रमा
२०११ साली सुचलेली व अन्य संस्थळावर आधीच प्रकाशित झालेली ही कविता -
समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली. कौस्तुभ मणी, पारीजातक, कामधेनु गाय, अमृत , ध्न्वंतरी, वीष, चंद्र वगैरे वगैरे. पैकी लक्ष्मी ही देवी सुद्धा या १४ रत्नांतच गणली जाते. ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे ; ).
कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.
पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना
जिचा अनुज असे चंद्रमा,
अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.
चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.
प्रतिक्रिया
"कविता" सदरात टाकायची होती.
"कविता" सदरात टाकायची होती. चुकून "मौजमजा" सदरात पडली आहे. आता संपादन करता येत नाहीये.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
मौजमजा सदरातून "कविता" या
मौजमजा सदरातून "कविता" या प्रकारात लेखन हलवले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद ऋ. मी अचानक
धन्यवाद ऋ. मी अचानक "अद्ययावत" पाहीलं अन म्हटलं अरेच्च्या कोणी माझं पासवर्ड क्रॅक केलय की काय?
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
छे!
काळजी नसावी. तुमच्या खात्याचा पासवर्ड क्रॅक करायचे एखाद्याने ठरवले, तरी तो तुमचे खाते नक्की कोणते हे न कळल्याने बेत रद्द करेल!
खी: खी: मस्त!
खी: खी: मस्त!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
कृपया मीटर कडे दुर्लक्ष करावे
पण अर्थातच धनंजय किंवा अन्य कोणीही सदस्यांनी जर मीटरमध्ये बसवली किंवा सुधारली तर आनंदच होईल.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
?
फुटात बसवली तर चालेल काय?
काय आहे, अमेरिकेत मेट्रिक पद्धत प्रचलित नाही, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नसावी. त्यामुळे, मापालासुद्धा मीटर मिळणे दुरापास्त. म्हणून विचारतोय.
होय फुटात बसवा नाय तर पाल्मात
होय फुटात बसवा नाय तर पाल्मात काय बी तक्रार नाय.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तिने विष्णूस वरमाला
विष्णू वरमाला घालून घेण्यासाठी घाईघाईने रस्त्याकडेच्या पेड पार्किंमघ्ये गरूड पार्क करून आला आहे आणि म्हणून लोकांना मीटरकडे दुर्लक्ष करायला सांगतो आहे असं चित्रं डोळ्यापुढे उभं राहिलं!!!
केलात ना आमचा क-च-रा
केलात ना आमचा क-च-रा
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
क-च-रा?
नाय हो, उलट तुमचं एक पार्किंग तिकिट वाचवलं!!!
बाकी ही कविता कुठेतरी ओळखीची वाटते आहे.
मिपावर टाकली होती का याआधी?
व्हय जी
व्हय जी
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
पेड पार्किंमघ्ये गरुड शेवटी
गरुड शेवटी झाडावरच बसणार ना. त्यामुळे पेड पार्किंग असणे अगदी स्वाभाविकच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्याच त्याच जागी रोज बसत
त्याच त्याच जागी रोज बसत असल्यास पार्किंग आपोआप पांढर्या पट्ट्यावरच होत असेल.
+१
तपकिरी झाडावरची पांढरी रेघ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अशी पांढरी रेष म्हणताय का???
अशी पांढरी रेष म्हणताय का???
पाखंडी!!!!!
पाखंडी!!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
श्लेष
आहाहा "पेड" क्या श्लेष है .... हुष्षार बॅट्या. मस्त मजा आली.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
ती प्रकट झाल्यानंतर तिने
हे राम.. आय मीन हे रमा..
सुंदर मुलगी जरा आत्ता कुठे प्रकट झाली नाही झाली की लग्गेच तिला वर शोधून कोणाच्यातरी गळ्यात बांधायची नुस्ती घाई.
चला.. वठणीवर आणली एकदाची बाई(च्या जाती)ला.
बरं झालं ना फार वेळ "playing
बरं झालं ना फार वेळ "playing hard" केलं असतं तर विष्णू हातचा गेला असता
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
धागाशीर्षक (अवांतर)
धागाशीर्षक वाचून 'ऐसी..'च्या जुन्या सदस्या रमाबाई कुरसुंदीकर परतल्या की काय असे वाटून गेले.
हाहाहा धमाल होत्या त्या
हाहाहा धमाल होत्या त्या
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
याच सध्या मिपावर "माईसाहेब
याच सध्या मिपावर "माईसाहेब कुरसुंदीकर" म्हणून वावरत असतात का? नाना-माईंचा नटरंगी वग फ्यामस आहे मिपावर.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
होय त्याच. तीच शैली होती
होय त्याच. तीच शैली होती त्यांची. मस्त मजा यायची. नेफळे-कुरसुंदीकर शुभ लाभ इथेही घेता येऊ देत हीच सदिच्छा
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
नक्की त्याच आहेत? मिपावरची
नक्की त्याच आहेत? मिपावरची बरीचशी जनता त्या आयडींना ट्रोल/डू आय डी समजते.
होय माहीते
होय माहीते
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
Awww I miss 'her'. माईंचे
Awww I miss 'her'. माईंचे ऐसीवरचे प्रतिसाद आवडायचे मला.
शेवटी श्रीविष्णूंच्या चरणांशी
इथल्या स्त्रीवादी ब्रिगेडच्या नजरेतून सुटलात कशा? कि ते चंद्रशेखर आझादांसारखं - 'ब्रिटिशांचा शिपाई असला तरी त्याला मारू नका. तो भारतीय आहे शेवटी.'?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.