Skip to main content

ही बातमी समजली का? - २८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा.

------------

राज्य सरकारच्या नव्या महिला धोरणानुसार फक्त आईचं नाव कागदपत्रांमध्ये लावण्याची आणि आपलं नाव, आडनाव ठरवण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना मिळणार आहे. ही मटामधली बातमी. (म्हटलं तर आपलं नाव, आडनाव काय हे ठरवणं ही किती साधी गोष्ट वाटते. अर्ध्या समाजासाठी सरकारला धोरण बनवावं लागतं, २०१४ सालात!)

शहराजाद Tue, 24/06/2014 - 07:13

अपत्याला आईचे , आणि फक्त आईचे नाव लावण्याचा पर्याय असणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.
एक कुतूहल- बापाच्या नावाचा पत्ता नाही अशा परिस्थितीत काय केले जाते?

माझ्या माहितीप्रमाणे आपले नाव, आडनाव बदलण्याची मुभा प्रौढ स्त्री- पुरुष सर्वांनाच होती. सर्कारी फॉर्म, कागदपत्रे इ करून नंतर स्थानिक वर्तमानपत्रात नाव बदलल्याचे जाहिर करावे लागे.
लग्नानंतर, सामाजिक रूढीप्रमाणे पत्नीचे नाव आपोआप बदलत असले तरी सरकारदरबारी लग्नाचे प्रमाणपत्र दाखवून नाव बदलून घ्यावे लागते.
पत्नीला लग्नानंतर आधीचेच नाव लावायचे असल्यास काहीच करावे लागत नाही. आहे तसेच पुढे चालू ठेवायचे.

उदय. Tue, 24/06/2014 - 10:08

In reply to by शहराजाद

किशोर शांताबाई काळे या लेखकाचे पुस्तक वाचले होते, ज्यात त्यांनी म्हटले आहे की मी आईचे नाव वापरले. म्हणजे आईचे नाव वापरणे ही गोष्ट प्रचलित नसेल, पण काही विशेष किंवा बेकायदेशीर वाटत नाही.

नगरीनिरंजन Tue, 24/06/2014 - 10:20

In reply to by शहराजाद

लग्नानंतर, सामाजिक रूढीप्रमाणे पत्नीचे नाव आपोआप बदलत असले तरी सरकारदरबारी लग्नाचे प्रमाणपत्र दाखवून नाव बदलून घ्यावे लागते.

सहमत. लग्नात नाव-आडनाव बदलावे असा कोणताही कायदा नव्हता व नाही. निव्वळ प्रथा म्हणून आडनाव बदलले जाते. मुलगी किती गरीब व सासरचे किती तालेवार आहेत त्याप्रमाणे "हौसेने" नावही बदलले जाते.

अजो१२३ Tue, 24/06/2014 - 16:26

In reply to by नगरीनिरंजन

मुलगी किती गरीब व सासरचे किती तालेवार आहेत त्याप्रमाणे "हौसेने" नावही बदलले जाते.

मुलगी किती तालेवार आणि सासरचे किती गरीब याप्रमाणे.

नितिन थत्ते Tue, 24/06/2014 - 10:08

स्वागतार्ह निर्णय.

>> (म्हटलं तर आपलं नाव, आडनाव काय हे ठरवणं ही किती साधी गोष्ट वाटते.

वडिलांचे नाव/आडनाव लावणे म्हणजे 'पुरुषप्रधान समाजाकडून महिलांवर अन्याय' अशा संकुचित दृष्टीतून पाहिलं तर या विधानाला टाळ्या.

चिंतातुर जंतू Tue, 24/06/2014 - 10:56

In reply to by नितिन थत्ते

>> वडिलांचे नाव/आडनाव लावणे म्हणजे 'पुरुषप्रधान समाजाकडून महिलांवर अन्याय' अशा संकुचित दृष्टीतून पाहिलं तर या विधानाला टाळ्या.

दत्तक घेऊन किंवा इतर पद्धतींनी एकट्या स्त्रीनं मूल वाढवणं हे प्रकार आता शहरी मध्यमवर्गात दिसू लागले आहेत (एके काळी नीना गुप्ता किंवा सुश्मिता सेन ह्यांच्या बाबतीत ही बातमी होत असे.) घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहेच. ह्या बदलत्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवावं की संकुचित दृष्टीनं कुणाला तरी कशासाठी तरी हिणवावं हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. सरकार परिस्थितीचं भान ठेवतंय असं दिसतंय. ते निश्चितच स्वागतार्ह आहे.

नितिन थत्ते Tue, 24/06/2014 - 11:23

In reply to by चिंतातुर जंतू

निर्णय स्वागतार्ह आहे हे पहिल्याच वाक्यात म्हटलं आहे. ज्या महिलांना आईचे नाव लावायचे आहे त्यांना ते लावू देण्यास माझी काही हरकत नाही (मला काही त्याचे दु:ख झालेले नाही). आणि तेच सरकारने केले आहे. सो माझे वैर वडिलांचे नाव न लावण्याशी नाहीच.

आईचे तरी नाव का लावायचे हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो. त्याचे उत्तर सापडत नाही. काहीतरी आडनाव हवे असा (गतानुगतिक/परंपराग्रस्त) विचार आहे का? तसे असेल तर त्याला काही अर्थ रहात नाही.

"म्हटलं तर आपलं नाव, आडनाव काय हे ठरवणं ही किती साधी गोष्ट वाटते" यापुढचे पण सरकारला अर्ध्या समाजासाठी धोरण बनवावे लागते या वाक्यातून तो (संकुचित) विचार मला जाणवला. पक्षी केवळ पुरुषप्रधानता टिकून रहावी म्हणून आजवर हे शक्य झाले नव्हते असा विचार.

चिंतातुर जंतू Tue, 24/06/2014 - 13:06

In reply to by नितिन थत्ते

>> आईचे तरी नाव का लावायचे हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो. त्याचे उत्तर सापडत नाही. काहीतरी आडनाव हवे असा (गतानुगतिक/परंपराग्रस्त) विचार आहे का? तसे असेल तर त्याला काही अर्थ रहात नाही.

कायद्यानं अल्पवयीन असेपर्यंत मुलाला कुणी तरी पालक असणं आवश्यक आहे हे ह्यामागचं साधं कारण आहे. बदलत्या समाजव्यवस्थेनुसार एकत्र कुटुंब -> चौकोनी कुटुंब -> सिंगल पेरंट असे बदल झाले आहेत, पण कुणी तरी प्रौढ माणूस त्या मुलासाठी जबाबदार असायला लागतो.

प्रौढ झाल्यानंतर त्यामागे वेगळी कारणं असतात. मोठ्या प्रमाणातला डेटा संकलित करताना एकाच किंवा सारख्या नावांची अनेक माणसं आढळू शकतात. अशा वेळी डेटा गोळा करताना त्यात काही डुप्लिकेट डेटा पॉईंट्स घुसलेले असण्याचीही शक्यता असते, किंवा ती प्रत्यक्ष आयुष्यात वेगवेगळी पण एकाच नावांची माणसं असू शकतात. डुप्लिकेट कोण आणि वेगवेगळे इसम कोण हे शोधून काढण्यासाठी जे डेटा पॉईंट्स पाहिले जातात त्यात आई/वडलांचं नाव, जन्मतारीख वगैरे तपशील उपयोगाचे ठरतात.

नितिन थत्ते Tue, 24/06/2014 - 13:32

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद.

माझ्या मुद्द्याला दुजोरा देणारा प्रतिसाद. नाव आणि आडनाव कोणतं असावं हा साधा चॉइस नाही.

चिंतातुर जंतू Tue, 24/06/2014 - 14:09

In reply to by नितिन थत्ते

>> माझ्या मुद्द्याला दुजोरा देणारा प्रतिसाद.

मुद्दा कोणता? 'नाव आणि आडनाव कोणतं असावं हा साधा चॉइस नाही' हाच की आणखी काही?

सोकाजीरावत्रिलोकेकर Tue, 24/06/2014 - 11:04

In reply to by नितिन थत्ते

चच्चा,

खरेतर

अर्ध्या समाजासाठी सरकारला धोरण बनवावं लागतं, २०१४ सालात!

हे वाक्य कोट करायला हवे होते.
हे करावे लागले ते कायदेशीर बाबींसाठी. कारण कितीही आव आणला पाहिजे ते नाव ठवण्याचा तरीही जेव्हा कायदेशीर कारवाईस सामोरे जायचे असते तेव्हा सरकारच्या दरबारी नियमांनुसार नाव असणे सक्तीचे असते.

निर्णय यथोचित, झाला हे ही नसे थोडके.

- ('नावे' ठेवणारा) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 24/06/2014 - 19:40

In reply to by नितिन थत्ते

खवचटपणाचं कारण समजलं नाही.

हं, कदाचित तुमचं नाव लिहीताना कोणीही तुम्ही तुमच्या जन्मदात्यांचे नवरा आहात अशा प्रकारे तुमचं नाव लिहीलेलं नसेल. कदाचित "लग्नानंतर त्या तुझं नाव काय ठेवणार?" म्हणून कोणी तुमच्याशी हट्टाने किंवा प्रेमाने नाव बदलण्याकरता वाद घातला नसेल किंवा "लग्नानंतर पुरुषांना नाव बदलण्याची आवश्यकता नाही" असे संवाद तुमच्या परिसरात घडले, घडत नसतील. माझ्या परिसरात घडतात. एक-दोनदा झालं तर गंमत म्हणून सोडून देता येतं. सातत्याने व्हायला लागलं की कंटाळा येतो. शिवाय ही गोष्ट 'किशोर शांताबाई काळे' किंवा 'संजय लीला भन्साळी' अशी दोन-चार प्रसिद्ध उदाहरणं द्यावीत इतपत मर्यादितही नाही. (आईचं नाव लावण्याचा प्रकार मर्यादित नसेल तर त्याबद्दल मर्यादित आनंद आहेच.) माझ्या माहितीतल्या बऱ्याच स्त्रियांची नावं होती तीच आहेत. त्यातल्या बहुतेक जणी त्यामुळे होणाऱ्या गंमती आणि सतत तेच होत राहतं म्हणून तक्रारी सांगताना दिसतात.

अशा वेळेस "नाव बदललंच पाहिजे असा काही कायदा नाही" हे सांगणं अनेकदा पुरेसं नसतं. काहीतरी सकारात्मक गोष्ट असल्याचा जेवढा परिणाम होतो, तेवढा अभावाचा होत नाही. संस्कृती-परंपरेबाबत null hypothesis किती लोकांना झेपतो हा प्रश्नही येतोच. त्यापेक्षा "हे असं राज्य सरकारचं धोरण आहे" अशा सकारात्मक उत्तराने फरक पडेल असं मला वाटतं. नाव न बदलणाऱ्या असंख्य स्त्रियांचा, आणि विशेष करून पुरुषांचा (बायको या विषयावरून तक्रार नाही ना करणार!), या धोरणामुळे त्रास वाचेल.

---

वडलांचं नाव/आडनाव लावणं ही पुरुषप्रधान संस्कृती आहेच. यात आईला डावलणं अनेक पुरुषांनाही दिसतं; आडनावांमुळे समजणारी जात हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. मला चटकन फेसबुकावरचं नाव 'उत्पल वनिता बाबुराव' आठवलं. पण असं नाव लावणाऱ्यांमध्ये मला स्त्रियाच जास्त आठवतात, मनस्विनी लता रविंद्र आणि 'मिळून साऱ्याजणी'मध्ये जी नावं छापून येतात त्यातली बरीच नावं.

१. सध्या इमोजी न वापरण्याचा विचार आहे, म्हणून "ह. घे." असं लिहावं लागत आहे.

अजो१२३ Tue, 24/06/2014 - 22:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कदाचित तुमचं नाव लिहीताना कोणीही तुम्ही तुमच्या जन्मदात्यांचे नवरा आहात अशा प्रकारे तुमचं नाव लिहीलेलं नसेल.

काय व्याकरण काही कळलं नाही. स्त्री तिचे नाव लिहिताना तिच्या जन्मदात्यांची बायको आहे असं नाव लिहितात? मागे मिस , मिसेस असं काही असतं ते वाचायचं नसतं का? मग आता काय जन्मदातीची (आईची) बायको आहे असा कायदा होतोय कि काय? हेच लॉजिक मुलाच्या नावात (मुलाचे नाव +आईचे नाव+ आडनाव) लावले तर अजूनच कंफ्यूजन आहे. "तुम्ही तुमच्या जन्मदात्रीचे पती आहात का अशा प्रकारे तुमचं नाव लिहिलेलं नसेल" अशी चर्चा पुरुष करू लागतील. अविवाहित मुलींच्या नावापुढे बापाचे नाव सांगायची प्रथा तो तिचा नवरा आहे म्हणून सांगण्यासाठी आहे हा शोध आपणांस कसा लागला?

अपत्यावरचा मालकीहक्क (?) दोन्ही पालकांचा असतो नि तो नावातही दिसला पाहिजे हा आग्रह रास्त असू शकतो. पण सद्य नावामुळे वरच्याप्रमाणे फिल येतो हा प्रचंड मोठा जावईशोध/सूनशोध आहे.

माझ्या माहितीतल्या बऱ्याच स्त्रियांची नावं होती तीच आहेत. त्यातल्या बहुतेक जणी त्यामुळे होणाऱ्या गंमती आणि सतत तेच होत राहतं म्हणून तक्रारी सांगताना दिसतात.

यातल्या गैरसोयींना आपल्या दृष्टीनं महत्त्व नसावं.

अशा वेळेस "नाव बदललंच पाहिजे असा काही कायदा नाही" हे सांगणं अनेकदा पुरेसं नसतं. काहीतरी सकारात्मक गोष्ट असल्याचा जेवढा परिणाम होतो, तेवढा अभावाचा होत नाही. संस्कृती-परंपरेबाबत null hypothesis किती लोकांना झेपतो हा प्रश्नही येतोच. त्यापेक्षा "हे असं राज्य सरकारचं धोरण आहे" अशा सकारात्मक उत्तराने फरक पडेल असं मला वाटतं. नाव न बदलणाऱ्या असंख्य स्त्रियांचा, आणि विशेष करून पुरुषांचा (बायको या विषयावरून तक्रार नाही ना करणार!१), या धोरणामुळे त्रास वाचेल.

सरकारने नावांच्या लफड्यात न पडलेले बरे. आमच्या घरी मी माझे नाव "अरुण भास्करराव जोशी" लिहिणार नि वडीलांचे नाव "भास्करराव भगवंतराव जोशी" असे लिहिणार व वडील स्वतःचे नाव "भास्कर भगवंतराव जोशी" असे लिहिणार अशी प्रथा आहे. सरकारच्या धोरणाने मी "जोशी अरुण भास्कर" नि वडील "जोशी भास्कर भगवंत" असे लिहावे (कोणी का लिहिना) असे आहे. म्हणजे सरकारी धोरण आणि आमचे नाव लिहायची पद्धत जुळतच नाही. कोण कूठे राव लावणार? आडनाव अगोदर कि नाव? शिवाय माझ्या नावाला आडनाव + दिलेले नाव म्हणणे तर अगदीच चूक आहे. "अरुण भास्करराव" हे माझे दिलेले नाव नाहीच. आता काय देश सोडून जायचे कि काय?

वडलांचं नाव/आडनाव लावणं ही पुरुषप्रधान संस्कृती आहेच.

मुळात नाव ठेवणं हीच प्रक्रिया जेंडर न्यूट्रलाईज केली पाहिजे. मी वडलांना विचारले - ' अरुण किती बोरिंग नाव आहे. थोडे मॉड नाव ठेवायचेत ना.' वडील म्हणाले - 'मला तुझं नाव कोणी ठरवलं ते माहित नाही. जे मला सांगीतलं गेलं ते मी नोंदलं.' आई म्हणाली -'अरे, आत्या किंवा मामी नाव ठेवते. पाळण्याजवळ पुरुष नसतात. बायकांच्या पसंदीचे, त्यांना सुचेल ते नाव ठेवले जाते. एखादा अपवाद.' आडनावातली पुरुषप्रधानता नि नावातली स्त्रीप्रधानता दोन्ही वाईट्च.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/06/2014 - 00:17

In reply to by अजो१२३

स्त्री तिचे नाव लिहिताना तिच्या जन्मदात्यांची बायको आहे असं नाव लिहितात?

होय, इतरांचं माहित नाही. मला असा अनुभव निदान दोनदा आलेला आहे. कागदोपत्री. मग ते नाव बदलून घेण्याची उठाठेव मला करत बसावी लागली. माझं कागदोपत्री नाव संहिता मनोहर जोशी असं आहे. दोन महाभागांनी (एक एलायसी एजंट आणि एक बँकेतली कारकून), माझं लग्न झालेलं आहे असं समजल्यावर, नावामागे सौ. जोडून दिलं. तरी बरं, त्याच अर्जांमध्ये माझ्या नवऱ्याचं नाव नॉमिनी म्हणून लिहून, तो माझा नवरा आहे हे ही स्पष्ट लिहीलेलं होतं. मराठी नावं कशी वाचली जातात हे ज्यांना कोणाला माहित आहे त्यांना या 'कर्तृत्त्वा'मागचा मूर्खपणा वेगळा सांगायला नको. (हवाच असेल तर खरडवहीत सांगेन. मी पकाऊपणा खरडवह्यांमध्ये मनापासून करते.)

... अरे, आत्या किंवा मामी नाव ठेवते. पाळण्याजवळ पुरुष नसतात. बायकांच्या पसंदीचे, त्यांना सुचेल ते नाव ठेवले जाते. एखादा अपवाद.

तरीही तुम्हाला कुटुंबसंस्था आवडते? कमाल आहे!

बाकी काही गैरसमजांची यादी येणेप्रमाणे -

  • अविवाहित मुलींच्या नावापुढे बापाचे नाव सांगायची प्रथा तो तिचा नवरा आहे म्हणून सांगण्यासाठी आहे हा शोध मला लागला. (करोलरी - मी लग्न करण्यापूर्वी या भानगडी झाल्या.)
  • सद्य नावामुळे वरच्याप्रमाणे फिल येतो हा प्रचंड मोठा जावईशोध/सूनशोध आहे.
  • यातल्या गैरसोयींना आपल्या दृष्टीनं महत्त्व नसावं.
  • .
  • .
  • .

बॅटमॅन Wed, 25/06/2014 - 00:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इन्फरन्स कसा काढू नये याचा वस्तुपाठ म्हणून हा प्रतिसाद सांगायला हर्कत नाही! यद्यपि हा माल जुना झाला. पण वस्तुपाठमूल्य बाकी सनातन-नित्यनूतन आहे.

अनामिक Wed, 25/06/2014 - 08:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं कागदोपत्री नाव संहिता मनोहर जोशी असं आहे. दोन महाभागांनी (एक एलायसी एजंट आणि एक बँकेतली कारकून), माझं लग्न झालेलं आहे असं समजल्यावर, नावामागे सौ. जोडून दिलं.

तुझी तक्रार काय आहे? त्यांनी सौ.जोडून दिले ह्याची, की नावामागे श्री जोडले नाही ह्याची?

पण असो, अश्या गमती घडतात खर्‍या!

माझ्या बाबातीत सांगायचं तर बायकोला घेऊन अर्जंट केअरमधे गेलो होतो. तिचे अडनाव 'दरबार' आणि माझे 'पद्मावार', सुरवातीला भरायच्या फोर्ममधेही हे स्पष्टं लिहिलेलं होतं, शिवाय फी साठी दिलेल्या क्रेडीट कार्ड्वरही माझं नाव होतंच. तरी कार्ड परत करताना फॉर्मवर वरती बायकोचे (अड)नाव बघून मला बोलवण्यासाठी उल्लेख "मिस्टर दरबार" असा करण्यात आला. तेव्हापासून मी बर्‍याचदा गमतीमधे माझी ओळख मि. दरबार म्हणून करून देतो.

१ - हा श्री श्रीमतीचा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/06/2014 - 20:00

In reply to by अनामिक

कागदोपत्री भलतं नाव लावण्याचा अनुभव अनेकांना नसावा. मला आहे. अगदी लहानपणापासूनच. हाक मारायचं नाव अदिती असल्यामुळे काकाला त्याच्या विलमध्ये बदल करवून घ्यायला लागले. कधीतरी आकाशवाणीने दोन चेक अदिती नावाने दिले होते, ते वटवून/बदलून घेण्यासाठी बराच त्रास झाला. हे अनुभव नसते तरीही आणि बाईचं लग्न झालं हे तिचं सौभाग्य वगैरे मानण्यातला बुरसटपणा सोडून दिला तरीही कागदोपत्री माणसाचं नाव बदलणं, हे त्या माणसावर फ्रॉड म्हणून उलटू शकतं वगैरे गोष्टींची जाणीव या लोकांना नसते.

माझी ओळख मी सौ ... करून देण्यात गंमत नाही. कारण त्यात गतानुगतिकता आहे.

माझी व्यक्तिगत तक्रार - माझं नाव मी जे लिहीलेलं आहे ते सोडून भलतं काहीही लिहीण्याबद्दल आहे. मी माझ्या नावामागे कु, श्री, सौ, प्रा, डॉ काहीही लावत नाही. माझ्या सरकारी कागदपत्रांवरही हे असं काहीही नाही. माझं नाव लिहीताना लोकांनी तसंच लिहावं एवढीच अपेक्षा आहे.

मूळ मुद्दा - हे तुरळक एक-दोन ठिकाणी नाही, अनेकींच्या बाबतीत घडतं; त्याची दखल शासनाने घेतली याचा मला आनंद झाला.

अनामिक Thu, 26/06/2014 - 09:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं नाव लिहीताना लोकांनी तसंच लिहावं एवढीच अपेक्षा आहे.

सरकारच्या धोरण केल्याने हे बदलेल असे का वाटते? ज्या लोकांना स्वत:चे लॉजीक वापरून दुसर्‍याच्या नावात बदल करायचेत ते ते करणारच. मग सरकारची धोरणं, एथिक्स, इ. त्यांच्या गावीही नसणार/नसतं! माझा एक मित्र होता सणोष नावाचा, त्याने एक्झाम फॉर्म भरताना बरोबर नाव भरले, ज्या कुणी फॉर्म कंप्युटर मधे फीड केला त्याने स्वतःची अक्कल लढवत स्पेलींग मधे "टी" अ‍ॅड करून ह्याचे नाव संतोष केले. मित्र म्हणाला हे आता नेहमीचेच झालेय, ऑफिशियली संतोष नाव ठेवून घ्यावेसे वाटतेय!

टीप - वरचा प्रतिसाद "विनोदी" श्रेणीत लिहिला होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 26/06/2014 - 19:09

In reply to by अनामिक

माझ्या बूर्ज्वा कटकटींमध्ये ही एक होती. बाकी प्रेमाने, हट्टाने नाव बदलण्यासाठी गळ्यात पडणारे नातेवाईक (माझं नाव काय असावं यावरून मी समोर असतानाही भलतेच लोक चर्चा करत बसणं), नाव बदललं नाही यावरून किरकीर करणारे सरकारी कर्मचारी आणि त्यावरून सातत्याने 'पंगा' घेत बसायला लागणं (मला याचा अनुभव नाही, पण अनेकींना आहे), लोकांनी विचित्र नजरांनी त्यावरून आपल्याकडे पाहणं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे, कायदा-धोरणाच्या अभावापेक्षा धोरण करून काही फरक पडेल असं मला वाटतं. "नाव बदलण्याची सक्ती करणारा कायदा दाखवा" म्हणण्यापेक्षा "सरकारी धोरणानुसार नाव न बदलण्यात काहीही अडचण नाही" हे जास्त प्रभावी असण्याबद्दल मला खात्री आहे. जादूटोणा कायदा केला तेव्हाही अशाच शंका घेतल्या होत्या, तेव्हा सतीचं उदाहरण दिलं गेलं होतं.

एखाद्या मुलाला, पुरुषाला जेव्हा ही अडचण येत असेल तेव्हा त्याच्या दसपट स्त्रियांना याचा सातत्याने त्रास होत असेल. विशेषतः ज्यांची सरकारी खात्यांमध्ये कामं निघतात त्यांना. या लोकांना त्रास होतो तर तुम्हीही थोडा सहन केला तर काय बिघडलं, असा विचार तर यामागे नाही ना?

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 11:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाईचं लग्न झालं हे तिचं सौभाग्य वगैरे मानण्यातला बुरसटपणा

बाईचे लग्न होणे हे तिचे दुर्भाग्य असते का? आणि सौभाग्यवती हा शब्द "लग्न होऊ शकणे" वा " लग्न होऊ शकण्यास पात्र असणे" यासाठी नसतो. (अर्थ कसा काढावा हे आपल्याकडून शिकावे.) "जो साथी मिळाला आहे तो चांगला आहे हे नशीब आहे" इ इ असा असतो. मानवजातीत अजून तरी आई , बाप, भाऊ , बहिण, मित्र, मैत्रिण, हे सगळं असणं भाग्याचं मानलं जातं. पैकी नवराबायकोचे हितसंबंध सर्वात जास्त, सर्वात दीर्घकालीन, सर्वात एकत्र. म्हणून बायको सौ नि पती श्रीमान. कि लग्न नाही झाले तर पुरुषाला भिकारी मानणे (श्रीमान् न म्हणणे) हे देखिल बुरसटलेले विचार?

ऋषिकेश Thu, 26/06/2014 - 11:41

In reply to by अजो१२३

लग्न नाही झाले तर पुरुषाला भिकारी मानणे (श्रीमान् न म्हणणे) हे देखिल बुरसटलेले विचार?

अर्थातच!!
लग्न झाले नाही/केले नाही तर पुरूष भिकारी! बापरे, या न्यायाने नरेंद्र मोदी, वाजपेयी यांना श्रीमान लावायचे टाळणार की काय तुम्ही आता?

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 12:03

In reply to by अजो१२३

बाई किंवा बुवा यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता म्हणजे लग्न नव्हे असा काहीसा विचार आहे इतकेच. त्यावरून विपरीत अर्थ काढू नका.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 12:19

In reply to by बॅटमॅन

बाई किंवा बुवा यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता म्हणजे लग्न नव्हे हे ठिक आहे पण विवाहितेला सौभाग्यवती म्हणणे हे बुरसटलेपणा असा अर्थ देखिल विपरित नव्हे का?
विकिपेडीया-
Mrs. originated as a contraction of the honorific Mistress, the feminine of Mister, or Master, which was originally applied to both married and unmarried women. The split into Mrs. for married women from Ms. and Miss began during the 17th century.[1][2]

याचा अर्थ मिसेस म्हणजे मालकिण. एखादीला फुकटच मालकीण म्हणणे (कि नवर्‍याची मालकिण म्हणणे?) देखिल असेच बुरसटलेले असावे का? डॉक्टरच नसलेल्या माणसाला डॉक्टर म्हणणे? देशात समानता असताना राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, इ इ ना बळेच ऑनरेबल म्हणणे हे सगळं बुरसटलेपणाचं असावं. बाकीचे लोक ऑनरेबल नसतात का?

अनामिक Thu, 26/06/2014 - 12:31

In reply to by अजो१२३

बाईचे लग्न होणे हे तिचे दुर्भाग्य असते का?

नाही हे तिचे दुर्भाग्य नसते, परंतु "सौभाग्यवती" शब्दाला बुरसटलेपणा म्हणायला वाव आहे खरा. तसे नसते तर नवरा मेल्यावर लगेच सौभाग्यवतीचं गं.भा. किंवा श्रीमती (महाराष्ट्रापुरतं) झालं असतं का?

चर्चा सौभाग्यवती शब्दाबद्दल असताना त्याचा संबंध मिसेस ह्या शब्दाशी लावू नये असे वाटते.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 12:35

In reply to by अजो१२३

इन द्याट केस, पुरुषाचे लग्न झालेले असो किंवा विधुर असो, त्याला तेवढे मिष्टर अन बाईला मात्र मिसेस अन मिस हा दुजाभाव का असे विचारणे म्हणजे तुमच्या भाषेत अँटी-सामाजिक किंवा महापापी आहे का?

बाकी सुतावरून स्वर्ग-नरक-पाताळ-ब्रह्मलोक-वैकुंठ सर्वकाही गाठण्याच्या तुमच्या कौशल्याची दाद द्यावी तितकी थोडीच.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 12:49

In reply to by बॅटमॅन

नवरा मेल्यावर सौभाग्यवती न म्हणणे चूक आहे असे म्हणणे मला मान्य आहे. पण लग्न झाल्यामुळे सौभाग्यवती आहे असे म्हणणे बुरसटेलेपणाचे आहे असे म्हणणे बुरसटलेपणाचे आहे.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 12:53

In reply to by अजो१२३

पण लग्न झाल्यामुळे सौभाग्यवती आहे असे म्हणणे बुरसटेलेपणाचे आहे असे म्हणणे बुरसटलेपणाचे आहे.

इंडीड. पण 'लग्न झाल्यावर सौभाग्यवती' चे एक्स्टेन्शन 'विधवेला/अविवाहितेला अलौड नै' असे भौतेकवेळेस होत असल्याने ते तसे कुणी म्हटले तर थोडे समजून घेऊ शकतो.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 12:59

In reply to by बॅटमॅन

कुमारी - सौभाग्यवती - गंगाभागीरथी हे तीन्ही शब्द सन्मानजनक आहेत. आता पुरुषांना एकच शब्द का असा आक्षेप असेल तर ते योग्य आहे.
म्हणजे तिथेही कुमार -श्रीमान् -हिमालयशिवालिक असे शब्द हवेत म्हणा. पण सौभाग्यवती हा शब्द बुरसटलेला आहे असे मानणे हीन मानसिकता आहे.

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 13:21

In reply to by ऋषिकेश

त्या शब्दाशी पुरुष निगडीत हाच त्या बिचार्‍याचा दोष आहे. नाहीतर जगात लाखो विशेषणे आहेत. त्यांच्यावर ही पाळी येत नाही.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 13:22

In reply to by ऋषिकेश

अरुणजोशी नवे आहेत ओ. "हौ टु बी अ ट्रू ब्लू लिबरल-१०१" चा कोर्स त्यांनी अजून केलेला नसल्याने अशा चुका होतात त्यांच्याकडून, त्याला इलाज नाही.

मेघना भुस्कुटे Thu, 26/06/2014 - 13:01

In reply to by बॅटमॅन

या प्रकारचे वाद आता काहीसे एकसुरी, प्रेडिक्टेबल (मराठी प्रतिशब्द?), अनिर्णायक आणि त्यामुळे अंमळ कंटाळवाणे व्हायला लागले आहेत.

'का म्हणून तुम्ही आमच्या (!) संस्कृतीला / परंपरांना / संचिताला इतकं विखारी बोलता? आम्ही दुखावले जातो त्यामुळे...' विरुद्ध 'का म्हणून तुम्ही त्यांतल्या अन्यायाकडे काणाडोळा करून त्यांची पाठराखण करता? आम्ही दुखावले जातो त्यामुळे...' आणि याच्याच निरनिराळ्या आवृत्त्या. बदलते नटसंच. त्याच त्या टाळ्या. त्याच त्या श्रेण्या.

:tired:

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 13:13

In reply to by मेघना भुस्कुटे

वेल्कम टु इंटरनेट.

या प्रकारचे वाद नेहमीच एकसुरी नि प्रेडिक्टेबल असतात. कंटाळवाणे वाटणारे लोक तेवढे बदलतात इतकंच.

अतिशहाणा Thu, 26/06/2014 - 19:17

In reply to by अनामिक

मी लग्नानंतर बायकोचे आडनाव बदलले नाही. (यात लिबरल विचारसरणी वगैरे नसून पासपोर्टासकट सर्व कागदपत्रात तिचे माहेरचेच आडनाव असताना परत एकदा नव्या नावाची कटकट नको असा निव्वळ सोय असा विचार होता.) कायदेशीर नाव बदलण्यासाठी पेपरात द्यायची जाहिरात, जिल्हाधिकाऱ्याकडे द्यायचे प्रतिज्ञापत्र यासाठीही वेळ नव्हता. बायकोलाच मात्र नवे आडनाव घ्यायचा फार हुरुप आला होता असे वाटते. लग्न झाल्याझाल्या काही दिवसात फेसबुकावर वगैरे जिकडेतिकडे नवे आडनाव लावून तिने ज्यांना लग्नाबाबत माहीत नव्हते त्यांच्या शुभेच्छा मिळवल्या.

आता यात पुरुषप्रधान मानसिकता कुठे आली बॉ?

अजो१२३ Thu, 26/06/2014 - 20:07

In reply to by अतिशहाणा

प्रतिसाद आवडला, एक्सेप्ट फॉर "मी लग्नानंतर बायकोचे आडनाव बदलले नाही." म्हणजे यातून 'माझा एक अधिकार' असा भाव येतोय तो ठिक नसावा.

अनुप ढेरे Thu, 26/06/2014 - 22:32

In reply to by 'न'वी बाजू

सकाळीसकाळी एखादा लिबरल चावला होता काय?

लिबरल सकाळीच चावला असं का वाटल तुम्हाला? का रात्री लिबरल चावला तर फार एफेक्ट नाही होत?

अतिशहाणा Thu, 26/06/2014 - 20:31

In reply to by अजो१२३

अभिप्रेत अर्थः बायकोचे नाव बदलू नये यासाठी मी पुरेपुर प्रयत्न केले. मात्र तरीही जिथे शक्य आहे तिथे बायकोने नाव बदललेच.

शहराजाद Fri, 27/06/2014 - 01:47

In reply to by अतिशहाणा

मी लग्नानंतर बायकोचे आडनाव बदलले नाही. (यात लिबरल विचारसरणी वगैरे नसून पासपोर्टासकट सर्व कागदपत्रात तिचे माहेरचेच आडनाव असताना परत एकदा नव्या नावाची कटकट नको असा निव्वळ सोय असा विचार होता.) कायदेशीर नाव बदलण्यासाठी पेपरात द्यायची जाहिरात, जिल्हाधिकाऱ्याकडे द्यायचे प्रतिज्ञापत्र यासाठीही वेळ नव्हता. बायकोलाच मात्र नवे आडनाव घ्यायचा फार हुरुप आला होता असे वाटते. लग्न झाल्याझाल्या काही दिवसात फेसबुकावर वगैरे जिकडेतिकडे नवे आडनाव लावून तिने ज्यांना लग्नाबाबत माहीत नव्हते त्यांच्या शुभेच्छा मिळवल्या.

आता यात पुरुषप्रधान मानसिकता कुठे आली बॉ?

पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते :)

चिंतातुर जंतू Wed, 25/06/2014 - 11:31

In reply to by अजो१२३

>> सरकारने नावांच्या लफड्यात न पडलेले बरे. आमच्या घरी मी माझे नाव "अरुण भास्करराव जोशी" लिहिणार नि वडीलांचे नाव "भास्करराव भगवंतराव जोशी" असे लिहिणार व वडील स्वतःचे नाव "भास्कर भगवंतराव जोशी" असे लिहिणार अशी प्रथा आहे. सरकारच्या धोरणाने मी "जोशी अरुण भास्कर" नि वडील "जोशी भास्कर भगवंत" असे लिहावे (कोणी का लिहिना) असे आहे. म्हणजे सरकारी धोरण आणि आमचे नाव लिहायची पद्धत जुळतच नाही. कोण कूठे राव लावणार? आडनाव अगोदर कि नाव? शिवाय माझ्या नावाला आडनाव + दिलेले नाव म्हणणे तर अगदीच चूक आहे. "अरुण भास्करराव" हे माझे दिलेले नाव नाहीच. आता काय देश सोडून जायचे कि काय?

नक्की अडचण कळली नाही. वडिलांचं नाव कागदोपत्री भास्कर असलं तर सरकारला तेच ग्राह्य असणार. तुम्हाला वडिलांचं नाव कागदोपत्री वेगळं लावायचं असलं तर वडिलांना आपलं कागदोपत्री नाव बदलावं लागणार. अर्थात, वेगळं अ‍ॅफिडेव्हिट करून स्वतःचं नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही असतो.

अजो१२३ Wed, 25/06/2014 - 12:10

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या खानदानाच्या प्रथांप्रमाणे -
मी लिहिताना
१. (मुलगा) ईशान्य अरुण जोशी,(मी) अरुण भास्करराव जोशी, (वडील)भास्करराव भगवंतराव जोशी,
वडील लिहिताना
१. (नातू) ईशान्य अरुण जोशी,(मुलगा) अरुण भास्कर जोशी, (स्वतः)भास्कर भगवंतराव जोशी,
मुलगा लिहिताना
१. (स्वतः) ईशान्य अरुणराव जोशी,(पपा) अरुणराव भास्करराव जोशी, (आजोबा)भास्करराव भगवंतराव जोशी,
अशी सिस्टिम आहे.

सरकारच्या मते ही एकूण सात माणसांची नावे झाली.
शिवाय ती अधिकृत रित्या उलटी आहेत, म्हणजे आडनाव अगोदर.ते ही मला पसंद नाही. दिल्लीत सरकारात माझ्या बायकोचे नाव श्रीमती क्ष क्ष असे लिहितात. मराठवाड्यात श्रीमती जनरली विधवा स्त्रीयांना म्हणतात. याने माझ्याच असण्यावर प्रश्नचिन्ह येते म्हणून मला ते पसंद नाही.

माझे पॅनकार्डची अप्प्लीकेशन मला चार्-पाच वेळा परत आली. म्हणे तुमच्या वडीलांचे नाव मॅच होत नाही. आता राव लावला आहे कि नाही आणि जोडून लावला कि तोडून ( कारण कोणत्याही कागदपत्रात उत्तर भारतीय राव वेगळा लिहितात. आमच्या एच आर ला दर वर्षी लिहून माझे नाव अरुण भास्कर राव जोशी असेच कितीतरी कम्यूनिकेशन्स मधे येते. मग कितीवर्षापूर्वी कोणते कागदपत्र, ज्यात वडीलांचे नाव लिहिले आहे व आय टी ला सब्मिट केले होते ते आठवता आठवता नाकी नऊ. आणि पॅन वाल्यांचा ऑफिशियल लाईन विचित्रच - Application denied. Request to process change of name of father cannot be processed. जुने पॅन हरवले आहे, नवे द्या, बापाचे नाव जुनेच टाका हे मला सांगताच येईना. ते मँडेटरी फिल्ड होते आणि किमान बापाचे नाव नीट माहिती असायची करखात्याची अपेक्षा रास्तच म्हणायची.) चा घोळ.

चिंतातुर जंतू Wed, 25/06/2014 - 12:19

In reply to by अजो१२३

>> माझ्या खानदानाच्या प्रथांप्रमाणे

इथूनच अडचणी सुरू होत नाहीत का? माझ्या खानदानात आल्यागेल्याला 'रावबहादूर', 'महामहोपाध्याय' नाही तर 'वज्रचुडेमंडित' लावायची प्रथा भली असली, तरी लोकशाही सरकारनं ते मान्य करावं असा आग्रह मी का धरावा? त्यातही अ‍ॅफिडेव्हिट करून नाव बदलता येईल, पण मी सांगतो ते माझ्या वडिलांचं नाव आणि वडील सांगतात ते त्यांचं नाव ह्यातच जर फरक असेल तर ते कुणी का ग्राह्य मानेल?

अजो१२३ Wed, 25/06/2014 - 12:25

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या खानदानाच्या प्रथा काय अन् सरकारचे नियम काय, फरक काय? एकापेक्षा दुसरे श्रेष्ठ कसे? आणि लादणूक का ? हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला नाही का?

मन Wed, 25/06/2014 - 12:31

In reply to by अजो१२३

सरकरनं प्रत्येकाच्या प्रथा परंपरांनुसार चालायचं ठरवलं तर ते कधीच चालू शकणार नाही १०० कोटिंच्या देशात.
काही ना काही कॉमन अंडारस्टँदिंग असनं भाग आहे.
"हेच्च का, तेच्च का" असं विचारण्यापेक्षा आहे ते घेउन चालू पडणं व्यवहार्य ठरावं.

अजो१२३ Wed, 25/06/2014 - 12:39

In reply to by मन

मग हेच बायकांना पुरुषांचं आडनाव लावायचं कि पुरुषांना बायकांचं यालाही लागू व्हावं.

एका व्यक्तिचे नाव "प्रिका सामा कोला" असले तर ती स्त्री आहे का पुरुष, लग्न झालेली आहे कि नाही, सामा तिचा बाप आहे, नवरा आहे, आई आहे कि बायको आहे नि कोला आईचे माहेरचे आडनाव, बापाचे आडनाव, सासूचे माहेरचे आडनाव, सासर्‍याचे आडनाव पैकी काय आहे हे सगळे कंफ्यूजन प्रत्येक वेळी असणार नाही का?

आता सध्याला जी सिस्टिम आहे त्यात अन्याय शोधणे आणि संभ्रम निर्माण करणे योग्य असेल तर माझी ही माझ्या खानदानाच्या नियमांनी आमचे नाव ठेवायची प्रथा मृत होऊ नये ही मागणी रास्त ठरावी.

चिंतातुर जंतू Wed, 25/06/2014 - 13:24

In reply to by अजो१२३

>> आता सध्याला जी सिस्टिम आहे त्यात अन्याय शोधणे आणि संभ्रम निर्माण करणे योग्य असेल तर माझी ही माझ्या खानदानाच्या नियमांनी आमचे नाव ठेवायची प्रथा मृत होऊ नये ही मागणी रास्त ठरावी.

>> माझ्या खानदानाच्या प्रथा काय अन् सरकारचे नियम काय, फरक काय? एकापेक्षा दुसरे श्रेष्ठ कसे? आणि लादणूक का ? हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला नाही का?

रीतसर अ‍ॅफिडेव्हिट करून तुम्ही तुमचं नाव बदलू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हाला नक्कीच आहे. पण 'मी माझ्या नावात वडिलांचं नाव भास्करराव लावणार, पण त्यासाठी कोणताही कायदेशीर पुरावा माझ्याकडे नाही, आणि तरीही ते मी म्हणतो म्हणून सरकारनं मान्य करावं' हा आग्रह अवास्तव वाटतो.

अनामिक Wed, 25/06/2014 - 12:23

In reply to by अजो१२३

तुमच्या खानदानाच्या प्रथेप्रमाणे, किंवा तुम्हाला पसंद नाही म्हणून अख्ख्या देशाने किंवा सिस्टीमने त्यांची नाव लिहायची पद्धत बदलायची का?

तुम्ही तुमच्या वडीलांच्या नावापुढे आदरार्थी "राव" लावता. आम्हाला शाळेत असताना, दहावीच्या परि़क्षेचा फॉर्म भरतानाच राव, साहेब, अशी आदरार्थी सफिक्स न लावायला बजावले होते. तुम्ही जरी वडीलांच्या नावापुढे राव लावत असला तरी त्यांचे कागदोपत्री ते नाव नव्हे, तेव्हा जे नाव आहे ते लिहा असे सांगण्यात आले. त्याचा अजुनही फायदा होतो. सगळी कागदपत्रे नावासाठी मॅच होतात.

अजो१२३ Wed, 25/06/2014 - 12:28

In reply to by अनामिक

तुमच्या खानदानाच्या प्रथेप्रमाणे, किंवा तुम्हाला पसंद नाही म्हणून अख्ख्या देशाने किंवा सिस्टीमने त्यांची नाव लिहायची पद्धत बदलायची का?

का हो, आम्ही आमच्या घरात पिठले भात खातो, म्हणजे सार्‍या भारताने खावा असा आमचा आग्रह असतो असे कशावरून? बाकी भारताचे माहित नाही, व्यवस्थेत किमान आमचे नाव तरी आमच्या शैलीने लिहायची व्यवस्था नको का?

नितिन थत्ते Wed, 25/06/2014 - 12:42

In reply to by अजो१२३

म्हणूनच बहुधा त्या फॉर्म्स मध्ये "गिव्हन* नेम" असं म्हटलेलं असतं.

तुमचं गिव्हन नेम अरुण आहे अरुणराव, अरुणदादा नाही. तसेच तुमच्या वडिलांचं गिव्हन नेम भास्कर आहे भास्करशेट/भास्करराव नाही.

*गिव्हन नेम (बारशाला ठेवलेले नाव) हे शिवा** असावे. गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलवतंस छत्रपती श्री शिवाजी महारा.......ज नाही.

**शिवा"जी" सुद्धा नसावे.

अजो१२३ Wed, 25/06/2014 - 12:44

In reply to by नितिन थत्ते

नाय नाय नाय. चीड त्याचीच आहे. पासपोर्ट फॉर्म नीट वाचावा. आमचे गिवन नेम अरुण नाही, अरुण भास्करराव आहे. संताप आहे.

नितिन थत्ते Wed, 25/06/2014 - 12:49

In reply to by अजो१२३

ओके.... ती जेन्युइन चूक आहे ती दुरुस्त करून घ्यावी.

ते कायतरी "डोन्ट अ‍ॅट्रिब्यूट मलैस टु व्हॉट कॅन बी एक्स्प्लेन्ड बाय मिअर स्टुपिडिटी" असं म्हणतात ना?

अनामिक Wed, 25/06/2014 - 13:00

In reply to by अजो१२३

पास्पोर्ट फॉर्मनुसार

2.1 Applicant's Given Name (Given Name means First name followed by Middle name (If any))(Initials not allowed)

आपण आपले मिडल नेम म्हणून वडीलांचे नाव दिले असेल तर त्यात पास्पोर्ट खात्याची चूक कशी? त्यांनी स्प्ष्टपणे इफ एनी अस्म लिहिलंय की!

अजो१२३ Wed, 25/06/2014 - 13:05

In reply to by अनामिक

First name followed by Middle name (If any)

मिडल नेम हे फक्त उत्तर भारतात असते. लाल / रंजन / कुमार इ इ. पास्पोर्टवाल्यांना बापाचे/पालकाचे नाव अभिप्रेतच नाही.

चिंतातुर जंतू Wed, 25/06/2014 - 13:30

In reply to by अजो१२३

>> मिडल नेम हे फक्त उत्तर भारतात असते. लाल / रंजन / कुमार इ इ. पास्पोर्टवाल्यांना बापाचे/पालकाचे नाव अभिप्रेतच नाही.

मराठी माणसांच्या पासपोर्टवर बापाचं / पतीचं नाव 'गिव्हन नेम'मध्ये सर्रास पाहिलेलं आहे. त्यामुळे पासपोर्टवाल्यांना काहीही अभिप्रेत असो; महाराष्ट्राची ही 'खानदानी प्रथा' म्हणता यावी ;-)

अनामिक Wed, 25/06/2014 - 14:04

In reply to by अजो१२३

मिडल नेम हे फक्त उत्तर भारतात असते. लाल / रंजन / कुमार इ इ. पास्पोर्टवाल्यांना बापाचे/पालकाचे नाव अभिप्रेतच नाही.

चूक, आंध्रा आणि आता तेलंगाणा राज्यातही ऑफिशियली दोन नावे म्हणजे फर्स्ट नेम आणि मिडल नेम असणे अगदीच कॉमन आहे, आणि असे कित्येक मित्र मैत्रीणीही आहेत. ते मिडल नेमच्या ठिकाणी मिडल नेमच लिहितात, वडीलांचं नाव लिहित नाही. वडीलांच नाव मिडल नेम म्हणून मी फक्तं महाराष्ट्रातच पाहिलं आहे. आणि अश्यातून तुम्ही तुमच्या वडीलांचे नाव देऊन झालेला घोळही बघितला आहे. आपल्याला मिडल नेम नसताना जिथे ते द्यायला सांगितलं तिथे चुकीचे आणि विनाकारन देऊन मग संताप करून घेऊ नये. तुमच्या वडीलांच्या नावासाठी फॉर्ममधे वेगळं विचारलेलं असतं. आणि पासपोर्टवरही आई, वडील आणि स्पाऊस अश्या तिघांचेही नावे असतात.

ॲमी Tue, 24/06/2014 - 11:30

असाच एक अवांतर किस्सा: टर्म एंडचे सबमिशन करताना आमच्या एका सरांनी फाइलवरची नावं बघून सगळ्यांना फार झापलं होतं. कोणी फक्त नाव आडनाव लिहीलय तर कोणी वडीलांचे अद्याक्षर लिहीलय. आम्हाला झेपेना ते का रागावतायत. नंतर कळल की 'बाप अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण इ इ खर्च करतो आणि त्याचंच नाव लिहायला तुम्हाला लाज वाटते का?' असे त्यांचे म्हणणे होते. उत्तरेकडच्यांना हे कैच्याकै वाटलेल. कारण तिकडे शाळाकॉलेजात वडीलांचे नाव लिहणे दूरच आडनावाचेपण फक्त अद्याक्षर लिहायचा ट्रेंड होता म्हणे. बिहारींनातर आडनावपण नसत बहुतेक म्हणून ते कुमार लावतात.

ॲमी Tue, 24/06/2014 - 17:00

In reply to by अजो१२३

हो ना. उत्तरेत हा प्रकार तर दक्षिणेत अजूनच काहीतरी वेगळ. मग मुळात नाव आई/बापाचेनाव आडनाव असा फॉर्मेट भारतात कुठेकुठे पाळला जातो? इतर देशात काय होतं? जंतूंनी दिलेला टेकनीकल कारण याशिवाय त्या फॉर्मेटचा उपयोग काय? उगाच झापलं आम्हाला :-/.

बॅटमॅन Tue, 24/06/2014 - 17:04

In reply to by ॲमी

उगाच झापलं आम्हाला :-/.

हो नैतर काय! आता टाईम मशीनचा शोध लागला की तुम्ही सगळ्या अन्यायाचा बदला घेऊ शकाल. आम्हीही एक लिष्टच बनवावी म्हणतोय तशा अन्यायांची ;)

'न'वी बाजू Tue, 24/06/2014 - 17:18

In reply to by ॲमी

जंतूंनी दिलेला टेकनीकल कारण

फॉर्म माणसासाठी, की माणूस फॉर्मसाठी?

(तुम्ही माणूस आहात, की ब्यूरोक्रॅट, यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.)

-------------------------------------------------------------------------------------

जगात कोठेही जा, या स्पीशीज़शी पाला (झालेच तर पाचोळासुद्धा) पडतोच.

कदाचित हे जगातील 'ओल्डेष्ट प्रोफेशन' गणता यावे काय?

अजो१२३ Tue, 24/06/2014 - 17:23

In reply to by ॲमी

दक्षिण - गावाचे नाव + स्वत:चे नाव
उत्तर - आडनाव + स्वतःचे नाव + कुमार्/सिंग्/चंदन्/रंजन्/नंदन (ऐच्छिक)
बिहार - स्वतःचे नाव + इतर (ऐच्छिक)
महाराष्ट्र - आडनाव + स्वतःचे नाव + बापाचे नाव
पूर्वोत्तर - आडनाव + नाव
मेघालय - आईचे आडनाव + नाव
केरळ - आईच्या गावाचे नाव + स्वतःचे नाव
पंजाब - नाव + सिंग्/कौर + आडनाव

सगळ्यात चीड आणणारा प्रकार - पासपोर्ट - आडनाव + दिलेले नाव

भास्करराव सारखे क्लीष्ट मधले नाव माझ्या बापाने मला का लावले असावे असा प्रश्न माझ्या बर्‍याच मित्रांना पडलेला असतो. ज्यांना नसतो ते मला तेलगू समजत असू शकतात- राव शब्दामुळे.

मागच्या एका कंपनीत ९०-१०० ट्रेनिंना किट देताना कि असेच काहीतरी मी शेवटचा उरलो. माझे नाव का नाही पुकारले म्हणून विचारले तर त्यांनी अनुपस्थित मुलांची नावे सांगीतली. त्यात एक नाव होते जे ए बी राव. तो मी होतो.

ॲमी Tue, 24/06/2014 - 17:45

In reply to by अजो१२३

ए बी राव :-D :-D
पण ते तमिळ लोकांच्या नावात अद्याक्षरांची आगगाडी असते उदा पी व्ही एस शास्त्री ती काय म्हणे?

अजो१२३ Tue, 24/06/2014 - 17:51

In reply to by ॲमी

जे ए बी राव, ए बी राव नव्हे.

तमिळ मित्रांनी बर्‍याचदा सांगीतले आहे. विसरलो. पण पहिले अब्रिव्हिएशन गावाचे असते, शेवटचे स्वतःचे नाव असते.
आमचा एक मित्र होता. वाय एन डी एस एस आर रामा. वाय हे गावाचे अद्याक्षर.

'न'वी बाजू Tue, 24/06/2014 - 23:02

In reply to by ॲमी

झुकझुकगाडीपद्धत तमिळांपेक्षा तेलुगु मंडळींत अधिक प्रचलित असावी. आधुनिक तमिळांत दोन, फारफारतर तीनहून अधिक आद्याक्षरे फारच क्वचित पाहिलेली आहेत. तेलुगु मंडळींत मात्र पाच ते सात आद्याक्षरे ही बर्‍यापैकी सामान्य बाब असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

बॅटमॅन Wed, 25/06/2014 - 16:59

In reply to by ॲमी

हे घ्या. पाच आद्याक्षरवाले तेलुगु. आयेसाय बंगळूरूच्या मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंटचे हेड टी.एस.एस.आर.के. राव.

http://www.isibang.ac.in/~tss/

अनामिक Wed, 25/06/2014 - 08:53

In reply to by 'न'वी बाजू

अद्याक्षरवाला नाही पण माझ्या बॅचमधे एक "वेंकट शाम नाग-नटराजा विनोदकुमार कोल्लुरू" नावाचा तेलुगु मित्र होता.

गब्बर सिंग Tue, 24/06/2014 - 15:22

http://india.blogs.nytimes.com/2014/06/23/health-minister-questions-str…

“The thrust of the AIDS campaign should not only be on the use of condoms,” he said in a telephone interview last week. “This sends the wrong message that you can have any kind of illicit sexual relationship, but as long as you’re using a condom, it’s fine.”

जनता बिनडोक असते व मंत्र्यांनाच काय ती अक्कल असते ह्या गैरसमजातून आलेली विधाने.

मन Tue, 24/06/2014 - 15:34

In reply to by ऋषिकेश

+१
गविनं ते ९९% टाक्के शक्यता, २% शक्यता बद्दल लैच भारी, नेमक्या शब्दांत लिहिलं होतं.
कुणाकडे दुवा/url असेल तर द्यावा/द्यावी.

चिंतातुर जंतू Tue, 24/06/2014 - 15:39

In reply to by ऋषिकेश

>> नै कळ्ळे
कंडोम वापरला की सगळी सुरक्षा मिळते हे चुकीचेच आहे.

(बातमीनुसार) पती-पत्नीच्या नात्याचं पावित्र्य ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अशा ('कंडोम वापरा. एड्सपासून बचाव करा'') कँपेनमुळे भारतीय संस्कृतीचं नुकसान होतंय असा आदरणीय आरोग्यमंत्र्याचा मुद्दा आहे.

ऋषिकेश Tue, 24/06/2014 - 16:12

In reply to by चिंतातुर जंतू

ओह.. बातमी आता वाचली. आधी फक्त गब्बरने दिलेला कोट वाचला होता.
बाकी वक्तव्याने धक्का बसला नाहीच, फक्त पोप आणि आपले आरोग्यमंत्री यांच्यातील मतैक्याने डॉळे पाणावले :P

अजो१२३ Tue, 24/06/2014 - 17:25

फक्त आईचं नाव कागदपत्रांमध्ये लावण्याची आणि आपलं नाव, आडनाव ठरवण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना मिळणार आहे.

केरल मधे नि मेघालय मधे ही कायदे करा ब्वॉ.

चिंतातुर जंतू Wed, 25/06/2014 - 13:20

विख्यात फ्रेंच दिग्दर्शक आंद्रे तेशिने ह्याची 'द गर्ल ऑन द ट्रेन' आज संध्याकाळी ६:३० वाजता पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखवली जाईल. प्रवेश सर्वांसाठी खुला. तिकीट नाही.
अधिक माहिती
ट्रेलर :

ऋषिकेश Wed, 25/06/2014 - 16:59

सरदार सरोवराची भिंत वाढवण्याविरोधात काल दिल्लीत मेधाताईंच्या नेतृत्त्वाखाली धरणे सुरू झाले होते. त्याचा आज दुसरा दिवस
श्रीमती वृंदा करात व काँग्रेसच्या कुक्क्षीच्या आमदारांनी तिथे उपस्थिती लाऊन या आंदोलनाला पाथिंबा दिला आहे.

मिहिर Wed, 25/06/2014 - 21:54

मंत्रिमंडळाने मराठ्यांना १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण ते कमाल आरक्षण ५० टक्केच असावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल का काहीतरी होते ना?

नितिन थत्ते Wed, 25/06/2014 - 22:11

In reply to by मिहिर

मुस्लिम आरक्षण बहुधा कोर्टात खारिज होईल. मराठा आरक्षण बहुधा ओबीसीमधला तुकडा असेल.

अतिशहाणा Wed, 25/06/2014 - 22:33

In reply to by मिहिर

दोन टक्के आरक्षण विशेष मागास प्रवर्ग (गोवारी समाज वगैरे. त्यांच्या नागपुरातील विधानसभेच्या सत्राच्या वेळी केलेल्या आंदोलनात काही लोक चेंगराचेंगरीत ठार झाले होते) साठी आहे. हे दोन टक्के आरक्षण ५० + २ असे नसून ५० टक्के आरक्षणाच्या जागा भरल्या गेल्या नाहीत तर त्यातील दोन टक्के जागा वि.मा.प्र. साठी राखून ठेवल्या जातात असे आहे.

चू.भू.द्या.घ्या.

बाबा बर्वे Thu, 26/06/2014 - 09:38

In reply to by नितिन थत्ते

मुस्लिम आरक्षण बहुधा कोर्टात खारिज होईल.

- मुस्लिम आरक्षणाविरोधात सद्य महाराष्ट्रातील कुणीही कोर्टात जाईल असे वाटत नाही.

नितिन थत्ते Thu, 26/06/2014 - 09:48

In reply to by बाबा बर्वे

>>- मुस्लिम आरक्षणाविरोधात सद्य महाराष्ट्रातील कुणीही कोर्टात जाईल असे वाटत नाही.

ऐला. म्हणजे स्वधर्मातल्या कोणाला आरक्षण दिले तर सवर्ण कोर्टबाजी करतात पण परधर्मियांना दिले तर करत नाहीत असे आहे का?

ऋषिकेश Thu, 26/06/2014 - 09:42

In reply to by नितिन थत्ते

आरक्षण राजकीय नसल्याने जरा वेगळी कायदेशीर गंमत होणार आहे.
बहुया कोर्ट काय निर्णय देते ते.

ऋषिकेश Thu, 26/06/2014 - 12:17

In reply to by बॅटमॅन

म्हंजे सध्या हे आरक्षण फक्त शिक्षणक्षेत्र व नोकर्‍यांमध्ये आहे.
'मराठा राखीव मतदारसंघ' नसतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांतरही यंदा सरपंच/महापौर/नगराध्यक्ष मराठा असावा वगैरे आरक्षण नसेल (जे SC, ST यांना असते).

एक प्रवाद असा आहे की ५०%ची लिमिट ही राजकीय आरक्षणासाठी आहे. यावरचा विवाद कोर्टात प्रलंबित आहे (तमिळनाडुत ५०%च्या वर आरक्षण आहे त्या विरोधातील). त्यामुळे म्हटले की सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आल्याशिवाय नक्की लिमिट कशावर आहे त्यावर मतमतांतरे होतच रहाणार.

बॅटमॅन Thu, 26/06/2014 - 12:23

In reply to by ऋषिकेश

ओह अच्छा, धन्यवाद.

बाकी सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय तो एकदाचा यावा असे वाटते. कंडका पडून गेला की कळेल तरी पुढचा मार्ग किती खडतर आहे ते...औघड आहे एकूण..

ऋषिकेश Thu, 26/06/2014 - 16:14

In reply to by नितिन थत्ते

हो पण या प्रक्रियेत घोटाळा होता हे ही सिद्ध झालेच की!
अश्या गोष्टी सिद्ध करायला लागणारा पेशन्स, सोर्सेस आणि कागदपत्रे या तीनही गोष्टीत स्वामीं इतका 'ब्लफमास्टर' सध्या भारतीय राजकारणात कोणी असेल काय?

ऋषिकेश Thu, 26/06/2014 - 16:39

In reply to by नितिन थत्ते

माझ्या आठवणीनुसार वादग्रस्त अलोकेशन कँसल करावे अशी मागणी करणारे स्वामी हे एकमेव वादी होते. शिवाय बहुदा त्यांनीच पब्लिक प्रॉसेक्युटरला या केसमध्ये सहभागी करण्यास कोर्टकडे याचिका करून केस स्ट्राँग केली होती. इतकेच नाही तर CBI इन्क्वायरीतील लूपहोल्स दाखवून देण्यापुरते स्वामींना आपली बाजु सीबीआय कोर्टापूढे स्वतःच मांडायची परवानगीही मिळाली होतॉ.

शिवाय चिदंबरम यांना विटनेस म्हणून मात्र समाविष्ट करण्यात स्वामी यांनी यश मिळावले होते.

ऋषिकेश Thu, 26/06/2014 - 16:09

जर हा प्रस्तावित कायदा झाला ऑनलाईन फोरम्सवर संतांची निंदा / संतांवर टीका केल्यास शिक्षा होणारसे दिसते
या सगळ्यात 'संत' कोणाला म्हणावे ही डेफिनेशन सरकार करणार याहून एकाच वेळी हास्यास्पद नी रोचक दुसरे काही नसावे!

मन Thu, 26/06/2014 - 17:41

In reply to by ऋषिकेश

लेख ठीकठाकच आहे. पण त्याच्या शेवटाचा 'स्वतंत्र भाजपचे पहिले पंतप्रधान' हा धमाल शेरा प्रचंडच आवडला.
ह्यापूर्वी असाच आवडलेला शेरा म्हणजे अडावाणींबद्दल बोलताना थत्त्यांनी " आपले पर्मनण्ट भावी पंतप्रधान" असा वाक्प्रचार वापरला होता. हे असं सुचणं लै म्हणजे लैच भारी आहे.
"पर्मनण्ट भावी " काय, "स्वतंत्र भाजपचे" काय...
काहीही.
कहर आहे.

मी Thu, 26/06/2014 - 17:59

आपली चुकीची किंवा जुनी माहिती आंतरजालावरुन पुसुन टाकण्याचा अधिकार आता मिळाला आहे, ह्या कायद्याअंतर्गत तुम्ही अगदी गुगललासुद्धा तुमची एखादी माहिती पुसुन टाकण्यासाठी सांगू शकता. पण दुर्दैवाने हा अधिकार फक्त युरोपिअन युजर्ससाठीच उपलब्ध आहे. ह्या कायद्याबद्दल अधिक इथे वाचता येईल.

अतिशहाणा Thu, 26/06/2014 - 18:03

In reply to by मी

मला वाटते फक्त सर्च इंजिनमधून ती माहिती काढून टाकण्याचा अधिकार आहे. माहिती तशीच राहणार आहे फक्त शोधण्याच्या वाटा कमी होणार आहेत.

गब्बर सिंग Thu, 26/06/2014 - 23:40

In reply to by अतिशहाणा

मला नेमके हेच अन्याय्य वाटते.

मी याबद्दल तपशीलात वाचलेले नाहिये पण हे थोडेसे चोर सोडून ...

जिथे माहीती स्टोअर्ड आहे तिथून ती पुसुन टाकली जावी हा अधिकार असायला हरकत नाही. पण सर्च इंजिन वर जबरदस्ती का ?

तपशीलात वाचायला हवे...

नितिन थत्ते Fri, 27/06/2014 - 09:46

In reply to by गब्बर सिंग

>>जिथे माहीती स्टोअर्ड आहे तिथून ती पुसुन टाकली जावी हा अधिकार असायला हरकत नाही. पण सर्च इंजिन वर जबरदस्ती का ?

ती जिथे ष्टोअर केलेली आहे ती मी केलेली नाही. मी माझ्या प्रोफाइलवर ष्टोअर केली होती (वाल्या कोळी). ती भें** त्या सर्च इंजिंनने चोरून आणखी कुठेतरी ष्टोअर केली आहे (वाल्याकोळी). म्हणून सर्च इंजिनवर जबरदस्ती. माझ्या प्रोफाइलवरून ती माहिती मी काढून/बदलून टाकली (वाल्मिकी ऋषी) तरी त्यांच्याकडे स्टोअर केलेली माहिती (वाल्या कोळी) मला काढून टाकता येत नाही. ती त्यांनीच काढून टाकायला हवी.

गब्बर सिंग Fri, 27/06/2014 - 13:03

In reply to by नितिन थत्ते

ती त्या सर्च इंजिंनने चोरून आणखी कुठेतरी ष्टोअर केली आहे

पण माझ्या माहीतीत सर्च इंजिन फक्त सर्च व डिस्प्ले करते. अनेक वेबसाईट्स सर्च करून सिझल्ट्स डिस्प्ले करते. जास्तीत जास्त डिस्प्ले करताना प्राधान्य बदलते. पण सर्च इंजिन स्टोअर सुद्धा करते हे मला माहीती नव्हते हो.

नितिन थत्ते Fri, 27/06/2014 - 13:52

In reply to by गब्बर सिंग

तुम्ही केलेल्या सर्च वरून तुमचे प्रोफाइल बनवते आणि त्यानुसार सर्च रिझल्ट दाखवते.... त्या अर्थी सर्च इंजिन माहिती स्टोअर करत असते.