Skip to main content

प्रिय प्र,

प्रिय प्र,

आज रंगांचा दिवस ! आज रंगानाही लाली चढावी … आज उषेने लाल शालू नेसावा आणि सूर्याने पिवळ्या धम्मक रंगात तिला बुडवून टाकावे . आज गर्द रानाने हिरवाकंच रंग उधळावा! आज फुलांनाही रंगांचे कोवळे स्वप्न पडावे !!!!! …… तुला माहितेय , आज माझ्याही गालावर अशीच सिंदुरी लाली चढावी . आज माझ्या श्याम सुंदर नील कृष्णाने मला त्याच्या निळाईत रंगवावे . …. आसुसलिये ये मी …. आह !!!!!!
ये तू ये. रंगव मला …. ही दुधशुभ्र त्वचा रंगवून टाक. या प्रेमवेड्या राधेची चोळी तुझ्या रंगात भिजवून टाक !!!!!
तुझे सारे सारे रंग आज आसुसले असतील माझ्यावर बरसण्यासाठी …… ये तू ये.

आज मीच रंग
खुलून आलेल अंग अंग
आज मी सुरज केसर
आज तू माझां बहर
आज मी हिरवं रान
आज नाही कसलही भान
आज मी लाजरा गुलाब
आज तुझा रंगीत रूबाब
आज माझी रंगीत काया
आज तू काजळ माया

बघ न शब्द ही रंगून गेलेत तुझ्या मयुरपंखी प्रेमात. खूप काहीतरी होतंय …शब्द बरसतायत …. तुला खुणावतायत.
आज न मी फुलाफुलाचा ड्रेस घालणारे …. मी फुल झालेय. आज मनाची कळी पुन्हा एकदा तिच्या नाजूक कोषातून डोकावतेय . आज मला वाटतंय सारखं की की मीच रंग होऊन तुझ्या मंत्रमुग्ध कायेवर बरसावं . मीच तुझी काया होऊन जावं . मग कुणि दूर नाही करणार आपल्याला !!!!!!!! आज तू ढग आणि मी तुझी निळाई … आज मी चाफा आणि तू माझा सोनसळी पिवळा रंग . आज मी इवलीशी मुग्ध कलिका …… आणि तू माझा गुलाबी गुलाबी रंग …. आज तू मऊशार ओठ …. आज मी भरून आलेय काठोकांठ . (इश्श्य …….)

संध्याकाळी वाट बघेन तुझी …… आपल्या नेहमीच्या कदंबाखाली ……. ये ये ये …… "प्र" माझ्या "प्र" …. रंग उधळत ये. … रंग बरसत ये. … स्वत:च रंग होऊन ये ………. !!!!!

तुझ्या रंगात रंगलेली,
वीणा

Node read time
2 minutes
2 minutes

गवि Thu, 05/03/2015 - 12:59

In reply to by गब्बर सिंग

मी "अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग"चा विडिओ एम्बेडवणार तोच तुम्ही रंग बरसे टाकलीत.

अमिताभऐवजी अशोकजी..!!! :)

वृन्दा Thu, 05/03/2015 - 19:40

In reply to by गब्बर सिंग

अमिताभचा आवाज इतका मस्त लागला आहे या गाण्यात. एकदम Rowdy n bawdy. काय योग्य अयोग्य , नैतिक, अनैतिक या कल्पना बाजूला ठेवल्या तर मस्त गाणं आहे.

अजो१२३ Thu, 05/03/2015 - 13:15

तुझे सारे सारे रंग आज आसुसले असतील माझ्यावर बरसण्यासाठी …… ये तू ये.

सारे सारे रस, रंग नको. तो अमृतघड्यावाला मोप झाला.

वृन्दा Thu, 05/03/2015 - 19:59

होळी इतका रोमँटीक सण का मानला जातो. कधी नव्हे ते अंगलगट करण्याचा चानस ;) मिळतो म्हणून?
___
नंद चतुर्वेदी यांची ही कविता सुंदर आहे.

फागुन के आते ही
हमारा नींबू सहस्त्रों छोटे पत्तों
फूलों से दमदमाने लगता है
सुगन्ध से प्रमत्त हवाओं के दिन
मुँडेर पर बैठ जाते हैं
छोटी चिड़िया-से गरदन उठाये
.
पौष में किसे मालूम था यह होगा
ठण्ड से काँपते, निर्जीव पेड़
हिलने लगेंगे
हरे, नये और ताजा दम
.
हजारों बार यही हुआ है
पृथ्वी !
तुम ने दी है ठण्डे, पपड़ाये
धूल-धूसरित
पेड़ों पठारों को
खिलखिलाती हँसी
रोशनी का समुद्र और वसन्त
ठिठुरता हुआ भूखण्ड
बदल गया है
रंगों की आतिशबाजी में
पृथ्वी !
तुम कितनी नयी होती हो
उर्वरा और उत्फुल्ल
.
कितनी तरह देती हो
रूप, आकार
बदलती हो ताल, लय, छन्द
त्रिकाल।

यसवायजी Fri, 06/03/2015 - 00:50

एवढ्या 'रंगा'त आलं होतं, आणि अचानक

आज न मी फुलाफुलाचा ड्रेस घालणारे

हे वाचालं आणि खरं सांगतोय, लै हसलो.

राही Fri, 06/03/2015 - 16:56

In reply to by वृन्दा

आठवलं होतं. पण दुसरं कुणीतरी नक्कीच चिकटवणार असं समजून आळस केला.
पण दोन मराठी होर्‍या अतिशय आवडतात.
१) आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. २) गोपगड्यांसह कृष्णकन्हैया आज खेळतो होरी ग, आज नको यमुनेचे पाणी चल जाऊ माघारी ग.

पिवळा डांबिस Fri, 06/03/2015 - 01:23

"अनंगरंगी, पी. डी. खेळते,
मी ही जर्द पिवळा!"
पिडांकाकांचा,
आहो पिडांकाकांचा,
थोबडा कुणी, आवळा...
:)

राही Fri, 06/03/2015 - 16:36

फारच पिडे बुवा ही वीणा.
-एक वीणापीडित.

वृन्दा Fri, 06/03/2015 - 20:28

In reply to by गब्बर सिंग

तिच्या लाडक्या प्र ने ओलीचिंब भीजवल्याने आजारी पडली असेल.
नाही नाही "औषध नल गे मजला" वाला मस्त मस्त फिव्हर नाही. ;)
खरा खुरा ताप.

वृन्दा Fri, 06/03/2015 - 20:36

In reply to by गब्बर सिंग

हाय!!! काय आठवण काढलीत सिंग जी.

कशि केलीस माझी दैना
रे मला तुझ्या बिगर करमेना !

http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Kelis_Majhi_Daina

बॅटमॅन Fri, 06/03/2015 - 23:52

In reply to by वृन्दा

पिचकारी मारून भिजवल्या गेल्यामुळे सर्द होणार असे म्हणालो हो. तुम भी कायपण सोचता है!

तदुपरि- काय क्रियापद आहे. विग्रहानुकारी कोंडके-एस्क =))