छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २६: व्यक्तिचित्रे (पोर्टेट्स)
या वेळेची कथावस्तू (थीम) आहे "व्यक्तिचित्रे (पोर्टेट्स)"
चेहरा आणी चेहर्या मागची व्यक्ति छायाचित्रातुन दाखवणे हे एक कौशल्याचे काम आहे. व्यक्तिच्या मनातील भाव चेहर्यावर व्यक्त होत असतांना छायाचित्र टिपणे हे पण यामागचे गमक आहे. तेव्हा तुमच्या ठेव्यातील व्यक्तिचित्रे बाहेर येउ द्या!
अपेक्षा:
१. एका छायाचित्रात एकच व्यक्ती!
२. इतर फाफट पसारा नको
३. शक्य असल्यास उत्स्पूर्त / candid व्यक्तिचित्र असावे
४. चेहर्यावरचे भाव टिपण्यास प्राधान्य असावे
-----
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय "दारे-खिडक्या", आणि विजेते छायाचित्र "काही दरवाजे आणि खिडक्या"
Taxonomy upgrade extras
मला जी पोर्टेट्स बघितल्यावर
मला जी पोर्टेट्स बघितल्यावर आवडतात त्यांच्यात या गोष्टी दिसतातः
१. वयस्कर, सुरकुतलेले, अनुभवी चेहेरे - अशा चेहेर्यांमधला नैसर्गिक पोत आकर्षक असतो.
१अ. असे चेहेरे नसल्यास चेहेर्यावर प्रकाश/सावली दोन्ही पाहिजेत.
१ब. यांपैकी काही नसल्यास चेहेर्यांवर काही उत्स्फूर्त भाव
२. चेहेर्यावर पुरेसा, शक्यतोवर नैसर्गिक, प्रकाश
३. डोळे शक्यतोवर दिसावेत. (चष्मिष्टांनी अँटीग्लेअर कोटींगचे चष्मे वापरले असल्यास उत्तम)
४. चित्रविचित्र कपडे, रंगभूषा केलेल्या लोकांचे फोटो हमखास रोचक वाटतात.
नमस्कार, छान निरिक्षण
नमस्कार,
छान निरिक्षण आहे!
मी काढलेली काहि पोर्टेट्स उदाहरणादाखल देत आहे (स्पर्धेसाठी अर्थातच नाहि!) -
१. काळाच्या सावलीत (माझी आजी) - इथे चेहेर्यावर मुद्दाम अंधार आहे. मला वाढत्या वयनुसार येणारा एकटेपणा, काळाची जाणवणारी पकड दाखवायची होती.
२. रामनगर (कर्नाटक) येथील एक मुलगी - फोटो सुमार आहे पण या मुलीच्या डोळ्यात (ज्याला जीवनाची उर्मी म्हणता येइल अशी एक) आशादायक चमक दिसते.
३. क्षणभर विसावा - सोलापुरला टिपलेले छायाचित्र. कडक उन्हाळ्यात क्षणभर विसावणारा हा श्रमिक.
पक्षी
पहिला फोटो ब्लू-कॅप्ड रॉकथ्रशच्या मादीचा आहे. नाव आणि फोटोवरून कळेलच की नर आणि मादी दिसायला वेगळे असतात.मादी तशी कमी दिसते कारण रंग उठून न दिसणारे असतात आणि तशी हालचालही कमीच करतात हे पक्षी. हा फोटो काढला तेव्हा मादी त्या जागी जवळजवळ १५ मिनिटे बसली होती आणि कदाचित माझी चाहूल लागली म्हणून उडाली.
दुसरा फोटो आपल्या नेहमी दिसणार्या खंड्याचा, अर्थात व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशरचा आहे.
स्पर्धेसाठी चालणार नाहीत कदाचित म्हणून तांत्रिक तपशील लिहिण्याचा कंटाळा केला होताच. तूर्तास एवढच सांगते की फोटो निकॉन डी ४० एक्स-७०-३०० एमेम लेन्स वापरून काढले आहेत.
ब्ल्यू-कॅप्ड रॉकथ्रश
ब्ल्यू-कॅप्ड रॉकथ्रश मी कर्नाटकात आणि त्याच्या आसपास(बेळगाव, दांडेली ते केरळ पर्यंत) पाहिले आहेत...फोटोत आहे तो बंगलोरचा आहे. तिथे साधारण सप्टेंबर मध्या पासून दिसू लागतात ते मार्च-एप्रिल पर्यंत असतात. मधल्या काळात, विणीच्या हंगामात, उत्तर भारतात हिमालयाकडे जातात अशी माहिती वाचल्याची आठवते.
टीपः 'ब्ल्यू रॉकथ्रश' या नावाचा वेगळा पक्षी आहे ! तो संपूर्ण निळा असतो...आणि मुख्यतः डोंगरांवर खडकाळ (रॉकी) परिसरात दिसतो. तोही दक्षिण भारतात हिवाळ्यात दिसतो. हा पक्षी मी इटलीच्या त्रेमिती द्वीपांवर या वर्षी एप्रिल मध्ये पाहिला.
आभार!
ओह ही टोपीवाल्याची बायडी है! :) मीच नीट वाचले नाही. माय बॅड.
आता विकीवर फोटो बघितल्यावर आठवले की याच्या नराला मी भूतानला पाहिला होता. थाक्सांग मॉनेस्ट्रीवर चढताना मधेच एका फांदीवर बसला होता. तेव्हा नाव माहिती नव्हते, जवळ वजन व साईजने लहान म्हणून सलीम अलींचे "भारतीय पक्षी" घेऊन जातो पण त्यातल्या चित्रांशी न जुळल्याने नाव कळले नव्हते. आज कळले. आभार!(बहुदा परतल्यावर नाव शोधायचे म्हणून फोटो काढला असणार, शोधुन बघतो)
माझी आजी (हे चित्र
कवयित्री सरिता पदकी
पं. विजय घाटे, तबलावादक
पं संतोष मिश्र, आकाशवाणी संगीत संमेलन
वरील तिन्ही फोटॉ कॅनन ५५०डी, ५५-२५० भिंग (आणि फ्लॅश न वापरता) उप्लब्ध प्रकाशात काढले आहेत.
माझी आजी (हे चित्र स्पर्धेकरता नाही)
वरील फोटो कॅनन एसेक्स २०० आयेस वापरून फ्लॅश न वापरता उप्लब्ध प्रकाशात काढला आहे.
दोन
छायाचित्रकार
लाजरा-बुजरा
एक्झिफ:
दोन्हींसाठी कॅनन टी-३ आणि कॅननचंच ५५-३०० मिमी भिंग वापरलं आहे.
१. aperture = 5.6, exposure = 1/4000 s, focal length = 163 mm, ISO 800 (जिंप वापरून कॉण्ट्रास्ट वाढवला आहे.)
२. aperture = 5.6, exposure = 1/640 s, focal length = 250 mm, ISO 200
चिमुकल्या माणसांची भलीमोठी व्यक्तिमत्वे.
१) रुसुबाई हसली! (निकॉन डी ९० - छिद्रमान - ५.६, गती - १/२५० सेकंद)
२)मॅडमको गुस्सा क्यूं आता है? (निकॉन डी ९० - छिद्रमान - ४., गती - १/६० सेकंद)
३) टॉपहॅट अँड हाय टी. (निकॉन डी ९० - छिद्रमान - ४., गती - १/८ सेकंद)
लहान मुलांची प्रकाशचित्रे काढताना त्यांच्याशी बोलत राहावे लागते असे अनुभव आहे. पहिल्या चित्रातल्या रुसुबाईला हसविण्यासाठी एक बाळबोध विनोद करावा लागला होता. दुसऱ्या चित्रातल्या मॅडम जरा उद्योगप्रिय असल्याने त्यांचे लक्ष विचलित केल्याने लगेच भडकल्या. तिसर्या बाईसाहेब अंमळ रोमँटिक आहेत; जुन्या बाजारात दिसलेल्या गोष्टी वापरून पहात असताना त्यांना एका जेन ऑस्टीन चित्रपटाची आठवण करून दिल्यावर चेहेर्यावर अपेक्षित भाव आले.
टीनेजर्सचे मूड
टीनेजर्सचे मूड पकडणारा हा प्रकल्प ह्या धाग्यासंदर्भात रोचक वाटावा.
सोप्पा दिसणारा (पण नसणारा) विषय
sony nex-5n with manual focus Nikon E-Series 100mm, f8, iso 400 1/60
sony nex-5n with 50-250mm auto-focus lens, 209mm f6.2, ISO 1600, 1/80 speed
Sony NEX-5N with manual focus Topcor RE 58mm F4 iso 500 1/160 speed
इतर एक दोन, स्पर्धेसाठी नाहीत.
sony next-5n with Konica Hexanon 85mm f4 iso 400 1/200 speed
स्पर्धेसाठी आलेली बहुतांश
स्पर्धेसाठी आलेली बहुतांश पोर्ट्रेट्स ही आडवा कॅमेरा धरून काढलेली आहेत. चित्रांमध्ये पोर्ट्रेट आणि लॅंडस्केप असे दोन प्रकार काढताना कॅनव्हास अनुक्रमे उभा आणि आडवा धरला जातो. किंबहुना कॉंप्युटरवर प्रिंट करतानाही उभा कागद छापायचा आहे की आडवा हे सांगण्यासाठी हेच शब्द वापरले जातात. असं असताना इतकी चित्रं आडवी का? यामागे काही खास विचार आहेत की कॅमेरा आडवा धरण्याची सवय असल्यामुळे हे झालेलं आहे?
स्पर्धेचा निकाल!
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे -
१. तृतीय क्रमांक : बाजीराव यांचे छायाचित्र #२
२. व्दितिय क्रमांक : वाचक यांचे सुप्रीत देशपांडे
३. प्रथम क्रमांक : रुची यांचे "मॅडमको गुस्सा क्यूं आता है?"
या विषयसाठी माझा सहभाग
या विषयसाठी माझा सहभाग प्रेक्षकाच्या भुमिकेतून ;)
मात्र या विषयाची वाट पाहत होतो हे खरेच.
या निमित्ताने या चित्रणप्रकाराबद्दल, त्यासंबंधीच्या क्लृप्त्यांबद्दल चर्चा झाली तर उत्तमच किंबहुना कराच अशी ऐसीकरांना विनंती