ग्लॅमर्/सौंदर्य
हा फोटो खफवर टाकला आहे.
माझी कमेन्ट -
हे असे फोटो पाहीले की मला ना खरच एस्थेटिक ऑर्गॅझम येतं.
.
अदितीची कमेन्ट -
एस्थेटिक ऑरगॅझम - बागकाम करणार्यांचे हात असे दिसत नाहीत.
.
माझी कमेन्ट -
बागकाम न करणार्या अनेक जणांचे हातही असे नसतात.
______________________
माझ्या मते प्रत्येक गोष्ट ही वास्तवतेच्या निकषावरती घासून पहायची नसते. कल्पनेत रममाण होण्याची, फॅन्टसीही मूलभूत गरज असते. तलवारीच्या जागी तलवारच आणि सुईच्या जागी सुईच हवी. सूर्य जसा नको ते, हवे ते सर्वाचेच प्रदर्शन मांडतो तद्वत चंद्र हा सर्व चराचराला, हार्श वास्तवतेला एक सॉफ्ट ग्लो देतो. जितका दिवस महत्वाचा तितकीच रात्रही महत्वाची. ऊन हवे तशीच सावलीही हवी. कदाचित फेमिनिस्ट व्यक्तींचा हा आक्षेप असू शकतो की स्त्रियांनीच सौंदर्य , बाहुलीपण मिरवण्याचा मक्ता घेतलेला आहे का? पण मग मला असे वाटते की स्त्रिया आपणहून नाही का ही लाइफस्टाइल स्वीकारत. हां अन्य सामाजिक दबाव येतात हे मान्य , किंबहुना असे फोटो अतिरेकी अपेक्षा निर्माण करतात, असंतोषास कारण बनतात. हे काही अंशी खरे आहे. आरोग्यापेक्षा मॉडेल्सारखी झिरो फिगर आणण्याचा अट्टाहास, नवर्यांची बायकोकडून ट्रॉफी वाइफ,बाहुली दिसण्याची अपेक्षा या घटना आढळतात. पण त्याचे खापर सौंदर्याच्या माथ्यावर जाते की या अनेन्लायटन्ड लोकांच्या मानसिकतेस जाते?
______
मला गुलाबी रंग आवडत नसे, किंबहुना मी काही फालतू लेख वाचले होते ज्यात गुलाबी रंगावर ती आवडणार्या लोकांवर विखारी टीका केलेली होती. हा रंग बराचसा डंब समजला जातो. तसाच हा रंग फेमिनाइनही समजला जातो. But I have come around a round circle. हा रंग मला अतिशय आवडतो.
.
___
प्रत्येक क्षेत्रात कष्ट करणार्या लोकांना आदर दिला जातो. डिग्निटी दिली जाते. पण शरीर सुंदर दिसण्यासही अमाप कष्ट व शिस्त लागते हे कोणीच लक्षात घेत नाही. किंबहुना उपहासच केला जातो. हा काहीजणांचा आकसातून असतो, काहींचा स्त्रीमुक्तीवादातून असतो तर काहींचा चूकीच्या समजूतींतून असतो. खालच्या फोटोमधली मॉडेलच घ्या. तिने पापण्याचें खोटे केस लावले आहेत म्हणून तुम्ही आक्षेप घेणार की इतक्या प्रखर प्रकाशझोतात एक क्षण का होइना तिने डोळा सताड उघडा ठेऊन, भिंगातून कॅमेर्याकडे पहात एक प-र-फे-क्ट शॉट दिला म्हणुन कौतुक करणार? मॉडेल्स ना महाभयंकर कष्ट असतात ही फॅक्ट आहे.
____
आणि एवढं बोलूनही मी शेवटी पुरुषांच्या सुपरफिशिअल स्वभावाला नावे ठेवतेच ;) पण त्याचे कारण या अशा ग्लॅमरस फोटोंतून प्रतीत होणारे स्टँडर्ड हे पुरुष डे टु डे आयुष्यात इम्पोझ करण्याचा प्रयत्न करत बसतात. जे भयंकर फ्रस्ट्रेटिंग (त्रासदायक) होते. कला ही मनाला विसावा देण्यासाठी असते, ती परफेक्ट असते. हे परफेक्शन रोजच्या आयुष्यात साधणे कसे शक्य आहे? किंबहुना खर्या आयुष्यात काहीच्च परफेक्ट नसते. अतोनात तडजोड व फ्रस्ट्रेशन असते आणि म्हणुन तर कलेच्या विसाव्याची गरज असते.
_____
अदितीची लेटेस्ट कमेन्ट -
बागकामाचा संदर्भ मुद्दाम वापरला कारण बागकाम करणं म्हणजे सेंद्रिय गोष्टींशी प्रत्यक्ष संपर्क असणं. ह्याउलट मेकपचे थर चढवणं = प्लास्टिक/असेंद्रिय (किंवा कचकड्याचं).
हा निसर्गाचा विनाश ही कन्सर्न (भूमिका) असू शकते हे मान्य आहे मला. पण मग बागकाम करताना रबरी हातमोजे न वापरल्याने गँगरिन होते याउलट हाताला नेलपॉलिश लावल्याने होत नाही अशी वडाची साल पिंपळाला मीही लावू शकते.
.
देवाने जर मला चॉइस दिला असता की तू आरोग्य अथवा सौंदर्य अथवा बुद्धीमत्ता यापैकी कशाची अॅम्बेसिडर बनशील तर मी सौंदर्य निवडले असते : ) याचा अर्थ असा नाही की अन्य दोन पर्याय नकोत किंवा कस्पटासमान आहेत . याचा अर्थ हा की जे कोणी सौंदर्यास प्रतिष्ठा मिळवुन देतात ते मला अतोनात आदरणीय वाटतात. (नक्की माझी शुक्र महादशा हे बोलते आहे. अजुन २० वर्षे आहे. ट्रा ला ला!!)
.
फोटो - नेटवरुन साभार
'च्रटजी किती सुंदर प्रतिसाद
अचरटजी किती सुंदर प्रतिसाद दिलात. खूपच आवडला.
.
अजुन एक मुद्दा शनि जो की कठोर शिस्त व कर्तव्यपालनाचा कारक असतो तो तूळेत (शुक्राची अर्थात सौंदर्याची रास) उच्चीचा असतो. शनिसारख्या खत्रुड, कडक वृद्धासही सौंदर्याची रास आवडते आणि तिथे तो त्याची संपत्ती उधळून देतो :) नक्कीच सौंदर्य आणि शिस्तीचा काहीतरी संबंध आहे.
होय हे खरे आहे. टोटली
होय हे खरे आहे. टोटली अॅग्री. हा मुद्दाही खूप मोलाचा आहे. म्हणुन मला खरं तर भेदभाव करायचा नव्हता. कारण तीनही महत्त्वाचे आहेत. आणि कल्पनेत कंजुषी कशाला? पण सौंदर्यास हायलाईट करण्यासाठी मी ती उतरंड रचली.
.
माझे तर मत आहे सौंदर्य टिकवण्यासाठीही एक प्रकारच्या बुद्धीची, इनसाईटफुल्नेस ची आवश्यकता असते. वाट्टेल ते खाल्ले प्याले, वागले तर थोडीच सौंदर्य टिकतं? निसर्गदत्त गोष्टींचा साधारण तीशीपर्यंत मुलामा असतो, त्यानंतर तुमचे कॅरेक्टर व शिस्त साफ दिसून येते.
नखाचीही सर नाही.
पहिल्या फोटोत मला नावडण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत; पण ते असो. नावडलेल्या गोष्टींबद्दल किती लिहायचं! त्या हातात, चित्रकारांच्या, रंगांच्या, जरा वापरलेल्या ट्यूबा असत्या तरी बराच आवडला असता.
इतक्या प्रखर प्रकाशझोतात एक क्षण का होइना तिने डोळा सताड उघडा ठेऊन, भिंगातून कॅमेर्याकडे पहात एक प-र-फे-क्ट शॉट दिला
ह्यात तिचं कर्तृत्व असेलच असं नाही. अनेक साधे पॉइंट-शूट कॅमेऱ्यांमध्ये दोनदा फ्लॅश होतो; पहिल्या फ्लॅशला बरेचसे लोक डोळे मिचकवतात आणि दुसरा फ्लॅश त्यानंतर एवढ्या कमी वेळात उडतो की पापण्यांची हालचाल करणं शक्य नसतं. किंवा स्टुडिओत जिथे सगळीकडे समान उजेड पडलेला असतो तिथे भिंगाकडे एकटक बघणं फार कठीण नसतं.
शरीर सुंदर, खरंतर निरोगी असण्याबद्दल माझा कोणत्याही 'वादा'तून किंवा व्यक्तिगत प्रकारचा काहीही आक्षेप नाही. उलट शरीर निरोगी नसेल तर काहीही करता येणार नाही१. संपूर्ण निरोगी असणारे लोक फारच कमी असतील; कोणाला चष्मा असेल, कोणाला ताणतणावांचं व्यवस्थापन खूप चांगलं करता येत नसेल, (सानिया मिर्झासारखे) कोणाच्या सांधे फार बळकट नसतील, एक ना अनेक. आहे त्यात सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक आरोग्य राखून असणारे लोक चांगले दिसतात. उत्क्रांतीनुसार, आरोग्यवंत लोकांना सुंदर मानण्यासाठी आपला मेंदू तयार झालेला आहे. आरोग्य, सौंदर्य आणि बुद्धीमत्ता ह्याबाबतीत थत्त्यांशी सहमत.
>>देवाने जर मला चॉइस दिला असता की तू आरोग्य अथवा सौंदर्य अथवा बुद्धीमत्ता यापैकी कशाची अॅम्बेसिडर बनशील तर मी सौंदर्य निवडले असते : )
तसाही मी देव नाकारलेला आहेच, पण असला, उत्क्रांतीचे बेसिक फंडे माहीत नसलेला, ढ देव मी निश्चितच नाकारेन.
अवांतर - मी नंदन असते तर नखं आणि सौंदर्य ह्यांना जोडणारी काही कोटी केली असती; पण माझ्या भाषिक क्षमतांना नंदनच्या कोटीकेसरी बुद्धीमत्तेच्या नखाचीही सर नाही.
१. ह्याची जाणीव ठेवून मी नियमितपणे, (स्वयंपाक, व्यायाम, दुकानात समोर सामोसा/मफिन दिसला तरी तो विकत न घेणे, प्रकारचे) चिकार कष्ट करते.
बुद्धीमत्ता =
बुद्धीमत्ता = व्यवहारज्ञान,सामान्यज्ञान.
आरोग्य = कोणतेही सामान्य काम करण्यात अडचण नसणे.
वस्तुंतलं सौंदर्य = मल्टिटास्किंगची क्षमता असणे.उदा नखे - बुद्धिमत्तेचा पाया खाजवणे,पेपराची पिन काढणे,शस्त्र,स्ट्रेस कमी करण्यासाठी खाण्यासाठी,मत्सर प्रेमराग(*) इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी.
(*)हुश्श अदितीचं काम करून टाकले. उगाच नको नंदनला पाचारण करायला एवढ्याशा कामासाठी.पिडांना भेटून कोटीभास्कर असल्याचे पटवणे ही कामे आहेतच त्यांना.)
या धाग्यावरुन एक धागा कल्पना सुचली
पुरुषी सौंदर्याची उत्तुंग उदाहरणे
असा एक स्वतंत्र धागा काढावा असे वाटत आहे. ज्यात केवळ आणि केवळ पुरुषी सौंदर्य यावर लिहावे.
पुरुष सौंदर्याला दिलेल्या उपमा कविता इत्यादी टाकाव्यात.
स्त्री सौंदर्याइतक्या मुबलक उपमा इतक्या मुबलक चर्चा इतक्या मुबलक फोटो वगैरे
पुरुषी सौंदर्याबाबत आढळत नाहीत.
त्यामुळे या दुर्लक्षित विषयाला न्याय देणे आवश्यक वाटते.
निळे पेस्टल रंग, चमक बघा की
निळे पेस्टल रंग, चमक बघा की हो. रंगसंगती, व रंगांची निवड पहा. एक एक रंग खावासा वाटतोय मला, प्यावासा वाटतोय. त्या त्या रंगाचे फुलपाखरु बनावेसे वाटते आहे :D . तो ट्युबवरचा डिझाइनर फॉन्ट पहा. :)
अरसिक कुठचे =))
___
उद्या म्हणाल कवितेची उकल करुन सांगा, कवितेचे विच्छेदन करा.
___
ती निळी ट्युब दिसते का दडलेली, काय रंग आहे तो. तो तसा अर्धवट दाखविण्यातच कौशल्य आहे. अब का का बताए! ट्युबस ची पांढरी पण फटक नसलेली किनार. सर्वच सुंदर(ग्लॅमरस) आहे.
___
ओह्ह्ह!! टू टॉप इट ऑल - आलमंड शेपड नखे. काय शेप आहे.
मला ओसीडी आहे.
लाईट-कॅमेर्याची फारशी माहीती असायची गरज नाही. ते डाग म्हणजे वरच्या दिव्याचं प्रतिबिंब असेल तर बोटं/नखं कशीही ठेवली तरीही लांबुडक्या, पांढऱ्या डागांचा लांबडा अक्ष परस्परांना समांतर हवा => अंगठ्यावर क्यूटिकल ते नखाचं टोक ह्या रेषेला लंब रेषेत लांबडा अक्ष हवा. इतर बोटांवरही तो अक्ष एकमेकांना समांतर नाहीच.
नखावर नक्की कुठे प्रतिबिंबाचा डाग पडेल हे बोटांची लांबी आणि ठेवण्याची पद्धत ह्यावर अवलंबून असेल. ते कोरीलेशन ह्या फोटोत दिसत नाही => तस्मात, ते पांढरे डाग रंगवलेले आहेत; त्या रंगरंगोटीत फार सुसंगती दिसत नाही.
शिवाय मधल्या बोटावर तो डाग नखाच्या बुडाशी लावला आहे. फोटो काढताना मधोमध वस्तू ठेवल्यावर जसा बोरिंग फोटो येतो तसंच काहीसं. त्याऐवजी अनामिकेच्या नखावर काही निराळं केलं असतं तर अंगठा लंब दिशेत असण्याने जी असममिती येते ती बॅलन्स झाली असती.
अदिती,
ओह शूट ते रंगवलेले डागच आहेत चमक वगैरे काही नाही :(
.
कोणीतरी म्हटलेले आहे की जेव्हा एखादे मूल "माझा परीवरती विश्वास नाही" असे म्हणते तेव्हा एक परी मरुन पडते.
तद्वत हे डाग पाहून ऐसीच्या एका कलासक्त सदस्येला (---> मी मी) हे चित्र कुरुप इम्परफेक्ट वाटू लागले आणि कुठेतरी .... काहीतरी मरुन पडलं ;) =))
___
कॉफी तर सकाळी घेतलेली. नक्की काय चढलय कळेना. पाणी बहुतेक ;)
ते रंगवलेले डागच आहेत चमक
ते रंगवलेले डागच आहेत चमक वगैरे काही नाही
मॉडेलांचे फोटो फोटोशॉप्ड असतात. कधी कोणाला तीन हात, सात बोटं वगैरे दिसतात तेव्हा ते भस्सकन समोर येतं. चकचकीत, सुपरफिनिश्ड फोटो कुरूप दिसण्यामागचं कारण हेच असतं, त्यात नैसर्गिकता नसते. तुकतुकीत कांती सुंदर दिसतच नाही असं नाही.
ताज्या मिरच्या तुकतुकीत, छान दिसतात. मागे एकदा सर्वसाक्षींनी तसा फोटोही स्पर्धेत लावला होता. त्यावर पडलेलं प्रकाशाचं प्रतिबिंब नैसर्गिक आहे हे लगेच समजतंय. हा प्रतिसादाचा दुवा.
या धाग्याचं सार्थक झालेलं
या धाग्याचं सार्थक झालेलं आहे. जाहीरातीचे जग सॉलिड फेक आहे हे समजले आहे. मॉडेलसचे शरीराचे फोटो फोटोशॉपने बदलतात हे माहीत होते. - http://abcnews.go.com/Entertainment/meghan-trainor-photoshop-controvers…
पण वेल, आय अॅडमिट की लहान सहान फोटोतही तोच भुलभुलैय्या असतो हे लक्षात आले नव्हते. भुलभुलैय्या हाच शब्द योग्य आहे. थँक्स अदिती.
खूप मुद्दे एकाचवेळी घेतले
खूप मुद्दे एकाचवेळी घेतले आहेत तरीही मुख्य सौंदर्य आहे.सौंदर्य टिकवावेही लागते - शरीर ,बाग , घर अथवा उपयोगाची वस्तू.शरीर आणि बुद्धिमत्ता वापरात ठेवल्याने निस्तेज होत नाही आणि सु्ंदर राहाते.व्यक्तिमत्त्व सुंदर वाटण्याचे कारण आनंदीपणा,उत्साह आणि दुसय्राचं कौतुक