अमेरिकन निवडणुकीत काय होणार?
ट्रम्प यांना रोखण्यासाठी क्रुझ-कसिच यांची युती
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी पक्षांतर्गत १२३७ प्रतिनिधींची मते आवश्यक आहेत. ट्रम्प यांना तेवढी मते मिळू नयेत यासाठी टेक्सासचे सिनेटर क्रुझ आणि ओगायोचे गव्हर्नर कसिच यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या क्लिव्हलँड येथील सभेपर्यंत आपसांत न लढण्याचा निर्णय घेतला आहे.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/republican-presidential-race-c…
काय भि**** आहेत हे दोघे.
http://en.worldmoneygrid.com/
http://en.worldmoneygrid.com/2016/06/13/trump-calls-for-step-up-in-mosq…
ट्रंप्या म्हणतोय - मशीदींवरची पाळत वाढवा.
He added: “And people that are around, Muslims, know who they are largely. They know who they are. They have to turn them in.”
मुसलमानांच्या आसपास वावरणार्या लोकांना म्हणे कोणात द्वेषभावना आहेत हे साधारण माहीत असते तेव्हा अशा लोकांना पकडवुन द्या.
.
पकडवुन द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? - पोलिसात तक्रार करायची की अमका अमका मला द्वेषी वाटतो?
- त्या द्वेषी माणसाने अब्रुनुकसानीचा दावा लावला तर?
- बरं समजा त्या मनुष्याने दावा नाही लावला पण पोलीस कोणत्या आरोपाच्या आधारावर त्या माणसाची झडती घेणार्/चौकशी करणार?
.
ट्रंप उचलली जीभ लावली टाळ्याला करत असतो. लायकी आहे का अशा माणसाची राष्ट्राध्यक्ष व्हायची?
____
हिलरीचं कौतुक नाही मला. पण ट्रंप एकदमच वायझेड आहे. बर्नी ऑलरेडी बर्न-आऊट झालेत :(
हिंदू सेनेने साजरा केला
हिंदू सेनेने साजरा केला डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस
http://www.loksatta.com/desh-videsh-news/hindu-sena-celebrates-donald-t…
+/-
बाकी हिलरी बाई जिकंतील असं मत असणारे सध्या अमेरिकी प्रतिनिधीगृहात रिपब्लीकन्सचं बहुमत आहे हेसुद्धा विसरतात म्हणजे हद्द आहे.
हे तितकं थेट नाही:
१. हाऊसची निवडणूक २०१४ साली झाली. नॉन-प्रेसिडेन्शियल निवडणुकांत रिपब्लिकन-बेस मतदारांचं प्रमाण (प्रामुख्याने वृद्ध, श्वेतवर्णीय, ग्रामीण) हे डेमोक्रॅटिक-बेस मतदारांपेक्षा (प्रामुख्याने तरुण, कॉस्मोपॉलिटिन, शहरी) अधिक असतं.
२. २०१२ सालच्या निवडणुकीत (प्रेसिडेन्शियल + हाउस), डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना एकूण मतं अधिक (जवळपास १ मिलियन अधिक) मिळूनही हाऊसमध्ये रिपब्लिकनांना अधिक जागा मिळाल्या होत्या. लोकसंख्येची असमान भौगोलिक विभागणी + gerrymandering ही यामागची कारणं आहेत.
ट्रम्प विरोध असणं/नसणं आणि तो जिंकतोय हे दिसत असून नाकारणं या डॉन वेगळ्या गोष्टी आहेत
याबाबत सहमत. सध्या केल्या जाणार्या पाहणी/कल यांना फारसं वजन देण्यात अर्थ नाही. ऑगस्ट/सप्टेंबरच्या सुमारास साधारण कल स्पष्ट होतो.
अरेच्च!
बाकी हिलरी बाई जिकंतील असं मत असणारे सध्या अमेरिकी प्रतिनिधीगृहात रिपब्लीकन्सचं बहुमत आहे हेसुद्धा विसरतात म्हणजे हद्द आहे
आधी सिनेट का हाऊस ते ठरवा पाहू.
१. १९६८ साली फक्त ३५/१०० जागांवर निवडणूक झाली.
२. २०१६ साली ३४/१०० जागांवर सिनेट इलेक्शन्स होणार आहेत. त्यातल्या २४ जागा सद्ध्या रिपब्लिकनांकडे आहेत.
३. २००२ ला सिनेट डेमोक्रॅटिक झाली तर राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन झाला.
४. सिनेट डेमोक्रॅटिक असताना (निवडणूकपूर्व) १९५४, १९७० आणि १९८२ ला व्हाईट हाऊस ब्लू चे रेड झाले. (निवडणूकपश्चात).
५. व्हाईट हाऊस एकाच रंगाचे असताना सिनेटमधला रंग अनेकदा बदलेला दिसतो.
आता यावरून ट्रंपच जिंकून येणार हा निष्कर्ष कसा काढला ते जरा सविस्तर सांगा पाहू.
बरं र्हायलं.. नका घेऊ
बरं र्हायलं.. नका घेऊ लक्षात.
प्रत्येक सद्य रिपब्लिकन सिनेटर नि हाउस रिप्रेझेंटेटिव्हने आपल्या मतदार संघातील बहुसंख्य नागरीक ट्रम्पला मतदान करतीय इतकंच यशस्वीपणे पाहिलं तरी ट्रम्प जिंकेल. त्यात ट्रम्पच्या बेलगाम विचारांमुळे, तो सिस्टीम बाहेरचा असल्याने, त्यात गोरा, त्यात पुरूष असल्याने (नि त्यात एका मवाळ, ट्रमप्च्या विखारी प्रचाराला बळी पडून एकदाची 'इस्लामी आतंकवाद' म्हणायला तयार झाललेली, त्यात स्त्री समोर असल्यावर तर) अधिकाधिक मते त्याला मिळतील ती वेगळीच
एक जनमत चाचणी म्हणते की अमेरिकन मतदार मुद्दे नाही तर पर्सनॅलिटी बघुन मते देतात. (आता दुवा हाताशी नाही मिळाला की देईन).
हिलरी आज्जी आणि ट्रम्प काका यांच्यात कोणाची पर्सनॅलिटी अधिक अग्रेसिव्ह आहे?
घ्या!
रत्येक सद्य रिपब्लिकन सिनेटर नि हाउस रिप्रेझेंटेटिव्हने आपल्या मतदार संघातील बहुसंख्य नागरीक ट्रम्पला मतदान करतीय इतकंच यशस्वीपणे पाहिलं तरी ट्रम्प जिंकेल.
If wishes were horses, we would all be political advisors. असो. आता यावर विस्तृत बोलायचं म्हणजे अमेरिकन पॉलिटीक्स १०१ पासून सुरवात करावी लागेल.
हा सूर्य अन हा शिंचा ट्रंप होईलच, ते पाहूच. आक्षेप "सद्ध्या हाऊस रिपब्लिकनांचं आहे म्हणजे त्यांचाच राष्ट्राध्यक्ष होणार हे ऑब्व्हिएस नाही का?" या वक्तव्याला होता. हे वक्तव्य नक्की कशाचा जोरावर केलं आहे ते कळण्याकरता ही उठाठेव.
हे ओवब्व्हियस आहे असे नाही.
हे ओवब्व्हियस आहे असे नाही. पण डेमोकृअॅट्स करता रिपब्लिकन्सच्या तुलनेत जिंकणे अधिक कठिण आहे इतके यावरून म्हणता येईल की नाही?
नुसतं हिलरी विरुद्ध ट्रम्पमध्ये सुद्धा तो भारी पडतोय, त्यात डेम्सवर जनता इन जनरल कंटाळलेली आहे (हे दाखवायला सिनेट व हाउसचे आकडे उपयुक्त) हे बघता हिलरीरा जिंकणे किती कठिण आहे. त्यावेळी तिने ट्रम्पवर हल्ले करुन त्याला बेजार करायला हवं. पण प्रत्यक्षात चित्र उलट आहे. ती नुसतीच डिफेन्ड करतेय नि ट्रम्प हल्ले!
वेळेअभावी शेवटचा प्रतिसाद
पण डेमोकृअॅट्स करता रिपब्लिकन्सच्या तुलनेत जिंकणे अधिक कठिण आहे इतके यावरून म्हणता येईल की नाही?
नाही.
नुसतं हिलरी विरुद्ध ट्रम्पमध्ये सुद्धा तो भारी पडतोय,
असहमत.
त्यात डेम्सवर जनता इन जनरल कंटाळलेली आहे (हे दाखवायला सिनेट व हाउसचे आकडे उपयुक्त)
?? संबंध दिसत नाही.
हे बघता हिलरीरा जिंकणे किती कठिण आहे. त्यावेळी तिने ट्रम्पवर हल्ले करुन त्याला बेजार करायला हवं.
गरज वाटत नाही.
पण प्रत्यक्षात चित्र उलट आहे. ती नुसतीच डिफेन्ड करतेय नि ट्रम्प हल्ले!
असहमत.
काल रात्रीच पाहीला होता. जाम
काल रात्रीच पाहीला होता. जाम मजा आली. कोलबर्ट ने खूप हसविले.
_______
जॉन स्टुअर्ट शो मात्र फार आवडत असे मला.
Jon Stewart launched a stinging new round of criticism against Donald Trump on Monday, calling the presumptive Republican presidential nominee a thin-skinned hypocrite who ridicules political rivals and minorities but implodes when faced with even a minor slight.
आवं त्यांना आता त्या
आवं त्यांना आता त्या सर्टिफिकेटची गरज नाय(सत्ता नाय ना) म्हणून ते इकडे पाठवलयं इथली त्यांच्या सोयीची चर्चा वाचून.
डू नाॅट फीड द..
शुची, तुम्ही इतक्या का फ्रस्ट्रेट होताय??काही नाही करणार ट्रंप तुम्हाला,मी त्यांना आत्ताच फोन करून सांगितलयं अमेरिकेतल्या भारतीयांना काही करू नका म्हणून.
A Separation?
न्यू यॉर्कमध्ये हयात गेल्याने ट्रम्प हा समजूतदार, मॉडरेट, नॉन-रेसिस्ट इ. असेल असा काही मॉडरेट रिपब्लिकनांचा आणि ट्रम्पच्या मित्रांचा समज (रादर, होपफुल थिंकिंग) होता. तो धुळीस मिळालेला दिसतोयः
एक्झिबिट १: Maureen Dowd (दुवा)
Trump jumped into the race with an eruption of bigotry, ranting about Mexican rapists and a Muslim ban. But privately, he assured people that these were merely opening bids in the negotiation; that he was really the same pragmatic New Yorker he had always been; that he would be a flexible, wheeling-and-dealing president, not a crazy nihilist like Ted Cruz or a mean racist like George Wallace. He yearned to be compared to Ronald Reagan, a former TV star who overcame a reputation for bellicosity and racial dog whistles to become the most beloved Republican president of modern times.
एक्झिबिट २: आजच्या 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधली ही बातमी:
Donald Trump Questions Hillary Clinton’s Religious Faith: Presumptive Republican nominee makes overture to religious right at gathering of evangelicals (दुवा):
Nihilst?
not a crazy nihilist like Ted Cruz
इथे nihilist हा शब्द शिवीसारखा वापरल्यासारखा वाटतोय. नुकतेच दोन-तीन इतर ठिकाणीही असे पाहिले. Nihilism म्हणजे विश्वाला किंवा आपल्या अस्तित्वाला मूलतः कोणता हेतू/अर्थ नाही, असे सांगणारा (नित्शेप्रणित?) वाद ना? मग असा शिवीसारखा का वापरलाय तो शब्द? आणि टेड क्रूझ Nihilist कसा असेल? तो तर कट्टर ख्रिश्चन आहे ना, म्हणजे बायबलप्रणित जीवनाचा, अस्तित्वाचा हेतू मानत असेल की.
कॅपिटल ऑफेन्स
इथे nihilist हा शब्द शिवीसारखा वापरल्यासारखा वाटतोय. नुकतेच दोन-तीन इतर ठिकाणीही असे पाहिले. Nihilism म्हणजे विश्वाला किंवा आपल्या अस्तित्वाला मूलतः कोणता हेतू/अर्थ नाही, असे सांगणारा (नित्शेप्रणित?) वाद ना? मग असा शिवीसारखा का वापरलाय तो शब्द
मला वाटतं, पहिलं अक्षर कॅपिटल असेल तर ते एका विशिष्ट तत्त्वप्रणालीकडे निर्देश करतं आणि जर ते कॅपिटल नसेल, तर त्या शब्दाच्या सामान्य अर्थाकडे. उदाहरणार्थ, Republican म्हणजे अमेरिकेतील वा अन्यत्र रिपब्लिकन पक्षाचा पाठीराखा/सदस्य; तर republican म्हणजे लोकांकडे आपल्या स्वायत्ततेचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अधिकार सोपवणारी प्रणाली (वा तिचा समर्थक).
गव्हर्न्मेंट शटडाऊन
२०१३ साली ओबामाकेअरला विरोध म्हणून टेडमामांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकनांनी सतरा दिवस सरकारचं काम ठप्प पाडलं होतं. ओबामा बधत नाही म्हटल्यावर आणि करदात्यांना सुमारे २५ बिलियन डॉलर्सचा (तेवढ्यात ट्रम्पच्या भिंतीचा वर्षभराचा खर्च निघाला असता!) फटका बसून, लोकांनी ठणाणा केल्यावर रिपब्लिकन पक्षाची लोकप्रियता अधिकच खालावल्यामुळे मग त्याने माघार घेतली - याकडे बहुधा निर्देश असावा.
या दुव्यातूनः http://www.salon.com/2015/09/29/stop_calling_ted_cruz_a_conservative_th…
The worst thing about Cruz isn’t his obnoxiousness or his undemocratic conservatism or his dreary affectations; it’s his self-promoting nihilism. What he’s doing, and how he’s doing it, feels unprecedented. Threatening to shut down the government or undermine the country’s credit rating in defense of campaign talking point is an act of legislative terror. Cruz represents the very worst of factionalist fervor. He has no regard for the constitution or the general will or the nation’s economy. He sees an opportunity to promote his brand and it doesn’t matter what the costs are, to his party or his country.
.
nihilism च्या छोट्या आणि मोठ्या 'एन'मुळे होणाऱ्या वेगळ्या व्याख्या विशद कराल काय? जीवनाला, घडणाऱ्या गोष्टींना काही मुळात अर्थ, हेतू नाही हा निहिलिजम/नायलिजमचा सामान्य अर्थ असे मला वाटते. दुसऱ्या प्रतिसादातल्या परिच्छेदातूनही टेड क्रूझ कसा निहिलिस्ट होईल कळाले नाही. धार्मिक म्हणजे चांगले लोक, त्याउलट कशात काही अर्थ नाही म्हणणारे निहिलिस्ट हे वैट्ट्ट लोक; टेड क्रूझ धार्मिक असला तरी तो वैट्ट आहे, म्हणून तो निहिलिस्ट आहे अशी विचारशृंखला आहे का?
अंदाज
ही व्याख्या बरोबर असेलच असं नाही, पण बहुतेक असं असावं:
Nihilist : नित्शे/निचाच्या तत्त्वज्ञानाचा समर्थक/आचरण करणारा
nihilist : (स्वहितासाठी) विधिनिषेध/राजकीय-शासकीय-पक्षीय चौकट यांच्यावर अजिबात विश्वास नसणारा; स्वतःचं नाक कापून दुसर्याला अपशकून व्हावा यासाठी झटणारा.
किंचित निराळा दृष्टिकोनः https://libcom.org/forums/theory/are-anarchism-political-nihilism-same-…
ट्रम्प हा एक नार्सिसिस्टिक लहान बाळ आहे .
ट्रम्प हा एक नार्सिसिस्टिक लहान बाळ आहे .त्याच्यात "फॅसिस्ट " विद्वेष अगदीच कमी आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळलेल्या अर्धशिक्षित गोऱ्या पुरुषांच्या प्रचंड मतदार संघाला आकर्षित करण्यासाठी त्याने अनेक मूर्ख पोझिशन्स घेतल्या आहेत . (खाजगी आयुष्यात तो तसा नाही म्हणतात !) . आता खरे तर हे संपायला हवे . सार्वत्रिक निवडणुकीची लोकसंख्या वेगळीच आहे .
Trump Delusions about
Trump's Delusions about Competence
गोषवारा : ट्रंप हा अमेरिकन अर्थव्यवस्था कार्यक्षमरित्या मॅनेज करू शकेल असं मानणे हे फोल आहे.
ट्रंप हा अमेरिकन अर्थव्यवस्था
ट्रंप हा अमेरिकन अर्थव्यवस्था कार्यक्षमरित्या मॅनेज करू शकेल असं मानणे हे फोल आहे.
गब्बु - कोण करु शकणार नाही हे तू सांगतोयस तर सध्याच्या उमेदवारांपैकी कोण करु शकेल हे सांगणे हे गरजेचे नाही का?
आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या पैकी कमी वाईट किंवा जास्त चांगला असेच बघायला लागेल ना. अॅब्सोल्युट व्हॅल्युला काय उपयोग आहे.
गब्बु - कोण करु शकणार नाही हे
गब्बु - कोण करु शकणार नाही हे तू सांगतोयस तर सध्याच्या उमेदवारांपैकी कोण करु शकेल हे सांगणे हे गरजेचे नाही का?
आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या पैकी कमी वाईट किंवा जास्त चांगला असेच बघायला लागेल ना. अॅब्सोल्युट व्हॅल्युला काय उपयोग आहे.
मुद्दा एकदम मान्य.
लेखाचा लेखक पॉल क्रुगमन ने अत्यंत बेसिक प्रश्न खुबीने टाळलेला आहे.
एका बाजूला एक आदर्श चॉईस अस्तित्वात असतो व दुसर्या बाजूला एक अत्यंत खराब चॉईस अस्तित्वात असतो -- अशा काहीशा स्थितीतून निवड करायची असते - या स्वप्नरंजनातून हे असे लेख जन्मास येतात.
Voters see Donald J. Trump as
मुद्दा एकदम मान्य काय
.
Voters see Donald J. Trump as a hugely successful businessman, and they believe that success translates into economic expertise, Paul Krugman writes.
.
जरा लेखाची पार्श्वभूमी वाचा की, लेख कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लिहीलेला नसून, फक्त बिझनेस्मन असल्याने, वित्त्व्यवस्थेबद्दल (इकॉनॉमी) ट्रंप यांना जे अवास्तव महत्त्व दिले जाते त्या भ्रमाला टाचणी लावण्याकरता लेख लिहीलेला आहे. प्रॉब्लेम स्टेटमेन्ट पहील्याच ४ ओळींत स्पष्ट असता कै च्या कै दुसरं एक्स्पेक्ट करणं म्हणजे, झोपेचे सोंग घेण्यासारखे आहे.
.
running a business is certainly nothing like running a government.
.
या लेखात अन्य उमेदवारांशी ट्रंपची तुलना करण्याचा उद्देश्य नाहीच आहे. यशस्वी बिझनेसमॅन = यशस्वी इकॉनॉमिस्ट्/पॉलिटिशिअन या बाळबोथ, भाबड्या समजाला फक्त कात्री लावलेली आहे.
.
One of many peculier things about Trump's run for the white house is that it rests heavily on his claims of being masterful. -
वरील क्लेम कै च्या कै , आहे बोळ्याने दूध पिण्यासारखा आहे त्याला छेद देणे हा लेखाचा स्कोप आहे. त्यात तुम्ही स्वतःचा स्कोप क्रीप कशाला करताय?
या स्वप्नरंजनातून हे असे लेख
या स्वप्नरंजनातून हे असे लेख जन्मास येतात.
अश्या लेखांना स्वप्नरंजन म्हणणे म्हणजे कुगमन ला बेनिफीट ऑफ डाउट देणे होइल.
क्रुगमन, माझ्यापेक्षा तरी हुशार असेलच,गेला बाजार माझ्या इतका तरी. तरी पण तो जर आदर्श चॉइस आणि खराब चॉइस अशी आदर्श परीस्थिती कल्पुन लेख लिहीत असेल तर त्या मागे त्याचा उद्देश वेगळाच असणार. सर्व वॉलस्ट्रीट वाल ट्रंप आला तर काय ह्यानी घाबरले आहेत. म्हणुन स्वताचा फायदा चालू ठेवण्यासाठी बेसलेस विधाने करत आहेत.
क्या बात है!
आजचा दिवस अमेरिकेने दसरा म्हणुन साजरा करायला सुरुवात केली पाहिजे.
यथार्थ उपमा! फक्त दसर्याला आपल्याकडे सीमोल्लंघन करतात, इथे आपल्या सीमा बळकट करून इतरांच्या बेकायदेशीर घुसखोरीला अटकाव करायचा आहे!!
बुडाली हिलरी ती पाजी,
कायद्याचे राज्य बळावले
लिब्रलांचा क्षयो झाला,
आनंदवनभुवनी!!!!
धत्तड तत्तड, धत्तडा तत्तड!!
बजावो, गब्बरसिंग बजावो!!!!
:)
मी इमानेइतबारे गॅरी जॉन्सन ला
मी इमानेइतबारे गॅरी जॉन्सन ला मत दिले.
पण ओबामाकेअर रद्द केले जाईल या आशेने व मुख्य म्हंजे डेम्स चे नाक जमीनीवर रगडले गेल्याचा आनंद आहे. सिनेट, काँग्रेस, राष्ट्राध्यक्ष जिकडेतिकडे डेम्स चा पराभव होणे हे मस्तच. सारखं "ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स" आणि "Rich should pay fair share of the taxes" ची बोंबाबोंब करायची आणी टॅक्सेस लावायचे - हे थांबायला हवे. कॅलिफोर्नियामधे रिक्रीएशनल गांजा ला परवानगी मिळाली हे लिबर्टेरियन धोरणांस अनुसरूनच आहे. Proposition 61 सुद्धा पराभूत झाले असे ऐकतोय. तेव्हा धत्तड तत्तड, धत्तडा तत्तड.
हा हा हा हा
हफिंग्टन पोस्टच्या मुख्यपानावरचा थयथयाट पाहण्यासारखा आहे.
http://www.huffingtonpost.com/
मिलिअन्स विल लुझ इन्श्युरन्स
मिलिअन्स विल लुझ इन्श्युरन्स आलय ना.
विमा कंपन्या ओबेसिटी, काही सिरीयस आजार यांचे कारण दाखवुन, आता विमा नाकारु शकतात. - माझ्यासारख्यांना हे भयावह वाटते.
.
बाकी खफवरती अनुताई म्हणतात तसा हाकलून बिकलून दिले जाण्याची भीतीही वाटत नाही आणि समजा दार बंद झालेच तरी आमचंआयुष्य थांबणार नाही हेही माहीत आहे. "आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो."
.
मात्र इन्श्युरन्स वगैरे जाण्याची भीती जरुर वाटते.
ओबामा यायच्या आधी काय होतं?
ओबामा यायच्या आधी काय होतं? कोणी कावळ्याच्या शापानी मरत नव्हतं. आत्ताही ओबामाकेअर गेल्याने लोक अॅडजस्ट होतीलच. लाइफ गोज ऑन. तुमच्या (श्रीमंतांच्या) दिडक्यांवर कोणाचेही जीवन-मरणाचे भवितव्य अवलंबुन नाही. नकोच्चे दुसर्या कोणाचा पैसा. आमच्यासारख्या नोकरदार मध्यमवर्गीयांना काहीही फरक पडत नाही. वी विल अॅडजस्ट.
.
फक्त जे खरच गरीब आहेत त्यांना बिचार्यांना विमा मिळणार नाही ते अॅफोर्ड करु शकणार नाहीत.
.
बाकी तुम्ही मनातल्या मनात व्यक्तीचा, धोरणांचा खुशाल अपमान करत रहा. तुमचा विखार कोण अडवु शकणार?
ओबामा यायच्या आधी काय होतं?
ओबामा यायच्या आधी काय होतं? कोणी कावळ्याच्या शापानी मरत नव्हतं. आत्ताही ओबामाकेअर गेल्याने लोक अॅडजस्ट होतीलच. लाइफ गोज ऑन. तुमच्या (श्रीमंतांच्या) दिडक्यांवर कोणाचेही जीवन-मरणाचे भवितव्य अवलंबुन नाही. नकोच्चे दुसर्या कोणाचा पैसा. आमच्यासारख्या नोकरदार मध्यमवर्गीयांना काहीही फरक पडत नाही. वी विल अॅडजस्ट.
ओबामाकेअर हे गरीबविरोधी आहे असा पण मोठा प्रवाद आहे. पण त्याकडे तुम्ही लक्ष देणार नाहीच. कारण - सकृतदर्शनी जे दिसतं तेच संपूर्ण सत्य असतं असं गृहितच धरलेलं आहे तुम्ही. दुसरं म्हंजे मनोरथ छानछान असले की पॉलीसीज पण छानछान निर्माण होतात असे स्वप्नरंजन करत बसलं की तुम्हाला तुमचा स्वतःचा इगो कुरवाळता येतो.
पण मुख्य म्हंजे आम्हाला राग आहे तो कंपन्यांवर जबरदस्ती होतेय त्याचा. व दुसरे म्हंजे सगळ्यांचेच रेट्स वर जातायत त्याचा. तिसरे म्हंजे - हिलरी आली असती तर तिने औषधांच्या किंमतींवर पण निर्बंध आणले असते. तशी बडबड पण तिने केली होती.
---
फक्त जे खरच गरीब आहेत त्यांना बिचार्यांना विमा मिळणार नाही ते अॅफोर्ड करु शकणार नाहीत.
कदाचित कदाचित pre-existing condition बद्दल बोलत असाव्यात. ह्या बद्दल ओबामाकेअर च्या तरतूदी ह्या रामबाण इलाज असतात असे गृहितक असावे तुमचे. म्हंजे त्या तरतूदी इतर समस्या निर्माण करत नाहीत असे गृहितक.
दुसरे - कोणालाही त्यांचे शरीर इतके महत्वाचे असेल तर दमड्या मोजायची तयारी ठेवावी. नाहीतर सायनाईड वापरावे. आम्हाला आणखी आनंद होईल. युथेनेशिया ला आमचा पाठिंबाच आहे.
---
ट्रंप हा स्वतःच्या वेगळ्याच व मोठ्या समस्या निर्माण करेल ही भीती मी डिस्काऊंट करीत नाहिये.
ओबामाकेअर हे गरीबविरोधी आहे
ओबामाकेअर हे गरीबविरोधी आहे असा पण मोठा प्रवाद आहे. पण त्याकडे तुम्ही लक्ष देणार नाहीच. कारण - सकृतदर्शनी जे दिसतं तेच संपूर्ण सत्य असतं असं गृहितच धरलेलं आहे तुम्ही. दुसरं म्हंजे मनोरथ छानछान असले की पॉलीसीज पण छानछान निर्माण होतात असे स्वप्नरंजन करत बसलं की तुम्हाला तुमचा स्वतःचा इगो कुरवाळता येतो.
सकृतदर्शनी नाही पण इथे - http://obamacarefacts.com/obamacare-facts/ पुनरेकवार नजर फिरवुन आम्ही तुम्हाला उत्तर दिलं. आणि कोणत्या पॉलिसीज चूकीच्या निर्माण झाल्या?हा प्रश्न प्युअर अॅकॅडेमिक इन्टरेस्टम्धुन विचारत आहे. ज्ञानात भर पडावी या हेतूने. कारण तुमचं वाचन आमच्यापेक्षा कैक पटीने चांगले आहे. तुम्ही उत्तर देणार नाही हे माहीत असूनही.
.
पण मुख्य म्हंजे आम्हाला राग आहे तो कंपन्यांवर जबरदस्ती होतेय त्याचा (Stopping insurance companies from imposing unjustified rate hikes). व दुसरे म्हंजे सगळ्यांचेच रेट्स वर जातायत त्याचा. तिसरे म्हंजे - हिलरी आली असती तर तिने औषधांच्या किंमतींवर पण निर्बंध आणले असते. तशी बडबड पण तिने केली होती.
ओके. कंपन्यांवर जबरदस्ती होतेय हे खरे आहे, सर्वांचे रेटस वर जातायत हेही खरे आहे. ((१) Expanding Medicaid to millions in states that chose to expand the program. (२) Providing tax breaks to small businesses for offering health insurance to their employees. Requiring large businesses to insure employees. (३) Requiring all insurers to cover people with pre-existing conditions)
.
कोणालाही त्यांचे शरीर इतके महत्वाचे असेल तर दमड्या मोजायची तयारी ठेवावी. नाहीतर सायनाईड वापरावे. आम्हाला आणखी आनंद होईल. युथेनेशिया ला आमचा पाठिंबाच आहे.
तुम्ही जर सेंटर ऑफ युनिव्हर्स असता तर तुमच्या आनंदाखातर तेही झालं असतं हो. पण तुमचा दारुण अपेक्षाभंग करते आणि सांगतेच - आमच्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने,तुम्ही सेंटर ऑफ युनिव्हर्स नाही आहात.
.
आणि कोणत्या पॉलिसीज चूकीच्या
आणि कोणत्या पॉलिसीज चूकीच्या निर्माण झाल्या?हा प्रश्न प्युअर अॅकॅडेमिक इन्टरेस्टम्धुन विचारत आहे. ज्ञानात भर पडावी या हेतूने.
कोणत्याही एखाद्या व्यक्ती च्या आरोग्यासाठी (which is mostly a private good) साठी इतरांवर खर्च लादावा ही कल्पनाच मुळी दमनकारी व फडतूसवादी आहे. अॅडव्हर्स सिलेक्शन चा विचार नाही, मोरल हजार्ड चा विचार नाही. "घे पॉलीसी आणि लाद लोकांवर" हा प्रकार केला ओबामाने.
--
Requiring large businesses to insure employees. (३) Requiring all insurers to cover people with pre-existing conditions)
हेच हेच आम्हाला दमनकारी वाटते. कारण कंपन्या त्या सगळ्या कॉस्ट्स आमच्याकडे संक्रमित करतात.
Requiring all insurers to cover people with pre-existing conditions) - मुळे जे लोक आज इन्श्युरन्स विकत घेऊ शकतात व घेऊ शकले असते ते म्हणतात की आम्ही गरज पडली की घेऊ (कारण निकडीची गरज पडल्यानंतर आम्हाला कोणी नाकारू शकणार नाही.). म्हंजे ओबामाकेअर हे perverse incentives निर्माण करते. जोडीला त्याच्या अनेक कॉस्ट्स आमच्याकडे संक्रमित केल्या जातात ते वेगळेच.
--
तुम्ही जर सेंटर ऑफ युनिव्हर्स असता तर तुमच्या आनंदाखातर तेही झालं असतं हो. पण तुमचा दारुण अपेक्षाभंग करते आणि सांगतेच - आमच्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने,तुम्ही सेंटर ऑफ युनिव्हर्स नाही आहात.
च्यक. आम्हाला सेंटर ऑफ युनिव्हर्स नावाची कोणतीही गोष्टच अस्तित्वात नको आहे. आम्ही डिसेंट्रलाईझेशन च्या बाजूचे आहोत.
इन्शुरन्स नाही हो
इन्शुरन्स नाही हो. खालील शीर्षकांच्या बातम्या वाचल्या नाहीत का?
America Elected A Man Who Said ‘Grab Them By The P***y’ Over The First Female President
Dear Fellow White Women: We F***ed This Up
Billy Bush Was Fired After ‘Access Hollywood’ Assault Talk. Trump Gets To Become President.
किती ते फ्रस्ट्रेशन? टेक इट ग्रेसफुली.
हो गेले वर्षभर
जनरली लिबरल असणारे दोन कलीग ट्रंपला वोट देणार हे सांगत होते याच्याशी हे मिळतंजुळतं होतं. मी एकाबरोबर कारपूल करतो तो रजिस्टर्ड डेमोक्रॅट आहे. तोही हिलरीपेक्षा ट्रंप बरा अशा हिंट्स देत होता. याच विषयावर सारखं लिहून अॅडम्सने वैताग आणला होता खरंतर. पण बाकीच्या हिलरीपेड मी़डियापेक्षा वेगळं लिहिलेलं पटत होतं. प्रायमरीजच्या इलेक्षननंतर बऱ्याच लोकांनी सीरियसली घ्यायला सुरुवात केली. आता भाव चांगलाच वधारणार त्याचा. (गेल्या तीनचार महिन्यात य़ा लिखाणामुळं त्याचं प्रोफेशनली खूप नुकसान झालंय असं वाचलं. http://www.mercurynews.com/2016/11/01/why-scott-adams-of-dilbert-fame-r…)
मात्र या वर्षात एनपीआरबाबत फार मोठा भ्रमनिरास झाला. हिलरीचं प्रचारी चॅनल असल्यासारखं शेवटच्या दिवसापर्यंत बायस्ड न्यूज चालू होत्या. बाकीच्या मीडियाचे कल आणि प्रेफरन्सेस साधारण माहिती असतात. एनपीआरकडं आता मनोरंजनाचं साधन म्हणून पाहावं लागणार. रिअल न्यूजसाठी असे अॅडम्ससारखे एकांडे शिलेदार बरे.
अगदी
मात्र या वर्षात एनपीआरबाबत फार मोठा भ्रमनिरास झाला. हिलरीचं प्रचारी चॅनल असल्यासारखं शेवटच्या दिवसापर्यंत बायस्ड न्यूज चालू होत्या. बाकीच्या मीडियाचे कल आणि प्रेफरन्सेस साधारण माहिती असतात. एनपीआरकडं आता मनोरंजनाचं साधन म्हणून पाहावं लागणार.
अगदी मनातलं बोललात. काल नंदनशी फोनवर बोलतांना मी हेच म्हंटलं. मला वाटत होतं की हा फक्त माझाच समज झालाय की काय!
वर्षानुवर्षे ह्या साल्यांना ऑबजेक्टिव्ह रहाण्यासाठी आर्थिक मदत केली आणि हे हरामखोर निघाले!
आता काही नाही, फक्त शनिवार-रविवारचे कार्यक्रम वर्गणी न देता ऐकणार!!!
मत आणि विचार.
निळ्या, ते अॅडम्सकाका थोडे भारतीय असणार पाहा. भास्कराचार्याने म्हणजे सहाव्या-सातव्या-आठव्या शतकात (का) कधीतरी πची किंमत लिहून ठेेवलेली होती; कशी आली कोण जाणे! मग विज्ञान म्हणून त्याला किती किंमत देणार? अॅडम्सकाकांचं काम त्यापेक्षाही सोपं होतं, हो किंवा नाही, एवढंच म्हणायचं. मत आणि आकडे-विश्लेषण यांतून आलेला विचार यांत फरक असतो. पण चालायचंच.
हफींग्टन पोस्टवर ही बातमीही सापडली - If You’re Overwhelmed By The Election, Here’s What You Can Do Now
अर्थातच.
प्रश्न थोडासा र्हेटॉरिकल होता. किमान त्यांनी तरी अभ्यासपूर्ण मतं वाचून अशी आपली एक भाबडी आशा. (आता ट्रंपच्या राज्यात उरलंच काय म्हणा आम्हाला.) शिवाय, एरवी आपले थोर्थोर विचार व्यक्त करून आमच्या मनात अतिव आदराचे स्थान प्राप्त केलेल्या स्कॉटसाहेंबानी अजून काही ज्ञानकण उधळले असतील तर टिपावे म्हणतो.
विचारजंत लेकाचा!
हे पाहा, विचारजंत, आकडेबाज, एकंदरीतच जरा बुद्धी चालवणाऱ्यांचे दिवस फिरले आहेत. अँटी-रेनेसांसला सुरुवात झाली आहे (अडीच वर्षांपूर्वीच). सरळ मासे पाळा आणि सुखी व्हा.
US निवडणूकः चाणक्य माशाचे भाकित खरे ठरले
(ह्या प्रतिसादात पुरेसा विखार आहे ना? जिंकणाऱ्यांनी कृपया याकडे हरलेल्यांचे करुण विनोद म्हणून बघावं.)
इथे आहे
लेटेस्ट अंदाज इथे आहेत
http://blog.dilbert.com/post/152293480726/the-bully-party
https://www.washingtonpost.com/news/comic-riffs/wp/2016/03/21/donald-tr…
अंदाजांबाबत थोडे रिलेटेड पोस्ट्स
http://blog.dilbert.com/post/151007796236/i-score-the-first-debate
http://blog.dilbert.com/post/148740944816/trump-prediction-update
http://blog.dilbert.com/post/152747601271/trump-the-closer
http://blog.dilbert.com/post/150919416661/why-i-switched-my-endorsement…
http://blog.dilbert.com/post/131749156346/the-case-for-a-trump-landslid…
http://blog.dilbert.com/post/128776840091/trump-engineers-a-linguistic-…
अर्थात इथं तुकड्यातुकड्यामध्ये आहे. त्याचे गेल्या वर्षभरातले ब्लॉग्ज वाचले तर मस्त मनोरंजन होईल.
का आणि अंदाज
दोन चार दुवे उघडून पाहिले. स्कॉट अॅडम्स दिलेली ती कारणं वगैरे आहेत. तुम्ही अंदाज म्हणालात म्हणजे मला वाटलं थोडंफार सांख्यिकी असेल. कुठली राज्यं जिंकणार, किती मतांनी जिंकणार वगैरे असेल असं.
ट्रंप का जिंकणार याची कारणं असं म्हणायचं असेल तर मुद्दा वेगळा. विचारायचं कारण हेच की कोणताच (रिस्पेक्टेड/लेजिटीमेट) पोल हे भाकित करत नव्हता. इतकंच काय, स्वतः केली अॅन कॉनवे (जी स्वतः एक पोलस्टर आहे, मिशीगन वगैरे हिलरी जिंकेल वगैरे म्हणालेली मी ऐकली आहे. असो.
अंदाज वेगळा सांख्यिकी वेगळी
अंदाज वेगळा सांख्यिकी वेगळी! पैशे देऊन काहीही आकडे दाखवता येतात. किमान इथं ओहायोमध्ये कोलंबसच्या बाहेर दहा मैलावर गेलं की ट्रंप-पेन्सचे बोर्ड सगळीकडे दिसत होते. (इथल्या बहुतांशी रुरल कौंटींनी ट्रंपला कौल दिलाय) फॉल्स कलर बघायला पेनसिल्वेनिया-वर्जिनियामध्ये गेलो तेव्हा गॉड-गन्स-कोल-ट्रंप असे असंख्य बोर्ड दिसत होते. मिशिगनमध्ये दोनचार वेळा गेलो तेव्हा तिथंही फक्त ट्रंपचेच बोर्ड दिसले. आता आमच्यासारख्या अजाण प्रवाशांना जो कल कळून येतोय तो या आकडेपंडितांना कळत नसेल तर त्यांच्या आकड्यांचा आणि अकलेचा किती आदर करायचा हा प्रश्नच आहे. शिवाय कोणते आकडे बघता (http://www.aisiakshare.com/node/5389?page=1#comment-135646) हाही एक प्रश्नच आहे.
मिशिगन
केली अॅन कॉनवे (जी स्वतः एक पोलस्टर आहे, मिशीगन वगैरे हिलरी जिंकेल वगैरे म्हणालेली मी ऐकली आहे
निवडणुकीच्या की आदल्या दिवशी एनपीआरने मिशिगनमधली एक डेमोक्रॅटिक काँग्रेसवूमन बोलवली होती. ती अगदी घायकुतीला येऊन सांगत होती की मी गेले कित्येक महिने आमच्या पक्षाला सांगते आहे की इथलं वातावरण बिघडलंय. लोकांचा कल ट्रंपकडे आहे. काहीतरी करा. तो बराच आरडाओरडा झाल्यावर दस्तुरखुद्द ओबामांना दोन वाऱ्या कराव्या लागल्या. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आता लोकांशी कनेक्टेड असलेल्या तिचं म्हणणं योग्य की केली अॅन कॉजवे या निव्वळ आकडे फेकणारीचं?
लेजिटिमेट पोल्समध्ये खरे अंदाज कळत नव्हते याचंही कारण स्कॉट अॅडम्सच्या पोस्टमधून लक्षात येईल. ट्रंप जिंकेल असा केवळ अंदाज व्यक्त केल्यावर त्याचे अनेक प्रॉग्रॅम्स रद्द करण्यात आले, ऑनलाईन बुलीईंग केलं गेलं. ट्रंपला सपोर्ट करतो असं सांगणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात असंही त्याने ऐकलंय. आता कोणती शहाणी व्यक्ती पोल्सच्या अंदाजात खरं मत सांगेल?
अर्थ
नक्की म्हणायचय काय?
चुकीचं प्रेडिक्ट करणारे चॅनेल्स बरोबर आहेत आणि बरोबर प्रेडिक्ट करणारा अॅडम्स चुकीचा आहे, बरोबर?
काही पोलस्टरांनी विदा, विश्लेषण करून काही अंदाज मांडले होते; ते अंदाज प्रसृत करणारे बहुतांश वाहिन्या आणि वृत्तपत्र होती; हे अंदाज चुकले आहेत. त्यांची पद्धत कदाचित परिपूर्ण नसेल, कदाचित विदा अपूर्ण असेल, किंवा आणखी काही कारणं असतील. त्यांनी काही आकडे मांडले होते; ते प्रेडिक्शन.
अॅडम्सकाकांनी प्रेडिक्शन केलेलं नाही; मत मांडलेलं आहे. समजा एखाद्या पोलस्टरने विदा-विश्लेषण केलं आणि त्यात ट्रंप जिंकेल असं दिसत होतं, पण तिला मनापासून हिलरी जिंकावी असं वाटत असेल तर - 'ट्रंप जिंकणार' हे प्रेडिक्शन आणि 'हिलरी जिंकणार' हे मत. मत मांडण्यासाठी हो किंवा नाही, असे दोनच पर्याय असतात. प्रेडिक्शनसाठी कोणत्या राज्यात कोण जिंकेल, कोणत्या समाजगटातले लोक कोणाला अधिक प्रमाणात मतं देतील, ते असं का करतील याची काही समाजशास्त्रीय कारणं अशा जडजंबाल विश्लेषणाची आवश्यकता असते. त्याशिवाय बाकीचं सगळं 'सांगोवांगीच्या गोष्टी', किंवा 'मलासं वाटतं' किंवा 'he says, she says' या प्रकारांत मोडेल.
प्रेडिक्शन ही गोष्ट थोडी विज्ञानासारखी आहे. विज्ञानात मांडलेले निष्कर्ष तपासून बघण्याची आणि चुकीचे असल्यास दुरुस्त करण्याची सोय असते. आज जे विश्लेषक चुकले त्यांना पुढच्या निवडणुकांसाठी त्यांची मॉडेल्स सुधारण्याची संधी मिळालेली आहे; सगळे हुशार पोलस्टर आता आपापल्या मॉडेल्समधल्या चुका सुधारत बसतील. पण म्हणून त्यांना त्यांची मतं बदलण्याची गरज नाही; काल सकाळपर्यंत जे लोक उदारमतवादी होते ते (हिलरी पडली तरी) आज सकाळीही उदारमतवादीच असण्याची शक्यता जास्त.
नाही
अॅडम्सकाकांनी प्रेडिक्शन केलेलं नाही; मत मांडलेलं आहे.
अमुक अमुक गोष्ट होईल असं म्हणणं म्हणजे प्रेडिक्शन असा माझा समज आहे. विदा/आकडेमोड करून तसं म्हणण हे केवळ एक साधन झालं भाकित करायचं.
या लेखातून घेतलेल्या वाक्याप्रमाणे
And that is part of why Adams believes Donald Trump will win the presidency. In a landslide.
हे प्रेडिक्षन आहे. काय झालं पाहिजे यापेक्षा वरील वाक्य वेगळं आहे. इतरांनी आकडेमोड करून भाकित केलं. याने ट्रंपच्या काही सवयी पाहून त्याचा लोकांवर किती परिणाम होईल याचा विचार करून भाकित केलं. दोन्ही प्रेडिक्षन्स आहेत.
+१
मला साईनफेल्डमधला "पाऊस पडतोय हे सांगण्यासाठी वेदर चॅनेलची गरज नाही" असं म्हणणारा एलेनचा बाप आठवतोय.
गेल्या दहा वर्षात या तारखेला पाऊस पडला नाही, आम्ही १०० लोकांना विचारलं ते म्हणतात पाऊस पडणार नाही वगैरे 'आकडेवारी' काढून पाऊस पडणार नाही असा एक 'अंदाज' निघतो.
दुसरी पद्धत अॅडम्सची आहे. तो म्हणतोय की वारा सुटलाय, ढग दाटून आलेत त्यामुळं पाऊस पडणार आहे.
दोन्ही अंदाजच आहेत पण किमान या बाबतीत दुसरा जास्त रिलायबल आहे.
अमुक अमुक गोष्ट होईल असं
अमुक अमुक गोष्ट होईल असं म्हणणं म्हणजे प्रेडिक्शन असा माझा समज आहे. विदा/आकडेमोड करून तसं म्हणण हे केवळ एक साधन झालं भाकित करायचं.
मग ते कासवानं, माकडानं वगैरे निवडलेले पर्याय म्हणजे पण प्रेडिक्शन्स का? तुमच्या सारखे लोक कोणीही केलेल्या प्रेडिक्शन्सवर विश्वास ठेवत असतील नाही? उद्या कळायचं एखादा म्हणाला ट्रंपच्या बोच्यावर जिसस द रिडीमरचा टॅटू आहे म्हणून तो जिंकला की लगेच तुम्ही तो जिंकला म्हणजे टॅटू असणारच असं म्हणणार. असो. एखाद्याला किती शिकवता येतं याचीही मर्यादा असतेच.
मग ते कासवानं, माकडानं वगैरे
मग ते कासवानं, माकडानं वगैरे निवडलेले पर्याय म्हणजे पण प्रेडिक्शन्स का?
हो! कुंडली बघून जे केलं जातं तेही प्रेडिक्षनच. चूक असू शकेल ते. पण ते प्रेडिक्शनच आहे.
अजून सोपं करतो जरा. बघा समजतय का. इथे जा.
http://dictionary.cambridge.org/dictionary/english/prediction
याला डिक्षनरी असं म्हणतात. (अर्थ माहिती नसेल तर Dictionary असं गूगल करा.) डिक्षनरीमध्ये शब्दार्थ लिहिलेले असतात. तिथे गेलात तर तुम्हाला दिसेल की prediction या शब्दाचा अर्थ असा लिहिला आहे.
a statement about what you think will happen in the future
आता वरील चर्चा पुन्हा एकदा वाचा. नाही समजलं तर विचारा. पुन्हा समजावून सांगेन.
धन्यवाद
मग ते कासवानं, माकडानं वगैरे निवडलेले पर्याय म्हणजे पण प्रेडिक्शन्स का? तुमच्या सारखे लोक कोणीही केलेल्या प्रेडिक्शन्सवर विश्वास ठेवत असतील नाही?
मी लिहलेलं संपूर्ण वाक्य. दोन शेजारी लिहलेली वाक्यं वाचूनही संदर्भ तुम्हाला समजत नाही हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. १. एकंदरीत मुद्दाम काहीतरी फालतू वाद घालायचा किंवा २. कशातलंच काहीच कळत नाही यापैकी तुम्ही आहात असे वाटते दोन्हीत विशेष इंटरेस्ट नाही. तेव्हा चालूद्या.
भाषा
>>हो! कुंडली बघून जे केलं जातं तेही प्रेडिक्षनच. चूक असू शकेल ते. पण ते प्रेडिक्शनच आहे.
अजून सोपं करतो जरा. बघा समजतय का. इथे जा.
http://dictionary.cambridge.org/dictionary/english/prediction
भाषा ही गोष्ट खूप गंमतीशीर असते ह्याचा प्रत्यय ह्या वादावादीतून मिळाला. एकाच शब्दाला सारखे भासणारे, पण मोठे फरक असणारे अर्थ भाषेत असतात. आणि ते संदर्भचौकटीनुसार ठरतात. 'प्रेडिक्शन' ह्या शब्दाविषयी वाद चालू आहे म्हणून ह्या पानाकडे लक्ष वेधतो. informed guess or opinion, occultic divination पासून ते वैज्ञानिक सिद्धांत तपासण्यासाठीच्या 'extremely reliable and accurate' निकषांवर आधारित कसोट्यांपर्यंत मोठा पल्ला हा एकच शब्द कवेत घेतो. निवडणुकांच्या निकाल अंदाजांच्या संदर्भचौकटींतही हे सगळे प्रकार वापरून केलेले अंदाज किंवा व्यक्त केलेली मतं हवं तर बसवता येतीलही, मात्र त्यातली कोणती किती गांभीर्यानं घ्यायची ते व्यक्तिगत बदलेल. मात्र, प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून लख्ख ठेवण्याचं काम ज्यांचं असतं त्यांच्याकडून आपले निकष बदलायची तयारी आणि चुका सुधारायची तयारी अपेक्षित असते म्हणून अर्थातच वैज्ञानिक विचारसरणीनुसार त्यांना अधिक वजन प्राप्त होतं. म्हणून प्रश्न विचारत राहणं आणि शंका उपस्थित करणं महत्त्वाचं. जसं हे करताहेत (केवळ एक उदाहरण म्हणून). नाही तर 'बागों मे बहार है'च माथ्यावर बसणार.
निवडणुकांच्या निकाल
निवडणुकांच्या निकाल अंदाजांच्या संदर्भचौकटींतही हे सगळे प्रकार वापरून केलेले अंदाज किंवा व्यक्त केलेली मतं हवं तर बसवता येतीलही, मात्र त्यातली कोणती किती गांभीर्यानं घ्यायची ते व्यक्तिगत बदलेल.
अगदी बरोबर. कुणाच्या प्रेडिक्षनवर विश्वास ठेवायचा हे व्यक्तिप्रमाणे बदलेल. पुढल्या वेळेला अॅड्म्सच्या प्रेडिक्षनवर लोक याआधारे विश्वास ठेवतील. पुढल्या वेळेला नाही आलं त्याचं प्रेडिक्षन बरोबर तर फाट्यावर मारतील. त्याची थिअरी, पर्सुएशन का काय ते, बोगस आहे असा निष्कर्ष काढतील. अर्थात इथे प्रेडिक्षनवर कोणी काही निर्णय घेत नव्हते. ( उमेदवारांच वेगळं. त्यांना प्रेडिक्षनवर आपली रणनीती ठरवायची असते. चुकीच्या प्रेडिक्षनवर विश्वास ठेऊन स्ट्रॅटेजी चुकली असू शकते हिलरीकाकुंची.)
व्यक्तिनिरपेक्ष?
>>अगदी बरोबर. कुणाच्या प्रेडिक्षनवर विश्वास ठेवायचा हे व्यक्तिप्रमाणे बदलेल.
माझ्या प्रतिसादातला पहिला भाग व्यक्तिसापेक्षतेचा होता, आणि दुसरा भाग - प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून लख्ख ठेवण्याचं काम, आपले निकष बदलायची तयारी, चुका सुधारायची तयारी, वैज्ञानिक विचारसरणीनुसार कुणाला अधिक वजन वगैरे - व्यक्तिनिरपेक्ष गोष्टी होत्या. त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे?
प्रेडिक्ट कसं करायचं, चुकीचे
प्रेडिक्ट कसं करायचं, चुकीचे अंदाज केल्यावर काय चुकलं शोधुन पद्धत सुधारायची हे सिरियसली प्रेडिक्ट करणारा कोणीही करेलच. या गोष्टी व्यक्तिनिरपेक्ष आहेत हे बरोबर.
पण प्रेडिक्षनचे जे कंज्युमर आहेत त्यांनी कोणाला वजन द्यायचं हे केवळ समोरचा काय पद्धत वापरतो यावर ठरत नसून बरचसं ट्रॅक रेकॉर्डवर ठरेल. यात व्यक्तिसापेक्ष गोष्टी भरपूर आहेत. वरील उदाहरणात लोकांचं सँपल घेऊन त्याद्वारे अंदाज हे जास्तं वजनाचे आहेत हे प्रत्येकजण नाही मानणार. जरी स्टॅटिक्टिक्स हे त्यामागचं शास्त्र असलं तरी. दुसरा जी मेथड वापरतो, समजा, गर्दीचं मानसशास्त्र, ती आधीपेक्षा जास्तं वजनदार आहे का शास्त्रीय दृष्ट्या हे ऑब्जेक्टिव्हली ठरवता येणार नाही. ट्रॅक रेकॉर्ड/प्रत्येक व्यक्तीला आलेले त्या पद्धतीचे अनुभव यावर कोणाला अधिक वजन देतील लोक ते ठरेल.
परफेक्ट
मला म्हणायचंय ते अनुप यांनी आधीच म्हटलंय. थोडंसं आणखी.
अॅडम्सचे हे दोन लेख नक्की वाचा.
http://blog.dilbert.com/post/109880240641/sciences-biggest-fail
http://blog.dilbert.com/post/143217546751/science-proves-science-is-an-…
हे दोन्ही लेख गेल्या काही दशकात आलेली वेगवेगळी डायट रिलेटेड फॅड्स वगैरेंबाबत आहेत. पण मुळात लोक सायन्सवर विश्वास का ठेवत नाहीत याची कारणं उलगडून सांगतात.
The pattern science serves up, thanks to its winged monkeys in the media, is something like this:
Step One: We are totally sure the answer is X.
Step Two: Oops. X is wrong. But Y is totally right. Trust us this time.
आणि हे कायमच होत आलंय. आता त्याला दुसरं डायमेन्शन असं आलंय की लोकांना आलेले अनुभव, त्यांची समज - ज्याला अॅडम्स पॅटर्न रिकग्निशन म्हणतोय - वगैरेला आम्ही फाट्यावर मारतो असे म्हणणारे लोक स्वतःला विज्ञानाचे पुरस्कर्ते मानून दुसऱ्यांची अक्कल काढत आहेत.
एखादा म्हणाला ट्रंपच्या बोच्यावर जिसस द रिडीमरचा टॅटू आहे म्हणून तो जिंकला की लगेच तुम्ही तो जिंकला म्हणजे टॅटू असणारच असं म्हणणार. असो.
ट्रंपच्या बोच्यावर टॅटू आहे म्हणून तो जिंकतोय असं एखादा म्हणतोय आणि ते खरं ठरतंय याउलट तुमच्या तथाकथित वैज्ञानिक वगैरेवगैरेंवर आधारित पोल प्रेडिक्शन तोंडावर आपटताहेत तर खरी वैज्ञानिक वृत्ती अशी आहे की ट्रंपच्या बोच्यावर टॅटू असणे आणि त्याचं जिंकणे यात खरंच काही को-रिलेशन आहे की नाही हे शोधून काढणे. पण होतंय काय की ट्रंपच्या बोच्यावर टॅटू आहे म्हणून तो जिंकतोय असं म्हणणाऱ्यांची आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचीच खिल्ली उडवली जात आहे.
...would I want to live in a world in which people stopped using pattern recognition to make decisions?
विज्ञान
ट्रंपच्या बोच्यावर टॅटू आहे म्हणून तो जिंकतोय असं एखादा म्हणतोय आणि ते खरं ठरतंय याउलट तुमच्या तथाकथित वैज्ञानिक वगैरेवगैरेंवर आधारित पोल प्रेडिक्शन तोंडावर आपटताहेत तर खरी वैज्ञानिक वृत्ती अशी आहे की ट्रंपच्या बोच्यावर टॅटू असणे आणि त्याचं जिंकणे यात खरंच काही को-रिलेशन आहे की नाही हे शोधून काढणे. पण होतंय काय की ट्रंपच्या बोच्यावर टॅटू आहे म्हणून तो जिंकतोय असं म्हणणाऱ्यांची आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचीच खिल्ली उडवली जात आहे.
१. पोल्स ही विद्यावर आधारीत असतात आणि त्यातील उणिवा ह्या 'नोन' आहेत.
२. बोच्याचे को-रिलेशन आहे का नाही हे शोधून काढायच्या आधीच तुमचा त्यावर विश्वास बसलेला आहे. हे वैज्ञानिक सिद्धांतावर आधारीत नाहीच. पुराव्याशिवाय विश्वास न ठेवणे शास्त्रीयच आहे.
स्कॉट अॅडम्सचे विश्लेषण शास्त्रीय नाही. ते असेल त ते का याचे विश्लेषण तुम्ही करावे.
नाही
मुद्दा प्रेडिक्शन करण्याचा कोणत्या मार्गाला किती विश्वासार्ह मानायचं हा आहे. एक उदाहरण देतो, विचार करून पहा.
एल ए टाईम्सच्या एका पोलने ट्रंप जिंकण्याचा रिझल्ट दाखवला होता. पण तो पोल बरोबर आहे असे कोणीही (पोल बिझनेस मध्ये असणारा) म्हणत नाहीए. कारण त्या पोल नुसार ट्रंप नॅशनली ५ पाँईट ने जिंकेल असा निकाल दिला होता. वास्तवात नॅशनली ट्रंप १ पाँईटने हरला आहे. इन काँन्ट्रास्ट, समजा एखाद्याने १०० वेळा नाणेफेक करून ट्रंप जिंकेल असे सांगितले असते तर त्याला विश्वासार्ह मानायचं का?
असो. हा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद. पोलिंग हा प्रकार किती गुंतागुंतीचा आहे ज्याला माहितीए त्यांची मतं विचारून पहा म्हणजे कळेल.
Do facts matter?
>> मुद्दा प्रेडिक्शन करण्याचा कोणत्या मार्गाला किती विश्वासार्ह मानायचं हा आहे.
+१. ह्या संदर्भात हेही वाचा -
The Most Depressing Discovery About the Brain, Ever
Do facts matter?
The answer, basically, is no. When people are misinformed, giving them facts to correct those errors only makes them cling to their beliefs more tenaciously.
Do facts matter? The answer,
Do facts matter? The answer, basically, is no. When people are misinformed, giving them facts to correct those errors only makes them cling to their beliefs more tenaciously.
जाताजाता : थॉमस काहील च्या मते प्लेटो ने सुद्धा अशीच गलती केली होती. (अशीच म्हंजे नेमकी हीच नाही. तर ... अशाच प्रकारची.)
Plato made the fatal error of equating knowledge with virtue and assuming that if one knows what is right he will do what is right. ____ from page 184 of Thomas Cahill’s "Sailing the Wine-Dark Sea: Why the Greeks Matter".
+१
मुद्दा प्रेडिक्शन करण्याचा कोणत्या मार्गाला किती विश्वासार्ह मानायचं हा आहे.
बरोबर. एखाद्या मार्गाचा सक्सेस रेट जास्त असेल तर तो निश्चितच विश्वासार्ह आहे. निव्वळ आकडे फेकून सायन्स असल्याचा आव आणणारा (आणि फेल्युअर रेट जास्त असणारा) मार्ग एखाद्या अंधश्रद्धेपायी कोणाला विश्वासार्ह वाटत असेल तर गुड लक!
Do facts matter?
The answer, basically, is no. When people are misinformed, giving them facts to correct those errors only makes them cling to their beliefs more tenaciously.
करेक्ट. फॅक्टस आणि पॉलिटिक्सचा काहीही संबंध नाही. अॅडम्सनेही तेच लिहिलंय.
पुन्हा तेच
वरचे प्रतिसाद परत एकदा वाचून पहा. असो. याअधिक लिहूनही तुम्हाला कळेल का याविषयी शंकाच आहे. तेव्हा माझा वेळा वाया घालवण्यात अर्थ नाही.
जाता जाता: Even The GOP Thought Trump Would Lose
थोर तुझे उपकार ट्रंपा...
फॅक्टस आणि पॉलिटिक्सचा काहीही संबंध नाही. अॅडम्सनेही तेच लिहिलंय.
या संशोधनासाठी एनेफेसकडून ग्रांट मागितली का तेवढेही कष्ट करायची गरज नाही अॅडम्सकाकांना? मध्ये गब्बर बिल मार लैंगिकता-तज्ज्ञ असल्याचं सुचवत होता, आता अॅडम्सकाका मानसशास्त्र-तज्ज्ञ. मज्जा ब्वॉ अमेरिकी लोकांची आणि पर्यायाने जगाचीही!
गुंतागुंत
प्रेडिक्षनचे जे कंज्युमर आहेत त्यांनी कोणाला वजन द्यायचं हे केवळ समोरचा काय पद्धत वापरतो यावर ठरत नसून बरचसं ट्रॅक रेकॉर्डवर ठरेल.
न्यूयॉर्करमधला निवडणुकीआधी आलेला हा लेख, आणि निवडणुकीचा प्रचार आणि पुढचे निकाल बघून - लोक ज्योतिष, पोपट, चाणक्य मासा किंवा नाणेफेकीवर अधिक प्रमाणात विश्वास ठेवतील याबद्दल मला शंका वाटत नाही. आजही निरनिराळ्या समाजांत ज्योतिषाला किती गिऱ्हाईक आहे, हे निराळं सांगायची गरज नाही.
त्यात प्रश्न असा की एसेमेस मिळवून विजेते ठरलेले महागायिका-महागायक यांना संगीत अधिक समजतं म्हणायचं का (व्यक्तिमत्त्वात अनेक दोष असलेल्या परंतु) वर्षानुवर्षं साधना करणाऱ्या कलाकारांना संगीत अधिक समजतं असं म्हणायचं? या प्रश्नाचं उत्तर आणि त्यामागची कारणं आपापली ठरवायची आहेत.
पॅटर्न रेकग्निशन
नानावटींच्या दिवाळी अंकातल्या लेखाचं टायमिंग एवढं महत्त्वाचं आहे, हे लेख पहिल्यांदा वाचताना लक्षात आलं नव्हतं. (लेखाचा दुवा - चुका (केल्यावर) होतच राहणार!)
लेखातील उद्धृत - खरं पाहता ही उत्स्फूर्तताच मानवी उत्क्रांतीत भरपूर फायदेशीर ठरत गेली. माहितीच्या डोंगराखाली दबलेल्या या प्राण्याला उत्स्फूर्ततेतून शॉर्टकट्स मिळायला लागले; त्यामुळे समस्यांच्या व आपत्तीच्या जंजाळातून सहीसलामत सुटका होऊ लागली. 'मला वाटतं' (गट फीलिंग) अशा प्रकारे निर्णय घेत गेल्यामुळे हे करू की ते, किंवा ते उत्कृष्ट की हे, असं 'हॅम्लेट'मधल्या भुतासारखे प्रश्नांच्या तावडीत न सापडता, अत्युत्कृष्ट नसलं तरी चालेल, परंतु कठीण प्रसंगातून बाहेर पडता यायला हवं, एवढ्यावरून मनुष्य कृतीशील झाला आणि 'मला वाटतं' ही भावना बहुतेक वेळा फलदायी ठरली.
परंतु आपल्याला जे 'वाटतं' ते दर वेळी कामी येईलच याची खात्री कुणी देऊ शकणार नाही. काही प्रसंगांत ते ठीक आहे असं वाटत असलं तरी त्याची चिकित्सा न केल्यास आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. व ही चिकित्सा न करणं किंवा करता न येणं यातूनच मूर्खपणाची सुरुवात होते. मी रुळलेल्या वाटेवरून जात असून ही पारंपरिक कृती मला योग्य ठिकाणी पोचवते, असं निर्देश करणारं एखादं बटण आपल्या मेंदूत नाही. त्यामुळे मेंदूला चिकित्सकपणे विचार करण्यात प्रशिक्षित करावंच लागेल. मेंदूतल्या न्यूरॉन्सना ट्रेनिंग देऊन तरबेज करावंच लागेल.
याच लेखाखाली संदर्भ म्हणून दिलेला आणखी एक दुवाही रोचक ठरावा - I’m with stupid
प्रेडिक्शन ही गोष्ट थोडी
प्रेडिक्शन ही गोष्ट थोडी विज्ञानासारखी आहे.
"थोडी" विज्ञानासारखी - हा शब्दप्रयोग रोचक आहे. वैज्ञानिक तै कडुन अपेक्षीत नव्हता.
पोलस्टरच्या मॉडेल्स मधे चुका नसणार, तर ते मॉडेलच चुक असणार. आणि मुळात मॉडेल होते का तरी? का सौदीहुन आलेल्या पैश्यावर पोल चे निकाल लिहीले जात होते?
१५००-२००० लोकांना विचारुन आणि ते खरं सांगत असतील असे पकडुन मॉडेल बनवणारे बाबाबंगाल्यांपेक्षा वेगळे नाहीत.
न्यूज चॅनेल्स
इलेक्शनच्या काळात वॉशिंग्टन पोस्टच्या एका माजी एक्झिक्युटिव एडिटरची मुलाखत ऐकली होती. वापो 100% लिबरल आहे. मात्र ही व्यक्ती स्वतः पदावर असताना त्याने आठ वर्षं मतदानही केलं नाही कारण त्यावेळी कुठलीतरी बाजू घ्यावीच लागली असती.
त्याच्या मते आजकाल लोक बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत कारण पत्रकार निष्पक्ष रिपोर्टिंग करण्याऐवजी त्यांच्या राजकीय प्राध्यान्यांनुसार रिपोर्टिंग करतात. (त्याच्या मते) ८०% पेक्षा जास्त पत्रकार रजिस्टर्ड डेमोक्रॅट आहेत.
(बातमीचा दुवा शोधायचा प्रयत्न करतोय)
माध्यमांची विश्वासार्हता
त्याच्या मते आजकाल लोक बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत कारण पत्रकार निष्पक्ष रिपोर्टिंग करण्याऐवजी त्यांच्या राजकीय प्राध्यान्यांनुसार रिपोर्टिंग करतात. (त्याच्या मते) ८०% पेक्षा जास्त पत्रकार रजिस्टर्ड डेमोक्रॅट आहेत.
यात थोडी गडबड वाटते आहे. एक तर, पत्रकारांनी रजिस्टर्ड डेमोक्रॅट किंवा रिपब्लिकन असणं आवश्यक नाही. कदाचित, त्यांचा निर्देश केवळ वॉशिंग्टन डी.सी. शहरातल्या रजिस्टर्ड पत्रकारांच्या एका छोट्या उपसंचाकडे असू शकेल. फॉक्स न्यूजतर्फे या खेपेला डिबेट मॉडरेटर असणार्या ख्रिस वॉलेसच्या पक्षसंलग्नतेवरून दहा वर्षांपूर्वी झालेली चर्चा, हे उदाहरण या संदर्भात बोलकं आहे:
On October 11, 2006, The Washington Post reported that Wallace had been a registered Democrat for more than two decades. Wallace explained his party affiliation in terms of pragmatism, saying that being a Democrat is the only feasible means of participating in the political process in heavily Democratic Washington, D.C. He maintained that he had voted for candidates from both major parties in the past.[28]
शिवाय मेनस्ट्रीम मीडिया, विशेषतः मुद्द्यांच्या बाबतीत, डावीकडे कललेला असला तरी रिपब्लिकन पक्ष जितका सातत्याने कंठशोष करतो तितका नाही; असं मला वाटतं. फॉक्स न्यूज, वॉल स्ट्रीट जर्नल हेही मुख्य धारेतच मोडतात आणि त्यांचा प्रेक्षक/वाचकवर्ग लक्षणीय आहे. त्याव्यतिरिक्त 'न्यू यॉर्क ऑब्झर्व्हर' (ट्रम्पचा जावई जॅरेड कुशनरच्या मालकीचे), नेव्हाडातले सर्वाधिक खपाचे 'लास वेगस रिव्ह्यू जर्नल' (ट्रम्पसमर्थक शेल्डन अॅडल्सनच्या मालकीचे), ब्राईटबार्ट.कॉम (ट्रम्प कॅम्पेनचा सीईओ स्टीव्ह बॅननचे) आणि इतर अनेक वेबसाईट्स/टॉक शोज् कन्झर्व्हेटिवांची बाजू मांडत असतात.
बाकी लोक बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत यापेक्षाही केवळ आपल्या भूमिकेला सोयीस्कर अशा गोष्टींवरच विश्वास ठेवतात, असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. विशेषतः, फेसबुक आणि ट्विटरच्या काळात हा कन्फर्मेशन बायस अधिक बळावला आहे. तो दोन्ही बाजूंत आढळून येतो.
अमेरिकन मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे निष्पक्षतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा दावा अजिबात नाही. मात्र माध्यमांच्या घटत्या विश्वासार्हतेबद्दल बोलायचं झालं तर: निक्सन-स्पिरो अॅग्नूपासून ते पेलिनपर्यंत राजकारण्यांनी आपली कातडी बचावण्यासाठी मीडियाला केलेलं लक्ष्य, रेगनने निकालात काढलेली एफ.सी.सी.ची फेअरनेस डॉक्ट्रिन, त्यातून केबल टीव्हीच्या काळात निपजलेले फॉक्स आणि नंतर एमएसएनबीसी असे उघडपणे एकांगी असणारे न्यूज चॅनेल्स, दीर्घ ऊहापोह वाचण्याऐवजी चटपटीत बातम्या वाचण्याकडे असलेला वाचकांचा नैसर्गिक कल आणि त्यातून उद्भवणारं 'क्लिकबेटिंग', मार्केटशरणतेमुळे सतत 'ब्रेकिंग न्यूज' देण्याची अहमहमिका असे अनेक घटक विचारात घ्यावे लागतील.
अॅक्चुअल डिबेट आणि डिबेटचं रिपोर्टिंग यात फरक आहे
अॅक्चुअल डिबेट आणि डिबेटचं रिपोर्टिंग यात फरक आहे. पहिल्या डिबेटमध्ये हिलरीने स्पष्टपणे बाजी मारली होती. पण नंतरच्या डिबेटमध्ये ट्रंप समतुल्य वाटत होता. तिसऱ्या डिबेटमध्ये हिलरी रडकुंडीला आली होती. अर्थात तिन्ही डिबेटच्या रिपोर्टिंगमध्ये हिलरी 'जिंकली' असं सांगत होते ते सगळं चित्र नव्हतं.
पुन्हा स्कॉट अॅडम्सः पहिली डिबेट ट्रंपने हरणं हे ट्रंपची प्रतिमा उजळवणारं होतं असं तेव्हा अॅडम्सने म्हटलं. ट्रंप हरला तरी ग्रेसफुली घेतो, प्रेसिडेन्शिअल बिहेवर ठेवतो हे त्यामुळं त्यामुळं लोकांना दिसलं. http://blog.dilbert.com/post/151007796236/i-score-the-first-debate
Trump was defensive, and debated poorly at points, but he did not look crazy. And pundits noticed that he intentionally avoided using his strongest attacks regarding Bill Clinton’s scandals. In other words, he showed control. He stayed in the presidential zone under pressure. And in so doing, he solved for his only remaining problem. He looked safer.
By tomorrow, no one will remember what either of them said during the debate. But we will remember how they made us feel.
Clinton won the debate last night. And while she was doing it, Trump won the election. He had one thing to accomplish – being less scary – and he did it.
त्यामुळं डिबेटमुळे काही फरक पडत नाही असा निष्कर्ष लगेच काढता येणार नाही.
काहिहि म्हणा...
अमेरिकन लोक फडतुसपणाला केराची टोपली दाखवतात हे या निकालाने पुन्हा एकदा सिध्द झाले अन डोक्यावरचे अनावश्यक दडपण नाहीसे झाले ;) अर्थात अमेरीकन लोक इस्त्रिला सक्षम अथवा कणखर मानत नाहीत म्हणून त्यांचा प्रेसीडंट कधीच इस्त्री नसतो हा सुर बहुधा याआधी ऐसीवरच वाचल्याचे वाटते.
चला किमान पाचवर्षे अमेरीका आता भक्कम खांद्यांवर उभी असेल हे बरे... तिकडे पुतीनवाने अतिशय सावध प्रतिक्रीया दिलेली आहे बघुया अब आगे क्या होगा ते.
गोविंद तळवलकर
तळवलकर यांचा लेख
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/wonder-of-the-world…
ट्रम्प जिंकले, तेव्हा टीव्हीवरील सर्व तथाकथित पत्रपंडित म्हणू लागले की त्यांना लोकांच्या मताचा अंदाज आला नाही. हे लोक गेले पंधरा महिने कोणाशी बोलत होते हा प्रश्न पडतो.
....
अनेक लोक ट्रम्प यांच्या बाजूचे होते पण आपल्याला लोकांनी वंशवादी म्हणू नये म्हणून ते ट्रम्प यांना पाठिंबा असल्याचे उघड करीत नव्हते. युनिव्हर्सिटीतील गोरा दारवान पहिल्यांदा म्हणाला, की त्याला हिलरी व ट्रम्प दोघे आवडत नाहीत. आम्हाला कुठचाच राजकारणी आवडत नाही असे त्याला सांगितल्यावर मात्र ट्रम्प यांना तो पाठिंबा देतो असे तो म्हणाला. बऱ्याच शिकलेल्या लोकांचेही असे मत होते, पण ते उघड सांगण्याची अनेकांना भीड पडली होती.
हा हा हा. मी पण हेच म्हणत होतो.
उलट
अमेरका, जिची जगभरात ढवळाढवळ चालू असते, जिची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी आहे, सारख्या देशात एक माथेफिरू निवडून आला म्हणून जगभर काय परिणाम होऊ शकतील याचा विचार करता जगभरात चर्चा सुरू झालेल्या आहेत यात काहीच नवल वाटत नाही. ज्यांना त्यात नवल वाटतं नाही त्यांच्याबाबत मात्र मला कौतुक आणि नवल वाटत आहे.
सहमत-असहमत
अमेरका, जिची जगभरात ढवळाढवळ चालू असते, जिची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी आहे, सारख्या देशात एक माथेफिरू निवडून आला म्हणून जगभर काय परिणाम होऊ शकतील याचा विचार करता जगभरात चर्चा सुरू झालेल्या आहेत यात काहीच नवल वाटत नाही.
'याचे जागतिक - बोले तो आपल्यावरसुद्धा - प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम कदाचित होऊ शकतील', या कन्सर्नीतून चर्चा होत असत्या, तर एक वेळ सहमत होऊ शकलो असतो, पण तसे काही दिसत नाही. इथे गंमत बघत तंबाखू चोळत (तंबाखू चोळण्याचा भाग मात्र केवळ फिग्युरेटिवच, हं!) चर्चा करणाऱ्या त्रयस्थ बघ्यांचीच मांदियाळी अधिक दिसते. असो चालायचेच.
पण इथेच बघे अधिक का?
बघ्यांचीच मांदियाळी अधिक दिसते.
पण इथेच बघे अधिक का याचे कारणच वरती उल्लेखलेले आहे. मुळात बघ्यांना निर्माण झालेला इंटरेस्ट हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वातावरणनिर्मितीने, ज्याचा उगम वर दिलेल्या कारणांत आहे, झालेला आहे. तेव्हा हे परस्पर विरोधी नाही असे मला वाटते. जाता, जाता, इतर देशांशी तुलना करून पाहता येईल. टर्कीत झालेला कू प्रकार, येमेन मधील धुमाकूळ वगैरे वगैरेत हेच बघे का बरं इतका रस घेत नाहीत? कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झळ/फायदे यांना होण्याची तितकी शक्यता नाही-तस्मात टीआरपी नाही वगैरे वगैरे.
असो.





संपूर्ण चित्र?
In reply to बाकी काही असो पण ट्रंपोबांनी by ऋषिकेश
हिलरी समर्थकांचा स्त्रीवादी आग्रह (उदा. ग्लोरिया स्टायनमने केलेली विधानं आणि पुढे ती मागे घेणं) वगळता त्यांनी घाऊक प्रमाणात दाखवलेलं अज्ञान माझ्या आठवणीत नाही. काही उदाहरणं देता येतील का? 'टुडे' शोवर कोणत्याही हिलरी समर्थकांची प्रतिक्रिया मी बघितली नाही वा तसं इथे लिहिलेलंही नाही.
मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधा; हिस्पॅनिक लोक बलात्कारी आणि गुंड प्रवृत्तीचे असतात; अमेरिकी नसणाऱ्या मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश मिळू नये; दहशतवाद्यांना बंदुका मिळवता येतीलच पण सामान्य नागरिक स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण कसं करणार; अशी विधानं करणारा मनुष्य 'एकमेकांची तक्रार करा' अशी विधानं करतो तेव्हा माझ्या जीभेवर कडवट चव रेंगाळते. ही आधीची विधानं केली नसती तर ह्या विधानाबद्दल वेगळा विचार करणं शक्य होतं.