Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
भारतात कोणी डिश वॉशर वापरतं का? कुठले चांगले आहेत? आणि उपयोगी असतात का खरच?

राही Wed, 30/09/2015 - 12:27

पण भारतीय स्वयंपाकप्रक्रिया आणि तज्जन्य झेंगटे ही तबकधुलाईस अनुकूल नाहीत. उदा. दूध तापवताना बाजूला करपणे. लोणी कढवणे. यात बेरी दिसते पण खरवडणे आणि घासाघाशी दिसत नाही.
कोणी उत्तम सुघरस्थ असतील ज्यांच्या हातून करपणे, जळणे, उतू जाणे इ. बायकी क्रिया अज्जिबात घडत नाहीत तर त्यांच्या भांड्यांसाठी ठीक. फक्त 'तबक-थाळी'साठी उपयुक्त. बाकी वेडेवाकडे आकार अर्थात पळी, पंचपात्री, तांब्ये, टोप, चंबूघंगाळे वर्ज्यच.
शिवाय अलीकडे पुण्यात पाणी नसते म्हणे.

अनुप ढेरे Wed, 30/09/2015 - 12:33

In reply to by राही

दूध करपणे आणि तूप कढवणे या गोष्टी रोज थोडीच होतात?

पळी, पंचपात्री, तांब्ये, टोप, चंबूघंगाळे वर्ज्यच.

तांब्ये ठीके पण बाकीचे प्रकार रोज वापरतात लोक अजून??

राही Wed, 30/09/2015 - 13:09

In reply to by अनुप ढेरे

पूजेला पळी ताम्हण, पंचपात्री (किंवा लोटा) लागतो. तेलकट निरांजन कधी ना कधी घासावे लागते. इतर अपघटना : पिण्याची भांडी प्रत्येकाच्या मर्जी/आवडी/सोयीप्रमाणे कितीही, कोणतीही निघतात. पाणी अ‍ॅक्वागार्डमधून गाळून घेऊन साठवण्याची प्रथा असेल तर तोटीवाले छोटे पिंप बाहेर घासावे लागते. पाणीच कमी असेल तर पाणीसाठवणीची भांडी पडतात. विजेचा लपंडाव असेल तर मशीनची वेळ सांभाळावी लागते. (सगळ्याच मशीन्सची अर्थात.) स्वयंपाक पातेल्या/टोपात होतो. कुकरमध्ये वरण सांडून आतल्या कडेने घट्ट बसते. दुधाचे पातेले/टोप बाजूने रोज करपतोच करपतो. तव्यावर काही तळले/भाजले तर त्याचे अवशेष राहातात. उलथने स्वच्छ होत नाही. कढईला बाजूने खरपुड्या जमतात. पोळीचा तवा, टोस्टर, , साधा तवा अशी हँडलवाली भांडी मध्ये मध्ये कडमडतात. माय्क्रोवेव्ची भांडी वेगळी. पसारेदार स्वयंपाक असला तर रोजच्या रोज मशीन लावावे लागते. (पाणी, वीज इ.). दोन-तीन कुकर/पॅन वापरात असतील तर जागा खातात. डिशेसचा पसारा कमी होतो मात्र.
(कधी कधी कुकरमधे सांडलेली शिते पेल्याच्या किंवा कपाच्या तळाशी दिसतात. त्यामुळे आधी भांडी धुऊन घेण्यासाठी दोन पायांचा डिश वॉशर लागतो.)
त्यापेक्षा अनु राव यांचा उपाय बरा.

अनुप ढेरे Wed, 30/09/2015 - 13:39

In reply to by राही

दोन पायाचे डिश वॉशर बेभरवशाचे असतात म्हणून तर या मशीनचा विचार करतोय. पण तुम्ही डि.वॉ. वापरून सांगत असाल तर ३०००० घालवण्याच्या वर्थ नाही वाटते

अनु राव Wed, 30/09/2015 - 13:51

In reply to by अनुप ढेरे

तुमचे प्रोब्लेम स्टेटमेंट समजले असते तर उत्तर देणे सोप्पे होईल अनुप जी.
उदा. तुम्ही जंगलात रहाता आणि कोणी भांडी घासणारी/रा मिळणार नाही तिथे.

फक्त हौस म्हणुन डीश वॉशर घ्यायचा असेल तर गोष्टच वेगळी.

पण हौस म्हणुन घेतलेत तरी पस्तावाल. डीशवॉशर मधे भांडी ठेवताना आधी थोडी विसळुन घ्यावी लागतात. अन्न जर वाळले असेल, किंवा करपले असेल तर काही उपयोग होत नाही.
डिशवॉशर वापरायचा असेल तर सर्व घरातल्यांना जेवण झाले की ताटवाट्या स्वच्छ करुन डिशवॉशर मधे ठेवायची शीस्त असायला पाहीजे.

दोन पायाचे डिश वॉशर बेभरवशाचे असतात म्हणून तर या मशीनचा विचार करतोय.

तुम्हाला काय वाटते ही मशिन न तक्रार करता चालतात?

अनुप ढेरे Wed, 30/09/2015 - 13:54

In reply to by अनु राव

प्रॉब्लेम स्टेटमेंट सोपे आहे.
भांडी घासणारी बाई बेशवरवशाची आहे. साप्ताहिक सुटी सोडून दर महिन्यला ५-६ दिवस गायब. हे मशीन या रेटने तरी बंद पडणार नाही.

अनु राव Wed, 30/09/2015 - 13:56

In reply to by अनुप ढेरे

तुम्ही फारच लाडवुन ठेवलेले दिसतय तिला :p
दुसरी कामवाली बाई लावणे जास्त सोप्पा ऑप्शन नाही का?

मेघना भुस्कुटे Wed, 30/09/2015 - 13:13

In reply to by अनुप ढेरे

टोप (पातेली), पळी (डावा आणि उलथनी आणि भातवाढपी आणि झारे), चंबू (पाणी (वरून) पिण्याचे लोट्ये) नाही वापरत तुम्ही?

***
अरे! वर राहीताईंनी रीतसरच लिहिलं आहे की. 'मम'.

अनुप ढेरे Wed, 30/09/2015 - 13:42

In reply to by मेघना भुस्कुटे

पळी म्हणजे मला एकदम पुजेची पळी वाटली ओ. पाण्याचा पिंपालाच पंचपात्री म्हणतात हे माहिती नव्हतं.

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 13:36

डिशवॉशर वापरता येणे म्हणजे "स्टँडर्ड आकाराच्या भांड्यांचा उगम होणे"
या दिशेने कितीही हळहळ वाटली तरी आता वाटचाल सुरू आहे.

उदा. पेढेघाटी डबे, तांब्याचे वेगवेगळे घाट, खोल वाट्या असलेले व खोलगटपणाच्या परीघाला ९० अंशात दांडा असलेले (ग मधील वळशासारखे) डाव इत्यादी गोष्टी मिळणे दुस्तर होत चालले आहे. अनेक मोठी भांडी/साठवणीची भांडी (जसे कळशा, टाक्या, पिंप इत्यादी) प्लास्टिकची एकाच साच्यातून निघालेली होत चालली आहेत.
दूध वगैरे तापवायला दुधाचे कुकर, भातासाठी स्टीम इलेक्ट्रीकवर चालणारे सुरू झाले आहेत. चहाची भांडी, कॉफीची भांडी किती दिवस वापरली जातील माहित नाही.

एकदा का वेगवेगळे घाट कमी होत भारतीय भांडीही एका ठराविक प्रकारचीच दिसू/असु लागली की त्याला साजेसे मशीन बनवणे काही कठीण उरणार नाही.

===

दुसरे असे की भांडी घासायला मनुष्यबळाची उपलब्धता व सुलभता किती त्यावरही या यंत्राचे भवितव्य असेल

घनु Wed, 30/09/2015 - 14:27

माझ्या ओळखीतल्या एकीने फार वर्षांपूर्वी डिशवॉशर घेतलं होतं. काही लोकांना अमेरिका वारी करून आल्यावर होतात तसे आजार तिला तिच्या अमेरिका वारी नंतर जडले होते. जसं ऐसी हवाच, कोल्ड-ड्री़ंक टीन मधलेच हवे, मिनरल वॉटरच हवं, ब्लॅक कॉफी, पॉल्यूशन-पॉल्यूशन करत किंचाळायचं, सतत सॅनीटायझर ने हात पुसायचे, 'ओ हाऊ ऑईली इज दॅट' म्हणायचं, मुलांना कम-हिअर + गो-देअर +सीट हियर्+डोण्ट ट्च सारखे श्वानमय उपदेश देणे/सोडणे वगैरे वगैरे... बिच्चारी :(. अरे विषय भरकटला.. हां तर तिने बसवलं हे डिश-वॉशर आणि जेव्हा हळू-हळू तिचे हे आजार कमी होऊ लागले तसं तिला जाणवू लागलं डिश-वॉशर हे आपण आपल्या आजारात डोकं ठिकाणावर नसतांना घेतलं होतं. भानावर येऊन "मै कहां हू" हा डॉयलाग उरकला तिने, तडक उठली आणि जवळच्या चाळीत्/झोपडपट्टीत गेली आणि दोन पायाच्या देशी डिश-वॉशर ची घरात प्रतिष्ठापना केली. ह्या अनुभवानंतर ती योग्य ते वॅक्सिनस घेऊन मगच अमेरिकेला जाते :)

ऋषिकेश Wed, 30/09/2015 - 14:41

In reply to by अनुप ढेरे

माझा निवास तापुर्ता हिरव्या देशात असताना मी वापरत असे. फक्त कढईवगैरेला चिकटलेले असेल तर खरवडावे लागे. त्यातही नॉनस्टीक कढया असल्याने तोही प्रश्न फार येत नसे
दूध तापवण्याची भानगड नव्हती. कॉफी डीकॉक्शनसाठी मशीन होते.
सर्वात मुख्य मी तेथील स्थानिक भांदी वापरे त्यामुळे तिथे डिश वॉशर वापरणे सज जमे.

त्यामुळेच वर म्हटले सद्य डिशवॉशर्स भारतीय पदार्थांमुळे नाही तर भांडयाच्या घाटाच्या विविधतेमुळे इथे वापरणे कठीण आहे.

रुची Thu, 01/10/2015 - 00:53

In reply to by अनुप ढेरे

आमच्याकडे भारतीय पद्धतीची बरीच भांडी आहेत, जसे की कढई, पळी, परात वगैरे. भारतीय स्वयंपाकही (फोडण्या वगैरे) नियमित होत असतो, त्यासाठी कुकरही वापरला जातो पण या भांड्यांसाठी डिशवॉशर वापरणे कधीच गैरसोयीचे वाटले नाही. डिशवॉशरची रचना, त्यात पाणी कसे येते, फिरणारे चाक कोठे तटू शकते हे नीट माहिती झाले की त्याप्रमाणे डिशवॉशर रचणे सोपे होऊन जाते. भांडीही स्वच्छ निघतात पण कढई वर पुटेवगैरे असतील तर ती निघत नाहीत. स्टीलच्या भांड्यांना खरबरीत ब्रश न वापरायला लागल्याने त्यावर चरे पडत नाहीत आणि चकचकीत रहातात. काचेची भांडी स्वच्छ निघतात आणि त्यावर डाग रहात नाहीत. डिशवॉशरमधे भांडी लावण्याआधी सगळे खरकटे काढून ती हलकी विसळावी लागतात म्हणजे मग पाईप तुंबणे, भांड्यांना वास येणे वगैरे प्रकार होत नाहीत. व्यक्तिशः मला घरच्या कामांसाठी इतरांवर अवलंबून रहायला आवडत नाही त्यामुळे डिशवॉशर सोईचा वाटतो. अर्थात वीज, पाणी, पर्यावरणाच्या दृष्टीने हा मुळीच चांगला पर्याय नाही याची जाणीव आहे म्हणून थोडीच भांडी असतील तर हाताबरोबर भांडी स्वतःच धुवून काढणे हा सोपा पर्याय वाटतो.

.शुचि. Thu, 01/10/2015 - 10:38

In reply to by अनुप ढेरे

एकदा चुकून लाकडी पोळपाट टाकलेलं, कसं माहीत नाही पण एकदमच वाया गेलं, मला आठवते त्याप्रमाणे - २ तुकडे झालेले वाटतं :(

नितिन थत्ते Wed, 30/09/2015 - 14:37

अनु राव यांच्याशी सहमत आहे.
भांडी घासण्याचा अगदीच कंटाळा असेल तर टबात साबनाचे गरम पाणी करून त्यात भांडी थोडावेळ बुचकळून ठेवणे. मग भांडी नुसती विसळता येतात.

बॅटमॅन Wed, 30/09/2015 - 14:44

In reply to by नितिन थत्ते

भांडी घासण्याचा अगदीच कंटाळा असेल तर टबात साबनाचे गरम पाणी करून त्यात भांडी थोडावेळ बुचकळून ठेवणे. मग भांडी नुसती विसळता येतात.

नोटेड, धन्यवाद.

घनु Wed, 30/09/2015 - 14:38

कन्वेक्शन मायक्रोवेव-अव्हन आणि बिल्ट-ईन-अव्हन ह्यात तसा टेक्नीकली फरक आहेच पण जर फार सामिष घरात बनत नसेल वा नेहमीच अभारतीय पद्धतीचं जेवण घरात होत नसेल तर त्या दृष्टिने किंवा भारतीय जेवण बनवण्याच्या दृष्टिन आणि विज-वापराच्या दृष्टिने ह्यातला कुठला पर्याय उत्तम? आणि 'इरेस्पेक्टीव-ऑफ-दॅट' हेच घ्यावं किंवा तेच घ्यावं असं काही आहे का?

अनुप ढेरे Wed, 30/09/2015 - 16:35

In reply to by घनु

कोणता निरामिष भारतीय पदार्थ ओव्हन वापरून बनवतात? माझ्या डोळ्यासमोर येत नाहीये. तंदूरी रोटी वगैरे बनवता येउ शकेल पण ओव्हन != तंदूर राइट?

घनु Wed, 30/09/2015 - 18:24

कोणता निरामिष भारतीय पदार्थ ओव्हन वापरून बनवतात

पारंपरिक पद्धती प्रमाणे अर्थात ओव्हन वापरून निरामिष पदार्थ बनवत नाहीत पण ईडली, भात, पुलाव, ढोकळा अश्या सारखे भारतीय पदार्थ येतात की ओव्हन मधे बनवता.

ओव्हन != तंदूर राइट?

तितकसं राइट नाहीये. तंदूर हे परदेशात क्ले-ओव्हन च्या नावाने वापरतातच की.
The term tandoor /tɑːnˈdʊər/ refers to a variety of ovens, the most commonly known is a cylindrical clay or metal oven
-विकीबाबा की जय हो!

अतिशहाणा Wed, 30/09/2015 - 18:20

मी (म्हणजे बायकोने!) गेल्या चारपाच वर्षात एकदोनदाच डिशवॉशर वापरले आहे. दोन वेळेची माफक भांडी घासायला तिला (किंवा मला) दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. तिला कंटाळा आला की मी मदत करतो. डिशवॉशर प्रचंड पाणी पितो. वीज खातो हे वेस्टेज आम्हाला दोघांनाही मान्य नाही. डिशवॉशर लावला की अर्धा पाऊण तास त्याचा आवाज येत राहतो. तो आवाज सुरुवातीपासूनच इरिटेटिंग वाटलाय. आता तो भांडी ठेवायच्या कपाटासारखाच वापरतो. छान कप्पे वगैरे असल्याने भांडी व्यवस्थित बसतात. :)
अलीकडे कास्ट आयर्नचे तवे-कढया वापरायला लागलोय. त्या भांड्यांना डिशवॉशर चालत नाही त्यामुळे असलेला ऑप्शन आपोआपच बाद झालाय. या भांड्यांचं सीझनिंग आता चांगलं झाल्यामुळं ती धुवायलाच लागत नाहीत. कडकडीत तापवून तेलाचा हात फिरवला की झालं. फक्त ताटंवाट्या-चमचे धुवायचे.

.शुचि. Thu, 01/10/2015 - 10:41

In reply to by अतिशहाणा

डिशवॉशर प्रचंड पाणी पितो. वीज खातो हे वेस्टेज आम्हाला दोघांनाही मान्य नाही. डिशवॉशर लावला की अर्धा पाऊण तास त्याचा आवाज येत राहतो. तो आवाज सुरुवातीपासूनच इरिटेटिंग वाटलाय.

होय वीज फार खातो :( :(

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/09/2015 - 18:30

In reply to by अनु राव

बीडाच्या पातेली, तव्यांना अन्न चिकटलेलं असतं. ते काढायचं असेल तर ही भांडी हातानेच घासावी लागतात. फारवेळ पाण्यात ठेवली तर ती भांडी गंजतात. सिरॅमिक कोटेड बीडाची भांडीही फोडणी करून पिवळट होतात. तीही हाताने घासलेली जास्त स्वच्छ होतात.

डिशवॉशरमध्ये भांडी टाकताना ती विसळून टाकावी लागतात. आतमध्ये अन्न गेलं तर ते अडकतं. डिशवॉशर वापरणार असाल तर काचेची किंवा चिनीमातीची भांडी वापरणं अधिक सोयीचं. प्लास्टिकची ठराविक भांडी डिशवॉशर सेफ असल्याचं लिहिलेलं असतं. ती टाकायला काहीच हरकत नाही.

आमच्या घरी दिवसातून एकदा तरी भारतीय स्वयंपाक होतो. पण बीडाची कोणतीच भांडी डिशवॉशरमध्ये टाकली जात नाहीत, कढया, कुकर, तवे हेसुद्धा. नॉनस्टिकच्या भांड्यांवर इतर कशामुळे ओरखडा येईल म्हणून टाकत नसे. आमच्याकडे दूध तापवलं जात नाही, चहा होत नाही, कॉफीच्या यंत्राचा अॅल्युमिनियमचा भाग डिशवॉशरमध्ये टाकत नाही (रंग उडतो). साधारण ३०% भांडी हाताने घासली जातात. दोन दिवसांतून एकदा डिशवॉशर लागतो. आमचा दोन पायांचा डिशवॉशर जेवढं पाणी वापरेल त्यापेक्षा डिशवॉशर कमी पाणी पितो. रात्री झोपताना तो लावून दिला की आवाजाचाही त्रास होत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/09/2015 - 21:10

In reply to by अनुप ढेरे

आणि हो, मी स्टीलची भांडी फारशी वापरत नाही. पण काटे-सुऱ्या-चमचे स्टीलचेच आहेत. ते डिशवॉशरमध्ये व्यवस्थित निघतात.

घरी कुत्रे किंवा मांजरं असतील तर डिशवॉशरमध्ये टाकण्याआधीच्या धुलाईचं काम कमी होतं.

Nile Wed, 30/09/2015 - 22:57

मी वापरतो. फार सोय होते. अर्थात इथे भांड्याला बाई मिळत नाही. मिळत असती तरी मी लावली नसती. त्यांच्या वेळापत्रकानुसार कोण चालणार?

वापरण्याकरता थोडासा सवयीत बदल करावा लागतो. थोडाफार भांड्यात बदल केला तरी उपयोग होतो. स्टीलची भांडी वापरण्यापेक्षा काचेची वापरा. (ताटं, वाट्या वगैरे).

स्वयंपाकाची भांडी जर लगेच बदलून घ्यायची सवय असेल तर फायदा होतो. (म्हणजे अन्न ठेवायची भांडी वेगळी अन स्वयंपाक करायची वेगळी, वगैरे).

चार भांडी हाताने घासायची तयारी ठेवा. रोज डीशवॉशर लावावा लागणार नाही असे नियोजन केलेत तर पैसे बर्‍यापैकी वसूल होती, भांडीही स्वच्छ होतील, अन बेभरवशाचे आयुष्य कमी होईल.

डिस्क्लेमरः सडाफटिंग माणसाचा असावा तेव्हढाच स्वयंपाक घरात होतो. तेव्हा चार-पाच पोरांच्या आईबापांनी हा सल्ला मिठाच्या चिमटीप्रमाणेच घ्यावा.

पिवळा डांबिस Wed, 30/09/2015 - 22:57

आमच्या डिश वॉशरला आपण लईच हाय-टेक असल्याचा गर्व आहे.
तो फक्त त्याच्या मालकिणीचं ऐकतो, इतर कुणाचंही नाही.
त्यामुळे आम्ही मालकीण दूर गावी गेलेली असल्यास त्याच्या वाटेलाही जात नाही.
गुमान सिंकमध्ये भांडी घासून ओट्यावर वाळायला ठेवतो!!!
:)

चिमणराव Thu, 01/10/2015 - 07:04

In reply to by .शुचि.

मी एकटा असतांना यावर बरेच प्रयोग केले होते.म्हणजे पाणी कमी होते म्हणून नव्हे तर योग्य पद्धत कोणती,कमीतकमी पाणी,पुनर्वापर वगैरे.शिवाय भांड्स खरपुडीच धरणार नाही,तेलकट तुपकट प्रकार कसा निपटायचा इत्यादी.अन्नाची आणि पाण्याची कमीतकमी नासाडी इत्यादी.दुसरा एक विचार म्हणजे आपल्याला नको ते जगालाच नको असे नसते.त्यांना हवे असणारे प्राणीमात्र आहेत त्यांच्या मुखात न पाडता त्यावर साबण लावून खराब करणे अयोग्य आहे.हे सर्व आवर्जून करत होतो. (परंतू आता सरळ सरळ आरोपच करतो) पुढे हे बंद पडले कारण ओळखलेच असेल.
१)तुमची मध्ये लुडबुड नकोय.
२)बाई येणारेय तुम्ही तिचे। काम कशाला कमी करताय?
३)३)मी करतीय इतके दिवस मला शिकवू नका
४)तुम्ही इकडे { सोसायटीत } चार भांडी पाणी वाचवल्याने काय फरक पडणारे?*****

तुमच्याकडे कुत्रा,बकरी,गाय अथवा बाल्कनीत झाडे ोसतील तर ते पाणी सत्कारणी लागते.

कुणाला जाणून घ्यायचे असेल तर माझे प्रयोग लिहीन.

वगैरे

अभिनय Thu, 01/10/2015 - 05:11

समीक्षण आणि परीक्षण ह्या मध्ये काय फरक आहे?

राही Thu, 01/10/2015 - 10:59

थाळी घासकावर एवढी चर्चा! एखादा शोधनिबंध होऊ शकेल यावर. प्रचलित पद्धतीनुसार 'सनातन भारतीय स्वयंपाकघरावर चंगळवादी पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण' 'स्त्रियांना आळशी बनवण्याचे षड्यंत्र' 'स्त्रियांच्या आरोग्यावर घाला(हल्ला)' अशी शीर्षके नेत्रखेचक ठरू शकतील.

.शुचि. Thu, 01/10/2015 - 11:57

In reply to by अनुप ढेरे

अनुप, बरेच लोक असतील तर नक्की कामाचा आहे. आपला वेळ वाचतो. १००%.
मात्र एकट्यासाठी असेल तर नका घेऊ.

बॅटमॅन Thu, 01/10/2015 - 14:50

In reply to by घनु

म्हणजे बंद वगैरे. ही संज्ञा एकदा गब्बरने वापरलेली तेव्हापासून आवडली आणि लक्षात राहिली.

नि:सारण म्हणजे निचरा, सो हा अर्थ एकदम विरुद्ध आहे. पण आय होप यू गेट द प्वाइंट. अकौंट नष्ट/डिअ‍ॅक्टिव्हेट करणे इ.इ.इ.

उपाशी बोका Fri, 02/10/2015 - 00:20

In reply to by बॅटमॅन

स्वतःचे खाते बंद करण्याऐवजी, एखाद्या विशिष्ट सदस्याचे लिखाण अजिबात दिसणार नाही, असे काही करायची सोय आहे का?

.शुचि. Fri, 02/10/2015 - 00:35

In reply to by उपाशी बोका

लिखाण म्हणजे धागे+प्रतिसाद?
अवघड असेल. मुख्य म्हणजे अननेसेसरी ओव्हरहेड असेल असे वाटते.

ऋषिकेश Mon, 05/10/2015 - 12:26

In reply to by बॅटमॅन

खाते वापरायचे की नाही याचा निर्णय प्रत्येक सदस्याच्या हातात असल्याने वेगळे निस्सारीत का करावे लागावे?
आपले लेखन अनेक वाचकांनी वाचलेले असते, त्याला वेळ देऊन त्यावर प्रतिक्रीया दिलेल्या असतात. खात्यासोबत लेखन निस्सारीत होईल व ते लेखन निस्सारीत करणे म्हणजे त्या लेखनासाठी आपला वेळ व उर्जा देणार्‍या वाचकांचा, व सर्व सदस्यांचा अपमानच आहे!

तेव्हा अशी सोय इथे नाही.

ऋषिकेश Mon, 05/10/2015 - 13:34

In reply to by नितिन थत्ते

ते बॅन आयडी असावेत. काय कल्पना नाही! उत्सुकता असल्यास मिपाच्या मंडळाकडे चौकशी करा म्हणजे नक्की काय असते ते कळेल.
पण इथे तसेही (आयडी बॅन) करायची पद्धत नाही.

नगरीनिरंजन Sun, 04/10/2015 - 10:35

आज एक रसदार, लालचुटूक शिशु-कलिंगड खाल्लं. थोड्या काळ्या बिया होत्या; पण बहुतांशी अजून पूर्ण न झालेल्या पांढऱ्या कोवळ्या बियाच होत्या त्यात. त्या बियांच्या भविष्यासाठी झाडाने साठवलेला तो लालेलाल, गोड आणि रसदार गर. तो मी खाल्ला. यत्किंचीतही अपराधभावनेशिवाय.
माणसाचं सगळंच नार्सिसिस्ट, सोयीस्कर आणि सदोष असतं त्याला माणसाचं लॉजिक कसं अपवाद असणार? बी अंकुरून स्वत:च्या मुळांवर उभी राहिपर्यंत झाडाने तिच्या पोषणाची केलेली सोय म्हणजे फळ. म्हणजे एका अर्थाने झाडाचा गर्भच तो. पण झाडांना आपल्यासारखं रक्त कुठे असतं? आपल्याला ऐकू येईल असा आवाज कुठे असतो? आपल्याला जाणवेल अशी तडफडतरी कुठे असते? आपल्या मांसासारखं मांसही नसतं. हे सगळं ज्यांना असतं ते प्राणीच फक्त भूतदयेचे अधिकारी आणि त्यांना खाणारी माणसं पापी. मांस न खाता झाडं खाणाऱ्यांना आपोआपच होलियर दॅन दाऊ स्थानप्राप्ती.
आपल्यासारखा नसला तरी जीवच तो आणि जगण्यासाठी दुसरा जीव खाणे ही निसर्गनियती. झाडंसुद्धा कितीतरी सूक्ष्म जीव खातच असतील. सुजाण मनात कृतज्ञता असली म्हणजे पुरे.
अगदीच हिंसा थांबवायला स्वत:पुरतं काही करायचं असेल तर आपली प्रतिकृती निर्माण न करण्याचा पर्याय आहेच; पण मग ते सोयीस्कर कुठे आहे? त्यापेक्षा निसर्गदत्त हिंसक वृत्ती इतरांवर (शक्यतो दुर्बळांवर) काढणे फारच सोयीस्कर.

.शुचि. Sun, 04/10/2015 - 10:40

In reply to by नगरीनिरंजन

अगदीच हिंसा थांबवायला स्वत:पुरतं काही करायचं असेल तर आपली प्रतिकृती निर्माण न करण्याचा पर्याय आहेच;

वा! मुक्तचिंतन आवडलं. पण ननि वरचं वाक्य कळलं नाही.
आपली प्रतिकृती निर्माण ... यात निर्माण म्हणजे फक्त जनन आहे की पालनपोषणातून विचार प्रदान करणेही आले? कारण फक्त जनन असेल तर - कशावरुन मी (कोणीही, इथे थट्टा नको) अगदी दुसरी मदर टेरेसा/बुद्ध जन्मास घालणार नाही?

राही Sun, 04/10/2015 - 17:15

In reply to by नगरीनिरंजन

सूक्ष्म का होईना, हिंसेशिवाय जगणे अशक्य आहे. मग कमीत कमी हिंसा होईल, कमीत कमी (निसर्गाला)ओरबाडले जाईल अश्या तर्‍हेने जगणे हा पर्याय राहातो. ग्रीड वजा केली तर कदाचित असे जगणे शक्य होईल. पण भोग आणि उपभोग यात सीमारेषा ओढण कठिणच आहे. 'तेन त्यक्तेन भुञ्जीथा:' वगैरे.

चिंतातुर जंतू Sun, 04/10/2015 - 23:33

In reply to by adam

हे काय बरोबर नाही. आम्ही बूच मारायचं नाही तर नाही, पण तुम्ही कृतघ्नपणा पण नाही करायचा ;-)

चिमणराव Sun, 04/10/2015 - 13:16

गौतमास वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले असं शाळेत शिकलो.तेव्हा ज्ञान म्हणजे काय आणि ते फक्त गौतमासच का मिळाले याचे उत्तर नंतर वाचनातून मिळाले .बुद्धाने अहिंसेवर/हिंसेवर कधी विस्तृत असे भाष्य केलेच नाही. परंतू मध्यम मार्ग ( सम्यक )अनुसरायला सांगितला.
खाणे ,जात ,धर्म,कर्म,आत्मा ,देव,स्वर्ग कल्पना नसलेला एकच धर्म आहे जगातला-बुद्धाचा संघधर्म.

नगरीनिरंजन Sun, 04/10/2015 - 13:44

In reply to by चिमणराव

देव,स्वर्ग कल्पना नसलेला एकच धर्म आहे जगातला-बुद्धाचा संघधर्म.

माझ्या घरासमोर एक बौद्धधर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे. बर्‍याचदा गाड्या भरभरुन लोक येतात प्रार्थना करायला. प्रार्थनेव्यतिरिक्तच्या वेळात आजूबाजूच्या इमारतींमध्ये भटकत असतात. एकदा मी चालत दुकानात जात असताना दोन बायांनी मला अडवलं आणि बौद्धधर्माबद्दल सांगायला सुरुवात केली. संवाद असा झाला:
"तू सत्कर्म केलेस, बुद्धाच्या मार्गावर चाललास तर स्वर्गात जाशील नाहीतर नरकात जाशील."
"माझा विश्वास नाही."
"तू मुस्लिम आहेस का? की हिंदू?"
"दोन्हीही नाही."
"ओह, अच्छा अच्छा. पण आमच्या देवळात फुकट जेवण आहे. येतोस का आमच्याबरोबर?"

एखाद्याला ज्ञान मिळालं तर तो दुसर्‍याला सांगत बसण्याच्या भानगडीत का पडतो हे न उमगणारं कोडं आहे खरंच.

नगरीनिरंजन Sun, 04/10/2015 - 14:40

अमेरिकेत व्याजदर वाढवायचं घाटतंय. २००८ च्या ऑईल प्राईस शॉकनंतर ऑईलच्या प्रचंड वाढलेल्या किंमतींमुळे फ्रॅकिंग एकदम इकॉनॉमिकली व्हायेबल वाटायला लागलं आणि अमेरिकेत जोरात फ्रॅकिंग सुरु झालं. या फ्रॅकिंग कंपन्यांनी भरपूर हाय-यिल्ड बॉन्ड्स काढून (हाय यिल्ड मार्केट्च्या जवळ्जवळ ३०%) बाजारातून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलंय. कमी व्याजदरांमुळे लोकांनीही बिनधास्त त्यात गुंतवणूक केलीय. पण तेलाची मागणी कमी झाल्याने पुरवठा जास्त होऊन किंमती पडल्यात. इतक्या कमी किंमतीवर फ्रॅकिंग किफायतशीर नाही. त्यामुळे हे कर्ज फेडणे या कंपन्यांना अवघड जाणार.आधीच या कंपन्यांचा डेट-टू-ॲसेट रेश्यो खूप जास्त आहे आणि तेलाच्या किंमती पडतात तसा तो वाढतच जातो. त्यात या विहीरींचा डिप्लिशन रेटही खूप जास्त आहे. दर तीन-चार वर्षांनी नव्या विहीरी खणायला या कंपन्यांना आणखी पैसा उभारावा लागतो. अशा परिस्थितीत व्याजदर वाढवले तर हाय-यिल्ड मार्केटमधला फुगा फुटेल आणि फ्रॅकिंग कंपन्यांना तगून राहणे आणखी अवघड होणार नाही का? फ्रॅकिंगवर परिणाम झाला तर पुन्हा ऑईलच्या किंमतीचे नियंत्रण ओपेककडे जाईल. तरीही फेड व्याजदर वाढवेल? अमेरिकन सरकारचा काय प्लॅन असेल फेडरल रिझर्व्हने दर वाढवले तर?

नगरीनिरंजन Sun, 04/10/2015 - 17:18

In reply to by अनुप ढेरे

व्याजदर पार शून्याजवळ असूनही इन्फ्लेशन वाढत नाहीय हेच तर फेडचं दुखणं आहे. उद्या आणखी काही वाईट झालं तर फेडला काय उपाय करायचे असा प्रश्न आहे. ही अभूतपूर्व अशी स्थिती आहे. म्हणून त्यांना आताच वेळ आणि थोडीफार अर्थव्यवस्थेत धुगधुगी आहे तोवरच व्याजदर शून्यापासून जितके दूर नेता येतील तितके न्यायची घाई झाली आहे म्हणजे पुढच्या क्रायसिसमध्ये ते कमी करता येतील. अन्यथा त्यांच्या भात्यात एकही शस्त्र उरणार नाही. विकसित देशांच्या अर्थव्यवस्था एका पॅराडाईम शिफ्टवर आहेत, त्या पुढे कोणत्या अज्ञात प्रदेशात जातात ते कोणालाही माहित नाहीय.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/10/2015 - 21:13

In reply to by नगरीनिरंजन

फ्रॅकिंगवर परिणाम झाला तर पुन्हा ऑईलच्या किंमतीचे नियंत्रण ओपेककडे जाईल. तरीही फेड व्याजदर वाढवेल? अमेरिकन सरकारचा काय प्लॅन असेल फेडरल रिझर्व्हने दर वाढवले तर?

यातला कार्यकारणभाव नक्की काय असतो? अगदी सोप्या शब्दांत, बाळबोध प्रकाराने सांगाल का?

नगरीनिरंजन Mon, 05/10/2015 - 19:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१९७० साली अमेरिकेत कन्व्हेन्शनल ऑईलचे उत्पादन वाढायचे थांबले आणि अमेरिकेला तेलासाठी गल्फकडे "वळावे" लागले. त्याच्या दहा वर्षे आधीच ओपेकची स्थापना झाली होती आणि त्यातल्या सदस्य देशांनी ऑईलच्या किंमतीचे नियंत्रण मिळवले. तेलाचे उत्पादन जास्त झाल्यास त्यात कपात करुन किंमत स्थिर ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे आली. अमेरिका पुरेसे तेल उत्पादन करु शकत नसल्याने ओपेकवर अवलंबून राहणे भाग होते.
फ्रॅकिंग हे तसं जुनं तंत्रज्ञान असलं तरी ते इतकी वर्षं वापरलं जात नव्हतं कारण ते महाग आहे. $४० प्रतिबॅरल किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला तेल विकावे लागल्यास ते किफायतशीर नाही. २००८ साली ऑईलची किंमत $१०० च्यावर गेल्यावर फ्रॅकिंग करून खडकांच्या भेगांतले ऑईल काढणे फायदेशीर वाटू लागले आणि अनेक छोट्या कंपन्या त्यात उतरल्या. या छोट्या कंपन्यांची पत चांगली नसल्याने त्यांना वाढीव दराने व्याज देऊन भांडवल उभे करावे लागते म्हणून त्यांनी बाजारात विकायला काढलेल्या बाँड्सना हाय यिल्ड बॉंड्स म्हणतात. म्हणजे ॲपलने बाँड इश्यू केला आणि त्यांना चार टक्के व्याज (कुपॉन) द्यावे लागत असेल तर या छोट्या कंपन्यांना ८-१० टक्के द्यावे लागते. अर्थातच हे बाँड विकत घेणे फार जोखमीचे असते कारण या छोट्या कंपन्या डिफॉल्ट करण्याचा धोका जास्त असतो. साधारणतः इतरत्र चांगले व्याज मिळत असेल तर अशा बाँड्समध्ये कोणी फार गुंतवणूक करत नाही. पण अमेरिकेत आणि एकूणच विकसित देशांमध्ये व्याजदर शून्यावर येऊन ठेपल्याने गुंतवणुकीवर परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकदार जोखमीच्या गुंतवणुकीकडे वळले. म्हणूनच सगळ्या मार्केट्समध्ये तेजी आली आणि फ्रॅकिंग कंपन्यांनाही फार जास्त व्याज न देता सुलभ कर्ज मिळाले आणि या कंपन्यांनी फ्रॅकिंग चालू केले. २००९ ते २०१४ या काळात फ्रॅकिंग कंपन्यांनी अमेरिकेच्या तेल उत्पादन दरात ३-४ मिलियन बॅरल प्रतिदिनाची भर घातली. म्हणजे पूर्वी अमेरिकेच्या तेल उत्पादनाचा दर ८ एमबीडी (मिलियन बॅरल्स अ डे) होता तो आता जवळ-जवळ १२ एमबीडी झाला. त्यातच इराकमधूनही पुन्हा तेल उत्पादन सुरु झाले. त्याचवेळी अर्थव्यवस्था पुन्हा म्हणावी तशी तेजीत न आल्याने तेलाची मागणी म्हणावी तशी वाढली नाही आणि तेलाच्या किमती पडल्या. पडलेल्या किमतींमुळे फ्रॅकिंग कंपन्यांना नफा कमी-कमी होत जातो आणि त्याचवेळी नवीन विहीरी खणायला भांडवलाचीही गरज असतेच. पूर्वी तेलाच्या किंमती पडल्या की ओपेक तेलाचे उत्पादन कमी करत असे; पण आता जर त्यांनी तेलाचे उत्पादन कमी केले तर त्यांचे ग्राहक अमेरिकन तेल घ्यायला लागतील आणि ओपेकचा मार्केट शेअर कमी होईल. म्हणून तोटा सहन करुनही सौदी अरेबियासारखे देश तेल उत्पादन कमी न करता चालूच ठेवत आहेत. फ्रॅकिंग कंपन्यांना तोटा होऊन त्या बंद पडल्या की उत्पादन कमी करुन किंमती वाढवता येतील असा त्यांचा होरा आहे.
आता जर अमेरिकेत व्याज दर वाढले तर फ्रॅकिंग कंपन्यांना नवीन कर्ज घ्यायला जास्त व्याज द्यावे लागेल. तेलाच्या कमी किंमतींमुळे नफा न मिळणे आणि नव्या बाँड्सवर जास्त व्याज द्यावे लागणे अशा डबल व्हॅमीमध्ये या कंपन्या सापडतील आणि नव्या विहिरी न खणल्याने बाजारातले अमेरिकन तेल कमी कमी होत जाऊन पुन्हा ओपेकच्या तेलावर अवलंबित्व आल्याने किंमतींचे नियंत्रण पुन्हा ओपेककडे जाईल असा अंदाज आहे.

रुची Mon, 05/10/2015 - 23:13

In reply to by नगरीनिरंजन

प्रतिसाद माहितीपूर्ण आहेच पण एक छोटीशी दुरुस्ती,

म्हणून तोटा सहन करुनही सौदी अरेबियासारखे देश तेल उत्पादन कमी न करता चालूच ठेवत आहेत.

हे तितकसं बरोबर नाही, आताच्या $४५ डॉलर प्रतिबॅरल किंमतीतही मध्यपूर्व ओपेक देश माफक नफा कमवतच आहेत, खाली एक चांगला ग्राफ मिळाला.

तेल उत्पादन खर्च

रशियाचा प्रतिबॅरेल तेल उत्पादन खर्च मात्र $४५ डॉलर प्रतिबॅरलच्या बराच वर असल्याने, तेलाचे दर सद्ध्याच्या किंमतीवर स्थिर होण्यामागे इतर आंतरराष्टीय राजकारणाचे डावपेच असावेत अशीही एक थियरी मधे मांडली जात होती ते ही आठवले.

नगरीनिरंजन Tue, 06/10/2015 - 04:51

In reply to by रुची

बरोबर आहे. माझं वाक्य चुकलं. तेल विक्रीतून अक्षरशः तोटा होत नसला तरी अंतर्गत खर्च आणि स्वतःचा वाढता तेल वापर यामुळे सौदी अरेबियाला ऑईल रेव्हेन्यु पुरत नाहीय. ऑईल व्यतिरिक्त आता पर्यटनाकडे उत्पन्नाचा मार्ग म्हणून बघायचे प्रयत्न चालू आहेत बहुतेक.
IMF Suggests Saudi Arabia Cut Spending, Rely Less on Oil Revenue

उदय. Mon, 05/10/2015 - 18:38

In reply to by नगरीनिरंजन

अशा परिस्थितीत व्याजदर वाढवले तर हाय-यिल्ड मार्केटमधला फुगा फुटेल आणि फ्रॅकिंग कंपन्यांना तगून राहणे आणखी अवघड होणार नाही का?

केवळ ऑईल कंपन्यांचा फायदा-तोटा बघून फेडरल रिझर्व्ह बँक व्याज कमी-जास्त करते, हे म्हणणे जरा धाडसाचे आहे. शिवाय ऑफशोर ड्रिलींगच्या मानाने ऑनशोर ड्रिलींगला (फ्रॅकिंग करायला) तुलनेत कमी भांडवल लागते. बाकी बाबतीत सहमत.

नगरीनिरंजन Mon, 05/10/2015 - 18:55

In reply to by उदय.

फेड त्यांचा फायदा तोटा बघून रेट कमी जास्त करणार नाही. तसं मला म्हणायचं नाहीय. पण अमेरिकन सरकारला मात्र त्याची काळजी करावी लागेल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने. ऑफशोर ड्रिलींग तर खूपच महाग आहे त्यामुळेच शेलने आर्क्टिकमधून सध्या माघार घेतलीय. पुन्हा किंमती वाढल्या की जातील ते परत ऑईल काढायला.

धर्मराजमुटके Sun, 04/10/2015 - 20:35

भारत नेपाळ संबंधांना काय झालयं ? नेपाळची नवीन राज्यघटना अस्तित्त्वात आल्यापासून भारताने नेपाळकडे जाणारा बराच सप्लाय रोखलाय अशा बातम्या वाचनात येतायेत. दोन्ही बाजूंनी (म्हणजे वाचकवर्गाच्या) तीव्र प्रतिक्रियादेखील येतायेत. एकाएकी नक्की काय बिघडलयं ?

ऋषिकेश Mon, 05/10/2015 - 15:05

अखलाखला ठार मारणारे १० पैकी ७ हल्लेखोर भाजप कार्यकर्त्याचे नातेवाईक

पण छे! ही काही सिद्धता नव्हे! दहशतवादी असल्याचे 'सिद्ध' कुठे झालेय! लोकसत्तालाभडकपत्रकारीताचआवडतेम्हणे!

.शुचि. Mon, 05/10/2015 - 17:05

In reply to by ऋषिकेश

कधी संजीव राणा/ कधी संजय राणा बातमी तरी नीटपणे द्यायची ना लोकसत्ताने. अर्थात मुद्दा तो नाहीच.

.शुचि. Tue, 06/10/2015 - 21:58

गुडविल किंवा तत्सम सेकंड हॅन्ड दुकानातून कोणकोण जण गोष्टी विकत घेतात? भारतात सेकंड हॅन्ड गोष्टींना आहे तसा टॅबू अमेरीकेत नाही. असा टॅबू अन्य कोणत्या देशात आढळतो/आढळत नाही?
माझ्यापुरता सांगायचं झालं तर मला क्वालिटी चांगली असेल तर (अंतर्वस्त्रे सोडून) काहीही सेकंड हॅन्ड घ्यायला लाज वाटत नाही. फक्त पैसे कमी हा घटक नसून (म्हणजे तो तर आहेच पण ...) असे आढळले आहे की लोकांनी सहसा "चोखंदळपणे" विकत घेतलेल्या व नतर डोनेट केलेल्या वस्तूच या दुकानात सापडतात. त्यामुळे चटकन आवडतात व व्हरायटीही असते.

राही Wed, 07/10/2015 - 11:47

In reply to by .शुचि.

जपानमध्ये सेकंड-हँड वस्तू विकत घेणे कमीपणाचे किंवा स्वाभिमानाच्या कमतरतेचे समजतात असे ऐकले होते. एखाद्याला मदत करायची असेल तर गावातले लोक त्याच्या नकळत आपापल्या घरातील वस्तू त्याच्या घराजवळ किंवा सोयीच्या ठिकाणी आणून ठेवतात. मग तो त्यातून हव्या असतील तेव्ह्ढ्याच वस्तू घरी नेतो. त्याला उपकाराचे आणि आपल्याला दानाचे ओझे होऊ नये म्हणून ही पद्धत आहे असे वाचले होते.
मला स्वतःला पुस्तके जुन्या बाजारात किंवा रद्दीच्या दुकानातून विकत घ्यायला आवडतात.

अंतराआनंद Tue, 06/10/2015 - 23:15

गांधीजींनी मनात आणलं असतं तर भगतसिंगाची फाशी टळली असती... अश्या अर्थाचं काही तरी वॉट्सअऎप वर फिरतय का? मी पाहिलं नाहीय, त्याबद्द्ल ऐकलय. पण हे काय आहे ते आणि त्याबद्द्ल अजून जास्त माहिती आहे का कोणाला? (हे असे ज्ञानकण वेचून ते पसरवणार्‍यांची खात्रीच असते की एवढी वर्ष आपण पार चुकीचा इतिहास शिकलोय म्हणून, त्यामुळे वाद घालणं ही कठिण हौन बसतं.)

अनुप ढेरे Wed, 07/10/2015 - 16:16

माझ्या एका मित्राला पडलेली शंका.
हे अ‍ॅवॉर्ड परत नक्की कसं करतात? डायरेक भारत सरकारला कुरियर करतात का?
आणि परत करतात म्हणजे फक्त ट्रॉफी परत करतात की कॅश, श्रीफल, शाल जे काही मिळालं असेल तेही परत करतात? कॅश कशी परत करतात? चेक?
आणि ते अ‍ॅवॉर्ड मिळाल्याबद्दल जर काही सत्कार झाले असतील तर त्यांचं मट्रीयलपण परत करतात का?

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 16:40

In reply to by अनुप ढेरे

>> हे अ‍ॅवॉर्ड परत नक्की कसं करतात? डायरेक भारत सरकारला कुरियर करतात का?
आणि परत करतात म्हणजे फक्त ट्रॉफी परत करतात की कॅश, श्रीफल, शाल जे काही मिळालं असेल तेही परत करतात? कॅश कशी परत करतात? चेक?
आणि ते अ‍ॅवॉर्ड मिळाल्याबद्दल जर काही सत्कार झाले असतील तर त्यांचं मट्रीयलपण परत करतात का?

तुमच्या मित्राचा ब्रेकअप / घटस्फोट झाला तर तो गर्लफ्रेंडला / बायकोला दिलेल्या सगळ्या गिफ्ट, डिनर, पिच्चरची तिकिटं, किस वगैरे परत मागतो का?

अनु राव Wed, 07/10/2015 - 16:48

In reply to by चिंतातुर जंतू

तुमच्या मित्राचा ब्रेकअप / घटस्फोट झाला तर तो गर्लफ्रेंडला / बायकोला दिलेल्या सगळ्या गिफ्ट, डिनर, पिच्चरची तिकिटं, किस वगैरे परत मागतो का?

घटस्फोट झाल्यावर गर्लफ्रेंड/बायको कडुन मिळणारे बेनिफिट तरी बंद होतात. असे अ‍ॅवॉर्ड परत करुन नक्की स्वताचे काय नुकसान होते? उलट त्या निमीत्ताने पेपर ला नाव छापुन येते.

अनुप ढेरे Wed, 07/10/2015 - 16:49

In reply to by चिंतातुर जंतू

घ्यावं का नाही/ द्यावं का नाही ही शंका नाही. ते देणारे/घेणारे बघतील.

शंका लॉजिस्टिक आणि तपशीलाबद्दल आहे. द्यायचं ठरवलं तर नक्की कस आणि काय काय देतात अशी शंका आहे.

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 16:55

In reply to by अनुप ढेरे

>> घ्यावं का नाही/ द्यावं का नाही ही शंका नाही. ते देणारे/घेणारे बघतील.
शंका लॉजिस्टिक आणि तपशीलाबद्दल आहे. द्यायचं ठरवलं तर नक्की कस आणि काय काय देतात अशी शंका आहे.

झालं तर मग. इथेसुद्धा देणारे / घेणारे बघतील, आणि लॉजिस्टिकचंसुद्धा तेच बघतील. ज्यांना वात्रट शंका काढायच्या आहेत त्यांना काढू देत.

ऋषिकेश Wed, 07/10/2015 - 16:42

In reply to by अनुप ढेरे

बहुदा पदक वगैरे असल्यास ते परत करत असावेत.
रक्कम परत करतात का कल्पना नाही.

बेसिकली काय परत करतात? या (हॅ हॅ हॅ टैप विनोदनिर्माण करणार्‍या प्रश्ना ;) )पेक्षा त्या मानाचा अव्हेर करणे याला प्रतिकात्मक किंमत अधिक आहे.

अनु राव Wed, 07/10/2015 - 16:47

In reply to by ऋषिकेश

मानाचा अव्हेर करणे याला प्रतिकात्मक किंमत अधिक आहे.

हे कसे काय? कोणाला कुठलेही अ‍ॅवॉर्ड मिळाले असेल तर ते परत केले काय किंवा नाही काय लोकांना पूर्वी ते मिळाले होते हे माहीती असणारच.

पैसे, शाली वगैरे व्याजासकट परत केले तरच खरे परत केले असे म्हणता येइल.

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 16:58

In reply to by अनु राव

>> कोणाला कुठलेही अ‍ॅवॉर्ड मिळाले असेल तर ते परत केले काय किंवा नाही काय लोकांना पूर्वी ते मिळाले होते हे माहीती असणारच.

नाही तर काय? आणि ज्यांना एवढी सगळी माहिती आधीपासूनच असते त्यांना ते अ‍ॅवॉर्ड परत केलं होतं हेसुद्धा माहीत असेलच की. झालं तर मग.

जाता जाता : अशोक वाजपेयी कोण हे तुम्हाला माहीत होतं का हो आधीपासून?

अनु राव Wed, 07/10/2015 - 17:09

In reply to by चिंतातुर जंतू

जाता जाता : अशोक वाजपेयी कोण हे तुम्हाला माहीत होतं का हो आधीपासून?

घ्या परिक्षा चिंज. कोणीतरी हिंदीतला लेखक कम पत्रकार आहे इतके माहीती होते. कॉग्रेस आणि समाजवाद्यांच्या वळचळीला पडुन असतो हे ही माहीती होते.

एका सेहगल नावाच्या बाईने पण ज्ञानपीठ परत केला, हे नाव कधी ऐकले नव्हते. पण पेपर ला कळले की ती नेहरुंची पुतणी आहे. मग ज्ञानपीठ कसे मिळाले हा प्रश्न ही पडला नाही.

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 17:31

In reply to by अनु राव

>> कोणीतरी हिंदीतला लेखक कम पत्रकार आहे इतके माहीती होते. कॉग्रेस आणि समाजवाद्यांच्या वळचळीला पडुन असतो हे ही माहीती होते.

कवी ही त्यांची प्रमुख ओळख आहे. ही त्यांची एक कविता -

गाढे अंधेरे मे

कविता वाचली तर कदाचित अशा माणसाला आज हे पारितोषिक परत करण्याची नैतिक गरज का भासली असू शकेल ह्याचा अंदाज येईल. बाकी चालू द्या.

अनु राव Wed, 07/10/2015 - 17:48

In reply to by चिंतातुर जंतू

ह्या पुढे सरकार नी नियमच केला पाहिजे की पुरस्कार वगैरे परत करायचे असतील तर २ वर्षाचा तुरुंगवास भोगायला लागेल.
बघु कीती अशोक बाजपाई पुढे येतात ते.

पारितोषिक परत करण्याची नैतिक गरज का भासली

पारितोषिक परत केले म्हणजे नक्की काय गमवले हो चिजं. काय असा त्याग केला?. तुम्हाला पार चुत्या ( दुर्दैवाने असले शब्द वापरावे लागतायत ) बनवतायेत ही लोक.

मोदी सरकार आल्यामुळे ह्यांचे दुकान तर बंद पडलेच होते. आता असली नाटके करुन २०१९ ला सरकार बदलले तर उपयोग होइल हा उद्देश. २०१९ ला पण ह्यांच्या मालकांचे सरकार आले नाही तर मात्र अश्या लोकांचे कठीण आहे.

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 17:59

In reply to by अनु राव

>> पारितोषिक परत केले म्हणजे नक्की काय गमवले हो चिजं. काय असा त्याग केला?.

पारितोषिक परत करून त्यांनी काही तरी गमावलं आहे असं मी म्हणालेलो नाही. तुम्हाला असं का वाटलं ते कळलं नाही. असो.

.शुचि. Wed, 07/10/2015 - 18:03

In reply to by अनु राव

नाही अनु नैतिक पाठींबा दिला गं. त्यांनी त्यांना मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन , इश्युला थोडा त्यांच्या परीने स्पिन द्यायचा प्रयत्न केला. - अर्थात हे तुला माहीतच असेल.
___
तुम्ही इकॉनॉमिस्टीश लोकं सगळं फायदा-तोट्यात तोलता का ग? :)

अनु राव Wed, 07/10/2015 - 18:06

In reply to by .शुचि.

शुचि - हे सगळे ढोंग असते ग. निव्वळ स्वार्थ. ह्यांना कसली आलिये नैतिकता? बंद पडलेले दुकान चालू होतय का ते बघतायत.

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 19:22

In reply to by .शुचि.

>> ते ही काही जणांबाबत शक्य असेलही

अनु रावांसाठी असं तळ्यात मळ्यात कधीच नसतं. सगळे जण एक तर काँगी सिक्युलर असतात नाही तर भडक भगवे. अनु राव मात्र संतुलितच असतात. आणि आत्मवंचना कधी होऊच शकत नाही. कारण 'स्वताला फसवणे हा स्वताचाच चॉइस असतो'.

चिंतातुर जंतू Wed, 07/10/2015 - 18:12

In reply to by अनु राव

>> गमवले नाही म्हणजे काहीतरी मिळवले.

हो. त्यांनी काही तरी नक्कीच मिळवलं आहे. काही वाचाळांनी सोयीस्कर मौन पत्करलं आहे आणि त्या मौनाविरोधात आवाज उठवणारे काही आहेत. सरकारी मलिद्यासाठी मूग गिळून गप्प राहण्यापेक्षा अशोक वाजपेयींनी आवाज उठवणाऱ्यांच्या सुरात सूर मिळवला आहे.

Usually it has been seen that English-speaking writers in India keep away from the dust and soil of everyday India. Sahgal's decision makes it clear that this is not the case. Moreover, Sahitya Akademi, that should be supporting the writers, seems to be supporting the government instead. The least it could do was organise a condolence meet for the murdered scholar MM Kalburgi, who also received the Akademi award in 2006.

अनु राव Wed, 07/10/2015 - 18:18

In reply to by चिंतातुर जंतू

सरकारी मलिद्यासाठी मूग गिळून गप्प राहण्यापेक्षा अशोक वाजपेयींनी आवाज उठवणाऱ्यांच्या सुरात सूर मिळवला आहे.

\

अहो चिंज, ह्या सरकार कडुन मलिदा मिळणार नाही हे पक्के ठाऊक असल्यामुळेच हे नाटक आणि भविष्यासाठीची गुंतवणुक.

एक बरे झाले की हे सर्व इतके वर्ष सरकार कडुन मलिदा खात होते हे मान्य केलेत.

नितिन थत्ते Wed, 07/10/2015 - 17:01

In reply to by अनु राव

मानाचा अव्हेर म्हणजे तुमचं अ‍ॅवॉर्ड मला नको. मला अ‍ॅवॉर्ड देण्याची तुमची लायकी नाही. [इथे भारत सरकार या कंटिन्यूअस एन्टिटीचा विचार करावा. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती आहेत आणि पूर्वी अब्दुल कलाम होते हे इथे महत्त्वाचे नाही].

ऋषिकेश Wed, 07/10/2015 - 17:18

In reply to by अनु राव

ज्याने आपल्याला एखादा मान देऊ केला आहे त्याचा जाहिर व सकारण अव्हेर करणे हे त्या कारणाचे महत्त्व अधोरेखीत करणारे आहे.
असा अव्हेर कोण व कोणत्या मानाचा करतो त्यावरून त्या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखीत करता येते.

याला राजकीयदृष्ट्युआ प्रतिकात्माक महत्त्व आहे. ते शक्य त्या मार्गाने केलेले एक महत्त्वाचे विधान (स्टेटमेंट) झाले.

तो मान मिळाल्यावरही आर्थिक लाभापेक्षा बरेच काही अधिक मिळत असते.

धर्मराजमुटके Thu, 08/10/2015 - 20:17

In reply to by अनुप ढेरे

तुमच्या मित्राला पडलेल्या शंकांचे उत्तर त्याला न मिळण्यातच त्याचे भले आहे. कारण याचे उत्तर काहिही दिले की त्याच्या मनात पुढील शंका येतील.
१. पुरस्कार घेताना सरकारने समारंभ आयोजित केला होता. मग पुरस्कार परत देताना पुरस्कार परत देणार्‍याने समारंभ का नाही आयोजित केला.
२. समारंभात दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांची लाल केली असेल (म्हणजे सभ्य मराठीत एकमेकांची स्तुती केली असेल.) पुरस्कार परत केलेल्या व्यक्तीने सरकारवर नाराज होऊन / टीका करुन पुरस्कार परत केला. मग सरकारने पण परत त्याच्यावर टीका केली पाहिजे
वगैरे ! वगैरे !!

अवांतर : उत्तरे तुमच्या मित्रासाठी आहेत तेव्हा ती तुम्ही तुमच्या मनास लाऊन घेणार नाही अशी आशा बाळगतो.

अनु राव Thu, 08/10/2015 - 08:56

आजचा सुविचार

वळवळणार्‍या समाजवादी विचारजंतांना पूर्णतः नष्ट करायचे असेल तर मोदी ब्रँड चे अल्बेंडेझोल भारताने कमीत कमी १५ वर्ष दर सहा महिन्यांनी घेणे गरजेचे आहे.

नगरीनिरंजन Thu, 08/10/2015 - 10:16

स्वतःला संवेदनशील, सभ्य वगैरे समजणार्‍या लोकांनाही एका माणसाला दगड-विटांनी ठेचून मारल्याचं फार काही वाटलेलं दिसत नाही. :-) दुसर्‍याची नीतिमत्ता आणि मलिदा वगैरे जज करणे! मस्त!
तिकडे फेसबुकवर कोणी शेफाली वैद्य म्हणून विचारवंत बाईंनीही टर उडवायला सुरुवात केलीय. ८४ चं शिखांचं शिरकाण, गोध्रा वगैरेच्या वेळी काय झालं विचारताहेत. असतील हे सिक्युलर मलिदखाऊ. प्रश्न हा आहे की त्यांना शिव्या घालणारे काय करताहेत? मलिदाखाऊ लोकांची टर उडवताना झालेल्या गोष्टीचं सुप्त समर्थन तर होत नाहीये ना? पूर्वी शिखांचं शिरकाण झालं, गोध्रा झालं म्हणून आता पुरेसे लोक असल्यास कोणालाही दगड-विटांनी ठेचलेलं चालणार आहे का?
मग १९८४वाल्यांच्यात आणि २०१५ वाल्यांच्यात फरक काय?

मेघना भुस्कुटे Thu, 08/10/2015 - 10:43

In reply to by नगरीनिरंजन

हे प्रश्न विचारणं म्हणजे तुम्ही स्यूडोसिक्युअर, विचारजंत, हस्तिदंती मनोर्‍यातले समाजवादी ढोंगी विद्वान असल्याचा पुरावा आहे हल्ली.

अनुप ढेरे Thu, 08/10/2015 - 10:58

In reply to by नगरीनिरंजन

त्या बाईच्या अ‍ॅवॉर्ड परत करण्याची टर उडवली म्हणजे हत्याकांडाबद्द्ल काही वाटत नाही लोकांना हा जावईशोध लावल्याबद्दल अभिनंदन.

नगरीनिरंजन Thu, 08/10/2015 - 11:34

In reply to by अनुप ढेरे

फार काही वाटलेलं दिसत नाहीय असं म्हटलंय. प्रायॉरिटीज ऑबव्हियस होतात ना जाहीर टर उडवताना.

.शुचि Thu, 08/10/2015 - 18:49

In reply to by नगरीनिरंजन

तिकडे फेसबुकवर कोणी शेफाली वैद्य म्हणून विचारवंत बाईंनीही टर उडवायला सुरुवात केलीय.

फेसबुकवरच उत्तर देऊ शकता. ऐसीवरती मताचे खंडन अथवा समर्थन करायला त्या बाई उपस्थित नसतीलही. कोणाचेही नाव घेऊ नये.

नगरीनिरंजन Thu, 08/10/2015 - 19:37

In reply to by .शुचि

मी त्यांचे नाव घेऊन बदनामी केलेली नाही. त्या टर उडवत आहेत ही वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यांना उत्तर द्यायचा माझा काहीही इरादा नाही.

चिमणराव Thu, 08/10/2015 - 14:33

मला वाटतं तसं पत्र पाठवल्यावर गॅझेटिअरमध्ये फारतर नोंद येत असावी.
सरकारी खात्यात घेण्याची आणि देण्याची खाती वेगळी असतात आणि त्यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो.तसंच या देण्या घेण्याच्या बाबतीत असावं.