छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २५ : दारे-खिडक्या
खिडकीला गज सातच का अन् सकाळकिरणे
किती असावी त्या गुणिलेले मी सातांनी..
देव बांधुनी जात असावा चिमणीचा अन्
खिश्यात आजोबांच्या खोपा हळू हातांनी...
आरती प्रभूंच्या या ओळी खिडकीचे नेहमीचेच दृश्य एकाएकी विलक्षणरित्या पालटून टाकतात.
किंवा
'आमार आँगिना थेके चोले गेएछे तोमारो मोने
बोशे आछि बातायोने तोमारी आशाय, कि लिखी तोमाय ? '
"माझ्या अंगणातून माझे मन थेट तुझ्या मनात मिसळून जाते आहे.
काय लिहू तुला ? मी इथे वातायनापाशी तुझ्याच ओढीने बसले आहे. "
इथे ते वातायन (खिडकी) तिच्यासाठी केवळ हवा येण्याचे निमित्तसाधन न राहता प्रियकराच्या भेटीचा मार्ग होते.
किंवा ग्रेस यांच्या,
'खिडकीवर धुरकट तेंव्हा कंदील एकटा होता' या ओळी....
दारे - खिडक्या या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. पण नेहमीच्या वापर-उपयोगापलिकडे त्यांचे रूप सोबतीला असलेल्या एखाद्या छोट्याश्या घटकाने (उडालेला रंग, एखादे अंग चोरून बसलेले मांजर, एखादी फुलदाणी, वैशिष्ट्यपूर्ण लाकडी चौकट, झरणारा प्रकाश, झुळझुळणारा पडदा, इ.) वा वेगवेगळ्या घटनांमुळे, संबंधित माणसांमुळे, पालटून जाते. त्या चित्रचौकटीत एक कथानक निर्माण होते. काही वेळा अश्या कुठल्याच घटकाची गरजदेखील भासत नाही. निव्वळ दारे-खिडक्यांचे अस्तित्वच पुरेसे ठरते. तर या वेळच्या पाक्षिक आव्हानात असे काही कथानक पकडण्याचा प्रयत्न करू या.
विषय आहे : दारे-खिडक्या.
-----
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. काही चित्रे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेली असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही. कृपया छायाचित्रे देताना Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट ८ सप्टेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ९ सप्टेंबर रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे (म्हणजे या धाग्याच्या लेखकाचे) असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----
मागचा धागा: विषय 'प्रकाश'. विजेते छायाचित्र "लाइट् अॅट् दि एन्ड ऑफ् द टनेल"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Taxonomy upgrade extras
प्रायव्हसी सेटींग्ज?
तुमच्या पहिल्या फोटोची लिंक ही आहे: http://farm4.staticflickr.com/3816/9599580298_d857663586_b.jpg
पण ही प्रतिमा, बहुदा प्रायव्हसी सेटींग्जमुळे, दिसत नाही. ही अडचण ब्राऊजरची नसावी असं वाटतं. मला कुबुंटूवर तीन ब्राऊजर्समधेही (क्रोम, फायरफॉक्स आणि रिकाँक) ही प्रतिमा दिसत नाहीये.
माझी चित्रे
१. रंगीत काचेची खिडकी (stained glass window)
एका चर्चमध्ये काढलेला फोटो. खिडकीतून चांगला उजेड येत होता व तिच्या बाजूला मला अंधार हवा होता, म्हणून शटरस्पीड जलद ठेवला. (फोटो आडवा का येत आहे, ते कळत नाही. मी ऊंची/रुंदी बदलून बघितले.)
२. ताजमहाल
टिपिकली आपण ताजमहालाचा फोटो समोरून घेतो, ज्यात माणसे छोटी-छोटी दिसतात, पण ताजमहाल किती मोठा आहे, ते पटकन कळत नाही. मला ताजमहालाची भव्यता दाखवायची होती आणि त्याचवेळी नाजूक कोरीवकाम पण टिपायचे होते. तिथे १ पक्षी बसलेला दिसला, त्याला reference पकडून मी ताजमहालाचे दरवाजे, सज्जे, खिडक्या फ्रेममध्ये पकडल्या. पक्ष्याचा reference माझ्या अपेक्षेपेक्षा गंडला. तिथे पक्षी आहे, हे सांगावे लागते :( पण full size फोटोमध्ये नक्षीकाम चांगले आले आहे. (झूम केले तर अजून स्पष्ट दिसेल.
३. आग्र्याच्या किल्ल्याचा दरवाजा
हा फोटो घेताना composition साठी खटपट करावी लागली कारण आडव्या पट्ट्या फ्रेममध्ये अचूक बसवायच्या होत्या. पण मुख्य म्ह्णजे दरवाज्यावरचे नाल अचूक टिपायचे होते. UV filter वापरल्यामुळे जरा निळसर झाक आली आहे. White balance वापरून फोटो अजून पिवळसर करता येऊ शकेल, ज्यामुळे लाकडाचा रंग अजून उजळून दिसेल. पण निळसर झाक ही लोखंडी नालांना जुळून येत आहे, म्हणून काही प्रोसेसिंग केलेले नाही. (यापैकी एकाही फोटोवर पोस्ट-प्रोसेसिंग केले नाही. मी व्यक्तिशः पोस्ट-प्रोसेसिंग शक्यतो करत नाही. मला तेव्हडा वेळ नाही आणि मला ते आवडतही नाही.)
EXIF ची माहिती आत्ता उपलब्ध नाही. नंतर देईन.
फोटोंचा आकार कमी केलेला नाही, त्यामुळे इंटरनेट स्लो असेल तर फोटो दिसायला वेळ लागेल, त्याबद्दल क्षमस्व.
अजून काही फोटो (स्पर्धेसाठी नाहीत)
अजून एक रंगीत काचेची खिडकी. वरच्याइतका चांगला नाही, असे मला वाटते कारण cropping करावे लागेल. शिवाय खिडकीजवळ बांधकाम चालू आहे.
एक सामान्य फोटो (पोस्टकार्डावर असतो तसा)
अजून एक पोस्टकार्ड छापाचा फोटो. आपला मुख्य उद्देश आहे, ताजमहाल दाखवणे, पण इथे खिडकीच मोठी दिसतेय. मूळ विषय सफाईदारपणे isolate करता आला नाही. (शिवाय त्यात आहे उडणारा पक्षी, धूर, दिव्यांचे खांब इ.)
काहि दरवाजे आणि खिडक्या!
Camera Details:
Model - Canon PowerShot G6
Exp: 1/640 seconds Aperture: f/8
२. अजुन एक बंद दरवाजा (लालबाग, बेंगळूरू)
Camera Details:
Model - Canon EOS 5D Mark II
Lens: Canon EF 24-105mm f/4 L IS USM
Exp: 1/200 seconds Aperture: f/4
३. तीन खिडक्या (एक सोडुन दिलेले बांधकाम, उन्हेरे, ता. पाली, जि. रायगड)
Camera Details:
Model - Canon EOS DIGITAL REBEL XSi
Lens: Canon EF-S 10-22mm f/3.5-4.5 USM
Exp: 1/50 seconds Aperture: f/11
दरवाजे, खिडक्या
१. ग्वाल्हेरचा किला: जैन लेणी
२. ग्वाल्हेर चा किल्ला: जैन लेणी
३. महेश्वर येथील एक घरः
--------------------------------------------------------------
आणखी काही फोटो:
फ्रेन (फ्रान्स) या गावातील एका प्राचीन इमारतीतील जर्जर दरवाजा:
पांथेऑन (पॅरिस) मधील दृश्यः
जयविलास प्रासाद, ग्वाल्हेरः
लूव्र संग्रहालय, पॅरिस
अहिल्याबाई होळकर यांचा वाडा, महेश्वर.
सर्व फोटो: CANON S95
निकाल
प्रथम, सर्व सहभागी सदस्यांचे आभार !
यावेळी वेळेअभावी खूप स्पष्टीकरण न देता निकाल जाहीर करीत आहे.
बरीच चित्रे ही दारे-खिडक्या केंद्रस्थानी वा मनात न ठेवता, वेगळ्या उद्देशाने काढलेली होती ते कळत होते. त्यामुळे निकाल देणे यावेळी जरा सोपे गेले.
क्र. ३ - 'चित्रगुप्त' यांचे 'फ्रेन (फ्रान्स) या गावातील एका प्राचीन इमारतीतील जर्जर दरवाजा'.
जरी हे चित्र तुम्हांला स्पर्धेसाठी द्यावेसे वाटले नसले तरी तुमच्या इतर चित्रांपेक्षा, विषयाच्या अपेक्षा अधिक पूर्ण करणारे आहे. या चित्रावर संस्करण करून खुलवता आले असते.
क्र. २ - 'बोका' यांचे 'दार आणि सोपान'
मला चित्रचौकटीतली रचना फार आवडली. वेगवेगळे भौमितीय आकार, जवळपास एकाच रंगाच्या तर्हतर्हेच्या छटा आणि पोत यांचे आपल्या जागी उठून येणे आवडले. या चित्रावर संस्कार निश्चितच आवश्यक होते. त्यानंतर ते फारच उठून आले असते. पुढील वेळी जरा अधिक मनावर घ्यावे, ही विनंती.
(अवांतर - तुम्हीच रिकाम्या पोटी 'उपाशी बोका' नांवाने चित्रे दिली का ? ;))
क्र. १ - 'पांथस्थ' यांचे 'एक बंद दवाजा'.
विषयाच्या अपेक्षा पूर्ण करणारी बंद दरवाजाची दोन चित्रे तुम्ही दिलीत. दोन्ही चपखल. दुसर्यात रंगाचा विरोधाभास फारच छान आला आहे. तरीही, कथानकाच्या दृष्टीने पहिल्यातील दारावरचा गंजकट रंग, नसलेला दिवा, विजेच्या तारा, गंजलेला पाण्याची नळी, वरची कडी-कुलूप, निखळलेली मुख्य कडी, पावसाने उडविलेले रंग, भेगाळ भिंत, इ. सगळे घटक जुळून आले आहेत. एका उत्तम चित्राबद्दल आभार आणि अभिनंदन.
पुढील पाक्षिक आव्हान तुम्ही द्यावे, ही विनंती.
खिडक्यांचीच इमारत ! (स्पर्धेसाठी नाही)
खिडक्या हा विषय असताना 'हवामहल' ला विसरता आले नाही !