Skip to main content

"म आं-जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?

"रच्याकने" जाता जाता कविता पाडली
"पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली

" कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली
" डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली

"हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले
"ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले

"म आं-जा" च्या संक्षेपांची यादी आटपली?
"पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली :)
~~~~~~~~~~~~~~~~

शब्दार्थ:
म आं-जा= मराठी आंतर-जाल

रच्याकने = रस्त्याच्या कडेने
पुलेशु= पुढील लेखनास शुभेच्छा
कृ ह घ्या= कृपया हलके घ्या
डू आयडी= माझे clones
हा का ना का= हाय काय नाय काय
ह ह पु वा= हसून हसून पुरे वाट
पु भा प्र= पुढील भागाची प्रतिक्षा