अमेरिकन निवडणूक : ट्रंपच्या विजयाचा अर्थ
रोनाल्ड रीगन ने सुरु केलेल्या जागतिकीकरणातून गोऱ्या अर्धशिक्षित कामगारांची प्रचंड वाताहत होऊन त्यातून अखेर ट्रम्प निवडून आला आहे . सध्याचे जागतिक-भांडवलशाहीचे जन-विरोधी स्वरूप यापुढे चालवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट संदेश या विजयातून दिला गेला आहे. हिलरीला प्रत्यक्ष मतांमध्ये ट्रम्पपेक्षा सुमारे दोन लाख मते अधिक मिळाली आहेत हे इथे नोंदवितो.
ट्रम्प जिंकण्याचे इतर काही परिणाम:
१. इराण बरोबरचे "डील " रद्द होईल, आणि सुप्त मार्गाने इराण दोन-तीन वर्षात स्वतःचा अणुबॉम्ब तयार करेल ज्याने जग अधिकच अस्थिर होईल .
२. अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडेल . खनिज तेल उत्पादनावरचे निर्बंध रद्द झाल्यामुळे प्रदूषण आणि तापमान वेगाने वाढून जगाचे अनेक भाग वीसएक वर्षे लवकर मानवी वस्तीला नालायक होतील . काही कोटी लोक मरतील. भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या शहरांना मोठा धोका निर्माण होईल .
३. ओबामाकेअर रद्द झाल्यामुळे अमेरिकेतील गरिबांची वैद्यकीय विमा मिळण्याची उरली-सुरली आशा नष्ट होईल .
४. ख्रिश्चन मूलतत्ववाद्यांचे फावेल . स्त्रियांच्या पुनरुत्पादन-स्वातंत्र्यावर प्रचंड मर्यादा येतील . अडचणीतील स्त्रियांना मदत करणारी प्लॅन्ड पेरेंटहूड ही सरकारी संस्था निकालात काढली जाईल .
५. पोलिसांचे कोणालाही गोळ्या घालण्याचे स्वातंत्र्य अधिकच बळकट होईल .
परंतु अमेरिकन लोकांनी बहुमताने मान्य केलेले हे परिणाम आहेत . पुढची चार वर्षे कशी जातात ते बघायचे. भारतीयांना कोणताही धोका होईलसे वाटत नाही .
हिलरी क्लिंटन प्रचारयंत्रणा
हिलरी क्लिंटन प्रचारयंत्रणा निधी चा तपशील
प्रचार समीतीने उभा केलेला निधी - $497,808,791
प्रचार समीतीने उभ्या केलेल्या निधी पैकी झालेला खर्च - $435,367,811
डॉनाल्ड ट्रंप प्रचारयंत्रणा निधी चा तपशील
प्रचार समीतीने उभा केलेला निधी - $247,541,449
प्रचार समीतीने उभ्या केलेल्या निधी पैकी झालेला खर्च - $231,546,996
अमेरिकन निवडणूक : ट्रंपच्या विजयाचा परिणाम - इतके असूनही Citizens United v. Federal Election Commission हा निर्वाळा व त्याभोवतीची बोंबाबोंब कमी होणार नाही.
चोर, ढोगी, पॅरॅसाइइट
चोर, ढोगी, पॅरॅसाइइट वृत्तीच्या लोकांना 'सर्वसामान्य कष्ट करुन कायदेशीर आयुष्य जगणारे" अत्यंत वैतागले आहेत. इतके वैतागले आहेत की वेळ पडली तर ते ट्रंप ला सुद्धा मत देऊ शकतात.
इतका साधा अर्थ आहे, ब्रेग्झीट च्या मतदानातुन सुद्धा हेच दिसले होते.
बाकी तुमचे मुद्दे नेहमीप्रमाणे अत्यंत निरर्थक आहेत आणि त्याला फीअर माँगरीम्ग म्हणतात. ह्यातले काहीही होणार नाही. अमेरीकेसाठी आणि सामान्य अमेरीकी जनतेसाठी नक्कीच काहेतरी चांगले होईल.
अमेरीकेत राहुन, सर्व फायदे उपटुन त्या देशाला आतुन पोखरत रहाणार्यांचे नक्कीच भले होणार नाही.
फीअर माँगरीम्ग
सत्य कडू असते आणि बोचतेच. वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगांना समजायला जरा (बराच?) वेळ लागतो इतकेच !
अमेरीकेत राहुन, सर्व फायदे उपटुन त्या देशाला आतुन पोखरत रहाणार्यांचे नक्कीच भले होणार नाही.
देशाच्या चुकीच्या कृतींनाही योग्यच म्हणायचे अशी शाळकरी देशभक्ती इथे प्रचलित नाही .
गंमत
ट्रंप नक्की काय करेल ते मला सांगता येणार नाही. मात्र, ट्रंपच्या विजयाविषयी इथे आणि सोशल मीडियावर इतरत्र काही भारतीय जो आनंद व्यक्त करताना दिसत आहेत त्यात काही विरोधाभास दिसतो आहे. आपण इथे म्हणता -
>>रोनाल्ड रीगन ने सुरु केलेल्या जागतिकीकरणातून गोऱ्या अर्धशिक्षित कामगारांची प्रचंड वाताहत होऊन त्यातून अखेर ट्रम्प निवडून आला आहे . सध्याचे जागतिक-भांडवलशाहीचे जन-विरोधी स्वरूप यापुढे चालवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट संदेश या विजयातून दिला गेला आहे.
ट्रंपच्या मतदारांसाठी हा मुद्दा खरंच कळीचा असावा असं आता तरी वाटतं आहे. पण इथेच खरी गंमत सुरू होते. जे भारतीय सध्या ट्रंपच्या विजयामुळे खूश दिसताहेत त्यांपैकी बरेचसे लोक खरं तर ज्या जागतिकीकरणाच्या धोरणांमुळे आर्थिक प्रगती करू शकले त्याच धोरणांच्या विरोधातला हा मुद्दा आहे. अमेरिकन अर्थकारण शक्यतो स्थानिक नोकरीनिर्मितीला प्राधान्य देणारं असावं, आउटसोर्सिंग नको वगैरे मुद्दे खरं तर समाजवादी आणि प्रोक्टेशनिस्ट आहेत. पण उजव्या किंवा लिबर्टेरियन विचारसरणीचेही लोक त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे विरोधाभास मला मजेशीर वाटत आहेत.
तात्त्विक गंमत
>>त्यामुळे चीन सद्ध्या जात्यात आहे. आपण सुपात आहोत.
( अॅक्चुअली याचा फटका भारतातील कपडे निर्यातीलादेखील बसू शकतो.)
कोण जात्यात, आणि ह्याचा प्रत्यक्ष फटका आपल्याला बसू शकेल किंवा नाही हे वेगळे मुद्दे आहेत. एक राजकीय-आर्थिक विचारसरणी म्हणून मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध व्हायला हवा ह्या आशेनं अमेरिकन लोकांनी ट्रंपला निवडून देणं आणि त्याच मुक्त अर्थव्यवस्थेच्या जोरावर ज्यांनी आर्थिक प्रगती करून घेतलेली आहे त्यांनी ह्यावर आनंद व्यक्त करणं ह्यात एक मूलतः विरोधाभास आहे.
सरसकट नसावं
>> पण त्यांचं ट्रंप समर्थन हे त्याच्या इस्लामी दहशतवादाविरुद्ध घेतलेल्या ष्ट्यांडमुळे आहे हे उघड आहे.
- ते सगळेच मोदीभक्त किंवा इस्लामद्वेष्टे नसावेत.
- जे इस्लामद्वेष्टे आहेत त्यांच्या बाबतीत तुमचं म्हणणं ग्राह्य धरलं तर तुमचं म्हणणं मोदींना मिळणार्या पाठिंब्याबद्दल थत्तेंच्या म्हणण्याशी मिळतंजुळतं ठरतं. बरोबर ना?
- मला फक्त इथलेच भारतीय अभिप्रेत नव्हते तर परदेशस्थ लोकही अभिप्रेत होते. ते कदाचित उजवे आहेत, पण ते सरसकट सगळे इस्लामद्वेष्टे नसावेत.
ओके
मी इथल्या ट्रंप समर्थकांबद्दल म्हणत होतो.
ते सगळेच मोदीभक्त किंवा इस्लामद्वेष्टे नसावेत.
इथे मोदी विरोधक पण ट्रंप समर्थक लोक कोणी असावेत असं वाटत नाही. असलेच तर इथले टोकाचे लिबर्तेरिअन लोक असतील. जे मोदी समर्थक राहिले नसावेत असं वाटत आहे. ( आधार, नरेगा चालू ठेवल्याने. )
जे इस्लामद्वेष्टे आहेत त्यांच्या बाबतीत तुमचं म्हणणं ग्राह्य धरलं तर तुमचं म्हणणं मोदींना मिळणार्या पाठिंब्याबद्दल थत्तेंच्या म्हणण्याशी मिळतंजुळतं ठरतं. बरोबर ना?
नाही.
थत्त्यांचं म्हणणं --> मोदींचे सर्व मतदार (४०%) मुस्लिम द्वेष्टे आहेत.
माझं म्हणणं --> फारतर असं म्हणता येईल की सर्व मुस्लिम द्वेष्टे मोदींचे मतदार आहेत. ( फारतर अशासाठी की काही मुस्लिम द्वेष्टे मोदींचाही द्वेष करत असतील. उदा: सनातन प्रभात. यांचं आणि संघाचं वाकडं आहे म्हणे.)
भक्ती नाही, नाही विरोध
>> इथे मोदी विरोधक पण ट्रंप समर्थक लोक कोणी असावेत असं वाटत नाही. असलेच तर इथले टोकाचे लिबर्तेरिअन लोक असतील. जे मोदी समर्थक राहिले नसावेत असं वाटत आहे. ( आधार, नरेगा चालू ठेवल्याने. )
जे मोदीभक्त नाहीत, पण ज्यांना मोदींच्या आर्थिक धोरणांशी काही अडचण नाही असे काही लोक मला दिसतात. त्यांना समाजवाद आणि समाजवादी आवडत नाहीत, तर उदार आर्थिक धोरण आणि एकंदर जगण्यातलं कॉर्पोरेटायझेशन आवडतं. हिलरीची कॉर्पोरेट कनेक्शन्स वगैरेंमुळे आणि स्टेटस को राहील अशा अपेक्षेतून त्यांचा पाठिंबा हिलरीला असेल असं मला वाटलं होतं, पण ट्रंपच्या विजयामुळे त्यांना आनंद झालेला दिसतो.
तर उदार आर्थिक धोरण आणि एकंदर
तर उदार आर्थिक धोरण आणि एकंदर जगण्यातलं कॉर्पोरेटायझेशन आवडतं. हिलरीची कॉर्पोरेट कनेक्शन्स
उजवी आर्थिक धोरणे आवडणे आणि भ्रष्टाचार, ढोंगीपण ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
उजवी आर्थिक धोरणे आणि क्रोनी कॅपिटलिझम चा काहीही संबंध नाही.
माझे काका, चिदु, सिब्बल, मारन ह्यंची पण कॉर्पोरेट कनेक्षन फार भारी आहेत, म्हणुन त्यांना मते द्यायची का उजव्या विचारसरणीच्या लोकांनी?
खोटे कधी बोलू नये
>> माझे काका, चिदु, सिब्बल, मारन ह्यंची पण कॉर्पोरेट कनेक्षन फार भारी आहेत, म्हणुन त्यांना मते द्यायची का उजव्या विचारसरणीच्या लोकांनी?
आं? मग उद्या एखादा सत्प्रवृत्त समाजवादी आला तर उजव्यांनी त्याला मतं द्यायची का? आणि तेदेखील केवळ तो खरं बोलतो म्हणून? ह्याला स्वतःच्या पायावर कुर्हाड का नाही म्हणायचं?
"सत्प्रवृत्त समाजवादी" ह्या
"सत्प्रवृत्त समाजवादी" ह्या शब्दप्रयोगात मुलभुत विसंगती दिसत नाही का?
तरी पण उत्तर द्यायचे झाले तर. ऑप्शनच नसेल तर ( म्हणजे उमेदवारी असलेला उजव्या विचारसरणीचा माणुस सत्प्रवृत्त नसेल ) आणि एखादा समाजवादी चांगला असेल तर त्याला मत देइन मी.
हिलरी आणि सँडर्स अशी निवडणुक असती तर मला सँडर्स निवडुन यावा असे वाटले असते.
ता.क. मी मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या पक्षाला मत न देता "सुभाष वारे" नावाच्या समाजवाद्याला दिले होते. मी स्वच्छ मनाची आहे, वाईट ते वाईट म्हणते. :-)
प्रातिनिधिक
>>हिलरी आणि सँडर्स अशी निवडणुक असती तर मला सँडर्स निवडुन यावा असे वाटले असते.
>>मी मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या पक्षाला मत न देता "सुभाष वारे" नावाच्या समाजवाद्याला दिले होते.
तुम्ही काय करता किंवा केलं असतं हा मुद्दा नसून ह्या गटातले बरेचसे लोक तसं करतील का, असा आहे. ह्या गटातल्या पुष्कळशा लोकांनी गेल्या निवडणुकीत सुभाष वारेंना मतं दिली असं माझ्या अनुभवात तरी आढळलं नाही.
म्हणजे तुमच्या मते रेसिजम आणि
म्हणजे तुमच्या मते रेसिजम आणि वाढलेला टॅक्स हे साधारण एकाच तराजूत मोजण्यासारखे आहे तर? तुमची मुल्यं जाहीर व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.
एका विशिष्ठ अर्थाने हो - या दोन बाबी साधारण एकाच तराजूत मोजण्यासारख्या आहेत.
कसं ते सांगतो -
रेसिझम मधे रेसिस्ट व्यक्ती reduces certain options of the target. That means imposes some extra costs on to the target.
श्रीमंतांवर ज्यादा टॅक्स लावणे हे सुद्धा reduces certain options of the target. That means imposes some extra costs on to the rich.
---
अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर जसे - a racist is prejudiced against people of certain race तसेच - Obama is prejudiced against the rich.
गांभीर्य
(१) श्रीमंतांना एकदाच हा टॅक्स भरुन, कचाट्यातून सुटका होते. || रेसिझम मुळे व्यक्तीला वारंवार , प्रत्येकापुढे स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागते.
(२) श्रीमंतांच्या वारसांकडे हा टॅक्स येईलच अशी गॅरन्टी नसते अर्थात वारस या टॅक्स्मधुन सुटूही शकतात || रेसिझम मुळे व्यक्तीच्या वारसांनाही तो जास्तीचा कर भरत रहावे लागते. म्हणजे अन्यायाची गॅरंटी असते.
(३) श्रीमंतांचे मानसिक खच्चीकरण होत नाहे (नसावे) त्यामुळे ते आयुष्यातून ऊठत नाहीत. || रेसिझम च्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होते. व्यक्ती आयुष्यातून ऊठू शकते.(आता म्हणा कोमल मन हा त्या व्यक्तीचा गुन्हा आहे आणि जबाबदारी टाळा) - On the Run: Fugitive Life in an American City हे पुस्तक तुम्हीच दोनदा (२ धाग्यांत) रिफर केले आहे.
___
दोन्ही सारखे असले तरी दोन्हीच्या गांभीर्याचे प्रमाण अधिक-कमी आहे.
गृहपाठ - आता सांगा अन्यायाच्या तराजूचे पारडे कुठे झुकेल?
ट्रंपच्या मतदारांसाठी हा
ट्रंपच्या मतदारांसाठी हा मुद्दा खरंच कळीचा असावा असं आता तरी वाटतं आहे. पण इथेच खरी गंमत सुरू होते. जे भारतीय सध्या ट्रंपच्या विजयामुळे खूश दिसताहेत त्यांपैकी बरेचसे लोक खरं तर ज्या जागतिकीकरणाच्या धोरणांमुळे आर्थिक प्रगती करू शकले त्याच धोरणांच्या विरोधातला हा मुद्दा आहे. अमेरिकन अर्थकारण शक्यतो स्थानिक नोकरीनिर्मितीला प्राधान्य देणारं असावं, आउटसोर्सिंग नको वगैरे मुद्दे खरं तर समाजवादी आणि प्रोक्टेशनिस्ट आहेत. पण उजव्या किंवा लिबर्टेरियन विचारसरणीचेही लोक त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे विरोधाभास मला मजेशीर वाटत आहेत.
क्लिंटन बाईनी पण खुल्या आर्थिक धोरणांच्या विरोधीच मतप्रदर्शन केले होते की. उदा - (१) हे एक उदाहरण, (२) आणखी, (३) आणखी इथे. (४) इथे पण
मग क्लिंटनबाई विजयी झाली असती आणि लोक खुश झाले असते तर हेच म्हंटलं असतंत का ?
माझा मुद्दा हा आहे की भारतीय लोक जे ट्रंप च्या विजयामुळे खुश झालेले दिसत आहेत त्यांना खुल्या आर्थिक धोरणांचा फायदा झाला असेल वा नसेल .... मतदान करताना ते या मुद्द्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. For most Indians(NRIs) Free-trade, market-oriented policies, globalization are not really important issues - when it comes to voting. रो खन्ना, कमला हॅरिस निवडून आल्या ते ह्याचेच द्योतक आहे. खुली आर्थिक धोरणे वगैरे मुद्दे त्यांच्यासाठी फुरसतीत चघळायचे विषय आहेत.
गंमत
जे भारतीय सध्या ट्रंपच्या विजयामुळे खूश दिसताहेत त्यांपैकी बरेचसे लोक खरं तर ज्या जागतिकीकरणाच्या धोरणांमुळे आर्थिक प्रगती करू शकले त्याच धोरणांच्या विरोधातला हा मुद्दा आहे.
त्यातही गंमत अशी वाटते की ट्रंपला मत देणारे लोक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण अमेरिकेतले आहेत; शहरी भागांत हिलरीला अधिक मतं आहेत. शिक्षित लोकांचा ट्रंपला फार पाठिंबा नाही. काल आणि आज अनेक विद्यापीठांमध्ये निदर्शनं होत आहेत. मात्र भारतात ज्यांचा ट्रंपला पाठिंबा आहे असं दिसतंय, ते लोकही शिक्षितच आहेत.
म्हणजे हाम्रीकेपेक्षा भारतीय
म्हणजे हाम्रीकेपेक्षा भारतीय शिक्षणाचा दर्जा चांगला आहे असा अर्थ काढायला हरकत नाही.
ज्या लोकांना लोकशाही मार्गानी झालेला पराभव पण पचवता येत नाही, त्या लोकांबद्दल काही बोलणे वेडेपणाचे आहे, हे कसले शिक्षीत लोक?.
मोदीला जसे पहिले वर्षभर द्वेषानी आणि स्वार्थापाई आलेला आक्रस्ताळेपणा भोगावा लागला तसा ट्रंप ला पण सहन करायला लागणार असे दिसते.
काय हे!
हे काही ठीक नाही, अनुताई. ट्रंपसुद्धा म्हणतोय की तो राष्ट्राध्यक्षपदाचा आब राखणारं वर्तन करेल. आणि तुमचं हे काय हे! लढाईत, पैजेत, मारामारीत जिंकलेले लोक विजेत्यांच्या ऐटीत मच्छरांकडे दुर्लक्ष करतात. ट्रंप जिंकल्यावर, मराठी आंजावर, त्यातही ऐसीसारख्या संस्थळावर एवढी फडफड का सुरू आहे?
किंवा तुमच्या लाडुकल्या डॉनेशच्याच भाषेत - कायद्याने मान्य केलेल्या पद्धतीनेच ही निदर्शनं होत आहेत. ट्रंपुकल्याने हवं तर आता कायदा बदलावा.
हे काही ठीक नाही, अनुताई.
हे काही ठीक नाही, अनुताई. ट्रंपसुद्धा म्हणतोय की तो राष्ट्राध्यक्षपदाचा आब राखणारं वर्तन करेल. आणि तुमचं हे काय हे! लढाईत, पैजेत, मारामारीत जिंकलेले लोक विजेत्यांच्या ऐटीत मच्छरांकडे दुर्लक्ष करतात. ट्रंप जिंकल्यावर, मराठी आंजावर, त्यातही ऐसीसारख्या संस्थळावर एवढी फडफड का सुरू आहे?
मोदी जिंकण्याच्या आधी व जिंकून झाल्यावर सुद्धा फडफड झालीच होती ना. मोदीचं काय वाकडं झालं ?
ओबामा जिंकल्यावर टेक्सास मधल्या काही मंडळींनी (संयुक्त संस्थानांमधून) ससेशन साठी अर्ज केले होते. ओबामाचं काय वाकडं झालं ?
रात बाकी, बात बाकी
होना है जो, हो जाने दो
सोचो ना, देखो तो
देखो हाँ, जाने-जां ... मुझे प्यार से
कश्ती जवां दिल की तूफां से टकरा गयी
मंज़िल मोहब्बत की अब तो करीब आ गयी
आ देख ले, है क्या मज़ा ... दिल हार के
रात बाकी, बात बाकी ...
आगाज़ ये है तो अंजाम होगा हसीन
दीवाने परवाने मरने से डरते नहीं
आ दिलरुबा, खुल के ज़रा ... मिल यार से
रात बाकी, बात बाकी ...
ट्रंप आणि क्लायमेट
चला अच्छे दिन येऊ लागले... आणि प्रलयघंटावादाची गच्छंती.
Trump Picks Top Climate Skeptic to Lead EPA Transition
प्रलयघंटावादाचे दुसरे नाव असते "विज्ञान-निष्ठा"
प्रलयघंटावादाचे दुसरे नाव असते "विज्ञान-निष्ठा".
उदा:
Proceedings of the national Academy of Sciences of USA, current issue:
Coastal sea level rise with warming above 2 °C
Svetlana Jevrejevaa, et al
Warming of 2 °C will lead to an average global ocean rise of 20 cm, but more than 90% of coastal areas will experience greater rises. If warming continues above 2 °C, then, by 2100, sea level will be rising faster than at any time during human civilization, and 80% of the global coastline is expected to exceed the 95th percentile upper limit of 1.8 m for mean global ocean sea level rise. Coastal communities, notably rapidly expanding cities in the developing world; small island states; United Nations Educational, Scientific and Cultural Organization Cultural World Heritage sites; and vulnerable tropical coastal ecosystems will have a very limited time after midcentury to adapt to these rises.
Abstract
Two degrees of global warming above the preindustrial level is widely suggested as an appropriate threshold beyond which climate change risks become unacceptably high. This “2 °C” threshold is likely to be reached between 2040 and 2050 for both Representative Concentration Pathway (RCP) 8.5 and 4.5. Resulting sea level rises will not be globally uniform, due to ocean dynamical processes and changes in gravity associated with water mass redistribution. Here we provide probabilistic sea level rise projections for the global coastline with warming above the 2 °C goal. By 2040, with a 2 °C warming under the RCP8.5 scenario, more than 90% of coastal areas will experience sea level rise exceeding the global estimate of 0.2 m, with up to 0.4 m expected along the Atlantic coast of North America and Norway. With a 5 °C rise by 2100, sea level will rise rapidly, reaching 0.9 m (median), and 80% of the coastline will exceed the global sea level rise at the 95th percentile upper limit of 1.8 m. Under RCP8.5, by 2100, New York may expect rises of 1.09 m, Guangzhou may expect rises of 0.91 m, and Lagos may expect rises of 0.90 m, with the 95th percentile upper limit of 2.24 m, 1.93 m, and 1.92 m, respectively. The coastal communities of rapidly expanding cities in the developing world, and vulnerable tropical coastal ecosystems, will have a very limited time after midcentury to adapt to sea level rises unprecedented since the dawn of the Bronze Age.
ट्रंपकेअर भयाण दिसतय.
ट्रंपकेअर (गरीबांकरता) भयाण दिसतय. लोकांच्या हेल्थकेअरवरच्या सबसिडीज काढून घेऊन, भिंती बांधणारे हा मनुष्य.
https://www.donaldjtrump.com/positions/healthcare-reform
.
हा मुद्दा आवडला - Remove barriers to entry into free markets for drug providers that offer safe, reliable and cheaper products.
.
Allow individuals to use Health Savings Accounts (HSAs). Contributions into HSAs should be tax-free and should be allowed to accumulate. These accounts would become part of the estate of the individual and could be passed on to heirs without fear of any death penalty. These plans should be particularly attractive to young people who are healthy and can afford high-deductible insurance plans. These funds can be used by any member of a family without penalty. The flexibility and security provided by HSAs will be of great benefit to all who participate.
- हे खरच तरुण लोकांकरता उत्तम आहे.
.
बेसिकली अनारोग्य खरोखर परवडणार नाहीये. आय होप पीपल विल इन्व्हेस्ट मोअर इन जिम्स & हेल्दी ईटींग. - हा मुद्दाही चांगलाच आहे की.
______________
नॉट माय प्रेसिडेन्ट
डंप ट्रम्प
कॅल-एक्झिट
कॅनडा-न्युझीलंडच्या इमिग्रेशन साईटसवरचा ट्राफिक
एकंदर अर्धी लोकं तरी बिथरली आहेत.
______________
women are making gynecologist appointments post-election
Samantha @SammanthaKellyy - Ladies make sure you stock up on birth control, free condoms and take advantage of free STD testing while Planned Parenthood still exists
.
T @tia_malise6 - Im about to stock up on 4 years worth of birth control cuz I aint riskin my healthcare rights
http://www.usatoday.com/story/news/2016/11/09/why-women-making-gynecolo…
नाभिषेको न एक्झिटः
>>> कॅल-एक्झिट बद्दल गब्बर, पिडां, नंदन यांची बहुमूल्य मते ऐकावयास आवडतील
--- बहुमूल्य नाही, पण आमचं आपलं हे नुसतंच मतः
कॅल-एक्झिटची कॅलिफोर्नियाला निराळी गरज नाही (स्वयमेव स्वायत्तता?); ते टेक्सससारख्या ग्रामीण नेतृत्वासाठी अधूनमधून गरजेचं असणारं शक्तिप्रदर्शन, साडीचोळीवाटप, वाढदिवस मेळावा यासारखं एक रिक्युअल(sic) म्हणून ठीक आहे ;)
बाकी गब्बर, पिडांकाका: सॅन डिएगो आणि व्हेंच्युरापाठोपाठ, ऑरेंज काऊंटीही (काँग्रेसशनल डिस्ट्रिक्ट्स नव्हेत, स्थिरसीमा-नॉनजेरीमँडर्ड काऊंटी) निळी झाली हो या खेपेस! आता काय होणार दक्षिण कॅलिफोर्नियातल्या सेन्सिबल कन्झर्व्हेटिव्ह परंपरेचं? :D
कॅल एग्झिट? नॉट नाऊ!!
कॅल-एक्झिटची कॅलिफोर्नियाला निराळी गरज नाही (स्वयमेव स्वायत्तता?)
करेक्ट! तसंही कॅलिफोर्नियन्स इतर ४९ स्टेट्सना फारशी किंमत देत नाहीतच!! :)
नॉट माय प्रेसिडेन्ट
वगैरे वगैरे..
ते कळतंय आम्हाला, आमची बुद्धी तितकी शाबूत आहे. पण तुमचाच महापुरूष बी. हुसेन ओबामा २००८ मध्ये सांगून गेलाय की, "इलेक्शनस हॅव कॉन्सिक्वेन्सेस, वुई वन!!" त्याला जागा आता!
शुचि, निदर्शनांना माझा विरोध नाही. ही लोकशाही आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे. जोवर निदर्शनं शांततेनं होताहेत तोपर्यंत त्यांना विरोध करायचं काहीच कारण नाही. पण जर शांततेचा भंग झाला तर निदर्शकांवर कडक आणि निष्ठूर कारवाई व्हावी असं मला वाटतं. दुकानांच्या काचा फोडून लूटालूट करायचे, पोलिसांवर दगडफेक करायचे ओबामा दिवस गेले आता म्हणावं! मला वाटतं की निदर्शनं करणार्यांनाही हे जाणवलेलं आहे म्हणूनच निदर्शंन शांततेने होताहेत.
स्ट्रॉन्ग मिलिटरी, लो टॅक्सेस, लॉ एन्ड ऑर्डर, मायटी बॉर्डर्स, अॅबन्डंट जॉब्ज फॉर सिटिझन्स!
अमेरिका फर्स्ट!!
स्ट्रॉन्ग मिलिटरी, लो
स्ट्रॉन्ग मिलिटरी, लो टॅक्सेस, लॉ एन्ड ऑर्डर, मायटी बॉर्डर्स, अॅबन्डंट जॉब्ज फॉर सिटिझन्स!
फॅसिस्ट लेबल लागेल तुम्हाला थोड्या दिवसात डांबिस काका.
===
बाकी आता भुरट्यांचे मशिदीं-बिशिदींवरचे हल्ले, कोणाला तरी कोणीतरी शिवी देणं या बातम्या खूप व्हिजिबल दिसतील. त्यांचा टोन 'ट्रंप निवडुन आल्यावर बघा काय होतय' असा असेल. नंतर बातम्या बोगस निघतील. Familiar script. इथेही हेच झालेलं.
कुणाला कशाचं आणि.......
बाकी गब्बर, पिडांकाका: सॅन डिएगो आणि व्हेंच्युरापाठोपाठ, ऑरेंज काऊंटीही (काँग्रेसशनल डिस्ट्रिक्ट्स नव्हेत, स्थिरसीमा-नॉनजेरीमँडर्ड काऊंटी) निळी झाली हो या खेपेस! आता काय होणार दक्षिण कॅलिफोर्नियातल्या सेन्सिबल कन्झर्व्हेटिव्ह परंपरेचं?
त्याची काळजी तुम्हाला नको
सध्या तुम्ही हाऊस, सिनेट, व्हाऊटहाऊस आणि पुढील सुप्रीमकोर्ट अशी जी तुमच्या चौपदरी कानसुलात बसलीये त्यामुळे सुजलेल्या गालफडावर काही उपाययोजना करता येते का ते पहा.....
सध्या आम्ही त्या चर्चेत मग्न आहोत. त्या चर्चेत तुम्हाला जर प्रामाणिकपणे काही कॉन्टॄईब्युशन करायचं असलं तर तुमचं जरूर स्वागत आहे!
बाकी सदर्न कालिफोर्नियात काय झालं आणि काय नाही (तुम्ही आता असलीच चर्चा काढणार म्हणा!!!) ह्याविषयी जर चर्चा करायची असेल तर नंबर घ्या आणि लायनीत उभे रहा....
आमचा मूड लागला की बोलावू तुम्हाला चर्चेला!!!!!
मला वाटतं की ट्रंपने दिलेल्या
मला वाटतं की ट्रंपने दिलेल्या वचनांवर त्याला काही ना काही कार्यवाही करावी लागेलच. जे मनात येईल ते बोलतो अशी त्याने प्रतिमा केलेली आहे. ती जर पाळली नाही तर त्याला प्रॉब्लेम येतील.
१. हिलरीला तुरुंगात टाकणं - मला वाटतं काहीतरी ससेमिरा लावेल. त्यातून ती प्रत्यक्ष तुरुंगात जाईल की नाही हे माहीत नाही. पण प्रयत्न करतोय असं दाखवावं लागेल.
२. ओबामाकेअर - हा कायदा निश्चित रीपील होईल, पण त्याजागी त्यासारखंच, किंचित वेगळं काहीतरी येईल. दुरुस्ती करणं की नवीनच काहीतरी लावणं यातला फरक तसा तांत्रिकच असतो.
३. चीनच्या मालावर बंदी - एकंदरीत परकीय मालावर थोडे निर्बंध आणि स्वदेशी वापराचा पुरस्कार होईल.
४. आंतरराष्ट्रीय नाती - नेटो, नाफ्टामधला अमेरिकन सहभाग कितपत बदलेल माहीत नाही.
५. मेक्सिको भिंत - अशी भिंत बांधायला सुरुवात होईल.
६. इस्लामविरोध - अनेक इस्लामी देशांतून लोकांना इथे येण्यावर बंधनं येतील.
७. गर्भपातविरोध - टेक्सससारख्या राज्यात गर्भपात कायदेशीर असला तरी क्लिनिक्सवर इतकी बंधनं असतात की ती बंद पडतात, तसे काहीतरी बंधनकारक कायदे अमेरिकाभर येतील बहुतेक.
८. आंतरराष्ट्रीय युद्ध - बहुधा इतक्या लवकर काही होणार नाही, पण अमेरिका मध्यपूर्वेतल्या युद्धात अधिक गुंतेल असं वाटतं.
९. एनआरए बळावेल, बंदुका नियंत्रित करण्याचे कायदे शिथिल होतील.
Yale professor makes
हे असं येल मधे होऊ शकतं हे चमत्कारिक आहे. येल ही जे-एन-यु टाईप लेफ्टिस्ट लिबरल विद्यापीठ आहे. हेच लेफ्ट लिबरल लोक इन्क्लुझिव्ह चा जयघोष करीत असतात. आता ट्रंप ला इन्क्लुड का करत नाहीत ते अल्ला जाने. म्हणे विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसलेला आहे म्हणून आम्ही मध्यावधी परिक्षा पुढे ढकलत आहोत. चक्रम तेजायला.
अत्रैत (अर्थात पार्थ, अर्जुन नि बृहन्नडा*,**)
तुम्ही ३ लोकांना एकत्र लम्प केलेले आहे.
अंहं!
उलट त्यांनी तर या तिन्ही एंटिट्यांना शेपरेटली एनुमरेट केलेले आहे.
(संघ, भाजप नि बजरंग दल यांना शेपरेटली एनुमरेट करतात ना काही जण, त्यातलाच प्रकार. किंवा कू क्लक्स क्लान, रिपब्लिकन पक्ष नि फॉक्स न्यूज. वगैरे वगैरे. असो चालायचेच.)
..........
* (पु.लं.कडून साभार.)
** (किंवा द फादर, द सन नि द होली घोष्ट म्हणा हवे तर.)
लाखो अर्धशिक्षित गोऱ्यांना नोकऱ्या देणे हे अतिशय कठीण!
लाखो अर्धशिक्षित गोऱ्यांना नोकऱ्या परत मिळवून देणे हे अतिशय कठीण असणार आहे. पण पॅरिस आणि नाफ्ता करारातून बाहेर पडणे, खनिज तेल उत्खननावरची बंदी उठविणे, ओबामाकेअर रद्द करणे, प्लॅन्ड पेरेंटहूड चा पैसा काढून घेणे हे सर्व तितकेसे अवघड नाही, आणि काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात आता त्याला बराचसा पाठिंबा आहे.
अवांतर :
बॅटमॅन , तुम्हाला पुण्याचे नागरिकत्व सन्मान पूर्वक सुपूर्द करण्यात येत आहे.आमच्या प्रमाणेच तुम्हीही, फारश्या महत्वाच्या नसलेल्या व्याकरण चुका अत्यंत किमान शब्दात कमाल आणि खवचट पण वगैरे नैसर्गिक पध्धतीने दाखवू लागला आहात. अशीच प्रगती चालू ठेवलीत तर आपण लवकरच पुणे ३० अध्वर्यू सुध्दा होऊ शकाल (कठीण असते , पण ध्येय नेहमी उच्चं वगैरे) अभिनंदन .( आता पुरे , खूप स्तुती झाली )
हेट क्राइम्स मध्ये वाढ
http://www.cnn.com/2016/11/10/us/post-election-hate-crimes-and-fears-tr…
.
असहिष्णुतेच्या, वांशिक भेदभावाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे.
.न्यु यॉर्कमध्ये मुस्लिम लोकांच्या प्रार्थनास्थळाच्या भिंतीवरती "ट्रंप" लिहीलेले आढळले.
.
"अमेरीका फक्त गोर्यांचीच आहे", "आफ्रिकेला परत जा" वगैरे मुक्ताफळे मिनेसोटात लिहीली जात आहेत.
.

.
A San Diego State University student walking to her car was confronted by two men who made comments about Trump and Muslims, SDSU police said.
.
A day after Trump was elected, some students at Michigan's Royal Oak Middle School started chanting in the cafeteria: "Build the wall! Build the wall!"
______
वा! देश पोखरणार्यांचे वाईट होईल ते हेच्च का अनु राव?
___
विघ्नसंतोषी लोकांनी टाळ्या पिटण्याचे दिवस आलेले दिसतायत.
___________________________________
http://www.nydailynews.com/news/politics/n-kkk-group-hold-victory-parad…
नॉर्थ कॅरोलिना मध्ये "क्लु क्लक्स क्लॅन" गट ट्रंपच्या विजयार्थ, "विजय-मिरवणुक" काढणार आहेत
.

केकेके ही एफ बी आय ने पूर्ण पोखरून निरुपद्रवी केलेली संघटना
आत्तापर्यंत तरी केकेके ही एफ बी आय ने पूर्ण पोखरून निरुपद्रवी केलेली संघटना होती . रिपब्लिकन लोकांनाही वंश-द्वेषी असा शिक्का नकोच असतो (कारण गोरे आता ४८% च आहेत! त्यातही कॅथॉलिक आणि ज्यू यांच्या केकेके विरोधातच आहे!) . पण केकेके चे पुनरुज्जीवनही होऊ शकते. निदान आम्ही गोरे प्रोटेस्टंट अमेरिकन आहोत, आमच्या संस्कृतीमध्ये लुडबुड करू नका असा त्यांचा संदेश तरी बळकट होऊ शकतो !
ख्रिस्तालाच ठावूक
ख्रिस्तमसापर्यंत तरी इथून सुटका नाही असे दिसत्ये. तोवर जगलो, वाचलो अन ख्रिस्ताप्रमाणे क्रॉसवर ( ते ही जळत्या! ;-) ) चढवलो गेलो नाही तर २०१७ मध्ये जमेलसं दिसतंय! अर्थात, त्या आधी ट्रंपने डिपोर्ट केलं नाही तर. नाहीतर च्यायला अमेरिकेच्या क्यालि ऐवजी मेक्सिकोच्या क्यालीत जाऊन बसायचो! ;-)
काहीच्या काही!
त्या आधी ट्रंपने डिपोर्ट केलं नाही तर.
ट्रंप तुम्हाला कशाला डीपोर्ट करेल, तुम्ही लीगल आहांत ना?
की एखाद्या इल्लिगल 'मिरा' बरोबर सूत जमवलयंत? :)
मला हीच गंमत वाटते. इथे ऐसीवर असणारे १००% मराठी अनागरीक हे लीगल आहेत. पण छाती पिटून आक्रोश मात्र असा करतात की कुणाला वाटावं की ह्यांचंच चंबूगबाळं उचलून ह्यांना सरकार आता बाहेर काढणार की काय!!!
मला हीच गंमत वाटते. इथे ऐसीवर
मला हीच गंमत वाटते. इथे ऐसीवर असणारे १००% मराठी अनागरीक हे लीगल आहेत. पण छाती पिटून आक्रोश मात्र असा करतात की कुणाला वाटावं की ह्यांचंच चंबूगबाळं उचलून ह्यांना सरकार आता बाहेर काढणार की काय!!!
उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखवायचे असतात त्यांना.... आणि ते करून झाले की मिरवायचे असते की आम्ही कसे समाजनिष्ठ आहोत त्याबद्दल.
ट्रम्प यांनी हरितपत्र मिळवणे अतिशय अवघड करण्याचे आदेश दिले आहेत
मा. श्री . ट्रम्प यांनी हरितपत्र मिळवणे अतिशय अवघड करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्या मते हे बहुधा स्किल्ड इमिग्रेशनला लागू नसावे! पण बघूया. नाहीतरी IEEE या अमेरिकन इंजिनियर संघटनेचा असा दावा आहेच की H1-B व्हिसा हा मुख्यतः स्वस्तात माणसे मिळविण्यासाठी वापरला जातो.
https://www.yahoo.com/finance/news/donald-trump-plans-getting-green-171…
कुठेतरी वाचताना असं दिसलं की
कुठेतरी वाचताना असं दिसलं की मत द्यायला फोटो आयडी लागतं अमेरिकेतपण. आणि काही डेमोक्रॅट्सना ही अट खूप जाचक वाटते. आणि याची गरज नाही असं म्हणणं आहे. सिरियसली? भारतासारख्या थर्ड-वल्ड देशात, ८० कोटी (त्यात देखील बर्याच अशिक्षित) मतदार असलेल्या देशात फोटो आयडीबद्दल तक्रार नाही. अनेक निवडणुका व्यवस्थित पार पडल्या. अमेरिकेसारख्या प्रगत देशात काय प्रॉब्लेम आहे फोटो आयडीबद्द्ल?
>>> अमेरिकेसारख्या प्रगत
>>> अमेरिकेसारख्या प्रगत देशात काय प्रॉब्लेम आहे फोटो आयडीबद्द्ल?
सुमारे दोन कोटी लोकांकडे, मतदानाला स्वीकारलं जाईल असं ओळखपत्र नाही. भारतात जसे ही समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले, तसे इथे झालेले नाहीत. रिपब्लिकनांनी ओबामाविरोध म्हणून फेडरल इलेक्शन कमिशनलाही पांगळं करून ठेवलं होतं. अशा परिस्थितीत, डेमोक्रॅट्सचा विरोध हा निवडणुकांच्या काही दिवस आधी व्होटर आयडी लॉज् बदलण्याला आहे. कॅची हेडलाईन्समध्ये तो सरसकटपणे 'आयडीला विरोध' म्हणून प्रोजेक्ट होतो.
या संदर्भात, हा लेख पहा:
https://www.washingtonpost.com/posteverything/wp/2014/05/30/democrats-s…
There would be very little opposition to the law from any quarter if all people had a free, easy-to-get, state-issued ID card that allowed them to vote. But there is unequal access and retention rates among lower-income and elderly people, and many laws discriminate between forms of government ID (Texas allows gun permits but not university IDs). Although Democratic opposition is about application, it is portrayed as anti-ID per se. That’s not helpful, particularly as providing ID cards to those in need is a crucial social service that can give individuals access to many social programs.
बाकी शहरांतली/विशिष्ट प्रभागांतली मतदानकेंद्रं बंद करणं, परिणामी मतदारांना तासन् तास रांगेत खोळंबावं लागणं, अर्ली व्होटिंगवर गदा आणणं इत्यादी लीळा 'व्होटिंग राईट्स अॅक्ट्स' अस्तित्वात असतानाही चालू होत्याच; आता त्यातल्या काही तरतुदी रद्दबातल झाल्यावर त्यांचं प्रमाण अधिक वाढलं आहे.
केवळ कांगावा
सुमारे दोन कोटी लोकांकडे, मतदानाला स्वीकारलं जाईल असं ओळखपत्र नाही..... अशा परिस्थितीत, डेमोक्रॅट्सचा विरोध हा निवडणुकांच्या काही दिवस आधी व्होटर आयडी लॉज् बदलण्याला आहे.
आता चार वर्षे वेळ आहे तुम्हाला!
व्हाईट हाऊस, सिनेट आणि हाऊस काहीच तुमच्या ताब्यात नाही. तेंव्हा तुम्हाला काम असं काहीच नाही. :)
तेंव्हा आता चार वर्षे हे काम करा आणि तुमचे जे कोण मतदार असतील त्यांना पुढील निवडणुकीपूर्वी ओळखपत्र असेल हे बघा.
नायतर पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या वेळेला बोंबा माराल...
(तुम्ही आता काहीही करणार नाही आणि पुढच्या निवडाणुकीच्या वेळेला पुन्हा बोंबा मारणार ह्याची आम्हाला खात्री आहे. कारण तुम्हाला तुमच्या मतदारांना ओळखपत्र मिळवून द्यायचीच नाहियेत, तुम्हाला हा एक इलेक्शन इश्यू म्हणून जागृत ठेवायचाय, आम्हाला कळत नाही का बच्चंजी?)
:D
आणि त्या दुव्यावर आतापावेतो ज्या काही माफक 'वाचकांच्या प्रतिक्रिया' आल्या आहेत, त्यातील एक अत्यंत बोलकी आहे. असो.
justkiddingdc
5/30/2014 11:04 AM EDT
Stephen,Not sure what your background on this is, but you have no clue what registration laws are actually about in the ground fight.
The poorer you are, the more you move. At one end of the spectrum, rich people and upper middle class are very stable, own homes, and move very, very rarely. As you move down the spectrum, you get into renters who are much more likely to move annually or even more often. Then you get to people renting in unpleasant places who move frequently, to people who are sometimes renting and sometimes squatting in a relative's spare room or a friend's couch.
People who move a lot -- and probably work at jobs that are not disposed to allowing time off to hang out at the DMV -- do not update their driver license every time they move. They may use their parents' address or have an out-of-date address.
Republicans attack this on two fronts. They mail postcards with special "do NOT forward -- return to sender" messages to registered Dems in poorer neighborhoods to find out which Dems do not live at the address on their registration. So to vote you have to have your voter registration address current and your driver license current and they have to match. For an owner or stable renter, that's easy. But for poor people, that's very, very hard. Republican poll-watchers in poor neighborhoods then have lists of voters whose postcard got returned so they can challenge those voters. And they publicize that they have those lists to intimidate people from trying to vote.
And Republicans post signs and advertise on radio in poor neighborhoods just before election day to remind people that it's a FELONY to vote if your voter registration address is inaccurate. That is very direct voter intimidation and affects a lot of people.
That's what ID laws are about. Not convenience. Very practical voter intimidation. And it works on a large scale.
मूलभूत शंका
'निवडणुकीकरिता आयडी असलाच पायजेलाय!' हे तूर्तास मानून चालू. आता पुढचे.
ष्टूडण्ट आयडीबद्दल बोलत नाही, परंतु मुळात ड्रायव्हर्स लायसन हेसुद्धा निवडणुकीकरिता वैध ओळखपत्र का असावे? (गन पर्मिट तर सोडूनच द्या.)
ड्रायव्हर लायसनने 'मी अमेरिकन नागरिक आहे (अत एव मतदानास पात्र आहे)' हे नेमके कोणत्या प्रकारे सिद्ध होते? मी एच१बीवर असताना माझ्याजवळ ड्रायव्हर्स लायसन होते. ग्रीनकार्ड मिळाल्यावर आणि नंतर नागरिकत्व घेतल्यानंतरसुद्धा त्यात काहीही फरक झाला नाही. (हं, जॉर्जियाच्या सद्यकालीन नियमांप्रमाणे नागरिकत्व घेतल्यानंतर थोडी अधिक फी भरून नेहमीच्या लायसनच्या दुप्पट वैधताकाल असलेले आणि थोड्या वेगळ्या डिज्जायनचे लायसन घेण्याचा विकल्प उपलब्ध झाला खरा, परंतु या वैकल्पिक लायसनलासुद्धा कोठेही नागरिकत्वाचा पुरावा म्हणून अधिकृत मान्यता नाही. असो.)
त्यापेक्षा, निवडणुकीकरिता खास वेगळे असे एकच अधिकृत ओळखपत्र (आफ्टर ड्यू व्हेटिंग) निर्माण करून, सर्वच नागरिकांना ते निवडणुकांकरिता म्याण्डेटरी करून, सर्वच नागरिकांना (इन्क्लूडिंग मला आणि पिडांकाकांना) त्याकरिता रांगेत उभे का करू नये? ओळखपत्राचे पंचवीस प्रकार चालतील, हे लाड काय म्हणून? (नि पंचवीस प्रकारच्या ओळखपत्रांचे लाड चालणार असतील, तर सव्विसाव्या प्रकारच्या ओळखपत्राचे लाड का चालू नयेत?)
सर्वच नागरिकांना (इन्क्लूडिंग
सर्वच नागरिकांना (इन्क्लूडिंग मला आणि पिडांकाकांना) त्याकरिता रांगेत उभे का करू नये?
जरूर, आमची तयारी आहे.
बाकी फोटो आयडी हे अमेरिकेचा नागरीक आहे हे सिद्ध करण्यासाठी नव्हे तर मतदार यादीमध्ये नांव असलेला माणूस आणि प्रत्यक्ष त्या नांवावर मतदान करणारा माणूस हे एकच आहेत हे पडताळून बघण्यासाठी आहे असं मला वाटतं.
He is a "closet liberal"
Trump changing positions (all the good!)
1. Will not prosecute Hillary: said the Clintons are "good people".
2. Will give up insistence on a wall. Fences will be "okay" in some places.
3. Will try to keep the "no pre-existing conditions' and the "Children till 26" clauses in Obamacare. How he can keep these, esp. the no pre-existing clause is beyond me. He will have to keep the entire law to defray the costs, from healthy people.
This should be fun to watch.
He is a "closet liberal", was a democrat, funded democrats in big ways before he ran. He is also for the minimum wage hike and a woman's right to abortion. Ivanka just said that she will agitate for equal pay for women: another blow to the Republican positions.
No 100 days.
नवनिर्वाचित/भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना अनावृत्त पत्र. हूव्हर इन्स्टिट्युशन च्या आयव्होरी टॉवर मधून.
You were elected because you are not Hillary Clinton. You were elected in revulsion at the corruption, the hypocrisy, the ram-it-down-their-throats nanny-state regulations, and their increasing politicization. You were elected to fix the process, dysfunction, and incompetence of government. You were elected because people are sick of working at Wal-mart, can't get a loan, and their health insurance premium just skyrocketed as they found out there isn't a doctor in 300 miles that will take it. You were elected because people want a prosperous economy with opportunity for them. They don't really care how you get it.
By being an outsider, not
By being an outsider, not beholden to particular ideologies or a political base, you are in fact the right person to do it.
हे आवडले.
.
ou have had a wonderful three days, saying hea
ओह शूट! हे वाचल्यानंतर it dawned on me (साक्षात्कार झाला) की इथे "राज्याभिषेक" (ऑफिशिअल) वगैरे नसतो. ट्रंप ऑलरेडी राष्ट्रपती झालेला आहे.
.
लेख ठीक वाटला. त्यांचा "पॉइन्ट ऑफ व्ह्यु" रोचक आहे. नीट विस्तारपूर्ण लिहीलेला आहे.
___
एका प्रतिसादातील
"And if you think the NY Times is serious about "rededicating itself to reporting honestly" then I've got oceanfront property in Chicago that I'd like to sell you."
ही उपमा झकासच आहे.
उपमा, उत्तप्पा वगैरे (शिळ्यालाच ऊत)
"And if you think the NY Times is serious about "rededicating itself to reporting honestly" then I've got oceanfront property in Chicago that I'd like to sell you."ही उपमा झकासच आहे.
मग नक्की कोण प्रामाणिकपणे रिपोर्टिंग करते म्हणता? फॉक्स न्यूज?
(बाकी उपम्या नि उत्तप्प्याबद्दलच म्हणाल, तर जुना/शिळा आहे हो! किंबहुना इतका शिळा, कि आजकल मैं भी बना सकता हूँ - 'गिट्स' से! तुम्हाला नवीन असला म्हणून काय झाले?)
बरे मग?
ष्टारबक्षने याहून नेमके काय वेगळे करायला हवे होते अशी अपेक्षा होती/आहे?
(किंबहुना, या पहिल्या आणि दुसऱ्या ट्विटांमधील कालावधी किती, तसेच पहिल्या ट्विटानंतर परंतु दुसऱ्या ट्विटात उल्लेखिलेली कार्यवाही होण्यापूर्वी त्या पहिल्या ट्विटाबद्दल काही जाहीर हंगामा झाला होता किंवा कसे, याबद्दल कल्पना नाही, परंतु त्या पहिल्या ट्विटाची ष्टारबक्षने त्वरित तसेच सुओ मोटु दखल घेऊन ही कार्यवाही केली असल्यास ती अभिनंदनीय - आणि (खरे तर नेहमीच, परंतु खास करून सध्याच्या राजकीय वातावरणात) वाखाणण्याजोगी - आहे. इतर तत्सम कॉर्पोरेशनांनी हा कित्ता जरूर गिरविण्यासारखा आहे.)
तर मग आपला मुद्दा नेमका काय होता ते कळले नाही. असो चालायचेच.
हो, पण ष्टारबक्षने ही कारवाई
हो, पण ष्टारबक्षने ही कारवाई करण्याचं कारण:
अ) नावडत्या व्यक्तीचं नाव कपावर लिहायला सांगितलं म्हणून कर्मचारी त्यात थुंकली हे कृत्य गैर आहे
हे आहे, की
ब) ट्रम्पचं नाव कपावर लिहायला सांगितलं म्हणून कर्मचारी त्यात थुंकली हे कृत्य गैर आहे
हे आहे?
कारण अ असेल ष्टारबक्षला माझ्याकडून ष्टार.
कारण ब असेल तर मैं बक्ष नहीं दूंगा.
धमकी दिली आणि स्वतःच्या
धमकी दिली आणि स्वतःच्या ट्विटर्/फेबु अकाऊंटवर दिली ही ष्टारबक्षच्या धंद्यासाठी आणखीच वाईट आहे.
म्हणूनच तर बडतर्फ केले गेले तिला.
--
च्यायला उद्या कोपर्यावरच्या ष्टारबक्षात कोपभर काफी गिळायला जाताना तिथल्या सगळ्या ष्टाफचे ट्विटर्/फेबु अकाऊंट चेक करायचे की काय!
तुम्ही चेक करायचे असं मी म्हणत नाही.
पण स्टारबक्स या बद्दल एक काम करू शकेल. संभाव्य/भावी एम्प्लॉयी च्या एम्प्लॉयमेंट अॅग्रीमेंट मधे तसे कलम घालू शकेल की तुम्ही आमच्याकडे कामाला असाल तर आमच्या ग्राहकांना आमच्या ब्रँड बद्दल घृणा उत्पन्न होईल असे काही पोस्ट करायचे नाही.
पण स्टारबक्स या बद्दल एक काम
पण स्टारबक्स या बद्दल एक काम करू शकेल. संभाव्य/भावी एम्प्लॉयी च्या एम्प्लॉयमेंट अॅग्रीमेंट मधे तसे कलम घालू शकेल की तुम्ही आमच्याकडे कामाला असाल तर आमच्या ग्राहकांना आमच्या ब्रँड बद्दल घृणा उत्पन्न होईल असे काही पोस्ट करायचे नाही.
असं कलम असतंच. विशेषतः फ्रन्टलाईन सेल्सचं काम करणार्या लोकांच्या एम्प्लॉयमेंट अॅग्रीमेंटमध्ये.
हे तत्व बिझिनेस विरोधीच आहे आणि राहील.
"Repeal and replace Obamacare" has always run up against two realities: there have been parts of the law that are broadly popular, and for all the law's faults, it's expanded coverage. Which means a repeal would have to keep the parts people like and manage to not cost people their insurance. As the Times notes, healthcare experts say that the parts of the law that people like and that Congressional Republicans insist will survive can only be effective if the rest of the law is in place.
उदा. कँसर ची कुठलीही नवीन ट्रीटमेंट वर्षाला एक लाख डॉलरच्या खाली होत नाही. (सर्वात नवीन ट्रीटमेंट: ब्रेस्ट कँसर : ७ लाख डॉलर्स!). मग तुम्ही जितके कँसर पेशंट सामील कराल तितका खर्च प्रचंड वाढणार हे उघड आहे. त्यामुळे आधी अस्तित्वात असलेल्या आजारावरून पेशंटला आरोग्यविमा नाकारण्यावर बंदी हे तत्व बिझिनेस विरोधीच आहे आणि राहील.




असे काहीही होणार नाही
ट्रंप-पुतीन-मोदी जगात शांतता राखण्यासाठी एकमेकांशी सहकार्य करतील ;) बाकी वर लिहिलेल्यापैकी ओबामाकेअर रद्द करुन ओबामाकेअरसारखाच (वेगळे नाव असलेला) दुसरा कायदा येईल. ट्रंपला ख्रिश्चन मूलतत्त्ववादाशी काही देणेघेणे आहे असे वाटत नाही. रिपब्लिकन पक्षाने शक्य तितके ट्रंपला लांब ठेवले होते. तो ख्रिश्चन मूलतत्त्ववाद्यांना भीक घालेल असे वाटत नाही.