Skip to main content

@AutismMarathi followed by @DrTempleGrandin! :)

(लेखमालिकेतील उरलेले लेख पोस्ट करायचे आहेत, मात्र आजची ही घटना मला शेअर करायलाच हवी, त्यामुळे लेखमालिकेला ब्रेक जरा.. ! :))

मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन - त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अ‍ॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले. व मुख्य म्हणजे ऑटीझमच्या त्या अगदी महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. ऑटीझमवरील त्यांची भाषणं, कॉन्फरन्सेस प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं देखील! 'द वे आय सी इट', 'डिफरंट.. नॉट लेस' ही पुस्तकं वाचनीय व अभ्यास करण्याजोगी आहेत. या डॉ. टेंपल ग्रांडीन यांन मी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर फॉलो करू लागले आणि आज दुपारी हे नोटिफिकेशन माझ्या फोनवर!

Dr.TempleGrandin

WOW! Dr. Temple Grandin!? Such Notable, remarkable and famous person from Autism community/ Autism activist following me? :)

I know she might have whole PR team to manage her twitter account and everything. And what do you really need to follow a person on twitter? But anyway, this gave me real shock( good one) when I received this notification on my iphone.
For more information read: http://www.grandin.com/

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अरविंद कोल्हटकर Thu, 15/01/2015 - 08:44

ह्या घटनेमुळे तुम्हाला झालेला आनंद वरील लेखनामधून आमच्यापर्यंत पोहोचला इतका तो मोठा आहे.

तुमचे ह्या विषयावरचे सर्व लेख मी काळजीपूर्वक वाचले. प्रतिक्रिया दिली नाही अशासाठी की असा अनुभव स्वतःला नसल्याने काही लिहिण्याजोगे नव्हते. पण उपाशी बोका ह्यांची मला थोडी कोरडी वाटलेली प्रतिक्रिया वाचून असे वाटले की मला स्वतःला हे लेख योग्य संबोधनाच्या दिशेने चाललेले आहेत असे जर वाटत असले तर तसे न लिहिणे हे अप्रामाणिकपणाचे ठरेल. तुमच्या लेखनासारखे लेखन आवश्यकच आहे असे स्पष्ट कळविण्यासाठी हा प्रतिसाद.

Nile Thu, 15/01/2015 - 09:10

तुम्हाला झालेला आनंद कळण्यासारखा आहे. या बातमीचे औचित्यसाधून अजून एक बातमी इथे देतो.

एनपीआरवर नुकतंच ऐकलं: न्युयॉर्कमधील ब्रॉडवे(थिएटर)वर "The Curious Incident of the Dog in the Night-Time" नावाच्या पुस्तकावर आधारीत नाटक सादर झाले आहे. यातील नायक एक १५ वर्षांचा ऑटीस्टीक मुलगा आहे. बातमीवरून हा एक अभूतपूर्व प्रयोग असावा असे वाटले. अधिक माहीती करता हा दुवा पहावा.

स्वमग्नता एकलकोंडेकर Thu, 15/01/2015 - 20:48

In reply to by Nile

वा.. फारच छान!
त्या बातमीतला शेवटचा परिच्छेद ऑटिझम म्हणजे काय यावर चांगले भाष्य करतो.

इतर सर्व प्रतिसाद देणार्यांचे आभार!!

मुळापासून Fri, 16/01/2015 - 10:32

In reply to by Nile

खूप छान पुस्तक आहे हे… अत्यंत सुंदर! पुस्तक वाचून झाल्यावर खूप दिवस त्याच्या hangover मध्ये असल्याचं आठवतं मला…

वामा१००-वाचनमा… Wed, 21/01/2015 - 03:06

In reply to by मुळापासून

माहीती शेअर (मराठी शब्द?) केल्याबद्दल, नाईल व मुळापासून यांना धन्यवाद. पुस्तक मिळवून आवडल्यास, वाचले जाईल.

बॅटमॅन Fri, 16/01/2015 - 16:31

अति उच्च. आपण तळमळीने एखादे काम करावे आणि मान्यवरांकडून या ना त्या स्वरूपात त्याची दखल घेतली जावी हा एहसास अतिशय सुखप्रद असतो. तुम्हांला पुढच्या कार्यासाठी व लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.

अंतराआनंद Sun, 18/01/2015 - 07:18

अभिनंदन आणि शुभेच्छा.
तुमचे लेख वाचते. आवडतातही. पण काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळल्याने ती दिली जात नाही. तुमची जिद्द, मेहेनत खरोखर कौतुकास्पद आहे.