अतर्क्य की तर्कसंगत?
नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः
हिंदू धर्मशास्त्रानुसार आत्मा अमर असतो. तो कधीही नष्ट पावत नाही. मृत्यूनंतर आत्मा निघून गेलेले शरीर हे अचेतन असते. अर्थात, ते जाळून नष्ट केले तरी निघून गेलेला आत्मा पुन्हः दुसर्या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म होणारच असतो. अशी हिंदूंची धारणा असते. किती हिंदू हे मानतात किंवा कसे, हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू! पण ही हिंदू धर्माची धारणा आहे, हे मात्र खरे.
म्हणूनच, अस्थी गोळा केल्या की प्रत्यक्ष दहनभूमीचे माहात्म्य संपते. दफनभूमीचे माहात्म्य असते ते ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या दहनभूमीवरील चौथरा पाडायला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली असल्याचे वृत्त वाचले. आणी स्वतःला अभिमानाने "हिंदुहृदयसम्राट" असे म्हणवून घेणार्या बाळासाहेंबांच्या अनुयायांना हिंदूंच्या धार्मिक धारणेपेक्षा ख्रिस्ती वा इस्लामी धार्मिक धारणा अधिक का भावू लागल्या, असा प्रश्न पडला.
हे अतर्क्य नव्हे काय?
की यानिमित्ताने, बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेसंबंधित वाद संपुष्टात येईल आणि "इतर मोक्याच्या" जागेचा विचार आपोआपच मागे पडेल, असा तर्कसंगत विचार यामागे आहे?
मुळात
मुळात शिवसेना (आणि भाजपा व तत्सम तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष) ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करते त्याचे मॉडेल ख्रिस्ती-इस्लामी धर्माच्या काही अतिरेकी अनुयायांपासून प्रेरणा घेऊनच तयार झाले आहे. या मॉडेलचे पूर्ण स्वरुप 'ते असे करतात म्हणून...' या एका वाक्यात संपते. आपल्या संतांनी शिकवलेल्या सर्वसमावेशक, समजूतदार हिंदुत्वाऐवजी अमुकतमुक काही झाले जाळपोळ करण्याची वृत्ती खचितच हिंदुत्ववादी नाही.
आजच्या पेपरात वाचलेल्या बातम्यांनुसार आता स्मारकाच्या वादाऐवजी शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ असे करावे असे शिवसेनेचे मत आहे. थोडक्यात आता शिवाजीऐवजी बाळासाहेबांचे नाणे चलनी वाटू लागले आहे.
अवांतरः सामनामध्ये त्या चौथऱ्याला समाधीस्थान असे म्हटले आहे. बाळासाहेबांचा रीतसर दहनविधी झाल्याने त्या स्थानाला 'समाधी' म्हणणे योग्य आहे काय?
नसावे.
ते धर्म उत्पन्न झाले त्या काळी इण्टरनेटावरून फाष्टात संकल्पना हिकडून तिकडं जात नसाव्यात बहुतेक.
पण तरीही, 'मूलतत्ववाद्यांचा' (हा हिंदी शब्द. मराठीत यांनाच प्रतिगामी, हिंदुत्ववादी इ. म्हणत असावेत) अविर्भाव सगळीकडे च सारखा. मी सांगतो तो 'धर्म'. बाकी सगळे 'हीदन' 'काफिर'. यांना नष्ट कर. किंवा बाटवून अनुयायी कर. 'तरच', 'तुला', 'स्वर्गात', जागा मिळेल असे बहुतेक सर्वच धर्मांनी या ना त्या वेळी सांगितले.
बेसिकली हिंदुत्ववाद्यांचे (किंवा कोणत्याही मूलतत्ववाद्यांचे. त्यात सगळेच धर्म येतात. हिंदुत्ववाद्यांचे विचार मला माझ्या अनुभवांशी पडताळून पहाता येतात म्हणून त्यांचा विशेष उल्लेख) युक्तिवाद वाचले की हे केवळ 'त्या' धर्माचा हेवा वाटतो, म्हणून त्यांच्यासारखे बनण्याच्या हेतूने केले आहेत असेच वाटतात.
या पेक्षा हे लोक सरळ मुसलमान/ख्रिश्चन इ. का होत नाहीत? :डोळे फिरवणारा बाहुला:
:)
मला वाटलंच होतं की माझा प्रतिसाद "बाल की खाल" टायपाचा वाटणार, पण खरच तसा प्रश्न पडलाय मला.
आता,
'मूलतत्ववाद्यांचा' अविर्भाव सगळीकडे च सारखा.
यातून मला मूलतत्ववाद ही मानवी स्वभावाशी निगडीत असलेली (पण हळू हळू नष्ट होत जाणारी) गोष्ट असावी असं वाटतं.
त्यांमुळे "याचं मॉडेल त्याने घेतलं / त्याचं मॉडेल याने घेतलं" हे दावे निरर्थक वाटतात.
सर्व मातीमोल करणार बहुतेक .......
माझे शिवसेनेला पूर्ण समर्थन नसले तरी एक मराठी पक्ष म्हणून विरोध नाही पण बाळासाहेबांबद्द्ल नितांत आदर आहे.
गेल्या काही वर्षात शिवसेनेला उतरती कळा लागली होती. बाळासाहेब गेल्याने जो जिव्हाळा शिवसेनेबद्द्ल निर्माण झाला होता त्याचा समर्पक उपयोग पक्ष बांधणीसाठी जर केला गेला असता तर त्यांच्या उत्तराधीकार्याना निर्विवादपणे एक हुशार नेता म्हणून पुढे येता आले असते पण बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या समाधीचे होणारे राजकारण पाहून विशेष करून सामना मध्ये अ(उ)ग्रलेख लिहिणारे सध्या असे सुटलेत कि हि संधी शिवसेना मातीमोल करणार बहुतेक....
अॅनालॉजी
धागा वाचून एका जुन्या धाग्याची आठवण झाली. 'गांधी अहिंसेचे प्रणेते; मग नथुरामला फाशी देणे हे कृत्य अहिंसाविरोधी नाही का?' असा काहीसा धागा होता. (लिंक देत नाही कारण हल्ली जुने धागे वाचता येत नाहीत).
त्यांना स्टेट फ्यूनरल मिळाली तेव्हा स्मारकही करायला काही हरकत असू नये.
नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः
हिंदू धर्म.
इ. वाचून धागा काही गंभीर चर्चा करेल असे वाटले, पण हाय रे कर्मा! फडतूस चर्चा.
वर अतिशहाणा यांना +१ दिलेला आहेच.
मुळात शिवसेना (आणि भाजपा व तत्सम तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष) ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करते त्याचे मॉडेल ख्रिस्ती-इस्लामी धर्माच्या काही अतिरेकी अनुयायांपासून प्रेरणा घेऊनच तयार झाले आहे. या मॉडेलचे पूर्ण स्वरुप 'ते असे करतात म्हणून...' या एका वाक्यात संपते. आपल्या संतांनी शिकवलेल्या सर्वसमावेशक, समजूतदार हिंदुत्वाऐवजी अमुकतमुक काही झाले जाळपोळ करण्याची वृत्ती खचितच हिंदुत्ववादी नाही.
हे परफेक्ट निवेदन आहे.
:-)
यामागे परदेशी शक्तींचा हात आहे का हे पाश्चात्यांचं अंधानुकरण आहे?