Skip to main content

गडकरी पुन्हा अध्यक्ष होणार का?

मटा मधे बातमी वाचली की अडवाणींनी गडकरींच्या नावाला विरोध केलाय आणि सुषमा स्वराज यांचे नाव सुचविले आहे. गडकरींना भाजपातुन विरोध आहे, पण संघ मात्र गडकरींच्याच अध्यक्षपदासाठी आग्रही आहे. संघाची नाराजी ओढवुन न घेण्यासाठी सुषमा स्वराजही अध्यक्षपदाला अनुत्सुक आहेत, कदाचित पंतप्रधानपदासाठी सर्वसहमतीच्या उमेदवार म्हणुन स्वत:ची पोझिशन मजबुत करायचा विचार करताहेत. काही मंडळी जेटलींचे नाव मांडत आहेत. मोदीगटाचा जेटलींना पाठींबा आहे.

अशा परिस्थितीत संघाच्या दबावाखाली गडकरींना अध्यक्षपद मिळु शकतं. पण भाजपाला ते परवडण्यासारखं आहे का? भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कॉंग्रेसला लक्ष्य करायचे झाल्यास गडकरींनी खरंतर स्वत:हुन बाजुला व्हायला हवं होतं. गडकरी अध्यक्षपदी जर २०१४ पर्यंत राहिले तर भाजपाला नवीन मुद्दे कॉंग्रेसविरोधात शोधावे लागतील.

कॉंग्रेस मात्र त्यामानाने २०१४ साठी तयारीत दिसतेय. राहुन गांधींना उपाध्यक्षपदी आणलंय, आधार कार्डाद्वारे अनेकांच्या बँक अकाउंटमधे पैसे जमा करुन लोकांना खुष करायचा प्रयत्नही होईलच. भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपाने उकरुन नाही काढला तर जनताही विसरुन जाईल आणि २०१४ ला पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर येईल.

मन Tue, 22/01/2013 - 09:56

Anyways; It doesn't matter to me much. Nor do I have any control about it to happen.
It's ljust like a documentary or a movie which I am watching in a theatre without getting associated/involved at all.
आंग्ल भाषेबद्दल क्षमस्व. पण हे मराठित काही धड सांगता येइना.
शिवाय मराठीप्रमाणेच आमच्या आंग्ल भाषेतही अगणित चुका आम्ही करतो ह्याची कल्पना आहे.
दुरुस्ती, सूचनांचे स्वागत आहे.

नगरीनिरंजन Tue, 22/01/2013 - 12:46

In reply to by मन

राहुल गांधींच्या उपाध्यक्षपदाची घोषणा होताना त्यांच्या चेहर्‍यावरचे लाजरे "कशाला, कशाला" भाव आणि पक्षातल्या वैफल्यग्रस्त बुजुर्गांचा लाचार गहिवर हा परफॉर्मन्स तर ऑस्करच्या पात्रतेचा होता!

शैलेंद्रसिंह Tue, 22/01/2013 - 13:25

In reply to by मन

इट मॅटर्स. विरोधी पक्ष जर खिळखिळा झाला तर त्यामुळे भारतीय पॉलिटीवर खुप मोठा परिणाम होईल. गडकरींना पुन्हा अध्यक्ष करणे हे भाजपाच्या सोयीचे अजिबात नाही. संघाचा दबाव झुगारणे हेही अवघड म्हणुनच हा विषयाविषयी उत्सुकता लागुन राहिलीय.

तिरशिंगराव Thu, 24/01/2013 - 19:39

In reply to by मन

Anyways; It doesn't matter to me much. Nor do I have any control about it to happen.
It's ljust like a documentary or a movie which I am watching in a theatre without getting associated/involved at all.

काही असो, मला त्याने काही फरक पडत नाही. आणि ते होण्यावर माझे काही नियंत्रणही नाही.
हे म्हणजे, एखादा सिनेमा वा लघुपट त्यांत जराही न गुंतता,पहाण्यासारखे आहे.

'मन'राव, आपल्याला असेच काही म्हणायचे आहे का ?

--तिमा

राजन बापट Tue, 22/01/2013 - 21:39

प्रश्न असा वाटतो की या सार्‍यातून भाजप त्यांची राष्ट्रीय आघाडी २०१४ पर्यंत बांधू शकेल का ? की इतके प्रचंड गैरव्यवहार प्रस्तुत कारकीर्दीत उघड झाल्यावरही कसलाही राजकीय पर्याय शिल्लक नाही अशीच परिस्थिती उद्भवेल ?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/01/2013 - 21:48

गडकरींचा राजीनामा!

या नाटकाच्या निमित्ताने (राष्ट्रीय स्वयंसेवक) संघाला भाजपच्या आतल्या भानगडींमधे रस असतो अशा अर्थाच्या बातम्या आल्या, त्याचा संघसमर्थकांनी इंटरनेटवर धिक्कार केलेला दिसला नाही (म्हणजे वृत्तपत्र या बाबतीत खोटं बोलत नसावीत) या गोष्टीही पुन्हा एकदा दिसल्या.

राजन बापट Wed, 23/01/2013 - 00:59

आताच फेसबुकावर याबद्दलची ही प्रतिक्रिया वाचली. नि थोडी गंमत वाटली :

"चला अश्या रीतीने अजून एक महाराष्ट्रीयन दिल्ली जिंकण्यास असमर्थ राहिला...च्यायला.. पानिपत कसं सवयीच झालंय ना... जाऊद्या.. चला नितीन गडकरीजी करा तुम्ही पण आराम आता...झोपा...शुभ रात्री...!!! "

रमाबाई कुरसुंदीकर Thu, 24/01/2013 - 16:28

काहीही म्हणा, हा नितिन कधी पक्षनेता म्हणून शोभलाच नाही.मिठाईच्या दुकानात गल्ल्यावर बसणार्‍यांसारखा दिसतो असे ह्यांचे मत्. अडवाणी,वाजपेयींचा कणखरपणा,मुद्देसूदपणा नितिनकडे नाही असे मलाही वाटते.

तिरशिंगराव Thu, 24/01/2013 - 19:38

कुठलाही चांगला पर्याय नसल्याने आणि गरीब लोकांना रोख सब्सिडी वाटल्याने पुन्हा काँग्रेसच येणार असे वाटू लागले आहे.

विषारी वडापाव Thu, 24/01/2013 - 20:37

संघाच भाजप वरच वर्चस्व संपत आले आहे. भागवतानी पूर्ण जोर लावून पण गडकरिना दुसरी टर्म मिळाली नाही. भाजप मधला अंतर्गत संघर्ष गडकरिना भोवला. पण त्या निंमित्ताने संघ पण भ्रष्टाचारयाणा पाठीशी घालतो हे दिसून आले.