स्वत:च्या मातेसोबतही एकांतात बसू नये!
वादग्रस्त साधू आसाराम बापू यांना एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक झाली. आसाराम हे त्या मुलीला घेऊन दीड तास एकांतात होते, अशी माहिती तपासातून समोर आली. त्याचे समर्थन करताना, आसाराम यांनी म्हटले की, ‘‘आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत एकांतात बसण्यात वाईट ते काय?''
विविध आखाड्यांच्या महंतांनी आसाराम यांच्या एकूणच वागणुकीला आक्षेप घेतला. दुसरे एक वादग्रस्त साधू रामेदव बाबा यांनी आसाराम यांना थेट विरोध केला नाही. पण त्यांनी धर्मशास्त्राचा हवाला देऊन एक वक्तव्य केले. रामदेव बाबा म्हणाले की, ‘‘साधूंनी स्त्रियांसोबत एकांतात बसू नये. साधूंनीच नव्हे, सर्वांनीच ही खबरदारी घ्यायला हवी. आपली माता, सासू, बहीण, मुलगी यांच्यासोबतही एकांतात बसू नये, असे धर्मशास्त्र सांगते.''
रामदेव बाबा यांनी ज्या धर्मनियमाचा हवाला येथे दिला आहे, त्याचा उगम वैष्णव पंथियांचा मुख्य धर्मग्रंथ असलेल्या श्रीमद्भागवतात आहे. राजा ययातिच्या तोंडी हा नियम आला आहे.
राजा ययातिची गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ती पुन्हा येथे देत नाही. आपले म्हातारपण आपला धाकटा मुलगा पुरू याला देऊन तसेच त्याचे तारुण्य स्वत:कडे घेऊन ययाति कित्येक वर्षे लैंगिक सुखाचा उपभोग घेतो. लैंगिक सुख कितीही उपभोगले तरी मन भरत नाही, याची जाणीव शेवटी त्याला होते. तेव्हा तो पुरूचे तारुण्य त्याला परत करण्याचा व स्वत: सर्व:संग परित्याग करून वानप्रस्थ स्वीकारण्याचा निर्णय घेतो. आपला हा निर्णय तो आपली पत्नी भृगुनंदिनी देवयानी हिला सांगतो. यावेळी तो तिला मोठा उपदेश करतो. या उपदेशात माणसाच्या लैंगिक सुखाच्या तृष्णेविषयी दोन श्लोक आहेत. त्यात वरील नियम आला आहे.
ययातिच्या तोंडी असलेले भागवतातील मूळ श्लोक असे :
या दुस्त्यजा दुर्मीतिभिर्जीर्यतो या न जीर्यते ।
तां तृष्णा दु:खनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत ।।
मात्रा स्वस्त्रा दुहिता वा नाविविक्तासनो भवते ।
बलवानिन्द्रियग्रामो विद्वासंसपि कर्षति ।।
श्रीमद्भावगत, स्कंध : ९, अध्याय १९, श्लोक : १६ आणि १७.
अर्थ :
लैंगिक सुखाची तहान ही सर्व दु:खांचे उगमस्थान आहे. मंदबुद्धीचे लोक या तृष्णेचा त्याग करू शकत नाहीत. शरीर म्हातारे होते, पण लैंगिक सुखाची तृष्णा नित्य नवी होत जाते. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे, त्याने लैंगिक तृष्णेचा त्वरित त्याग करायला हवा. ।।१६।।
आपली माता, बहीण आणि कन्येसोबतही एकांत स्थानी एका आसनावर बसू खेटून बसू नये. इंद्रिये बलवान असतात. मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात. ।।१७।।
शरीर म्हातारे झाले तरी शरीर सुखाची तहान म्हातारी होत नाही, उलट तिला नवे धुमारे फुटत राहतात, हा पहिल्या श्लोकातील उपदेश आसाराम बापू यांच्या वयाच्या पाश्र्वभूमीवर प्रभावी ठरावा. आसाराम यांचे वय आता ७१ वर्षांचे आहे. १६-१७ वर्षांच्या मुलीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इंद्रिये बलवान असतात, मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात, हे खरेच नाही का?
कदाचित आसाराम बापुंपुढेही तोच
कदाचित आसाराम बापुंपुढेही तोच आदर्श असेल आणि हे असले उफराटे प्रयोग करायची प्रेरणा त्यांना मिळाली असेल, नाही का?
अर्थात आसाराम बापुंना 'ब्रह्मचर्य टेस्ट' मध्ये पास होता आले नसेल. पण म्हणुन खर्या बापुंच्या तर्कदुष्ट कृतीची भलामण करायचे काहीच कारण नाही.
सगळे धर्म पुरुषांनी बनवलेले
सगळे धर्म पुरुषांनी बनवलेले आहेत हे ठीक आहे. पण स्त्रियांसाठी काही यम-नियम असतील ना!
लेखात हे पळसकर म्हणतात की लोकांनी असं-असं करू नये. लोकांमधे स्त्रियाही येतात ना? 'न'वी बाजू मला विचारतात "तुम्हाला मनस्थिती आहे?"
वेगळ्या धर्मांनी स्त्रीद्वेष करण्याची सवय झालेली आहे, पण ऐसी अक्षरेवर मान्यवर आयडींकडून केवढा हा स्त्रीद्वेष!! दु:खातिरेकाने माझी मती कुंठित झालेली आहे.
पण स्त्रियांसाठी काही यम-नियम
पण स्त्रियांसाठी काही यम-नियम असतील ना!
नाही, स्त्रियांसाठी काहीच नियम नाहीत. आपल्या समाजात कुत्र्यांसाठी नियम असतात का? नाही. ते पाळणाऱ्या मालकांसाठी नियम करायचे असतात.
लोकांमधे स्त्रियाही येतात ना?
अहो भारतीय घटना काहीतरी सांगते आणि तुमचा विश्वास बसतो. हे बाबा, बापू लोक ज्या धर्मग्रंथांचा हवाला देतात त्यात स्त्रिया लोक नसतात, मालमत्ता किंवा पाळीव प्राणी असतात. त्यामुळे त्यांना मनस्थिती असण्याचा संबंधच येत नाही.
लैंगिक तृष्णेचे वेळोवेळी शमन
लैंगिक तृष्णेचे वेळोवेळी शमन कसे करावे हा ही प्रश्नच आणि वेळोवेळी दमन कसे करावे हा ही प्रश्नच. लैंगिकतेचा संबंध थेट नैतिकतेशी असल्याने यावर उलट सुलट विचारप्रवाह समाजात आहेत. मेंदुचे 'काम'विषयक केंद्र जर बाह्योपचाराने संवेदनाहीन करता आले तर अनेक लैंगिक गुन्हे आटोक्यात येतील.
+
नेमके!
दुसर्याच्या शरीराचा कोणताही भाग सक्तीने (तात्पुरता किंवा कायमचा) निकामी करण्याचे अधिकार कोणी, कोणाला, कोणत्या आधारावर आणि कोणत्या अधिकाराने द्यावेत? (भले गुन्हा काहीही असो.१)
("मेंदुचे 'काम'विषयक केंद्र जर बाह्योपचाराने संवेदनाहीन करता आले तर अनेक लैंगिक गुन्हे आटोक्यात येतील") या सजेशनात आणि 'त्याचे हात कापा' / 'त्याचे आणखी काहीतरी तोडा' / 'त्याचे केमिकल कॅस्ट्रेशन करा'२ / 'त्याला भर चौकात खांबाला बांधून येणाराजाणारांकडून दगड मारवा/मुंडके उडवा' अशा प्रकारच्या सजेशनांत क्वालिटेटिव फरक नेमका काय?
एकदा 'गुन्हेगार' म्हटले, की संबंध असो वा नसो, हात धुवून घेण्याची, 'वचपा' काढण्याची, 'भडास' काढण्याची पब्लिकची जी एका प्रकारची सूडवृत्ती असते, ती नेमकी हीच नव्हे काय? ती सूडवृत्ती केवळ कायद्याकडे औटसोर्स करण्याचा हा प्रकार नव्हे काय?
कायदे, कायद्याच्या तरतुदी या भावनेवर आधारित असाव्यात काय?
असले काही सजेशन पब्लिकमध्ये केल्यास ते भयंकर लोकप्रिय व्हावे, याबद्दल शंका नाही. किंबहुना, अशा सजेशनवरून तसा कायदा बनवण्यासाठी इतकी पब्लिक डिमांड यावी, की बहुधा त्याला सिग्निफिकंट विरोध होण्याची शक्यता राहू नये, नि असे काही विधेयक बनल्यास ते सहजी पारित व्हावे; त्याकरिता 'वटहुकूम' वगैरे काढण्याची गरज भासू नये.
पण 'लोकप्रिय' असावे, म्हणजे 'विवेकी' ठरावे काय?
गुन्ह्यांविरुद्ध कायदे आणि शिक्षेच्या तरतुदी ठरवताना 'पब्लिक सेंटिमेंट' हा त्यामागील आधार असावा काय? हे नेमके कोणत्या प्रकारे 'विवेका'त बसते?
आणि... आणि... 'विवेकवादाला वाहून घेतलेली' म्हणून समजल्या जाणार्या एखाद्या संघटनेच्या पाइकांकडूनसुद्धा एखाद्या सार्वजनिक मंचावर अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारची सजेशने जाहीरपणे (आणि गंभीरपणे) मांडली जाऊ शकण्याची अपेक्षा असावी काय? (मग भलेही ती सजेशने खाजगी विचारांतून आलेली असोत, नि भलेही संघटनेच्या विचारसरणीशी त्यांचा थेट संबंध नसो.)
(अवांतर: Cruel and unusual punishmentविरुद्ध भारतीय घटनेत काही तरतूद आहे किंवा कसे, कल्पना नाही.)
(अतिअवांतर:
रोग नको औषध आवरा..
आपल्याला 'रोग परवडला, पण औषध आवरा' असे म्हणावयाचे होते काय?)
==========================================================================================
१ प्रस्तुत सजेशन हे बहुधा केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात केलेले असावे; गुन्हा केलेला नसताना, प्रोअॅक्टिव बेसिसवर, एखादी व्यक्ती कदाचित पुढेमागे असा गुन्हा करू शकेल / त्या व्यक्तीत तशी 'प्रवृत्ती' आहे, या आधारावर नसावे, असे गृहीत धरले आहे / अशी आशा आहे. (चूभूद्याघ्या.)
२ असले सजेशन समाजातल्या डॉक्टर वगैरे जबाबदार म्हणवल्या जाणार्या घटकांकडूनही दुर्दैवाने ऐकण्यात आलेले आहे. मेडिकल एथिक्सशी याचा नेमका कसा मेळ बसतो, ते कळलेले नाही.
...
लैंगिक तृष्णेचे वेळोवेळी शमन कसे करावे हा ही प्रश्नच आणि वेळोवेळी दमन कसे करावे हा ही प्रश्नच.
लैंगिकतेचा संबंध थेट नैतिकतेशी असल्याने यावर उलट सुलट विचारप्रवाह समाजात आहेत.
(१) ज्यानेत्याने स्वतःपुरते बोलावे. (२) इतरांची लैंगिकता रेग्युलेट/मॅनिप्युलेट करण्याचे तालीबानी/सौदी-छाप, अघोरी 'विचारप्रवाह' लोकप्रिय असतीलही कदाचित, पण ते बहुधा 'विवेकी' या सदरात मोडू नयेत. (चूभूद्याघ्या.)
'घरात एक थोडं भरपूर सुख असेल
'घरात एक थोडं भरपूर सुख असेल तर माणूस रांडेकडे कशाला जाईल हो?'
रोचक प्रश्न आहे.
लग्न झालेल्या/न झालेल्या प्रत्येक सज्ञान स्त्रीनेही (अर्थात त्या 'माणूस' नाहित हा दावा असल्यास आवाहन गैरलागू ठरेल याची कल्पना आहे) स्वतःला हा प्रश्न जरूर विचारावा व योग्य ती कृती करावा असे आवाहन या निमित्ताने करतो.
कुठल्याशा धार्मिक पौराणिक
कुठल्याशा धार्मिक पौराणिक ग्रंथांत काही अमुक तमुक सांगितलय असं म्हटलं की ती गोष्ट चूक की बरोबर,अन्यायकारक आहे का, आजच्या काळात निरर्थक आहे का वगैरे वादाच्या पलिकडे ती असते...असा विचार जनमानसात रूढ आहे. तुम्ही दिलेले त्याचेच एक उदाहरण दिसते.
'इंद्रिये बलवान असतात, मोठमोठ्या विद्वानांनाही ती विचलित करतात, हे खरेच नाही का?'---हा विचलित विद्द्वावानांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याकरता उपस्थित केलेला मुद्दा आहे. शेवटी विचारलेल्या प्रश्नावरून तुम्हाला हे विचलित विद्द्वानांचे आर्ग्यूमेंट पटलेले दिसते. काय समजायचं?
हा चर्चाप्रस्ताव फारतर मौजमजा सदरात गणता येईल.
च्च च्च..
कुठेतरी काहीतरी खाणे, आणि नंतर कुठेतरी निघून जाणे (पक्षी: गमन) यात अज्जिबात हिपोक्रिटपणा नाही.
खाऊन-खाऊन आपणाला अजीर्ण झाल्यावर 'बाबांनो, एवढं खाणं बरं नाही' असा दुसर्यांना उपदेश देणे यातही मुळीच हिपोक्रिटपणा नाही.
त्याला 'सौ चुहे खा के..' असे मराठीत म्हणतात.
मांजर जमातीला काहीही म्हणाच;
मांजर जमातीला काहीही म्हणाच; मी लगेच तलवार उपसून "पळ पळ शिवोऽहम" म्हणणार. ;-)
(मार्जारप्रेमी) अदिती
ययातिचे बोल म्हणजे "एक्सपर्ट ओपिनियन"!
येथील चर्चेत एक मुद्दा असा आला आहे की, "राजा ययातीने लैंगिक तृष्णेबाबत उपदेश करणे हे ‘सौ चुहे खा कर बिल्ली चली हज' या म्हणी प्रमाणे आहे."
वर्षानुवर्षे लैंगिक सुखाचा उपभोग घेतल्यानंतर ययाति हा उपदेश करीत आहे. त्यामुळे त्याच्यावर अशी टीका होणे साहजिक आहे.
या मुद्याकडे थोड्याशा वेगळ्या अँगलने पाहता येईल, असे मला वाटते. कितीही उपभागे घेतला तरी तृष्णा शमत नाही, हे ययातिचे मत अनुभवातून बनले आहे. त्यामुळे त्याला महत्त्व आहे. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास ययातिचे बोल म्हणजे "एक्सपर्ट ओपिनियन" होय.
महाभारतात वर्णन केलेली
महाभारतात वर्णन केलेली (महाभारतपूर्व) समाजस्थिती पाहिली तर खासगी बाबतीत बर्याच प्रमाणात मुक्तद्वार असलेले दिसुन येते.
ययातीचा स्वार्थ अत्यंत टोकाचा होता आणि त्याच्या विषयवासनेच्या पूर्तीत त्याने कोणतीही जनाची वा मनाची लाज बाळगली नव्हती. अशा नरपुंगवाचे बोलणे अनुभवसिद्ध आहे हे मान्य. पण एखादा असाच अनुभवी माणुस आज जर विषयवासना विषवत आहे हे सांगू लागला तर ते आपल्याला चालेल का?
दीर्घतमा ऋषीची कथाही तत्कालीन अनेक गोष्टींवर विचार करायला भाग पाडते. दीर्घतम्याच्या जन्माची कथा आज आपण भूषणावह समजणार नाही. देवगुरू बृहस्पतीच्या वर्तनाला आज कोणीही क्षमा करणार नाहीत. हाच दीर्घतमा वृद्ध झाल्यावर नवनव्या कामक्रीडा शिकला ज्याला आज बेस्टिआलिटी समजले जाईल.
या सगळ्याचा आपल्यापुरता अर्थ (मला समजतो तसा) म्हणजे पुराणातली वांगी पुराणातच बरी आहेत. तेव्हा तसे होते, अमक्याने तसे म्हटले म्हणून आज कोणीही तारतम्य सोडू नये.
कैच्याकैच
सगळ्यांचा लिबिडो समान नसतो हो. असतात काही लोक सभ्य. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मैत्रिणीची काळजी घेणारे मित्रही असतात. ययातीच्या गोष्टी लिहील्या तेव्हा हे असलं जनरलायझेशन खपून जात असेल. सध्या २०१३ साल सुरू आहे; या काळात अभ्यास करणार्याला एक्सपर्ट म्हणतात. स्वतःच्या उदाहरणावरून सरसकटीकरण करणार्या ययातींना फारतर एखादं (दुर्लक्षणीय?) फिक्शन लिहीता येईल.
आणि हो, अलिकडे एवढ्या कमी कष्टांत होलसेल उपदेशामृत विकलं जात नाही. गुड लक.
इंद्रिये बलवान नसतात
खरे बापू आणि आसाराम बापू यांच्यातला भेद न पाहता वरील मंत्र रचले आहेत. गांधींचे 'माझे सत्याचे प्रयोग' वाचाल तर असे कळेल कि ते स्वतः म्हातारे असताना १६ आणि १९ वर्षाच्या स्वतःच्या नातपुतणीसोबत आणि चुलतसुनेसोबत 'त्यांचे ब्रह्मचर्य टेस्ट होईपर्यंत' नग्न झोपले आहेत.
http://www.dnaindia.com/money/1818144/report-ambani-brothers-join-hands…
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-03-30/india/29361314_1…