Skip to main content

फेसबुक फ्रेंडनं फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा न दिल्यानं शेजारच्या काकू कष्टी.

फ्रेंडशिप डे

पुणे, २ ऑगस्ट २०२१.

आपल्या फेसबुक फ्रेंडनं आपण सोडून आणखी भलत्याच चार स्त्रियांना फेसबुकवर, चारचौघांत जिवलग म्हणाल्यामुळे शेजारच्या काकू कष्टी झाल्याची बातमी आमच्या कानांवर आली आहे.

सदर फेसबुक फ्रेंड फेसबुकवर आणि बाहेर गोडगोड गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्यापेक्षा जगात आणखी कुणीही जास्त गोड नाही, आपली स्पर्धा थेट स्पृहा जोशी यांच्याशी आहे, असं सदर फेसबुक फ्रेंडला सतत वाटत राहतं. लोकांनी आपल्याबद्दल काही वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, आपलं वाईट बघू नये, यासाठी सदर फ्रेंड प्राजक्ता माळीपेक्षा अधिक कार्यशील असते. तिच्याकडून मैत्रीदिनाच्या एवंविशिष्ट शुभेच्छा फक्त चारच स्त्रियांना मिळाल्यामुळे अनेकांची निराशा झाली असावी असा कयास आहे.

या फेसबुक फ्रेंडच्या अनेक मित्रांनीही या घडामोळींमुळे हताशा व्यक्त केली असली तरीही त्यांची 'j1 झाल का' इतपत अधोगती झाल्याचं अजूनपर्यंत दिसलेलं नाही. शेजारच्या काकू मात्र या प्रकारानं कष्टी झालेल्या आहेत. ० ते ६ या स्केलवर तुम्ही किती कष्टी झाला आहात, याचं उत्तर त्यांनी फक्त थंब्जअप एवढंच उत्तर दिलं. "मला अनेक मित्रांकडून शुभेच्छा मिळाल्या, परंतु मैत्रिणीकडून शुभेच्छा मिळवून मी या स्केलच्या मध्यात असल्याचं सिद्ध करणं शक्य झालं असतं", असंही काकूंनी खाजगीत अनेकांना बोलून दाखवलं आहे.

सई केसकर Sun, 01/08/2021 - 19:59

इतकीही अशी काही स्पृहा वगैरे आहे असं मला वाटत नाही सदर फ्रेंड बद्दल. कुणी हळुवार भावनांच्या हिंदोळ्यावर झुलुच नये का कधी? काही काही बायका स्त्रीवाद वापरून गळे कापतात काही काही गोडमिट्ट वागून कापतात. त्यातला प्रकार असावा असा माझा कयास आहे.

'न'वी बाजू Sun, 01/08/2021 - 22:02

चित्र छान भिकार आहे. त्याबद्दल अभिनंदन करणार होतो, परंतु बारीक नजरेने पाहिले असता, ते 'दुबई क्रॉनिकल' की कोठूनसे उचलल्याचे कळले.

प्रस्तुत चित्र आपण काढले असते, तर अधिक चांगले वाटले असते. शिष्याकडून पराभूत व्हावे, अशी कोणत्याही चांगल्या गुरूची अपेक्षा असते; सबब, आपला अभिमान वाटला असता, नि ती आम्ही गुरुदक्षिणा समजून गोड मानून घेतली असती. पण चलो, अगली बार ही सही.

(अतिअवांतर: त्या अज्ञात दुबईवासी भुरट्या एकलव्याकडून आंगठा मागून घेण्याचा इरादा आहे.)

==========

'घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.' तूर्तास आंगठा तर घेऊ. मग एकदा उंगली दिल्यावर१अ हात पकडण्याबद्दल विचार करता येईल.

१अ आंगठाच. दुसरे कोणतेही बोट चालणार नाही.१अ१

१अ१ कम टू थिंक ऑफ इट, द्रोणाचार्यांनी आंगठा मागितल्यावर एकलव्याने त्यांना त्याऐवजी मधले बोट दिले असते, तर द्रोणाचार्यांचा कसला पचका झाला असता, नाही? परंतु एकलव्य पडला बिचारा सरळसोट. त्याला काय करणार?

'न'वी बाजू Sun, 01/08/2021 - 22:17

In reply to by 'न'वी बाजू

लेखातले किंवा अन्य प्रतिसादांतले शष्प काही कळले नाही, अत एव केवळ चित्रासंबंधीच प्रतिसाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/08/2021 - 22:28

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही फेसबुकवर थोडे बागडत चलाच. बऱ्याच गंमती दिसतील.