छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : पॅटर्न
आपल्याला आजूबाजूला अनेक पॅटर्न दिसतात, पुन:पुन्हा घडणारी, दिसणारी भौमितिक किंवा इतर कोणतीही घटना. जुन्या देवळांमधल्या शिल्पांमधे दिसणारी नियमितता, किंवा तारांच्या जाळीतली नियमितता, किंवा ऋतूंमधे दिसणारी नियमितता, किंवा वागण्या-बोलण्याचे पॅटर्न्स हा या आव्हानाचा विषय आहे. एकावर एक आलेले, वेगवेगळे पॅटर्न्स (उदा: हा फोटो पहा.) बघायला आवडतील.
याशिवाय विषयाचा काही वेगळा अर्थ लावला तरीही स्वागतच आहे.
------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १९ जानेवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २० जानेवारी रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------
मागचा धागा: सावली, आणि विजेते छायाचित्र.
Taxonomy upgrade extras
हार्मनी इन केऑस
मला उलट आलेल्या चित्रातील हे तिसरे चित्र अधिक रोचक वाटले.
इथे काहितरी समान धागा - संगती आहे हे जाणवतेय पण काय ते सांगता येत नाहिये. पुन्हा पुन्हा बघावे आणि नक्की कुठे बघावे हे ठरवू न देणारे तिसरे चित्र अधिक आवडले.
आकृतीबंध/संगती माहित नाही पण काहितरी 'हार्मनी इन केऑस' धर्तीचं वाटतंय.. अगदीच वेधक! ('मुक्तहस्तचित्रां'त नै का काही चित्र सिमेट्रिक असायची नंतर इंटरमिजिएटला असिमेट्रिक झाली तरी अंगभूत काहितरी असायचंच. किंवा काही छान मुक्तछंदातल्या कवितांतही छुपा ठेका/लय असावा/वी तसं काहीस!)
या वेळच्या पाक्षिक(!) आवाहनात
या वेळच्या पाक्षिक(!) आवाहनात बरीच वेगवेगळी चित्रं आली. आणि बहुतेकशी चित्रं मला आवडली. त्यामुळे पहिलं कोण, दुसरं कोण हे सांगणं कठीण आहे.
या धाग्यात नियमितपणे फोटो न टाकणाऱ्या लोकांनीही पॅटर्न मोडला हे आवडलं.
अतुल ठाकुर यांचे पहिले दोन फोटो आवडले, पण त्याबद्दल अमुकच्या मताशी सहमत आहे. सगळे बदाम एकत्र रचलेले आणि कोपऱ्यात एकच आक्रोड किंवा जर्दाळू असं काहीतरी थोडं लांबून पहाताना त्यात नियमितता, पॅटर्न आणि त्याचा भंग होणं, अशी काहीतरी माझी कल्पना आहे. नितिनच्या चित्रातून होणारा त्रिमितीचा भास, बोका यांच्या चित्रातून एशरच्या चित्रांची आठवण होणं, रटाळ काम वाटणाऱ्या फायलींच्या थप्प्यांमधली नियमितता रोचक आहे. प्राचीन शिल्पकलेत नियमितता दिसते ती ही बघायला आवडली. पण रोजचं, तेच-तेच आणि रटाळ वाटणारं घरकाम-स्वयंपाक पण त्यातून तयार होणाऱ्या खाण्यापिण्यातली नियमितता चित्रांमधून आवडली. लाडू वळणे, केक बनवणे किंवा केतकीने दाखवलेल्या नीट कापलेल्या कलिंगडाएवढी मी कशावरही घेतली नसती, पण फोटो पाहिल्यावर असं काहीतरी करावंसं वाटलं. अमुकच्या दोन कल्पना, 'ओळखीचा' पॅटर्न आणि भंजाळलेला पॅटर्न दोन्ही आवडले; चित्रसुद्धा सफाईदार आहेत. या सगळ्या माझ्या कल्पना; वेगवेगळ्या लोकांची मतं वेगवेगळी असणारच. आव्हानाच्या निमित्ताने प्रतिसादांतून वेगवेगळी मतं नियमिततेने दिसावीत अशी अपेक्षा आहे.
मला सगळ्यात आवडला तो गारेगार गोळा. फोटोत दिसणारा भगभगीत प्रकाश, अशा हवेत हवासा वाटणारा गोळा, या भावनेतली नियमितता, आणि चित्राचा विषय असं सगळंच आवडलं. पुढचा विषय केतकीने द्यावा.
हे नागांव समुद्रकिनार्यावरील
हे नागांव समुद्रकिनार्यावरील छायाचित्र आहे.
लाटांसारखा दिसणारा पॅटर्न हा त्रिमित नाही. म्हणजे वाळूवर उंचसखल लाटा नाहीत. वाळूचा प्रूष्ठभाग पूर्ण सपाट आहे. हे पॅटर्न दोन रंगांच्या वाळूतून भरतीच्या लाटांनी बनले आहेत.
कॅमेरा ऑलिंपस एस झेड १४
नॉन डी एस एल आर असल्याने भिंगे वगैरे काही नाही.
एक्स्पोजर १/२५० सेकंद
आय एस ओ ८०