धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा
'ऐसी अक्षरे' सर्वांसाठी उपलब्ध केल्यानंतर अनेक सदस्यांच्या सहकार्यातून संस्थळाच्या रचनेत असणार्या त्रुटी, इतर हव्या असणार्या सुविधा इत्यादी गोष्टींवर चर्चा झाली. या फीडबॅकमधून काही गोष्टी करण्यात आल्या आहेत.
या संस्थळाची उद्दीष्टं साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व धाग्यांना श्रेणी देता येणं ही एक महत्त्वाची सुविधा आहे. संस्थळावरचं उत्तमोत्तम लेखन अधोरेखित करणं, तसंच प्रतिसादांना इतर वाचकांकडून फीडबॅक मिळून संस्थळाच्या अपेक्षा सदस्यांकडूनच सदस्यांना कळाव्या ही अपेक्षा आहे. या दोन्ही गोष्टींमुळे संस्थळावरच्या सदस्यांचा व लेखकांचा अनुभव सुधारेल अशी खात्री वाटते. जाहीर करायला आनंद होत आहे की ऐसी अक्षरेवर धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.
एकंदरीत तांत्रिक टीमने गेल्या दोन आठवड्यांत केलेल्या सुधारणांचा आढावा.
१. खरडवह्यांचा फॉर्मॅट सुधारला, बारीकसारीक त्रुटी काढून टाकल्या.
२. खरडवह्या व स्वतःच्या माहितीत चित्र टाकण्याची सोय केलेली आहे.
३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.
४. धाग्यांना तारे देण्याची सोय झालेली आहे. (याचा आणि कर्म, पुण्य, कर्म-मूल्य यांचा संबंध नाही.) ही सोय सध्या तरी श्रेणीदात्यांनाच उपलब्ध आहे. पण श्रेणीदात्यांची संख्या आता ८० च्या आसपास आहे. जसजशी सदस्यांची वागणूक दिसत जाईल तसतशी ही यादी वाढवत नेण्याचा प्रयत्न चालू आहे.
येत्या काही दिवसांत पुढच्या गोष्टी करण्यात येणार आहेत:
१. श्रेणीदात्यांची निवड आपोआप होणं कितपत शक्य आहे याची तपास.
२. धाग्यांच्या श्रेणीनुसार सॉर्ट करून सर्वाधिक श्रेणी असलेले धागे वर दिसतील असा वेगळा ट्रॅकर उपलब्ध करणे.
३. कौलांमधे पार्श्वभूमी देण्याची सोय सध्या नाही. लवकरच ही सोय उपलब्ध होईल.
४. कौलांमध्ये अजूनही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे.
ऐसी अक्षरे व्यवस्थापनातर्फे साइटवर सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. आपला पाठिंबा या प्रयत्नांना राहील अशी आशा आहे.
माझ्या लिनक्सवर फाफॉ ३.X आहे,
माझ्या लिनक्सवर फाफॉ ३.X आहे, तिथे 'नवीन' लाल रंगाचं दिसतं, कॉंकरर/रीकाँक नामक बाबा आदमच्या जमान्यातला ब्राऊजर आहे तिथेही 'नवीन' लाल रंगाचं दिसतं. अजून थोडा गूगलबाबा झिंदाबादचा नारा लावला पाहिजे असं दिसत आहे.
फाफॉच्या काही व्हर्जन्सचा इश्यू आहे असं वाटत आहे.
आणि हा प्रतिसाद लिहीता लिहीता 'नवीन'चा रंग फाफॉतही लाल झाला.
कॅश क्लीअर करा
>>विण्डोज आणि फाफॉ ६.०.२ मधून पहाताना 'नवीन' हा शब्द लाल रंगात दिसत नाहीये. इतर कोणाला हा प्रॉब्लेम येतो आहे का? (मी नेहेमी विण्डोज वापरत नाही त्यामुळे मुद्दाम विचारते आहे.)
किंचित डिटेक्टिव्हगिरी करून अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की याचा ब्राउजरच्या वर्जनशी संबंध नसावा. रंग नीट दिसण्यासाठी ब्राउजरची कॅश क्लीअर करायला लागते आहे. फायरफॉक्सवर हे करण्यासाठी सूचना इथे पाहायला मिळतील.
नवीन टॅग
सुधारणा आढावा कलम क्रमांक ३
३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.
~ याची अंमलबजावणी माझ्या वाट्याला आलेली दिसत नाही. जुनाच प्रकार आत्ता या क्षणीही चालू आहे. [मी फा.फॉ.६ वापरतो. त्यामुळे होत असल्यास मार्गदर्शन अपेक्षित आहे.]
याच संदर्भात एक सूचना : 'नवीन' हा टॅग उजव्या बाजूला घेता येईल ? म्हणजे दिनांकदर्शकाच्या अगोदर ~ नवीन/Wed, 02/11/2011 - 10:02" या प्रमाणे.
[आत्ता वाचताना असे वाचत गेलो : 'नवीन गवि आणि ऋ' / 'नवीन विंडोज' / 'नवीन सहमत' ~ म्हटले तर हे थोडे खटकते, म्हणून 'नवीन' ला डाव्या पक्षातून काढून उजव्यात स्थान द्यावे.]
अशोक पाटील
एक महत्त्वाचं काम
माझा, आणि आणखीही काहींचा, इथला वावर इथल्या व्यवस्थेवर विश्वास ठेवून होतो आहे. त्या विश्वासात एक महत्त्वाचा भाग असा आहे की, इथले मॉडरेटर वेळोवेळी श्रेणी देण्याचे काम करत असावेत हे गृहीत आहे. ते तसे होते आहे का? कारण, त्या मॉडरेटरनी दिलेल्या श्रेणीनुसार मला धाग्यांचीही निवड करता येते का हे मला पहावयाचे आहे. तसे झाले तर उगाच काही धागे उघडण्याचे कष्ट घेऊन मागाहून पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
मॉडरेटर्सनी किती प्रतिसादांना आणि धाग्यांना श्रेणी दिली असा काही लॉग देता येईल का? पारदर्शकता म्हणून. अप्रायजल होत जाईल. ;)
दोन नवीन
वर श्री.Nile आणि श्री.गवि यानी सुचविल्यानुसार प्रयोग केले आणि गंमत म्हणजे त्यानंतर आता उजवीकडे लाल रंगात 'नवीन' आले पण दुसरीकडे डाव्या हाताचे जुने काळ्या रंगीतील 'नवीन' आपली जागा सोडण्यास तयार नाही. म्हणजे "डबल बेनिफिट स्कीम'च जणू.
असो. आता तक्रार/सूचना करत नाही. अन्यथा मॉडरेटर अदिती माझे सदस्यत्वच गोठवून टाकतील.
अशोक पाटील
धाग्याना श्रेणी द्यायच्या
धाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून!
या मॉड्यूलचं वर्तन पहाता काही सजेशन्सः
१. अजिबात टाकाऊ धाग्यांना अजिबात तारे देऊ नयेत.
२. चांगल्या धाग्यांना मार्क दिल्याप्रमाणे १ तारा = २०%, २ तारे = ४०% ... याप्रमाणे तारे द्यावेत. सगळ्या धाग्यांना तारे द्यावेतच अशी अपेक्षा नाही. धागा खरोखर आवडला तरच तारे दिले असं केल्याचा जास्त फायदा होईल.
धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.
असे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.
श्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय?
गुड क्वेश्चन! सध्यातरी नाही. पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.
असे 'तारांकित' धागेच दिसतील
असे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.
असं करण्यापेक्षा त्या त्या धाग्यासमोर कंसात त्या धाग्याचे तारांकन आणि किती जणांनी तारांकित केलंय ही माहिती दिली तर जास्तं योग्य होईल असे वाटते. ज्यांना तो धागा तारे बघून उघडायचा आहे त्यांना मदत होईल. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे जर फक्तं तारांकित धागेच दिसलेत तर तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.
ठीक!
पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.
ठीक. मी ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना! :-)
आय होप यू आर गेटिंग मी!
अनामिकः तारांकन न झालेले,
अनामिकः
तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.
ज्यांना तारे देण्याची आणि श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्याकडून योग्य मतदान होण्याची अपेक्षाही आहे. 'ऐसीअक्षरे'वर संपादक हा शब्द वापरणं मुद्दामच टाळत आहोत. पण फार काही नाही तरी मॉडरेटर्सचं दोन गोष्टींकडे लक्ष असणं अपेक्षित आहे; एक म्हणजे चांगल्या प्रतिसादांना चुकून किंवा मुद्दाम वाईट श्रेणी मिळत नाहीत ना (असं झाल्यास चांगल्या प्रतिसाद आणि प्रतिसादकांसाठी मुद्दाम मत खर्ची करणे). आणि दुसरं म्हणजे चांगल्या धाग्यांना चांगलं तारांकन मिळेल. फक्त कचरा उचलणं आणि शिस्त लावणं यापलिकडे काही कन्स्ट्रक्टीव्ह काम या (आम्ही) मॉडरेटर्सनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. फक्त मॉडरेटर्सच कशाला, संस्थळाच्या सर्व वापरकर्त्यांकडून ही अपेक्षा आहेच.
प्रियाली:
ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना!
एकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की! दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.
लक्षात घ्या
एकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की! दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.
कृपया लक्षात घ्या. आपली (आपल्या देशातील म्हणा) चांगली जनता ही नेहमीच उदासीन राहिली आहे. परिस्थितीशी जुळवून घेणं जमलं नाही तर वेगळी चूल मांडणे हा पर्याय ते निवडतात पण परिस्थितीशी मुकाबला करणे, गुन्हा होताना दिसत असताना तो थांबवण्याचा प्रयत्न करणे, अगदी मतदानापासूनही अनेकदा सोकॉल्ड चांगला माणूस दूर राहतो. श्रेणी प्रक्रियेचेही असेच होईल असे वाटते.
उलट, ज्या खोडसाळ माणसाला स्वतःला आणि त्याच्या ड्युप्लिकेट आयडीला श्रेणी सुविधा मिळेल तो इतरांचे उच्चश्रेणींचे धागे दोन वेळा/ तीन वेळा खाली उतरवू शकतो आणि हे तर आजही ज्यांचा स्कोरः१ आहे अशा अनेक आयडींबाबत होते आहे. यावरून खोडसाळपणाच अधिक सुरु आहे असे वाटते.
ट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा
ट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा सुप्परझकास विभाग इथे सुरु केल्यास भटकंतीप्रेमींना बहार येईल. म्हणजे नुसते ठिकाणाचे वर्णन असेच नव्हे तर पूर्ण ड्रायव्हिंगचा रुट, आलेल्या अडचणी, रस्त्यावरची अनपेक्षित गावलेली सुंदर ठिकाणे, न चुकवण्यासारखे रोडसाईड ढाबे आणि ईटरीज..
अनुभवाच्या टिप्स, हमखास रस्ता चुकण्याचे धोक्याचे पॉईंट्स आणि ते टाळण्यासाठी लँडमार्क्स.. पेट्रोल पंपांची मुबलकता किंवा अभाव असलेल्या एरियाजचे इशारे..
.... रूट्ससाठी जमल्यास गूगलसाहाय्याने डायरेक्शन्स..
एकाच जागी पोहोचण्यासाठी (उदा मुंबई-गोवा) तीन ते चार वेगवेगळे मार्ग आणि प्रत्येकाचे फायदे तोटे.. (उदा पुणे कोल्हापूर निपाणी मार्गे जास्तीतजास्त फास्ट (कमी वेळात आणि कमी थकव्यात) पण मोनोटोनस आणि कमी निसर्गरम्यता..
कोकणातल्या वाटेने ड्रायव्हिंग प्लेजर खूप, सुंदर निसर्ग सर्वत्र सोबतीला, घाट आणि वळणांची मजा (ज्याला येते त्याला) आणि त्रास (ज्याला वळणं "लागतात" त्याला). शिवाय दमणूक जास्त आणि एका दिवसात गोव्याला पोहोचणं कठीण..
अशा असंख्य गोष्टी ट्रॅव्हलॉगमधे मांडता येतात आणि पुढच्या मुसाफिराला अत्यंत उपयोगी पडतात..
विचार करावा..
मोनोटोनस् ड्रायव्हिंग
+ सहमत
विशेषत: कोल्हापूर-निपाणी-संकेश्वर या मार्गाने गोव्याला जाणे हे किती मोनोटोनस आहे हे त्या मार्गाने नित्यनेमाने जाणार्यांना चांगलेच उमगते. अर्थात आंबोली घाट सुरू झाल्यावर मात्र निसर्गराजा चांगली साथ देतो ते अगदी पोन्जी पोन्जी आवाज कानी येईपर्यंत.
पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.
(येते शनिवार/रविवार/सोमवार सलग तीन दिवस गोव्यात आहे....जमवा तुम्हीही शक्य झाल्यास....'वॉर्फ' ला भेट देणार आहेच.)
अशोक पाटील
पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे
पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.
तरीही दोनातली एक ट्रिप त्यामार्गाने होते कारण आमच्या बापू घोलपचं मटणाचं हॉटेल आहे ना फोंडाघाटाच्या वरच्या खिंडीत.. (दाजीपूर).. कॉलेजच्या दिवसांपासूनची चटक लागलीय त्याच्या हातच्या स्वर्गीय खाण्याची.. त्यापुढे बाकीचं सगळं म्हणजे उगीच कॉम्प्रोमाईज हो.
तस्मात, रस्ता कसाही झाला तरी आम्ही जाणार.. (लास्ट ट्रिप करुन वर्ष झालं, तेव्हाही रस्ता वाईटच होता.. :) )
धाग्यांना तारे देण्याची सोय
धाग्यांना तारे देण्याची सोय करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की त्यातून संस्थळावरचे उत्तमोत्तम धागे लगेच सापडावेत. ही सुविधा सुरू झाल्यापासून काही तासांतच उत्तम म्हणता येऊ नये अशा काही धाग्यांना तारे दिलेले दिसत आहेत. त्यामुळे उत्तम वाचक म्हणून परिचित असणार्या सदस्यांनाच सध्या तारे देण्याची सुविधा आहे. धाग्याला मिळालेलं तारांकन आणि कर्म, कर्म मूल्य यांचा संबंध नाही. संस्थळावर कोणते धागे संस्थळ प्रवर्तकांना उत्तम वाटतात यासाठी तारे देण्याची सुविधा ऑटोमेशन म्हणून वापरण्यात येत आहे.
नगरीनिरंजन यांनी विचारलेला प्रश्नः
धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.
याची लिंक लवकरच उपलब्ध करून देत आहे.
पण हे मत संस्थळावरच्या उत्तम वाचकांचं असेल; व्यक्तिगत मतांसाठी सदस्य 'बुकमार्क'ची सोयही वापरू शकतात. शिवाय आपले बुकमार्क इतरांना दिसतात त्यामुळे सदस्यांना जे उत्तम वाचक वाटत असतील त्या सर्वांचे बुकमार्क्स लॉगिन केल्यावर उपलब्ध आहेतच.
यात काही बदल केल्यास पुन्हा कळवण्यात येईल.
फक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय? हे म्हणजे "माय व्हिउ" सारखा प्रकार आहे, किंवा "फिल्टर बाय लेखक"?
सध्यातरी नाही. पण याचा प्रयत्न करून पहाते; याची चाचणी यशस्वी झाल्यावर सांगते.
आपले मत काय?
दिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का? म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी. जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं :(
अर्थात मला पहील्यांदा काही श्रेणी मिळाल्याने अधिकाधिक "सेन्सिबल" लिहावेसे वाटू लागले आहे. :प
पण जर दिवसाला २५ पेक्षा कमी केल्या तरी चालेलसे वाटते.
जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल
जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं
असं कधीमधी मलाही वाटतं. एखादा प्रतिसाद पाच मार्क मिळवण्याएवढा आवडलेला नसतो, पण थोडा आवडतो. अशा वेळेस इतर कोणी श्रेणी दिलेली असेल तर मी देत नाही. असा विचार सगळ्यांनीच करावा अशी सक्तीही नाही.
२५ श्रेणी देता येतात म्हणून देण्याची सक्ती नाही. वेश्यागमन बेकायदेशीर नाही म्हणून करायलाच हवं असं नाही.
हा धागा वर आलेलाच आहे तरः
१. वाईट प्रकारच्या श्रेणी यादीच्या तळाशी घालवणे
२. कैच्याकै आणि निरर्थक या दोन श्रेणींच्या जागी निरर्थक ही एकच श्रेणी ठेवणे.
३. खवचट अशी एक सकारात्मक (+ve) अर्थाची श्रेणी आणणे.
असे बदल होणार आहेत. अन्य काही सूचना?
शाबास!
जोजोकाकू कोडर, लै भारी. ;-)
आमचा फोटो लावल्या गेलेला आहे. धन्यवाद.