छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३० : गंध
गंध, आपल्या मूलभूत संवेदनांपैकी एक महत्त्वाची संवेदना. ही अमूर्त संवेदनासुद्धा एखादं छायाचित्र पाहून कधी कधी आपल्या नाकाला जाणवते. फुलं, गवत, माती, स्वयंपाकघर असे काही विषय यात येऊ शकतील. उदा. हा फोटो
------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १२ फेब्रुवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १३ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------
मागचा धागा: पॅटर्न, आणि आवडलेली छायाचित्रे.
Taxonomy upgrade extras
एक कल्पना आहे पण
@केतकी - 'लोकानी पहावेत असं' छायाचित्र काढायची एक कल्पना आहे पण त्यासाठी 'मॉडेल' नाहिये आत्ता माझ्याकडे!
"............आई-बाबाच्या चेहेर्याचा समोरून शॉट, बाळाचे पाय हाताने उंचावलेले धरलेत त्यातली फक्त पावलं दिसतायत त्यावरनं काय कार्यक्रम चाललाय ते समजतं, आई-बाबाचे फक्त डोळे दिसतायत, आणि उंचावलेल्या भुवया, कपाळावरच्या आठ्या यावरून 'गंधाची' चटकन कल्पना यावी!!............." च्यायला मला हे चित्र दिसतंय....बाहुली वापरून छायाचित्र जमलं तर बघतो :-)
@ऋषिकेश - 'रंग-रूप' वरनं आठवलं. फार वर्षांपूर्वी, भाची अगदि लहान होती नी पोट बिघडलं होतं पहिल्यांदाच. मीहि ताईबरोबर डॉक्टरांकडे गेलो होतो. "नव्या आईच्या उत्साहाने" ताईने 'कसं पोट बिघडलंय' याचं संपूर्ण वर्णन केलंन. डॉक्टर म्हणाले "बरं, आता रंग, रूप, वास सगळं सांगितलंस तू मला, चव राहिली फक्त" :-)))))))))
बहुदा आपले "ते विषय" वेगवेगळे
बहुदा आपले "ते विषय" वेगवेगळे आहेत.
मी पाय वर उचलून चाललेल्या कार्य्क्रमाशी साधर्म्य राखणारे विषय नव्हतो म्हणत. ज्या कारणाने बेडरूममध्य जाताना नव-नवरा/नवरी पर्फ्युम्स शिंपडतात वा सुवासिक साबणाने आंघोळ करतात ते मी म्हणत होतो. पार्टनरच्या रंग रुपापेक्षा गंध अधिक धुंद करतो असे शास्त्र म्हणते ;)
एक निरीक्षण (अवांतर)
(बहुतेक) मत्स्यगंधेला "योजनगंधा" असं पण एक नाव आहे कारण तिच्या शरीराचा मादक वास म्हणे एक योजन अंतरावरून येत असे!
एक निरीक्षण: (सवय नसेल तर) मत्स्याचा गंध हा एका योजनावरूनच (मादक वगैरे नाही कदाचित, पण) सह्य होऊ शकतो.१
==============================================================================================================================
१ "कारण शेवटी आम्ही..." - पु.ल.
धागा वाचून माझ्या डोक्यात काय
धागा वाचून माझ्या डोक्यात काय विषय आले ते लिहीते. इतर कोणी तसे फोटो काढले तरी काही अडचण नाही. एकाच विषयावरचे बरेच फोटो बघायलाही आवडेल.
कोरड्या मातीवर पडलेले पाण्याचे थेंब, नुकतं कापलेलं गवत, रस्त्यावर पसरलेला पाचोळा (याचा काय गंध येणार असा प्रश्न असेल तर बंगळुरूच्या रामन रस्त्यावर, रामन संस्था आणि IISc चं मुख्य दार यांना जोडणारा रस्ता, जाऊन या.), चकचकीत मॉल्स, विमानतळांवरचे ट्रान्झिटचे भाग जिथे बरंच ड्यूटी फ्री शॉपिंग करता येतं, अर्थातच परफ्यूम्सची दुकानं, पण (फक्त) चॉकोलेटची दुकानं, बेकऱ्या, दुकानातला चहा-कॉफीचा भाग किंवा फक्त कॉफीचं दुकान, सध्या नारायणगाव आणि त्या वाईन बेल्टमधे जाणार असलात तर तिथेही द्राक्षांचा मादक वास येईल, चहाची टपरी, कोपऱ्यावरचे वडे-भजीवाले, मासेवाल्या ....
आणि एवढं करून मला आत्ता न आठवणारी बरीच ठिकाणं अनेकांना सुचतील.
ट्रान्झिटवरनं
ट्रान्झिस्टर रेडीओ आणि Sonyचा रेकॉर्डर आठवला जुना - आडवा, वरच्या भागात स्पीकर आणि खाली बटणं असलेला. त्या रेकॉर्डर ला, मुख्यत्वे बटणाना एक विशिष्ट वास असायचा. कसल्या प्लास्टिकचा करायचे तो देव जाणे. पण अगदि टिप्पिक्कल वास असायचा तो. 'प्ले'चं बटण सर्वात डावीकडे, लाम्बडं...आणि त्यात मधे छोटा लाल भाग - रेकॉर्ड करायला त्या लाला भागासकट दाबायचं बटंण...
हल्लीच्या फोनला, कॅलक्युलेटरला, कुठल्याचा उपकरणाला असा प्लॅस्टिकी वास नसतो. नको तिथे सुधारणा......
...
धागा वाचण्याआधीच, केवळ शीर्षक वाचून आमच्या टाळक्यात ती अय्यर१-अय्यंगार२ मंडळींची भलीमोठी, आडवी-उभी गंधे चमकून (आणि आमच्या डोळ्यांसमोरून तरळून३) गेली, इतकेच.
=====================================================================================================
१, २ "कारण शेवटी आम्ही(ही) भटेंच! त्याला काय करणार?" (प्रेरणा: पु.ल.)
३ यावरून आठवले: मनोबांच्या डोळ्यांना 'मनश्चक्षू' (शुद्धलेखनाची... चूभूद्याघ्या.) असे संबोधणे सयुक्तिक ठरावे काय?
आज माझा "यावरनं ते आठवलं"
आज माझा "यावरनं ते आठवलं" दिवस आहे. तुझ्या मनश्चक्षू वरनं. पु.लं.चा लेख आठवला - 'सैलबाला' वाला. त्यात त्यांचा मित्र 'एका मिनिटात चष्म्याला तीन शब्द देउन गेला'. त्यातलं फक्त कृष्णोपनेत्र आठवतं. दुसरी दोन कुठले? उपनयनत्राण असा काहिसा होता त्यातला एक?
संपादक, या अवांतराबद्दल माफ करा. पण दातात सुपारी अडकल्यागत झालंय हो!
'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर
'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे.
मी विषय दिला तेव्हा फुलं,
मी विषय दिला तेव्हा फुलं, खाद्यपदार्थ, माती, परफ्युम्स या सर्व प्रकरांमधील छायाचित्र भरपूर येतील असं वाटलं होतं. मला लगेचच आठवणार्या गंधांमधे या सर्वांशिवाय एस. टी. स्टॅंडवरचा आणि लहानपणी खूपदा केलेल्या नगर-नाशिक प्रवासातला साखर कारखान्याचा भयानक वास आहे!
स्पर्धेला आलेल्या फोटोंमधे, म्हणजेच घनु, अतुल ठाकूर, द्रुष्टद्युम्न आणि अदिती यांमधील घनुचा गार्लिक ब्रेडचा, अदितीने टाकलेल्यांपैकी कॉफी आणि फिशिंगचा, हे आवडले. अमुक यांनी सुचवलेल्या गंधकोषाची संकल्पना मस्तंय. अतुल ठाकूर यांनी जास्वंदीच्या फुलाचा त्या अनुषंगाने काढलेला फोटो तांत्रिकदृष्ट्या सर्वांत जास्त आवडला. अतुल यांनी नवीन विषय द्यावा.
अमुक आणि सर्वसाक्षी, फक्त कुतुहलापोटी विचारतेय, इतके छान फोटो स्पर्धेसाठी का नाहीयेत?
(हुश्श!! पुढचा विषय सोप्पा द्या बुवा! ;) )
कुमार सानु आठवला . पण सलग कसं
कुमार सानु आठवला ;-). पण सलग कसं काय जिँकलात? स्वतःच स्वतःला विजेता घोषीत केल की काय :-D ह घ्या.
मी काय म्हणते, विजेत्यांनी स्पर्धेत भाग घेतला नाही तर बाकीच्यांच्या चित्रणात सुधारणा कशी होणार? त्यामुळे २०१३मधे झाल्या तेवढ्या सुधारणा पुरे तुमच्यासाठी. आता या परत स्पर्धेत ही विनंती. वाटल्यास सलग एकालाच पैला नंबर देऊ नये असा नियम अॅड करता येईल.
फोटो स्पर्धेसाठी का नाही...
इतके छान फोटो स्पर्धेसाठी का नाहीयेत?
............तुम्ही दिलेला विषय उत्तम होता. हवे तसे, तितके प्रतिसाद आले नाहीत हे दुर्दैव.
मी दिलेले चित्र फारच थेट होते. त्यात चित्रणाची मजा फारशी नव्हती. त्याहून बर्याच बर्या आणि आव्हानात्मक अश्या इतर काही कल्पना सुचल्या होत्या. मात्र कॅमेरा सध्या बिघडलेला असल्याने प्रत्यक्षात उतरवू शकलो नाही. क्षमस्व.
जाउद्या!
काही विषय म्हंटलंय, हेच नव्हे. त्यामुळे घरातले अजुन पण 'काही' विषय डोक्यात आले - पण मला त्या विषयावरची छायाचित्र पहायला आवडणार नाही त्यामुळे जाउद्या! खरं सांगायचं तर च्यायला सगळं सोडून तोच विषय का पटकन डोक्यात यावा, अगदि कितीहि गंधित असला तरी, या विचाराने यातना झाल्या मनाला त्यामुळे जाउद्याच!! आणि "मीच का त्रास करून घेतोय, तांत्रिकददृष्ट्या संयुक्तिक आहे ना मग झालं" असंहि वाटलं पण लेखिकेने उदाहरणादाखल इतका प्राजक्ताच्या रसरशीत फुलांचा छान फोटो टाकल्याव वात्रटपणा पण करवत नाहिये त्यामुळे जा उं दे च मु ळी !!!