अंदाज करा - फोटोत किती माणसं आहेत?
बऱ्याच वेळा आपल्याला मोठ्या आकड्यांमुळे गोंधळून जायला होतं. वर्तमानपत्रांत सर्रास अमुक मोर्चाला वीस लाख लोक आले होते वगैरे बातम्या दडपून येतात. ते आकडे प्रचंड फुगवलेले असतात असा माझा अनुभव आहे. पण प्रचंड संख्येने दिसणारा जमाव दिसला की आपल्याला पन्नास हजार की पाच लाख हे कळायला मार्ग नसतो. वृत्तपत्रांनी ते स्वतंत्रपणे करावं अशी अपेक्षा असली तरीही ते तसं करताना दिसत नाहीत. पण काही गणितं करून, मोजमापं करून आपलं आपल्याला ठरवता येतं. म्हणून यावेळी खाली दिलेल्या फोटोत किती माणसं आहेत याचा अंदाज करायचा आहे.
सर्वात प्रथम कसलीही मोजमाप न करता अंदाजे आकडा ठरवा, आणि तो प्रतिसादात लिहा. मग कुठल्याही प्रकारे मोजमाप करून एकंदरीत किती माणसं असावीत याचा आकडा लिहा. शक्यतो 'कमीत कमी इतकी आणि जास्तीत जास्त इतकी' याची शक्य तितकी लहान रेंज लिहा. हे अंदाज बांधण्यासाठी तुम्ही कुठली पद्धत वापरली हेही सांगा. मीही माझा अंदाज सांगेन, आणि या उपक्रमातून आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी शिकायला मिळेल.
रिंगणाच्या आतमध्ये
रिंगणाच्या आतमध्ये साधारण दहा ते पंधरा हजार माणसे असावीत. रिंगणाच्या उजव्या भागातल्या त्यातल्यात्यात मोकळ्या भागातल्या माणसांच्या एका कोंडाळ्यातली टकलीं मोजली. त्यांनी जेव्हढी जागा व्यापली होती तितक्या आकारमानाचे किती तुकडे रिंगणाच्या मोकळ्या भागाच्या पाव हिश्श्यात बसतील ते काढले. मग (एका कोंडाळ्यात सुमारे १५ डोकी दिसली, म्हणून) डाव्या बाजूच्या दाटीच्या भागात प्रत्येक कोंडाळ्यात साधारण वीस माणसे आणि पाव हिश्श्यात दीडपट कोंडाळी असा अंदाज करून रिंगणातली डोकी ठरवली. रिंगणाबाहेर फारच दाटी आहे. टकली मोजताना डोळ्यांना त्रास होउ लागला म्हणून सोडून दिले.
इथे संपूर्ण रिंगणाचा हिशोब धरलेला नाही. फक्त दृश्यमान जागेचाच धरला आहे.
स्टेडियम
बाहेर खुर्च्यांचे (किंवा बसण्याच्या जागांचे) ३५ ब्लॉक्स मोजता आले. एका ब्लॉकमध्ये खुर्च्यांच्या बारा उतरत्या रांगा मोजता आल्या. सगळ्यात खालच्या रांगेत बारा खुर्च्या मोजता आल्या. वरच्या रांगेत सुमारे पंधरा-वीस असू शकतील. म्हणजे ३५x१२x१५ ते ३५x१२x२० इतके लोक असू शकतील बाहेर. म्हणजे ६३०० ते ८४०० बाहेर.
सगळे मिळून रिंगणातले दहा ते पंधरा हजार आणि बाहेरचे ६३०० ते ८४०० मिळून १६३०० ते २३४००.
खरे तर खालच्या रांगेतल्या बारा खुर्च्या आणि वरच्या रांगेतल्या वीस यांची सरासरी काढूनही १६x १२ करता येईल पण त्याने फारसा फरक पडणार नाही.
अर्थात इथे दाखवलेल्या कमाल किमान आकड्यात ५०% फरक आहे जो चालण्याजोगा नाही हे मान्य.
रिंगणातले १२ ते १५ आणि बाहेर ६७२० मिळून १८७२० ते २१७२० हा अधिक अचूक अंदाज असू शकेल.
राघा, कन्फर्मिटी च्या
राघा, कन्फर्मिटी च्या विरोधात* जाऊन मी पहील्यांना १०,००० आकडा मांडला तरी तुम्ही मला काहीच प्रतिसाद दिला नाहीत :( आता जचिंसारखं मलाही म्हणा - चूक झाली खरी माझी. पुन्हा नाही करणार असं. ;)
.
* तसंही जालावरती कन्फर्मिटीच्या विरोधात जायला फार झुंजार वृत्ती लागत नाही म्हणा. ;)
दिल्लीत पहिले कृषी भवन आणि
दिल्लीत पहिले कृषी भवन आणि उद्योग भवनच्या मध्ये असलेल्या राजपथ ते इंडीया गेट पर्यंत असलेल्या पार्क (जवळपास १-१/२ एक किलोमीटर लांब आणि २०० मीटर जाडी ) जास्तीस जास्त ४ लक्ष लोक येऊ शकतात. (कित्येक मोर्च्यात १० -१० लाख लोक येण्याचे दावे केले जात होते. पण प्रत्यक्षात २०-२५ हजार पेक्षा जास्ती लोक कधीच येत नव्हते. सर्वात जास्त लोक १९४७ १५ ऑगस्ट आणि राम मंदिरच्या आंदोलनात १९८९ मध्ये होते. इंडिया गेट पर्यंत. (प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले)
चित्रात दिसलेली जागा या पेक्षा किमान २० पट तरी छोटी असेल. अर्थात २०-२५ हजार पेक्षा जास्त लोक मावण्याची शक्यता नाही.
आणखी थोडी
आणखी थोडी माहिती.....
मुंबईच्या लोकलमध्ये माणसे पीक अवरला कशी पॅक भरलेली असतात ते सर्व जाणतात. तशा पॅक भरलेल्या लोकलच्या एका डब्यात तीनशे-साडेतीनशेच माणसे असतात. डब्याचा आकार सुमारे ३९ फूट * १० फूट धरता येईल.
प्रत्यक्षात मोर्चातील माणसे तितकी खचाखच नसणार....
काय महत्वाकांक्षी प्रश्न आहे किती भव्य झेप आहे विचारांची खरच
सिरीयसली म्हणतोय अगदी उपहास नाही.
फोटो वरुन गर्दीच्या आकड्याचा अंदाज लावण्याचा नुसता प्रयत्न करणे हेच किती रोमांचक आहे.
अश्मयुगात एखादा मानव पक्ष्याकडे बघुन एक दिवस आपण ही उडु असे दुसरा अश्मयुगीन माणसास म्हणाला असेल तेव्हा तो ही असाच रोमांचित झाला असणार
म्हणाला असणार खरच हे शक्य आहे ?
दुसरा म्हणाला असणार नक्कीच एक दिवस हे शक्य होइल.
जेकब्स मेथड
गर्दीचा अंदाज करण्याच्या ‘जेकब्स मेथड’प्रमाणे जर फार खेचाखेच गर्दी नसेल तर प्रत्येक माणूस पाच ते दहा स्क्वेअर फूट जागा घेतो. इथे मी किमान दहा म्हणेन कारण (रिंगणाच्या आत) इथेतिथे बरीच मोकळी जागा दिसते आहे.
पण ही जागा कुठली आहे ते मला माहित नाही; तूर्तास ‘शिवाजी पार्क’ आहे असं समजतो. तर त्याचं क्षेत्रफळ ११ लाख स्क्वेअर फूट आहे असं विकिपीडियावरून कळतं. याला दहाने भागलं की एक लाखाच्या आसपास आकडा येतो.
मुंबईतली (की सगळ्याच महाराष्ट्रातली?) इतर मैदानं शिवाजी पार्कपेक्षा लहान असल्यामुळे हा शिवाजी पार्क नसेल तर आकडा आणखी कमी भरेल. तेव्हा (रिंगणातल्या माणसांच्या संख्येचा) माझा अंदाज: नव्वद हजार ते एक लाख.
The inner circumference of
The inner circumference of the park is 1.17 kilometres (0.73 mi). The maidan covers 112,937 square metres (27.907 acres), more than half of which is occupied by 31 tenants, the largest being clubs like the Shivaji Park Gymkhana, and the Bengal Club.
किंचित एक शून्याची गल्लत आहे. शिवाजीपार्कचं क्षेत्रफळ सुमारे १.१ लाख स्क्वेअरफूट आहे. तेव्हा तुमच्या उत्तराला दहाने भागून अंदाज १०००० माणसं असा गृहित धरतो.
(अवांतर - गणिताच्या प्रोफेश्वरांची गणिताची चूक काढायला केवढी मज्जा आली म्हणून सांगू!)
साधारण ४६५६०
१. इमेजजे मधे इमेज घेतली (रिंगणाबारचा पोर्शन काढून टाकला)
२. बायनरी केली
३. हिस्टोग्रॅम पाहिला आणि काळे पिक्सेल मोजले (१२७ पर्यंतचे काळे म्हणून मोजले)
४. साधारण ३८८० आले
५. मूळ चित्रात पाहिले तर साधारण एक पिक्सेलभोवती १२ माणसे दिसली (४-५ ठिकाणी मोजले)
म्हणून ४६५६०
(आधी मनाने काही अंदाज लावला नव्हता, खरी गर्दी बघूनपण अंदाज बांधता येत नाही, चित्रात काय येणार.)
हो, डोकी काळी म्हणून काळ्या
हो, डोकी काळी म्हणून काळ्या भागाने 'माणूस' दर्शवला जातो. जर आपल्याकडे हाय रेझोल्यूशन, हाय कॉंट्रास्ट चित्र असतं तर पुरेसा खाली थ्रेशोल्ड घेतला तर प्रत्येक डोक्यामागे काही विशिष्ट पिक्सेल्स मिळतील. मग एकूण काळा पिक्सेल्सना सरासरी दरडोई पिक्सेल्सने भागलं की डोक्यांची संख्या मिळेल. मात्र या चित्रात रेझोल्यूशन चांगलं नाही, आणि माझ्या मते १२७ हे खूपच जास्त थ्रेशोल्ड आहे. त्यामुळे अनेक माणसं एका गोळ्यात येतात. पण प्रत्येक पिक्सेलभोवती बारा माणसं कशी आली हे मला नीटसं कळलेलं नाही.
८ ते १२ एका गोळ्यात
आली कारण मी ग्रेस्केल एमेजची, ओरिजनल एमेजशी तुलना केली आणि पाहिले साधरण एका गोळ्यत मूळ चित्रात किती माणसे आहेत. १२७ जास्त थ्रेशोल्ड आहे हे मान्य.
एखाद्या OpenCv मास्टरला हे काम दिले तर तो नक्कीच खर्या संख्येच्या आसपास पोचेल.
ऑब्जेक्ट मोजणे एकदम बेसिक काम आहे ओपेन्सीव्हीसाठी.
अनेक गृहीतके!
@आबा:
- काळेच पिक्सेल घ्यायची काय आयड्या आहे? (लोकांचे केस काळे म्हणून का?)
@राघा:
हो, डोकी काळी म्हणून काळ्या भागाने 'माणूस' दर्शवला जातो.
यात अनेक छुपी गृहीतके दडलेली आहेत, जी सर्व योग्य असतीलच असे नाही (आणि म्हणूनच काहीजणांसाठी - अनेकांसाठी! - अन्याय्यही असू शकतील). जसे:
१. त्या फोटोतील गर्दीपैकी प्रत्येक माणसास डोके आहे. (गुर्जींचे लाडके 'पर क्यापिटा' तत्त्व!)
२. त्या प्रत्येक डोक्यावर केस आहेत.
३. त्या प्रत्येक डोक्यावरील केस काळे (नैसर्गिकत: किंवा रंगवून) आहेत. (पक्षी: पिकलेले आणि न रंगवलेले - अर्थात पांढरे - चालणार नाहीत. किंवा, इतर कोणत्याही रंगाचे - नैसर्गिकत: किंवा रंगवून - हेसुद्धा चालणार नाहीत.)
थोडक्यात, ही पद्धत बरोबर नव्हे.
(याला पर्यायी पद्धत म्हणून 'गर्दीतील माणसांच्या पायांची संख्या मोजा आणि तिला दोनाने भागा', असे सुचविणार होतो, परंतु अधिक विचाराअंती त्याही पद्धतीमागे काही तितकीच अन्याय्य गृहीतके आहेत, असे लक्षात आले, सबब तीही पद्धत बाद.)
हम्म्म्म्म्... एकंदरीत कठीण मामला आहे सगळा!
झेंडे आणि डोकी...
...यांत तसे कोरिलेशन दिसत नाही. (काही ठिकाणी भगव्याचे - अश्यूमिंग भगवा डिनोट्स झेंडे - कॉन्सण्ट्रेशन अधिक आहे, तर इतरत्र काळ्याचे. त्यात काही प्याटर्न दिसत नाही.) पुन्हा, यात 'काळा = डोके' हे जे गृहीतक दडलेले आहे, त्यावरील मुळात उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह जसेच्या तसे राहाते.
शिवाय...
...भगवा = झेंडे या गृहीतकातदेखील अडचण आहे. उद्या तेथे त्या गर्दीत समजा डॉनल्ड ट्रंप जर जाऊन उभा राहिला (कशासाठी, ते विचारू नका. त्याने कोठे नि कोठल्या फोटोत कडमडावे, ही त्याची मर्जी.), तर त्याला 'डोके' म्हणून मोजणार, की 'झेंडा' म्हणून?
हं, आता ट्रंपला डोके नाही, हे जरी राष्ट्रीय उघड गुपित असले, तरी तो 'झेंडा' क्याटेगरीत मोडतो, याबद्दल कोठलाही विदा (वा सांगीवांगीची गोष्टसुद्धा) निदान माझ्याजवळ तरी उपलब्ध नाही. (तुमच्याजवळ आहे काय?)
एक गृहीतक राहिले - निषेध!
४. त्यांपैकी कोणत्याही डोक्यावर पगडी, टोपी, रुमाल, हेल्मेट वा अन्य कोणतेही आवरण वा आच्छादन नाही. (बोले तो, बहुतांश शीख आणि अनेक मुस्लिम - अमंग अदर्स - यातून ऑपॉप बाद. मायनॉरिटीज़ना वगळण्याचा हा छुपा प्रयत्न अत्यंत गर्हणीय असून, आमच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटलेला नाही, हे आधीच बजावून ठेवतोय. हां!)
आपण फोटोत ग्रिड बघतो ना नऊ
आपण फोटोत ग्रिड बघतो ना नऊ चौकोनांचे तसे फक्त माणसे बसली आहेत त्या भागाचे नऊ केले. अंदाजाने प्रत्येकात शंभर धरली तर १०० गुणिले नऊ नउशे लोक झाले.प्रत्येकात दीडशे धरली तर १३५० होतात. ही पद्धत पक्षी मोजण्यासाठी वापरतात.एका चौकोनाचा अंदाज सवयीने बरोबर सांगता येतो.रेल्वेत गर्दीच्या वेळी डब्यात १६० लोक असतात.ते दाटीवाटीने उभे असतात तसे सभेला बसत नाहीत. विरळ बसतात.( बाकी मेंदू नसलेले लोकच मतपेटीतून काहीही काढू शकतात. मेंदू नसलेलेच उमेदवार उभे असतील तर हे लोक आणखी काय कमाल करणार म्हणा?)
सोयीसाठी आत्तापर्यंत आलेली
सोयीसाठी आत्तापर्यंत आलेली उत्तरं एकत्र करून ठेवतो आहे. ती पाहूनच आपल्याला सुमारे दहा पटीची रेंज आहे हे जाणवतं.
अनु राव 60000
राही 20000
अनुप ढेरे 10000
शुचि 10000
थत्ते 150000
पटाईत 20000
हर्षच 137500
चिपलकट्टी 95000
लोळगे 46560
अचरट 1250
तिरशिंगराव 78000
हा फोटो अहमदनगरच्या वाडिया
हा फोटो अहमदनगरच्या वाडिया पार्कमधला आहे. तिथे २३ सप्टेंबरला रॅली झाली होती. नवभारतटाइम्सच्या एका बातमीतून हा फोटो उचलला होता. मात्र आता बघतो तर तो फोटो तिथे दिसत नाहीये. पण मी वाडिया पार्कचे फोटो पाहून हे तेच पार्क आहे याची खात्री केली. त्याची कपॅसिटी किती हे पटकन शोधून सापडलं नाही. मात्र वानखेडे स्टेडियमच्या मानाने खूपच कमी असावी.
माझं उत्तर लिहून काढायला वेळ लागेल. सध्या दिवाळी अंकाच्या कामात बिझी आहे. लवकरच लिहितो.
बरोबर. उत्तर काढण्यासाठी
बरोबर. उत्तर काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे अंदाज करावा लागतो. त्यात जर मैदान कुठचं आहे हे माहीत असेल, त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे माहीत असेल तर त्यावरून अंदाजाच्या वरच्या मर्यादा तरी काढता येतात. असा प्रयत्न विवेक पटाईत आणि जयदीप चिपलकट्टी यांनी केला आहे. मला कोणीतरी 'हे क्रिकेटचं ग्राउंड वाटतंय, तेव्हा व्यास साधारण पाचशे फूट धरू. तेव्हा क्षेत्रफळ दोन लाख स्क्वेअरफूट असेल' असा अंदाज करेल असं वाटलं होतं. चिपलकट्टींनी असा अंदाज केला असता तर त्यांना हे ग्राउंड शिवाजीपार्कच्या एकपंचमांशाहूनही कमी आहे हे लक्षात आलं असतं.
बाकी शुचिताईंना 'दहा हजार उत्तर देणारी मी पैली बरंका!' असं सांगायचं असावं. फारच खात्री दिसतेय आपल्या उत्तराबद्दल! ;)
बाकी शुचिताईंना 'दहा हजार
बाकी शुचिताईंना 'दहा हजार उत्तर देणारी मी पैली बरंका!' असं सांगायचं असावं. फारच खात्री दिसतेय आपल्या उत्तराबद्दल! (डोळा मारत)
तुम्ही फार काळ मौन राहीलात त्यामुळे माझा संशय बळावला की मैने भांडा फोड दिया है शायद ;) ........... मानसशास्त्र राघा मानसशास्त्र!!! तुमच्या उत्कांतीत काही ठेवलं नाही बघा. आमच्या मानसशास्त्र कुरणात या :)
आठ ते पन्नास हजार
५०*५० पिक्सेलचा चौरस चित्राच्या मध्यवर्ती भागात कुठेतरी* ~= साधारण १०० मनुष्य-ठिपके.
एकूण अंदाजपंचे ६५०*४०० पिक्सेल = १३*५०*८*५० पिक्सेल = (१३*८)*(५०*५०) पिक्सेल ~= १०४*१०० मनुष्य ~= १० हजार माणसे
रेंज - ८,००० ते ५०,००० माणसे.
रेंज वरच्या बाजूला अधिक का? स्टँडवरती बसलेले लोक पुषकळ प्रमाणात चित्रात नाहीत, आणि शिवाय ठिपके मोजलेल्या चौरसात सरासरीपेक्षा कमी लोक भरत असावेत.
--
*कुठेतरी = पिक्सेल एक्स२९१, वाय१५१ हा चौरसाचा वायव्य कोपरा.
माझं विश्लेषण
एकंदरीत किती लोक आहेत?
- जयदीप चिपलकट्टींचा युक्तिवाद - शिवाजीपार्कमध्ये सुमारे लाख लोक बसू शकतात. हे ग्राउंड शिवाजीपार्कच्या एक पंचमांश आहे. तेव्हा त्यात २०००० पेक्षा जास्त लोक मावू शकणार नाही. फोटोत ते पूर्णही आलेलं नाही. त्यामुळे जर ते २/३ दिसत असेल तर सुमारे १३०००. अनेक भागात गर्दी खूपच कमी आहे. त्यामुळे वरची मर्यादा १३०००.
- धनंजयचा युक्तिवाद - एकंदरीत सुमारे २५०००० पिक्सेल्स लोकांनी व्यापलेले आहेत. लोकं नीट दिसण्यासाठी प्रत्येकी सुमारे २५ पिक्सेल लागतात. काही ठिकाणी लोक नीट न दिसण्याइतकी गर्दी आहे, तर काही ठिकाणी रिकाम्या जागा आहेत. त्यामुळे सगळ्याची सरासरी मिळून सुमारे १०,००० लोक. हा खूपच अचूक अंदाज आहे.
- ग्रिड तयार करून त्यात सरासरी लोक मोजणं - शुचिचा युक्तिवाद - या मोजमापीत चौकटी तयार करून त्यात सरासरी लोक मोजणं. त्यातून १०००० हे उत्तर आलं. हाही माझ्या गणिताच्या खूपच जवळ जाणारा अंदाज आहे. (आणि शुचिने सगळ्यात पहिल्यांदी सांगितला, बरंका!)
- झेंडेमोजणी - जिथे कमी गर्दी आहे, तिथे पाहिलं तर सुमारे दर वीस लोकांमागे एक झेंडा दिसतो. एकंदरीत झेंड्यांची संख्या सुमारे ३५०. म्हणजे लोकांची संख्या सुमारे ८७५०.
स्टॅंडमध्ये किती लोक आहेत?
- राहींचा युक्तिवाद - मला खुर्च्यांच्या १२ रांगा दिसल्या पण त्यांच्यापेक्षा दर रांगेत खूपच कमी खुर्च्यांची संख्या जाणवली. सुमारे ३००. म्हणजे स्टॅंडमध्ये ३६०० लोक असावेत.
- वानखेडेशी तुलना (नितिन थत्तेंचा युक्तिवाद - सुधारित) - वानखेडे स्टेडियममध्ये ३३००० लोक मावतात. आणि त्याला किमान तीन मजले आहेत. इडन गार्डन्सची कपॅसिटी ६६००० आहे. पण तिथे रांगांची संख्या किमान ४० असेल असं फोटोंवरून दिसतं. काही ठिकाणी दुमजलीही आहे. म्हणजे वाडिया मैदानाच्या पाचपट सरासरी रांगा आहेत. वाडिया मैदानाचाही प्रेक्षकांचा फक्त १/३ भाग फोटोत दिसतो आहे. आता हिशोब करू. ६६००० गुणिले १/५ गुणिले १/३ = सुमारे ४०००.
- क्रिकेट ग्राउंड सुमारे पाचशे फूट व्यासाचं असतं. जर आपल्याला त्याचा एक तृतियांश परीघ दिसत असेल तर आपल्याला साधारण ५२५ फुटांचा भाग दिसतो. प्रत्येक खुर्ची किमान दोन फूट रुंदीची दिसली तरी आपल्याला सुमारे २५० खुर्च्या प्रत्येक रांगेत आहेत असं म्हणता येतं. म्हणजे २५० गुणिले १२ = ३०००. जर मैदानाचा १/३ पेक्षा जास्त भाग दिसत असेल तर समजा ५० टक्के = ८०० फूट दिसताहेत - म्हणजे प्रत्येक रांगेत ४०० खुर्च्या असतील तर हा आकडा येतो ४८००. पण हे खूपच ताणलेलं आहे.
थोडक्यात, स्टेडियममध्ये बसलेले लोक सुमारे ३५०० ते ४५००. आपण सोयीसाठी ४००० म्हणू.
मैदानाच्या आत किती लोक आहेत?
- अनुराव यांचा अंदाज - त्यांनी वर्तुळ करून त्याची त्रिज्या १२५ - १५० लोकांची मोजली. माझ्या मते हा फारच वरचा आकडा आहे. त्यातही फोटोच्या खालच्या भागात जी गर्दी आहे त्यामानाने फोटोच्या वरच्या भागात प्रचंड कमी गर्दी आहे. तसंच, त्यातून येणारे अंदाज हे संपूर्ण वर्तुळासाठी येतात, आणि आपल्या फोटोत त्या वर्तुळाचा सुमारे ६०% भागच दिसतो. या दोन फरकांमुळे त्यांचं उत्तर सुमारे चौपट आलेलं असलं तरी त्यांचा मोजमापीचा प्रयत्न योग्य होता.
- अनुप ढेरेंचा अंदाज - त्यांनी साधारण झाडाने व्यापलेलं क्षेत्रफळ मोजलं, आणि त्यात किती माणसं बसू शकतील असा विचार केला. प्राथमिक गणितात त्यांचं उत्तर लाख आलं असलं तरी पुनर्विचारानंतर त्यांनी उत्तर १०००० च्या आसपास असावं असं म्हटलं. हे उत्तर माझ्या गणिताच्या खूपच जवळ जाणारं आहे.
मी गणित करण्यासाठी लोकांचे तीन भाग केले. फोटोचा खालचा भाग - जिथे खूपच दाट गर्दी आहे; फोटोचा मधला भाग - जिथे लोक विरळ आहेत; आणि खुर्च्यांवर बसलेले लोक. पैकी तिसऱ्या म्हणजे फोटोच्या सर्वात वरच्या भागासाठी मी कसा अंदाज बांधला ते वर लिहिलेलंच आहे. माझं उत्तर सुमारे ४००० लोक.
खालच्या आणि मधल्या भागांसाठी मी धनंजयची पद्धत वापरून दोन ५०X५० पिक्सेलचे दोन चौकोन काढले. त्यातल्या त्यात नजरेने सरासरी घनता असलेले भाग निवडले. वरील चित्रात ते जाड काळ्या चौकोनाने दाखवलेले आहेत. त्या जाड चौकोनांच्या आत बारीक चौकोन आहेत ते ५०X५० पिक्सेलचे चौकोन.
माझ्या मोजमापानुसार त्यातल्या खालच्या भागात दर २५०० पिक्सेलला सुमारे ४५ ते ७० लोक आहेत. आणि वरच्या भागात दर २५०० पिक्सेलला सुमारे २२ ते ३० लोक आहेत. म्हणजे ५००० पिक्सेलमध्ये ६७ ते १०० लोक आहेत. सरासरी सुमारे ८२. तर २२५००० पिक्सेलमध्ये सुमारे ३७०० लोक आहेत. रेंज - २९०० ते ४५००.
थोडक्यात, बसलेल्या लोकांची संख्या सुमारे ४००० + मैदानातल्या लोकांची संख्या सुमारे ३७०० = ७७००. सोयीसाठी मी ८००० म्हणायला तयार आहे.
माझी रेंज सुमारे ६००० ते १०००० इतकी येते, सरासरी ८०००!
या मोर्चात ३०,००,००० (तीस लाख) लोक सामील झाल्याचा दावा केला गेला होता. तीस लाख लोक म्हणजे या ग्राउंडमध्ये भरलेल्या जास्तीत जास्त १०,००० लोकांच्या ३०० पट. अहमदनगरात या ग्राउंडपलिकडे २९९ पट लोक सामावून घेण्याइतकी जागा तरी आहे का?
बायदवे, खुर्च्यांवर बसलेल्यांची संख्या मैदानात उभे असलेल्यांपेक्षा जास्त आहे हे कोणाला आश्चर्यकारक वाटतं का?
काही चुका
क्रिकेट स्टेडियमचा व्यास पाचशे फूट असतो? (मला वाटते तो ३०० फुटाहून जास्त नसावा).
वानखेडे स्टेडिसममध्ये ३३००० लोक केवळ परीघावरच्या स्टँड्समध्ये मावतात ना?
एखादे साधारण थिएटर- २५ खुर्च्यांच्या २० रांगा तरी असतात. म्हणजे थिएटरमध्ये किमान ५०० लोक एका लेव्हलमध्ये आरामशीर पाय पसरून बसू शकतात. हा फोटोतला भाग थिएटरच्या कितीपट मोठा वाटतो?
गूगल मॅप्समध्ये पाहिले तर वाडिया मैदान वानखेडेच्या मानाने लहान आहे असे वाटत नाही. मी झूम केल्यावर जेव्हा खाल्चे स्केल १० मीटर दाखवते तेव्हा वाडिया मैदान माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये मावत नाही. वानखेडे स्टेडियम (सहज; बाजूस एक एक इंच जागा सोडून) मावते.
गूगल डीस्टंस मेजरमेंट टूल
गूगल डीस्टंस मेजरमेंट टूल वापरून
वानखेडेचा व्यास (मैदानाचा) ४४९फूट - ४५७फूट .. परफेक्ट गोल नसल्याने..
क्षेत्रफळ- १५४००० स्क्वे. फूट
तर वाडीया पार्कचा व्यास (मैदानाचा) ५१५ फूट - ६४५ फूट .. खूपच लंबगोल आकार आहे.
क्षेत्रफळ- २७९००० स्क्वे. फूट
मॅपवर राईट क्लिक करुन 'मेजर डीस्टंस' ऑप्शन.. मग परीघावर एक एक पॉईंट मार्क करत पूर्ण परीघ कव्हर केल्यावर बंदिस्त आकृती झाल्यावर क्षेत्रफळ देखिल दाखवतं गूगल..
वानखेडे
सेम झूम लेव्हलला तुलनात्मक साइज
वानखेडे स्टेडियम
https://www.google.co.in/maps/place/Wankhede+Stadium/@18.9388309,72.825…
वाडिया पार्क अहमदनगर
https://www.google.co.in/maps/place/Wadia+Park+Stadium/@19.0876827,74.7…
हे मैदान मुंबईतले वाटतच
हे मैदान मुंबईतले वाटतच नव्हते. मुंबईची स्काय-लाइन अगदी वेगळी आहे. ब्रेबर्न म्हटले तरी स्टँड्स उथळ (उतरते, कमी चढाचे) आहेत. आणि वानखेडेमध्ये स्टीप आहेत. बाकी मेट्रो शहरेही बाद झाली कारण ईडन गार्डन मोठे आहे आणि तिथे भगवा मोर्चा जरा कठिण दिसतो. चिन्नास्वामीसुद्धा वेगळे आहे. सध्याच्या मराठा मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर हे स्टेडियम महाराष्ट्रातलेच असावे असा अंदाज बांधला. आणि ते मोठे नसावे हा बेस पक्का झाला. मग एका छोट्या विभागातली माणसे मोजून त्यावरून दृश्यमान मैदानातल्या माणसांचा अंदाज केला. खरा तर तो सगळा आकडा दहा-पंधरा हजारांपर्यंतच येत होता. पण इतरांचे लाखालाखांचे आकडे पाहून आपले गणित अगदीच चुकले की काय असे वाटून रिंगणातली माणसे दीडपट केली. पीअर प्रेशर म्हणतात तो असा.
जास्तीत जास्त ७०,००० माणसे
जास्तीत जास्त ७०,००० माणसे असावीत.
कमीत कमी ४५,००० असावीत.
अंदाजे ६०,००० असावीत.
त्रिज्या १२५ ते १५० माणसांची असावी ( मी अंदाजे मोजुन बघितले. आय ऑफ गर्दी सेंटर ला नाहीये ).