Skip to main content

तृतीय विश्वयुद्ध होणार का?

सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फक्तं दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ...

एकीकडे अमेरिका आणि रशिया एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुंतागुंतीच्या क्षेत्रीय हितसंबंधा मुळे या युद्धाचे स्वरूप अमेरिका विरुद्ध रशिया असे बनेल की काय ? अशी भीती वाटते . त्यातच इस्लामीक राष्ट्रांकडील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडणे आणि विश्वयुद्ध भडकल्यास दक्षिण कोरियाची आणि चीनची भूमिका काय असेल ? भारतावर या सगळ्याचा काय ,कसा व किती परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ...

आपणास काय वाटते ? खरोखर तिसरे विश्वयुद्ध होऊ शकते का?

गब्बर सिंग Mon, 26/10/2015 - 12:28

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सकाळी सकाळी थोडी घेऊनशान बसलो होतो त्यामुळे प्रेमाच्या ताकदीला ओव्हर-एस्टिमेट केले .... आत्ताही उतरण्याचे चान्सेस नाहीत.

.शुचि. Tue, 27/10/2015 - 20:30

In reply to by गब्बर सिंग

सकाळी सकाळी थोडी घेऊनशान बसलो होतो त्यामुळे प्रेमाच्या ताकदीला ओव्हर-एस्टिमेट केले

आम्ही ऐकले होते की उलुशीदेखील घेतली तरी माणूस मनातील "खरे खरे" घडाघड बोलतो ;)
अनुचे बरोबरच होते तर "टफ गाय" फक्त फसाड आहे ;)

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 21:53

In reply to by .शुचि.

अनुचे बरोबरच होते तर "टफ गाय" फक्त फसाड आहे

प्रेम करणारा माणूस टफ नसतो?
मग पहिल्या बाजीरावाने इतके शत्रू कसे काय कापून काढले?
:)

.शुचि. Wed, 28/10/2015 - 00:34

In reply to by गब्बर सिंग

शेरोशायरी अन सुभाषितं बरी जीभेवर (थुईथुई) नाचत असतात ;)
कधी तुमची वही सापडली तर पळवून नेईन मग बघू किती सुविचार्/वचने टाक्ताय ;)
.
वा! बर्‍याच दिवसांनी "थुईथुई" शब्द वापरायला मिळाला

अरविंद कोल्हटकर Mon, 26/10/2015 - 08:09

शक्यता अजिबात दिसत नाही.

सीरियामध्ये रशियाने हस्तक्षेप केला आहे हे खरे पण त्यात रशिया/अमेरिका एकमेकांमध्ये संघर्ष होणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतांना दिसतात. आत्ताच फरीद झकेरियाच्या 'GPS' मध्ये पाहिल्याप्रमाणे रशिया कोठे active ह्यावर अमेरिका नजर ठेवून असून तो भाग ते टाळत आहेत. त्यामुळे अमेरिका/रशिया संबंधांत ठिणगी पडणार नाही.

एरवीहि अमेरिकेमध्ये 'boots on the ground' अशी खुमखुमी असणारा कोणीच नेता नाही. सध्याच्या रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या इच्छुकांमध्ये ह्याबाबत कोणीही बोलतांना दिसत नाही. बशार असाद जागेवर राहिला काय वा गेला काय ह्याला अमेरिकन नागरिकाच्या मते फार थोडे महत्त्व आहे.

ISIS ला कसे आवरायचे ही काळजी सर्वांनाच आहे पण त्यावरून जागतिक युद्ध करण्याचा मूड आम जनतेत आहे असे वाटत नाही.

पिवळा डांबिस Mon, 26/10/2015 - 22:04

In reply to by अरविंद कोल्हटकर

पण थोडं अजून सत्याच्या जवळ जाऊन लिहितो...

बशार असाद जागेवर राहिला काय वा गेला काय ह्याला अमेरिकन नागरिकाच्या मते फार थोडे महत्त्व आहे.

खरं तर कोण असाद, काय असाद याविषयी अमेरिकन नागरिकाला फारशी माहिती नाही आणि माहीती करून घेण्याची इच्छाही दिसत नाही..

ISIS ला कसे आवरायचे ही काळजी सर्वांनाच आहे.

आयसिसला 'आवरणं' हा फक्त सध्याच्या अमेरिकन अ‍ॅड्मिनिस्ट्रेशनचा अजेंडा आहे. अमेरिकन नागरिकाला आयसिसचा नायनाट हवा आहे.
मग रशिया ते करतोय म्हंटल्यावर त्याला नागरिकांचा फारसा विरोध दिसत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/10/2015 - 00:56

In reply to by पिवळा डांबिस

अमेरिकन नागरिकाला आयसिसचा नायनाट हवा आहे.
मग रशिया ते करतोय म्हंटल्यावर त्याला नागरिकांचा फारसा विरोध दिसत नाही.

असं काहीतरी आज सकाळी डॉनल्डकाका ट्रंप बोलत होते. पण दुसरीकडे 'मी राष्ट्राध्यक्ष झालो तर मीच सगळ्या जगावर दादागिरी करेन, रश्याला संधीच देणार नाही', असंही म्हणत होते. (सकाळची कॉफी मला कमी पडली का डॉनल्ड काकांना?)

मूळ प्रश्न - तिसरं महायुद्ध होईल बहुतेक. किंवा नाही होणार. किंवा कसंही.

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 02:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'मी राष्ट्राध्यक्ष झालो तर मीच सगळ्या जगावर दादागिरी करेन, रश्याला संधीच देणार नाही'

सबको लाथ, सबकुछ भकास!!! :)

तिसरं महायुद्ध होईल बहुतेक. किंवा नाही होणार. किंवा कसंही.

हा प्रतिसाद म्हणजे ते मटामध्ये भय्या लोकांचे प्रतिसाद असतात तशापैकी आहे!!!
;)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/10/2015 - 07:12

In reply to by पिवळा डांबिस

मटारी* मराठी आणि मटारी* बातम्यांना प्रतिसाद पण तसलाच येणार ना!

*शब्दसौजन्य - अमुक

धनंजय Tue, 27/10/2015 - 04:19

In reply to by राजेश घासकडवी

१९४० काळातील शेंदरी रंगातील मृत्यूचे आकडे कुठले? युरोपातील ज्यू लोकांचा वंशनाश?
~~१८०० ते ~२०१५ असा आलेख बघायला मिळाला असता, तर हवे होते. परंतु Peace Research Institute of Osloच्या संस्थळावर आकडेवारी सहज सापडली नाही.

राजेश घासकडवी Tue, 27/10/2015 - 04:41

In reply to by धनंजय

हे आकडे महायुद्धाच्या नंतरचे आहेत. महायुद्धातले आकडे दाखवले असते तर कदाचित त्या स्केलवर इतर आकडे दिसलेही नसते. सिव्हिल वॉरमध्ये कदाचित फाळणीनंतरच्या भारतातल्या हिंदू मुस्लिम दंगलींचे आकडे असावेत. ४६ नंतरच्या चीनमधल्या सिव्हिल वॉरचेही असावेत. इतरही वसाहतींना स्वातंत्र्य दिल्यावर तिथे आंतरिक कलह होणं स्वाभाविक होतं.

उदय. Tue, 27/10/2015 - 02:42

आम्हा अमेरिकनांसाठी अमेरिका हेच्च आणि इतकेच्च विश्व आहे, त्यामुळे इथे विश्वयुद्ध होणारच नाही. तुम्ही बसा चर्चा करत, मी चाललो फिशिंगला.

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 22:11

In reply to by .शुचि.

फिशिंगला जाणार, मजबूत बियर पिणार, आणि येतांना (कॉस्कोतून) भलेमोठे ट्राऊट घेऊन येणार!!
:)
आम्ही कॅलिफोर्नियन तरी असंच करतो बुवा!!

.शुचि. Tue, 27/10/2015 - 22:14

In reply to by पिवळा डांबिस

तुमच्या कॅलिचं कवतुक ऐकून कान किटले बर्का. जसं काही हामेरीकेत कॅलिशिवाय काहीच ग्लॅमरस नाही :(
आमच्या विस्कॉन्सिनचच चीज खाता ना बीअरबरोबर?

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 22:48

In reply to by .शुचि.

तुमच्या कॅलिचं कवतुक ऐकून कान किटले बर्का

असं सगळेच बाहेरचे म्हणतात, आम्हाला त्याची सवय आहे!!
आपल्या बायकोच्या सौंदर्याचं एखाद्या नवर्‍याने कौतुक केलं की बाकीच्या बायका असंच म्हणतात (असं ऐकून होतो आजवर!!!)
:)

जसं काही हामेरीकेत कॅलिशिवाय काहीच ग्लॅमरस नाही

खरंच आहे ते! बो डेरेक, जोडी फॉस्टर, अ‍ॅन्जेलिना जोली आणखी दुसरीकडे कुठे आहेत? तुमच्या विस्कॉन्सिनात तर फक्त गाई-म्हशी आहेत!!
म्हणून बटर काऊ बनवून तिला ग्लॅमरस करायचा प्रयत्न करता!!
:)

आमच्या विस्कॉन्सिनचच चीज खाता ना बीअरबरोबर?

नोप! आम्ही बीयरबरोबर कॅलिफोर्नियाचे खारवलेले पिस्ते खातो!!!
बाकी आम्ही विस्कॉन्सिनला वाईट कुठे म्हणालोय? तुम्हाला कॅलिफोर्निया विरहाचं दु:ख्ख सहन होत नाही त्याला आम्ही काय करणार?
करा पॅकप आणि या परत इथे!!
;)

बाय द वे, आजचे हवामानः सनी, ७८ डिग्री विथ लाईट ब्रीझ!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/10/2015 - 23:46

In reply to by पिवळा डांबिस

बाकी आम्ही विस्कॉन्सिनला वाईट कुठे म्हणालोय? तुम्हाला कॅलिफोर्निया विरहाचं दु:ख्ख सहन होत नाही त्याला आम्ही काय करणार?
करा पॅकप आणि या परत इथे!!

हे अशानी कशी होणारं विश्वयुद्धं? काहीतरी विचार करा हो धागा काढणाऱ्यांच्या भावनांचा.

पिवळा डांबिस Wed, 28/10/2015 - 09:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे अशानी कशी होणारं विश्वयुद्धं?

आम्ही मेनलॅन्डवर विश्वयुद्ध करत नाही. ते करायचं महासागराच्या दुसर्‍या किनार्‍यावर!!!!
;)

पिवळा डांबिस Wed, 28/10/2015 - 08:55

In reply to by .शुचि.

आम्ही शत्रूलाही ५२ चिंतत नाही.
अर्थात तुम्हाला सदैव स्वेटर घालून बसण्यात संतोष असल्यास आमची काही हरकत नाही!!!
:)

अरविंद कोल्हटकर Wed, 28/10/2015 - 01:22

In reply to by पिवळा डांबिस

"बाय द वे, आजचे हवामानः सनी, ७८ डिग्री विथ लाईट ब्रीझ!!"

म्हणजे गरमच की? म्हणजे आंघोळीची गरज असणार. पण त्यासाठी पाणी आहे का? आम्ही तर ऐकत आहोत की तुमच्या येथे पुष्कळजण 'जुम्मे के जुम्मे'वाले झालेले आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/10/2015 - 01:41

In reply to by अरविंद कोल्हटकर

तुम्हाला चुकीची माहिती मिळाल्ये. कॅलिफोर्नियात दर शुक्रवारी पाऊस पडतोच असं नाही.

पिवळा डांबिस Wed, 28/10/2015 - 08:58

In reply to by अरविंद कोल्हटकर

आम्ही तर ऐकत आहोत की तुमच्या येथे पुष्कळजण 'जुम्मे के जुम्मे'वाले झालेले आहेत.

तुमचे ऐकवणारे बदला. तुम्हाला ते थापा लावतायत!!
किंवा तुम्ही आम्हाला थापा लावताय!!
:)

गब्बर सिंग Tue, 27/10/2015 - 09:52

U.S. Navy destroyer patrols near islands built by China in South China Sea - Mon Oct 26, 2015 9:36pm EDT

The U.S. Navy sent a guided-missile destroyer within 12 nautical miles of artificial islands built by China in the South China Sea on Tuesday, a U.S. defense official said, in a challenge to China's territorial claims in the area.

The official said the USS Lassen was sailing near Subi and Mischief reefs in the Spratly archipelago, features that were submerged at high tide before China began a massive dredging project to turn them into islands in 2014.

"The operation has begun ... It will be complete within a few hours," said the official, who spoke on condition of anonymity.

The mission would be the start of a series of challenges to China's territorial claims in one of the world's busiest sea lanes, another U.S. defense official said.

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 21:58

In reply to by गब्बर सिंग

The mission would be the start of a series of challenges to China's territorial claims in one of the world's busiest sea lanes, another U.S. defense official said.

शाब्बास रे मेरे गब्रू!!!
:)

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 22:02

In reply to by .शुचि.

..