अनिष्ट परिणाम होत नाही. ग्रहण काळात पूजा, शांती वगैरे करण्यापेक्षा स्वत: जप करणे अतिशय लाभदायक असते.
खरा वैज्ञानिक दृष्टिकोन हे कधी आचरणार ?
हॅहॅहॅ
तरुण भारतचे भविष्य.....हॅहॅहॅ
आमच्या येथील सोलापूर तरुण भारत हा जुन्या तरुण भारत किंवा बेळगाव तरुण भारत पेक्षा वेगळे प्रकाशन आहे. अर्थात अजेंडा, स्वरूप आणि स्थिती सेम.
तिथे साप्ताहिक भविष्य लिहिणारा आणि किंचित लेखक सिनिओरिती ने चक्क मुख्य संपादक झाला. अशा पेपरांचे मत काय वर्णावे.
येथे कर माझे जुळती...
येथे कर माझे जुळती...
चीन धोका देनेवाला देश है.भारत मे चीन के सभी वस्तुओंका बहिष्कार करना चाहीये.चायनीज फूड और चायनीज फूड के हॉटेल भारत मे बंद करने चाहीये ! pic.twitter.com/ovL2sOLUo4
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 17, 2020
अहो म्हणजे एकंदरीत
अहो म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य, मासेसना अपील होईल असं बहुतांश जे काही असतं ते विनोदी, फालतू, निरुपयोगी असा दृष्टिकोन अनेकदा दिसतो त्याबद्दल म्हटलं.
त्याने ठोस आउटकम असतोच असं नाही, पण खूप मोठा वर्ग एकत्र येऊन काहीतरी प्रतीकात्मक करत असेल तर त्याला इतकं डिस्काउंटही करू नये. मी खुद्द थाळी वाजवेन असं नाही किंवा टॉर्च लावेन असं नाही, त्यावरून निखळ विनोदही करायला हरकत नाहीच.. पण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना अपील होणाऱ्या गोष्टीबद्दल थेट मूर्खपणा किंवा करमणूक साधन असं म्हणू नये असं मत आहे.
अर्थात एक मत प्रत्येकाला असतं तितपतच ते आहे.
इति.
अं?
मला वाटलं ही टिंगल केली ती मोदीभक्तांनी त्या टाळ्या-थाळ्यांमुळे करोना पळाला, वगैरे मास्टरस्ट्रोक मारले होते, त्याची. प्रतीकं निराळी; त्यांचं दैवतीकरण निराळं आणि भंपकपणा साफच निराळा.
एरवी शी जिनपिंग किंवा चीन सरकारच्या नावानं सामुदायिक आणि एकसमयावच्छेदेकरून शिवीप्रदानाचं 'टास्क' देण्याबद्दल लिहिलं असतं, तर ते असं विनोदी वाटलं नसतं. ते फॉरवर्ड आणून मी इथे डकवलं नसतं. भावनांचा निचरा निराळा; विनोद निराळा.
...
(या धाग्यावरची चर्चा मोठी झाल्यामुळे वेगळा धागा केला आहे.)
दुसऱ्या महायुद्धात अशी भावनिक आवाहनं केली जात नव्हती का?
गूगलबाबा आपला जिगरी दोस्त, लंगोटीयार वगैरे जरी नसला, तरी कधीकधी हातचे राखून थोडी वरवरची का होईना, परंतु मदत करतोसुद्धा.
हे घ्या: (पहिल्या + दुसऱ्या महायुद्धांतली. विविध जालस्रोतांतून साभार.)
ब्रिटनमध्ये:
"सैन्यात भरती व्हा. नाहीतर तुमची बायको तुम्हाला काय म्हणेल?"
"तुमच्या मुलाबाळांना काय जाब द्याल?"
(गच्च भरलेल्या गाडीत) "या! जागा आहे अजून."
(कशाला या? मरायला?)
"कोण रे तो? आँ?"
(सभ्यतासंकोचास्तव शब्दरचना आवरती घेतली आहे. दामाजीचा घोडा, वगैरे...)
"या रे या! सारे या!" (साम्राज्याकरिता लढायला सर्व अंकितांना अगत्याचे आमंत्रण.)
ब्रिटिश हिंदुस्थानात:
टोपीकरांच्या शिपायांना वरून छत्रपती शिवाजीमहाराज आशीर्वाद देत आहेत, ही मोठी मौजेची गोष्ट आहे, नाही?
आणि, अकबर आणि राणा प्रताप यांचे एकसमयावच्छेदेकरून आशीर्वाद परस्परांना कॅन्सलौट नाही का करणार?
मराठ्यांचा जय... इंग्रजांच्या छत्राखाली! वरच्याप्रमाणे छत्रपतींच्या आशीर्वादानेच असणार बहुधा.
दखनी लोकांचे नांव ते नांव, नि वर पुन्हा दक्षिणा! वर बक्षीस, नि कपडे आणि घर फुकट! आणखी काय पाहिजे?
असो.
ग्रेट डिक्टेटर ( हिटलरचे
ग्रेट डिक्टेटर ( हिटलरचे विडंबन करणारा, चार्ली चाप्लीनचा सिनेमा)
त्यात देशासाठी त्याग करणारा निवडताना " ज्याच्या पुडिंगमध्ये नाणं निघेल त्याने पुढं व्हायचं असतं." हना सर्वांच्याच पुडींगमध्ये नाणे घालते तो विनोदी प्रसंग.
माझ्या मते हा प्रसंग एक माइक्रोलेवलचे आवाहनच आहे. घंटानाद/ शंखध्वनिने काही होत नाही हे जनतेला माहिती आहेच. पण तरीही मरण जवळ आलेल्या माणसासाठी उज्जैनीमध्ये महांकाळला महारुद्र करतातच तसे.
"आता हसून घेतले नाही तर पुढे संधी येईलच याची खात्री नसते" हा डायलॉग मी सहावीत रेशनच्या रांगेत उभा असताना कच्छी बायकांकडून ऐकला. ( संदर्भ : रेशनला प्रत्येक कार्डाला बासमती तांदूळ दिला जात होता दोन युनिटला एक किलो. - अट - पी एल40 नावाचा अमेरिकन गहू किंवा मका घेतला तरच बासमती मिळणार होता.)
नंतर तो मका कसा खपवायचा हा प्रश्नंच होता. गिरणीवाला मका दळायला तयार नव्हता. गहू मात्र थोडे थोडे चांगल्या गव्हात मिसळून दळले.
गेल्या काही दिवसांपासून ऐसीवर
गेल्या काही दिवसांपासून ऐसीवर लिन्क क्लिक केल्यास भलतीच पेज उघडतात असा अनुभव येत आहे. विंडोज १० + फायरफॉक्स ब्राउझर.. नेहमी होत नाही. विशेषत: २ नवे प्रतिसाद मधील २ वर क्लिक केल्यास असे होते.
इतरांना असे आढळले आहे का?
मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर मध्येही असे झाले..