आसाद / पुतीन अलेप्पो, सीरिया मध्ये निरपराध नागरिकांच्या प्रचंड कत्तली करत आहेत
अलेप्पो, सीरिया मध्ये आसाद / पुतीन निशस्त्र , निरपराध नागरिकांच्या प्रचंड कत्तली करत आहेत, लहान मुले जिवंत जाळली जात आहेत, आणि उर्वरित मानवजात (तुम्ही आणि मी !) षंढपणे , मख्खपणे पाहत बसलो आहोत. वाहवा!
https://www.theguardian.com/commentisfree/2016/dec/13/aleppo-people-sla…
कोणी, केव्हा, कोणत्या आधारावर, कुठे, कोणत्या साधनांनी
अगदी मान्य आहे . पण ते तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असणार आहे . उदा . बिल क्लिंटनने बॉम्बिंग करून बोस्नियाच्या मुस्लिमांची होऊ घातलेली कत्तल थांबविली . पण आज असाद-पुतीन यांना जर अमेरिका विरोध करायला गेली तर तिसरे महायुद्ध होईल (आणि मोसूल मध्ये अमेरिकाही तेच करत आहे !) ते काम निष्पक्ष युनोनेच करायला पाहिजे . पण भारत , चीन अशा प्रचंड आणि न्यूट्रल महासत्तांच्या प्रदेशात, तसेच इतरत्रही, या सगळ्याबाबत बऱ्यापैकी मख्खपणा आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे .
आलेप्पोमध्ये सध्या जे काही
आलेप्पोमध्ये सध्या जे काही चालले आहे ते अतिशय नीच आणि गर्हणीय आहे यात शंकाच नाही.
पण
आणि उर्वरित मानवजात (तुम्ही आणि मी !) षंढपणे , मख्खपणे पाहत बसलो आहोत. वाहवा!
विथ ड्यू किंवा अनड्यू रिस्पेक्ट- काय करू शकतो आपण? जे करायचे ते नेते करतील. तुम्हीआम्ही काय करू शकतो तेवढे कळाल्यास बरे.
काय करू शकतो आपण? जे करायचे
काय करू शकतो आपण? जे करायचे ते नेते करतील. तुम्हीआम्ही काय करू शकतो तेवढे कळाल्यास बरे.
अगदी नेत्यांनी जे काही करायला हवे ते अत्यंत इमानेइतबारे केले तरी - जगाची पोलिसगिरी करणारे तुम्ही कोण ? असा प्रश्न विचारला जाईलच ना.
--
बाकी कळीचा प्रश्न वेगळ्या शब्दात -
ऐ मेरे मुश्किलकुशा फरियाद है, फरियाद है
आप के होते हुए दुनिया मेरी बरबाद है
असं नेमकं कोणाला म्हणणार ?
जगाची पोलिसगिरी करणारे तुम्ही कोण ?
हा प्रश्न अमेरिकेला विचारला जाईल, इतरांना नाही . तिसऱ्या जगातील टिनपाट राज्यकर्त्यांना दमनाचा, कत्तलींचा मुक्तहस्त देण्यासाठी हा विचार पुरस्कृत केला गेला आहे . आता भारत सिरीयात काय करू शकतो हा वेगळा प्रश्न आहेच (हे भारतापासून इतके दूर चालले आहे की भारतीयांना त्यात रस वाटायचे कारण नाही असे माझा एक अत्यंत सुविद्य मित्र मला म्हणाला !) . पण समस्त मानवजात अगदी आधुनिक काळातही (उदा. दारफूर , रवांडा , काँगो , सीरिया ) कत्तली षंढपणे बघत बसते हा इतिहास आहे . उदा दारफूर कत्तलीत, जिथे सव्वाचार लाख काळे मारले गेले , तिथे आफ्रिकन युनियनने "निरीक्षक " पाठविले होते (सैन्य नाही!) , जे कोणताही गलबला सुरु झाला की पळून जायचे . युनोला थोडे "दात" असावेत असे जर सर्वांनी मान्य केले तर हे बदलू शकेल ! आणि हे लोकमताच्या रेट्याखालीच ("तुम्हीआम्ही") होऊ शकेल .
मुळीच नाही
युनो सारख्या जागतिक, निष्पक्ष संस्थेमधला ऐतखाऊ आणि अकार्यक्षम भाग निपटण्याकरता पावलं उचलली जावीत.
मुळीच नाही, सध्याची युनो ही इतकी सडलेली आहे की बरखास्त करण्यावाचून पर्याय नाही
पुरावा मिळेपर्यंत गप्प बसलो होतो. पण सद्य संस्थेच्या कर्तबगारीमुळे(?) फार काळ वाट पहावी लागली नाही!!
हा घ्या, वंडरवूमनला युनोचा अॅम्बेसेडर करताहेत रां*च्चे, जगातले बाकीचे सगळे प्रश्न जणू संपले!!!
http://www.cnn.com/2016/10/21/health/wonder-woman-un-ambassador-trnd/
आणखी - Concerned United
आणखी -
Concerned United Nations staff members नी तिच्या विरुद्ध पिटिशन सुरु केलेली आहे.
Wonder Woman was created 75 years ago. Although the original creators may have intended Wonder Woman to represent a strong and independent “warrior” woman with a feminist message, the reality is that the character’s current iteration is that of a large breasted, white woman of impossible proportions, scantily clad in a shimmery, thigh-baring body suit with an American flag motif and knee high boots –the epitome of a “pin-up” girl. This is the character that the United Nations has decided to represent a globally important issue – that of gender equality and empowerment of women and girls. It appears that this character will be promoted as the face of sustainable development goal 5 for the United Nations at large.
At a time when issues such as gender parity in senior roles and the prevention of sexual exploitation and abuse of women and girls is at the top of the United Nation’s agenda, including the “He for She” campaign, this appointment is more than surprising. It is alarming that the United Nations would consider using a character with an overtly sexualized image at a time when the headline news in United States and the world is the objectification of women and girls. The image that Wonder Woman projects (life-size cut outs of which have already appeared at UNHQ) is not culturally encompassing or sensitive –attributes the United Nations expects all its staff members to embody in the core value of respect for diversity.
सध्याच्या युनोबाबतचे तुमचे हे
सध्याच्या युनोबाबतचे तुमचे हे मत मला पूर्णपणे मान्य आहे.
धन्यवाद
पण एक निष्पक्ष (साम्राज्यवादी इंटरेस्ट्स नसलेली ) , जागतिक आणि दात असलेली संघटना हवी यावर मला वाटते आपले एकमत व्हावे.
तात्विकदृष्ट्या असावी. पण ती सर्व देशांनी भार उचललेली असावी, फक्त काही ठराविक देशांवरच तिचा भार असू नये.
आणि दुसरं थोडंसं (एक माजी न्यूयॉर्कर म्हणून) वैयक्तिक म्हणजे ती न्यूयॉर्कमध्ये नसावी. फार बेशिस्त असतात हे राजदूत आणि त्यांचे कबिले!!!
त्यापेक्षा चायनाला समुद्रात एक जास्तीचं बेट बांधायला सांगून त्यावर ती वसवावी!!
:)
पण ती सर्व देशांनी भार
पण ती सर्व देशांनी भार उचललेली असावी, फक्त काही ठराविक देशांवरच तिचा भार असू नये.
भार कोणावर ? : यासाठी विश्वातील प्रत्येक व्यक्तीकडून एक्झॅक्टली समान अमाऊंट चा पोल टॅक्स घेण्यात यावा. ती अमाऊंट किती असावी ते दरवर्षी ठरवले जावे. No Exceptions. अमका गरीब आहे अन तमका दुर्बल घटक आहे म्हणून सूट नसावी. व त्यातून उभ्या होऊ शकणार्या रक्कमेतूनच हे वैश्विक शांतिप्रस्थापनाचे उद्योग केले जावेत.
अगदी असंच नाही, पण
१. सर्वात आधी, ह्या संघटनेत सामील होणं देशांना ऐच्छिक असावं. त्या त्या देशांत पोल घेऊन ते ठरवलं जावं. आणि चायनाला घेतलं म्हणून तैवानला त्याची इच्छा असूनही नकार असा प्रकार नसावा.
२. एकदा सामील व्हायचा निर्णय झाला की मग सगळ्यांना वर्गणी सारखी असावी. सगळ्याचं मत ही सारख्याच मोलाचं असावं. विशेष, अतिविशेष असे व्हेटो पॉवर नसावेत.
३. संघटनेतले जे देश शांती धोक्यात आणतील त्यांना संघटनेतून हाकलून दिलं जावं आणि त्यांच्याशी संघटनेतल्या देशांनी सर्व आर्थिक व्यवहार थांबवावेत.
४. संघटनेचं ऑफिस एकतर आन्टार्टिकावर असावं किंवा मग ज्या देशात असेल त्या देशाचे कायदे पाळायची अन्य सभासद देशांच्या प्रतिनिधींवर सक्ती असावी, डिप्लोमॅटिक इम्युनिटी हा प्रकार नसावा.
५. जे देश सभासदत्व स्वीकारायला तयार नसतील तिथे अशांतता झाल्यास संघटनेनं दुर्लक्ष करावं. सभासद देशांपैकी कुणाला इंडिव्हिज्युअल पातळीवर हस्तक्षेप करायचा असेल तर त्याला हरकत नसावी, पण संघटनेनं उगाच नसती घोंगडी गळ्यात बांधून घेऊ नयेत. तिने सभासद देशांमधील सहकार्य, त्यांचा विकास यावर लक्ष केन्द्रित करावं.
पिडाकाका - युनोला बरखास्त तर
पिडाकाका - युनोला बरखास्त तर करावेच, पण दुसरी कुठलीही संस्था निर्माण करु नये.
अशी संस्था कधीही काही फार चांगले काम करु शकत नाही कारण तो विचारच नैसर्गिक मानवी प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे.
अश्या संस्था डीझाईंड फॉर फेल्युअर असतात किंवा फक्त दांडग्या लोकांसाठी ( देशांसाठी ) काम करतात.
उदा : सहकारी चळवळ.
कोणी, केव्हा, कोणत्या आधारावर, कुठे, कोणत्या साधनांनी ....
अगदी मान्य आहे . पण ते तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असणार आहे . उदा . बिल क्लिंटनने बॉम्बिंग करून बोस्नियाच्या मुस्लिमांची होऊ घातलेली कत्तल थांबविली . पण आज असाद-पुतीन यांना जर अमेरिका विरोध करायला गेली तर तिसरे महायुद्ध होईल (आणि मोसूल मध्ये अमेरिकाही तेच करत आहे !) ते काम निष्पक्ष युनोनेच करायला पाहिजे . पण भारत , चीन अशा प्रचंड आणि न्यूट्रल महासत्तांच्या प्रदेशात, तसेच इतरत्रही, या सगळ्याबाबत बऱ्यापैकी मख्खपणा आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे .
पण भारत , चीन अशा प्रचंड आणि
पण भारत , चीन अशा प्रचंड आणि न्यूट्रल महासत्तांच्या प्रदेशात, तसेच इतरत्रही, या सगळ्याबाबत बऱ्यापैकी मख्खपणा आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे .
भारतात पाकिस्तानने १९८९ पासून दहशतवाद सुरु केला तेव्हा सिरियातले लोक आंदोलनं करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते असं ऐकतो. लई राडा झाला होता. पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणांनी दमास्कस चा आसमंत दणाणून गेला होता. त्यावेळचे सिरियाचे सर्वेसर्वा (जे कोणी होते ते) यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून युनो मधे धाव घेतली होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबवण्यासाठी त्यांनी आपल्या फौजा युनो च्या अधिपत्याखाली द्यायचं मंजूर केलं होतं. पाकिस्तानविरोधी आर्थिक निर्बंधांची सुद्धा घोषणा केली होती त्यांनी.
मा श्रींचे म्हणणे
ही माझी मा श्री गब्बर सिंग यांना औपरोधिक प्रतिक्रिया होती हे लक्षात घेणे. सीरियाने भारताबाबत काही केले नसल्यामुळे भारतानेही काही करू नये असे मा श्रींचे म्हणणे होते. (लवकरच न्यू जर्सीत "रिकिएशनल" मारिजुआना लीगल होईलच- कारण आता त्याच्यावर गोरे भांडवलदार प्रचंड नफा मिळवू शकतात असे त्यांच्या लक्षात आले आहे . लीगल होण्याची वाट पहात आहे. )
ही घ्या आता नव्याने होऊ घातलेली कत्तल: दक्षिण सुदान
ही घ्या आता नव्याने होऊ घातलेली कत्तल: दक्षिण सुदान, जगातला सर्वात नवा देश. चार हजार (सशस्त्र?) शांतता-रक्षक ठेवायला नुकतीच त्यांच्या केंद्रीय सरकारने मान्यता दिली आहे ! बघूया काय काय होते ते!
https://www.theguardian.com/global-development/2016/dec/14/south-sudan-…
मला वाटले होत की कोणी
मला वाटले होत की कोणी विचारणारच नाही हा प्रश्न.
-----------
आम्ही ( म्हणजे माझ्यासारखे ज्ञात अज्ञात लोक ) मठ्ठपणे बसुन रहात नाही.
१. पुतिनचा जयजय्कार करतो. "पुतिन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अश्या घोषणा देऊन त्याला मानसिक बळ देतो.
२. "बराक हुसेन ओबामा हाय हाय" अश्या घोषणा देणार्यांना मदत करतो ( मार्क द अधोरेखित शब्द ).
३. हिलरी आणि ओबामाच्या सौदी पैश्याच्या कनेक्शन बद्दल कुजबुज चळवळ चालवतो.
४. ओळखीत कोणी चोर एनजीओना पैश्याची मदत वगैरे करत असेल तर त्याचे मतपरीवर्तन करतो. त्याला चांगल्या एनजीओ सुचवतो,
५. जालावर न्यायाची आणि सत्याची बाजू सातत्यानी लाऊन धरुन कुंपणावरचे लोक चुकीच्या मार्गानी जाणार नाहीत ह्याची काळजी घेतो.
हे थोडेच, बाकीचे सांगणार नाही.
ट्रम्प यांच्या पंक्तिलाभाचा लिलाव !
"कुजबुज चळवळ " शब्द आवडला . हा घ्या अजून एक विषय: जी व्यक्ती, निसर्ग-रक्षण या विषयात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना १ मिलियन किंवा अधिक डॉलर्स देणगी देईल तिला ट्रम्प यांच्या पंक्तीचा लाभ मिळणार. (हेच क्लिंटनने केले तर त्याला "भ्रष्टाचार" असे नाव होते! असो.)
आमच्या दॄष्टीनी क्लिंटन ओबामा
आमच्या दॄष्टीनी क्लिंटन ओबामा आता अस्तीवात नाहीत. तुम्ही ट्रंपला कीतीही नावे ठेवा, काही फरक पडत नाही. ट्रंप पण उत्तर देणार नाही आणि मी पण उत्तर देणार नाही.
आमचा एक गोल पूर्ण झाला आहे, आता लक्ष पुढच्या गोल्स कडे आहे. तुम्ही चिवडत बसा क्लिंटन/ओबामाची कौतुके.
येमेन मध्ये सौदी अरेबिया क्लस्टर बॉम्ब वापरीत आहे .
येमेन मध्ये सौदी अरेबिया, अमेरिका आणि ब्रिटन यांनी दिलेले क्लस्टर बॉम्ब नावाचे भयानक बॉम्ब टाकून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची कत्तल करीत आहे. सौदी अरेबिया हे एक यशस्वी झालेले आयसिस आहे - शिरच्छेदाची शिक्षा अगदी कॉमन - अशी इथे धारणा आहे, आणि सौदीशी संबंध तोडावेत अशी निदर्शनेही होत आहेत . स्वार्थासाठी अमेरिका यातले काहीही करणार नाही हे दुर्दैवाने सत्य आहे. अमेरिकेला हे लाजिरवाणे आहे.
शी संबंध तोडावेत अशी
शी संबंध तोडावेत अशी निदर्शनेही होत आहेत . स्वार्थासाठी अमेरिका यातले काहीही करणार नाही हे दुर्दैवाने सत्य आहे. अमेरिकेला हे लाजिरवाणे आहे.
काय भारी लॉजिक आहे..
माझ्या कडे दुध आणुन देणारा माणुस, रोज बायकोला मारतो. ह्या कारणासाठी मी स्वताला लाजीरवाणे का वाटुन घ्यायचे ते काही कळले नाही.
तो त्याच्या बायकोला मारतो म्हणुन मी त्याच्या कडुन दुध घेणे कसे बंद करणार? आमच्या एरीआ मधे तो एकमेव दुधवाला आहे.
एक करु शकतो. आम्ही सर्व लोक मिळुन त्या दुधवाल्याला मारुन टाकु शकतो आणि त्याच्या म्हशी एखाद्या नेपाळ्याला देऊन त्याच्या कदुन दुध मिळेल अशी सोय करु शकतो. पण दुधवाल्याला मारले तर मिलिंद सारखे लोक आम्हाला पुनिन ला देतायत तश्या शिव्या देतील.
--------
ह्या पोस्ट ला कोणीतरी निरर्थक म्हणले म्हणजे, माझ्या उपमा पटाइतकाकांसारख्या कॉम्प्लेक्स झाल्या असाव्यात.
१. मी = हाम्रीका
२. दुधवाला = सौदी अरेबिया.
३. दुधवाल्याची बायको = सीरीया, सौदी, इराण मधे मारले जाणारे वाळवंटी लोक.
कितीही वाईट चालले असले तरी आपण थंडपणे आपले जीवन जगत राहावे
समाजात काहीही , कितीही वाईट चालले असले तरी आपण थंडपणे आपले जीवन जगत राहावे ही मनोवृत्ती तर याहून भन्नाट आहे . काय वाईट, काय चांगले, ह्या गोष्टी स्थानिक लोकांचे कल्चर ठरवितात.
"पती है तो पिटेगा ही ' ही बिहारी वृत्ती महाराष्ट्रातही टॉलरेट व्हावी असे तुमचे म्हणणे दिसते.
तसेच पूर्ण पोस्ट वाचत गेल्यास अधिक समजतही जाईल . अमेरिकेने दिलेले क्लस्टर बॉम्ब सौदी येमेनच्या निरपराध नागरिकांवर वापरते, आणि अमेरिका सौदीला या शस्त्रांचा पुढचा हप्ता हे घडत असतानाच देते , हे लाजिरवाणे नाही काय ? आयसिसला मान्यता देऊन भारताने त्यांचे खनिज तेल विकत घ्यावे काय? तेलाच्या किमतीत भरपूर राष्ट्रीय "स्वार्थ" साधेल.
आयसिसला मान्यता देऊन भारताने
आयसिसला मान्यता देऊन भारताने त्यांचे खनिज तेल विकत घ्यावे काय? तेलाच्या किमतीत भरपूर राष्ट्रीय "स्वार्थ" साधेल.
भारत आज सुद्धा पाकिस्तानकडून अनेक वस्तू विकत घेतो. उदा. मी असं ऐकलंय की सिमेंट. माझ्या माहीतीनुसार भारताने पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड नेशन चा दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल खाली देत आहे.
माझ्या मते भारताने पाकिस्तानवर वराह-अस्त्राचा प्रयोग केला पाहिजे .... पण काय करणार !!! .... सधसभा, कणव, दया, क्षमा, शांति, मानवकल्याण, करुणा, सहिष्णुता, वैश्विक प्रेम, वगैरे ची चलती आहे आजकाल.
This sounds like a contradiction. It suggests special treatment, but in the WTO it actually means non-discrimination — treating virtually everyone equally.
This is what happens. Each member treats all the other members equally as “most-favoured” trading partners. If a country improves the benefits that it gives to one trading partner, it has to give the same “best” treatment to all the other WTO members so that they all remain “most-favoured”.
Most-favoured nation (MFN) status did not always mean equal treatment. The first bilateral MFN treaties set up exclusive clubs among a country’s “most-favoured” trading partners. Under GATT and now the WTO, the MFN club is no longer exclusive. The MFN principle ensures that each country treats its over—140 fellow-members equally.
व्यापाराला आक्षेप घेणारा मनुष्य "लिबरटेरियन" कसा काय मानावा?
युद्धाऐवजी पाकिस्तान बरोबरच्या व्यापाराला आक्षेप घेणारा मनुष्य "लिबरटेरियन" कसा काय मानावा? व्यापारातून(च) जगात शांती आणि सौहार्द नांदेल अशी त्या पक्षाची मुख्य धारणा नाही काय? आणि असा व्यापार वाढल्यास पाकिस्तानचा घातपाताकडे असणारा कल कमी होईल कि अधिक? ज्या वीज केंद्रातून आपल्यालाच वीज मिळते त्तेथे ते घातपात करतील काय?
युद्धाऐवजी पाकिस्तान
युद्धाऐवजी पाकिस्तान बरोबरच्या व्यापाराला आक्षेप घेणारा मनुष्य "लिबरटेरियन" कसा काय मानावा? व्यापारातून(च) जगात शांती आणि सौहार्द नांदेल अशी त्या पक्षाची मुख्य धारणा नाही काय?
मुद्दा योग्य आहे.
(१) इंटरनॅशनल पॉलिटिकल सिस्टिम ही बरीचशी अनार्की आहे ह्याकडे लक्ष वेधू इच्छितो.
(२) वरील (१) मधला युक्तीवाद मान्य नसल्यास - गब्बर सोयिस्कर रित्या लिबर्टेरियन आहे असं समजा.
परंतु - पाकिस्तान्यांना क्रूरपणे तुडवण्यातून मला जे मानसिक समाधान मिळेल त्यावर मी प्रिमियम लावायला तयार आहे. (इतर भारतीय लोक यासाठी तयार नाहीत/नसतील हे मला माहीती आहे. )
--
आणि असा व्यापार वाढल्यास पाकिस्तानचा घातपाताकडे असणारा कल कमी होईल कि अधिक? ज्या वीज केंद्रातून आपल्यालाच वीज मिळते त्तेथे ते घातपात करतील काय?
तुम्ही असं गृहित धरत आहात की पाकडे रॅशनल आहेत.
Thomas Crombie Schelling यांचे साहित्य वाचा असं सुचवतो. नुकतेच निवर्तले ते. व्हिएतनाम युद्धादरम्यान किसिंजर चे सल्लागार होते.
पाकडे रॅशनल आहेत ?
- बरेचसे "पाकडे" अडाणी धनगर/शेतकरी वगैरे आहेत, आणि त्यांच्याकडून बारकावे समजून घेण्याची अपेक्षा ठेवणे चूक आहे.
- पाक लष्कर देशाचा ४०% पैसे खाते . ते एक राजकीय पक्ष असल्यासारखेच आहेत, ते अर्थातच सर्वात बलवान आहेत, आणि कोणीही त्यांची प्रिव्हिलेजेस कमी करायला गेला तर ते उसळतात. मध्ये इम्रान खानला लाखो लोकांबरोबर इस्लामाबाद मध्ये घुसवून त्यांनी नवाज शरीफ सरकारवर प्रचंड दडपण आणून लष्करी खर्च आणि परकीय धोरण यात 'ढवळाढवळ" करणार नाही असे मान्य करून घेतले.
- नवाज शरीफ -व इतरही मुलकी राजकारण्यांना- हे समजून चुकले आहे की लष्करावरील खर्च कमी केला नाही तर विकास होणार नाही . विकासातल्या उत्तम अचिव्हमेंट मुळे भारताबद्दल आदर असणारा एक मोठा शहरी , सुशिक्षित वर्ग पाकिस्तानात आहे . १०-१५% ?.
- स्त्री-शिक्षणात भुत्तोंच्या पीपीपी पक्षाने उत्तम काम केले आहे . अगदी पेशावर मध्ये सुद्धा मुलींचे कॉम्पुटर कॉलेज आहे .
- पाकिस्तानी "एलिट" हे भारतीय एलिट प्रमाणेच इंग्लंड-अमेरिकेशी मोठ्या प्रमाणात संबंध ठेवून येत-जात असते .
- असे शहरी मध्यमवर्ग-मुलकी सरकार , मुल्ला-लष्कर आणि पख्तुनी तालिबान असे सरळसरळ तीन "पाकिस्तान" आहेत, आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन , हितसंबंध वेगवेगळे आहेत. सर्वांना एकाच "पाकडे" नावाच्या वर्गात टाकणे चूक ठरेल .
कैच्या कै!
सौदीशी संबंध तोडावेत अशी निदर्शनेही होत आहेत .
अमेरिकेत सार्वत्रिकपणे कुठे? का तुम्हीही थापा मारायला लागलांत?
स्वार्थासाठी अमेरिका यातले काहीही करणार नाही हे दुर्दैवाने सत्य आहे.
त्यात दुर्दैव काय? जगातला भारतासकट प्रत्येक देश त्याचा स्वार्थ पहातो मग अमेरिकेनेच का पाहू नये?
अमेरिकेला हे लाजिरवाणे आहे.
किंबहुना अमेरिकेत जेवण जेवून त्याच थाळीत ओकणारे @#$%^* (जाणकारांनी फुल्या भराव्यात) लोक ठेवून घेणे हे अमेरिकेला जास्त लाजिरवाणे आहे. पण काय करता? फर्स्ट अमेंडमेंट!!
:)
किंबहुना अमेरिकेत जेवण जेवून
किंबहुना अमेरिकेत जेवण जेवून त्याच थाळीत ओकणारे @#$%^* (जाणकारांनी फुल्या भराव्यात) लोक ठेवून घेणे हे अमेरिकेला जास्त लाजिरवाणे आहे. पण काय करता? फर्स्ट अमेंडमेंट!!
भारतातही आजकाल असल्यांचा फार भरणा झालेला आहे. वर त्यांना त्यांच्या आवडत्या देशात जा असे सुचवले तरी पिसाळतात.
कोणी जावं म्हणून
कोणी जावं म्हणून ऐसीव्यवस्थापक काहीही कारवाई करत नाही. लोक आपलेआपणच निघून जातात. काही वेळा आपलं लिखाण वगैरे उचकटून टाकून. नंतर आपलेआपणच येतात परत, तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण पिडांकाकांचं 'खाल्ल्या ताटात न ओकण्याबद्दलचं' म्हणणं पटतं बुवा. मी तर म्हणेन की जर सदस्यांनी वेळोवेळी काही भरीव, वाचनीय किंवा माहितीपूर्ण लेखन केलं तर त्यांच्या ओकाऱ्याही अधूनमधून सहन करायला काही हरकत नाही.
कोण काय करावं हे मी
कोण काय करावं हे मी सांगितलेलं नाही. पण वरील चर्चेतला मुद्दा पाहिला तर कोण कारवाई करणं अपेक्षित आहे हे सहज समजेल. अमेरिकेत राहून अमेरिकेवर टीका करणारे लोक अमेरिकेने सहन करू नये असा पिडांच्या म्हणण्याचा अर्थ होतो. याचा अर्थ मी अमेरिकन शासनाने सहन करू नये असा घेतला. त्या अनुषंगाने या केसमध्ये कारवाईची जबाबदारी ही व्यवस्थापकांची आहे, व्यवस्थापकेतर सदस्यांची नाही इतकेच सांगायचे होते. केले-सांगितले छाप बकवास करायची तर तिला नीट काँटेक्स्ट पुरवला पाहिजे तो पुरवला इतकेच.
बाकी ओकार्या वगैरे शब्दयोजना रोचक तर वाटलीच पण काळजीही वाटली.
ओकारी हा शब्द मुळात
ओकारी हा शब्द मुळात पिडाकाकांनी वापरला आहे. तेव्हा तो रीपीट करण्यापलिकडे मी काहीही केलेलं नाही. त्यांनी म्हटलं तेव्हा तुम्हाला आक्षेप घ्यावासा न वाटता त्यांना पाठिंबा द्यावासा वाटला आणि मी त्यांचं म्हणणं केवळ उद्धृत केल्यावर आक्षेप घ्यावासा वाटला हे गमतीदार आहे. त्यांनी जे म्हटलं आहे त्यात अमेरिकन शासनाने सहन करण्यापेक्षा मुळात जे लोकं अमेरिकन ताटांत जेवतात त्यांनी त्या ताटांत ओकाऱ्या करणं योग्य नाही असा अर्थ आहे.
ऐसी व्यवस्थापक म्हणून आम्ही काही कारवाया वगैरे करत नाही, एवढंच सांगितलं. आमच्या जबाबदाऱ्या काय, किंवा सदस्यांच्या जबाबदाऱ्या काय, आणि उत्तम लेखन करणाऱ्या सदस्यांचं महत्त्व काय याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मुद्दा असा आहे की जे सदस्य काही भरीव योगदान न करता नुसत्याच नकारात्मक पिंका टाकतात, अशांना 'ऐसीच्या ताटात जेवून त्याच ताटात ओकाऱ्या काढणारे' हे वर्णन लागू पडतं हे तुम्हाला मान्य आहे का?
अच्चं जालं...
असो.
हा धागा सिरीयातल्या यादवी युद्धामुळे होणारी जीवीतहानी आणि त्याबद्दल आपल्या असंवेदनशीलतेसंदर्भात आहे. ह्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच कारणासाठी इतरांवर दोषारोपण करणं, व्यक्तिगत पातळीवर घसरून प्रतिसाद देणं, बालकांसारखे बोबडे बोल बोलणं, रडारडीचे अॅड होमिनेम प्रतिसाद देणं यांसाठी ऐसीची बँडविड्थ खर्च होऊ नये, अशी अपेक्षा आहे. गरज पडल्यास ऐसी व्यवस्थापनानं, गेल्या पाच वर्षांत आलेले अनुभव बघून मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मुद्द्यांची भर घालावी. कृपया इथली अवांतर चर्चा बंद करू.
मुद्दा असा आहे की जे सदस्य
मुद्दा असा आहे की जे सदस्य काही भरीव योगदान न करता नुसत्याच नकारात्मक पिंका टाकतात, अशांना 'ऐसीच्या ताटात जेवून त्याच ताटात ओकाऱ्या काढणारे' हे वर्णन लागू पडतं हे तुम्हाला मान्य आहे का?
मुद्दा असा आहे की मुळातच बायस्ड लेबले लावून इतरांना गिल्ट ट्रिप द्यायचा केविलवाणा प्रयत्न करणं हे तुम्हांला रोचक वाटतं का?
नीरक्षीर....
ओकारी हा शब्द मुळात पिडाकाकांनी वापरला आहे.
होय, वापरला आहे. कारण जर षंढ हा शब्द चालतो तर ओकारीनेच काय घोडे मारलेनीत?
प्रस्तुत धागाकर्त्याच्या लिखाणात जगात कुठेही काहीही घडलं तरी अमेरिकेला दुषणं देण्याचा पॅटर्न दिसून आलेला आहे. आणि माझ्या दृष्टीने हे निंदनीय आहे. जर हा प्रकार असाच सुरू राहिला तर मीही त्याचा कठोर भाषेत प्रतिकार करत रहाणार. मग जे काय होईल ते होईल!
बाकी माझ्या वरील प्रतिक्रियेचा ऐसी अक्षरे, त्याचे व्यवस्थापन आणि त्यांच्या जबाबदार्या याच्याशी काहीही संबंध नाही. ऐसीवर जेंव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेंव्हा आम्ही त्यांचा पुरस्कार करतो, जेंव्हा आमच्या मते अनिष्ट गोष्टी घडतात तेंव्हा त्यांचा विरोध करतो. ऐसीचे व्यवस्थापन आजतागायत तरी बहुतेक वेळा आमचे म्हणणे ऐकून घेत असल्याचा अनुभव आहे. तेंव्हा वडाची साल पिंपळाला लावली जाऊन नये ही अपेक्षा.
प्रस्तुत धाग्यातही धागाकर्ते यांचा त्यांना जे काय हवं ते आणि त्यांना ज्या शब्दांत हवं तसं (षंढ वगैरे) मांडण्याचा लिखाणस्वातंत्र्याचा हक्क आम्हाला मान्यच आहे. पण त्यावर आम्हाला हव्या तशा प्रतिक्रिया देण्याचा हक्क आम्ही राखून ठेवत आहोत, इतकंच काय ते!
अगदी खरे आहे!
पण काय करता? फर्स्ट अमेंडमेंट!!
अगदी खरे आहे! किंबहुना, (कदाचित तेवढी ती एक सेकंड अमेंडमेंट वगळल्यास) आख्खी अमेरिकन कॉन्ष्टिट्यूषण हीच अमेरिकेच्या गळ्यातली एक प्रचंड धोंड आहे. तेव्हा, ती जर रद्दबातल करता आली, किंवा न जमल्यास गेला बाजार ती ढुंगणकागदतुल्य बनवता आली, तर सोन्याहून पिवळे!
फक्त, आम्हाला बराक हुसेन ओबामा असे (अधोरेखनासहित) आवर्जून उच्चरवात म्हणता येण्याइतपत तोंडी लावण्यापुरती माफक फर्ष्ट अमेंडमेंट शिल्लक ठेवलेनीत, की झाले. कसें? मग उरलेली टाका बेदिक्कत फ्लश करून!
तुम्ही नक्की कुठल्या बाजूने
तुम्ही नक्की कुठल्या बाजूने प्रतिसाद दिलाय हेच कळलं नाहिये!!
आमच्यासाठी घटना, त्यातल्या सगळ्या अमेंडमेंटसकटच वंदनीय आहे. म्हणून तर अमेरिकेत राहूनही जगातल्या कुठल्याही घटनेमध्ये अमेरिकेचा निषेध करणार्याला 'काय करणार, फर्स्ट अमेंडमेंट' अशी रिअॅक्शन दिली. त्याच बरोबर आमचा फर्स्ट अमेंडमेंट अधिकार म्हणून त्याच्या प्रवृत्तीला 'ज्या ताटात खाणे इथेच ओकारी करणे' हे अभिधान दिलं.
काय चुकलं?
नागरिकांचा नैतिक दबाव= "खातो तिथे ..गणे" ?
ताटात ओकणे वगैरे भाषा ऐकून शिसारी आली, पण मुद्दा मांडायला हवाच. कोणत्याही देशाचे सरकार केवळ न्याय्य , योग्य गोष्टीच करते या शाळकरी भ्रमातून या ऐसीकरांनी बाहेर येण्याची गरज आहे. अमेरिकेचे व्हिएतनाम मधली अत्यंत निंद्य वागणूक (लाखो लोकांचे बॉम्बिंग मधले मृत्यू वगैरे) केवळ अमेरिकनांच्या निदर्शनामुळे बंद झाली. भारतीय सरकारही कोठडीतील टॉर्चर , खोट्या चकमकीतले मृत्यू , कोठडीतील बलात्कार याबाबत प्रचंड प्रमाणात दोषी आहे . हे बंद करण्याचे काम फक्त नागरिकांच्या नैतिक दबावातूनच होऊ शकते : बाहेरच्या सत्तांचे, संस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन स्वतःची कृष्णकृत्ये मान्य करणे हे फारसे घडत नाही-तेव्हढी नैतिक उंची फारशा सरकारांची नसते. हे दोष दाखवून देणार्यांबाबत जर "खातो तिथे ..णारे" वगैरे मूर्ख बडबड करायची असेल, तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेव्हढी थोडीच आहे .
Don't just do something; sit there.
र्वरित मानवजात (तुम्ही आणि मी !) षंढपणे , मख्खपणे पाहत बसलो आहोत. वाहवा!
आमची मैत्रिण अॅमी/अस्मि सांगते त्याप्रमाणे "Don't get involved in other people's affairs".
स्वित्झरलँड ची भूमिका अशीच आहे. Don't just do something; sit there.
आणखी - इथून उधृत
The advice of Switzerland's popular saint, Nicholas of Flüe (1417-87), "Don't get involved in other people's affairs" has been the hallmark of Swiss policy for nearly 500 years. The country has in effect been neutral since 1515, a status formally recognised and guaranteed by the great powers of Europe after the Napoleonic Wars in 1815.
Swiss neutrality thus has deeper roots than any of Europe's other major neutral states: Sweden (1815), Eire (1921), Finland (1948) and Austria (1955).
Neutrality is defined as non-participation in a war between other states. The rights and duties of neutral countries in time of war were laid down by the international community in 1907. In times of peace neutral states define their own rules, but take it for granted that they should stay outside military blocs, like NATO.
The status of neutrality has not only protected Switzerland from war, but has helped prevent the country from being torn apart when its different language communities might have been tempted to side with different belligerents in cases of conflict.
हिटलरच्या ज्यू हत्याकांडाबद्दलही असाच पवित्रा ?
सर्वसाधारण समस्यांबद्दल हे थोडेफार पटूही शकते (Don't be a busybody!") . पण स्वित्झर्लंडने जर हिटलरच्या ज्यू हत्याकांडाबद्दलही असाच पवित्रा घेतला असेल तर ते अत्यंत लज्जास्पद आहे . पाकिस्तानात होत असलेल्या हिंदू किंवा शिया लोकांच्या हत्यांबाबत तिथले केंद्र सरकार उदासीन आहे हे उघड आहे . इतरांनीही त्याबाबत स्वस्थ बसावे काय? नव्या जगात- जिथे सर्व देश एकमेकांवर अवलंबून असतात- सार्वभौमत्व ही एक अतिशय विवाद्य गोष्ट झाली आहे आणि त्याच वेळेला "नेशन स्टेट " अनेकदा सरळ सरळ फॅसिस्ट प्रवृत्तीने वागताना दिसते .
स्विस तटस्थतेबद्दल , न्युट्रॅलिटी बद्दल अवांतर
स्वित्झरलँड ची भूमिका अशीच आहे. Don't just do something; sit there.
स्वित्झर्लंडची भूमिका नुसतीच न्युट्रल नाही. त्यांच्या भूमिकेला armed neutrality म्हणतात.
शस्त्रसज्ज पण न्युट्रल असा देश. शिवाय त्यांच्या न्युट्रल राहण्याच्या इच्छेस पूरक असे इतर काही सांस्कृतिक , आर्थिक, राजकिय्, ऐतिहासिक्, सामाजिक घटकही कारणीभूत आहेत.
नाझींनी/
अॅक्सिस सैन्यानं स्विस सार्वभौमत्वाचा भंग केला, फायटर विमानं स्विस हद्दीतून उडू लागली हे दिसताच ह्या चिमुकल्या देशानं retaliate सुद्धा केलेलं आहे. चक्क नाझींची दोन-चार विमानं पाडलेली आहेत. दुसर्या महायुद्धात दोन-चार ह्या अशाही घटनाही आहेत.
•The Swiss armed forces mobilized in three days when war first broke out in 1939, and (re)fortified the country's borders. The risk of Axis invasion was met with hints of bloody battles of attrition, a national redoubt, and interference of Axis passage rights through critical rail lines. Aerial incursions by both Axis and Allied aircraft were met evenhandedly, with interceptions in some cases, especially by bomber formations, and by turning a blind eye to accidental violations by lost single aircraft.
.
.
शिवाय मी राजकिय, आर्थिक कारणं म्हणतो ते म्हणजे हे--
•Switzerland was very dependent on food imports from many countries, which had to be paid for with the proceeds of trade in other areas.
•Switzerland's banking and financial dealings depended on neutrality, in order to facilitate its own trade in all areas, and as a source of national revenue to allow survival. Germany's economy was based on a national Ponzi scheme that required the existence of external financial markets. There was trade in precious metals and gold reserves, but a postwar Allied investigation determined that Swiss transactions with Germany did not prolong the war.
.
.
दोस्त राष्ट्रे व अॅक्सिस अशा दोघांनीही पैसे स्विसवाल्यांअकडेच दिल्ते ठेवायला. जिंकल्यानंतर आरामात परत घेउ म्हणून.
स्विसलाच बॉम्बिंग करुन इतर युरोप सारखं ध्वस्त केलं; तर तुमचा हिशेब लागणार कसा ?
सगळी लूट कुठेतरी सुरक्षित ठेवयला नको का ? स्वतःच्या देशात तर ती तशी ठेवता येत नाही. (शत्रू सैन्याकडून सतत हल्ले होत असण्याची भीती)
दुसर्या महायुद्धादरम्यान व नंतरही अकही काळ मोठी लाटाच सुरु होती अॅन्टिक वस्तूंच्या स्मगलिंगची.
आख्ज्ख्या युरोपातून विविध ठिकाणहून जे काय लुटून आणलेलं नाझींनी, त्यातल्या कित्येक गोष्टींअन कोणी दावेदार मिळाला नाही मालक म्हणून. ( मालक युद्धात मारला गेला नैतर परागंदा झाला परत न येण्याच्या इराद्यानेच.) मग त्या परस्पर चोरवाटेनं विकल्या जाउ लागल्या.
.
.
नोट --
ह्या प्रतिसादातले इंग्लिश परिच्छेद क्युओरा ह्या सायटीतल्या एका प्रतिसादातून थेट उचलले आहेत.
अर्थ निरक्षर
मी अर्थविषयक बाबींत निरक्षर, ठार अज्ञानी. जिथवर ऐकून आहे त्यावरुन --
नाझी राज्य technically bankrupt झालेले होते युद्धाच्या सुरुवातीपासूनच. यु एस एस आर, ब्रितिश साम्राज्य, यु एस ए इत्यादी सर्वाधिक धनाढ्य , समृद्ध होते. अॅक्सिसच्या एकत्रित ताकतीहूनही कैकपट प्रचंड इंडस्ट्रिअल प्रॉडक्शन व नैसर्गिक संसाधन (युद्ध सामुग्री --अवजारं, दारुगोळा, वाहनं, रणगाडे ह्यासाठी धातू,रबर, पेट्रोल ,अन्नधान्य) ह्यांच्यातले एकेक्ट्याचे होते.
ह्यांच्याशी जर्मनी-इटली लढत कसे होते ?
त्यातले अकही महत्वाचे मार्ग-
१.नवा भूभाग जिंकून/लुटून आधीची देणी देत रहायची.
२. अंकित भूभागत किंवा जिंकलेल्या भूभागात स्वतःला हवे त्या दराने स्वतःचे चलन खपवत रहायचे. स्वतःला हवे तसे छापत रहायचे. त्याचा आणि वास्तव इकॉनॉमीचा/दराचा संबंध होताच असे नाही. (काहीही छापले तरी तरी रोमानिया,बल्गेरिया,हंगेरी,झेक वगैरे जर्मनीला जाब थोडीच विचारु शकत होते ?)
आणी हे आख्ख्या continental Europe मध्ये नाझी करत होते.
१९४१ ला त्यांच्या उत्कर्ष बिंदूच्यावेळी त्यांच्या ताब्याबाहेर फक्त इंग्लंड आणि रशियाचा पश्चिम भाग होता.
जर्मनी, इटाली, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्तक, पोलंड, फ्रान्स्,फिनलंड, डेन्मार्क , नॉर्वे,स्वीडन्,रोमानिया, बल्गेरिया, हंगेरी, स्पेन्,इत्यादी थेट, जिंकले तरी गेले होते; किंवा नाझींअन सामील झाले होते किंवा जर्मनीशी व्यापाराला तयार तरी होते. ह्यातल्या बहुतांश प्रदेशात ती चलन छपाई आणी पॉन्झी स्किम सुरु होती म्हणतात.
.
.
हे करत राहण्यासाठी सतत नवनवे भूभाग जिंकत राहणं भाग होतं. जोवर नवा भूभाग येतोय तोवर आधीची पापं धुतली जाताहेत. "कर्जं काढून इ एम आय फेडण्याचे " हे उद्योग.
.
.
अधिक ज्ञान मला नाही.
हे पूर्णसत्य नाही. नाझी राज्य
हे पूर्णसत्य नाही. नाझी राज्य बॅंकरप्ट वगैरे नव्हतं. त्यांची तत्कालीन सैनिकी शक्ती इतर राष्ट्रांच्या तुल्यबळ किंवा काकणभर अधिकच होती. किंबहुना इतर राष्ट्रांनी त्यांच्या बरोबरीत येण्याआधीच जमेल तितका प्रांत काबीज करून अधिक बलवान व्हावं अशा जर्मनीचा प्रयत्न होता. त्यातल्या युद्धपूर्व प्रयत्नांत जर्मनी यशस्वी होत होती. कदाचित या वेगावर थोडं बंधन त्यांनीच घातलं असतं तर अधिक यशस्वीही झाली असती. मात्र डांझिंग काबीज करून जर्मनीने दुसरं महायुद्ध काहीसं ओढवून घेतलं. इतक्या मोठ्या युद्धासाठी कोणीच तयार नव्हतं, पण जर्मनी जास्त तयार होती. त्यामुळे नवा भूभाग घेऊन शक्ती वाढवायची ही आक्रमक भूमिका जर्मनीला घेता आली. याउलट इतर राष्ट्रांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. सतत नवीन भूभाग जिंकत राहाणं हे कर्ज काढून इएमाय फेडण्यापेक्षा जास्त जास्त अॅसेट्स ताब्यात घेण्यासारखं होतं. जर स्टालिनग्राड आणि मॉस्को पडलं असतं तर कदाचित इंग्लंडही पडू शकलं असतं. आणि मग अमेरिका युद्धात उतरली असती की नाही हा प्रश्न आहे.
गॅरी कास्परॉफची तळमळ
द वॉल स्ट्रीट जर्नलनं गॅरी कास्परॉफचा लेख छापला आहे. सोशालिझम नव्हे तर रक्तरंजित पुतीन सरकारनं नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली, तेव्हा पश्चिमेनं काहीही केलं नाही. आणि आता पुतीन राक्षस बनला आहे, अशा अर्थाचा लेख. थोडं आत्मपरीक्षण आणि थोडी हरल्याची भावना. लेखाच्या शेवटी तो म्हणतो,
Crimea is annexed, Ukraine is invaded, ISIS is rallying, Aleppo is laid waste, and not a one of us can say that we did not know. We can say only that we did not care.
लेखाचा दुवा - The U.S.S.R. Fell—and the World Fell Asleep
अलेप्पो, सीरिया मध्ये आसाद /
अलेप्पो, सीरिया मध्ये आसाद / पुतीन निशस्त्र , निरपराध नागरिकांच्या प्रचंड कत्तली करत आहेत, लहान मुले जिवंत जाळली जात आहेत, आणि उर्वरित मानवजात (तुम्ही आणि मी !) षंढपणे , मख्खपणे पाहत बसलो आहोत. वाहवा!
सिरिया (मंजे आसाद) आणि रशिया यांच्या भूमिकांस आणि कृतींस माझा पाठींबा आहे. इराक सरकार आणि सिरीया सरकार सोडून तिथे जे जे गैरसरकारी फोर्सेस आहेत त्यांना चेचून मारले पाहिजेत आणि परिस्थिती अरब स्प्रिंग पूर्वीसारखी केली पाहिजे. मला माझ्या षंढपणाचा आणि मख्खपणाचा अभिमान आहे.
===================
अतिरेकी सर्वसाधारण नागरिकांच्या पदराआड (फेमिनिस्ट वाक्यरचना झाली वाटतं) लपून सिरियाचे सार्वभौमत्व धोक्यात आणत असतील आणि वर्षानुवर्षे भुभाग अतिरेक्यांच्या ताब्यात राहणार असेल तर कडक कारवाई समर्थनीय आहे.
=======================
या बातमीसाठी ही वाक्यरचना धादांत खोटी आणि सिरीयन सरकारची बदनामी करणारी आहे.
I hope not, as I have been
अधोरेखित प्रश्न हा कळीचा प्रश्न आहे. कोणी, केव्हा, कोणत्या आधारावर, कुठे, कोणत्या साधनांनी हस्तक्षेप करायला हवा ते.