दहशतवाद विरोधासाठी अमेरिकेने भारताकडून काय शिकावे?
http://theweek.com/articles/630723/what-america-could-learn-from-india-…
प्रत्येक गर्दीच्या ठिकाणाने (मॉल, थिएटर , संस्था इत्यादी ) आपली स्वतःची सुरक्षा यंत्रणा उभारावी: सरकारवर अवलंबून राहू नये . सरकार इतक्या प्रचंड आव्हानांना पुरे पडू शकत नाही .
To that end, liberal
To that end, liberal suggestions to ban assault weapons and impose other gun restrictions are truly benighted — not to mention atavistic. They also run counter to the strategy that Israel, the country with long and bitter experience dealing with the kind of terrorism that is only now fully maturing in America, has opted for.
Israel requires all its active duty soldiers — men and women — to carry their weapons and ammunition at all times, even when out on personal business. The idea is that terrorists can strike anywhere, anytime, and government cannot (and should not) be omnipresent, protecting every individual at every time. What is true for a tiny country like Israel is doubly true for an enormous one like America. To be sure, Israel has stringent civilian gun ownership regulations, but the relevant point is that the government doesn't zealously guard its monopoly on providing security.
इस्रायल मधे गन कंट्रोल कायदे कठोर आहेत. पण तरीही दहशतवादी हल्ले होतात. हे लक्षणीय आहे. अर्थात इस्रायल हे छोटे राष्ट्र आहे व त्यांचे शत्रू (फिलिस्तीनी लोक) अगदी त्यांच्यामधे काही प्रमाणावर घुसलेलेच आहेत. (इस्रायल विरोधक उलटे म्हणतील - की इस्रायल फिलिस्तीन मधे घुसलेला आहे) त्यामुळे फिलिस्तिन्यांना दहशतवादी कारवाया करणे सोपे जाते. पण इस्रायल-पॅलेस्टाईन चे भौगोलिक मुद्दे मान्य केले तरीही इस्रायल विरुद्ध झालेले हल्ले हे अमेरिकेपेक्षा व (कदाचित) भारतापेक्षा जास्त आहेत. व तेसुद्धा बाँब वापरून (की जे सर्वत्र प्रतिबंधित आहेत) व आत्मघाती पथके वापरून. त्यामुळे इस्रायल चे उदाहरण किमान शिकण्यासाठी तरी जरूर वापरले जावे.
अमेरिकेत काही ठिकाणी म्हणे
अमेरिकेत काही ठिकाणी म्हणे ओपन कॅरी नावाचाही प्रकार आहे. उघडपणे बंदूक बाळगण्याच्या हक्कासाठी "प्राऊड गन ओनर्स आर स्टँडिंग देअर ग्राऊंड".
मग अशा लोकांपैकी धोकादायक लोक कसे ओळखणार? भारतात आर्म्ड गार्ड्स आणि मेटल डिटेक्टर वगैरे असतात मॉल्स, हॉटेल्समध्ये असं लेखिका म्हणते; पण उघडपणे बंदूक घेऊन हिंडणार्या माणसाचा हेतू ओळखायला मेटल डिटेक्टरचा काय उपयोग? लाय डिटेक्टर लागेल तिथे.
ओरलॅन्डोच्या क्लबमध्येही मारेकरी मशिनगन घेऊन गेला. मशिनगन काही खिशात बाळगायची गोष्ट नाहीय. ती तो उघडपणेच घेऊन गेला. आता त्या क्लबच्या दारात दोन आर्म्ड गार्ड्स आणि मेटल डिटेक्टर असता तरी मशिनगनपुढे आणि अचानक होणार्या हल्ल्यापुढे त्यांचा काय पाड?
ह्या बाईने साधी मारामारी तरी बघितली आहे की नाही शंकाच आहे. गनफाईट तर लांबच राहिली. कोणत्याही ॲसॉल्टमध्ये इतके व्हेरिएबल्स असतात की लोकांकडे बचावासाठी गन्स आहेत की नाहीत हा अत्यंत किरकोळ मुद्दा ठरतो. हल्लेखोराकडे कोणतं हत्यार आहे त्याने मात्र खूप फरक पडतो; कारण हल्ल्याची सूत्रे हल्लेखोराकडे असतात आणि बचाव करणार्यांना ती त्याच्याकडून मिळवावी लागतात. सर्वसाधारणतः लोकांकडे बंदूक नसणे आणि ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे संशयाने पाहणे हा सर्वात जास्त सुरक्षित मार्ग आहे.
मध्यंतरी शाळेत झालेल्या हल्ल्यानंतर डिस्कव्हरीवर एक कार्यक्रम पाहिला. त्यात शिक्षकांना बंदुका दिल्या तर प्रश्न सुटेल का याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता. काही कमांडोजच्या मदतीने हल्ल्याचे नाटक उभे केले आणि कार्यक्रमाच्या ॲंकरकडे खोटी बंदूक देऊन त्याला प्रतिकार करायला सांगितला. शाळेच्या इमारतीत हल्लेखोराचा "प्रतिकार" करताना त्या ॲंकरने दोन-चार मुले व एक शिक्षिका मारली पण हल्लेखोराला तो मारु शकला नाही. आणि हे सगळं ती चकमक खोटी आहे हे त्याला माहित असताना!
अर्थात बिनडोक लोकांना हे कधीच समजणार नाही. वर्षाला किमान चार-पाचतरी घटना अशा घडतात ज्यात घरातली बंदूक लहान मुलाच्या हातात लागल्याने त्याचा किंवा घरातल्या कोणाचातरी अपघाती मृत्यु झाला आहे. तरीही "गन्स डोन्ट किल" असं म्हणणारे महाभाग स्वतःच्या बौद्धिक उजेडात निथळत राहणार.
मिलीन्दजी
एक नम्र विनंती आहे
कृपया धाग्याच्या विषयासंदर्भात थोडी तरी प्रस्तावना भुमिका माहीतीपर किमान१०-१२ ओळी तरी लिहीलेत तर बरे होइल. त्याने विषय कळतो लेखकाची भुमिका कळते.
प्रतिसादातुन एकेक मुद्दा चर्चेच्या अनुषंगाने विस्तार मान्यच आहे.
मात्र थोडं तरी किमान थोड तरी विस्तार करुन चर्चा विषय मांडला पाहीजे असे वाटते. काही कविता लघुकथा किमान शब्दात कमाल आशय असे असेल तर गोष्ट वेगळी आहे मात्र चर्चेच्या विषयाला थोडा तरी विस्तार आवश्यक आहे.
हफ्त्या हफ्त्या ने प्रतिसादात सर्व येतच मात्र
आखिर डाउन पेमेंट भी तो कोइ चीज होती है.
प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन भी तो कोइ चीज होती है.
मागच्या लेखात किमान ५ मुद्दे होते १०-१२ ओळी होत्या
आता दोनच ओळी पुढच्या वेळेस फक्त एखादीच ओळ
मग एकच शब्द मग एकच अक्षर मग टींब
बघा मला आपल एक वाटल म्हणुन बोललो.
साठमारी
कृपया धाग्याच्या विषयासंदर्भात थोडी तरी प्रस्तावना भुमिका माहीतीपर किमान१०-१२ ओळी तरी लिहीलेत तर बरे होइल. त्याने विषय कळतो लेखकाची भुमिका कळते.> असे मारवा म्हणतात.
मला वाटते धागाकर्त्याला एकोळी आणि काहीहि स्वतःचे नसलेला धागाच सुरू करायचा आहे. त्यातून निर्माण होणारी साठमारी बघणे आणि आपल्या लेखनातून हे शतकी-द्विशतकी धागे सुरू झाले हे चार चांद मिळवून त्यांचा आनंद घेणे हा धागाकर्त्याचा मूळ हेतु असावा असे मला वाटते. सर्व प्रतिसादक ह्या सापळ्यामध्ये आपखुशीने शिरत आहेत.
असहमत
त्यातून निर्माण होणारी साठमारी बघणे आणि आपल्या लेखनातून हे शतकी-द्विशतकी धागे सुरू झाले हे चार चांद मिळवून त्यांचा आनंद घेणे हा धागाकर्त्याचा मूळ हेतु असावा असे मला वाटते.
धागालेखकाशी माझा संपर्क इतर सोशल संसाधनांवरून गेले वर्ष-दीड वर्षं आहे. त्या अनुभवावरून वरील विधानांशी आणि धागालेखकावरच्या अप्रामाणिकतेच्या आरोपाशी मी असहमती व्यक्त करू इच्छितो.
पण त्याच बरोबर धागा सुरू करताना विस्तृत भुमिका- किमान चर्चेची आखणी करता येईल- इतके लिहावे या मारवा यांच्या आवाहनाशी सहमती व्यक्त करतो. अन्यथा, ही बातमी वाचली का वगैरे धागे ऐसीवर आहेतच, तेथे असे दुवे देण्याची सोय वापरावी.
- एअरपोर्टवर चेक इन बॅगांचं
- एअरपोर्टवर चेक इन बॅगांचं एक्सरे स्कॅनिंग ही भारतातील पद्धत अमेरिकेत मी असेपर्यंत तरी नव्हती. ती मला सुरक्षेच्या दृष्टीने चांगली वाटते.
- दंगली थांबवायच्या भिवंडी पॅटर्नचा अभ्यास करणे. ज्या कम्युनिटीजमध्ये हेट्रेट आहे त्यांची एकमेकांवर आर्थिक डिपेन्डन्सी इतकी वाढवणे की त्यांना एकमेकांशिवाय सस्टेन करणे कठीण व्हावे. याने दंग्यांवर बरीच रोख लागते, एकमेकांशी सतत संपर्काने अधिक ओळख होऊन ट्रम्पीय बागुलबुवाला जागा कमी रहाते.
भारताने अमेरिकेकडून शिकायच्या गोष्टी शिकवायला इथे सतत येणारे एनाराय आहेत. त्यांचे कान किटेस्तोवर उसन्या मायदेशाचे चाल्लेले कवतिक (शी बै इथे किती धुळ, इथे किती 'अन्हायजेनिक'ए, इथे किती.....)ऐकून त्या देशाबद्दल गोष्टी भारतीय शिकतच असतात. ;) उलट शिक्षणाची गरज अमेरिकेला आहे हे शतशः मान्य! :प
मुंब्रा हे मुस्लिम घेट्टो
मुंब्रा हे मुस्लिम घेट्टो म्हणून प्रसिद्ध आहे. आजही मुंब्र्यात फिरले तर मुस्लिम तोंडवळा प्रकर्षाने दिसतो. परंतु गेल्या काही वर्षांत मुंब्र्यामध्ये मोठ्याप्रमाणात हिंदू लोक रहात आहेत. तोंडवळा मुस्लिम राहिला तरी मुंब्रा हा आता मुस्लिम बहुल भाग राहिला नसावा.
माझ्या माहितीनुसार होय. अधिक
माझ्या माहितीनुसार होय. अधिक तपशील एका व्यक्तीला विचारून मिळाताहेत का बघतो
गेल्या निवडणुकीतले आपचे उमेदवार संजीव साने यांच्या एका उत्तरात आलेली या प्रयोगाबद्दलची माहिती इथे
तुम्ही कधी सुरेश खोपडेंशी बोललात, तर तुम्हांला भिवंडीतल्या मोहल्ला समितीबद्दल कळेल. त्यांनी भिवंडीत मोहल्ला समितीचा प्रयोग केला. भिवंडीमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. तुम्ही कितीही परिणामकारक काम केलंत, तरी त्या रचनेमुळे तो ताबा एका समाजाकडून दुसर्या समाजाकडे जाणं शक्य नाही. हे वास्तव लक्षात घेऊन खोपड्यांनी एक वातावरण निर्माण केलं. तिथे राहणारा जो जैन, मारवाडी, तथाकथित हिंदू समाज आहे, त्याला त्या भिवंडीच्या वातावरणामधे एक सस्टेनेबिलिटी मिळत राहील, एक विश्वासाचं वातावरण तयार होईल आणि त्या प्रक्रियेला तिथल्या मुस्लिम स्थानिक कारागिरांची आणि नेत्यांची मान्यता असेल; ते आणि पॉवरलूम सेक्टरमधले मालक असे दोघे मिळून एकत्र धंदा करतील अशी रचना करण्याचं काम त्या मोहल्ला समितीनं केलं. तेव्हापासून तिथले दंगे बंद झाले. म्हणजे ही आपापत: घडलेली गोष्ट नाही मुळामध्ये. सु्रेश खोपडे डाव्या चळवळीमधून आलेले असल्यामुळे त्यांचं लक्ष केवळ ’सामूहिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित करा, म्हणजे एकत्रित काहीतरी होईल’ इतक्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळे ते इतकं सस्टेनेबल झालं. १९८४ च्या दंगलीनंतर भिवंडीत एकही दंगा नाही. १९९२ ला जेव्हा देशभर दंगे झाले, तेव्हा भिवंडी शांत होती. अगदी आनंद दिघे असतानासुद्धा भिवंडी शांत होती. त्या वेळी ठाणंसुद्धा शांत होतं. बेलापूर पट्ट्यातसुद्धा काही झालं नाही
हो. एक खोपडे नावाचे अधिकारी
हो. एक खोपडे नावाचे अधिकारी होते त्यांनी हे प्रयत्न केले आहेत.

(No subject)
:)