(त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....)
cereal
सकाळी उठल्यानंतरची वेळ, बाहेरून पक्षी आणि गाड्यांचे आवाज येण्याची वेळ! त्याचप्रमाणे पोटातून आवाज (पोट बिघडलं नसेल तरीही) येण्याची वेळ. सकाळी उठून ब्रेकफास्ट करण्याची वेळ. माझे आई-वडील असल्यापासूनची ही सवय मी स्वतंत्र झाल्यावरही सुरू ठेवलेली! त्यामुळे इच्छा असो वा नसो, आवाजाकडे लक्ष जातंय. इतक्या वर्षांच्या सवयीने आपोआप एकीकडे डोक्यातलं चक्रही सुरू होतं. झोप पूर्ण झाली नाहीये, उठणं भागच आहे, काल कोणालातरी अॉनलाईन चिडवलं होतं, त्यांचं उत्तर आलंय का, इ.
तसंही ही वेळ उपमा, शिरा अन चहापोह्यांची नाही, कारण कसाबसा जागा झालेला मेंदू नवं काही बनवून खाण्याच्या ‘मोड’मध्ये नसतोच!
मग जे त्या फ्रिजवर दिसतंय ते तरी निदान बरं असावं असं वाटतं.
'चिरीओज', 'कॉर्न फ्लेक्स', ह्यानंतर आता परवडत असलेल्या --- ‘हनी बंचेस अॉफ ओट्स’, ‘रेझिन ब्रान विथ हनी’, 'म्युजली' हे तीन सिरीयल त्यातल्या त्यात ‘खाणेबल’ असतात.
अति गोऽड-गोऽड, निव्वळ फायबर ह्या विषयाभोवती जाहिराती गुंफलेल्या, इ. आक्षेप त्यावर घेतले जातात.
तरीही मला वाटतं, ज्या वेगाने घरी खाण्याचं प्रमाण कमी होतंय, रुचिरा, संजीव कपूरांच्या देशात मॅकडोनल्ड्स बोकाळत आहेत त्यावर इलाज म्हणून नाही पण निदान त्यातल्या त्यात पोटाच्या आरोग्याशी इमान राखणारा ब्रेकफास्ट आहे. आजच्या, स्वयंपाक न करणं मिरवणं जाण्याच्या काळात, घरचं खाणं, पोषण, गोडपणा असे गुण म्हणजे नक्की काय हे अशा दुकानात विकल्या जाणाऱ्या खोक्यातून समजलं तर त्यात गैर काय आहे?
आरोग्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक असणारा चोथा, फायबर्स त्यात नक्कीच जास्त प्रमाणात आहे. अन हे जर त्या सिरीयलमधे असेल तर त्यांच्या निव्वळ गोग्गोड चवीवर टीका करण्यात काय अर्थ आहे?
त्याने फार मोठी आरोग्यक्रांती घडणार नाही हे तर खरंच आहे. पण निदान तळकट, रेड-मीटी, फुसफुशीत बर्गर-फ्राईजच्या तुलनेत हे तसे आरोग्यवर्धकच म्हणायचे.
आम्ही एक्जात सगळ्या
आम्ही एक्जात सगळ्या ओर्ग्यानिक सिर्यल्स खातो. आठवड्यातून दोन ते तीन सकाळी फक्त.
- काशी श्रेडेड व्हीट (पोस्ट्च्या सिर्यलपेक्षा दस्पट चांगले आहे - साखर घातली नाहीये - खाण्यासारखे आहे)
- बॉब्स रेड मिल (आप्ल्याला आवडतो बुवा तो चरबट चोथा! आणि तुलनेने खूप च चांगले आहे)
बाकी मग
- ओटमील
- हार्ट हेल्दी
- कॅस्केडियन
हेही अधूनमधून खातो. पोटाला शॉट नाही (म्हणजे आहे).
बाकी कशाबद्दल काही मत नाही
बाकी कशाबद्दल काही मत नाही फारसं. पण 'रेझिन ब्रान विथ हनी’ हे 'त्यातल्या त्यातही खाणेबल' सीरियल असू शकेल, या वाक्याला प्राणपणानं विरोध आहे. पोत (प्र-चं-ड कोरडेपणा आणि न-खाणेबलता), चव (सरळसरळ 'भुसा/ जाड पुठ्ठा'ची ढापलेली), रंगसंगती (लिहावं तेवढं कमी) या सगळ्या आघाड्यांवर कल्पनादारिद्र्य सिद्ध करणारी तद्दन पारंपरिक बेचवपणा सिद्ध करणारं विकृत सीरियल आहे.
बॉक्सवर वेगळी, नवीन कोडी आणि चित्रं उत्तम वापरली आहेत, एवढा एकच बारकुसा मुद्दा त्या सीरियलच्या बाजूनी. बास.
(कोल्ह्याला द्राक्षं) आंबट
तुम्हाला विकृत म्हणायचं आहे का (कोल्ह्याला द्राक्षं) आंबट?
विक्रुत म्हणण्यासारखं काय आहे म्हणे त्या सिरियलीत.
ते रेझिन कित्त्ती स्वीट लाग्तं नै.
आणि ते हनी पण कित्ती कित्ती छान लाग्तं.
आणि ते ब्रानचे एकसमान असलेले, लाटालाटावाले तुकडे...
सारेच कसे अलगद मनतरंग उमलवणारे इष्टुर फाकडे.
व्वा व्वा.
निषेध
उपवासाचे पदार्थ काय-काय असावेत ह्यावर ज्याप्रमाणे प्रांतवार मतभिन्नता आढळते त्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या वायव्येस दक्षिणेचा अंमल (हे ते अंमळ नव्हे) अधिक असलेल्या काही प्रांतांमधे 'दुध' व खरकट्याचा संबंध व्यस्त असल्याचे इतिहासात व काही अंशी वर्तमानात अढळते.
तुम्ही श्रेणी देण्याची उष्टी भुमिका इथल्या काही महान श्रेणीदात्यांकडूनच घेतली असल्याचे आढळल्याने कष्टी होउन 'उष्टे' म्हणजे अन्न-भक्षण करताना डाव्या(न-जेवत्या) हाताचा स्पर्ष अन्नास झाल्यानेदेखील ते उष्टे होते हे मी कदापी सांगणार नाही.
महाराष्ट्राच्या वायव्येस
महाराष्ट्राच्या वायव्येस दक्षिणेचा अंमल (हे ते अंमळ नव्हे) अधिक असलेल्या काही प्रांतांमधे 'दुध' व खरकट्याचा संबंध व्यस्त असल्याचे इतिहासात व काही अंशी वर्तमानात अढळते.
आँ? वायव्य महाराष्ट्रावर दक्षिणेचा अंमल????? हे तर मराठ्यांनी अटक जिंकल्यापैकीच झाले की. त्याचीच ही रीजनल आवृत्ती म्हणावयाची "की क्कॉय??"
तुम्ही श्रेणी देण्याची उष्टी भुमिका इथल्या काही महान श्रेणीदात्यांकडूनच घेतली असल्याचे आढळल्याने कष्टी होउन 'उष्टे' म्हणजे अन्न-भक्षण करताना डाव्या(न-जेवत्या) हाताचा स्पर्ष अन्नास झाल्यानेदेखील ते उष्टे होते हे मी कदापी सांगणार नाही.
श्रेणी देण्याची भूमिका उष्टी नाही. अन कसेही असले तरी त्याने लोकांची तुष्टी होते हे वास्तवच माझ्या मतास पुष्टी देते.
व्याख्या
जुन्या काळातले लोक बाहेरून आणलेल्या 'रेडी टु ईट' पदार्थांना* खरकटे म्हणून संबोधत असत. म्हणजे पाव, बिस्किटे हे खरकटे अन्न.
*भिक्षुकाला भिक्षा घेताना "शिजवलेले अन्न घेऊ नये, कोरडा शिधा घ्यावा" असा दंडक मनुस्मृतीत सांगितला आहे. त्याचा काही संकल्पना-संदर्भ इथे असू शकेल
उष्टे , खरकटे
ताज्या शिजवलेल्या अन्नास उष्टे वा खरकटे म्हणत नसावेत. एकदा थोडा भाग खाऊन झाला कि या संकल्पना अस्तित्त्वात येतात.
उष्टे - ज्या पात्रात/ताटात हात, चमचा घालून खाल्ले तिथे उरलेले अन्न.
खरकटे - इतर उरलेले अन्न.
उष्टे आणि खरकटे फक्त काढायचे/खायचे असतात. शिजवायचे, खरीदायचे, इ इ नसतात.
बाकी यांना इंग्रजी शब्द काय असावेत?
ताज्या शिजवलेल्या अन्नास
ताज्या शिजवलेल्या अन्नास उष्टे वा खरकटे म्हणत नसावेत.
म्हणतात तर. वर अनेकांनी म्हटलं आहे, त्याप्रमाणे दूध घालून शिजवलेलं / धान्य भाजून शिजवलेलं ते निर्लेप (खरकटं नाही). पानात उरलेलं अन्नही खरकटंच. शिवाय जेवल्यावर न धुतलेला हात वा तोंडही खरकटंच.
उष्टे - ज्या पात्रात/ताटात हात, चमचा घालून खाल्ले तिथे उरलेले अन्न.
शिवाय जो हात, चमचा, तोंड खाण्याकरता वापरलं, तेही उष्टंच.
फार कशाला...
...बैलांतसुद्धा हुच्च/नीचभ्रू प्रकार असतातच की. ('प्राइम', 'चॉइस' वगैरे...)
मस्त.
त्यातल्या त्यात वाचणेबल आणि खुसखुशीत.
याने फार मोठी साहित्यक्रांती घडणार नाही हे तर खरंच आहे. पण निदान जळकट, भिक्कार*टी, विसविशीत कविता-लेख-चर्चांच्या तुलनेत हे तसे मनोरंजनर्धकच म्हणायचे.