अमेरिकन निवडणुकीत काय होणार?
ट्रम्प यांना रोखण्यासाठी क्रुझ-कसिच यांची युती
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी पक्षांतर्गत १२३७ प्रतिनिधींची मते आवश्यक आहेत. ट्रम्प यांना तेवढी मते मिळू नयेत यासाठी टेक्सासचे सिनेटर क्रुझ आणि ओगायोचे गव्हर्नर कसिच यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या क्लिव्हलँड येथील सभेपर्यंत आपसांत न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/republican-presidential-race-c…
काय भि**** आहेत हे दोघे.
"I am the king of debt. I do
"I am the king of debt. I do love debt. I love debt. I love playing with it," Trump said.
Donald Trump’s bizarre explanation of how the national debt works
गेली १० मिनिटं मी नुसता हसतो आहे. ट्रंप हा मस्त स्टँडप कॉमेडियन आहे ....
नाही.
जर इतरांची नावं बॅलटवर लागलेली असतील, अन जर विनर टेक ऑल प्रायमरी नसेल तर इतरंना अजूनही डेलिगेट्स मिळू शकतात. वेस्ट व्हर्जिनीयात केसिकला १ डेलिगेट मिळाला.
शिवाय, रिपब्लिकनांमध्ये सुपर डेलिगेट हा प्रकार नाही.
The litmus test in the new
रिपब्लिकन पार्टीची जी गत झालिये त्याबद्दल...
----
शेवटी : ट्रंप मेगन केली ला "एक्सक्युज मी" म्हणाला. - घाणेरडं बोल्ण्याबद्दल किमान एवढं तरी. (हे स्गळे स्टेज मॅनेज्ड आहे असे म्हंटले तरीही )
ट्रंपोबा आणि मेगन केली -
चला, ट्रंपोबांनी एकतरी वचन पाळलं. 'लिटल मार्को' किंवा 'खोटारडा क्रूझ' असं ओरडत सुटला होता तेव्हा त्याला 'हे वागणं बरं नव्हं' म्हणत पत्रकारांनी छेडलं होतं. त्यावर 'राष्ट्राध्यक्षपदाच्या जवळ गेल्यावर मी पदाचा आणि स्वतःचा आब राखेन' असं काहीतरी तो म्हणाला होता.
डोनाल्ड ट्रंप यांच्यावर कठोर टीका.
Robert Kagan : This is how fascism comes to America - रॉबर्ट केगन चे "ऑफ पॅरॅडाईझ अँड पॉवर" हे पुस्तक मागे २००५ च्या दरम्यान वाचले होते. आवडले होते.
What these people do not or will not see is that, once in power, Trump will owe them and their party nothing. He will have ridden to power despite the party, catapulted into the White House by a mass following devoted only to him. By then that following will have grown dramatically. Today, less than 5 percent of eligible voters have voted for Trump. But if he wins the election, his legions will comprise a majority of the nation. Imagine the power he would wield then. In addition to all that comes from being the leader of a mass following, he would also have the immense powers of the American presidency at his command: the Justice Department, the FBI, the intelligence services, the military. Who would dare to oppose him then? Certainly not a Republican Party that laid down before him even when he was comparatively weak. And is a man like Trump, with infinitely greater power in his hands, likely to become more humble, more judicious, more generous, less vengeful than he is today, than he has been his whole life? Does vast power un-corrupt?
पण केगन सायबानी साधे सोपे काऊंटरप्वाईंट्स दुर्लक्षित ठेवलेले आहेत. ट्रंप जर एवढा माचोमॅन टाईप आक्रमक आहे तर तो गेल्या २५ वर्षांत आपल्या धंद्यात कसाकाय तसा वागला नाही ? आफ्टरऑल - एका मोठ्या कंपनीचा तो फाऊंडर होता. साडेचार बिलियन डॉलर्स ची संप्पत्ती त्याने स्वतःसाठी निर्माण केली. हे सगळं माचोमॅन मेंटॅलिटी च्या अतिआक्रमक माणसाला करता येतं का ? तसं करणं इतकं सोपं आहे का ? कंपनी चालवणे व राष्ट्राध्यक्ष असणे ह्या भिन्न गोष्टी आहेत हे "इयत्ता दुसरी क" मधलं मूल सुद्धा सांगू शकेल. पण - like in polity, in business you have to discuss, and negotiate. And you do not have any army, police, FBI at your disposal in business. त्याचे काय ?
------------------
(Latest) Elizabeth Warren on Donald Trump.
“Donald Trump was drooling over the idea of a housing meltdown because it meant he could buy up a bunch more property on the cheap,” said Ms. Warren, a Democrat from Massachusetts. “What kind of a man does that?”
- हे उद्गार आहेत अशा व्यक्तीचे की जी ग्राहकांच्या हिताबाबत जागरूक असण्याचा दावा करते. कंझ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरो ची संस्थापिका आहे. ही सरकारी डिपार्टमेंट अमेरिकन ग्राहकांना उलबध असलेल्या सर्व फायनान्शियल प्रॉडक्ट्स चे रेग्युलेशन करते. म्हंजे क्रेडिट कार्ड वगैरेंचे.
एखादा वेडसर माणूस सुद्धा इतकं चिंताजनक वाक्य उच्चारणार नाही.
त्यात चिंताजनक काय आहे? ते
त्यात चिंताजनक काय आहे?
ते चिंताजनक एवढ्यासाठी आहे की एलिझाबेथ वॉरेन ह्या एका इष्ट गोष्टीस अनिष्ट, वाईट म्हणत आहेत. हाऊसिंग मार्केट कोसळत होते तेव्हा अनेकांना त्यांचा "संभाव्य लॉस" टाळण्यासाठी त्यांची प्रॉपर्टी विकायची होती. हे नॉर्मल आहे. व त्यावेळी कोणी घ्यायला तयार नसेल तर त्या विकू इच्छिणार्या माणसाची काय हालत होईल ? विकू इच्छिणार्यांपैकी अनेकांनी अत्यंत खराब क्रेडिट स्कोअर असूनही गृह कर्ज घेतलेली होती. आता ती त्यांना लबाडीने विकली गेली होती असं म्हणणं सोयीचं आहे (कारण मग सगळं खापर मॉर्टगेज बँकर च्या माथी मारता येतं) पण वस्तुस्थिती ही आहे की बॉरोअर स्वतः अतिलोभी होता. मार्केट कोसळत असल्यामुळे त्यातल्या काहींना आपली चूक सुधारायची होती. कारण कर्जं जेव्हा दिली गेली तेव्हा ती घराच्या मार्केट व्हॅल्यु च्या बेसिस वर दिली गेली होती आणि बॉरोअर चे क्रेडिट अत्यंत खराब असूनही. आता झालेली चूक सुधारायची व त्यातल्यात्यात तोटा कमीतकमी ठेवायचा तर लवकरात लवकर विकणे भाग आहे. नाहीतर सगळीच अनिश्चितता होती. व म्हणून त्यावेळी ट्रंप सारख्या अपॉर्च्युनिस्टिक बायर ची उपस्थिती ही विकणार्यासाठी खूप आवश्यक होती. व हे इष्टच आहे. असे अनेक अपॉर्च्युनिस्टिक बायर्स असले तर (त्यांच्यात स्पर्धा असेल व) विकणार्याला अनेक विकल्प मिळू शकतील. नैका !!!
--
ट्रंप कशाकरता ड्रूल करतो याचा अन उपरोल्लेखित ब्युरो का ट्युरोचा काय संबंध
वरचा परिच्छेद हा कंझ्युमर-कम-बॉरोअर ला नजरेसमोर ठेवून लिहिलेला आहे. मॅडम वॉरेन ह्या कंझ्युमरचे हित जपण्यासाठी वचनबद्ध आहेत (त्यांनी तो ब्युरो स्थापन केला ह्यातून त्यांची ही वचनबद्धताच सिद्ध होते). पण जी गोष्ट मार्केट मधे (कंझ्युमरच्या निकडीच्या वेळी) इष्ट आहे तिला वाईट ठरवणे हा अविचारीपणा आहे.
सँडर्स यांच्या धोरणांच्या समर्थनार्थ
सँडर्स यांच्या धोरणांच्या समर्थनार्थ - अर्थशास्त्री जेफ्री सॅक्स यांनी बर्नी सँडर्स यांच्या धोरणांना समर्थन दिलेले आहे व आकडेवारी पेश करून सँडर्स यांची धोरणे ही कशी योग्य आहेत त्यावर टिप्पणी केलेली आहे. डॉ. सॅक्स हे दारिद्र्य निर्मूलन चळवळीचे आघाडीचे शिलेदार आहेत.
धन्यवाद
Wow! थँक्स. हे शांतपणे वाचायचे आहे.
____
There is nothing magical or utopian about Sanders’s recommendations. He is advocating policies of decency long ago adopted by other prosperous high-income countries. Our own neighbor, Canada, is a case in point. Canada has lower-cost health care, a life expectancy two years higher than in the United States, much lower college tuition, far lower poverty rates and, not surprisingly, more happiness (ranking sixth in the world in life satisfaction, behind Scandinavia and well ahead of the United States, which is 12th).
ते एम्बोल्डन (ठळक ठशातील) वाक्य एका नामवंत इकॉनॉमिस्टने म्हटल्याने धीर आला ब्वा. म्हणजे बर्नी सँडर्स चूकीचे नाहीत, अतिआदर्शवादी, स्वप्नाळू नाहीत एवढे कळले.
बाकी हेज फंड, सिंगल पेयर इन्श्युरन्स या टर्म्स चाळून समजुन घ्यावे लागेल. पण सँडर्स यांच्या विमाविषयक धोरणामुळे, म्हणे खाजगी विमाकंपन्यांपेक्षा, सरकारला पैसे जास्त मिळतील.
हायली पेड सी ई ओज ना चांगला फटका बसणारे वाटतं. चला आर्थिक विषमता कमी होऊ देत. - अच्छे दिन आनेवाले है लगता है ;)
सिनेटर बर्नी सँडर्स यांचा पलायनवाद
सिनेटर बर्नी सँडर्स यांचा पलायनवाद
.
.
.
.
.
.
.
.
LEÓN KRAUZE, UNIVISION: I am sure that you know about this topic: various leftist governments, especially the populists, are in serious trouble in Latin America. The socialist model in Venezuela has the country near collapse. Argentina, also Brazil, how do you explain that failure?
BERNIE SANDERS, DEMOCRATIC CANDIDATE: You are asking me questions…
LEÓN KRAUZE, UNIVISION: I am sure you’re interested in that.
BERNIE SANDERS, DEMOCRATIC CANDIDATE: I am very interested, but right now I’m running for President of the United States.
LEÓN KRAUZE, UNIVISION: So you don’t have an opinion about the crisis in Venezuela?
BERNIE SANDERS, DEMOCRATIC CANDIDATE: Of course I have an opinion, but as I said, I’m focused on my campaign.
ट्रम्प लव्ह्ज हिस्पॅनिक्स!
जज Gonzalo P. Curiel -
जन्म - इस्ट शिकागो, इंडियाना राज्य, इ. स. १९५३
शिक्षण - बी.ए. + Juris Doctor, इंडियाना युनिव्हर्सिटी, इ. स. १९७९
अनुभव -
१९७९ ते १९८९ - प्रायव्हेट प्रॅक्टिस
१९८९ ते २००६ - असिस्टंट यू.एस. अॅटर्नी, कॅलिफोर्निया (*१९८९ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.)
२००६ ते २०१२१ - जज ऑफ सुपिरियर कोर्ट, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (*२००६ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.)
२०१२ ते आतापर्यंत - जज, यू.एस. डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया (*यू.एस. सिनेट ज्युडिशियरी कमिटी आणि संपूर्ण सिनेटकडून मान्यता)
. . .
गेली सहा वर्षं (२०१० पासून - म्हणजे ट्रम्पने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलं, त्याच्या कितीतरी आधी), ट्रम्प युनिव्हर्सिटीच्या विरोधात खटला चालू आहे. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीतून ट्रम्पने भरपूर फी घेऊन ($३५,००० च्या घरात), त्या बदल्यात जाहिरात केलेल्या गोष्टी/कोर्सेस शिकवले नाहीत, असं त्याचं स्वरूप आहे. सध्या ही केस जज गोन्झालो क्युरिअल यांच्यासमोर असून, तिची सुनावणी नोव्हेंबरमध्ये (२०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर) आहे.
आज सॅन डिएगो शहरात एका सभेत बोलताना, ट्रम्पने जज क्युरिअल यांच्याबद्दल खालील भाष्य केलं:
Trump leveled a series of blows against Curiel. He called him “a hater of Donald Trump” and “very hostile” person who had “railroaded” him.....“I think Judge Curiel should be ashamed of himself. I think it’s a disgrace that he’s doing this.” Trump brought up Curiel’s ethnicity: “The judge, who happens to be, we believe, Mexican…
टीव्ही न्यूज
>>> तुम्ही आणि ट्रंपचं व्याखान ऐकायला गेला होता?
बाब्बौ, तिकडे दोन्हीकडचे माथेफिरू जमले होते. काही कॉन्फेडरसीचा झेंडा फडकवत, काही मेक्सिकोचा. तिथे जाऊन कुठे तंगड्या गळ्यात अडकवून घ्या? आम्ही आपला स्थानिक न्यूजवर व्हिडिओ रिपोर्ट पाहिला हो.
अवांतर - जज क्युरियल बहुतेक आता आपलं बर्थ सर्टिफिकेट शोधायच्या मागे लागले असावेत :)
अमेरिका तेरे टुकडे होंगे!
काही कॉन्फेडरसीचा झेंडा फडकवत
बाबौ! फुटीर लोक अजून तिथेही आहेत वाटतं. आम्हाला वाटलं उमेरिकेत सग़ळं आलबेल असतं. अमेरिका माता की...!!
अवांतर - जज क्युरियल बहुतेक आता आपलं बर्थ सर्टिफिकेट शोधायच्या मागे लागले असावेत
हाहाहा. इथे लोक डिग्र्या शोधत असतात आता.
Dog-whistle politics
बाबौ! फुटीर लोक अजून तिथेही आहेत वाटतं.
:), फरक इतकाच की अशा लोकांना एकोणिसाव्या शतकातली अमेरिकाच अजून प्यारी आहे. (एक टेक्ससचा अपवाद - ते मात्र कुणी न विचारताच, संघराज्यातून फुटून पडायच्या सतत धमक्या देत असतात.) ट्रम्पची अशी race-baiting विधानं, ही अशा लोकांना दिलेली छुपी चिथावणी आहे (पहा: Dog-whistle politics). असो, संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवर आहेच.
हाहाहा. इथे लोक डिग्र्या शोधत असतात आता.
ट्रम्पआजोबा तुमच्या दोन पाऊलं पुढे आहेत, काय समजलात? २०११ साली आपले अध्यक्षपदाचे मनसुबे जाहीर करताना, त्यांनी ओबामाची डिग्री/गुणपत्रिका तर मागितलीच, वर असेही दावे केले:
"Our current president came out of nowhere. Came out of nowhere," Trump said. "In fact, I'll go a step further: the people that went to school with him, they never saw him, they don't know who he is. It's crazy."
अर्थात, ते चुकीचे होते - पण ओबामा हा अँटायख्राईस्ट, सैतानावतार असल्याचं समजून चालणार्या अनेकांच्या मताला त्यामुळे पुष्टी मिळाली :)
(पाहिलं नसल्यास, पहा: Dog-whistle politics)
the people that went to
the people that went to school with him, they never saw him,
बास बास, हे भलतच साम्य आहे. इथे लोक मोदींचे क्लासमेट शोधत होते. मोदींनी मी एक्स्टर्नल यमे केलं असं सांगितलेलं असताना देखील.=))
मोदी-ट्रंप-केजरीवाल-ओबामा यांच्या कहाण्या ऐकून 'अवघा रंग एक झाला' फील येत आहे.
+ नया है वह
मोदी-ट्रंप-केजरीवाल-ओबामा यांच्या कहाण्या ऐकून 'अवघा रंग एक झाला' फील येत आहे.
=))
आजच जॉन मकेनच्या अॅरिझोनात, एका घरगुती उत्तर भारतीय पार्टीत, एका ज्येष्ठ ट्रम्पसमर्थकाशी काही काळ चर्चा झाली (वेळ काय सांगून येते का!). चमकदार घोषणा आणि शाळकरी भाषेत अपमान करत राहणे, ह्याव्यतिरिक्त ट्रम्पची धोरणं फारशी सखोल नाहीत ह्या आक्षेपावर, त्यांनी जी सबब सांगितली ती "नया है वह" याच चालीवरची होती :). (गंमत म्हणजे, भारतीय राजकारणाच्या संदर्भात, हे काँग्रेस-समर्थक आहेत असं दिसलं.)
अर्थात, ट्रम्प १९८८ सालापासून अध्यक्षीय निवडणूक लढवण्याचा मनसुबे जाहीर करीत होता आणि २०१६ सालची निवडणूक लढवण्याचं तर त्याने तब्बल पाच वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं; हे सांगून काही उपयोग नव्हता. कारण आठ वर्षांपूर्वी, या गृहस्थांनी ज्याला होम-स्टेट सिनेटर म्हणून हिरीरीने मत दिलं होतं; त्या मकेनच्या सैनिकी कामगिरीचे ट्रम्पने काढलेले धिंडवडेही त्यांनी मुकाट स्वीकारलेले दिसले.
बेसिकली सिस्टिम बाहेरून येऊन
:)
बेसिकली सिस्टिम बाहेरून येऊन कोणीतरी सिस्टिम साफ करेल असा विश्वास बळावला की हे असंच होणार. दिल्लीत मोठं उदाहरण आहे. म्हणूनच मला ट्रम्पचे क्यांपेन (आणि माझ्या अंदाजाने विजयही) मोदींपेक्षा केजरीवालशी असोशिएट करणे सोपे जाते.
हिलरी (शील दिक्षितप्रमाणे) अनेकांच्या नजरेत थोर्थोर असली तरी तुम्ही तिलाही हरवू शकता इतकं मतदारांवर गोंदवत राहिलं की झालं! बघा बळी पडतात की नाही! (एका मोठ्या नेत्याला आपण कसा लोळवला याप्रकारच्या विजयात लोकांनाही कैफ चढतो आणि जिंकण्याची किक अधिक बसते)
आशांचा चुराडा
तुम्ही आणि ट्रंपचं व्याखान ऐकायला गेला होता?
नंदनच्या गावच्या बातम्या टीव्हीवर लागल्या की मी त्यात नंद्या दिसतो का हे शोधत होते. किती बै आशा होती मला!
असो. बोरोविट्झचा आजचा दंगा - Sanders Vows to Keep Fighting for Nomination Even if Hillary is Elected President
आक्षेपावर, त्यांनी जी सबब
आक्षेपावर, त्यांनी जी सबब सांगितली ती "नया है वह" याच चालीवरची होती (स्माईल). (गंमत म्हणजे, भारतीय राजकारणाच्या संदर्भात, हे काँग्रेस-समर्थक आहेत असं दिसलं.)
या गृहस्थांनी ज्याला होम-स्टेट सिनेटर म्हणून हिरीरीने मत दिलं होतं; त्या मकेनच्या सैनिकी कामगिरीचे ट्रम्पने काढलेले धिंडवडेही त्यांनी मुकाट स्वीकारलेले दिसले.
डोनाल्ड आहेच असा लाघवी!!! शत्रुपक्षातल्या लोकांना पण भुरळ घाललीय त्याने.
http://www.isidewith.com/ 36,
36,827,212 voters use iSideWith to find their candidate match
या वेबसाईट चा दावा असा आहे की = iSideWith is not affiliated with any political party, candidate, or interest group.
ईनी-मिनी-माईनी-मो
मला ईनी-मिनी-माईनी-मो करता येइल. सगळेच जवळजवळ एका लेव्हलवर आहेत
_____________
Candidates you side with...
85% Hillary Clinton , Democratic
on social, domestic policy, environmental, education, criminal, immigration, and science issues.
____________
77% Bernie Sanders, Democratic
on social, domestic policy, environmental, education, criminal, immigration, and science issues.
______________
71% Jill Stein, Green
on social, domestic policy, environmental, criminal, immigration, and science issues.
________________
60% Gary Johnson,Libertarian
on economic, social, foreign policy, immigration, and science issues.
____________________
54% Donald Trump , Republican
on foreign policy and electoral issues.
न्यु यॉर्क चे सरकारी वकील ट्रंप बद्दल काय म्हणतात ...
न्यु यॉर्क चे सरकारी वकील ट्रंप बद्दल काय म्हणतात : निर्लज्ज व निर्दय
ट्रंप ला उद्देशून वापरलेल्या शिव्यांचे एक सहस्त्रनाम होईल.
---
फिअर "माँगरींग" हे खोट्या भीतीबद्दल म्हणतात, खऱ्या नाही .
फिअर "माँगरींग" हे खोट्या भीतीबद्दल म्हणतात, खऱ्या नाही . "मी मेक्सिको सीमेवर भिंत बांधणार असल्यामुळे इथला अमेरिकेत जन्मलेला (पण मेक्सिकन वंशाचा) न्यायाधीश माझ्या केसमध्ये निष्पक्षपाती राहूच शकत नाही " हे किती बालिश विधान आहे. ट्रम्प साहेबांनी अशी कित्येक विधाने केली आहेत.
डेम्स ची मज्जा असते ....
डेम्स ची मज्जा असते .... एकीकडं बोंबलायचं की अमेरिकेत आर्थिक विषमता वाढत चाललिये, वर्णविद्वेष/वर्णभेद वाढतोय (अगदी मेक्सिकनांविरूद्ध सुद्धा).
दुसरीकडे - ज्यांना या विषमतेपासून, वर्णभेदापासून सुटका मिळू शकते व ते आपापल्या मातृभूमित वापस जाऊ शकतात त्यांना जाऊन देण्यास विरोध करायचा.
अमेरिकेत एवढा वर्णभेद असेल तर मेक्सिकन लोक आपल्या जिवावर उदार होऊन सीमारेषा ओलांडून वैध्/अवैध मार्गाने अमेरिकेत येण्याचा व राहण्याचा यत्न का करतील ?
दुसरीकडे - ज्यांना या
दुसरीकडे - ज्यांना या विषमतेपासून, वर्णभेदापासून सुटका मिळू शकते व ते आपापल्या मातृभूमित वापस जाऊ शकतात त्यांना जाऊन देण्यास विरोध करायचा.
हे कुठे दिसलं ब्वॉ तुम्हांला? उलट मंदीनंतर अनेक लोक परत गेले की मेक्सिकोत. खरं तर, काही काळ 'इफेक्टिव्ह इमिग्रेशन' निगेटिव्ह झालं होतं त्यामुळे.
अमेरिकेत एवढा वर्णभेद असेल तर मेक्सिकन लोक आपल्या जिवावर उदार होऊन सीमारेषा ओलांडून वैध्/अवैध मार्गाने अमेरिकेत येण्याचा व राहण्याचा यत्न का करतील ?
गब्बर मोड सुरू> अमेरिकेत अज्जिब्बात्तच्च वर्णभेद आणि आर्थिक विषमता नाही गब्बर मोड समाप्त>
हे कुठे दिसलं ब्वॉ तुम्हांला?
हे कुठे दिसलं ब्वॉ तुम्हांला? उलट मंदीनंतर अनेक लोक परत गेले की मेक्सिकोत. खरं तर, काही काळ 'इफेक्टिव्ह इमिग्रेशन' निगेटिव्ह झालं होतं त्यामुळे.
मग खालील गोष्टींना विरोध का ?
(१) अमेरिका व मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे
(२) डिपोर्टेशन्स ऑफ इल्लिगल इमिग्रंट्स
आता तुम्ही म्हणालच की इल्लिगल इमिग्रंट्स हे इल्लिगल नाहीतच. उदाहरणच द्यायचे तर हिलरी चा खालील मजकूर पहा (हिलरीबाईंच्या वेबसाईटवरून) - https://www.hillaryclinton.com/issues/immigration-reform/
“We have to finally and once and for all fix our immigration system—this is a family issue. It’s an economic issue too, but it is at heart a family issue. If we claim we are for family, then we have to pull together and resolve the outstanding issues around our broken immigration system.
हा फॅमिलि इश्यु आहे व इकॉनॉमिक इश्यु आहे असं म्हणायचं आणि लॉ इन्फोर्समेंट इश्यु नाहीच असं भासवायचं.
---
आता असं म्हणून टाका की डेम्स चा विरोध नसूनही गब्बर "डेम्स चा विरोध आहे" असं म्हणातोय. किंवा गब्बर सरमिसळ करतोय किंवा गब्बर गल्लत करतोय.
----
गब्बर मोड सुरू> अमेरिकेत अज्जिब्बात्तच्च वर्णभेद आणि आर्थिक विषमता नाही गब्बर मोड समाप्त>
नंदन मोड सुरू> अमेरिकेने फक्त वर्णभेद आणि फोर्स्ड आर्थिक विषमता ह्या फॉर्मल पॉलिसिज वापरून प्रचंड प्रगती केली. खरंतर अमेरिकेचे यश हे याच दोन धोरणांवर आधारलेले आहे. इतकेच काय तर खरी प्रगती ही मेक्सिको ने च केली. अमेरिकेने फक्त मेक्सिकोला लुटले व आपली तिजोरी भरून घेतली. नंदन मोड समाप्त>
इस मोड से जातें हैं
मग खालील गोष्टींना विरोध का ?
(१) अमेरिका व मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे
(२) डिपोर्टेशन्स ऑफ इल्लिगल इमिग्रंट्स
-- ओबामाने डिपोर्ट केलेल्यांची संख्या, इल्लिगल इमिग्रंट्सकडून त्याला मिळालेलं 'डिपोर्टर-इन-चीफ' हे बिरुद, ओबामाच्या पाठिंब्याने + सिनेटने बाय-पार्टीसन मेजॉरिटीने (६८ - ३२) मंजूर केलेलं इमिग्रेशन बिल ज्यात सीमेवर कुंपण बांधण्यास अधिक सुरक्षा वाढवण्याची तरतूद आहे (रिपब्लिकन हाऊसने ते साधं चर्चेसही घेतलेलं नाही) या गोष्टी तुम्हांला ज्ञात असतीलच. पण तरीही तुम्ही हा निष्कर्ष कसा काढला?
हा फॅमिलि इश्यु आहे व इकॉनॉमिक इश्यु आहे असं म्हणायचं आणि लॉ इन्फोर्समेंट इश्यु नाहीच असं भासवायचं.
संत रेगन आणि संत फ्रीडमनसुद्धा म्हणाले होते हो असं. हिलरीबै एकट्या नैत. झोडपायचं तर सगळ्यांना झोडपा की.
नंदन मोड सुरू> अमेरिकेने फक्त वर्णभेद आणि फोर्स्ड आर्थिक विषमता ह्या फॉर्मल पॉलिसिज वापरून प्रचंड प्रगती केली. खरंतर अमेरिकेचे यश हे याच दोन धोरणांवर आधारलेले आहे. इतकेच काय तर खरी प्रगती ही मेक्सिको ने च केली. अमेरिकेने फक्त मेक्सिकोला लुटले व आपली तिजोरी भरून घेतली. नंदन मोड समाप्त>
नै जम्या, कीप ट्रायिंग
-- ओबामाने डिपोर्ट
-- ओबामाने डिपोर्ट केलेल्यांची संख्या, इल्लिगल इमिग्रंट्सकडून त्याला मिळालेलं 'डिपोर्टर-इन-चीफ' हे बिरुद, ओबामाच्या पाठिंब्याने + सिनेटने बाय-पार्टीसन मेजॉरिटीने (६८ - ३२) मंजूर केलेलं इमिग्रेशन बिल ज्यात सीमेवर कुंपण बांधण्यास अधिक सुरक्षा वाढवण्याची तरतूद आहे (रिपब्लिकन हाऊसने ते साधं चर्चेसही घेतलेलं नाही) या गोष्टी तुम्हांला ज्ञात असतीलच. पण तरीही तुम्ही हा निष्कर्ष कसा काढला?
आमचा मुद्दा पुन्हा मांडतो -
एका बाजूला अमेरिकेत वर्णभेद व आर्थिक विषमता आहे असं बोंबलणे व दुसर्या बाजूला इल्लिगल इमिग्रेशन ला Deter न करणे (तिथे मात्र मतांसाठी बोटचेपेपणा करणे) हे अति विसंगत आहे. व हेच नेमके डेम्स करतायत.
( याला क्रोनिइझम म्हणतात. फक्त काये की कॅपिटलिस्टांनी केला की तो क्रोनिइझम/क्रोनि कॅपिटलिझम होतो. बाकीच्यांच्या बाबतीत ती ह्युमेन, कंपॅशनेट पॉलिसी होते.)
--
नै जम्या, कीप ट्रायिंग
नंदन मोड सुरु> डेम्स हे जेनेटिकली मॉडिफाईड टू नेव्हर बीइंग duplicitous असतात. बाकीचे (म्हंजे रिपब्लिकन्स, लिबर्टेरियन्स) हे duplicitous शिवाय दुसरे काही असूच शकत नाहीत. duplicitous हे विशेषण फक्त यांच्यासाठीच जन्माला आले. नंदन मोड समाप्त>
---
बाकी इमिग्रेशन ला माझा अतिमहाप्रचंड पाठिंबा आहे. www.openborders.info या वेबसाईट चा मी पंखा आहे.
मिल्टन
एका बाजूला अमेरिकेत वर्णभेद व आर्थिक विषमता आहे असं बोंबलणे व दुसर्या बाजूला इल्लिगल इमिग्रेशन ला Deter न करणे (तिथे मात्र मतांसाठी बोटचेपेपणा करणे) हे अति विसंगत आहे. व हेच नेमके डेम्स करतायत.
- इल्लिगल इमिग्रेशनला डेमोक्रॅट्सचा मतांसाठी पाठिंबा आहे, या समजाला छेद देणार्या काही बाबी मी वर सांगितल्या आहेत.
- अमेरिकेत आर्थिक विषमता आहे हे ट्रम्पचे पाठीराखेही मान्य करताहेत. वर्णभेद आणि ट्रम्प... ते एक असो.
-
(श्रेयअव्हेरः मिपावरचा 'गॅरी ट्रुमन' हा आयडी)
नंदन मोड सुरु> डेम्स हे जेनेटिकली मॉडिफाईड टू नेव्हर बीइंग duplicitous असतात. बाकीचे (म्हंजे रिपब्लिकन्स, लिबर्टेरियन्स) हे duplicitous शिवाय दुसरे काही असूच शकत नाहीत. duplicitous हे विशेषण फक्त यांच्यासाठीच जन्माला आले. नंदन मोड समाप्त>
नै, नै. हा तर गब्बर मोड झाला की! फक्त नावं बदललीत; सूर, सरसकट सामान्यीकरण कायमच आहे. स्कॉचमध्ये भेसळ तर नाही ना तुझ्या? ;)
नै, नै. हा तर गब्बर मोड झाला
नै, नै. हा तर गब्बर मोड झाला की! फक्त नावं बदललीत; सूर, सरसकट सामान्यीकरण कायमच आहे. स्कॉचमध्ये भेसळ तर नाही ना तुझ्या?
(१) अमेरिकेत वर्णभेद आहे
(२) अमेरिकेत वर्णभेद नाही
या दोन पैकी कोणते विधान सरसकटीकरण आहे ? कोणते जास्त सरसकटीकरण आहे ? कोणते सामान्यीकरण आहे / नाही ?
---
बाकी फ्रिडमन यांचा व्हिडिओ गब्बरेतरांसाठी डकवणे हे मस्तच आहे. लई भारी. तुस्सी ग्रेट हो.
गब्बर साठी डकवणे हे "आजोबांना लंगोट घालायला शिकवणे" आहे.
---
पुनश्च - I am fully supportive of free flow of goods, capital, labor, information and ideas.
पण फ्री ट्रेडमुळे अमेरिकन कामगारांचे नुकसान होते असं ओरडायचं आणि जोडीला मेक्सिकन लोकांच्या अवैध प्रवेशास उत्तेजना द्यायची हे विसंगत आहे.
https://www.washingtonpost.com/news/the-fix/wp/2015/06/17/tracking-the-…
http://www.npr.org/sections/itsallpolitics/2015/04/21/401123124/a-timel…
जनरली स्पीकिंग
या दोन पैकी कोणते विधान सरसकटीकरण आहे ? कोणते जास्त सरसकटीकरण आहे ? कोणते सामान्यीकरण आहे / नाही ?
सामान्यीकरण/सरसकटीकरण = डेमोक्रॅट्स इल्लिगल इमिग्रेशनला उत्तेजन देतात.
कारण =
१. जनरलायझेशन असाईड, हे विधान चुकीचं का आहे याची तीन-चार कारणं मी वर दिली आहेत.
२. रिपब्लिकन पक्षाचा हक्काचा मतदारसंघ असलेले कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल व्हॅलीतले शेतकरी (पहा: बेकर्सफिल्ड आणि परिसर, एकेकाळी हाऊस मेजॉरिटी लीडर बनण्याची शक्यता असलेल्या केविन मॅकार्थीचा सी.ए.-२३ हाऊस डिस्ट्रिक्ट) आणि वाढत्या संख्येने मिडवेष्टातले शेतकरीही या इल्लिगल फार्म वर्कर्सवर अवलंबून आहेत. आपल्या प्रॉफिट मार्जिनसाठी खरं तर, त्यांची लॉबी बंदिस्त बॉर्डरच्या विरोधात आहे.
३. इल्लिगल इमिग्रेशन = मेक्सिकोतून होणारं इमिग्रेशन; हे अजून एक सरसकटीकरण आहे. आशियातील अनेक राष्ट्रांतून येनकेनप्रकारेण टूरिस्ट व्हिसा मिळवून आलेल्या आणि मुदत उलटूनही इथेच राहिलेल्या इल्लिगल इमिग्रंट्सची संख्या लक्षणीय आहे. विशेषतः, फिलिपाईन्समध्ये कॅथलिक चर्चच्या प्रभावामुळे कुटुंबाची वाढती संख्या -- खर्चाचा न बसणारा मेळ -- एजंट्सकडून तात्पुरते पैसे घेऊन मिळवलेला टूरिस्ट व्हिसा -- न्यू यॉर्क किंवा कॅलिफोर्नियात मिळालेले लो-पेइंग जॉब्स ही साखळी अव्याहत सुरू आहे.
४. क्युबातून पळून येणार्यांसाठी पेश्शल 'Wet feet, dry feet policy' आहे, हा भाग वेगळा.
तर असल्या बाबी लक्षात न घेता; केवळ तुम्ही भिंत बांधायच्या विरोधात आहात (तिचा खर्च, देखभाल, पर्यावरणाला पोचणारे धोके, अमेरिकन धरतीवरीलच लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मिळवलेल्या जमिनी) म्हणजेच तुम्ही इल्लिगल इमिग्रेशनचे खंदे समर्थक आहात असा निष्कर्ष काढणं, हे अजून एक सरसकटीकरण.
गब्बर साठी डकवणे हे "आजोबांना लंगोट घालायला शिकवणे" आहे.
याबाबत दिलगीरी व्यक्त करतो. गब्बरला फ्रीडमनबद्दल काही सांगणे, म्हणजे स्टेफ करीला 'थ्री पॉईंटर्स'बद्दल टिप्स देण्यासारखेच.
पुनश्च - I am fully supportive of free flow of goods, capital, labor, information and ideas.
म्हणजे तुम्ही भिंत बांधायच्या विरोधात आहात की बाजूने?
तर असल्या बाबी लक्षात न घेता;
तर असल्या बाबी लक्षात न घेता; केवळ तुम्ही भिंत बांधायच्या विरोधात आहात (तिचा खर्च, देखभाल, पर्यावरणाला पोचणारे धोके, अमेरिकन धरतीवरीलच लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मिळवलेल्या जमिनी) म्हणजेच तुम्ही इल्लिगल इमिग्रेशनचे खंदे समर्थक आहात असा निष्कर्ष काढणं, हे अजून एक सरसकटीकरण.
इल्लिगल इमिग्रेशन च्या विरोधात अशी कोणती कारवाई आहे की जिचे डेमोक्रॅट्स समर्थन करतात ?
--
पुनश्च : भिंत बांधायच्या विरोधात आहेच मी.
पण जे इल्लिगल इमिग्रंट्स आहेत त्यांना जबर, अतिकठोर दंड करण्याच्या मताचा आहे मी. तसेच त्या सगळ्यांचा क्रिमिनल बँकग्राऊंड चेक करावा व त्या चेक चे पैसे सुद्धा त्यांच्याकडून वसूल करावेत. ( आता लगेच - हे विधान भिंतीला विरोध न करण्याच्या विधानाशी, व फ्री ट्रेड पॉलिसिज च्या भूमिकेशी - काहीसे विसंगत आहे असं म्हणालच तुम्ही. )
>>> इल्लिगल इमिग्रेशन च्या
>>> इल्लिगल इमिग्रेशन च्या विरोधात अशी कोणती कारवाई आहे की जिचे डेमोक्रॅट्स समर्थन करतात ?
--- ओबामाने पाठिंबा दर्शवलेलं आणि तत्कालीन सर्व डेमोक्रॅटिक सिनेटर्स (५४) + १४ रिपब्लिकन यांनी मिळून पास केलेलं इमिग्रेशन रिफॉर्म बिल पहा:
The measure would not only increase security along the border, but requires a mandatory workplace verification system for employers, trying to ensure no jobs are given to immigrants who are not authorized to work in the United States.
It also includes a new visa program for lesser-skilled workers – the product of negotiations between the U.S. Chamber of Commerce and labor unions. And it shifts the country’s immigration policies away from a family-based system to one that is focused on more on work skills.
अधिक माहिती: https://en.wikipedia.org/wiki/Border_Security,_Economic_Opportunity,_an…
अवांतर - १९८६ साली रेगनच्या कार्यकाळात पास झालेल्या इमिग्रेशन रिफॉर्मने, १९८२ पूर्वी आलेल्या सरसकट सार्या इल्लिगल एलियन्सना ("legalized illegal immigrants" अशी शाब्दिक कसरत करून), जुजबी अटी घालून (candidates were required to prove that they were not guilty of crimes, that they were in the country before January 1, 1982, and that they possessed minimal knowledge about U.S. history, government, and the English language.) सिटिझनशिपचा मार्ग मोकळा करून दिला होता.
जोडीला हे पण वाचून टाका.
माझा मूळ मुद्द्याला धरून = (क्लिंटन बाईंच्या वेबसाईटवरून) - https://www.hillaryclinton.com/issues/plan-raise-american-incomes/
Inequality is a drag on our economy, and to get incomes rising again, we need to renew our country’s basic bargain. With near-record corporate profits and stagnant wages, the deck is stacked against working Americans. If you work hard, you deserve to get ahead and stay ahead.
काय मस्त?
डेमोक्रॅट लोकांप्रमाणे एक बाजू सातत्याने आपली बाजू तार्किकतेने अन विद्यासह मांडत आहे अन ट्रंपप्रमाणे दुसरी बाजू उगाच इररिलेवंट गोष्टीने पाल्हाळ वाढवत आहे. तुमच्यासरख्या काय वाटेल ते मस्त आहे म्हणून वाचणार्या-ऐकणार्या लोकांमुळेच ट्रंपसारख्यांच भावतं!
(सर्वांनी ह.घे. अथवा प्रतिसादांभोवती भिंती बांधून घेणे.)
-इल्लिगल प्रतिसादक
विसंगतींची तुलना
१. तुमचा ओरिगिनल आक्षेप डेमोक्रॅट्सबद्दल होता, त्याला मी उत्तर दिलं. शिवाय कृती > उक्ती (विशेषतः लेबर युनियन्स, बिझनेस लॉबी, एच-१/ग्रीन कार्ड वाल्यांचा दबावगट या सार्यांना एकत्र घेऊन जाणारं कॉम्प्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन बिल), असं मला वाटतं. ज्या रिपब्लिकन हाऊसने, साठहून अधिक वेळा ओबामाकेअरविरोधी युजलेस कायदे पास केले (करदात्यांच्या पैशांतून), अकराहून अधिक बेन्गाझीविषयक कमिट्या नेमल्या (पुन्हा, करदात्यांच्या पैशांतून. एका कमिटीने तर चक्क हिअरिंगच्या आधी वाईन टेस्टिंगही आयोजित केलं होतं) आणि सरकार बंद पाडलं (निव्वळ करदात्यांच्या पैशांतून नव्हे, तर सुमारे २५ बिलियन डॉलर्सचा अधिकचा भूर्दंड) - त्यांना हे बिल आजवर साधं चर्चेसही घेता आलेलं नाही. वर निवडणुका आल्या की 'इल्लिगल मेक्सिकन्स तुमचे जॉब चोरताहेत, ते रेपिस्ट्स आहेत, डेमोक्रॅट्स मतांसाठी त्यांच्याकडे काणाडोळा करताहेत हो!' अशा बोंबा ठोकायला हे मोकळे.
बाकी अमेरिकन क्रॉसरोड्स ही Karl Rove ची सुपर-पॅक असल्याने* (ऑफ कोर्स, मी हा उल्लेख करणार हे तुम्हांला आधीपासूनच ठाऊक होतं. पण हा उल्लेख गब्बरेतर जनांसाठी :)), त्यांचे हे पगारी कामच आहे आणि ते काम, ते चोखपणे पार पाडत असल्याचं दिसतं आहे. त्याबद्दल Karl Rove यांचे अभिनंदन!
२. With near-record corporate profits and stagnant wages, the deck is stacked against working Americans.
--- पुन्हा एकदा: केवळ हिलरीच नव्हे, तर ट्रम्प आणि सँडर्सची कँपेन्स हा मुद्दा मांडत आहेत. त्यातही ट्रम्पच्या दृष्टीने मिडवेस्टातला नॉन-कॉलेज-एज्युकेटेड, श्वेतवर्णीय मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. रिपब्लिकन पक्षाचा बेस (४ जी - गॉड, गन्स, ग्लोबलायझेशन आणि गेज्) आणि त्यांची सोशली मॉडरेट, बिझनेस-फ्रेंडली, कंट्री-क्लब-ड्वेलिंग हुच्चभ्रू विंग (उदा. पॉल सिंगर सारखे बिलियनेर डोनर्स) यांच्यातला विरोधाभास हा अधिक लक्षणीय, अधिक stark आहे. विशेषतः, ट्रम्पच्या उमेदवारीनंतर आणि त्याच्या बेस (ऑर बेसलेस, टेक युअर पिक!) विधानांनंतर ही दुफळी अधिक प्रकर्षाने जाणवते.
१. तुमचा ओरिगिनल आक्षेप
१. तुमचा ओरिगिनल आक्षेप डेमोक्रॅट्सबद्दल होता, त्याला मी उत्तर दिलं. शिवाय कृती > उक्ती (विशेषतः लेबर युनियन्स, बिझनेस लॉबी, एच-१/ग्रीन कार्ड वाल्यांचा दबावगट या सार्यांना एकत्र घेऊन जाणारं कॉम्प्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन बिल), असं मला वाटतं. ज्या रिपब्लिकन हाऊसने, साठहून अधिक वेळा ओबामाकेअरविरोधी युजलेस कायदे पास केले (करदात्यांच्या पैशांतून), अकराहून अधिक बेन्गाझीविषयक कमिट्या नेमल्या (पुन्हा, करदात्यांच्या पैशांतून. एका कमिटीने तर चक्क हिअरिंगच्या आधी वाईन टेस्टिंगही आयोजित केलं होतं) आणि सरकार बंद पाडलं (निव्वळ करदात्यांच्या पैशांतून नव्हे, तर सुमारे २५ बिलियन डॉलर्सचा अधिकचा भूर्दंड) - त्यांना हे बिल आजवर साधं चर्चेसही घेता आलेलं नाही. वर निवडणुका आल्या की 'इल्लिगल मेक्सिकन्स तुमचे जॉब चोरताहेत, ते रेपिस्ट्स आहेत, डेमोक्रॅट्स मतांसाठी त्यांच्याकडे काणाडोळा करताहेत हो!' अशा बोंबा ठोकायला हे मोकळे.
माझा आक्षेप फक्त डेम्स बद्दल होता हे अर्धसत्य आहे.
पूर्णसत्य हे आहे की डेम्स हे एका बाजूला आर्थिक विषमता असल्याची बोंब मारतात तसेच वर्णभेदाची आरोळी ठोकतात व दुसर्या बाजूला परकीयांना त्या आर्थिक विषमतेत राहण्यास प्रेरणा देणारी भूमिका घेतात. Why would a Mexican national risk his/her life and attempt to cross the border (using whatever means) if he knows that there is severe income inequality and वर्णभेद here (अमेरिकेत).
याचे समाधानकारक उत्तर तुम्ही वरच्या प्रतिसादात दिलेले असेलही. पण त्याकडे मला पुन्हा एकदा पॉईंट करा.
--
माझे मत : तुम्ही तार्किक बोलण्याचा आभास निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहात.
हरदासाची कथा
हे तुमचं मूळ प्रॉब्लेम स्टेटमेंटः
एका बाजूला अमेरिकेत वर्णभेद व आर्थिक विषमता आहे असं बोंबलणे व दुसर्या बाजूला इल्लिगल इमिग्रेशन ला Deter न करणे (तिथे मात्र मतांसाठी बोटचेपेपणा करणे) हे अति विसंगत आहे. व हेच नेमके डेम्स करतायत
.
यात, डेम्स दोन विधानं करताहेत (विधान 'अ' आणि विधान 'ब'), आणि ती परस्परविसंगत आहेत - असं आपलं म्हणणं आहे.
यावर मी 'ब' ह्या विधानाचा आळ खोडणारे काही पुरावे दिले. जर विसंगतीच्या आरोपांपैकी एक बाजू लागूच नसेल - तर विसंगतीचं आर्ग्युमेंट ठिसूळ पायावर आधारित आहे, हे स्पष्ट होतं. आता यात कुणाला तार्किक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न वाटत असेल, तर मी 'तू न पहचाने तो ये है, तेरी नजरों का कसूर' या पलीकडे काय बोलणार?
असो. माझ्या बाजूने आता मी ही चर्चा थांबवतो आहे. सॅन डिएगोला आलात की स्कॉच/टकिला/मेस्काल यांच्या सोबतीने पुढे चालू ठेवू :)
एक अनाहूत, आगाऊ (परंतु तरीही प्रेमळ) सल्ला
सॅन डिएगोला आलात की स्कॉच/टकिला/मेस्काल यांच्या सोबतीने पुढे चालू ठेवू (स्माईल)
"डुकराशी चिखलात१ कुस्ती खेळू नये. तुम्ही दोघेही घाण होता, नि डुकराला मात्र त्यात प्रचंड मजा येते." - एक अमेरिकन म्हण.
(संभाव्य एक्सेसिवली बेसिक आक्षेप: डुकरांची बदनामी थांबवा!!!!!!)
..........
१ "दारू प्यायल्याने गटारात लोळायला होते" अशी एक (एक्सेसिवली बेसिक) समजूत आमच्या लहानपणी प्रचलित होती. पुढे मोठे झाल्यावर त्यात फारसे तथ्य नाही हे स्वानुभवाने लक्षात आले, परंतु ती गोष्ट वेगळी. असो. स्कॉचटेकिलादींच्या साथीचा ज़िक्र केलात, त्यावरून हे (उगाचच) आठवले. (तसेही, स्कॉच/टेकिला+गब्बर हे कॉकटेल अंमळ घातकच नव्हे काय?)
<नंदन मोड सुरु> डेम्स हे
नंदन मोड सुरु> डेम्स हे जेनेटिकली मॉडिफाईड टू नेव्हर बीइंग duplicitous असतात. बाकीचे (म्हंजे रिपब्लिकन्स, लिबर्टेरियन्स) हे duplicitous शिवाय दुसरे काही असूच शकत नाहीत. duplicitous हे विशेषण फक्त यांच्यासाठीच जन्माला आले. नंदन मोड समाप्त>
डेम्सबद्दल कल्पना नाही, परंतु उर्वरित दोघांबद्दल जर बोलायचेच झाले (कशासाठी? बोले तो, गरजच काय?), तर कदाचित ढोबळमानाने असे म्हणता येईल, की The principal difference between Republicans and Libertarians is that Republicans are wolves in wolf's clothing.
(संभाव्य अतिबेसिक आक्षेप: लांडग्यांची बदनामी थांबवा!!!!!!)
(आणि डेम्सबद्दलच बोलायचे, तर तेदेखील काही फार ग्रेट आहेत, असा दावा मुळीच नाही. परंतु They are the far lesser evil. बोले तो, ते काही फार मोठे भव्यदिव्य करतील अशी अपेक्षा मुळीच नाही. परंतु अगोदरच लागली आहे त्याहून अधिक वाट (निदान रिपब्लिकनांच्या आडमुठ्या मदतीशिवाय, स्वकर्तबगारीच्या बळावर तरी) लावणार नाहीत, एवढीच माफक आशा आहे. असो चालायचेच.
धन्य!
धन्य आहात! सा.न. स्विकारावा!
४-५ गुलाम राबवायला असतील घरी तर किती मज्जा येइल मला.
- उत्तरातील आत्मविश्वासावरती आणि खटकेबाजीवरती फिदा आहे
काय ट्रंपच्या झनानखान्यात दाखल व्हायचा विचार आहे की काय तुमचा ? (डोळा मारत)
- प्रतिसाद अनावश्यक तसेच वैयक्तिक व चीप वाटला. निषेध नोंदवते.
@रुची,
मी गुलाम होणार नाही हा अनुचा आत्मविश्वास मला जबरी वाटला. ४-५ गुलाम ठेवेन या वाक्याला मी म्हटले आहे की मी या वृत्तीशी सहमत होइनच असे नाही.
ट्रंप आला तर ब्राऊन लोक गुलामच करेल असेच वाटते आहे :(
___
जनानखाना वाले वाक्य अनावश्यकच वाटले. हेदेखील खरे आहे
________
यात विसंगती कुठे आहे मला कळले नाही?
पण गुलामगिरीचे मी समर्थन
पण गुलामगिरीचे मी समर्थन केलेच नाही मी म्हटले आहे की या वृत्तीशी मी सहमत नाही.
___
अनुने गाय मारलीये (कबुल आहे. गुलामगिरीचे समर्थन करुन तिने गाय मारली आहे) ज्याचे मी अज्जिबात समर्थन केलेले नाही. पण म्हणून वासरु मारावे याचेही समर्थन मी करु इच्छित नाही.
नाही नाही "मी गुलाम होणार
नाही नाही "मी गुलाम होणार नाहीच" हा आत्मविश्वास मला कुल वाटला साहेब :)
कारण परत तेच ट्रंप्या आला तर तेजायला मला गुलाम व्हायची भीती वाटते :(
____
अनु आणि गब्बर यांनी सांपत्तिक सुस्थितीचा दबदबा जरुर निर्माण केलाय. गब्बर सारखे म्हणत असतात की फडतूसांना चिरडा म्हणजे ते फडतूस नसून धनिक असावेत अशी शंका रास्त ठरते. अनुराव म्हणतात सबसिडी दिली तर त्या पाच पाच फ्लॅटसही घेतील.
हे जे इमेजप्रोजेक्शन आणि आत्मविश्वासी दिखाऊपण आसतो तो मला ज्याम कुल वाटतो कारण आम्ही नेभळट आका रडतराऊ. कधीच काही प्रोजेक्ट करता न येणारे :(
जाऊ देत हे फार वैयक्तिक होत असल्याने इत्यलम.
उलटपक्षी...
गब्बर सारखे म्हणत असतात की फडतूसांना चिरडा म्हणजे ते फडतूस नसून धनिक असावेत अशी शंका रास्त ठरते ... हे जे इमेजप्रोजेक्शन आणि आत्मविश्वासी दिखाऊपण आसतो तो मला ज्याम कुल वाटतो
उलटपक्षी, अशा इमेजप्रोजेक्शनची गरज लक्षात घेता, ते स्वत: फडतूस (किंवा गेलाबाजार फडतूस ब्याकग्रौण्डातून आलेले) धनिक-वॉनाबी असावेत, अशी शंका उद्भवू लागते. असो.
+
तसेही, ट्रम्पला गाढव म्हणणे हे तात्त्विकदृष्ट्या चुकीचे असावे. ट्रम्पने इतक्यात पक्षांतर केल्याचे ऐकिवात तरी नाही.
या हिशेबाने उद्या कोणी हिटलरला झायॉनिष्ट, जीनांना हिंदुत्ववादी किंवा गब्बरला कम्युनिष्ट म्हणेल!
हं, आता ट्रम्पला कोणी हत्ती म्हटले, तर गोष्ट वेगळी. ते बहुधा (तूर्तास तरी) ठीकच राहावे. (यात हत्तींच्या बदनामीचा प्रश्न उद्भवत नाही. हत्ती अलीकडे तसेही स्वकर्माने बदनाम आहेत.)
(शिवाय, ट्रम्पची बोटे आखूड आहेत, गाढवांची लांबलचक असतात, हा सूक्ष्मभेदही आहेच. पण ते एक असोच.)
काय सांगता!
लहानपणी नारायण पेठेत (किंवा फॉर द्याट म्याटर कोठेही) कन्स्ट्रक्शनवरची लायनीने चाललेली ओझीवाहू गाढवे पाहिली नाहीत काय कधी?
पैकी मध्येच एखाद्या गाढवाचे बोट अचानक लांबच लांब व्हायचे, नि मग तेथेच भर नारायण पेठेत जागच्या जागी... असो. (त्याच्यापुढची गाढवीण असल्यास सोन्याहून पिवळे, एवढेच नमूद करून तूर्तास गप्प बसतो. तसेही पॉर्न विशेषांक तूर्तास संपलेला आहे.)
मोठे मनमोहक, दिलखेचक दृश्य असे ते!
(अतिअवांतर: एरवीच्या वेळी ते बोट 'गुलदस्तात असायचे' असे म्हणता येईल काय?)
चाईल्ड मोलेस्टर
>>> इथे चोर्या दरोडे अन रेप करायला येतात वगैरे रोज स्टेज वर जाऊन बोंबलणे
--- पण यात चूक काय आहे, आजच अॅरिझोनात एकाला चाईल्ड मोलेस्टेशनच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक केली!
(ऊप्स! हा तर चक्क सीमेवर बंदूक घेऊन शायनिंग मारणार्या मिनटमॅन संघटनेचा सदस्य, नव्हे संस्थापक सदस्य दिसतोय!! मेक्सिकन निघाला असता तर आत्तापर्यंत मीडियाने बातमी पैल्या पानावर छापली असती. वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडिया!)
ट्रम्पः a force emanating from the collective American id
we could see Trump as having emerged from our collective id, the part of the unconscious that is the fount of the instincts, and that expresses itself impulsively and without the mediation of reason.
Their origin in unconscious id processes is what gives Trump’s remarks their undeniable sense of authenticity— their truth-effect. It also explains their unpredictability, their forcefulness, and the way they disrupt and outrage common sense and decency. Trump’s critics argue that he seems thoughtless and unreflective but that is precisely the source of his power. The impression Trump conveys of being out of control— but also uncontrollable— is better seen as a force emanating from the collective American id than as the babblings of an individual.
http://www.huffingtonpost.com/eli-zaretsky/american-id-freud-on-trum_b_…
नंदन आणि गब्बर सिंग यांची
नंदन आणि गब्बर सिंग यांची चर्चा १० वेळा वाचल्यानंतर असे काहीसे वाटले की -
(१)ओबामा व डेम्स हे इल्लिगल इमिग्रेशनच्या विरोधात आहेत.
(२)पण हिलरी मॅडम ज्या डेम्स चे प्रतिनिधीत्व करतात त्या मात्र इल्लिगल इमिग्रेशनच्या विरोधात नाहीत.
म्हणजे उमेदवारांना (हिलरी)आपल्या आपल्या पक्षाच्या (डेम्स) पॉलिसीज आपल्या स्वतःच्या मताप्रमाणे कस्टमाइझ करता येतात का?
_____
हिलरीचा इल्लिगल इमिग्रेशनला विरोध नाही .................... हे गब्बर मांडतात
डेम्स चा इल्लिगल इमिग्रेशनला विरोध आहे........................हे नंदन मांडतात.
__________
यात मला दोघांचेही बरोबर वाटते आहे, विसंगत वागतेय ती हिलरी - असे एकंदर दिसतेय.
लॅरी समर्स हे रघु राजन ना
लॅरी समर्स हे रघु राजन ना लुड्डाईट म्हणाले होते असा काहीतरी संदर्भ आहे त्या सिनेमा मधे - असं आठवतंय.
--
इनसाईड जॉब पाहिल्यावर वाटलं की काय फरक पडतो रिपब्लिकन्स आले काय अन डेमोक्रॅट्स आले काय. सत्तेची सूत्र वॉलस्ट्रीटच्या यासारख्या बड्या धेंडांकडेच असतात.
तसे असणेच योग्य आहे.
अतिसामान्यांच्या हाती सत्ता दिली की व्हेनेझुएला, सोव्हिएत युनियन, क्युबा होतो.
कालच्या हल्ल्यानंतर अमेरिकन
कालच्या हल्ल्यानंतर अमेरिकन समाज अधिक घाऊक द्वेष्टा होणार
तिथे भयंकर असहिष्णुता आहेच - होतीच.. आता त्यातही वाढ होणार
अर्थात त्याचा फायदा ट्रम्पला होणार.. एक मध्यममार्गी ओबामाची पाठराखी स्त्री गोर्या, धनाढ्य, सर्वद्वेष्ट्या पुरुष उमेदवाराला हरवू शकेलसे वाटत नाही. अमेरिकन समाज तेवढा प्रगल्भ नाही.
तो मारणारा माथेफिरू वगैरे
तो मारणारा माथेफिरू वगैरे नव्हता. अश्या लोकांना बंदुका मिळवणे काहीच अवघड नव्हते. अमेरीकेत अगदी बंदुका विकायला , बाळगायला परवानगी नसती तरी ह्यानी मशिनगन मिळवलीच असती. त्यामुळे बंदुकांच्या वर आरोप घालणे म्हणजे टीपिकल क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष आहे, जे समोर उघडउघड दिसते आहे ते सोडुन फाटे फोडत बसणे.
आज सकाळी ऐकले की आयसिस नी जबाबदारी घेतली आहे ( कुठे पेपर मधे दिसले नव्हते, पण रेडीओ वर ऐकले ).
त्या व्यक्तीने काहि
त्या व्यक्तीने काहि दिवसांपूर्वी दोन गे व्यक्तिंना एकमेकांचे चुंबन घेताना व स्पर्श करताना पाहिले आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मुलानेही ते पाहिले - त्याच्या मते पहावे लागले याबद्दल तो प्रचंड वैतागला होता असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्याची एरवी मते टोकाची असतीलही पण या घटनेत धर्म किती प्रमाणात आहे हे अजुन माहित नाही.
इन आयदर केस, अमेरिकेने बांगलादेश होण्याकडे आणखी एक पाऊल टाकलेय असे म्हणावे लागेल. :(
बाकी हे निवडणुकांच्या इतक्या जवळ घडल्याने ट्रम्प क्यांपला आता बारा 'हत्तीं'चे बळ आले असेल
इन आयदर केस, अमेरिकेने
इन आयदर केस, अमेरिकेने बांगलादेश होण्याकडे आणखी एक पाऊल टाकलेय असे म्हणावे लागेल.
बांगलादेशात मायनॉरिटी हिंदूंवर अत्याचार होतात. अमेरिकेत मायनॉरिटी मुसलमानांवर अत्याचार होतात का? इथे तर उलटी मिसिसिपी आहे. त्यामुळे बांगलादेश वगैरे उपमा मिस्प्लेस्ड आहेत.
बांगलादेशात गे असण्यामुळे
बांगलादेशात गे असण्यामुळे किंवा त्याचे समर्थन केल्याबद्दल मारले जाते, उदारमतवादी ब्लॉगर्सची हत्या होते. अमेरिकेतही काही वेगळे घडले नाही एका होमोफोबिक व्यक्तीने गे क्ल्ब मध्ये घुसून लोकांना मारले. :(
जर हा खरोखर प्लान्ड दहशतवादी हल्ला असेल तर अर्थातच माझी उपमा मिस्लेस्ड आहे. पण धार्मिक कारणाने तो गे क्लबात का गोळीबार करेल समजत नाही.
शिवाय अनेक बातम्या व त्या व्यक्तीचे परिचित त्याच्या होमोफोबिक नेचर कडे निर्देश करत आहेत. ख.खो. काय ते समजायला थोडा काळ जावा लागेल
Sharia: homosexuality is punishable by death
Islam goes beyond merely disapproving of homosexuality. Sharia teaches that homosexuality is a vile form of fornication, punishable by death.
(Beneath the surface, however, there are implied references to homosexual behavior in paradise, and it has been a historical part of Arab and Muslim culture.)
अरब लोकांना समलैंगिक संभोग
अरब लोकांना समलैंगिक संभोग वर्ज्य नव्हता. आत्ताच गौरी देशपांडेंनी अनुवादित केलेल्या अरेबिअन नाईट्सचे काही खंड वाचले. समलैंगिक संभोगाच्या /प्रणयाच्या कित्तीतरी ष्टोर्या आहेत. शेख नफझवीचं 'The Perfumed Garden' वाचायचं आहे आता. हे अरबी कामसूत्र ;) यातपण गे सेक्सचं वर्णन आहे म्हणे.
कशाला ना मग?
वाचीव माहिती: त्या माथेफिरूच्या कलिगने कंपनी मॅन्जेमेंटकडे याच्या टोकाच्या भुमिकांबद्दल तक्रार केली होती. भावना दुखवायच्या नाहीत म्हणून काही कारवाई केली नाही. ख.खो.दे.जा
दोन वेळा एफबीआयने चौकशी केली होती त्याची. उगाच भावना दुखवायच्या नाहीत वगैरे सेंटी कशाला?
हेच आणि...
दोन वेळा एफबीआयने चौकशी केली होती त्याची.
हेच लिहायला आले होते. एफबीआयनेच 'हा इसम धोकादायक नाही' असं प्रमाणपत्र २०१३ सालातल्या घटनेनंतर दिल्याचं आज बातम्यांत सांगत होते.
त्याच वाहिनीवर (एनबीसीचा टुडे शो) ट्रंपोबांची मुलाखत झाली. ट्रंपोबांनी तक्रार केली की लोक आजूबाजूचे लोक संशयास्पद वागतात ह्याचं रिपोर्टिंग करत नाहीत. म्हणजे नागरिकांनी आपसांत मारामाऱ्या करायला, परस्परांवर अविश्वास वाढवायला पद्धतशीरपणे सुरुवात झालेली आहे ट्रंपोबांची.
बाकी हिलरीची धोरणं, मतं, विचार, कृती काही का असेना; किमान ती असॉल्ट रायफली, शिकारींसाठी न वापरल्या जाणाऱ्या बंदुकांवर बंदी आणावी असं आता म्हणत्ये.
बाकी काही असो पण ट्रंपोबांनी
बाकी काही असो पण
ट्रंपोबांनी तक्रार केली की लोक आजूबाजूचे लोक संशयास्पद वागतात ह्याचं रिपोर्टिंग करत नाहीत. म्हणजे नागरिकांनी आपसांत मारामाऱ्या करायला, परस्परांवर अविश्वास वाढवायला पद्धतशीरपणे सुरुवात झालेली आहे ट्रंपोबांची.
संशयास्पद वागण्याचं रिपोर्टींग म्हणजे परस्परांवर अविश्वास दाखवणं हे आज नवंच कळलं. जगभरातले पोलीस उग्गाच नागरिकांना सजग राहायला सांगतात , रेल्वेतहि सूचना लिहिल्या असतात.
ट्रम्पला धोपटायला अनेक बाबी आहेत. तो म्हणेल ते धोपटायचं असं करून हिलरी समर्थक आपलेच अज्ञान दाखवत असतात त्याचाच हा नमूना.


हे वाचा.
In reply to http://www.americanactionforu by .शुचि.
हे वाचा.
चीन ज्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरींग करतो आहे त्यापेक्षा कितीतरी क्लिष्ट असं high-value added मॅन्युफॅक्चरिंग अमेरिकेत होते. पण निवडणूकांमधे ह्या प्रकारच्या जॉब्स असलेल्या/गमावलेल्या लोकांचे मताधिक्य नसते.