Skip to main content

लाडक्या, लाडू, लाडुकल्या 'प्र',

लाडक्या, लाडू, लाडुकल्या 'प्र',

आज व्हँलेटाईन्स डे... प्रेम दिवस... गोड, गुलाबी दिवस... प्रेमी मनांच्या मधुर मीलनाचा दिवस. आज अमृताचा वर्षाव... आज सुरेल हृदयाच्या तारा झंकारण्याचा दिवस. आज आकाश आपले बाहू पसरून कवेत घेण्याचा दिवस. आज तुझा-माझा दिवस!!! माझ्या मनाला कोवळी पालवी फुटल्ये आज. धडधड होत्ये हृदयाची. खूप काहीतरी होतंय... कळतंय... वळतंय!

भावविभोर कवितेलाही आज प्रेमाचे वेड लागावे. आज सूर्यालाही तेजाची आस लागावी. आज दगडालाही फुलांचे भास व्हावेत. सनई-चौघडे वाजतायत रे माझ्या कानांत. आणि आज संध्याकाळी तू भेटणार. माझा तू!!! फक्त माझा!!! माझा राजा!

माझ्या कुडीतला प्राण. माझ्या पृथ्वीचं आभाळ. आणि तुझ्या मोहोरलेल्या वसंतातली बहरलेली पहिली कळी मी! मी पण अशीच उमलून आल्ये. आई म्हणालीपण आज, "काय झालंय तुला?" काय सांगू तिला? तिला का माझ्या मनीच सप्तसूर ऐकू येणारेत? आपल्या मीलनाचे अमृतक्षण तिला कस्से कस्से कळणार? तुझ्या मऊशार स्पर्शासाठी मी आतुर झाल्ये. तू गुलाब आणशील माझ्यासाठी ... आणि चॉकलेट्स. मी आणलाय एक रुमाल तुझ्यासाठी, त्यावर प्र विणलंय. धकधकतंय इवलंसं काळीज. मनाची छोटीशी कडी तिच्या हिरण्यकेशी कोषातून हळूच बाहेर डोकावत्ये. मी झरा झाल्ये, मी नदी झाल्ये, वाहत्ये तुझ्या प्रेमात. शेवटी या नदीला तुझ्या सागरालाच तर मिळायचंय. तुझ्या सुवर्णकांचनी प्रकाशाने या सूर्यफुलाला खुलवायचंय.........

मी किनई एक कवितापण गिफ्ट देणारे तुला. माझ्या हातांनी लिहिलेली. (पण माझं हस्ताक्षर चांगलं नाहीये रे सोन्या. पण त्याचं काय रे एवढं! भावना तर झिरपतीलच तुझ्या काळजात.)

तू माझा प्रकाश
तू माझं आकाश
तू माझा श्वास
तूच जीवनाचा प्रवास

तू पाचूचं रान
तू सुरेल गान
मी कोवळं पान
तू हरपलेलं भान

मी तुझी कळी
तू माझा माळी
तुझं तुझंच कुंकू
फक्त माझ्याच भाळी

आवडेल तुला नक्कीच
हस्ताक्षराचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून रक्तानेच लिहिणार होते खरंतर. पण हळूच सुई टोचायचा प्रयत्न केला तर दुखलं रे खूप! तुझी ही नाजुका घाबरून गेली रे. लाललाल रक्त... मलातर भीतीच वाटते. लाललाल तर भाववेडं हृदय असतं. लाललालतर थरारलेलं उत्कंठीत मन असतं. लाललालतर हळवे ओठ.... (इश्श!)

राजा, माझ्या राजा, माझ्या प्र, घड्याळ बघ कसं कासवासारखं पुढे जातंय. त्याला सांगतेच आता, चल जरा पटापट. असं वाटतंय, घड्याळाने रॉकेट होऊन धावावं. फास्ट. म्हणजे मग आत्ताच ती शामलसंध्या अवतरेल. प्र, भेटूया नेहेमीच्या कदंब वृक्षाखाली.

माझ्या नीलकृष्णा, तुझ्या मऊशार ओठांना स्पर्श करणारी, (इश्श)

तुझीच
वेणू.

Node read time
2 minutes
2 minutes

तिरशिंगराव Sat, 14/02/2015 - 13:49

मी नदी झाल्ये, वाहत्ये तुझ्या प्रेमात. शेवटी या नदीला तुझ्या सागरालाच तर मिळायचंय

ऑबजेक्शन युवर ऑनर! कारण,

'नदी न्याहळी का कधी सागराला?" असं प्रत्यक्ष गदिमांनी लिहून ठेवलंय!

वृन्दा Mon, 16/02/2015 - 19:55

तुझ्या मऊशार स्पर्शासाठी मी आतुर झाल्ये.

ईईईईईई पुरषाचा स्पर्श मऊशार??? :( =))
कुच भी!!
माझ्या तरी मते द खरखरीत अन राकट द मेरीयर ;)

वृन्दा Mon, 16/02/2015 - 20:01

In reply to by बॅटमॅन

अर्र मी मिस केला तो प्रकाटाआ लिहीण्यापूर्वीचा प्रतिसाद. सांग ना काय होता बॅट्या. मस्त टॉपिक चाललाय. आय अ‍ॅम शुअर तो प्रतिसाद खतरा होता ;)

वृन्दा Mon, 16/02/2015 - 20:07

In reply to by वृन्दा

मी हाताचा अन दाढीच्या स्टबलचा (खुंट) खरखरीत स्पर्श म्हणत होते त्यावरुन कोणाला काही विविक्षित dotted & ribbed गोष्टी आठवल्या तर त्याचे श्रेय माझे नाही =))

गवि Tue, 17/02/2015 - 08:32

In reply to by बॅटमॅन

..बहुजन ऐसीकर समाजाला न समजणार्‍या भाषेत काहीतरी हाय कॉन्टेक्स्ट लिहिणार्‍या या सदरील सदस्यांवर योग्य ती कारवाई का केली जाऊ नये.
.

.धन्यवाद

'न'वी बाजू Tue, 17/02/2015 - 08:52

In reply to by गवि

नेमकी काय कारवाई होणे अपेक्षित आहे?

अशा प्रतिसादांचा वेगळा धागा बनवावा काय?

ॲमी Thu, 19/02/2015 - 09:06

:-D छान. मजा आली. आयड्या, लेखमाला आवडलीच. आता कमिंग आऊट करणार का?

अवांतर: एक जेन्युन शंका आहे. ते काय ते टेडी बीडी, गुलाब, बदामाच्या आकाराचे फुगे, केक, पिझ्झा, धिरडी वगैरे पुरुषांना खरोखरच आवडतात की स्त्रियांना आवडतात अशी समजूत मिडीया, मार्केटींगने करून दिल्याने ते या सर्वात सहभागी होतात?

बॅटमॅन Tue, 24/02/2015 - 14:45

In reply to by ॲमी

एक जेन्युन शंका आहे. ते काय ते टेडी बीडी, गुलाब, बदामाच्या आकाराचे फुगे, केक, पिझ्झा, धिरडी वगैरे पुरुषांना खरोखरच आवडतात की स्त्रियांना आवडतात अशी समजूत मिडीया, मार्केटींगने करून दिल्याने ते या सर्वात सहभागी होतात?

दुसरा कयासच बरोबर आहे. असला गुलाबीजुलाबीपणा पुरुषांना इन जण्रल आवडत नाही.

गब्बर सिंग Wed, 25/02/2015 - 06:08

In reply to by बॅटमॅन

असला गुलाबीजुलाबीपणा पुरुषांना इन जण्रल आवडत नाही.

यामुळे या सगळ्यांची एक ग्याप तयार होते. ग्याप म्हंजे अनेक स्त्रियांना हे (गुलाब, चॉकलेट्स, शँपेन, गिफ्ट्स) हवेसे वाटते व अनेक पुरुष नेमके हेच करायला नाखुष असतात. जे पुरुष स्वतःच्या नाखुषीवर विजय मिळवतात व अनेकदा मनःपूर्वक या गोष्टी (स्वतःला आवडत असो वा नसो) करतात ते - they reap huge returns.

ऋषिकेश Wed, 25/02/2015 - 11:00

In reply to by ॲमी

बाकी पुरूषांचं माहित नाही. मात्र मला

केक, पिझ्झा, धिरडी

हे तीन पदार्थ आवडतात - आकार कोणताही असो,.

टेडी बीडी, गुलाब, बदामाच्या आकाराचे फुगे,

यादीतील गोष्टींपैकी टेडी, गुलाब, फुगे खाण्यायोग्य नसल्याने त्यांच्याकडे माझा ओढा नाही :P. आवड वगैरे दूरच!

राहता राहिली बिडी, ती अजून ओढूनच नै बघितली

मारवा Wed, 03/02/2016 - 08:55

काश !
मला आजवर मिळालेली प्रेमपत्रे फारच साधारण भाषेत लिहीलेली फारच रुक्ष होती असे तीव्रतेने जाणवले.
ओल्या प्रेमपत्रांसाठी आसुसलेला
मारवा

जाता जाता

प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है
नये परिंदो को उड़ने में वक़्त तो लगता है

जिस्म की बात नही थी उनके दिल तक जाना था
लंबी दूरी तय करने में वक़्त तो लगता है

गाँठ अगर लग जाये तो फिर रिश्ते हो या डोरी
लाख करे कोशिश खुलने में वक़्त तो लगता है

हमने इलाज-ए-जख्म-ए-दिल तो ढूँढ लिया लेकिन
गहरे ज़ख़्मो को भरने में वक़्त तो लगता है

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 12:04

In reply to by नितिन थत्ते

जर दररोज एक या दराने असेच लेखन आले तर त्यांनाही वेगळा धागा काढून त्यावर लिहायची विनंती करता येईल. पण हे लेखन रोज येऊन ट्रॅकरभरून टाकतेय असे सध्या तुम्हाला का वाटते?

का आपली उग्गाच एक फुसकुली!? ;)

वीणेची तार Thu, 04/02/2016 - 13:37

माझ्या लाडलाडूल्या "प्र",

आज कित्ती दिवसांनी तू बोललास माझ्याशी …… हाय !!! तू परत आलास माझ्या उन्मनी मनाची स्थिती समजून … हो हो तू आलास. खरच!!!!!! तुझ्या विस्तीर्ण बाहुंमध्ये मला सामावून घ्यायला …. तुझ्या मखमली स्पर्शाने हे कोवळं अंग बहरवून टाकायला …. तू आलास …. पूर्वीसारखाच …. माझ्या मनोरथाच्या अश्वावर स्वार होउन. … तू आलास या पवनाच्या मंजुळ सुरातून …. तू आलास या पृथ्वी चे आकाश बनुन. (ही पृथ्वी हे आकाश पांघरते बरं … ईश्य्य्य )

मी ना कसं सांगू … गेलं एक वर्ष कसं गेलं ते. रडून रडून अश्रुंची विहीर आटली . या देहाचे मलमली रूप पार झाकोळून गेले. (एक वर्ष मी साधी लिपस्टिक सुद्धा लावली नाही…)

तुला आली का रे माझी सय ? तुझं मन रमलं का रे या फुलपाखराशिवाय ? तुला … तुला अश्रु अनावर झाले का रे राजा? माझ्या पापण्या अंथरून तुझी वाट पहिली तुझ्या या राणीने …. भांडण झालं म्हणून काय अशी जन्म जन्मांतरीची नाती तुटतात काय? तुझं आणि माझं हे पवित्र नातं एवढ्यात संपेल कसं रे??? बघ ना आणि आज आपण परत भेट्लो . या चिमुरड्या चातक पक्षाला त्याचा मनोदेवता भेटली . पाऊस धारा बरसलल्या …. तुप्त झालो … तू आणि मी …. प्र …. विणा …

सायली Thu, 04/02/2016 - 15:20

वर्षभर थांबल्याने वीणा तारवट्ली काय?