.
.
शू:
तू का आलास बाहेर? तुला सांगितलं होतं ना इतक्यात बाहेर यायचं नाहीस म्हणून. तू आमचा 'स्ट्रॅटेजिक रिजर्व' आहेस. किती कौशल्याने तुझं नाव वगळलं होतं यादीतून, एकदा तर 'सध्या तू कुरुक्षेत्रावर ब्यान आहेस' असं सांगून दिशाभूल केली अदितीची. तर तू म्हणजे ना... बाबाला भॉ: करायला लपून बसलेल्या पोरासारखा बापाचं पाउल घरात पडत नाही तर लगेच बाहेर. हॅ:
जसवंती
तुम्हाला असं वाटलंच कसं कि नगरीनिरंजन हे आपल्याच बाजूच्या माणसाची हसून हसून पुरेवाट होईल अशी स्थिती करतील?
तुम्ही नि अदिती महाभारत वैगेरेच्या गोष्टी करता. मी ते शुद्ध काव्य मानतो. मग आम्ही दाखले देतो ते अलिकडच्या काळातले - दुसर्या महायुद्धातले. म्हणजे मन, बॅटमॅन, नगरीनिरंजन, अरुणजोशी, (अनुप ढेरे, सुशेगाद, वाघमारे, ग्रेटथिंकर,) इ लोक हे Axis Powers चे सदस्य आहेत असे म्हणतो. अक्षसत्ता यासाठी कि ऐसीवर आम्ही चौघे प्रचंड मायनॉरिटीत आहोत. इथल्या दोस्त सत्ता नेहमी इतका हंगामा करतात कि आमचा विजयही लोकांना दिसत नाही. या धाग्यात गटबाजीच्या उपमा महाभारत काळात न्यायच्या आहेत्. तेव्हा नगरीनिरंजननी आमच्या गटाला कौरव म्हटले आहे. पण आम्ही जाणून आहोत कि ऐसी अनरियालिस्टीकली पुरोगामी आहे. ऐसीवरचे कौरव म्हणजे समाजातले पांडव आणि ऐसीवरचा जयद्रथ म्हणजे खराखुरा अर्जून !!!
आणि पलटवार वैगेरे काय? पलटवार म्हणजे अगोदरचा झपका झेलला आहे याची कबूली!!! ती मिळेल का माझ्याकडून? आमची सगळी चमू तुमच्या बाजूने हवी का नको ते बोला. घासकडवी राजनाथी राग आळवत आहेत आणि तुम्ही केव्हाचे जसवंती राग लावून बसला आहात.
भारत?
इथले बरेचसे सदस्य शरिराने, मनाने (आठवा मधुबाला vs ज्युलिया रॉबर्ट्स), आणखि कशाकशाने परदेशात असल्याने ऐसियड, ऐसिडि असे काहितरि असायला हवे बॉ.
अवांतर> अरे असे धागे तर संस्थळप्रवर्तकांनि सदस्यांचि मरगळ घालवण्याकरता काढायचे असतात ना. (निगेटिव श्रेणि देणार्यांनि जरा हलके घ्या बाबांनो)
आमचे देव गुरुजी सांगायचे की
आमचे देव गुरुजी सांगायचे की महाभारतात दिवसा युद्ध होत असत. पण सूर्यास्तानंतर युद्ध थांबे. रात्री दोन्ही बाजूचे लोक एकत्र येउन 'श्रमपरिहार' करित असत. त्यावेळी युद्धाचा विषय न बोलता अन्य विषयावर गप्पा मारीत असत. असो. एक वे'गळी बाजू मांडायचा प्रयत्न करणे हा आमचा छंद आहे. त्यानिमित्त काही हिशोब चुकते होतात.
=))
=)) च्यायला हे एक नंबर हालकट आहे बघा. बरोब्बर नको ते विषय काढतंय. सध्या अशी स्थिती आहे की राजकारण्यांची अंगवस्त्रे लोकांना ठाऊक असतात, बायकाच कोणत्या ते ठाऊक नसते म्हणे. काळ मोठा वाईट आलाय बघा. असो. आमच्या प्रतिज्ञापत्रात काय ते लिहिले जाईल, तिथे तो कॉलम मोकळा सोडल्यास वस्त्रे नसल्याने आम्ही तसेच (च्यायला ही अवस्थाही अश्लीलच होते, भलतीच आफत आहे) आहोत असे समजायला हरकत नाही.
हा सगळा रमताराम यांचा डाव
हा सगळा रमताराम यांचा डाव आहे. माझं आणि रमताराम यांचं अधूनमधून, पडद्याआड बोलणं होत असलं तरीही रमताराम आणि आमच्यातले मतभेद संपुष्टात येऊ शकत नाही. रमताराम हे वृद्ध आचारांचे आणि डाव्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते आहेत. आम्ही नेहेमीप्रमाणेच आमच्या तरुण विचार आणि धडक कृतींची कास धरणाऱ्या आहोत. आमचं आणि म.म. रमताराम यांचे जमणे सर्वथैव अशक्य आहे. हा त्यांनी मतदारांना गोंधळात टाकायला केलेला फार्स आहे. त्याकडे मतदारांनी लक्ष देऊ नये.
लक्ष दिलंच तर अनुप ढेरे आपल्या पार्टीत.
पक्ष
मला त्यांच्या पक्षात घ्यायला, राजेशजी above the table च काय, under the table डील करायला पण तयार आहेत. तेव्हा त्यांना दुखवून तुमच्या पक्षात दाखल होण्यापूर्वी किमान winnability पाहिली पाहिजे. आणि कलियुगात युद्ध जिंकायचं म्हणजे नितीमूल्यांना तरोड मरोड करायला येणं आवश्यक!
खालिल पैकी कोणताही एक प्रश्न सोडवून दाखवा - (मुद्दा असा मांडा कि बव्हंश ऐसीकरांना खरोखरच पटेल.)
१. समलैंगिकता सर्वांसाठी अनिष्ट आहे.
२. स्त्री हे केवळ पुरुषांच्या भोगाचे साधन आहे. त्यापलिकडे तिला अस्तित्व नाही.
३. झाडून सगळे एन आर आय महामूर्ख असतात.
४. विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे.
५. ब्रह्मचर्य हेच जीवन.
६. गेल्या (२०व्या) शतकात जगाची लोकसंख्या तिप्पट कमी झाली आहे.
७. गणपती हेच, जग निर्मिणार्या/ उत्क्रांतीची चावी भरणार्या ईश्वराचे स्वरुप आहे.
ऐसीकरांना या पैकी कोणत्याही एका विषयावर रिजनेबली पटवू शकाल तर मी लगेच तुमच्या पक्षात.
अहो विश्वाच/ब्रह्मांडाच
अहो विश्वाच/ब्रह्मांडाच केँद्रस्थान पुणे-३० होत, आहे आणि सदैव राहील.
हे अर्धसत्य आहे.
त्या ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानाचे फायनान्सिंग आमच्या ऑस्टिन मधून होते. ते सुद्धा इक्विटी फायनान्सिंग. ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानाचे सीईओ आम्ही इथून ठरवतो.
ज्याप्रमाणे सैन्य पोटावर चालते त्याप्रमाणे सर्व केंद्रस्थाने फायनान्सिंग वर चालतात. फायनान्सिंग इल्ले .... केंद्र्स्थान इल्ले.
(ब्रह्मांडाचे विकेंद्रीकरण करू पाहणारा) गब्बर
अ ... हं.केंद्रीकरण हे
अ ... हं.
केंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे. Central planning is the defining building block of socialism. e.g. Planning commission.
विकेंद्रीकरण ही नेसेसरी कंडीशन आहे व "कल्याणकारी राज्याचे समूळ उच्चाटन" ही सफिशियंट कंडीशन आहे. - आता Condition for what ? हा प्रश्न पडू नये.
(संदर्भ - द फेटल कन्सिट ___ एफ ए हायेक; द रोड टू सर्फडम ___ एफ ए हायेक.)
एकदा काय ते नक्की ठरव
केंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे.>> एकदा काय ते नक्की ठरव. निदान अध्यक्षीय लोकशाही असलेल्या देशात केंद्रीकरण नाही हे बोलू नकोस. अगदी आपले सहाय्यक मंत्री (तिथे त्यांना 'सेक्रेटरी' म्हणून त्यांचे दुय्यम स्थान अधिकच अधोरेखित केले जाते.) देखील तोच निवडतो म्हणे. इतके टोकाचे केंद्रीकरण दुसरे माझ्या पाहण्यात नाही. का मग तिथे समाजवाद आहे म्हणायचे? आणि मुळात सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्राम-स्वराज्य या समाजवाद्यांनी राबवलेल्या संकल्पना आहेत एवढं मात्र नक्की.
तसं नाही
तपशील फार होतील ररा.
पण माझ्या माहिती/समजाप्रमाणे बोलतो.
भारत नावाची संकल्पना व अमेरिका नावाची संकल्पना ह्यात मूलभूत फरक आहे.
क्र १ बद्दल बोलू शकतो.
अमेरिकेची स्वतःची स्वतःबद्दलची धारणा व भारताची स्वतःबद्दलची तात्विक भूमिका किमान शब्दांत मांडायची तर :-
USA is destructible union of indestructible states.
India is indestructible union of destructible states
असं काहीतरी म्हणता यावं.
नाही म्हणायला अमेरिकेत चार्-दोन राज्य नव्यानं निर्माण झालीत, पण एकूणात त्यांची भूमिका
"आम्ही एकत्रित आलेले काही देश आहोत" ह्या छापाची आहे. एक देश दुसर्याच्या अंतर्गत बाबींत नाक खुपसत नाही!
भारतात राज्ये ही एकत्रित केंद्राच्या तुलनेत वध्य्/विभाजनीय मानली आहेत.
भारतात राज्यांचे तुकडे होणं, दोन तुकडे जोडणं हे प्राशासनिक सोयींचे कारण देउन करता येते.
अमेरिकेत मात्र एक राज्य हे एक स्वतंत्र युनिट असल्यासारखे आहे तात्विकदृष्ट्या.
नेमक्या शब्दांत सांगता येणे कठीण आहे.
अमेरिका ही काहिशी confederate ह्या संकल्पनेच्या जवळ जाते.
तात्विकदृष्ट्या अमेरिकेचा एकत्रित कारभार आवडला नाही म्हणून राज्ये त्यातून बाहेर पडू शकतात.
(अमक्या देशाने तमक्या संघटनेचा राजीनामा दिला, तसे काहिसे. किंवा युरोझोन वा युरोपिअन युनिअन मधून ग्रीस नावाचा देश बाहेर पडणे; अशी एखादी बातमी येउ शकते तसे काहिसे.
युरोपिअन युनिअन व USA ह्या संकल्पना बर्याच जवळ जातात एकमेकांच्या .
पण युरोपिअन युनिअनचे fiscal union, monetory union पूर्णपणे होणे, जितके झाले आहे ते consolidate होणे हे बाकी आहे. ते झाल्यास USA व EU ह्या संकल्पना फारच जवळ जातील.
फरक इतकाच रहिल की EUचे एकच एक केंद्र सरकार व एकच कॉमन लश्कर नाही.
)
, पण चीन काय, भारत काय हे केंद्र मजबूत व राज्ये तात्कालिक ह्या भूमिकेवर चालतात.
असो.
हे नेमक्या भाषेत सांगता येणे मला अशक्य आहे.
अमेरिका , पश्चिम युरोप इथे mayor ह्या शब्दांस वेगळेच महत्व आहे.
आपल्या "महापौर" पेक्षा बरेच अधिक अधिकार व मान महानगरांच्या mayor ह्यास असतात असे ऐकून आहे.
बर्याच बाबतीत mayorचे अवलंबित्व हे प्रेसिडेंट्,प्राइम मिनिस्टर ह्यांच्यावर फार कमी असते.
अर्थात हा सारा तर्क व ऐकिव माहिती आहे.
लिखित असा एक स्रोत मजकडे नाही.
बादवे, लढाईत तुमच्या साइडला असलो, तरी जे आठवले ते भस्कन लिहीले. (विकर्ण syndrome!)
पुढील मुद्दा समोर आला की गब्बरला गुद्दा घालायला सर्वात पुढे मीच असेन.
ह्यॅ:
मनोबा तुला अगदीच काही कळत नाही बघ. मी वर म्हटलंय ना गब्बर नि माझ्या भांडणांना मोठा इतिहास आहे म्हणून. तेव्हा तो चेंडू गब्बरसाठी होता. तू बॅटिंगला असशील तेव्हा तुला गुगली ऐववी 'दूसरा' टाकेन. फलंदाज कोण त्याप्रमाणे गोलंदाजी करायची की नाही. मधे नॉनस्ट्रायकरने येऊन चेंडू मारलेला चालेल का? म्हणजे डावरा गांगुली ... नको गब्बर इथे स्ट्रायकर आहे ना मग डावरा नको... उजवा सचिन स्ट्राईक घेतोय म्हणून लेगस्पिन टाकावा तर नॉनस्ट्रायकर असलेल्या डावर्या गांगुलीन धावत मधे येऊन तो ऑफस्पिन असल्याने मिडविकेटला खेचून षटकार मारावा हा अन्याय आहे. तिकडे फील्डर लावलेला नाही की नै सचिनसाठी?
केंद्रीकरण हे समाजवादी खूळ
केंद्रीकरण हे समाजवादी खूळ आहे.>> एकदा काय ते नक्की ठरव. निदान अध्यक्षीय लोकशाही असलेल्या देशात केंद्रीकरण नाही हे बोलू नकोस.
अमेरिकेत केंद्रीकरण आहेच. प्रश्नच नाही.
फेडरल रिझर्व्ह (US counterpart of Reserve bank of India) हे केंद्रीकरणाचेच उदाहरण आहे. The value of the most widely used asset in the economy is decided by a bunch of bureaucrats sitting in Washington DC.
तसेच अध्यक्षीय लोकशाही सुद्धा खूप प्रमाणावर केंद्रीकरणच आहे.
संसदीय लोकशाही ही श्रेष्ठ आहे ती त्यामुळेच.
तुझा पुढचा प्रश्न हा असणार आहे - की - Don't multinational corporations do a lot of planning ? Central planning ?
प्रांतिक अस्मि तांचा अपमान
पुणे -३०? हा आमच्या प्रांतिक अस्मितांचा सरासर अपमान आहे. विश्वाच्या केंद्रस्थानी असलाच तर उदगीरचा चौबारा असेल. तुम्ही पुणे-मुंबैकर आमच्या मराठवाड्याला खूप कमी लेखता ब्वा!
मी मनोबांना review करायला एक कथा दिली. त्यांनी त्यात एकच सुधारणा सांगीतली. त्यात "मराठ्यांचे कुटुंब" असा उल्लेख आला होता. म्हणे कि त्याने 'मराठे आडनावाच्या ब्राह्मणांचे कुटुंब' कि ' मराठा जातीच्या लोकांचे कुटुंब' हे कळत नाही. मी विचारलं कोणाला कळत नाही? तर म्हणे पुण्याकडच्या लोकांना!! (मनोबाचा सद्दुदेश होता यात शंका नाही.) पण तुम्ही जर अख्ख्या मराठवाड्याचा सर्वे कराल तर लोक म्हणतील "मराठ्यांचे कुटुंब" म्हटल्यावर त्यात ब्राह्मणांचा काय संबंध?
तुम्ही लोक आजपावेतोच्या दलित पिडित दुर्लक्षितांची इतकी काळजी करणारे असाल तर सगळी केंद्रे पश्चिम महाराष्ट्रातून शिफ्ट करा ना राव!
द्युत
ऐसीचे लाडके कुक्कुले बाळ - अतिरेकी पुरोगामित्व - द्युतावर लावावे. व्यासांची प्रतिभा थकेल, गणपतीची लेखणी थकेल, ...., ऐसीकरांच्या लॅपटॉप्सचे स्फोट होतील, पण ऐसीभारत थांबणार नाही. ऐसीकर परंपरावादाचे, सनातनवादाचे, प्रतिगामित्वाचे, स्थिरतेचे शुद्ध अभिनयात्मक नाटक केल्यानेच अपवित्र होतील.
ऐसीभारतातील वस्त्रहरण
द्रौपदी - ऐसीचे (तथाकथित) पुरोगामित्व
दु:शासन - अरुणजोशी
कृष्ण - (कळफलक बडवणारी) मेघना
भीम - (चडफडणारी) अदिती
दुर्योधन - (सूत्रधार) नगरीनिरंजन
कर्ण - मनोबा
विदुर - (तात्विक पाठिंबा देणारे) थत्ते
धॄतराष्ट्र - (उंडारलेली मुले नियंत्रित करू न शकणारे) ऋषिकेश
गांधारी - शहराजाद
आणि
घासकडवी - (हतबल) भीष्म
वैधानिक इशारा - त्या
वैधानिक इशारा - त्या द्रौपदीचे वस्त्रहरण थांबवा ... नाहीतर परंपरावादाचे वस्त्रहरण सुरु करण्यात येईल.
हा हा हा.
आमची स्फूर्तीस्थाने -
1) Why I am not a conservative ___ F A Hayek
2) Why I, too, am not a conservative, (Normative vision of classical liberalism) ___ James Buchanan
आत्तापर्यंत किमान सात तिसऱ्या
आत्तापर्यंत किमान सात तिसऱ्या आघाड्या झालेल्या दिसताहेत.
हरकत नाही. आमची आठवी तिसरी आघाडी. भगवान श्रीकृष्णही आठवेच होते. विजय आमचाच होणार. इश्वराचीच ही योजना असावी बहुधा.
अरे लोकहो, कोणतरी लीडर ठरवा आणि तयार करा की आघाडी.
लिडर कशाला ठरवायला हवा, आम्ही असताना? लिडर ठरवा म्हणायची हिंमत होतेच कशी, म्हणतो मी! तिसरी आघाडी आमच्याच नेतृत्वाखाली काम करणार! आम्ही नेतृत्व करावे, ही लोकांचीच इच्छा आहे. लोकांच्या इच्छेला मान देऊन आघाडीचे नेतृत्व करणे आम्हाला आता भागच आहे. चला आम्च्या विजयाच्या घोषणा द्यायला सुरुवात करा.
आप कतार मे हय
तेजा, तेरा नंबर आनेका चान्स कम हय.
एक मनोविश्लेषण > घाबरुन काढुन टाकले भौ. जिज्ञासुंनि व्यनि केल्यास मिळेल. धैर्य धरुन परत टाकले आहे. पांधर्या ठशात आहे. सिलेक्ट करुन वाचायचा अजिबात आग्रह नाहि.
*इथे सदस्यांविषयि मौजमजेत चर्चा सुरु असल्याने या विश्लेषणाला हरकत नसावि. दुसर्या एका संकेतस्थळावर माझे संस्थान व्यवस्थित सुरु होते. मि एक उत्स्फुर्तपणे सुचलेले (माझ्यादृष्टिने) सुंदर ललित या संकेतस्थळावर सादर केले. तिचे इथल्या इंटुकांनि काहि कौतुक केले नाहि. मग मला राग आला. त्याचवेळि इथल्या एका एस्टेब्लिश्ड इंटुकाच्या ललिताचे फार कौतुक झाले. मग मला आणखि राग आला. माझे अनेक शिष्य इथे आहेत. माझ्या संस्थानातुन पोटेन्शियलि मि अनेक लोक आणु शकतो. मग इथल्या ट्रॅकर हलता रहावा यात इंट्रेस्ट असणार्या लोकांनि माझि समजुत घातलि. मि परतलो आहे. मि माझे भाटपोटेन्शियल सिद्ध करत आहे.
सॉरी हं
म्हणजे भांडणाचं ऐलान करून आम्ही काही दूरच्या गिरीजनांना - पक्षी: अन्य संस्थळावरचे सदस्य - आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी वाटाघाटी करायला निघून गेलो तेव्हा जरा दोन दिवस आघाडीवर शांतताच होती. दरम्यान इथे सात आघाड्या झालेल्या दिसताहेत. याविरुद्ध अंपायर ऊर्फ मेघनाकडे आम्ही रीतसर तक्रार नोंद्वली आहे. हे राजकारण नव्हे, भांडण आहे तेव्हा इथे त्या वृंदावनातल्या होळीप्रमाणे दोनच पार्टी आहेत, एक बाप्यांची नि एक बायांची. बाप्यांनी पार्टी पारंपारिक मार खाणारी पार्टी आहे, आणि हा इतिहास आम्ही बदलू पहात आहोत. तेव्हा फक्त दोनच पार्ट्या, बाकी सार्या आघाड्या - देवेगौडापासून डॉ. जयप्रकाश नारायणांचे नाव मिरवणार्या आंध्रातल्या पैसेखाऊ पार्टीच्या नेत्यापर्यंत सार्यांच्याच - दोन पैकी एका बाजूला विलीन करण्यात याव्यात असा फतवा काढतो आहे. भारत की पाकिस्तान हे दोनच पर्याय आहेत, संस्थांनांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय नाही.
तुम्ही काहीही म्हणा हो! संधी
तुम्ही काहीही म्हणा हो! संधी मिळताच या सातांची एक आघाडी करून दाखवतो की नाही बघा..
बाकी कोल्हटकर, नानावटी, घारेसर यांनाही तिसर्या आघाडीच्या प्रवेशाचे आवताण देत आहोत!
समांतरः या सातात माझीच आघाडी सर्वात जास्त मेंबरांची आहे, बाकी सगळा एकला चलो रे प- अपक्ष - मामला आहे हे लक्षात आले असेलच!
अहं
तुझ्या आघाडीत मेँबर बरेच आहेत रे, पण त्यातले कचाकचा भांडणारे, दुसर्याँच्या झिँज्या उपटणारे, टाळकी फोडणारे, खळ्ळं खट्याक कोणीच नाय ना. मग काय उपयोग?>> त्यांची भांडणाची पद्धत वेगळी आहे. ते कुरुक्षेत्रावर... आय मिन जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहेत ऐसीभारताला विरोध म्हणून. नि ते संपलं की हा आमचाच नैतिक विजय आहे असा दावा मीडियासमोर करणार आहेत. 'सारे प्रवासी घडीचे' मधले डॉ. रामदास आठवतात का 'आता आपण हिंदुस्थान सोडून जाणे इष्ट ठरेल' अशी तार दर महिन्याला इंग्रज गवर्नरला करणारे? ते ऋषिकेशच्या आघाडीचे प्रेरणास्थान आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे.
लक्ष ठेवून आहोत
तुम्हा सगळ्यांच्या आचरटपणावर लक्ष आहे बरं का आमचं!
-निळोबा शेषन.