सध्या मासिक खर्च किती आहे?
शंकाः त्रिकोणी मध्यमवर्गीय कुटुंबाला भारतात महिन्याला सध्या किती खर्च येतो?
संपादकः या प्रतिसादापासुन मुळ धाग्यावर अवांतर परंतु रोचक चर्चेचे स्वतंत्र धाग्यात रुपांतर करत आहोत. इच्छा असल्यास स्वयंसंपादनकरून धागाकर्ता विषय अधिक तपशीलात मांडू शकेल.
येथे थोडी चर्चा केली होती
काही दिवसांपूर्वी येथे थोडी चर्चा केली होतीः http://www.mr.upakram.org/node/2601
चार वर्षांचा ९ टक्के सरासरी महागाई दर पकडला तर त्यात कितपत बदल झाला आहे?
२०-२५हजार? कोरेगाव पार्क ला
२०-२५हजार? कोरेगाव पार्क ला असेल तेवढे भाडे!
बाणेर - बावधन मध्ये १६-१८ हजार सेमिफर्निश्ड २ बीएचके ला भाडे आहे. सिंहगड रोड - सांगवी ( जिथे खराखुरा "मध्यम वर्ग" राहतो जास्त करून) इकडे १२-१५ हजार मध्येपण चांगला सेमिफर्निश्ड २ बीएचके भाड्याने मिळतो. अनफर्निश्ड १० च्या आतच मिळावा.
हे सोडता सध्या ४-५ माणसांच्या घरात (१ किंवा २ मुले, आजी/आजोबा, आई-वडील) साधारण खालील्प्रमाणे खर्च येतो
३५००-४५०० - किराणा
१४००-२००० - दध
१४००-१८०० - भाजीपाला
१०००-१२०० - वीजबील
२०००-३५०० - कामवाली
२५००-४५०० - पेट्रोल
१०००-२००० - औषधे
५००-८०० - गॅस
२०००-३००० - हॉटेलिंग
२०००-३००० - इतर ( इस्त्रीवाला/ गाडी धुणारा / छोट्या-मोठ्या दुरुस्त्या / भेटवस्तू)
३००-६०० - केबल
१५००-२५०० - फोन्/इंटरनेट
सो साधारणपणे २५०००-३०००० मध्ये घर व्यवस्थित चालते. काटकसर केली तर २०,००० च्या आत!
मग बाकी तुम्ही वस्तू घ्याल तशा.
मुलांचे शिक्षण तुम्ही शाळा निवडाल तसा खर्च:
"इंटरनॅशनल स्कूल / एसी वर्ग" इत्यादी साठी जाल तर वर्षाला १.५ लाख
हाय फाय नसलेल्या पण तरी चांगल्या शाळा - वर्षाला ४०,००० - ६०,०००
अनुदानित शाळा - वर्षाला १५,०००- २०,०००
पुणे हे फार्फार महागडे शहर
पुणे हे फार्फार महागडे शहर आहे असे (पुन्हा एकदा) लक्षात आले.
"मध्यमवर्ग या शब्दाची व्याख्या बदलली असण्याचा सुद्धा परिणाम आहे.
माझ्या पिढीत १ आर के हे मध्यमवर्गाचे स्टॅण्डर्ड आणि १ बीएचके हे उच्च मध्यमवर्गाचे स्टॅण्डर्ड होते. शिवाय ग्रॅज्युअली मोठे घर घेण्याकडे कल होता. माझ्या बहुतांश मित्रांनी ३० व्या वर्षाच्या आसपास १ बीएचके घरे घेतली आणि ४५ नंतर २ बीएचके.
शिवाय टिव्ही फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे हळूहळू जमेल तसे घेतले जात असे.*
*हा विदा कारकून वर्गाबाबत नसून बर्यापैकी कंपनीत इंजिनिअर वगैरे असलेल्यांबाबत आहे. अर्थात आज इंजिनिअर असलेल्यांना हे जमत असावेसे दिसते. [पगाराच्या रिलेटिव्ह गॅजेट्सच्या किंमती खूपच कमी झाल्या आहेत हे खरेच आहे].
महागडे वर आक्षेप! सांगली/
महागडे वर आक्षेप!
सांगली/ नगर/ कोल्हापूर अर्थात पेक्षा आहे महाग, पण सरसकट इकडे प्रचंड( इतर महानगरांपेक्षा खूप जास्त) महागाई असते वगैरे साफ नामंजूर!
सर्व पर्याय उपलब्ध असतात. महागाई ही घेणार्याच्या इच्छेवर असते.
आज ही २५०-३०० रू मध्ये दोन माणसे पोटभर आणि बर्यापैकी हायजेनिक जागी खाऊ शकतात (अर्थात नो ऑर पुअर अॅम्बियन्स)
हेच दोन माणसांचे २५०० बिल करू शकणार्या जागा पण बर्याच आहेत.
तुमच्या आधीची पिढी मंजे
तुमच्या आधीची पिढी मंजे आत्ताचे आजीआजोबा, त्यातले कित्येकजण निवृत्त होताहोता स्वतःचे घर घेउ शकले. तोपर्यंत भाड्याच्या घरात.
तेच माझ्या पिढीतल्या आयटीवाल्यांनी २५चे असतानाच २बीएचके घेतले. आता त्यांची दोनदोन घरं आहेत. आला पैसा की गुंतव रिअल इस्टेटमधे. उगाच थोडीच भाव वाढतात घराचे.
बादवे वरच्या प्रतिसादात मी फुल्लीफर्निश्डचे भाडे यासाठी पकडले की नाहीतर या सगळ्या वस्तू+पलंग गादी कपाट सोफा भांडी पडदे वगैरेवगैरे न संपणार्या यादीचे खर्च वनटाइम असलेतरी महीना/वर्षाच्या खर्चात पकडावे लागतील.
महागडे का वाटते .....
महागडे शहर (आमचे खेडेगाव) ठाण्याशी तुलना करता आहे....
पुण्यात शाळेची रिक्षा सुमारे दीड किमी अंतरासाठी महिना २००० रु घेते असे कळते. माझी मुलगी दिवसातून दोन वेळा (२.८ किमीवरील) शाळेत जाते (एकदा क्लासला आणि एकदा शाळेत). आम्ही ठाण्यात त्यासाठी (व्हॅनसाठी) महिन्याचे १००० रुपये देतो.
अतिशहाणा यांच्याशी त्यांनी दुवा दिलेल्या धाग्याच्या सुमारास खरडचर्चा झाली होती त्यात सर्दी पडसे झाल्यास जनरल फिजिशिअन डॉक्टरकडे १५० रु जातात असे ते म्हणाले होते. त्यावेळी आम्ही ठाण्यात (एमबीबीएस) जीपीला ५० रु देत असू.
कामवालीला आम्ही १००० रु कपडे धुणी भांडी करण्याचे देतो.
आमच्या घरी (मुलीसाठी) पूर्णवेळ* (सकाळी १० ते ७) थांबणे आणि स्वैपाक करणे (पोळी, भाजी, भात आमटी- भाजी चिरण्यासह) यासाठी ३७०० रु देतो. त्यातले ७०० रु प्रवासखर्च म्हणून देतो.
*मुलगी मोठी झाली असल्याने आता पूर्णवेळ थांबावे लागतेच असे नाही.
तुलना फारशी योग्य वाटत नाही.
तुलना फारशी योग्य वाटत नाही. तुम्ही ठाण्यातील मध्यवर्ती भागातील (जिथे लेबर सप्लाय विपुल आहे) तुलना पुण्यातील दूरवरच्या उपनगराशी (जिथे लेबर सप्लायची चणचण आहे) करताय असा संशय आहे.
पुणे महाग आहेच, पण तुम्ही दिलेले आकडे हे नव-पुण्यातील वाटतात (औंश, बाणेर, युएसपी, हडपसर, कल्याणीनगर वगैरे)
+१
+१
तुमच्या भागाची तुलना पेठांशी नाही करता आली तरी निदान चिंचवड, पिंपरीमधील नॉर्मल लोकांचा निवासी भाग किंवा वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे सांगवी, सिंहगड रोड ह्यांच्याशी करावी. अगदि खूपच झाले तर कर्वेनगर, कोथ्रुडही चालेल पण यूसपी वा वाकड्,रावेत असे उधळ्यांचे अड्डे नकोत.
एक बुके घ्यायला गेलो तर पाचशे रुपये बोलतो भांचूत. चुकून भाव करायचा प्रयत्न केला तर नजरेनेच " पुढं जा " असा इशारा किंवा दुर्लक्ष.
मेथी आणि पालकाच्या जुड्या दुप्पट ते तिप्पट किमतीला. कै च्या कैच आहे डबल इन्कम आयटीप्रकरण भांचूत.
१. व्यवस्थित बार्गैन केले
१. व्यवस्थित बार्गैन केले नसावे
२. जास्त काळासाठी कुटुंबासकट एका शहरात राहणारे "सगळंसगळं" असणार्या भाड्याच्या घरात राहायला जात नाहीत. फर्निचर (किचन ट्रॉली, कपाटे, बेड, सोफा), फॅन - ट्युब आणि जमल्यास इन्हर्टर पण पुरेसा असतो.
३. "सगळंसगळं" असणारे प्लॅट सहसा बॅचलर्स, विद्यार्थी किंवा अतिशय अल्पकाळासाठी आलेले किंवा अजून पर्यंत इकडे जास्त राहायचं की नाही याचा निर्णय न झालेले लोक घेतात.
जो गरीब नाही तो श्रीमंत हे
जो गरीब नाही तो श्रीमंत हे लॉजिक वाचून म्हैसमधल्या "मी पुलिस नायतर काय चोर आहे" हे वाक्य आठवले.
मी कौटुंबिक नाही व्यक्तिगत उत्पन्नबद्दल बोलत होतो.
आणि कौटुंबिक जरी धरले तरी २० हजार ही गरीबी रेषा बरीच चुकीची वाटते. ज्या तीन जणांच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न ५ हजाराच्या खाली आहे त्यांना मी गरीब म्हणेन!
५ ते २० - निम्न मध्यम वर्ग
२० ते ६० - मध्यमवर्ग
६० ते १०० - उच्च म मध्यमवर्ग
१०० च्या पुढे श्रीमंत
बाकी तुमची टक्केवारी, आकडे वगैरे मनोरंजन चालु द्या!
जाऊ दे मला तुमच्याशी वाद
जाऊ दे मला तुमच्याशी वाद घालण्यात किंवा तुम्हाला माझा मुद्दा पटवण्यात वेळ्/शक्ती खर्चायची नाही.
पुण्यात राहायला किती खर्च असतो सहसा - ह्या प्रश्नाचे मी उत्तर दिले आहे. ज्यांना माहिती हवी त्यांना उत्तर मिळाले आहे.
थेटरात २५० रू चे तिकिट असताना महिन्यातून दोनदा गेलेच पाहिजे आणि २५० रू चे पॉपकॉर्न खर्च केल्या शिवाय मुले पिक्चर पाहू देऊ नाहीत त्यामुळे त्यांना ते दिलेच पाहिजे ही कोणाच्या उच्च मध्यम वर्गीयाची व्याख्या असे तर असू देत बापडे!
मी होम थिएटर सिस्टिम घेतली आहे ५० रु ची सिडी भाड्याने आणून महिन्याला ३-४ पिक्चर पाहते, चांगला पिक्चर असेल तरच थेटरात जाऊन पाहते. पॉपकॉर्न शिवाय पिक्चर पाहणार नाही, पाहू देणार नाही असे पोरांनी म्हटले तर "बस घरी मग" असेही त्यांना सांगते
ऑलमोस्ट हेच नियम सगळ्या खर्चांना लावते त्यामुळे माझे घर २५००० मध्ये आरामात चालते. मी कोणाला उच्चमध्यम वर्गीय वाटते की नाही यामुळे मला फरक पडत नाही.
अगदी बरोबर
२५ ते ३० हजारात मध्यमबर्गीय माणूस पुण्यात राहू शकतो. एवढं झंझट करून सिनेमाला जायला फार म्हणजे फारच उत्साह पाहिजे. मल्टीप्लेक्सवाल्यांच्या अशा वागण्याचा राग येतो. ज्यांना येत नाही, ते श्रीमंत. ज्यांना तोच पिक्चर निलायमला ७०/१०० रूपयात दिसत असताना, मल्टीप्लेक्सचे काहीच कौतुक वाटत नाही, ते मध्यमवर्गीय.
-स्वधर्म
अनस्किल्ड लेबरचा महिन्याचा
अनस्किल्ड लेबरचा महिन्याचा पगार - ६००० ते ८००० पेक्षा जास्त नसतो!
Kindly browse the Minimum Wages Act for any metro. ६०००-८००० ही बेसिक सॅलरी असते, ८ तासांची. दिल्लीत सेमी स्किल्ड लेबरची ८ तासांची मासिक किंमत १५००० रुच्या वर पडते. त्यातले फक्त पी एफ चे ६०० रु नि एजंसीचे १००० रु त्याचे टेक होम नसतात.
सरकारी नोकर मज्जा करतात ते यामुळेच.
भारतातला एक तरी लेबर इन्स्पेक्टर इमानदारीत कायदा इम्प्लिमेंट करवतो का? अन कुठेही, अगदी तुमच्या घरी धुणीभांडी करायला येणार्या रामागड्याला तरी तुम्ही स्वतः मिनिमम वेजेस नुसार पगार देता का?
अन मुख्य म्हणजे, पगार द्यायला हरकत नाही, पगार घेणारा १ रुपया पगाराच्या मोबदल्यात १ रुपयाचे काम करतो की १० पैशाचे काम करून ९० पैसे पाट्या मारतो + २ रुपयांची वरकमाई शोधतो?
इन जनरल, २००-३०० रु. रोज ही म्याक्स रोजंदारी आहे अन्स्किल्ड साठी. ते देखिल रोज काम मिळत नाही, अन मिळाले तरी फिजिकली करवत नाही. शिवाय आजोबांच्या पहिल्या प्रतिसादात अनस्किल्ड अन नंतर सेमी स्किल्ड शब्द आलेत.
भारतात अगदी एका अनस्किल्ड
भारतात अगदी एका अनस्किल्ड लेबरची महिन्याची पगार १२००० ते १४००० आहे
नाही हो.. असं नाहीये. माझ्या पाहाण्यात बरेच पुणे आणि नाशिकमधले अनस्कील्ड च काय पण स्किल्ड लोकांचे पगार सुद्धा पंधरा हजाराच्या आतच आहेत. एलेक्ट्रीशीयन, सुतार, ड्रायव्हर ह्या लोकांना स्किल्ड च म्हणावं लागेल पण ह्या लोकांचा पगार जेम-तेम १० हजार असतो, अगदी शाळेतल्या शिक्षकांचा पगार देखील १५ च्याच आसपास असतो. माझ्या ओळखीतले एक कार ड्रायव्हर प्रशिक्षक आहेत, गाडी चालवण्याचं उत्तम शिक्षण देतात. सकाळी ६-२ आणि संध्याकाळी ४-८:३० अश्या कामाच्या वेळा आहेत ह्यात त्या ड्रायव्हींग स्कूल चे ऑफिस-बॉय कॅटेगरीतले सगळे कामंही करतात आणि पगार मिळतो ६ हजार, पुर्वीच्या ड्रायव्हींग स्कूल मधे ह्याही पेक्षा कमी मिळायचा म्हणून इथे आले म्हणजे एकंदरीत सगळीकडे एवढाच पगार असवा(पुण्याततरी). बाकी मग वॉचमेन, आया, स्वयंपाकीण, ऑफीस-बॉय, बड्या-कंपनीमधे साफ-सफाई करणारे कर्मचारी ई. ह्यांचे पगार जेम-तेम ४-६ हजाराच्या घरात असतात. हे झाले पुणे-नाशिक सारख्या मोठ्या शहरातील पगार -बाकी छोट्या शहरांमधे तर नक्कीच ह्यामधे बरीच तफावत असेल, अजून कमी पगार असतील. आणि भारतात अशी मोठी शहरे आहेत तरी किती....
ऑफिशियली
ऑफिशियली अनएंप्लोइड/सेमीएंप्लॉइड आहेत
पण हे जे इलेक्ट्रीशीयन, सुतार्, सफ-सफाई कामगार आहेत त्यांना मासिक पगार मिळतो. ते शाळेच्या, कंपनीच्या पे-रोल वर आहेत अश्यांचे उदाहरण दिले आहे मग ते 'ऑफिशियली अन ऑर सेमी एंम्पलॉईड कसे?
आणि ते मध्यमवर्गीय नाहीत म्हणजे ते गरीब किंवा मध्यमवर्गाच्या खालचे म्हणत असाल तर साहाजिकच आहे ना, जर त्यांना पगारच एवढा मिळतो आणि खाणारे अनेक तोंड घरात त्यांच्या पगारावर अवलंबून असतील शिवाय त्यात वाढती महागाई मग इतक्या सहजा-सहजी त्यांचा एवढ्या पगारावर स्तर वाढणारच कसा?
बचत व घराचा इ एम आय वजा जाता
बचत व घराचा इ एम आय वजा जाता भारतात प्रतिमाह एका त्रिकोणी कुटुंबाला शहरात एक लाख रुपये लागतात.
साधारणतः भाडे ३५, अन्न, दूध, फळे, भाज्या, हॉटेल -१०, शिक्षण -१०, प्रवास, पेट्रोल, वाहन -१०, वीज, नेट, गॅस, इ -१०, औषध - २.५, कामवाली -२.५, कपडे, सण, फ्रीज्/टीव्ही सारखी मशीन्स, गॅझेट्स, दागीने -१०, मनोरंजन, भेटीगाठी -५, मिस्क - ५. वर्षातले सगळे खर्च अॅवरेज करून.
एक लाख?
भाडे ३५? (इएमआय असूनही भाड्याच्या घरात का राहता?) दर महिन्याला फ्रीज व इलेक्ट्रॉनिक गॅझेटे? मनोरंजन - भेटीगाठी ५? (मिस्क मध्ये दारु व तत्सम खर्च आहेत काय?)
मध्यमवर्गाचा खर्च बचत वगळता १ लाख... हे तर पूर्णच आवाक्याबाहेरचे दिसते...
असो चर्चा मूळ विषयाशी विसंगत असल्याने वेगळी काढता आली तर उत्तम.
खर्च
-------------------भाडे ३५?------------------
भाडे द्यावे लागते, मासिक मेंटेनन्स द्यावा लागतो, भाडेकरार रजिस्टर करावा लागतो, वन टाईम पण एजंटची फी द्यावी लागते, नि डिपॉझिटचे व्याज मिळत नाही. दिल्लीत मॉडेल टाउनमधे, जे फार काही हाय फाय नाही, ३ बी एच के फ्लॅट विथ पार्किंग, अन्फर्निशड, ६० हजार रु प्रतिमाह आहे. मंजे ३५ के रिजनेबलच आहे.
-------------- (इएमआय असूनही भाड्याच्या घरात का राहता?) --------------------
हे सगळं व्यक्तिशः माझ्याबद्दल नाही. जनरल आहे. ऑफिस गोईंग क्लास इन दिल्ली. नविन सेटल होणारा कोणालाही सहसा घर बूक करायलाच बरीच वर्षे जातात. रडीमेड घ्यायला बरेच काळे पैसे लागतात. बूक केल्यावर पझेशन मिळायला ५-६ वर्षे लागतात. तेवढ्यात लोक ट्रान्सफर घेतात, होतात वा नोकरी बदलतात. स्थानिक सोडल्यास जास्तीत जास्त लोकांना मी अजूनही भाड्याच्याच घरात राहताना पाहतो. शिवाय लोकांना कर सवलत हवी असते म्हणूनही हे ते भाड्याच्या घरात राहतात.
------------दर महिन्याला फ्रीज व इलेक्ट्रॉनिक गॅझेटे?------------
असं नाय हो. एकूण वर्षाचा खर्च महिन्याला सरासरी केला आहे. मी लिस्ट करायचा प्रयत्न करतो. २-३ बेडस, सोफा, डायनिंग टेबल, टीवी टेबल, काँप टेबल, ड्रेसिंग टेबल, टिव्ही, काँप, फ्रिज, वॉशिंग मशीन, किचनचे सामान, मोबाईल्स (हे फटाफट बदलायची फॅशन आहे), टॅब, कॅमेरा, इलेक्ट्रिकल्स, इन्वर्टर, १-२ ए सी, कूलर, गिझर्स, असो. यातलं काही ना काही नेहमी बाद होत असतं. शिवाय इकडे घरासाठी कोणताही खर्च (परवानगीने आणि), जसे पहिल्यानंतर रंग देणे, स्वतः करावा लागतो.
------------- मनोरंजन - भेटीगाठी ५? -------------------
सिंपल आहे. ( ३ * २५० = ७५० तिकिट + २५० (पॉपकोर्न (हा नसेल तर मुले पिच्चर पाहूच देत नाही, चाहे पिच्चर त्यांचाच असो)))*२ (महिन्यातून दोनदा)=२०००. माझा अनुभव सांगायचा झाला तर दारू सॉलिडच महाग असते म्हणून मी पित नाही पण मी सिगारेट पितो. १८० रु चे पाकिट, दोन दिवसाला एक तर १८०*१५ =२७००. पेपरचे ३०० रु. झाले ५०००? भेटीगाठी यच्यातून बचत करून करायच्या. तरीही नशीब शास्त्रीय संगीत व पुस्तके अशा सवयी जोडल्या नाही. जे पुस्तके वाचतात ते सिगारेट कमी पीत असतील.
-------------(मिस्क मध्ये दारु व तत्सम खर्च आहेत काय?)---------------------
नाही. एखादवर्षी एक असा खर्च असतो कि तो त्याच वर्षी असतो. लग्न, बाळंतपण, हनिमून, आजारपण, मुलाचे अॅडमिशन, इ.
-----------------मध्यमवर्गाचा खर्च बचत वगळता १ लाख... हे तर पूर्णच आवाक्याबाहेरचे दिसते-------------------
हा खर्च (सहापैकी एक) मेट्रोतला आहे. अन्यत्र फार कमी आहे. शिवाय मेट्रोत ज्यांचे स्वतःचे घर आहे त्यांना सरळसरळ ३० हजार रु कमी लागतात. आपण प्रश्न जनरल त्रिकोणी कुटुंबाबद्दल विचारला आहे, मध्यमवर्ग, इ बद्दल नाही. १ लाख खर्च असेल तर कुंटुंबीय ओके असतात, मंजे कोणाची काही तक्रार नसते, असे वर्णन मी केले आहे. मध्यमवर्ग शैक्षणिक, वैचारिक, इ इ असतो. त्याचे उत्पन्न कमीही असू शकते, जास्तही असू शकते. शिवाय एका बॅचलरचा खर्च ३० हजार असेल तर तो या वर्गात मोडावा.
दिल्लीत दिखाऊ खर्च भयंकर
दिल्लीत दिखाऊ खर्च भयंकर असतात, लग्नात कमीत कमी ५०१ रुपये द्यावेच लागतात. मला कुठले ही व्यसन नाही. कार्यालयात चहा इत्यादीचा खर्च नाही, रात्री उशीर झाला कि जेवण ही मिळते. तरी ही बसचा/मेट्रोचा खर्च १२50 (५०x२5), बाकी महिन्यातून एखाद लग्नाला सपरिवार जावे लागते. दिल्लीत वरात नेहमीच रात्री १० नंतरच येते अर्थात महिन्याचे कार भाडे किंवा रिक्षा खर्च १5००. मुलांचा आणि सौचा बस किंवा रिक्षा खर्च १०००. मोबाईल, फोन इंटरनेट (२०००)विजेचे बिल उन्हाळ्यात ३०० युनिट (कूलर आणि पंखे, एसी नाही )१८०० रुपये. जोडे आणि चपला ६०० महिना. कपडे कमीत कमी २००० वरचे पडतात जे आपण बहुधा मोजत नाही(सिलाई ३००च्या वर असते,शिवाय जाकेट, स्वेटर,इनर इत्यदी). शिवाय वर्तमान पत्र, मासिक, पेन पेन्सिल , औषधी १००० ते १५०० अर्थात CGHS सुविधा असून ही लागतो. भारत सरकार प्रमाणे ज्याचे घराचे बजेट नेहमीच (-) मध्ये राहते तो खरा मध्यमवर्गीय
उलटे गणित
साधारणपणे उत्पन्नातील १५ टक्के भाग तुम्ही बचतीसाठी वापरता व २५ टक्के भाग इएमआयसाठी वापरता असे गृहीत धरले तर १ लाख रुपये खर्च करण्यासाठी महिन्याला आयकर वजा जाऊन पावणेदोन लाखापर्यंत हातात उत्पन्न हवे. ३० टक्के टॅक्स ब्रॅकेटवाल्यांसाठी हे वार्षिक करपूर्व उत्पन्न ३० लाखापर्यंत येते. ही आकडेवारी मध्यमवर्गीयाची नक्कीच वाटत नाही.
24
Income = i,
saving = 0.15 i
EMI = 0.25 i
Expense = i-0.4i=0.6i=1 lakh
Hence I = 1.6 lakh per month before tax.
Assuming 3.5 lakh rent, 1.5 lakh interest, and other 2 lakh are tax free (another 3 lakh at less tax which we will take at 1.5 lakh) = 8 lakh
If Pre-tax income is T, and t (30%) is tax rate, then (T-8)*(1-0.3) + 8 = 1.6* 12 , thus T=24.
येतो की घेता; न यायला काय
येतो की घेता; न यायला काय झालं?
सोपा उपाय मंजे मालकीचे घर दुसर्या गावात घ्यायचे. किंवा त्याच गावात पण हापिसपासून दूर कुठेतरी घ्यायचे आणि कम्युटला प्रॉब होतो म्हणून भाड्याने राहतो म्हणायच. त्याशिवायदेखील मला वाटत आईबाबांच्या घरात त्यांच्यासोबतच राहून त्यांना भाडे देतोय असे दाखवू शकतो.
घराचा ताबा मिळाला नाही पण इएमआय चालू झाला असेल तर प्रिंसीपल कंपोनंट जो ८०सी मधे येतो त्याचा लाभ कधीच घेता येत नाही. पण इंटरेस्ट कंपोनंटचा लाभ पझेशन मिळाल्यापासून पुढची पाच वर्ष इक्वल अमाउंटमधे डिवाइड करुन घेता येतो.
३०लाख
पुणे-बेंग्लोर-दिल्ली वगैरे ठिकाणी आय टी वाल्यांचे किंवा त्या ब्रॅकेटमधील ३० लाख घरटी उत्पन्न असणे शक्य दिसते.
माझे म्यानेजर ह्याच रेंजमध्ये असावेत हा आमचा गॉसिपचा नेहमीचा विषय आहे.
म्यानेजर सोळा वगैरे व त्याची बायडी चौदा वगैरे दरसाल घरी धो धो आणत असावी.
त्यांना अजून किडन्याप करायला आम्हाला जमलेले नाही.
१६ + १४ = ३०
वाटलच
वाटलच असा जालावर घिसापीटा सवाल येणार म्हणून.
असा प्रश्न विचारला जावा म्हणूनच ; खास उचकवण्यासाठी असं लिहिलं.
सिरियस नोट :-
तिचा स्किल सेट ह्याच्याइतका भारी नाही. एकूण अनुभवही ह्याच्याहून बराच कमी आहे.
प्लस ह्याच्या बोलण्यातून ते तसे जाणवते (तो अधिक कमवत असल्याने बायको त्याला लुटत असल्याचे जाणवते)
म्हणून लिहिले.
तो गरिब आहे, म्हणजे बायकोचा
तो गरिब आहे, म्हणजे बायकोचा पगार सरळ-सरळ ईएमाआय मधे जात असणार, स्वतःचा बराचसा पगार इतर चिल्लर ईएमआय आणि वाहन-ईएमआय, ट्रिप खर्च वगैरे मधे जाणार, बँक बॅलन्स* कमीच असणार.
* हे जास्त असेल तरच किडनॅप करून फायदा, आणि केला तरी बायको/नवरा म्हणेल निदान १ अठवडा तरी ठेवून घ्या किंवा विकेंडला बघू.
मी तर मनोबालाच लुटायचा विचार
मी तर मनोबालाच लुटायचा विचार करतोय. कट्ट्याच्या निमित्ताने बोलवायचे आणि उचलायचा, हाकानाका. चारपाच पोरं पेरून ठेवायची अगोदरच इकडंतिकडं. खूण केली रे केली की हे लिहायला अन वाचायला जितका वेळ लागला असेल त्याच्या एक शतांश वेळात मनोबाला गुंडवाहन ओम्नीत कोंबायचं. अन सुटण्यासाठी एका दिवसात किमान २ लेख लिहायला मजबूर करावयाचे. असे १ आठवडा त्याने आज्ञापालन केले रे केले की मग मनोबाचे अकौंट लुटायचे.
यतो आकडा काढताना मी पर्यटन
यतो आकडा काढताना मी पर्यटन धरले नव्हते (तुमच्याही ब्रेकापमध्ये नव्हते, तयामुळे लक्षात आले नाही)
असे वर्षातून एकदा येणारे खर्च धरले तरी खर्च ५-६ लाखाच्या वर जात नाही! (महिना खर्च २५-३० हजारात मुलीचा खर्च पकडून भागतो. तिला महाग शाळेत घालायचा विचार नाही त्यामुळे तो खर्च फार वाढेलसे वाटत नाही)
मी ज्या ज्या कालोनीत (रेगुलर
मी ज्या ज्या कालोनीत (रेगुलर कालोनी नाही, उत्तम नगर हा मागास भाग मानल्या जातो) राहतो गल्लीत २० घरे असतील. सर्वात जास्त आयकर देणारा बहुतेक मीच असावा.(गेल्या वर्षी ४५००० कर दिला होता.) शेजार्यांच्या दृष्टीने मी एक गरीब बाबू आहे. बहुतेक लोकांकडे कार आणि bpl कार्ड दोन्ही आहेत. मराठी लोकांचे म्हणावे तर बाह्य दिल्लीत ही लग्नाच्या पार्टीत १५-२० लाख खर्च करणारी बरीच मराठी कुटुंबे ही आहेत.
बादवे, कुटुंबाचे मरू देत. (हे
बादवे, कुटुंबाचे मरू देत. (हे खास अजोंसाठी होते! ;-))
सिर्यसली: एकट्या माणसाला मुंबईत घर थाटून राहायला महिना किती उत्पन्न पुरेल? दरेक माणसाला घर विकत घेणे शक्य नाही. तो खर्च आपण सोडून देऊ. किंवा त्यावर काहीतरी तोडगे काढू. घर = टीव्ही-फ्रीज-वॉमशीन असलेले तयार घर. त्या वस्तू विकत घेण्याचा खर्चही तूर्तास सोडून देऊ.
म्हणजे समीकरण काहीसे असे व्हावे -> वाणसामान (अन्न आणि साबणादी उत्पादने) + प्रवासखर्च + मनोरंजनाचा खर्च + फोन-लाइट-पाणी-मेंटेनन्स इत्यादी बिले + औषध/व्यायाम खर्च
"मध्यमवर्ग या शब्दाची
"मध्यमवर्ग या शब्दाची व्याख्या बदलली असण्याचा सुद्धा परिणाम आहे.
एक्झॅक्टली. त्यामुळे मध्यमवर्गीय सारखा ताणला जाऊ शकणारा शब्द वापरणं मी टाळतो. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी वगैरे मध्यमवर्गीय नाहीत याबाबतच केवळ एकमत होतं. उदाहरणार्थ, भारतात सुमारे दीड कोटी कार्स आहेत. हिशोबासाठी पंचवीस कोटी कुटुंबं (हाउसहोल्ड्स) धरली तरी कार असलेलं कुटुंब हे वरच्या सात टक्क्यांत येतं. तरीही गाडी बाळगणारे मध्यमवर्गीय म्हणवून घेताना दिसतात.
सध्याची दारिद्र्यरेषा - चौघांच्या कुटुंबाला महिना साडेतीन-चार हजार रुपये. त्याखाली मिळत असतील तर अमाप दारिद्र्य. दारिद्र्यरेषेखाली राहणारे सुमारे १० ते १५ कोटी लोक आहेत. त्यापेक्षा अधिक मिळत असतील तर काही लगेच श्रीमंत होत नाही. म्हणून ऋषिकेशने दिलेली स्केल पटते.
त्यामुळे अशी वर्गांची लेबलं लावण्यापेक्षा वरचे १० पर्सेंटाइल, पुढचे १० पर्सेंटाइल असं बोलणं अधिक सोयीस्कर आणि नेमकं ठरतं. गेल्या पन्नास वर्षांत आयुष्य कसं बदललं आहे हे पहायचं असेल तर त्या काळातला अमुक इतके पर्सेंटाइलवरचा माणूस कसा जगायचा आणि आता त्याच पर्सेंटाइलचा माणूस कसा जगतो याची तुलना करावी लागते.
गेल्या पन्नास वर्षांत आयुष्य
गेल्या पन्नास वर्षांत आयुष्य कसं बदललं आहे हे पहायचं असेल तर त्या काळातला अमुक इतके पर्सेंटाइलवरचा माणूस कसा जगायचा आणि आता त्याच पर्सेंटाइलचा माणूस कसा जगतो याची तुलना करावी लागते.
काळाच्या महिम्याने सर्वात खालचे काही पर्सेंटाईलच नष्ट झाले असले तर कसे तोलणार?
उच्च वर्गीय
उच्च वर्गीय लोक १ कोटी रुपये (वर्षाला) खर्च करतात. या लोकांवर जळायला होते.
१. स्वतंत्र बंगल्यात वा मस्त गेटेड सोसायटीच्या निवांत ३ बी एच के विथ सर्वंट क्वार्टर अपार्टमेंट मधे राहणे. तिथे बाग, स्व्मिंग पूल, क्लब, जिम, इ असणे. घरावरच एक प्रबंध लिहिता येईल. असो.
२. भारी कार असणे. तिचा २४ तास ड्रायवर असणे. इतर सदस्यांसाठी अजून एक एक कार असणे.
३. २४ तास नोकर असणे. २४ तास मोलकरीण असणे.
४. मुले इंटरनॅशनल स्कूलमधे जाणे.
५. वर्षांत एक विदेशवारी. लंबी छुट्टी.
६. प्रत्येक लांब प्रवास (इकॉनोमी क्लास नसलेल्या) विमानाने. नवरा, बायको च्या घरी वर्षातून किमान २-२ दा जाणे.
७. २-३ मुले असणे.
८. मुलांना कोणतेही कर्ज न घेता परदेशात एम बी ए करवणे.
९. इस्पितळातल्या फाईव स्टार सुविधांचा लाभ घेऊ शकणे.
१०. सर्वात भारी ब्रँडचे गॅझेट्स घेणे. ते वारंवार बदलणे.
११. फाइव स्टार हॉटेलात, इ महागड्या पार्ट्या देणे, समारंभ करणे.
१२. व्यसने (बाई/बाबा, बाटली, सिग्रेट, जुगार, शर्यत, रुचिप्रमाणे) पूर्ण करायला पैसे असणे.
१३. डोनेशन्स द्यायला पैसे असणे.
१४. मान मिळायला मोठे सामाजिक, राजकीय, इ पद असणे.
या लोकांवर जळायला होते. खरोखर
या लोकांवर जळायला होते.
खरोखर सांगतो मला हेच होत नाही. आणि घरच्यांच्या मते त्यामुळे मी (तथाकथित) प्रगती करत नाही.
आता मिळतंय त्याला त्याच्या भल्याबुर्या कर्माने.. आपण का जळायचे असे मला वाट्टे. (नी हे पैसेच नाही, हाफिसातले रेटिंग ते कोणत्याही काँपिटीटिव्ह गोष्टीत होते)
आणि हा गुण मनःशांतीच्या दृष्टीने सद्गुण ठरतो पण ऐहिक प्रगतीच्या मधला अडसर! :)
अर्थात मी कोणावरच जळत नाही असे नाही, पण त्याची कारणे पूर्णपणे वेगळी असतात.
जळा
आजकाल श्रीमंत होऊन वर्षाला एक कोटी रुपये कमवणे तितकेसे अवघड नाही. इतके पैसे कमवणे, प्रगती करणे नि मनःशांती यांचा काही संबंध नाही.
मला हा प्रश्न वेळ आणि जीवनशैली यांचा आहे असे वाटते.
वेळ - य वेळात क्ष रुपये कमावले तर ते खर्च करायला किमान ५*य इतका वेळ द्यावा असे मला वाटते. म्हणून उत्पन्न वाढते नि वाढवायला द्यायचा वेळ वाढतो तसतसा खर्च करायला वेळच उरत नाही. जास्त न कमवण्याचे हे एक कारण.
जीवनशैली - कमवण्याच्या काळातील घटना त्या तासांच्या पलिकडील जीवन प्रभावित करतात. आपण कमवण्यात जितके जास्त निमग्न होऊ तितका हा परिणाम वाढतो. शिवाय प्रत्यक्ष कमवण्याच्या तासांत देखिल आपल्याला बराच अकोमोडेटिवनेस दाखवावा लागतो. उदा. 'मांसाहार (कोणीही)करू नये' हे मूल्य, सवय म्हणून मला आवडत असले तरी कमावायची घाई जितकी जास्त तितके कामावर असताना कोणाचे हे प्रबोधन करायचा वेळ कमी.
शिवाय पैसे कमवण्यासाठी प्रचंड अलर्ट राहावे लागते, गुप्तता राखाव्या लागतात, धाकधुक ठेवावी लागते. कधी कधी सद्य आर्थिक सुखावरच पाणी फेरावे लागते. आणि सगळ्यात महान म्हणजे श्रीमंत झाल्यानंतरचा पोपट - एक वर्षा सहा महिन्यांनी त्याचं सुख वाटणं बंद होतं. तिथे वरच्या मजल्यावर कोण राहत आहे याची चौकशी चालू होते. नान्तो न चार्दि न च संप्रतिष्ठा।
त्यापेक्षा मस्त जळा. ते सर्वमान्य आहे, सुखद आहे. तसे केल्याने जेल होत नाही.
एक कोटी?
च्यायला, महिन्याला एक लाख वगैरेच जास्त वाटत होते तिथे आता महिन्याला आठ लाखापर्यंत उडी पोचली आहे. एक कोटी रुपये वर्षाला कमावणे कसे काय सोपे आहे बॉ? एखादी एक्झिक्युटिव पोझिशन असल्याशिवाय नोकरी करुन नक्कीच सोपे दिसत नाही. किंवा प्रचंड वरकमाई असलेली सरकारी नोकरी हवी.
साफ चूक... जवळची मैत्रिण,
साफ चूक... जवळची मैत्रिण, बहिणीचा नवरा आणि माझा नवरा अनुक्रमे "ब्लु कॉलर", "आयटी" आणि "नॉन आयटी व्हाइट कॉलर" कंपन्यांमध्ये एचआर मध्ये कामाला आहेत त्यामुळे त्या सगळ्या फिल्ड मधले साधारण पगार किती याचे आकडे ऐकून आहे.
सुमारे एक कोटी ते पाच कोटी हे बर्यापैकी कॉमन पॅकेज आहे टॉप लेव्हल मॅनेजर्स लोकांसाठी!
आता मला सांगा विशाल सिक्का ला इन्फी चे सीइओ म्हणून घेतले ते काय ५० लाख पॅकेजवर काय? तेवढे तर इन्फी चा सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजरपण घेत असणार! या नवीन सीइओ चे पॅकेज ५ कोटी ते १० कोटी मध्ये तो आरामात असेल.
आणि त्याच्या येण्याच्या आधी सीइओ पदावर जाण्यास इच्छुक जी आधीच मंडळी कंपनी मध्ये होती ती निदान २ कोटी च्या रेंज मध्ये आधीच असणार!
+१
१. हो हो.
२. अगदी इंफिचे उदाहरण द्यायचे गरज नाही. बर्याचदा ३०-४० कोटी टर्नओवर असलेल्या कंपनीत देखिल सी ई ओ १ कोटी नि डायरेक्टर्स ५० लाख कमावतात. पण अशा नेमणूका सहसा वेगळ्याच कारणांनी (ओळख, वारसा) इ नी होतात.
३. सिक्का साहेबांच्या इसॉप्स त्यांना करीयर शेवटी १०० ते ५०० कोटीच्या घरात नेऊन ठेवतील असा अंदाज आहे.
४. मी जे जवळजवळ अशक्य म्हणालो त्याचा एलॅबोरेट अर्थ वेगळा आहे. उदा, माझ्या मागच्या कंपनीत माझ्या बॉसचा (बॉसिणीचा) पगार ऑल इन्क्लूसिव प्रि टेक्स ६ कोटीच्या आसपास होता (२०११). म्हणजे पोस्ट टेक्स ४ कोटी आणि खर्चायला ३ कोटी. ऑफिशियली ही कंपनी इक्वल ऑपॉर्च्यूनिटी एंप्लॉयर आहे. माझ्या नि बॉस मधे एकूण ४ च पदांचा फरक होता. एका प्रमोशनला ३ वर्षे धरली तर १२ वर्षांनी माझे पद ते नि माझा पगार ६ कोटी (गुणिले महागाईची अॅडजेस्टमेंट) इतका होणार होता का? नाही. कारण? माहित नाही? मी त्या पदाला जायच्या लायकीचा आहे? एच आर ला माहित. मी त्या पदावर गेलो असतो? नक्कीच नाही!!! माझा २०१० चा पगार नि चार प्रमोशन्स नंतरचा पगार यांच्यात रिजनेबल स्केल आहे? नाही (रिश्चर स्केलपेक्षा वाईट स्केल आहे.) असं का? माहित नाही. इथे वर मी आज एक कोटी खर्च म्हणालो, म्हणजे २ कोटी ग्रॉस सॅलरी, टाईम ईन्फ्लेटेड. साधारणतः पगार जितकी वाढते त्यातला ७०-८०% भाग इन्फ्लेशनच खऊन टाकते, मग म्हणून नोकरीत अशक्य आहे. उलट इंफोसिस मधे गेल्या वर्षी ७% सरासरी पगारवाढ होती नि महागाई १०-११% होती. मंजे लोकांचा पगार कमीच होत होता. अर्थातच खूप शार्प आणि घासू आणि नशीबवान आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे लोकही बरेच असतात नि त्यांना नोकरीतही आजच्या टर्म्समधे २ कोटी ग्रॉस सॅलरी भारतात मिळते.
पगारापेक्षा जास्त वेगाने
पगारापेक्षा जास्त वेगाने महागाई वाढते, सगळी पगारवाढ इन्फ्लेशन खाऊन टाकते अशी ओरड करणार्या उच्चमध्यम वर्गीय लोकांची मला मौज वाटते.
एक उदाहरण घेऊ.
२००५ साली चांगल्या कॉलेज मध्ये बीई झालेला एक तरूण नोकरीला लागला. किती पॅकेज मिळेल त्याला? फार हाय-फाय नको. २.२५ पकडू!
आता पुढच्या ९-१० वर्षात फार वाईट नाही आणि फार नेत्रदिपक नाही अशा पद्धतीने त्याचा पगार वाढला आणि अर्थात महागाई पण ८% दराने वाढत राहिली असे मानू!
पुढील तक्ता पहा.
मी दिलेले कुठले ही आकडे अविश्वसनीय नाहीयेत. जितके वर्षाचा अनुभव साधारण तितके पॅकेज हा मार्केट मधला बेसिक थंबरूल इथे पण पाळलेला आहे.
नीट बघितले तर टॅक्स वगैरे जाऊन आणि दर महिना घरगुती खर्च वाढत जाऊन सुद्धा त्याच्या दर्साल बचतीचा आकडा वाढतच चालला आहे.
दहा वर्षात घर/ग्रूहोपयोगी वस्तू यात त्यातली काही बचत घातली असे धरले तरी गुंतवणूक करायला बर्यापैकी बफर राहतोय. मग यथावकाश त्या गुंतवणुकीचे रिटर्न्स पण मिळत राहतीलच.
आता दरमहा सगळे पैसे उडवून xx ला हात पुसणारे कोणी असेल तर त्याला काही करू शकत नाही.
सो आयदर बी एक्स्ट्राऑर्डिनरी टू अर्न एक्स्ट्राऑर्डिनरीली ऑर लिव्ह बाय युअर मीन्स इफ यू नो यू आर नॉट!
>>पगारापेक्षा जास्त वेगाने
>>पगारापेक्षा जास्त वेगाने महागाई वाढते, सगळी पगारवाढ इन्फ्लेशन खाऊन टाकते अशी ओरड करणार्या उच्चमध्यम वर्गीय लोकांची मला मौज वाटते.
हा हा हा. माझ्या बर्याच कलीग्जना २० हजार रुपयांनी पगारवाढल्याच्या आनंदापेक्षा त्यातले ६००० टॅक्समध्ये जाणार याचं प्रचंड दु:ख होतं आणि २० हजार पगार वाढल्याचा आनंद ते उपभोगू शकत नाहीत.
सुमारे एक कोटी ते पाच कोटी हे
सुमारे एक कोटी ते पाच कोटी हे बर्यापैकी कॉमन पॅकेज आहे टॉप लेव्हल मॅनेजर्स लोकांसाठी!
या पगाराच्या पातळीवरील व्यक्ती निव्वळ मॅनेजर नसून CXO टाईपचे एक्झिक्युटिव असावेत असे वाटते. कोणत्याही कंपनीत अर्ध्या टक्क्यापेक्षाही बरेच कमी असावेत असा अंदाज आहे.
इन्फीसारख्या कंपनीतील सीनिअर प्रॉजेक्ट मॅनेजर पन्नास लाखापर्यंत पगार घेत असण्याबाबतही नक्कीच शंका आहे. (मात्र हे खरे असल्यास माझा फार मोठा भ्रम दूर होईल)
२० वर्षापर्यंतचा अनुभव
२० वर्षाच्या जवळपासचा अनुभव असणाऱ्यांचा मेडिअन पगार खालील दुव्यावर १५ लाख दाखवला आहे. जास्तीत जास्त पगार २४ लाखांपर्यंत जातोय. नॉन एक्झिक्युटिव मॅनेजरियल पोझिशनवर राहून या आकड्यांच्या दुप्पट ते तिप्पट पगार मिळवण्यासाठी फारच स्पेशल स्किल्स असणे आवश्यक आहेत.
http://www.payscale.com/research/IN/Job=Senior_Project_Manager%2c_IT/Sa…
आयटी बहुराष्ट्रीय परंतू
आयटी बहुराष्ट्रीय परंतू भारतीय मुळ असणार्या सर्विस प्रोव्हायडिंग कंपन्यांमध्ये (जसे इन्फी, विप्रो, टिसीएस) सिनीयर प्रोजेक्ट मॅनेजरला (साधारण १२ ते १५ वर्षांचा आयटी एक्सपिरीयन्स) साधारणतः वर्षाला १५ ते २० लाख रुपये पगार असतो. (इतर कोणतेही विशेष बेनिफिट्स नसतात ते त्यापुढिल लेव्हलला असतात)
आयटी बहुराष्ट्रीय परंतू भारतीय मुळ असणार्या प्रोडक्ट बेस कंपन्यांमध्ये (ज्या फार जास्त नाहित) त्याच व्यक्तीला पगार थोडा अधिक असतो. तर आयटी बहुराष्ट्रीय अन् अभारतीय मुळ असणार्या सर्विस बेस्ड कंपन्यांमध्ये (जसे अॅक्सेन्च्युअर, कॅपजेमिनी इत्यादी) साधारणतः ३० लाखापर्यंतही पॅकेज असु शकते.
यप्स
ट्याक्स बास्केट कशी बनवलीय
तोपण एक रोचक आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. एकदा कंपनी बदलून माझे प्याकेज बरेच वाढले; पण पगारातील basic आधीच्यापेक्षाही कमी झाला. बरं, असे निर्णय घेण्यापूर्वी विचार वगैरे करायचा असतो हे आमच्या गावीही नव्हते. मारली उडी धाडकन.
नंतर ह्या प्रकाराचे फायदे नि तोटे लक्षात राहतील असे अनुभवले.
तोटा :-
ब्यांका मोठ्या रकमेची गृहकर्जे वगैरे देताना हात आखडता घेतात. take home पाहतात, तसेच basic ला सुद्धा बरेच महत्व देतात.
(अर्थात, कोणती ब्यांक किती महत्व देते हे ब्यांकेगणीक बदलू शकते, पण एक थम्ब रूल म्हणून लक्षात ठेवावे, इतपत महत्वाची गोष्ट आहे.)
आमच्या एक मैत्रीणीची बेसीकतर
आमच्या एक मैत्रीणीची बेसीकतर २% च आहे. मंजे १% HRA. तिच्यासाठी २०० ३००च रू व्हायचे. EPF चे कंपनी काँट्री कमी व्हावे म्हणून करतात असे. आणि बाकीची भलीथोरली बास्केट चिल्ड्रन युनिफॉर्म, बुक्स वगैर... मुल नसलेल्यांना काय उपयोग त्याचा? परत सोडेक्सो कुठे ५००चे तर कुठे १०००चे कुठे १.५ कुठे २. पेट्रोल अलाऊंसचेपण तसेच.
सोडेक्सो
सोडेक्सोचे बेनेफिट्स ट्याक्स फ्री असतात. सोडेक्सो बंद करुन क्याश घेतली तर ट्याक्स भरावा लागतो. अगदी मार्केट फोर्सेसचा फायदा घ्यायचा म्हटले तर पुण्यात काही दुकानदार ५ ते ८ टक्के कमिशन कापून उरलेल्या सोडेक्सोची क्याश देतात.
उदा. ढोबळ गणितानुसार १५०० चे सोडेक्सो घेतले तर ५०० रु. ट्याक्स वाचतो. ते सोडेक्सो मार्केट फोर्सेसला विकले तर १२० कमिशन जाऊन १३८० रुपये मिळतील. याउलट कंपनीला क्याश द्यायला सांगितले तर १००० रुपये.
घाला बोटे. करा गणित.
भाईकाका कोण? खर्र्च माहित
भाईकाका कोण? खर्र्च माहित नाही. "बोटे घाला"यचा नि त्यांचा संबंध काय?
तसं आम्हाला मराठी नि झंटलमन ही दोन्ही बिरुदं नीट फीट बसणार नाहीत. एकतर आम्ही लातुर-उस्मानाबाद जिल्ह्यात, ते ही गावाकडे, जन्मले वाढलेले. फक्त ४-६ वर्षे खर्या महाराष्ट्रात (मंजे पुण्यात नि मुंबईत) होतो.
सोपे आहे
मला एकदा कॉल करा.
माझ्याकडे एक स्कीम आहे तुमच्यासाठी सर.
तुमच्यासारखे नेटवर्किंगचे उत्तम स्किल असलेले लोक आमच्या स्किममधून नक्कीच खूप काही कमावू शकतात.
असं बघा ....
तुम्हाला दोन तरी जवळचे मित्र असतीलच.
त्यांना त्यांचे दोन तरी जवळचे मित्र असतीलच.
भूमितीय श्रेणीनं तीन चार पायर्यांत तुम्ही करोडपती झालेले असाल!
काहीही न करता!!
मला हे गणित कधी जमलंच नाही.
एकूण पगार बारा त्यातला एक फंडात -एक आयकरात- एक मुलांच्या फिया भरण्यात -एक बारसं -मुंज -लग्न-कट्टे या साठी -एक आकस्मीक उदभवणार्या अडचणीसाठी -एक अक्कल खात्यातल्या खर्चासाठी -म्हणजे सहा महीन्याच्या पगारात अजून तगून आहे.
तरीपण विचार केला तर आमचा चौघांचा मिळून खर्च महीना ३५००० असावा.(कुपनांच्या फायद्यासकट)
आस्था
संस्थळ चालवायचे सारेच काम आउटसोर्स केले तरी ते बर्यापैकी स्वस्त असावे.
१. डॉमेन नेम घेणे, चालू ठेवणे = दर्वर्षी ५०० ते १००० रु
२. संस्थळ डिजाईन करणे = एकवेळ ५० हजार
३. काही फिचर्स, जसे मराठी सपोर्ट, इ देणे. = एकवेळ ३-४ हजार. नंतर अपडेट्स. बाकी युनिकोड फुकट आहे जो हे वापरतात.
४. डाटा स्टोर करणे (मला वाटत नाही इथे सॅन इ लागत असावी)= १ ते २ टीबी = एकवेळ १० ते १२ हजार.
५. हाय स्पीड कनेक्टिविटी = महिना २ ते ३ हजार
६. ऑनलाईन सपोर्ट. बहुतेक स्वेच्छेने काही सदस्य करतात.
७. हार्डवेअर ठेवायची जागा इ, नाहीतर आय डी सी चे वा क्लाउडचे भाडे. = भाडे असेल तर स्टोरेज व कनेक्टीवीटी कॉस्ट शून्य.
८. बहुतेक कोणतेच स्पेशल अप्प्लीकेशन सॉफ्टवेअर लागत नाही. = ०.
इथे प्रश्न पैशाचा नाही. वेळ असण्याचा, विषयातील आस्थेचा आहे. येणार्या जबाबदार्यांचा, सदस्यांच्या किटकिटींचा आणि आलेच तर कायदेशीर अडकणूकीचा आहे. (अवांतर -मराठीतली अशी "चर्चास्थळं" खूप चांगल्या दर्जाची आहेत. अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत निर्विवाद. कदाचित इंग्रजी सोडून इतर अनेक मोठ्या मोठ्या भाषांच्या तुलनेतही. इंग्रजीतही मला सदस्य ओळखीचे व्हावेत असे भारतीय संस्थळ दिसले नाही.)
मध्यंतरी एक मित्र अमेरिकेतून
मध्यंतरी एक मित्र अमेरिकेतून भारतात परत येऊ इच्छित होता. एका माणसाला भारतात शहरात राहून चैन न करता जगायला किती पैसे लागतात, असा अंदाज त्याला घ्यायचा होता, म्हणून बरीच अंदाजपत्रकं मांडली. अर्थात आकडे वाढत जातीलच. पण हा सध्याच्या दरांनुसारचा अंदाज.
गृहितकं: घर उपलब्ध आहे. घरातल्या वस्तूही नव्यानं विकत घ्यायला नको आहेत. एसी नाही. फ्रीज-टीव्ही-धुलाई मशीन-मिक्सर-गीझर ही प्रमुख यंत्रं. ती आहेत. मेंटेन तेवढी करायला लागतील. एकट्या माणसाला राहायचं आहे. त्याला जोडीदार नाही. मूलबाळही नाही. पुरेशी काटकसर करायची तयारी आहे, मात्र कंजूषपणा नाही.
माझ्या मते २०-२५००० खर्चाला रग्गड झाले. त्यात गुंतवणूक आणि बचत मात्र करता येणार नाही. जनतेचं काय मत आहे?
+१
+१
अर्थात नियमित पब - डिस्क वगैरेची वारी होत असेल, वा अत्यंत रसिकतेने विविध महागडी व दर्जेदार मद्य वगैरे चाखून पहायची हौस असेल तर २५k सुद्धा खर्च होउ शकतात हे मान्य आहे. किंवा इतरही काही खर्चिक अशा बेकायदा किंवा कायदेशीर गोष्टी आहेतच.
पण त्यास "चैन न करता जगणे" नाही म्हणता येणार.
हं, मेबी. मलापण अंदाज येत
हं, मेबी. मलापण अंदाज येत नाहीय. आपण ब्रेकप करू. अजून काही राहून गेलं का, काही अती वाटतंय का ते पाहू.
वाणसामान + प्रसाधनं = २५००
स्वैपाकाला इंधन = ५००
वीज = ५००
टेलिफोन + मोबाईल + नेट = १५००
मेंटेनन्स + टॅक्स = १५००
प्रवासखर्च = १५००
भाजी + दूध = १०००
सिनेमा + पुस्तक + प्रदर्शन + नाटक = २०००
कपडालत्ता = ५००
इस्त्री + केबल + पेपर + कचरेवाला = ५००
व्यायाम + औषध = १०००
भेटीगाठी + बाहेर खाणे = २०००
एकूण = १५०००
म्हणजे २५००० हा खरोखरच उधळपट्टीचा आकडा झाला, नाही का? की काही चुकतंय?
सबब इसम अमेरिकेतून येत आहे
सबब इसम अमेरिकेतून येत आहे याचा काहीतरी विचार करा.
उदा. कपडे -५०० रु. दिवसात एक ड्रेस जरी इस्त्री केला तरी त्याचे ५*३०=१५०, धुतला तर अजून १५०. मग उरले २०० रु. वर्षाला २४०० रुपयचे कपडे (शर्ट, पँट, बनियन, अंडरविअर, रुमाल, कॅप, पावसाळी कपडे, टॉवेल, गादी, बेडशीट, चादर, पायपुसणी, टी-शर्ट, कॅज्यूल्स, स्वेटर, सूट, टाय, सॉक्स, इ इ ) खरीदायला कसे पुरतील? मधेच काही ड्राय क्लीन करावं लागलं तर त्यालाही पैसे नसणार. अगदी पाचपैकी पहिल्या वर्षात सरकारे देखिल इतके बेक्कार अलोकेशन करत नाहीत. पीटर इंग्लंडचे प्रिंट न आवडणारे शर्ट देखिल ५००-६०० ला असतात. मग अॅलन सोलीच्या पँटला हात घातला (म्हणजे ती खरीदायचा विचार केला) तर १५००-१६०० पासून भाव चालू होतो.
चुकिचे मार्गदर्शन करून मित्राला अडचणीत आणू नका.
तो अमेरिकेत राहिला आहे हे लक्षात घेता, नि त्याचे तिकडचे उत्पन्न चांगले असेल तर त्याला ५०,००० रुच्या खाली त्याग करू नको म्हणून सांगा. मंजे तो ममईत राहणार असला, नि आता ए सी नको म्हणतोय, तर एकदा बेस्टमधून हाश्य हुश्य करत दुपारी घरी आल्या आल्या दहा मिनिटांनी त्याचा ए सी घेण्याचा विचार पक्का होइल. घराला डास न येण्यासाठी, तसे दरवाजे नि खिडक्या हवेत हे दोनच दिवसात कळेल. असं बरंच असावं.
- अजून मध्यममध्यमवर्गीयांत
- अजून मध्यममध्यमवर्गीयांत कपडे धुवायला इस्त्रीवाल्याकडे देण्याची पद्धत नाही. त्याला फारच जास्त चैन समजतात.
- ब्रॅण्डेड कपड्यांना आमच्याकडे (मी आणि मित्रमंडळी) हिंग लावून विचारण्याची पद्धत नाही.
- बाकी एकूण कपड्यांना २४०० नाहीत पुरायचे हे खरंच आहे. पण मग किती पुरतील? तुम्हीच द्या बरं अंदाज. मी तो माझ्या कात्रीत बसवून हवा त्या मापाचा करून घेते.
- बाकी एसी-डास इत्यादी संदर्भचौकटीबद्दल चिंता नसावी. तसा तो घट्ट माणूस आहे. माझ्या मार्गदर्शनालाही विचारत नाही, यातच काय ते स्पष्ट असावं! ;-) पण त्या निमित्ताने हा एक रिअलिस्टिक अंदाज घेण्याची संधी आहे, ती साधलीय.
- अजून मध्यममध्यमवर्गीयांत
- अजून मध्यममध्यमवर्गीयांत कपडे धुवायला इस्त्रीवाल्याकडे देण्याची पद्धत नाही. त्याला फारच जास्त चैन समजतात. >> लाँड्रीवाल्याला कपडे देताना जपून बरंका. आमच्या इथल्या काहीजणांनी एकगठ्ठा १० १२ ब्रँडेड शर्टपँट जोड दिले आणि लाँड्रीवाला गायब. तसेच काहीजणांचे दुरूस्तीला नेलेले मावे फुप्रो मिक्सरपण गायब झालेत म्हणा :-D.
पुण्यात २बीएचके चे भाडे
पुण्यात २बीएचके चे भाडे २०-२५हजार. एक वयस्काला अन्नाचा खर्च साधारण २५००-३००० येतो. वस्त्र ५००-१०००. इतर खर्च वीज, फोन, पेट्रोल, केबल, विकांताचे आउटींग वगैरे पकडल्यास माणशी कमीतकमी २००० पर्यंत. परत कामवाली बाईचे प्रत्येक कामाचे ५००-६००रू वेगळेच. मुलांच्या शिक्षणाचा खर्चतर विचारूच नका...