मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४७
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
Will build Ram temple in Ayodhya without political help: Shankaracharya
बातमी मधे चे चित्र आहे त्यात शंकराचार्यांच्या बाजूला जो चष्म-ए-बहाद्दूर माणूस बसलाय तो दिग्विजय सिंग आहे का ??
'मेक इन इंडिया'चा भ्रम हा लेख
हा लेख ओढूनताणून कसं ही करून मोदींवर टीका करायचीच म्हणून लिहिलेला आहे असे फक्त मलाच वाटतेय की तुम्हालाही तसेच वाटते ??
२०११च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या "ग्लोबल जेंडर गॅप' रिपोर्टनुसार चीनमधे एकूण रोजगारांपैकी महिलांचा वाटा जवळजवळ ४५ टक्के इतका आहे, तर एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७४% महिला रोजगार कमवत असतात. या उलट भारतात महिलांच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ३५% महिला रोजगार कमावतात. चीनच्या महिलांच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याहून कमी आहे. भारतातील एकूण रोजगारामध्ये हा वाटा अवघा २८-२९% इतकाच आहे. (बांगलादेशमध्येही हे प्रमाण तब्बल ६५% आणि ४३% इतके उल्लेखनीय आहे.) चीनचा रोजगार-व्यवस्थेतील पुरुषप्रधानतेबाबत १३५ देशांत ३४वा क्रमांक आहे, तर भारताचा १२३वा! (बांगलादेशही भारताच्या पुढे म्हणजे ८३व्या क्रमांकावर आहे.) एवढेच नव्हे, तर हे प्रमाण गेली काही वर्षे घसरते आहे, असे दिसून येते. उत्पादन क्षेत्रांत आपण चीनची बरोबरी का करू शकत नाही, याबद्दल गेले दशकभर वेगवेगळ्या विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञांनी बराच उहापोह केला;
लेखात संदर्भ म्हणून वापरलेला हा रिपोर्ट - The Global Gender Gap Report 2011
या लेखाच्या लेखिका लॉरा टायसन रोचक लिखाण करतात. काही वेळा मी सहमत नसतो त्यांच्याशी पण ....
यात मला मोदी सरकारवर टिका
यात मला मोदी सरकारवर टिका दिसली नाही. फक्त एकदा उल्लेख आहे तो मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडीयाचा! आता 'मेक इन इंडीया' ही घोषणा खरोखरच मोदी सरकारची आहे तेव्हा त्यांचे नाव येणे गैर वाटत नाही.
हा लेख उद्योगातील स्त्रियांना कमी वाव मिळण्याबाबत हवा होता (बहुदा लेखकाला अपेक्षित होता). पण तो फसला आहे.
उदा. हे वाक्य घ्या:
चीनच्या ज्या "मेड इन चायना'ला "मेक इन इंडिया' असे प्रत्युत्तर द्यायचे स्वप्न भारत पाहतो आहे, त्या चीनची उत्पादन क्षेत्रातली क्रांती केवळ उत्पादन क्षेत्रांत व्यापक स्तरावर महिलांच्या सहभागामुळेच घडून आली आहे.
इथे स्त्रियांचा "आपखुशीने" सहभाग किती आणि सरकारने जबरदस्ती करून किती जणींना कामाला लावले आहे? याचा विदा सहज मिळणे शक्य नाही. भारतातील 'मेक इन इंडीया'च्या अधिकाधिक यशासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे - व तो झाला तर या प्रक्रीयेला वेग येईल हे खरे आहेच; पण त्यासाठी चीन सारख्या कम्युनिस्ट राजवटीचा (दडपशाहीचा) दाखला देणे अगदीच गैर आहे.
उलट सरकारने अधिकाधिक महिलांना उद्योगधंद्यांमध्ये सहभागी होण्यास कसे 'प्रेरीत' करता येईल हे बघावे अशी अपेक्षा हवी! ही स्वयंप्रेरणा हवी!
त्यासाठी परंपरेने महिला जी कामे करतात त्यासाठी पर्यायी यंत्रे स्वस्त करणे, मुलांच्या संगोपनासाठी उद्योगधंद्यांना आपल्याच कॅम्पसमध्ये पाळणाघरे चालु करणे अनिवार्य करणे, घरातील प्रत्येक कामांत मदत करणारा व गरज असेल तसे जेवण बनवणारा, मुलं सांभाळणारा वगैरे पुरूष हाच खरा आपल्या बायकोवर प्रेम करणारा पुरूष (केवळ पैसे कमावले की झालं असं समजणारा आयतोबा पुरूष म्हणजे ऑलमोस्ट दैत्य ;) ) अशा प्रकारचे कंडिशनिंग विविध सरकारी जाहिरातींतून करणे, पुरूषांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी पुरूषांसाठी चालणार्या कुकिंग क्लासेस वगैरेला करमुक्त करणे आदी उपाय करता येतील.
चीन हा कोणत्याही प्रकारच्या शासकीय अंमलबजावणीत आदर्श असु शकत नाही! इतका व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करून होणारी तथाकथित प्रगती अजिबातच नको!
खालील दोन वाक्ये मोदी सरकारवर
खालील दोन वाक्ये मोदी सरकारवर टीका नाहीत ??
१) शूरपणाचा आव आणणा-या सिंहाचा बोधचिन्हात वापर करून नव्या औद्योगिक क्रांतीची आभासी प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "मेक इन इंडिया' या नावाखाली नुकतीच जगासमोर आणली आहे.
२) शहरी मतदारांची मते मिळवून सरकार बनविता येऊ शकते आणि हा देश शहरी नागरिकांचाच आहे, असे भासविण्या-या मोदी सरकारची औद्योगिक क्रांतीची मोहीमही शहरी आणि पूर्णतः पुरुषप्रधान आहे. स्त्रियांचा आणि त्यातही ग्रामीण स्त्रियांचा त्यात स्पष्ट सहभाग नसल्यास ही औद्योगिक क्रांती घडून येणे शक्य नाही.
-----------------
इथे स्त्रियांचा "आपखुशीने" सहभाग किती आणि सरकारने जबरदस्ती करून किती जणींना कामाला लावले आहे? याचा विदा सहज मिळणे शक्य नाही. भारतातील 'मेक इन इंडीया'च्या अधिकाधिक यशासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे - व तो झाला तर या प्रक्रीयेला वेग येईल हे खरे आहेच; पण त्यासाठी चीन सारख्या कम्युनिस्ट राजवटीचा (दडपशाहीचा) दाखला देणे अगदीच गैर आहे.
वाह.
महिलांचा सहभाग वाढला तर लेबर सप्लाय वाढून लेबर कॉस्ट्स कमी होतील. हे सत्य असले तरी ते अतिरेकी बेसिक आर्ग्युमेंट आहे. एवढेच नोंदवतो.
अधोरेखित भागाबद्दल टाळ्या.
-----------------
त्यासाठी परंपरेने महिला जी कामे करतात त्यासाठी पर्यायी यंत्रे स्वस्त करणे, मुलांच्या संगोपनासाठी उद्योगधंद्यांना आपल्याच कॅम्पसमध्ये पाळणाघरे चालु करणे अनिवार्य करणे,
अधोरेखित भागाबद्दल एक स्मितहास्यवदन कल्पावे.
अगदी. ब्याट्याचा
अगदी.
ब्याट्याचा षटकार.
"कंपॅरॅटिव्ह अॅडव्हांटेज" ही संकल्पना अस्तित्वातच नैय्ये व अस्तित्वात असलीच तर ती un-proven आहे (आणि "अॅबसोल्युट अॅडव्हांटेज" हेच काय ते सत्य आहे) अशा गृहितकातून "केवळ पैसे कमावले की झालं असं समजणारा आयतोबा पुरूष" असे समज निर्माण होतात.
जनरली लोकांचा इथे वडीलांनी
जनरली लोकांचा इथे वडीलांनी भाज्या धुतल्या पाहिजेत, इ इ आग्रह असतो. तुमचे वडील ऑफिस सोडून अजिबातच काही काम करत नसत का? किराणा, भाज्या आणणे, कपडे, सणाचे सामान आणणे, इ इ? घराचा हिशेब ठेवणे? प्रवास प्लॅन करणे? मुलांच्या शाळेचे काम? अभ्यासात मदत? आजारपणात आजाराच अभ्यास करून योग्य ती पावले उचलणे? मुलांवर दरारा ठेउन त्यांना बिघडू न देणे? नातेवाईक नि आप्तेष्ट यांचेशी कम्यूनिकेशन राखणे? मुलांना खेळ, सायकल, पोहणे शिकवणे? घर बांधणे वा घेणे? धटीगणांपासून मुले, स्वतः, बायको सुरक्षित ठेवणे? पाळीव प्राणी सांभाळणे? घरची बाग राखणे? कार चालवणे? सामान (भांडी, इ) विकत आणणे? विमे, बचत आणि गुंतवणूका करणे? प्लॅन करून कुटूंबाची स्थिती उंचावणे? मुलांची लग्ने, इ गोष्टी करणे? मजले चढताना वा चालताना हेवी बॅगा उचलणं?
ही सगळी टिपीकली आजघडीला भारतात पुरुषांची कामे नव्हेत काय? हे सगळं करण्यात पुरुष जितका हलगर्जीपणा करतात वा अपयशी ठरतात तितकाच त्यांच्या कामात बायका करतात. उदा. पंगतीला पुरुष वा मुले नसली तर बायका शिळेच अन्न खातात. नवे बनवायचे कष्ट घेत नाहीत. आणि आम्हाला शिळे खावे लागते म्हणून सहानुभूती मिळवतात.
शॉल्लेट.
Comparative Advantage चे सुरेख उदाहरण.
आता टिपिकली या सुयोग्य शब्दाकडे दुर्लक्ष करून - हम भी ये सब कर सकते है और करते भी है - असा दावा केला की आपण फार मोठ्ठे इक्वॅलिटेरियन आहोत असा दावा करायला फेमिनिस्ट लोक रिकामे.
आता टिपिकली या सुयोग्य
आता टिपिकली या सुयोग्य शब्दाकडे दुर्लक्ष करून - हम भी ये सब कर सकते है और करते भी है - असा दावा केला की आपण फार मोठ्ठे इक्वॅलिटेरियन आहोत असा दावा करायला फेमिनिस्ट लोक रिकामे.
ते तर कधीही मेलबॅशिंग करायला रिकामेच असतात. बाकी एरवी उत्क्रांतीच्या नावाखाली शंख करणारे विसरतात, की पैसे कमावणे हे पुरुषी काम ही धारणा उत्क्रांतीतूनच आलेली आहे. तेव्हा उत्क्रांतीपुरस्कृत कामाला दैत्यवत् ठरवणे हे उदाहरणार्थ रोचक आहे. पण दुटप्पीपणा हाही प्रामाणिकपणाच असे म्हणणार्यांना त्याचे काय होय? ते चालायचंच. सध्या त्यांचे दिवस आहेत.
अजो,
(२)कपडे, सणाचे सामान आणणे, इ इ? - बायका सुद्धा करतात
(३)घराचा हिशेब ठेवणे? - जास्त करुन बायकाच करतात
(४)प्रवास प्लॅन करणे? - मे बी पुरुष जास्त करत असतील.
(५)मुलांच्या शाळेचे काम? - बायकाच जास्त करतात
(६)अभ्यासात मदत? - काय सांगता? बायकाच करताना दिसतात.
(७)आजारपणात आजाराच अभ्यास करून योग्य ती पावले उचलणे? - आजरपण बायकाच काढतात
(८)मुलांवर दरारा ठेउन त्यांना बिघडू न देणे? - ह्म्म्म पुरुष जास्त करतात
(९)नातेवाईक नि आप्तेष्ट यांचेशी कम्यूनिकेशन राखणे? - बायका प्र-चं-ड प्रमाणात ही कामे करतात
(१०)मुलांना खेळ, सायकल, पोहणे शिकवणे? - पुरुष जास्त करतात
(११)घर बांधणे वा घेणे? - पुरषांची टेरीटरी
(१२)धटीगणांपासून मुले, स्वतः, बायको सुरक्षित ठेवणे? - हे आजकाल लागतं का?
(१३)पाळीव प्राणी सांभाळणे? - माहीत नाही
(१४)घरची बाग राखणे? - ज्याला आवड आहे तो करतो. युनिसेक्स आहे हे काम.
(१५)कार चालवणे? - काय सांगता अजो! बायका नाही चालवत कार?
(१६)सामान (भांडी, इ) विकत आणणे? - बायका करतात
(१७)विमे, बचत आणि गुंतवणूका करणे? प्लॅन करून कुटूंबाची स्थिती उंचावणे? मुलांची लग्ने, इ गोष्टी करणे? - दोघे इक्वली करतात
(१८)मजले चढताना वा चालताना हेवी बॅगा उचलणं? पुरुषच करतात :D
_____________
१८ पैकी ५ च कामे फक्त पुरुष जास्त प्रमाणात करताना दिसतात.
अहमहमिकेने हे नाही सांगायचे की आम्ही कित्ती कित्ती कामे करतो अन तुम्ही कसे आयतोबा आहात.
फक्त आपल्या मतातील फारकत दाखवून दिली.
जंत्री मध्ये काढलेले निष्कर्ष अचूक नाही इतकेच.
_____
स्त्रियांना नेहमी खिडकीची जागा मिळते असे नीरीक्षण आहे :D
जी ५ कामे कदाचित जास्त करत
जी ५ कामे कदाचित जास्त करत असतील पण त्या कामाच्या आउट्कमच्या दर्जाचे काय?
(४)प्रवास प्लॅन करणे? - मे बी पुरुष जास्त करत असतील.
काही धड जमत नाहीत.
(११)घर बांधणे वा घेणे? - पुरषांची टेरीटरी
अर्धे डाऊन पेमेंट पासुन इएमाय कित्येक बायका भरतात. घर बांधणे वगैरे कुठले हो जमायला? ( म्हणजे गवंड्यांना जमेल, पण बाकी पुरुषांना )
मजले चढताना वा चालताना हेवी बॅगा उचलणं? पुरुषच करतात
करायलाच पाहीजे. गाढवकाम करायला गाढवेच नकोत का?
(८)मुलांवर दरारा ठेउन त्यांना बिघडू न देणे? - ह्म्म्म पुरुष जास्त करतात
कदाचित मुले वडलांकडे बघुन असे वागायचे नसते हे शिकत असतील. तेव्हडेच कॉट्रीब्युशन.
(१०)मुलांना खेळ, सायकल, पोहणे शिकवणे? - पुरुष जास्त करतात
एखाद दोन वेळेला केल्यासारखे दाखवतात आणि लगेच कंटाळतात नाहीतर मुलांवर आरडा ओरडी करतात.
---------
एकुणात पुरुष हा जास्त शाररीक ताकद असलेला आयतोबा आहे. एकच गोष्ट सोडली तर पुढारलेल्या समाजात बायकांसाठी पुरुष हे रीडंडंड झालेली गोष्ट आहेत. ( काही संन्माननीय अपवाद असतील कदाचित )
हाहाहा. अरेरे रिडन्डन्ट नको
हाहाहा. अरेरे रिडन्डन्ट नको म्हणायला. ;) पण स्त्रियांनी पुढे जाऊन नाकावर टिच्चून स्वातंत्र्य मिळवले आहे/मिळवत आहेत हे खरे आहे.
मला विनोदबुद्धीत पुरुष वरचढ वाटतात. माहीत नाही की माझेच मित्र-मंडळ कमी पडते अथवा कसे पण स्त्रिया इतकं हसवत नाहीत जितके पुरुष हसवतात. :)
HELLO!!!
आय डी नऊ तारखेच्या आसपास बनला. बनल्याबरोबर "हा नेहमीच्याच लोकांपैकी कुणाचा तरी आय डी आहे"
हा माझा त्याच दिवशी असलेला अंदाज होता.(माझे त्यादिवशीचे प्रतिसाद पहावेत.)
लागलिच पुढील दिवशी सदर आय डी शुचिमामीचाच आहे; हे मी ओळखलं.(दहा तारखेस.)
पण सध्या काही जाहिर करु नकोस; म्हणून मामीने विनंती केली असल्याने शांत होतो.
आता तसेही बॅट्याने जाहिरपणे तीच शक्यता वर्तवली असल्याने मी बोलायला संकोच नसावा.
आय डी बनून झालेत फार तर चार दिवस. मी तीनेक दिवसापूर्वीच शुचिमामीला पकडलं.
अगदी बरोबर. बाकी स्वतःच्या
अगदी बरोबर. बाकी स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल कायम ओरडा करणाऱया स्त्रिया नवर्याच्या बारीक-सारीक गोष्टींतही बिनदिक्कत हुकूमत गाजवतात.
शिवाय पलंगावर कोणती चादर घालायची इथपासून ते पोराला कोणती चड्डी घालायची इथपर्यंत स्वत:चच म्हणणं खरं करुन घेतात. वर नवऱयाला घरकामातलं काही कळत नाही हा डांगोरा. बायकांच्या ड्रायव्हिंग स्किलबद्दल बोललं की लगेच जेंडर स्टिरिओटाईप.
चीत भी मेरी पट भी मेरी!
हा हा हा. पुरुष नामशेष झाले
हा हा हा. पुरुष नामशेष झाले तर हू विल डू द हेवी & डर्टी & डेंजरस वर्क? अशा कामांतला पुरुषांचा सहभाग डिस्प्रपोर्शनेटलि जास्त आहे. हे समानतावादी सीईओ पोझिशनला बायका नाहीत म्हणून रडतात त्यासोबत इथेही स्त्रिया नाहीत म्हणून रडताना दिसत नाहीत. पुरुष नसतील तर मानवजात टिकणे अशक्य आहे.
तसं नाही रे गटारात उतरुन काम
तसं नाही रे गटारात उतरुन काम करणार्या क्वचित, त्यातील विषारी वायूने मृत्युमुखी पडणार्या अशा सर्व (स्त्री)-पुरुषांचा आदर आहेच. पण तूतूमीमी करण्यापेक्षा हे काम ऑटोमेटेड कसे होऊ शकते ते पहायला हवे. अन त्याकरता दोन्ही डोकी लागणार, सहकार्य लागणार. ऐसा झगडनेका नै!!!
आजारपण
काव्या, नितिनजींशी झालेल्या खरडींचा मी (एडीटून) वेगळा धागा काढू इच्छितोय. त्यांच्या संमतीची वाट पाहत आहे.
==========================================================================================================
आई घरात काम करते आणि वडील (लिटरली) काहीही करत नाहीत जवळजवळ असं विधान केलं होतं त्याला ते उत्तर होतं. अर्थात central, state and common असे विषय असतात हे मान्यच आहे. सबब सगळे सुद्धा मान्य आहेत.
आपण शक्यतो "फक्त बायकाच करतात" असा सूर आणू दिला नाही. ते मला खूप आवडलं.
पण खाली एक उदाहरण आहे ज्याच्यात आपण १००% श्रेय स्त्रीयांना देताय आणि वरकरणी ते योग्यही वाटतं.
(७)आजारपणात आजाराच अभ्यास करून योग्य ती पावले उचलणे? - आजरपण बायकाच काढतात
यातला पुरुषांचा रोल नकळत कसा नाकारला जातो ते पाहू. लक्षात घ्या हे उदाहरण मेट्रोलाईट, उच्चवर्णीय, पुरोग्रामकांक्षिणीचे नाही. मिड टाऊन मधल्या मास्तरणीचे सुद्धा नाही. टिपीकल भारतीय मास्तरच्या होममेकर बायकोचे आहे.
१. अगदी बेसिकातच प्राथमिक लक्षणे आहेत कि नाही हे रिपोर्ट करणे - स्त्री
२. रोग काय असावा आणि कसल्या डोक्टरला दाखवावे - पुरुष
३. पेशंटला घेऊन जाणे - पुरुष
४. टेस्ट करवून आणणे - पुरुष
५. असल्यास मेडिक्लेम प्रोसेस करणे - पुरुष
६ रोगविमा घेणे - पुरुष
७. औषधे घेणे - पुरुष
८. नियमित भेटायचे असेल डॉक्टरकडे घेऊन जाणे - पुरुष
९. पेशंट खपला तर अंत्यसंस्कार करणे - पुरुष
१० ऑपरेशनच्या वेळी धीर देणे - पुरुष
११ नियमित औषधे पाजवणे -स्त्रीया
१२ पेशंटला आजारास अनुरुप अन्न देणे - स्त्री
१३. पट्टी करणे - स्त्री
१४. स्वच्चता राखणे - स्त्री
१५ काही नविन नसेल आणि गावाबाहेर इ इ नसेल तर स्त्रीया डोक्तरकडे नेणे - स्त्री
१६. आजाराच्या सुट्ट्यांत थकलेले काम नंतर करणे - पुरुष
१७. हे सगळं करायला पैसे कमावणे - पुरुष
१८. पाहुणे, भेटकर्ते मॅनेज करणे - स्त्री
१९. आयुष्यभर अजून एक (जसे अळणी) अन्न्न बनवणे - स्त्री
२०. उपचारच होत नसेल तर खस्ता खात डॉक्टर शोधत राहणे - पुरुष
२१. ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करणे - पुरुष
२२. व्रतवैकल्य करणे -स्त्री
२३. नवर्याच्या जेवणातले तेल मीठ अकारण (काळजीने हो) कमी वा बंद करणे - स्त्री
२४. उपचाराची उपकरणे विकत घेणे - पुरुष
====================================================================================
आता हे काही असं काळं पांढरं नसतं. रोल स्वॅप खूप असतो. पण आजारपण म्हटले कि पलंगावर झोपलेल्या २२ वर्षाच्या मुलाची सुश्रुषा करणारी ५० वर्षाची माता उभी राहते. एका हातात पाण्याचा ग्लास. दुसर्या हाताने साजूक हलवा भरवणारी. या प्रतिमेला बळी पडावे का?
असं प्रत्येक आयटमचं करता येईल.
=================================================================================
अहमहमिकेने हे नाही सांगायचे की आम्ही कित्ती कित्ती कामे करतो अन तुम्ही कसे आयतोबा आहात.
यासाठी अभिनंदन करावं तितकं कमी आहे. असा विचार करणारे लोक सुखाने जगतात. जगाला दोन उपविश्वांत वाटणारे नाही.
अजून एक सल्ला आहे - काँशसली आम्ही आणि तुम्ही हे शब्द टाळावेत. एका पक्षाचे प्रतिनिधित्व घेत गेलो तर बायस कधी कुठून आला हे कळत नाही.
http://www.thehindu.com/2004/
http://www.thehindu.com/2004/01/10/stories/2004011004021200.htm
२००४ ची ही बातमी.
बोलणारे सगळे काँग्रेसचे.
http://history.stackexchange.com/questions/1356/did-india-turn-down-a-p…
हे दृष्टोकोन.
-----------------------------
नक्की काय भानगड आहे?
नेहरू खरोखरीच खूप उदार होते का?
१. मला तरी त्यांनी ती ऑफर
१. मला तरी त्यांनी ती ऑफर 'नाकारलेली' कुठेही दिसली नाही. फक्त चायनाच्या "ऐवजी" नको असे म्हटले आहे. आधी चायनाचे काय ते बघु मग इतर, एकावेळी एक असा अॅप्रोच ठेऊयात अशी चर्चा आहे. फक्त चायनालाच द्या आम्हाला नकोच असे काही दिसले नाही.
२. ही चर्चा वरील लोकसभेतील निवेदनाच्या आधी झाली की नंतर कल्पना नाही. त्यामुळे वरील नेहरुंचे लोकसभेतील विधान कदाचित खरेही असेल
३. नक्की ऑफर कोणी दिलेली अमेरिका की रशिया की दोघांनी?
==
ही मिनिट्स वाचली तर इतक्याशा चर्चेवरून सिक्युरीटी काउंसिलमधील जागेची ऑफर होती हे कदाचित ग्राह्य ठरावे नि त्याहून महत्त्वाचे असे की नेहरूंनी ती मुळातूनच नाकारली असा ठाम निष्कर्ष काढणे घाईचे ठरावे.
दुसरे असे की ही ऑफर परमनंट मेंबरची होती का हे ही समजायला मार्ग नाही.
तिसरे असे की ही ऑफर व्हेटोसह परमनंट मेंबरची होती का याबद्दल अजिबातच उल्लेख नाही
---
अख्खे मिनिट्स समोर असल्याशिवाय दोन्ही बाजुने विधान करणे घाईचे वाटते. तेव्हा तुर्तास नेहरुंचे वरील लोकसभेतील विधानावर हे मिनिट्स शंका उत्पन्न करतात हे मान्य करून खाली बसतो.
या बातमीत दिलेली घटना सत्य
या बातमीत दिलेली घटना सत्य आहे की नाही कल्पना नाही ते कोर्ट ठरवेलच. पण अशा केसेस 'बलात्कार' या शब्दाची व्याख्या केवळा लिंगनिरपेक्षच नाही तर इतरही अंगांनी व्यापक करण्याची गरज उद्धृत करते.
यात दोन व्यक्तींना परस्परांशी जबरदस्तीने संभोग करायला लावला असा आरोप आहे. हा एक प्रकारे दोन्ही व्यक्तींवर बलात्कारच झाला. मात्र सद्य भारतीयच नाही तर अन्य देशांतील बलात्काराच्या व्याख्येत हे येत नसावे. इतर देशांत अशी घटना झाल्यास त्यावर निकाल द्यायला कोणते कायदे आहेत काय?
(चर्चेपुरते आरोपी पोलिस नाहीत असे गृहित धरावे. बातमीत ते पोलिस आहेत पण त्याने केवळ गुंतागुंत वाढते. तुर्तास इतकी गुंतागुंत नको)
अमेरीकेत कोणाकडे एखादे
अमेरीकेत कोणाकडे एखादे "मराठी" पुस्तक डबल झाले आहे का? किंवा वाचून वाचून कंटाळा आल्याने कोणाला एखादे पुस्तक देऊन टाकायचे आहे का? मला माझ्या ऑफिसचा पत्ता देऊन, पोस्टाने देवाणघेवाण करायला आवडेल. माझ्याकडे नवेकोरे, "पारवा - जी ए कुलकर्णी" पुस्तक डबल झाले आहे.
मराठी वाचन उपासमारीवर मला
मराठी वाचन उपासमारीवर मला सापडलेला उपायः
http://oudl.osmania.ac.in
पु.ल., दळवींची पुस्तकं बहुधा
पु.ल., दळवींची पुस्तकं बहुधा नाहीयेत. पण चिक्कआआर जुनी जुनी पुस्तकं आहेत. मला यावर माडखोलकर, केशवसुत, वसंत कानेटकर, चिं.विं, श्री. ना. पेंडसे वगैरेंची पुस्तकं मिळाली. मराठी नावं इंग्रजीत लिहिताना त्यांनी कुठली तरी खास पद्धत वापरली आहे (उदा. खांडेकर Khaan'd'ekar असं लिहिलंय, तर गाडगीळ Gaad'agiila असं). मी Browsing by Author करते. ओळखीचं किंवा मराठी भासणारं नाव दिसलं की क्लिक करून पाहते. Show full item record वर पाहिलं की कुठल्या भाषेतलं पुस्तक आहे, कुठल्या प्रकारचं वगैरे माहिती दिसते, की मग हाणते डाउनलोड. (उदा. गंगाधर गाडगिळांची पुस्तकं इथे मिळतीलः http://oudl.osmania.ac.in/browse?value=Gaad%27agiila+Gan%27gaadhar&type…). मधून मधून ही साइट बंद पडलेली दिसते, त्यामुळे त्वरा करा!
प्रॉव्हिन्स
चीन ह्या देशामध्ये जसे प्रॉव्हिन्स आहेत, तसे भारतात आहेत का? पूर्वी होते का?
प्रॉव्हिन्स म्हणजे भाषेनुसार केलेली प्रांतवार रचना/ विभागणी का? का प्रत्येक प्रॉव्हिन्स चा राज्य कारभार वेगळा असतो?
मग त्याला राज्य का नाही म्हणत? का राज्य आणि प्रॉव्हिन्स ह्या एकच गोष्टी आहेत?
--मयुरा.
प्रॉव्हिन्स (प्रांत) म्हणजे
प्रॉव्हिन्स (प्रांत) म्हणजे एखाद्या देशाचे प्रशासनाच्या सोयीसाठी पाडलेले विभाग. ते भाषावार असतील असं काही नाही. प्रॉव्हिन्स (प्रांत) आणि स्टेट (राज्य) हे दोन्ही शब्द बर्याचदा समानार्थी वापरतात. पण 'प्रॉव्हिन्स'ला 'राजधानीचं शहर वगळून उरलेला प्रदेश' अशी एक छटा आहे. 'राज्य'मधे ती नाही. तसंच, ज्या राष्ट्राचं प्रशासन संघराज्य पद्धतीनं चालतं, त्याच्या विभागांना राज्य तर ज्या राष्ट्राचं प्रशासन युनिटरी (मराठी शब्द आठवत नाहीये) पद्धतीनं चालतं, त्याच्या विभागांना प्रांत म्हणायची प्रथा आहे, असा फरक बहुधा असावा.
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात जे प्रशासकीय विभाग होते, त्यांना प्रॉव्हिन्स (प्रांत) म्हणायचे: संयुक्त प्रांत (युनायटेड प्रॉव्हिन्सेस - स्वातंत्र्योत्तर उत्तर प्रदेश), मध्य प्रांत (सेंट्रल प्रॉव्हिन्सेस - स्वातंत्र्योत्तर मध्य प्रदेश), पंजाब प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत इ. मुंबई, बंगाल आणि मद्रास हे तीन मह्त्त्वाचे आणि मोठे प्रांत होते. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या तीन शहरांतून (प्रेसिडेन्सी टाउन्स) त्यांचं प्रशासन चाले. [मुंबई प्रांतात आताचा पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकाचा काही भाग, सिंधचा काही भाग, गुजरात यांचा समावेश होता.] पुढे यातल्या अनेक प्रांताचे विभाजन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला हेच प्रांत होते. भाषावर प्रांतरचना केली तर भाषिक समूह राष्ट्रातून फुटून निघतील अशी भीती वाटल्याने नेत्यांच्या मनात भाषावार प्रांत नसावेत असं वाटत होतं. लोकांनी प्रांतांच्या भाषावार पुनर्रचनेसाठी आंदोलनं केल्यावर मात्र अखेर त्यांना नमावं लागलं.
बतन्-काज
बटन-काज, झिप/चेन ह्या वस्तूही डावर्यांसाठी वेगळ्या/सोयीस्कर बनवता येणं शक्य असावं.
बटान उजव्या बाजूला आणि काज/छिद्र डावीकडे ही रचना उजव्यांइतकी डावर्यांना सोयीची नसावी.
भारतीय स्टैल प्रातर्विधी प्रकारात टमरेल उजवीकडे ठेवायला लागतो. ते उजव्यांना सोपे.
मूठ असणार्या कैक वस्तू (चाकू वगैरे, किम्वा अगदि डिझायनर पलंगसुद्धा ) उजव्या हाताची मूठ गृहित धरुनच बनवल्यासारख्या वाटतात.
जेवण आणि इतर डावे-उजवे
पंगतीत पाण्याचा पेला डाव्या बाजूला असतो कारण तो जेवताना खरकट्या झालेल्या उजव्या हाताने उचलावा लागू नये म्हणून. हे उजव्यांना सोयीचे. तसेच जास्त खाल्ले जाणारे पदार्थ उजवीकडे वाढतात. उजव्या हाताने घेणे सोपे पडावे म्हणून. जे पदार्थ थोडेसेच खायचे असतात ते डाव्या हाताला कारण उजवा हात ताटावरून उलटा कमीत कमी वेळा फिरवावा लागावा.(अक्रॉस). जे लोक परंपरागतरीत्या तिखट खाणारे/ आवडणारे असतात त्यांच्यामध्ये गोडाची वस्तू डाव्या बाजूला वाढण्याची पद्धत असते आणि मीठही एक्स्ट्रीम डाव्या बाजूला असते.
जानवे डाव्या खांद्यावरून उजवीकडे असते आणि/कारण...
डावर्यांनी या चालीरीती आपल्याला सोयीस्कर अशा बदलाव्या. अगदी सव्य-अपसव्यसुद्धा. कालांतराने त्या रूढ होतीलच.
जुन्या काळी हातावरून भविष्य सांगणारे लोक बायकांचा डावा हात पाहात. आजकाल खूपसे हस्तसामुद्रिकतज्ञ बायकांचा देखील उजवा हातच बघतात.
२८ वर्षांपुर्वी मी एका
२८ वर्षांपुर्वी मी एका वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता, विषय होता 'निसर्ग श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ'. बरेच हास्यास्पद दावे करुन, निसर्गच मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ राहणारच अश्या नोटवर स्पर्धा जिंकली होती. पण आज ही चर्चा वाचल्यानंतर निसर्गच श्रेष्ठ आहे हे ठामपणे सांगू शकते....कारण तिथे कुठलिही मूठ वापरा काही फरक पडत नाही...
काव्या - मला बर्याच
काव्या - मला बर्याच वस्तूंबद्दल "डावर्या लोकांसाठी असतात वेगळ्या बनवतात का?" हा प्रश्न पडला होता. पण ब्रा बद्दल हा प्रश्न पडणे म्हणजे तुम्ही सॉलिड आहात.
एक उपप्रश्न : जर अश्या वेगळ्या ब्रा बनवल्या तर, कधीकधी ब्रेसियर्स पार्टनर (पुरुष्/स्त्री , ऐसीचा कल लक्षात घेउन फक्त पुरुष असे लिहीले नाही ) काढतो. अश्या वेळेला त्याचे/तिचे डावरेपण लक्षात घेउन पण बनतील का?
...
काव्या - मला बर्याच वस्तूंबद्दल "डावर्या लोकांसाठी असतात वेगळ्या बनवतात का?" हा प्रश्न पडला होता. पण ब्रा बद्दल हा प्रश्न पडणे म्हणजे तुम्ही सॉलिड आहात.
जिचे जळते?
एक उपप्रश्न : जर अश्या वेगळ्या ब्रा बनवल्या तर, कधीकधी ब्रेसियर्स पार्टनर (पुरुष्/स्त्री , ऐसीचा कल लक्षात घेउन फक्त पुरुष असे लिहीले नाही ) काढतो. अश्या वेळेला त्याचे/तिचे डावरेपण लक्षात घेउन पण बनतील का?
अँबिडेक्स्ट्रसची कल्पना रोचक आहे. बोले तो, बियर मग कसा अँबिडेक्स्ट्रस असतो - डावर्या आणि उजवर्या दोन्हीं प्रकारच्या लोकांना वापरता येतो - तसे काहीतरी योजणे उपयुक्त ठरेल.
किंवा मग पर्वतमुहम्मदन्याय. बोले तो, उत्पादक जर अँबिडेक्स्ट्रस चीजवस्तू बनवायला तयार नसतील, तर मग उपभोक्त्याने अँबिडेक्स्ट्रस व्हायचे. विनोबा कसे दोन्हीं हातांनी लिहू शकत, तद्वत. (मात्र, विनोबांची नेमकी अडचण कळू शकली नाही. लेखणीउत्पादक तसेही आपला माल अँबिडेक्स्ट्रसच बनवतात, अशी माझी समजूत होती - चूभूद्याघ्या.)
उशीर अन धांदरटपणा >> काय
उशीर अन धांदरटपणा >> काय कॉमेंट आहे तिच्याआयला =))
डावर्या बायका पुढे हुक असणार्या ब्रेसियर्स वापरत असतील कदाचित.
Thinking outside the box, ब्रेसियर्सना हुकऐवजी वेल्क्रो का नाही वापरत? ते डबल सायडेड असू शकते. किंवा २ मॅग्नेट्स. म्हणजे डावर्या बायकापण वापरू शकतील.
They just want to talk about
They just want to talk about it.
and call man a "bad listener" at the end of it. ;)
पुरुषमाणसाला हे दोन्ही सांभाळावं लागतं.
ट्रॅफिक हवालदाराला नुसते शांतपणे चायपाणी देऊन भागत नाही, थोडासाच वादविवाद करुन जॉब सॅटिस्फॅक्शनही द्यावे लागते. तद्वत स्त्रीचे म्हणणे नुसते शांतपणे ऐकून खरोखरचा "गुड लिसनर" ठरता येत नाही. त्यावर काहीतरी प्रतिसादात्मक बोलून स्वतः बॅड लिसनर ठरण्याचे मटेरियलही पुरवावे लागते. गपपणे ऐकून गप बसल्यास आपण "गुड लिसनर" न ठरता बेपर्वा, कशाचे काहीच पडलेले नसणारी व्यक्ती ठरु शकतो..
डावर्यांचे प्रमाण
एकूण लोकसंख्येत डावर्यांचे प्रमाण किती असेल?
जर ते प्रमाण जास्त नसेल तर, खास त्यांच्यासाठी बनणार्या वस्तूंसाठी जादाची रक्कम मोजण्यास ते तयार होतील काय?
(सदर प्रश्न केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून विचारलेला आहे. उजवे-डावरे सामाजिक समानतेची किंमत उत्पादकाने का चुकवावी?)
बटन आणि काजं यात उजवं डावं
बटन आणि काजं यात उजवं डावं काही नसतं.
फरक आहे. बटन हाताच्या बोटांनी पकडून योग्य अँगलने काजात घालणे आणि दुसरीकडून बाहेर घेऊन जागीच स्थित करणे या क्रियेत बटण पकडणार्या हाताच्या बोटांचं कौशल्य (फाईन मोटर स्किल) काज पकडणार्या हातापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. त्या बेताने पुरुषांच्या शर्टाची बटणं उजव्या हातात येतील आणि काजं डाव्या हातात येतील अशी रचना असते.
दुरुस्ती
तो इसम दिग्विजयसिंग आहे पण ते चित्र बातमीशी संबंधित नाही (असं फोटोखाली म्हटलं आहे).