Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

वेलकम याच्या विरुद्धार्थी शब्द काय असावा?

अनवेलकम हा शब्द नाही. वेलकम म्हणजे 'येणार्‍याचं स्वागत' तसं अनवेलकम म्हणजे 'येणार्‍याचं स्वागत नाही-यायला नकोय' असा अर्थ आहे. मला 'जाणार्‍याचं स्वागत' अशा अर्थी शब्द हवाय. अनुराग कश्यप जातो म्हणतोय 'तो जातोय ते चांगलंय' अशा अर्थी शब्द काय?

गवि Thu, 21/05/2015 - 12:41

In reply to by नितिन थत्ते

Good riddance मधे निगेटिव्ह छटा आहे. कटकट गेली अशा अर्थाची.

तशी अपेक्षित असल्यास शब्द चपखल.

पण जातोय याचा खरोखर आनंद (गुड फॉर हिज फ्यूचर, वगैरे) असा असेल तर कदाचित हा शब्द चपखल ठरणार नाही

राही Thu, 21/05/2015 - 23:43

'शुभास्ते पन्थानः सन्तु' हे लांबलचक वाक्य दर्शवण्यासाठी 'शुभास्ते...' असा शॉर्ट-फॉर्म क्वचित वापरला जातो. अपमानकारक निर्गमन सुचवायचे असल्यास 'गच्छ सूकर, भद्रं ते' या ऐवजी नुसतं 'भद्रं ते' असं वापरता येईल, वापरतात. शुभास्ते मध्ये निव्वळ निर्गमनच नाही तर त्यासाठी शुभेच्छा देखील आहेत. 'शुभ-निर्गमन' किंवा 'सुनिर्गतम्' असंही म्हणता येईल. 'सुआगतम्-सुनिर्गतम्' ही जोडी ठीक वाटते प्रचारात आणायला. सध्या कॉइन केलेला वाटत असला तरी एकदा रुळल्यावर सोपा वाटू शकतो हा शब्द. काही एक ध्येय ठेवून दूर जाणे'' यासाठी प्रस्थान, प्रयाण हे शब्द वापरता येतील.
दूर जाणार्‍या माणसासाठी कोंकणीत 'बरें करूं' हे शब्द वापरतात. म्हणजे चांगल्याने जा. सुखरूप असा. उर्दूमध्येसुद्धा 'दूर जाणे'साठी हिज्र वापरतात. प्रेषिताचे पलायन म्हणजे जरी मूळ हिज्र असले तरी हिज्र म्हणजे विरह, हव्या असलेल्या माणसाचे दूर जाणे अशा सुंदर अर्थाने तो वापरला जातो. "हिज्र की रात और इतनी रौशन!" किंवा "तेरा हिज्र भी, तेरा वस्ल भी, मेरे दर्दे दिल की दवा नहीं" वगैरे. उर्दूत वेगवेगळी छटा असलेले आणखी देखील शब्द आहेत. जसे की रुख़्सत, बिदा, गुज़रना वगैरे "कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे." रुख्सत क़्बूल करना हा वाक्प्रचारसुद्धा (जाणे मान्य करून घ्या अशा साधारणतः अर्थाने) छान वाटतो.

अजो१२३ Thu, 21/05/2015 - 23:45

In reply to by राही

छान माहिती.
-------------------------------------------------
जाणे येणे बद्दल राही न जाने तो कौन जाने?

गवि Fri, 22/05/2015 - 14:33

खेद व्यक्त करणे आणि दिलगिरी व्यक्त करणे यात काही फरक आहे का? असला तर कोणता? जबाबदारी घेणे आणि कबुली कशात जास्त आहे? यापैकी एक किंवा दोन्ही "क्षमा मागणे" याच्याशी समकक्ष आहेत का?

एखाद्या विधानाबद्दल किंवा घटनेबद्दल बोलताना वापरले जाण्याचा संदर्भ.

याच प्रकारचा आणखी काही शब्दप्रयोग आहे का?

नितिन थत्ते Fri, 22/05/2015 - 14:44

In reply to by गवि

खेद व्यक्त करणे हे जेनेरिक असावे आणि दुसर्‍यालाच दोष देण्यासारखे असावे.

दिलगिरी व्यक्त करणे हे माफी मागण्यासारखे आहे.

माझ्या बोलण्याने तुझ्या भावना दुखावल्या याबद्दल मला खेद आहे. तुझ्या भावना दुखावल्या जायला नको होत्या त्या दुखावल्या गेल्या त्याबद्दल मला खेद आहे. मी असे बोलायला नको होते असे मात्र नाही.

दिलगिरीमध्ये मी असं करायला नको होतं अशी कबुली आहे.

गवि Fri, 22/05/2015 - 15:23

In reply to by आदूबाळ

सॉरी हे (भारतात तरी) माफी याच अर्थाने वापरलं जातं. केवळ दु:ख म्हणून वापरलं तर बर्‍याचदा रेकग्नाईज होत नाही. कोणाचीतरी दुर्दैवी घटना ऐकून मी पूर्वी "ओह, आय अ‍ॅम सॉरी" असं म्हणण्याचा प्रयत्न केला तेव्हा "नो नो.. व्हाट्स युअर फॉल्ट इन दॅट.." असं म्हणून माझंच सांत्वन झालं.

आदूबाळ Fri, 22/05/2015 - 15:28

In reply to by गवि

माझ्याबाबतीत एकदा उलटं झालं होतं. मी काहीतरी चूक केल्यावर "आय अ‍ॅम सॉरी" म्हणालो. तर त्यावर ती बया म्हणाली, "यू शुड बी सॉरी. बट डू यू फील लाईक अपोलोजायझिंग?"

अरारारारारारा...

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 15:35

In reply to by गवि

What is your fault चूक आहे पण त्याजागी It's okay बरोबर आहे. मी विषय काढला म्हणून मी सॉरी. तितकं चालतं म्हणून ओके.
---------------------------------------------------
सॉरी हे फक्त "सॉरी" एतकेच एक्सक्लेमेशन असते तेव्हा ती व्यवस्थित माफी असते.

"आय अ‍ॅम सॉरी" मधे ते अ‍ॅडजेक्टीव असते तेव्हा (दु:ख निर्माण करण्यात माझा काही संबंध नसताना) वाईट वाटले असे वा (मी विषय काढला, आपणांस वाईट वाटले असावे क्षमा नाही पण) खेद आहे असा होतो, चूकून धक्का बिक्का लागला, खेद आहे असं. मी खोड काढलेली, काही वाईट केलेलं, आता बुद्धी झाली आहे, माफ करा म्हणायला "सॉरी".

काव्या Fri, 22/05/2015 - 15:45

In reply to by गवि

सॉरी हे (भारतात तरी) माफी याच अर्थाने वापरलं जातं. केवळ दु:ख म्हणून वापरलं तर बर्‍याचदा रेकग्नाईज होत नाही. कोणाचीतरी दुर्दैवी घटना ऐकून मी पूर्वी "ओह, आय अ‍ॅम सॉरी" असं म्हणण्याचा प्रयत्न केला तेव्हा "नो नो.. व्हाट्स युअर फॉल्ट इन दॅट.." असं म्हणून माझंच सांत्वन झालं.

हे अमेरीकेतही अनुभवास आले :(
पण अगदीच क्षुल्लक बाबतीत झाले. मी त्या सेल्स्मनला कानातील रिंगा दाखवायला सांगीतले अन त्याच्याने कपाट का खण उघडेचना. त्याची ते प्रयत्न पाहून मी म्हटले होते "आय अ‍ॅम सॉरी". कदाचित ते योग्य नसावे पण बायका जास्त वेळा सॉरी म्हणतात असे ठोस सर्वेक्षण आहे. लिंक सापडत नाहीये.

गवि Fri, 22/05/2015 - 15:48

In reply to by काव्या

बायका जास्त वेळा सॉरी म्हणतात

हो, पण एकदाही मूळ अर्थाने म्हणत नाहीत हे आमचे निरीक्षण आहे. बायकांचे सॉरी म्हणजे कम्बख्ती.

गवि Fri, 22/05/2015 - 15:46

In reply to by आदूबाळ

दिलगिरी म्हणजे सहानुभूति का? मनापासून दु:खी किंवा या दु:खात सहभागी आहे, म्हणजे दिलगीर आहे ?

की गिल्टी आहे, अपराधीपणा फील करतो आहे अशा अर्थाने?

'न'वी बाजू Fri, 22/05/2015 - 18:45

In reply to by हारुन शेख

'दोष (सर्वस्वी) माझा'?

हारुन शेख Fri, 22/05/2015 - 21:10

In reply to by 'न'वी बाजू

भारीच… ABP माझावाल्या वृत्तनिवेदकाकडून काही बोलतांना चुकलं तर ते असेच म्हणतील ;)

adam Fri, 22/05/2015 - 16:30

भारत महान देश आहे.प्रभूची लीला अपरंपार आहे.
मुख्तार अब्बस नक्वी गोहत्याबंदीचं हिरिरीनं समर्थन करताहेत.
शाहनवाज हुसैन सावरकर भक्त आहे; सावरकरांना "टेररिस्ट " म्हण्णार्‍या (उच्चवर्णीय तमिळ ब्राम्हण घरातल्या) मणिशंकर ऐय्यरला जाहिर टीव्हीवर झापतोय.(दहाएक वर्षापूर्वीचा टीव्हीवरचा जाहिर वादविवाद.)
कर्नाड, काटजू,ऋषी कपूर हे हिंदू गाय खाण्यास आसुसलेले आहेत.
.
.
भारत खरोखर सेक्युलर आहे. प्रभूची लीला अपरंपार आहे.

सावरकरांना टेररिस्ट म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांना झापले ते बरोबरच केले. नक्वी शाहनवाझ यांच्या मतांचा आदर आहेच. पण गोवंशहत्याबंदी चुकीची आहे एवढेदेखील त्यांना समजत नसेल तर या नेत्यांची नाळ मुसलमानांशी पूर्ण तुटलेली आहे असे म्हणता येण्यास बराच वाव आहे.
बाकी आपला देश महानच आहे. जय हिंद !

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 18:44

In reply to by हारुन शेख

पण गोवंशहत्याबंदी चुकीची आहे एवढेदेखील त्यांना समजत नसेल तर या नेत्यांची नाळ मुसलमानांशी पूर्ण तुटलेली आहे

रियली?
मी तर असं ऐकलं आहे कि कट्टर, पाकिस्तान मागणारे, हिंदू विरोधी, मुसलमानांना अव्वाच्या सव्वा राजकीय अधिकार असावेत , इ इ म्हणणारे १९०० ते १९६० चे मुस्लिम नेते गोहत्याबंदी बद्दल अगदी कूल होते. नो ऑब्जेक्शन.

कंस्टिट्येंट असेंब्लित एकाही मुस्लिम सदस्याने गोहत्येला विरोध केला नाही. उलट अनेकांनी पाठिंबा दिला.
गोहत्या बंदी हा "मूलभूत अधिकार" होणार होता. आणि असा प्रस्ताव मुस्लिमाने दिलेला. हे ते स्पीच -

Mr. Z. H. Lari (United Provinces: Muslim): Mr. Vice-President, I appreciate the sentiments of those who wantprotection of the cow - may be on religious grounds or maybe in the interests of agriculture in this country. I havecome here not to oppose or support any of the amendments butto request the House to make the position quite clear andnot to leave the matter in any ambiguity or doubt. TheHouse, at the same time, must appreciate that Mussalmans ofIndia have been, and are, under the impression that theycan, without violence to the principles which govern theState, sacrifice cows and other animals on the occasion ofBakrid. It is for the majority to decide one way or theother. We are not here to obstruct the attitude that themajority community is going to adopt. But let there notlinger an idea in the mind of the Muslim public that theycan do one thing, though in fact they are not expected to dothat. The result has been, as I know in my own Province onthe occasion of the last Bakrid, so many orders underSection 144 in various places, districts and cities. Theconsequence has been the arrests of many, molestation ofeven more, and imprisonment of some. Therefore, if the Houseis of the opinion that slaughter of cows should beprohibited, let it be prohibited in clear, definite andunambiguous words. I do not want that there should be a showthat you could have this thing although the

intention may beotherwise. My own submission to this House is that it isbetter to come forward and incorporate a clause inFundamental Rights that cow slaughter is henceforthprohibited, rather than it being left vague in the DirectivePrinciples, leaving it open to Provincial Governments toadopt it one way or the other, and even without adoptingdefinite legislation to resort to emergency powers under theCriminal Procedure. In the interests of good-will in thecountry and of cordial relations between the differentcommunities I submit that this is the proper occasion whenthe majority should express itself clearly and definitely.

I for one can say that this is a matter on which wewill not stand in the way of the majority if the majoritywants to proceed in a certain way, what ever may be ourinclinations. We feel - we know that our religion does notnecessarily say that you must sacrifice cow: it permits it.The question is whether, considering the sentiments that youhave, considering the regard which the majority have forcertain classes of animals, do they or do they not permitthe minority - not a right - but a privilege or a permissionwhich it at present has? I cannot put it higher. I won'tclass it as interference with my religion. But I do not wantthat my liberty should be taken away, and especially thepeaceful celebration of any festival should be marred by thepromulgation oforders under Section 144. I have come only to plead that.Therefore, let the leaders of the majority community hereand now make it clear and not leave it to the back-benchersto come forward and deliver sermons one way or the other.Let those who guide the destinies of the country, make ormar them, say definitely "this is our view", and we willsubmit to it. We are not going to violate it. This is theonly thing I have come to say. I hope you will notmisunderstand me when I say this. It is not due to anger,malice or resentment but it is out of regard for cordialrelations between the communities, and what is more, due tothe necessity of having a clear mind that I say this.Henceforward the Muslim minority must know where they standso that they may act accordingly, and there be no occasionfor any misunderstanding between the majority and theMuslims on this point.

In view of what I have said, I would not oppose norsupport any of the amendments, but I would invite a veryclear and definite rule instead of the vague phraseology ofthe clauses which have been put forward. It proceeds to saythat we should have modern and scientific agriculture.Modern and scientific agriculture will mean mechanisationand so many other things. The preceding portion of theclause speaking about modern and scientific agriculture andthe subsequent protion banning slaughter of cattle do notfit in with each other. I appreciate the sentiments ofanother member who said "this is our sentiment, and it isout of that sentiment that we want this article". Let thatarticle be there, but for God's sake, postpone thediscussion of the article and bring it in clear, definiteand unambiguous terms so that we may know where we stand andthereafter there should be no occasion for anymisunderstanding between the two communities on this issuewhich does not affect religion but affects practices whichobtain in the country.

शिवाय नकवी आणि हुसेन यांना मुसलमानांपासून तोडण्यापूर्वी ही अख्खी डिबेट वाचा-
http://parliamentofindia.nic.in/ls/debates/vol7p12.htm

हारुन शेख Fri, 22/05/2015 - 21:07

In reply to by अजो१२३

अजो, कुलली घेतलं म्हणजे बोचलं नाही असं नाही,पण फक्त चरफडण्यापलीकडे काहीच करू शकत नाही कारण त्यांना माहित आहे की आपले आततायी बोलणे अंगाशी येउन आपले आणि आपल्या समाजाचे व्यापक हित धोक्यात घालू शकतात. ( भडकाऊ बोलायची संधी आणि मोकळीक हिंदुत्ववाद्यांना आहे आपल्या लोकशाहीत पुढची काही वर्ष . त्यामुळे चालू देत त्यांचे ) आणि शहाणपणाचीच भूमिका आहे ही. राज्यकर्त्यांप्रमाणे प्रजा स्वतःला थोडंफार बदलून घेतेच . मला मात्र ही बंदी जाचक वाटते.

"नकवी आणि हुसेन यांना मुसलमानांपासून तोडण्यापूर्वी " ---

छे छे …मी कोण हो यांना मुसलमांनापासून तोडणारा. मी आपलं मला दिसलं ते सांगितलं. ते मुसलमानांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे नेते वैगेरे आहेत असं तुम्ही म्हणत असाल तर तुमच्याही मताचा आदर आहेच. मुस्लिम तरुणांमध्ये किंवा एकूणच सगळ्या वयोगटातील मुस्लिमांना सध्या AIMIM चे 'असदुद्दीन ओवैसी' जास्त आपले वाटतात. (भडकाऊ बोलणारे 'अकबरुद्दीन ओवैसी' आणि हे ओवैसी वेगळे ) ते काय बोलतात, काय मुलाखती देतात, त्यांच्या सभा आणि लेख याकडे आवर्जून लक्ष दिले जाते. हेही माझ्या मर्यादित वर्तुळातले माझे निरीक्षण असे तुम्ही म्हणू शकता.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 23:02

In reply to by हारुन शेख

असवुद्दिन ओवैसी अत्यंत संतुलित आणि सुविचारी मनुष्य आहे.
=========================================================
आणि लक्षात घ्या, त्यांचे बंधु बेताल सुटलेले असले तरी गोहत्याबंदी असा. ओवैसींना मान्य आहे.
http://www.dailyo.in/politics/beef-ban-congress-bjp-asaduddin-owaisi-ca…
=============================================================
https://www.youtube.com/watch?v=emJmXRlSnJ8
गोहत्येवरचे त्यांचे सगळे विचार इकॉनॉमिक आहेत आणि रास्त आहेत.
=======================================================================================================================

आपले आततायी बोलणे अंगाशी येउन आपले आणि आपल्या समाजाचे व्यापक हित धोक्यात घालू शकतात.

काहीतरीच? त्या सदस्याने अतिशय विशुद्ध आणि मुद्देसुद मत मांडले आहे. शिवाय, हे विधान वर्तमान संदर्भात असल्यास, भारतात मुस्लिमांच्या व्यापक हिताची चिंता करावी इतका मोठा मुस्लिम नेता देशात नाही आणि तो असो वा नसो, अशी चिंता करायची या देशात गरज नाही.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 23:07

In reply to by हारुन शेख

कुलली घेतलं म्हणजे बोचलं नाही असं नाही

मोगल बादशहांनी कूलली घेतलं तर आत्ताच काय बिघडलं म्हणे?

बॅटमॅन Sat, 23/05/2015 - 00:36

In reply to by अजो१२३

ठ्ठो =)) हे तोडफोडवाले मुघलही गोभक्त निघाले म्हणजे मज्जाच आहे =))

गूगलल्यावर विकी डोनरने दिलेली माहिती अशी:

The Mughal emperor Babar ruled in 1526 that killing cows was forbidden.[31] In his Wasiyyat namd-i-majchfi (Persian: secret testament‎) to his son and successor, Humayun, dated First Jamadi-ul-Awwal 935 Hijri (11 January 1529), Babur wrote,

The realm of Hindustan is full of diverse creeds. Praise be to God, the Righteous, the Glorious, the Highest, that He had granted unto you the Empire of it. It is but proper that you, with heart cleansed of all religious bigotry, should dispense justice according to the tenets of each community. And in particular refrain from the sacrifice of cow, for that way lies the conquest of the hearts of the people of Hindustan; and the subjects of the realm will, through royal favour, be devoted to you".[32][33]

Later Mughal emperors Akbar (reign: 1556 – 1605), Jahangir (1605 – 1627), and Ahmad Shah (1748 – 1754), it is said, imposed selective restricted bans on cow slaughter.[34][35]

Cow slaughter was not prohibited during the reign of Aurangzeb. In 1645, soon after being appointed Governor of Gujarat, Aurangzeb converted the Chintamani Parshvanath Jain temple near Sarashpur, Gujarat into a mosque, and ordered that a cow be slaughtered in the shrine.[36][37] The building was later restored to the Hindus, by order of Aurangzeb's father, then emperor Shah Jahan.[38] Aurangzeb wished to convert India into a Muslim country, and forced conversions occurred in some areas.[39][40] In present-day Punjab, India, a delegation to the 9th Sikh guru Guru Tegh Bahadur told him that " ... Cows are everywhere being slaughtered. If any cow or buffalo belonging to a Hindu is mortally ill the qazi comes and kills it on the spot. ... If we fail to inform the qazi when a beast is dying he punishes us ... "[41]

The last Mughal emperor Bahadur Shah Zafar banned cow slaughter in 1857 in the territories he nominally controlled, a couple of months before being deposed and deported to Burma by the British.[42][43]

तो स्युडो-आलमगीर आपलं पिदरगीर औरंगजेब वगळला तर बाकीचे बहुतेक सर्वजण कूलपणेच घेत होते असं दिसतंय.

अजो१२३ Sat, 23/05/2015 - 01:42

In reply to by बॅटमॅन

खासकरून १८५७ नंतर हिंदूची पवित्र गाय आणि मुस्लिमांचे निषिद्ध डुक्कर यांचेबद्दल दोन्ही समाजांत प्रचंड 'समजून्तदारपणा' निर्माण झालेला. तो ऐक्याचा, बंडाचा, इ इ ट्रीगर होता. तुमच्या गाईला आम्ही मानत नाही म्हटल्यावर कुठचं आलंय एकत्रित उठाव?

'न'वी बाजू Sat, 23/05/2015 - 17:38

In reply to by बॅटमॅन

तो स्युडो-आलमगीर आपलं पिदरगीर औरंगजेब वगळला तर बाकीचे बहुतेक सर्वजण कूलपणेच घेत होते असं दिसतंय.

त्या अगोदरच्या यच्चयावत् सगळ्या घराणेशाहीवादी डाव्या मुघलांचा हिंद्वनुनय, दुसरे काय! सगळे नुसते व्होटबँक पॉलिटिक्स. (तरी त्याचा राजकीय फायदा किती झाला, कोणास ठाऊक. हे हिंदू सगळे एकजात चालू! एवढे सगळे करूनच्या करून तो तेवढा तीर्थयात्रा कर काय तो लावला, म्हणून यांची रड आहेच. अरे, एवढेच असेल, तर जावा की हिंदवी स्वराज्यात! कोणी अडवलेय?)

मग पुढे आला तो आलमगीर तेवढा पोलादपुरुष निघाला. त्याने नसते लाड चालवून घेतले नाहीत, नि दणका दिला नि मग अच्छे दिन आले.

असो चालायचेच. हिष्टरी रिपीट्स इट्सेल्फ इन द मोष्ट अनप्रेडिक्टेबल वेज़, अजून काय?

(बादवे, 'पिदरगीर' बोले तो?)

बॅटमॅन Sun, 24/05/2015 - 02:13

In reply to by 'न'वी बाजू

(बादवे, 'पिदरगीर' बोले तो?)

इराणचा तत्कालीन राजा शहा अब्बास हा औरंगजेबाला आजिबात मानत नसे. बॉर्डर डिस्प्यूटचा मामला. त्याने कंदाहार हडपल्यावर ते मुघलांना बहुधा पुन्हा कधी घेता आले नाही. त्यांच्या कायम स्वार्‍या होत असत तिथे, पण यश कै आले नाही.

आता आलमगीर या शब्दाचा अर्थ आहे जगाचा राजा, लिटरली-जगाला 'गिरफ्त' करणारा अर्थात पकडणारा असा तो. अब्बासच्या मते हा कसला आलमगीर? हा तर पिदरगीर अर्थात, बापाला कोठडीत डांबणारा.

http://en.wikipedia.org/wiki/Abbas_II_of_Persia

नितिन थत्ते Sun, 24/05/2015 - 08:34

In reply to by 'न'वी बाजू

पिदरगीर म्हणजे बापाला कैद करणारा .....

अच्छा ! म्हणजे हिंदुस्थानातील थेरडेशाही संपवण्यात सुद्धा औरंगजेबाचा खारीचा वाटा आहेच तर !! ;)

'न'वी बाजू Sun, 24/05/2015 - 17:07

In reply to by नितिन थत्ते

हिंदुस्थानातील पारंपरिक थेरडेशाही संपविण्यात, बरोबर. (आणि त्याकरिता त्याबद्दल आदर आहेच.) फक्त, (हिंदुस्थानातील) पारंपरिक हिंदू थेरडेशाही संपविण्यात असे म्हणता येणार नाही, इतकेच.

पण बरोबरच आहे. ज्यानेतिने आपापले घर स्वच्छ केले (/ ठेवले) पाहिजे, नाही काय?

नितिन थत्ते Sun, 24/05/2015 - 17:21

In reply to by 'न'वी बाजू

वरिज्नल पिदरगीर सम्राट अशोक होता असे ऐकले आहे. पण विकीवर "भावाला जळत्या निखार्‍यांच्या खड्ड्यात पाडून" त्याचा काटा काढला असे लिहिले आहे.

नितिन थत्ते Mon, 25/05/2015 - 07:58

In reply to by बॅटमॅन

अ‍ॅक्च्युअली दोन्ही नसावा. गीर म्हणजे "पकडणारा" असेल तर अशोकाने भावांना पकडले नव्हते ठारच मारले.

'न'वी बाजू Sun, 24/05/2015 - 16:43

In reply to by गवि

..पिदर आणि पितर या शब्दांत साम्य दिसतेय.

अर्थात आहे.

आणि त्यात आश्चर्यकारक असे काही नसावे. संस्कृत आणि फारसी या दोन्ही इंडोयुरोपियन गटातील भाषा असून त्यांच्यात अत्यंत निकटचे नाते असल्याबद्दल ऐकिवात आहे.

(चूभूद्याघ्या; तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा.)

बॅटमॅन Mon, 25/05/2015 - 07:20

In reply to by 'न'वी बाजू

एग्झॅक्टलि. इनफॅक्ट, अरबी आक्रमण होण्याच्या हजारेक वर्षे अगोदरची जी ओल्ड पर्शियन भाषा (इसपू ५०० च्या सुमारासची) आहे, ती एखादी प्राकृत म्हटली तरी चालेल इतके तिचे संस्कृतशी साम्य आहे. एका जालमित्राने तो इराणास गेला असताना तिथल्या एका शिलालेखाचे वाचन करून मला त्याची मेल केली होती. थोड्याश्या स्पूनफीडिंगनंतर (उदा. संस्कृत स = पर्शियन ह, संस्कृत ह = पर्शियन द, इ.) तो शिलालेख समजायला आजिबात अडचण आली नाही.

हा शिलालेख म्हणजे ३०० नामक पिच्चरमध्ये जो इराणी राजा xerxes दाखवलाय त्याचा आहे. भगवान अहुरमझ्दाच्या कृपेने राज्य मिळाले इ.इ. उल्लेख आहे.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 18:46

In reply to by हारुन शेख

सावरकरांना टेररिस्ट म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांना झापले ते बरोबरच केले.

"सावरकरांचे नव्हे तर दाऊद इब्राहिमचे स्मारक बांधणार का?" हा शाहनवाज हुसेन यांचा टोला अविस्मरणीय आहे.

गब्बर सिंग Mon, 25/05/2015 - 11:33

In reply to by अजो१२३

सावरकरांचे स्मारक अवश्य बांधा. फुल्ल पाठिंबा आहे. दोन तिन स्मारके बांधा.

पण एकदाच काय ते बांधून काढा. "स्वातंत्र्योत्तर कालात सावरकरांवर अन्याय झाला" हा आरडाओरडा बंद करता येईल अशी सोय व्हावी इतपत मोठे स्मारक बांधा. पुन्हा २०१९ नंतर आरडाओरडा होता कामा नये की सावरकरांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले.

गवि Mon, 25/05/2015 - 11:39

In reply to by गब्बर सिंग

पण एकदाच काय ते बांधून काढा. पुन्हा २०१९ नंतर आरडाओरडा होता कामा नये की सावरकरांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले.

का म्हणून ही बंधने? एकदाच स्मारक बांधून न काढणे, थोडेथोडे बांधणे, शंभर वर्षांत मिळून बांधणे, अनेक स्मारके बांधूनही सावरकरांकडे किंवा अन्य कोणाकडेही अक्षम्य दुर्लक्ष झाले असे ओरडणे हे सर्व हक्क ज्याला हवे त्या व्यक्तीला हवे तेव्हा आणि हवे तसे उपलब्ध राहिलेच पाहिजेत.

-बब्बर विंग

गब्बर सिंग Mon, 25/05/2015 - 11:44

In reply to by नितिन थत्ते

महाराष्ट्र सरकार.

२०१९ चा अर्थ महाराष्ट्र राज्य सरकार असा सुद्धा होतो. (सरकार तोपर्यंत टिकले तर).

'न'वी बाजू Sat, 23/05/2015 - 17:39

In reply to by हारुन शेख

पण गोवंशहत्याबंदी चुकीची आहे एवढेदेखील त्यांना समजत नसेल तर या नेत्यांची नाळ मुसलमानांशी पूर्ण तुटलेली आहे असे म्हणता येण्यास बराच वाव आहे.

मुसलमानांशी नाळेबद्दल (मला) कल्पना नाही. परंतु, "ज्यांना गोमांस खायचे आहे, अशांनी खुशाल पाकिस्तानात जावे" अशा स्वरूपाचे या सद्गृहस्थांचे विधान असल्याचे समजते. (चूभूद्याघ्या.)

आता, मी (किंवा माझ्यासारख्या कोणी) कोठे जायचे हे ठरवू पाहणारे हे सद्गृहस्थ कोण, ही बाब तूर्तास क्षुल्लक म्हणून सोडून देऊ. (चलता है, हिंदुस्तान है, वगैरे वगैरे.) परंतु, माझ्या अतिसामान्य अज्ञानानुसार, मी (किंवा माझ्यासारख्या कोणा बिगरपाकिस्तानी नागरिकाने) या सद्गृहस्थांची आज्ञा शिरसावंद्य मानून आत्ताच्या आत्ता पाकिस्तानास प्रस्थान करायचे जरी म्हटले, तरी ते मारली स्कूटरला किक (किंवा पकडले विमान किंवा रेल्वे किंवा जे काही असेल ते) आणि निघाले पाकिस्तानास, इतके सोपे नाही, एवढे मलादेखील कळते. त्याकरिता किमानपक्षी पाकिस्तान सरकारचा परवाना (व्हिसा वगैरे) लागावा, आणि तो मिळवणे एवढे सोपे नसावे, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. तो परवाना मला सहजगत्या आणि निश्चितपणे उपलब्ध होईल, याची हमी सदर सद्गृहस्थ देऊ शकतात काय? देऊ शकत असल्यास, पाकिस्तान सरकारच्या वतीने अशी हमी ते छातीठोकपणे देऊ शकतात, ते नेमक्या कोणत्या आधारावर? सदर सद्गृहस्थ पाकिस्तान सरकारचे अधिकृत प्रतिनिधी आहेत काय?

(नसल्यास, हे हलवायाच्या घरावरील तुळशीपत्र किंकारणेन?)

...............

किंवा, आम्हां फडतूसांच्या भाषेत, पाकिस्तान काय यांच्या तीर्थरूपांचे?

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 19:01

इतिहासात पहिल्या सतीचा उल्लेख कधीचा आहे? (ती पुराणातली सती नव्हे, कुप्रथेतील सती.)

बॅटमॅन Fri, 22/05/2015 - 19:45

In reply to by अजो१२३

http://en.wikipedia.org/wiki/Sati_%28practice%29#Earliest_records

इ.स. ४६४ च्या सुमारासची ओल्डेस्ट सतीशिळा सापडलेली आहे. त्याअगोदर ग्रीक ग्रंथातला उल्लेख इसपू पहिल्या शतकातला आहे.

त्याच लिंकेतून कळते की प्राचीन काळी भारताबाहेरही काही ठिकाणी अशी रूढी प्रचलित होती.

चार्वी Fri, 22/05/2015 - 20:26

In reply to by अजो१२३

सतीप्रथेचे खंडन करताना राममोहन रॉयांनी पूर्वपक्षाचे जे मत दिले आहे, त्यात ऋग्वेदातला म्हणून एक उतारा दिला आहे:
"O fire ! let these women, with bodies anointed with clarified butter, eye coloured with collyrium, and void of tears, enter thee, the parent of water, that they may not be separated from their husbands, but may be, in unison with excellent husbands, themselves sinless and jewels amongst wromen."
(तळटीपेत लिहिले आहे: 'इमा नारीरविधवा: सुपत्नीवांजनेन सर्पिषा सम्बिशन्त्वनश्रवा अननीरा सुरत्ना आरोहन्तु यामयो योनिमग्ने:')
आता हा खरंच ऋग्वेदातला उतारा आहे का याबद्दल मला शंका आहे. पण असल्यास हाच पहिला उल्लेख असू शकेल. त्याशिवाय हा पूर्वपक्षवाला (सतीचे मंडन करणारा) अंगिरस, व्यास, हरीत, विष्णु इ. धर्मशास्त्रकारांचे, ब्रह्म पुराणाचा असे दाखलेच दाखले देतो. (या सगळ्यांचा काळ कुठला ते मात्र मला माहीत नाही)

बॅटमॅन Fri, 22/05/2015 - 20:42

In reply to by चार्वी

सहज गूगलल्यानंतर तेव्हा ती ओळ ऋग्वेदातली नसून अथर्ववेदातली आहे असे दिसते. अथर्ववेदाचा काळ? ऋग्वेदाच्या नक्कीच नंतरचा असे म्हणतात, पण कधी ते माहिती नाही. इन एनी केस बिफोर ७००-८०० बीसी. पण एवढ्या एका उल्लेखावरून सांगता येईल असे वाटत नाही, कारण नक्की पार्श्वभूमी माहिती नाही.

शिवाय एक ओव्हरलि बेसिक शंका- इमा: नारीरविधवा म्हणजे या अविधवा स्त्रिया. सती जाणारी स्त्री ट्रॅडिशनली अविधवा मानली जाते का? की तेवढ्यापुरता मरेपर्यंत सौभाग्यात खंड वगैरे पडतो?

चार्वी Sat, 23/05/2015 - 23:36

In reply to by बॅटमॅन

हं, अथर्ववेदातली असल्याचीच शक्यता जास्त वाटते. तसंच सती-मंडनकाराने लावलेला तिचा अर्थही कितपत विश्वसनीय आहे कोण जाणे.
सती अविधवा मानली जाते का नाही काही कल्पना नाही. पण कादंबर्‍यांमधे वाचलेल्या उल्लेखांवरून सती जाताना मळवट भरणे, चुडा भरणे, ओटी भरणे, (आणि बहुधा सौभाग्यवाण वाटणे) अशा एरवी सवाष्ण स्त्रियांनाच लागू असणार्‍या गोष्टी करत असत असं वाटतं.

adam Fri, 22/05/2015 - 20:40

लहानपणी दही-दूध-लोणी-तूप प्रचंड आवडत असे. मनसोक्त खायचो घरी बनवलेलं तूप.
पण तूप अन् लोण्यापेक्षाही जास्त आवडायची ती "बेरी". लोणी कढवताना खाली तळाशी शिल्लक राहिलेला थोडासा खरपूस आंबट्/गुळमट काळपट-चॉकलेटी भाग.
मस्त लागायची बेरी नुसतीच खाताना नैतर गुळात कालवून खायला.
हल्ली मार्केटमध्ये पाकिटबंद दूध-दही-तूप असं सगळच मिळतं.
पण बेरी कुठेच वेगळी अशी दिसली नै.
तूप बनवताना बेरी उरतच असेल की खाली.
ही उद्योजक मंडळी ती बेरी न विकताच ठेवत असतील असं वाटत नै.
पण मग मार्केटात का दिसत नै बेरी ?
की मग ह्यांची तूप बनवायची पद्धतच मुळात पार वेगळी असल्याने बेरीच बनत नै ?
आणि बेरीला इंग्लिश मध्ये नेमकं काय म्हणतात ?
तुपाला इम्ग्लिशमध्ये काय म्हणतात ? (तुपाच्या डब्ब्यावर "घी" असं लिहिलेलं दिसलं.)
(घरी बनवताना आधी दूध तापवायचं, मग साय काढायची, सायीचं विरजण लावायचं, मग ते घुसळून लोणी आणि ताक वेगळं काढायचं अशी प्रोसेस अवलंबतो. पण कंपन्यात/डेअर्‍यांत मात्र कच्च्या दुधाचं क्रीम काढतात नि मग काय काय प्रोसेसिंग करुन तूप बनवतात म्हणे.)

बॅटमॅन Fri, 22/05/2015 - 20:43

In reply to by adam

तूप ही कन्सेप्ट बहुधा युरोपात नाही. त्याला क्लॅरिफाईड बटर असे म्हणतात.

बाकी या निमित्ताने अजूनेक प्रश्नः बटरमिल्क या शब्दाचा अर्थ आपल्याकडे ताक असा घेतात. युरोप-अमेरिकेतले नेटवर पाहिलेले फोटो मात्र तसे वाटत नाहीत. मग त्यांचं बटरमिल्क म्ह. नक्की काय असतं?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 22/05/2015 - 20:52

In reply to by adam

घरी बनवताना आधी दूध तापवायचं, मग साय काढायची, सायीचं विरजण लावायचं, मग ते घुसळून लोणी आणि ताक वेगळं काढायचं अशी प्रोसेस अवलंबतो. पण कंपन्यात/डेअर्‍यांत मात्र कच्च्या दुधाचं क्रीम काढतात नि मग काय काय प्रोसेसिंग करुन तूप बनवतात म्हणे.

दूध तापवून, फ्रीजमध्ये थंड करून मग साय काढण्याचा फायदा म्हणजे घरच्याघरी दुधातले मेद अधिकाधिक प्रमाणात वेगळे करता येतात. विरजणाची पायरी गाळली तरी तुपाची चव बदलत नाही. विकत आणलेल्या, कच्च्या दुधाच्या लोण्याचं तूपही चवीला काही वेगळं लागत नाही. पण विकत मिळणाऱ्या तुपात (माझ्या मते) प्रिझर्व्हेटीव्ह्ज घालतात आणि त्यामुळे त्याची चव वाईट लागते.

इथे बेरीला browned (caramelized) milk solids असं म्हटलेलं आहे.

विकतचं लोणी आणून घरी तूप कढवण्याचे कष्ट घेतले तर बेरी सहज मिळेल. (एकेकाळी, आमच्या घरी बेरीवर पांढरू मांजरीचा हक्क होता. तिच्या खरबरीत जिभेने ती तुपाचं भांडं व्यवस्थित चाटून पुसून साफ करायची. दोन दिवस थांबलं की पातेलं घासायचे कष्ट फारच कमी व्हायचे. सध्या आमच्याकडे मांजर नाही, कंपोस्टात बेरी टाकता येत नाही. त्यामुळे कचऱ्यात भर पडते.)

अनुप ढेरे Fri, 22/05/2015 - 22:12

In reply to by adam

छान तूप किंवा बेरी हवी असेल तर कष्ट करावेत. विकत आणलेल्या तुपाला किंवा विकत आणलेल्या लोण्याला कढऊन केलेल्या तुपाची चव ही मला कायम इंफिरिअर वाटते.

नितिन थत्ते Fri, 22/05/2015 - 23:21

In reply to by adam

आपण सायीचं दही विरजून ताक करून त्यातून लोणी काढतो. कमर्शिअली दुधातील क्रीम वेगळे करून त्याला घुसळून बटर काढले जाते. उरते ते बटरमिल्क. हे आपल्या ताकासारखे आंबट नसते.

अशा (ताकाविना) काढलेल्या बटर मध्ये एसएनएफ (Solids Non Fat) चे प्रमाण सुमारे दीड टक्का असते. फॅट सुमारे ८० टक्के आणि बाकीचे पाणी असते. असे लोणी कढवल्यावर हे दीड टक्काच बेरी निघू शकेल. (उरलेली ८० टक्के फॅट) तुपाच्या स्वरूपात येते. [म्हणजे एक किलो लोणी कढवले तर फक्त दीड ग्रॅम बेरी मिळणार].

शिवाय कमर्शिअल घी (क्लॅरिफाइड बटर) कमी कढवलेले असते.

Ghee, although a type of clarified butter, differs slightly in its production. The process of creating traditional clarified butter is complete once the water is evaporated and the fat (clarified butter) is separated from the milk solids. However, the production of ghee includes simmering the butter along with the milk solids so that they caramelize, which makes it nutty-tasting and aromatic.

बहुधा न जळलेले एसएनएफ इतरत्र वापरलेही जात असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 23/05/2015 - 01:06

In reply to by नितिन थत्ते

यू.के आणि यू.एस.मध्ये बटरमिल्क या नावाखाली जे पेय विकलं जातं ते मला बऱ्यापैकी आंबट वाटतं. ग्रीक दह्यापेक्षा जास्त आंबट आणि बल्गेरियन दह्यापेक्षा कमी. ते कसं बनवतात हे मला माहीत नाही.
(ग्रीक दही फ्रीजबाहेर ठेवलं तर आंबट होत नाही, यथावकाश बुरशी येते. दोन्ही दह्यांची विरजणं लागत नाहीत.)

---

ऐकीव माहिती - म्हशीच्या दुधात ओमेगा-३ हे फॅटी आम्ल असतं, गायीच्या दुधात ओमेगा-६. यांतलं ओमेगा-६ हृदयासाठी अधिक चांगलं असं म्हणतात. म्हणून गायीचं दूध, तूप अधिक चांगलं असं समजतात.

तूप पक्कं कढवलं (बेरी ऑलमोस्ट काळी आणि पाण्याचा थेंब टाकल्यावर लगेचच तडतडेपर्यंत लोणी-तूप उकळायचं.) तर मला तुपांच्या चवींतला फरक समजत नाही. ज्यांना हे समजतं त्यांच्यापेक्षा माझं आयुष्य अधिक सुखाचं असावं. ;-)

चिंतातुर जंतू Sat, 23/05/2015 - 11:20

In reply to by नितिन थत्ते

>> हे आपल्या ताकासारखे आंबट नसते.

तरीही त्यात आंबटपणा असतो. उदा. आयरिश सोडा ब्रेडच्या पारंपरिक पाककृतीत (रुचीचा धागा पाहा) बटरमिल्क घालायला सांगतात, कारण त्याच्या आंबटपणामुळे सोडा फसफसतो आणि ब्रेड हलका होतो.

बिटकॉइनजी बाळा Sat, 23/05/2015 - 00:36

In reply to by adam

सहज विचारतो- म्हशीच्या दुधाचं तूप मला जास्त चविष्ट वाटते, आणि त्याचा सुवास ही स्ट्राँग टेम्टींग वाटतो. त्या मानाने गायीच्या दुधाचे (जर्सी गायींच्या) तूप हे इन्फिरिअर वाटते.
यापैकी कोणतं तूप चांगलं?

चार्वी Sat, 23/05/2015 - 23:56

In reply to by adam

आत्ताच एक पुस्तक-परिचय वाचला. दुधा-तुपावर चर्चा करायला आणखी बळ येईल असंच हे पुस्तक दिसतंय. अमेरिका-भारतातल्या दूध संस्कृती वरचे हे पुस्तक वाचायला आवडेल काही लोकांना:
http://www.hup.harvard.edu/catalog.php?isbn=9780674729056

बिटकॉइनजी बाळा Sat, 23/05/2015 - 10:48

मी व बेटर हाफने भाकरी करायचा आटापिटा केला, पण यश आले नाही. भाकरी जरी गोल आणी एकसंध थापली गेली तरी चर्‍या/भेगा पडल्या आणि त्या कधीच दुपदरी झाल्या नाहीत.
काही गोष्टी नोटीस केल्या की : साध्या पाण्याऐवजी जर उकळलेले पाणी टाकले तर कणीक हाताला खूप चिकटते. ते कसे टाळावे? भाकरी मात्र मउ झाली तुलनेत.
तवा मी हॉकीन्स चा ६ मिमी जाडीचा हार्ड अनोडाईज्ड (आत बहुतेक अ‍ॅल्युमिनीयम असावे) वापरतोय. त्याच्या गरम होण्याचा अंदाजच येत नाही आहे. अजुन एक म्हणजे भाकरी थापण्यासाठी/मळण्यासाठी मी लाकडी काटवठ वापरत आहे. भाकरी बरेच मोठी झाली तर उलथता येत नाही. शिवाय भाकरी तव्यावर टाकल्या वर त्यावर पाणी देखील फिरवताना स्कील लागतंय असं दिसतंय. त्यासाठी काही ट्रीक आहे का? शेवटी बेटर हाफ म्हणाली की भाकरी जेवणातून गायब करायची, पण परत प्रयत्न करायला राजी केलं आहे! काही ट्रीका सांगाल का कुणी?

adam Sat, 23/05/2015 - 10:55

In reply to by बिटकॉइनजी बाळा

नेमकं काय करायचं मलाही सांगता येणार नाही.
मी तीन-चार वेळेस करुन पाहिल्या. दरवेळी बर्‍यापैकी जमल्या होत्या.
भाकरी बनवण्यासाठीचा माझा पाककलेतला पूर्वानुभव :- शून्य.
मी आयुष्यात चहा-कॉफी वगळता कधी काही बनवलेलं नाही. पाककलाशून्य माणूस.
.
.

पण हा विडियो पाहून त्याबरहुकूम भाकरी केल्या जशास तशा; तर नेमक्या जमल्या.
हा तो विडियो :-
https://www.youtube.com/watch?v=4ZRrT7l7fEE

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 14:58

व्यवस्थापन : इथली उपचर्चा मूळ धागाविषयाशी संबंधित नसल्यामुळे इथे हलवली आहे.

ब ही व्यक्ती हयात नसल्याने तिचा कोणता एन्फोर्सेबल अधिकार डावलला जातोय?

नास्तिक, आत्मा न मानणारे लोक इंशुरन्स का घेतात असा प्रश्न मला नेहमीच पडतो.

बॅटमॅन Fri, 22/05/2015 - 15:00

In reply to by अजो१२३

मला तर उलट प्रश्न पडतो. देवावर श्रद्धा असलेल्यांना इन्शुरन्सची गरज का पडावी? श्रद्धाच पुरेशी नाही काय?

काव्या Fri, 22/05/2015 - 15:05

In reply to by बॅटमॅन

प्लीज इतक्या सुंदर चर्चेत तरी आत्मा अन अध्यात्माचे अवांतर आणू नये ही विनंती. बाकी ती मानणं न मानणं तुमच्या हाती. अति अवांतर झालं तर, योग्य वेळी संमं हलवतीलच.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 15:22

In reply to by काव्या

मी नितिनजींना विचारलेला पहिला प्रश्न अगदी पर्टीनेंट आहे.
हयात नसलेल्या महापुरुषाची बदनामी, स्तुति व्हावी वा नाही हे पाहणारा नास्तिक आहे कि नाही यावर अवलंबून आहे.
"ज्याला गांधीजी म्हणावं असं आज काहीच नाही" तर त्याचे संरक्षण का करा असा प्रश्न आहे.

नितिन थत्ते Fri, 22/05/2015 - 16:15

In reply to by अजो१२३

हयात असलेल्या पुरुषाची बदनामी झाली तर त्या हयात व्यक्तीस फरक पडतो. त्याच्याशी व्यवहार करणारे इतर लोक त्याच्याशी व्यवहार करताना बिचकतील/व्यवहार करणार नाहीत. त्यामुळे त्या हयात व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होऊ शकेल. म्हणून हयात व्यक्तीच्या बदनामीविरोधातला हक्क एनफोर्सेबल आहे.

मयत व्यक्तीला तसे काही लागू नाही असे मला वाटते.

तरी मला तुमचा प्रश्न कळलेला नाही.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 19:12

In reply to by काव्या

इतक्या सुंदर चर्चेत तरी आत्मा अन अध्यात्माचे अवांतर आणू नये ही विनंती.

आत्मा नि अध्यात्म हे विषय सुंदर नाहीत, सुंदर चर्चेचा भाग होऊ शकत नाहीत हा बायस अनावश्यक आहे.

काव्या Fri, 22/05/2015 - 19:17

In reply to by अजो१२३

दोन्हीही विषय सुंदरच वाटतील जर ररांइतके मुद्देसूद कोणी लिहू शकेल तर.
मला एवढच म्हणायचत अभिव्यक्तीस्वातंत्र्याची चर्चा अन अध्यात्म हा बादरायण संबंध आहे. हे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार आहे. पण जर तुम्हाला काही लिंक दिसत असेल तर जरुन विषद करावी.
पश्चातबुद्धी/उपरती म्हणा हवं तर. मला तरी काहीच आक्षेप उरला नाहीये आता. समंचा रोल मी कशाला घेऊ?

हारुन शेख Fri, 22/05/2015 - 16:59

In reply to by बॅटमॅन

इन्शुरन्स 'हराम' आहेत असे मानणारे काही मुसलमान बघितलेले आहेत. म्हणजे 'अल्लाक कालजी' अशी त्यांची आस्था असते.

adam Fri, 22/05/2015 - 17:03

In reply to by हारुन शेख

काही मुस्लिम मंडळी घरासाठी गृहकर्जही घेत नाहित असे ऐकले आहे.
फक्त परिचितांकडून पैसा गोळा करतात; किंवा स्वतः उभा करतात.
(बँकेच्या सहकार्याशिवाय घर घेतात.स्वतःचा पैसा उभा राहिस्तोवर चिकाटीनं वाट पाहतात. )
उसने पैसे घेतले असतील तर नंतर पैसे जमा झाल्यावर जितके घेतले
तितकेच(बिनव्याजी) परतही करतात.

गवि Fri, 22/05/2015 - 17:27

In reply to by adam

इस्लामिक बँकिंग ही एक रोचक आल्टरनेट बँकिंग सिस्टीम आहे. त्यानुसार इस्लामी बँका चालतात.

सर्व लिहिलं तर विषय मोठा होईल. थोडक्यात मुख्य सद्य चर्चेशी संबंधित मुद्दा असा की, शरियानुसार व्याज घेणे वर्ज्य आहे. त्याचप्रमाणे "वायदा" टाईपचे कोणतेही भविष्यकालीन अननोन गृहीतके असलेले व्यवहार वर्ज्य आहेत.

तेव्हा इस्लामिक तत्वाने चालणार्‍या बँका

अ. घर / वाहन वगैरेसाठी लोन देण्याऐवजी कागदोपत्री ते घर / वाहन स्वतः विकत घेते आणि कर्जदाराला (अधिक रकमेने) विकून मधले मार्जिन फायदारुपात मिळवते. ही किंमत हप्त्याहप्त्याने भरण्याची सोय देते. दंड आकारु शकत नसल्याने डिफॉल्ट न व्हावा म्हणून गहाण काहीतरी घेते.
ब. बँक कर्जदाराची पार्टनर बनते आणि घर आदि घेते. त्यात बँकेचे (बरेचसे) पैसे आणि घरेच्छूचे (थोडे) पैसे असे दोन्ही असल्याने टेक्निकली ही भागीदारी होते. नंतर ही मालमत्ता त्यालाच (घरेच्छूला) भाड्याने दिली जाते.

इतरही पद्धती असतात..

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 20/12/2018 - 23:54

In reply to by हारुन शेख

भलत्याच काही कारणासाठी खोदकाम करताना हा प्रतिसाद दिसला.

'हम देखेंगे' या फैजच्या कवितेत 'हम अहले सफा मरदूद-ए-हरम' अशी ओळ आहे. यात हरम याचा अर्थ घर असा असल्याचं एका मित्रानं कळवलं. 'हरम' निराळं आणि 'हराम' निराळं, हेही आवर्जून लिहिलं. मात्र 'मरदूद' या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नाही; हा काही अरबी शब्द आहे, त्याला अरबी भाषा येत नाही, उर्दू येते.

अतिअवांतर - हा मित्र सध्या (मोदीद्वेष्टा नसला तरीही आईवडीलांना भेटण्यासाठी) पाकिस्तानात गेला आहे.

चिंतातुर जंतू Fri, 21/12/2018 - 12:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'हम देखेंगे' या फैजच्या कवितेत 'हम अहले सफा मरदूद-ए-हरम' अशी ओळ आहे. यात हरम याचा अर्थ घर असा असल्याचं एका मित्रानं कळवलं. 'हरम' निराळं आणि 'हराम' निराळं, हेही आवर्जून लिहिलं. मात्र 'मरदूद' या शब्दाचा अर्थ त्याला माहीत नाही;

इथे पाहा.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 17:28

In reply to by हारुन शेख

व्याज, विमा इ इ संकल्पना हराम आहेतच मुळी.
न्यूटनने भौतिकशास्त्रात काळ एक रियल संकल्पना म्हणून मांडली नि तेच अर्थशास्त्राबाबत झाले. जणू काही काळातच काही शक्ती आहे.
मूळात या फंडामेंटल्स मधेच इतका सॉलिड लोचा आहे कि मानवाची प्रगती अशा चुकीच्या आधारांमुळेच खुंटून बसली आहे कि काय असे कधी कधी मला वाटते.
सिंप्लिफिकेशनच्या नादात ...

नितिन थत्ते Fri, 22/05/2015 - 18:07

In reply to by अजो१२३

म्हणजे अर्थशास्त्रात "टाइम व्हॅल्यू ऑफ मनी" ही संकल्पना न्यूटनच्या थिअरीवरून घेतली गेली?

असेल असेल. पण आमचे पूर्वज मात्र न्यूटनच्या आधीसुद्धा दाबून व्याज घेत ब्वॉ....

बॅटमॅन Fri, 22/05/2015 - 18:13

In reply to by नितिन थत्ते

पण आमचे पूर्वज मात्र न्यूटनच्या आधीसुद्धा दाबून व्याज घेत ब्वॉ....

मनुस्मृती की अर्थशास्त्रातही व्याजदराबद्दल डिस्कशन्स आहेत- अर्थात इ.स. च्या पहिल्या शतकापासून तरी किमान हे ज्ञान भारतीयांना असल्याचे पुरावे आहेत.

बाकी कुठे न्यूटन आणि कुठे अर्थशास्त्र....सगळाच श्वानं युवानं मघवानमाह पैकी प्रकार आहे.

अजो१२३ Fri, 22/05/2015 - 19:15

In reply to by नितिन थत्ते

वाक्यरचना गैरसमज करणारी आहे हे मान्य. खुलासा -
I did not intend to suggest any time sequence or correlation in the developments in physics and economics.
फक्त दोन्ही कडे तसं आहे असं म्हणायचं आहे.

स्वरा Mon, 25/05/2015 - 15:09

In reply to by बॅटमॅन

बरोबर...खरं म्हणजे आस्तिकांचे इन्शुरन्स क्लेम्स स्विकारलेही जाऊ नयेत, कारण ते लोकं, मेल्यानंतरही अस्तित्त्व असते असं मानतात ना..?

अजो१२३ Mon, 25/05/2015 - 18:22

In reply to by स्वरा

इंशुरन्स हा "अस्तित्व" असण्या नसण्यासाठी नसतो, मृत्यू होण्यासाठी असतो. एखाद्याची ममी बनवली तरी द्यावा लागतो.
------------------------------------------------------------------------------------------
मी कारचा विमा घेतला, गाडीचा अपघात झाला तर मी आणि गाडी दोन्ही अस्तित्वात असतो. दॅट इज नॉट द प्रॉब्लेम.

धर्मराजमुटके Sun, 24/05/2015 - 22:13

नुकतेच ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टचे व्हिडीओ पाहिले. त्यात टाटा नॅनो, आल्टो ८००, फोर्ड फिगो सारख्या कार्स टेस्टमधे फेल झालेल्या दाखविल्या. जालावर बर्‍याचशा ठिकाणी कार्सचे रीव्ह्यू सापडतात. पण मला खालील काही प्रश्न पडले आहेत.

१. एकंदरीत कार्सची सुरक्षितता कशी मोजतात ?
२. विविध ठिकाणी कार्सच्या चर्चा रंगतात पण अमूक एका कार जास्त सुरक्षित आहे हे कसे समजावे ? विशेषतः एखाद्याला जुनी कार घ्यायची असेल तर (म्हणजे एअरबॅग्स, एबीएस ह्या फिचर्सच्या जन्मापुर्वीच्या) तर ती कार किती सुरक्षित आहे हे कसे कळावे ? उदा. मला जुनी होंडा सिटी, जुनी ह्युंदाई अ‍ॅसेंट व जुनी मारुती एस्टीम यांच्या सुरक्षिततेची तुलना करायची असेल तर ती कशी करावी ? की ज्या कारचा पत्रा जास्त जाड आहे ती सुरक्षित समजतात ?
३. डिकी आणि बॉनेट असलेली कार डिकी आणि बॉनेट नसलेल्या कार्सपेक्षा जास्त सुरक्षित असते काय ?
४. एसयुव्ही मॉडेल्समधे (उदा. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो वगैरे) हाय व्हिजीबीलीटी असते. बिल्ड क्वालिटी सोडल्यास हाय व्हिजीबिलीटीमुळे गाडी चालवितांना जास्त सुरक्षिततेचा अनुभव येतो काय ?

अजूनही काही मुद्दे असतील (सुरक्षेविषयी) तर माहितीत भर घालावी हि विनंती.

घाटावरचे भट Mon, 25/05/2015 - 09:31

In reply to by धर्मराजमुटके

१. एकंदरीत कार्सची सुरक्षितता कशी मोजतात ?
२. विविध ठिकाणी कार्सच्या चर्चा रंगतात पण अमूक एका कार जास्त सुरक्षित आहे हे कसे समजावे ?

कार्सची सुरक्षितता मोजण्यासाठीच स्टॅण्डर्डाइझ्ड एन्कॅप टेस्ट्स निघाल्या आहेत. यातील स्टार रेटिंग (० ते ५) गाडीतील अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी डिवायसेस किती आहेत तसेच ठराविक वेगाला समोरून धडक, बाजूने धडक वगैरे सारख्या चाचण्याद्वारे ठरते. गाडीतल्या प्रवाशांची सुरक्षितता मोजण्यासाठी सेन्सर्स बसवलेले डमी (पुतळे) वापरतात. डमीजना झालेल्या इजांवरून आणि सेन्सरद्वारे मिळालेल्या माहितीवरून अतिशय गंभीर (मृत्यूस कारणीभूत होईल अशी) दुखापत, साधारण दुखापत वगैरे निष्कर्ष काढले जातात आणि एनकॅप रेटिंग ठरवतात. एन्कॅपमध्ये किमान एक स्टार मिळवण्यासाठी किमान फ्रंट एयरबॅग्ज (आणि बहुधा एबीएसही) असणे आवश्यक असते. आपल्याकडे एन्कॅप कायद्याने कंपल्सरी नाही (युरोपात आहे बहुतेक) पण आजकाल आपल्याकडे विकल्या जाणार्‍या बहुतांश गाड्या आधीच इतर देशात मिळत असल्याने त्यांचे एन्कॅप रेटींग उपलब्ध असते. एन्कॅप कंपल्सरी नसल्याने आणि कॉस्ट सेन्सेटिव्ह मार्केट असल्याने भारतात मिळणार्‍या बहुतांश परदेशी गाड्या उदा. सुझुकी, फोक्स्वॅगन, रेनॉ वगैरे युरोपातील स्पेसिफिकेशनपेक्षा कमी स्पेसिफिकेशनच्या असतात (कमी जाडीचा पत्रा, कमी स्ट्रक्चरल रिएन्फोर्समेंट, एयरबॅग्ज नसणे/ऑप्शनल असणे वगैरे). परंतु बहुतांश वेळेला गाड्यांवर कंपन्या स्वतः क्रॅश टेस्ट्स करतात आणि बेसिक सुरक्षितता राहील इतपत डिझाईन मजबूत असते. अशा क्रॅश टेस्ट फॅसिलिटीज भारतातील बहुतांश भारतीय (मारुती, टाटा मोटर्स, महिंद्रा) आणि परदेशी कंपन्यांकडे आहेत. अगदीच नसेल तर पुण्यात एआरएआयमधेही आहेत. ज्यात या गाड्या टेस्ट केल्या जाऊ शकतात.

३. डिकी आणि बॉनेट असलेली कार डिकी आणि बॉनेट नसलेल्या कार्सपेक्षा जास्त सुरक्षित असते काय ?

अर्थात्. सगळ्यात वाईट उदाहरण - मारुती ऑम्नी (असे असतानाही अजून ढिगाने विकली जाते. आश्चर्य आहे की नाही? मुळात सामान्य भारतीय ग्राहक गाडी घेताना सेफ्टीचा सगळ्यात शेवटी विचार करतो असे निरीक्षण आहे)

४. एसयुव्ही मॉडेल्समधे (उदा. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो वगैरे) हाय व्हिजीबीलीटी असते. बिल्ड क्वालिटी सोडल्यास हाय व्हिजीबिलीटीमुळे गाडी चालवितांना जास्त सुरक्षिततेचा अनुभव येतो काय ?

अर्थातच. एकदा सफारी/फॉर्च्युनर चालवून बघा. किमानपक्षी बसमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसून पहा. अंदाज येईल. हाय व्हिजिबिलिटी आणि हाय ड्रायव्हिंग पोझिशन हे दोन्ही गाडी चालवण्यासाठी अधिक उपयुक्त असतात.

नितिन थत्ते Mon, 25/05/2015 - 10:19

In reply to by घाटावरचे भट

>>सगळ्यात वाईट उदाहरण - मारुती ऑम्नी (असे असतानाही अजून ढिगाने विकली जाते. आश्चर्य आहे की नाही? मुळात सामान्य भारतीय ग्राहक गाडी घेताना सेफ्टीचा सगळ्यात शेवटी विचार करतो असे निरीक्षण आहे)

नॅनोसुद्धा तशीच आहे.

घाटावरचे भट Mon, 25/05/2015 - 10:34

In reply to by नितिन थत्ते

>>नॅनोसुद्धा तशीच आहे.

मुळीच नाही. नॅनो ४०किमी/तास या वेगाला (ज्या वेगात साधारणपणे एक सिटी कार चालवली जाते) फ्रंटल आणि साईड इंपॅक्ट टेस्ट पास करते. याशिवाय आता नवीन नॅनोत आणखी मोठा फ्रंट क्रंपल झोनही आणि साईड इंपॅक्ट बीमही आहेत. मारुती ऑम्नीमध्ये कुठल्याही प्रकारचे फ्रंटल प्रोटेक्शन अस्तित्वात नाही.

नितिन थत्ते Mon, 25/05/2015 - 11:00

In reply to by घाटावरचे भट

ऑम्नीबाबत सहमत आहे. शिवाय ती शहरातल्या खड्ड्यांतून जाताना फ़ारच डुगडुगताना दिसते.
पण ऑम्नीचे अपघात फार होत नाहीत असे वाटते.

घाटावरचे भट Mon, 25/05/2015 - 11:09

In reply to by नितिन थत्ते

भारतातल्या कमी किमतीच्या कार्सना एनकॅपमध्ये ० स्टार्स मिळण्याचे मुख्य कारण एयरबॅग्ज आणि एबीएस नसणे हे आहे. ते नसले तर एनकॅप तुम्हाला ० पेक्षा जास्त रेटिंग देउच शकत नाही. आता आल्टो आणि नॅनोला एवढ्या कमी किमतीत कुठून येणार एबीएस? असो. याबाबतीत केंद्र सरकार इंडिया एनकॅप मानक कायद्याने लागू करण्याचा विचार करीत आहे. साधारण २०१७ची टाईमलाईन आहे, ज्याला ऑटो कंपन्यांचा (मुख्यत्वेकरून मारुतीचा, कारण त्यांच्या जास्त खपाच्या कार्स एनकॅप लागलं तर विकता येणार नाहीत) विरोध आहे. पण येत्या काळात एबीएस आणि एयरबॅग्स सर्व कार्सना कायद्याद्वारे सक्तीच्या होताना दिसतील. ट्रक्स आणि बसेसना (३.५ टनांच्या पुढे) १ एप्रिलपासून रोड स्पीड लिमिटर सक्तीचे झाले आहेत आणि बहुधा १ ऑक्टोबरपासून एबीएसही सक्तीचे होणार आहे (की झाले आहे, नक्की ठाऊक नाही). रस्त्यावर होणारे जड वाहनांचे अपघात आता थोड्याफार प्रमाणात तरी कमी होताना दिसतील अशी आशा करायला हरकत नाही.

सुनील Mon, 25/05/2015 - 11:48

In reply to by घाटावरचे भट

रस्त्यावर होणारे जड वाहनांचे अपघात आता थोड्याफार प्रमाणात तरी कमी होताना दिसतील अशी आशा करायला हरकत नाही.

अपघात कसे कमी होतील?

वरील सर्व फीचर्समुळे अपघाताचा परिणाम कमी होईल हे मान्यच. पण मुदलात अपघातांचे मुख्य कारण जे की, रहदारीचे नियम न पाळणे, त्यावर उपाय काढल्याशिवाय प्रत्यक्ष अपघातांचे प्रमाण कमी होणे नाही!

घाटावरचे भट Mon, 25/05/2015 - 12:00

In reply to by सुनील

पण मुदलात अपघातांचे मुख्य कारण जे की, रहदारीचे नियम न पाळणे, त्यावर उपाय काढल्याशिवाय प्रत्यक्ष अपघातांचे प्रमाण कमी होणे नाही!

सहमत.

एबीएस आणि एयरबॅग्ज संबंधी बातमी

धर्मराजमुटके Wed, 27/05/2015 - 20:12

In reply to by घाटावरचे भट

सर्व प्रतिसादकांचे आभार ! चांगली चर्चा चालू आहे. पण तरीही माझा एक मुद्दा दुर्लक्षीत झाल्यासारखा वाटतो. एकंदरीत कमीत कमी पैशात गाडी खरेदी करणे ही भारतीय ग्राहकाची मानसिकता आहेच. पण याच कारणामुळे जुन्या गाड्यांचे मार्केट बहुधा नवीन गाड्यांच्या मार्केटपेक्षा जास्त जोरात चालते. (चुक असेल तर दुरुस्त केल्यास आनंदच आहे.) आत्तापर्यंत जी चर्चा चालू आहे ती नवीन गाड्यांची सुरक्षितता किंवा टॉप व्हेरीएंटमधे असलेल्या सेफ्टी फीचर्सबद्दल.
माझा मुद्दा हा आहे की जुन्या गाड्यांना काही सुरक्षिततेचे उपाय करता येतील काय ? किंवा गाड्यांमधे काही बदल करायचे नसल्यास (करता येत नसल्यास) ड्रायव्हर किंवा सहप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काहि प्रयत्न करता येणे शक्य आहे काय ? उदाहरणार्थ
१. एअर बॅग ऐवजी एखाद्या संरक्षक प्रकारचे जॅकेट बनविता येईल काय जे काहि विशीष्ट दाबाला फुगू शकेल. किंवा काहि विशिष्ट केमीकल्सपासून एखादे तंतूमय जॅकेट बनविता येईल काय ? जे एक ठराविक मर्यादेपर्यंतचा धक्का पचवू शकेल ?
२. डोक्यात घालण्यासाठी हेल्मेट. हे नेहमीच्या दुचाकी हेल्मेटपे़क्षा वजनाने हलके असावे व त्याने आजूबाजूला बघण्यावर मर्यादा येऊ नयेत.
३. गाडीच्या पुढे मागे जे स्टीलचे बंपर प्रोटेक्टर लावले जातात त्यामुळे गाडीचे नुकसान होते. पण अशा एखाद्या धातुचे प्रोटेक्टर्स बनविता येऊ शकतात काय जे एका ठराविक मर्यादेपर्यंतची धडक सहन करु शकतील व नंतर मोडून पडतील. याने गाडीत बसलेल्या प्रवाशांचा धक्का जीवघेणा या पातळीवरुन कमीतकमी दुखापत होऊ शकेल असा करता येईल काय ?
कोणी अशाप्रकारे वेगळा (किंवा मुर्खपणाचा) विचार करुन काही नवीन शोध लावू शकतो काय ? त्यातून तो दोन पैसे कमवू शकतो व काही प्रमाणात जीवहानी टाळू शकतो.
तुर्तास इतकेच. जसे सुचेल तसे लिहीत जाईन.

घाटावरचे भट Thu, 28/05/2015 - 15:20

In reply to by धर्मराजमुटके

एबीएस/एयरबॅग्जसारख्या गोष्टी आफ्टरमार्केटला उपलब्ध नसण्याचे कारण गाडीत करावे लागणारे मोठे स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल बदल आणि शिवाय या यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी लागणारे खूप सारे टेस्टिंग हे आहे. पण या यंत्रणांमुळे मिळणारी अपघात-सुरक्षितता बिनतोड आहे हे ही तितकेच खरे. त्यामुळे एबीएस + एयरब्याग्जसह गाडी घेणे कधीही चांगले.

क्र.३ मधील किंवा तादृश आफ्टर्मार्केट गोष्टी तयार करून / विकत घेऊन जुन्या गाडीवर लावण्यापेक्षा नवीन गाडी घेणे कॉस्ट टु बेनिफिट रेशिओचा विचार करता अधिक श्रेयस्कर वाटते. शिवाय उपाय क्र.१ आणि २ मध्ये ड्रायव्हिंग एक्स्पीरियन्सची वाट लागते. हेल्मेट/सेफ्टी जॅकेटच घालून वावरायचे असेल तर दुचाकीच का न घ्या?

ता.क. - मी मगापासून सारखं सारखं एबीएस-एयरब्याग्ज करतोय कारण ते मिनिमम सेफ्टी प्याकेज आहे. ते कुठल्याही गाडीत असलंच पाहिजे. :-)