Skip to main content

आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )

६- आचरणे व सोहळे (Rituals & Events) यांचा एक कायमस्वरुपी मजबुत कार्यक्रम.
अशा CULT मध्ये शिष्यांना कायम दोन पातळींवर एक कार्यक्रम दीलेला असतो आणि तो काटेकोरपणे अमलात आणणे यातच कशी अवघ्या जीवनाची सार्थकता आहे हे सतत हॅमरींग केले जाते.
यात वैयक्तीक पातळीवर आचरणाची असंख्य नियम व कामे (Rituals) नेमुन दीली जातात.यातील बहुसंख्य ही सोपी परंतु निर्बुद्ध आणि प्रचंड repetitive अशी असतात. यात काय खावे काय नाही, कुठल्या दीवशी ,कपडे इ. संबधी चे असंख्य नियम, अमुक इतके तास दररोज अमुक एक क्रिया करणे. इ, याची अनेक उदाहरणे आहेत पण जागा पुरणार नाही,
आणि सामुहीक पातळीवर असंख्य सोह्ळे (Events) चे आयोजन सातत्याने केले जाते. जसे प्रमुखाचा वाढदिवस, कोणतातरी महत्वाचा दिवस, initiation चा कार्यक्रम इ.अनेक ( परत जागा कमी पडते भाउ)
या कार्यक्रमा ने CULT सभासदांना कायमची संघटने शी अक्षरशः जखडुन ठेवते NO EXIT.
या Events द्वारे सभासदांचे प्रचंड आर्थिक व इतर शोषण केले जाते, जसे देणग्या,कार्यक्रमाला कार्यकर्ता म्हणुन राबविणे इ,यातुन संघटने च्या नविन भरती साठी ही पोषक अशी वातावरण निर्मीती ही होत असते.( बघितलत का ? कीत्ती कीत्ती आणि कुठुन कुठुन लोक आली होती कार्यक्रमाला आणि हो ते फॉरेनर्स......)
वैयक्तीक Rituals मुळे माणसाला एका भ्रामिक security & consistency चा दिलासा मिळतो,पण होत काय की सर्वात महत्वाच म्हणजे आत्मपरीक्षणासाठी (soul searching) साठी जो एक निवांतपणा आवश्यक असतो तो अशा Rituals मध्ये दिवस-रात्र गुंतल्यामुळे कधिच मिळत नाही. सभासद कायम एका उन्मादी अवस्थेतच दिसतो.( जरा निरी़क्षण करुन बघा)
७- अधिकार पदांची उतरंड (hierarchy)
याचा वापर प्रत्येक कल्ट करते. यात जसे कॉर्पोरेट विश्व्वा त जशी श्रेणीची व्यवस्था कि चेअरमन-व्हाइसचेअरन-मॅनेजर-इ. असते तशाच पोस्ट प्रत्येक संघटनेवाइज वेगवेगळ्या असु शकतात त्या आखुन दीलेल्या असतात. जसे प्रमुख गुरु सर्वात टॉपवर त्याच्या खाली उपगुरु मग उपउप मग शाखा प्रमुख इ.इ. सर्वात खाली अनेक साधारण सभासद.मग खालच्यांना वरच्या आणि वरच्यांना त्याहुन वरच्या पोस्ट चे प्रमोशन मिळविण्यास भरपुर प्रोत्साहन दीले जाते. याने संघटने चा अफाट विस्तार साधला जातो.अर्थात मग संघटने च्या प्रमोशन साठी टारगेट ही अ‍ॅचिव्ह करावे लागतात कीती नविन भरती केली, संघटनेचे कीती लेव्हल कीती कोर्सेस करुन गाठली. यातुन कीती इनर सर्किल मध्ये जाउ याची जोरदार चढाओढ सभासदां मध्ये लागते. मात्र सहसा यात वर जाण्याची एक लिमीट असते एक glass ceiling असते. आणि यातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे बाह्य जगा चा संपुर्ण त्याग करुन आलेले सर्व या अंतर जगतात परत तोच बाहेर चाच रॅटरेस चा पॅटर्न फॉलो करतात. जी धडपड बाहेर मॅनेजर बनण्यासाठी होती तिच आता उपगुरु बनण्यासाठी सुरु होते. धडपड चालुच फक्त फोकस बदलला मनाला शांती नाही ती नाहीच. तिच मनाची तगमग तगमग!
८-आमच्यात याच अन्यथा तुमचा निषेध असो ! ( convert or condemn)
यात एककलमी कार्यक्रम अत्यंत आक्रमकतेने राबविला जातो तो म्हणजे आपल्या संघटनेची सभासद संख्या वाढविणे संघटनेत convert करण्यासाठी हरेक प्रकारचे मार्ग अवलंबिले जातात पुस्तके-टिव्हि चॅनल्स - मिटींग्ज वन टु वन बेसीस यात असंख्य प्रलोभनांची उधळण केली जाते जर तुम्ही आमच्यात आलात तर तुमच्या या ते त्या जगापर्यंत कसे आणि कीती कल्याण होइल हे असंख्य पद्धतीने ठसविण्यात येते, आणि यात कुणी कशाने पिडीत असेल तर मग विचारायलाच नको कोणी व्यसनाने -आर्थीक परीस्थीतीने- आरोग्याने वा कुठल्याही कारणाने " ग्रस्त" असेल तर असे "ग्रस्ती" हा तर ऑल टाइम फेव्हरीट सॉफ्ट टारगेट ( catch them young च्या चालीवर catch them broken ) करुन त्यांना संघटने त ओढण्याचा जोरदार आक्रमक प्रयत्न करण्यात येतो.
यातला दुसरा भाग भयानक असतो जर वरील सर्व करुन ही एखादा जॉइन होत नसेल आणि कुठल्याही कारणाने संघटनेला विरोध करीत असेल तर मग मात्र अशांचा जबरदस्त निषेध केला जातो. बदनामी ते मारहाण ते काहीही ( संघटने च्या कट्ट्र्र्र्र ते च्या प्रमाणात विरोधकां ना दडपले जाते.यात सर्व माणुसकी विसरली जाते.
९- सभासदा ला "बाहेरच्यां " पासुन तोडणे ( आयसोलेशन)
सभासदांना अधिका अधिक संघटने च्याच लोकांशी सोशलाइज करण्यास प्रोत्साहन दीले जाते.सभासदांना बाहेरच्या जगाशी गरजेपुरते वरवरचे संबध आणि याच्या उलट " आतील आपल्या " लोकांशी अधिकाअधिक जवळीक वाढेल असे पोषक वातावरण पुरविले जाते. अशा सभासदांचा त्यांच्या जुन्या मिंत्रांशी-कुटुंबियाशी ही (जर ते सभासद नसतील) तर संवाद कमी कमी वा तुटक होत जातो. अशांचा समाजातील वावर एका फॉर्मेलीटी सारखा होत जातो. ते अधिका अधिक संवेदनाशुन्य व कमालीच्या संकुचित स्वभावाचे होत जातात. त्यांच्याशी संवाद साधणे अवघड होत जाते. असा सभासद हा दुहेरी पातळी वर जगु लागतो. बाहेरच्या साठी काहीही करणार नाही पण आतल्या एखाद्या साठे जान भी हाजिर है, यांचे सर्व प्रेम-मदत अपनो के लिये ( आपल्या संघटनेतला असेल तरच) बाहर वाले जाओ भाड मे. असे व्हावे यासाठी जाणीवपुर्वक काम केले जाते. कारण सभासद जेवढा आयसोलेटेड होतो तेवढ्याच प्रमाणात तो संघटने वर डिपेंड होत जातो. सभासदाचा बाहेरच्या जगाशी जो नॉर्मल संबध असतो तो तुटत जातो त्याचे फार दुरगामी परीणाम अशा सभासदावर होतात.
१०- सभासदा चा मेंदु निर्मल-स्वछ-चकचकीत करणे ( ब्रेनवॉश)
या बद्द्ल तर काय बोलावे बस नाम ही काफी है. याच्या असंख्य मेथड निर्माण केलेल्या आहेत.यात सभासदांच्या सारासार विवेका चा अक्शरशः चुराडा केला जातो. यावर टंकुन टंकुन बोट तुटुन जातील म्हणुन एक आळशी पणा करतो या लिंक्स तुम्हाला देतो मग तुम्ही तुमच काय ते बघुन घ्या बुवा मी आता थांबतो
http://www.cultwatch.com
www.culteducation.com

आणि एक राहील..
मी काही या विषयातील अधिकारी माणुस नाही जे काय माझ्या अनुभवा-वाचना ने थोडेफार आकलन झाले ते तुमच्या बरोबर शेअर केले इतकेच यात उणिवा चुका असु शकतील जाणकारांनी सुधारुन दील्यास आनंद होइल आभार आणि चुकासांठि माफी अगोदरच मागुन मोकळा होतो.
(पुर्वप्रकाशीत लेख)

राजेश घासकडवी Tue, 17/12/2013 - 08:20

दोन्ही लेख आवडले. वाचताना एक जाणवलं की जवळपास सर्वच संघटनांमध्ये या दहापैकी काही ना काही पद्धती वापरल्या जातात.

त्यावरून एक आठवलं - भाषा आणि बोली (language and dialect) यांमध्ये फरक काय? तर स्वतःचं लष्कर बाळगून असणारी बोली ही भाषा म्हणावी. कल्ट आणि धर्म यात फरक काय, यावरही हेच उत्तर लागू पडतं. पुरेसा मोठा कल्ट तो धर्म. पुरेसं मोठं होण्यासाठी अर्थातच वरचे काही मुद्दे थोडे सुसह्य होऊन येतात.

पण आधी म्हटल्याप्रमाणे - कुठची संस्था वरीलपैकी एकही ट्रिक न वापरता लोकांना एकत्र करते? कल्ट कुठे संपतो आणि कल्चर कुठे सुरू होतं हा प्रश्नच आहे.

मुग्धमयुर Tue, 17/12/2013 - 11:52

In reply to by राजेश घासकडवी

आपले म्हणणे कळले नाही. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की ज्या प्रमाण भाषेला मोठ्या संख्येने बोलल जातं तीला कल्ट लाइक फॉलोइंग असत आणि तुलनेने एखादा छोटासा समुह एखाद्या गावापुरतीच एखादी बोली बोलत असेल तर ते तस नसत. की सर्व भाषा या मुळात एक बोलीच असतात फक्त जी तुलनेने मोठ्या समुहाने [आर्थीक -सामाजिक द्रुष्ट्या शक्तीशाली] जर स्विकारली तर मग ते जे काय त्या भाषेसंदर्भात प्रमाण नियम मानतील वा बनवतील तेच इतर बोलींवर थोपण्यात येतात. ?

राजेश घासकडवी Tue, 17/12/2013 - 18:29

In reply to by मुग्धमयुर

बऱ्याच वेळा एका परिसरात अनेक छोट्या छोट्या समूहातून एकाच भाषेच्या अगर पूर्णपणे वेगवेळ्या भाषांच्या बोली बोलल्या जातात. काही कारणाने त्यातला एक समूह प्रबळ ठरतो. इतरांवर राज्य करतो. मग साहजिकच ती मूठभर लोकांची बोली मोठा समुदाय बोलायला लागतो. आणि ती भाषा म्हणून मान्यता पावते. म्हणून लॅंग्वेज इज अ डायलेक्ट विथ अॅन आर्मी असं म्हटलं जातं. तत्त्वतः त्यांमध्ये काही फरक नसतो. हेच कल्ट विस्तृत होऊन धर्म तयार होताना दिसतं. त्यामुळे कल्ट आणि धर्म यांत तत्त्वतः फरक नाही. मात्र छोट्या कल्टमध्ये जे शोषण, 'गुरु हाच सर्वस्व' अशी एकाधिकारशाही चालते त्याचं प्रमाण धर्म तयार झाल्यावर कमी होतं.

प्रकाश घाटपांडे Tue, 17/12/2013 - 12:57

In reply to by राजेश घासकडवी

पण आधी म्हटल्याप्रमाणे - कुठची संस्था वरीलपैकी एकही ट्रिक न वापरता लोकांना एकत्र करते? कल्ट कुठे संपतो आणि कल्चर कुठे सुरू होतं हा प्रश्नच आहे.

आमी बी हेच म्हंतो. आमचे ते कल्चर तुमचा तो कल्ट.

ऋषिकेश Tue, 17/12/2013 - 08:52

स्वतः कोणत्याही कल्टमध्ये सहभागी नाही असा अंदाज/समज आहे. :)
मात्र अनेक परिचितांना अनेक कल्टमध्ये सहभागी झालेले पाहतो. माझ्या त्याबद्दलच्या हेटाळणीयुक्त जाहिर बोलण्याने त्या मंडळींच्या 'बॅड बुक्स'मध्ये माझे नाव पहिल्या पानावर लिहिलेले आहे असेही अनेकदा कळते .. हसून घेतो झाले ;)

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 11:11

विपश्यना, योग, सगळे धर्म, बापू, निरंकारी, माता अमृतानंदमयी, सहजयोग, रामदेव,आर्यसमाज, इस्कोन, विवेकानंद, रामदासी, वारकरी, राघवेंद्र स्वामी, बजरंग दल, शिवसेना, इ इ चिकार कल्टी लोक पाहिले आहेत. पण लोक कशात तरी श्रद्धा ठेवतात आणि सुखी राहतात हे पाहून मी काही म्हणत नाही. पण त्यांच्याशी बोलताना मला फार अवघड पडते. म्हणजे ते कौतूकाने 'आमच्या गुरुंमधे ही पावर आहे' असे म्हणतात आणि मला मान डोलवावी लागते. विशेषतः त्या टॉपच्या माणसावर कल्ट्यासमोर टिकाच करता येत नाही.

मी थोडा संकुचित होतो आणि हिंदू धर्माकडे पाहतो तेव्हा मूळ धर्मात कोणालाच रस नाही असे जाणवते. कल्टांनी हिंदू धर्माचे प्रचंड नुकसान केले आहे.

दुसरीकडे फॅशन, पार्टी, दारू, रियल इस्टेट, स्टॉक्स, मूव्हिज, फिटनेस, इ इ कल्ट्स आहेत. ते लोक ते सोडून दुसरं बोलतच नाहीत. पण ठीक आहे.

तिसरा एक अतिशहाण्यांचा कल्ट आहे. स्वतःला वैज्ञानिक दॄष्टिकोनाचे, सर्वज्ञानी, पुरोगामी, सर्वपठित, आधुनिक विचारांचे, इ इ मानतात. यांनी चिकार पुस्तके वाचलेली असतात आणि त्यांच्या त्यांच्यावर फार परिणाम झालेला असतो. 'प्रकाशापेक्षा वेगवान' असे म्हटले कि संदर्भ न पाहता हे लोक 'सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञाचा अपमान करायची हिंमत कशी झाली' म्हणून मागे लागण्याची प्रंचंड शक्यता. विज्ञानाने'च' जी निरीक्षणे केली आहेत ती सत्य आहेत असे ते मानतात. शिवाय विज्ञानाला सर्व काही ज्ञात आहे असे मानतात. थोडे अजून सौम्य असतील तर विज्ञानाला सर्व काही ज्ञात होईल'च' असे मानतात. हे लोक त्यांच्या वैज्ञानिक धारणांवर टिका ऐकण्यास मानसिक रित्या तयात नसतात. अजून एक गोष्ट म्हणजे त्यांना विषयाचे खोलात ज्ञान नसते. खोलात जाण्यात रसही नसतो. विधानांचा संदर्भ त्यांना प्रस्थापित करता येत नाही. कोणते वाक्य टीकार्ह आहे आणि कोणत्या वाक्यावर टाळ्या वाजवायच्या हे त्यांना मुखपाठ असते. ह्या ठरलेल्या फॉर्म्यूल्यावर त्यांचे कल्टवर्तन असते. उत्क्रांती आणि बिग बँग त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. या दोन संशोधनांच्या मर्यादा त्यांनी वाचलेल्या नसतात. तशी इच्छाही नसते. पण त्यांच्या विरोधात एक वाक्यही ऐकायला तयार नसतात. संशोधनाची संपूर्णतः आणि सुसुत्रता त्यांना आवश्यक नसते. समांतर लॉजिक कुठचे कुठेही लावणे आणि लंबातर लॉजिक धुडकावणे यात ते माहिर असतात. लॉजिक लावताना संदर्भ कोठे जात आहे याची ते काळजी करत नाहीत. त्यांच्यामते जे अशास्त्रीय विधान आहे ते ऐकून घेण्यास ते तयारही नसतात. अशा मूर्खपणाचा परमोच्च बिंदू म्हणजे भौतिक नियमांचे सामाजिक जीवनात केलेले संदभहिन अप्लिकेशन. नवलाची गोष्ट म्हणजे स्वतः शास्त्रज्ञ या कल्टमधे सहसा नसतात. सुदैवाने ऐसीवरील बहुतांश (९५% प्लस) आय डी वैज्ञानिक आहेत आणि कल्टवाले नाहीत. ही या संस्थळाची एक शोभाच आहे.

मन Tue, 17/12/2013 - 11:28

In reply to by अजो१२३

एकुणात +१. पण...
.
.
मी थोडा संकुचित होतो आणि हिंदू धर्माकडे पाहतो तेव्हा मूळ धर्मात कोणालाच रस नाही असे जाणवते. कल्टांनी हिंदू धर्माचे प्रचंड नुकसान केले आहे.

आपणास मूळ धर्मात रस आहे काय?
मूळ हिंदू धर्म म्हणजे नेमके काय आपणास अभिप्रेत आहे?
कल्टांनी त्या धर्माचे नेमके काय नुस्कान केले आहे?
.
.
दुसरीकडे फॅशन, पार्टी, दारू, रियल इस्टेट, स्टॉक्स, मूव्हिज, फिटनेस, इ इ कल्ट्स आहेत. ते लोक ते सोडून दुसरं बोलतच नाहीत. पण ठीक आहे.

दारु वगैरे नाही, पण उरलेल्या बर्‍याच गोष्टींच्या अशाच उथळ कल्टांचा मीही एक सभासद आहे.
.
.
तिसरा एक अतिशहाण्यांचा कल्ट आहे. स्वतःला वैज्ञानिक दॄष्टिकोनाचे, सर्वज्ञानी, पुरोगामी, सर्वपठित, आधुनिक विचारांचे, इ इ मानतात. यांनी चिकार पुस्तके वाचलेली असतात आणि त्यांच्या त्यांच्यावर फार परिणाम झालेला असतो.

हे लै आवडले.
.
शिवाय विज्ञानाला सर्व काही ज्ञात आहे असे मानतात.

अशी व्यक्ती अजून मला तरी माझ्या प्रत्यक्ष परिचयात किंवा जालीय वावरात हाती घावली नाही. तुम्हास घावली आहे का?
उदाहरण, मह्णून, एखादे तरी. हवं तर ऐसीवरच्या एखाद्या सदस्याचं नाव घेउन उदाहरण द्या. त्यांनी अब्रूनुक्सानी खटला टाकला तर मी खटल्याची फी भरेन.
तुम्ही माझेच नाव घेतलेत, तर खटलाही टाकणार नाही. तुम्ही नाव घ्याच. त्याशिवाय मजा नाय.
.
सुदैवाने ऐसीवरील बहुतांश (९५% प्लस) आय डी वैज्ञानिक आहेत आणि कल्टवाले नाहीत. ही या संस्थळाची एक शोभाच आहे.

पुन्हा तेच. प्लीझ.उदाहरण, मह्णून, एखादे तरी ५ टक्क्यातील नाव घ्या ना. हवं तर ऐसीवरच्या एखाद्या सदस्याचं घेउन उदाहरण द्या.
त्यांनी अब्रूनुक्सानी खटला टाकला तर मी खटल्याची फी भरेन. तुम्ही माझेच नाव घेतलेत, तर खटलाही टाकणार नाही.
तुम्ही नाव घ्याच. त्याशिवाय मजा नाय.
.
.
नाव घेउन बोंबा मारायची सुरुवात मी करतो.
ऋषिकेश हे अत्यंत बोरिंग व्यक्तिमत्व आहे. संतुलितपणाचा अतिरेक ते साधू पाहतात.
अदिती विक्षिप्त व तर्‍हेवाईक आहे.
बॅटमन उलट्या डोक्याचा आहे.
प्लीझ, आता एकदा तुमच्याकडून.

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 11:51

In reply to by मन

तुम्ही नाव घेतलेले तिघेही अत्यंत संतुलित, सभ्य लोक आहे. मतभिन्नतेचा त्यांना नितांत आदर आहे असे जाणवते.

शिवाय इथे संपूर्ण कल्टवाला कोणी नाही. पण अंशतः बरेच आहेत. राजेशजी कल्टी आहेत. पण अतिच सभ्य आहेत. नवे ते बरे हा त्यांचा कल्ट आहे. भूतलावरचे प्रदूषण कमी झाले/होत आहे म्हणतात. मी आकाशात दिल्लीतून आणि गावातून दिसणार्‍या तार्‍यांची संख्यावा प्रमाण सांगीतले तर सौंदर्यदृष्टी सांगीतली म्हणतात आणि चूलीच्या एस पी एम चे उदाहरण देतात. दिल्लीत आकाशात किती एस पी एम आहे हे मान्य करत नाहीत.

अदितीजी स्त्रीयांना समान वागणूक मिळावी ही रास्त मागणी करतात. मेघनाजी मात्र 'सगळेच पुरुष सगळ्याच स्त्रीयांवर सगळ्याच प्रकारचे अन्याय सतत करू पाहतात' एतत्सम विधाने करतात. प्रेम आणि सन्मान मानवतेला अलिकडेच गवसलेले गुण आहेत कि काय असे त्यांची वाक्ये वाचताना वाटते. फूल्याकर्व्यांच्या थोरवीबद्दल मी काहीही बोललो नसताना मला त्यांच्याबद्दल सन्मान नाही असे सुचवितात. हा एक कल्ट आहे.

सन्जोपरावांना परंपरांची शिसारी येते. आधुनिक संस्कृतीत देखिल बरेच शिसारी येणारे प्रकार आहेत. त्याबद्दल ते शांत असतात. लोकांनी स्त्रीचे आडनाव बदलू नये म्हणतात. मी त्यांना विचारले कि अपत्याला आपल्या ऐवजी प्रत्यक्ष त्याच्या आईचे आडनाव आपण लावले आहे का तर शांत राहतात.

हे सगळे मी वाटले ते मनःपूर्वक लिहिले आहे. त्यात कोणाचा अवमान इ चा हेतू नाही. केवळ वैचारिक विरोध आहे. थोडी गंमत देखिल आहे. आणि मनोबा, संदर्भ पूर्ण लिहिता येत नाही म्हणून घोळ होतो. खटला वैगेरेत मला पडायचे नाही. तसं काही वाटत असेल तर अगोदरच क्षमा मागतो.

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 12:25

In reply to by मन

माझ्या प्रतिसादांमुळे भावना अनपेक्षितपणे आहत झाल्याचा समलैंगिकतेच्या धाग्यावरचा अनुभव आहे. क्षमा मागण्यामागे स्वतःची सुरक्षा हा हेतू आहेच पण कोणाला वाईट वाटू नये हाही हेतू आहे.

शिवाय संकेतस्थळांवर कोणी फार फार सिरियस नसतं हे माहित आहे. पण काही लोकांमधे कटूता निर्माण होते. कोणाला काही फरक पडत नाही पण सगळं वातावरण कलुषित होतं. म्हणून. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/12/2013 - 20:49

In reply to by अजो१२३

अदितीजी स्त्रीयांना समान वागणूक मिळावी ही रास्त मागणी करतात. मेघनाजी मात्र 'सगळेच पुरुष सगळ्याच स्त्रीयांवर सगळ्याच प्रकारचे अन्याय सतत करू पाहतात' एतत्सम विधाने करतात. प्रेम आणि सन्मान मानवतेला अलिकडेच गवसलेले गुण आहेत कि काय असे त्यांची वाक्ये वाचताना वाटते. फूल्याकर्व्यांच्या थोरवीबद्दल मी काहीही बोललो नसताना मला त्यांच्याबद्दल सन्मान नाही असे सुचवितात. हा एक कल्ट आहे.

हे वाचून मी फार हसले.

विकेण्डलाच 'टॅक्सी ड्रायव्हर' नामक चित्रपट पाहिला. काहीतरी मानसिक विकार, बहुदा डिप्रेशन, असलेला रॉबर्ट डीनिरो त्याला झिडकारणाऱ्या मुलीला इंप्रेस करण्यासाठी, सिनेमाच्या शेवटी काही खुनाखुनी करतो. आपण विचार करावा "आता हा पारच कामातून गेला", तर चित्रपटात मात्र त्याचं कौतुक होताना दिसतं. माझी अवस्था आत्ता पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरचा शेवट बघितल्यासारखी झाली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/12/2013 - 23:35

In reply to by अजो१२३

कोणीही नाही.

दोन माणसांचं एकच घटना, व्यक्ती यांच्याबद्दल किती वेगवेगळं मत होऊ शकतं एवढंच सुचवायचं आहे.

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 11:55

In reply to by मन

आपणास मूळ धर्मात रस आहे काय?

नाही. पण तरीही...

मूळ हिंदू धर्म म्हणजे नेमके काय आपणास अभिप्रेत आहे?

धर्माची उदात्त तत्त्वं

कल्टांनी त्या धर्माचे नेमके काय नुस्कान केले आहे?

एक लार्ज प्लॅटफॉर्म बनण्याऐवजी छोटे छोटे अनेक बनवले आहेत.

मन Tue, 17/12/2013 - 12:14

In reply to by अजो१२३

धर्माची उदात्त तत्त्वं

हिंदु धर्माची कोणती उदात्त तत्वे आपण मानता?
उदात्त असण्याचा क्रायटेरिआ काय ?(सामूहिक भले, की व्यक्तिगत स्वातंत्र्य की "अ प्युअर जस्ट/जस्टिस" पण ती युतोपियन संकल्पना आहे. )
.

एक लार्ज प्लॅटफॉर्म बनण्याऐवजी छोटे छोटे अनेक बनवले आहेत

असे अनेक लहान प्लॅटाफॉर्म मिळूनच मोटह सामायिक प्लॅटफॉर्म बनत नाही काय?
एखादा लाकडाचा ओंडका एकसंध दहा फूट जाडीचा असणे काय आणि एक एक फूट रुंदीच्या दहा छड्या एकत्रित बांधलेल्या असणे काय, थोड्याफार फरकाने इफेक्ट तोच येणार नाही का?
मुळात प्लॅटफॉर्म लार्ज का असावा?
उपलब्ध लार्ज प्लॅटफॉर्म मला योग्य वाटला नाही आणि मी स्वतःचा स्वतंत्र लहान प्लॅटाफॉर्म सुरु केला, तर नक्की चूक काय?
"कंपन्या मोठ्या असल्या तर बर्‍या" अरे पण का?
मी माझा आंत्रप्रुनर , स्वतंत्र व्यावसायिक झालो तर चुकले काय?

अजो१२३ Tue, 17/12/2013 - 13:03

In reply to by मन

हिंदु धर्माची कोणती उदात्त तत्वे आपण मानता?

१. ईश्वराचे स्वरुप - अनंत, अनादी, एक, भला, योगक्षेम वाहणारा, पिता. (कारण ब्रह्मांडाचे, विश्वकारणाचे स्वरुप ओळखणे हाच माझा व्यवसाय नसेल तर ईश्वराचे हे स्वरुप म्हणजे नवरत्न तेल.)
२. एकता - संगच्छत्वं, संवदध्वं, इ इ (स्वतःचाच स्वार्थ नेहमी विचारात ठेवला तर एक मानसिक अस्वस्थता येते. सगळ्यांचेच भले झाले तर आनंद होणे ही वॄत्ती बळावते.)
३. आपलेपणा - वसुधैव ... (हिशेब करण्यात आयुष्य संपत नाही. घरातच कमवलं, घरातच घातलं.)
४. सुखाचे स्वरुप - ...सर्वे सन्तु निरामय्...(सन्मूल्यांना बळ)
५. सण - टाईमपास
६. बंधने - पाळायची कि तोडायची.
७. मानवतेस संबोधन - मनाने धर्म पाळण्यासाठी व्हिसा लागत नाही.
८. सामाजिक फ्रेमवर्क - सगळ्याच गोष्टी एकत्र ऐरणीवर घ्यायची गरज नाही. एकेक सुधारता येते. उच्च मूल्यांना अधिकॄत आधार.
९. प्रश्नसंस्कृती - तत्त्वज्ञान झुगारता येणे
१०. आत्मियता - माझा असल्याचे संस्कार

उदात्त असण्याचा क्रायटेरिआ काय ?(सामूहिक भले, की व्यक्तिगत स्वातंत्र्य की "अ प्युअर जस्ट/जस्टिस" पण ती युतोपियन संकल्पना आहे. )

हे परस्पर विरोधी नसतात. संकल्पना सगळ्या हस्तिदंती मनोर्‍यातल्याच असतात. त्या इतक्या संहत असतात कि सहन होत नाही. पण शेवटी त्याच प्रेरणा असतात.

एक लार्ज प्लॅटफॉर्म बनण्याऐवजी छोटे छोटे अनेक बनवले आहेत

असे अनेक लहान प्लॅटाफॉर्म मिळूनच मोटह सामायिक प्लॅटफॉर्म बनत नाही काय?
एखादा लाकडाचा ओंडका एकसंध दहा फूट जाडीचा असणे काय आणि एक एक फूट रुंदीच्या दहा छड्या एकत्रित बांधलेल्या असणे काय, थोड्याफार फरकाने इफेक्ट तोच येणार नाही का?
मुळात प्लॅटफॉर्म लार्ज का असावा?
उपलब्ध लार्ज प्लॅटफॉर्म मला योग्य वाटला नाही आणि मी स्वतःचा स्वतंत्र लहान प्लॅटाफॉर्म सुरु केला, तर नक्की चूक काय?
"कंपन्या मोठ्या असल्या तर बर्‍या" अरे पण का?
मी माझा आंत्रप्रुनर , स्वतंत्र व्यावसायिक झालो तर चुकले काय?

धर्म स्वार्थ आणि परमार्थाचे संतुलन सांगतो. नक्की किती हिशेब करावा, कशाचा करावा, किती करावा कशाचा नये हे सांगतो. प्रत्येक जागी एका जन्मात नव्याने विवेकवाद, इ लावणे असंभव आहे.

धर्माचे असे प्रयोजन नसले तर मी तो मानत नाही.

ऋषिकेश Tue, 17/12/2013 - 12:21

In reply to by मन

बोंबाच मारायच्या आहेत तर अजून थोडी भरः

-- धनंजय अतिक्लीष्ट लिहितो, त्याला गणित म्हणता येत नसल्याने मराठी म्हणायची सक्ती असते.
-- राजेश घासकडवी प्रतिक्रीया बर्‍याच उशीरा देतात. तोवर मूळ दंगा संपून गेला असतो
-- संजोप रावांनी आपली भक्तीस्थळे/विषय (अर्थात आपल्या इमेजच्या बाऊंड्रीज -पक्षी जीए, (तरिही) पुलं, उच्च अभिरूचीपूर्ण साहित्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, क्वचित सामाजिक प्रश्नावर मते, प्रमाण मराठी) मार्क करून ठेवलेली आहेत. त्याच्या बाहेर ते प्रतिसाद द्यायच्या फंदात पडत नाहीत.
-- चिंतातूर जंतूना तिरके प्रतिसाद न देता शेवटी प्रतिसाद द्यायची वैट्ट खोड आहे त्यामुळे तिरक्या प्रतिसादांची मजा जाते.
-- न वि बाजु भडकाऊ आहेत (या श्रेणीमुळे'च' त्यांचे समाधान होते असे त्यांनीच मनोबाला जाहिर सांगितले आहे)
-- बॅट्या जाम चिवट आहे. (मात्र तरीही त्याच्याबरोबर तिरके तिरके वाद/चर्चा करताना मला टंकाळा कसा येत नाही कळत नै)
-- मुक्तसुनीत धूमकेतू आहेत तेही अलिप्त धुमकेतू

अर्थातच प्रत्येक जण स्वयंभू असल्याने इथे कल्ट होणे अवघडच आहे.

............सा… Tue, 17/12/2013 - 20:10

In reply to by ऋषिकेश

(१) "अस्मि" बिन्धास्त फालतू बाय पॉप्युलर डिमांड (मस्ती का काय) चित्रपटांबद्दल लिहीते.
(२) रुचि ने सर्वांना जेवायला बोलावले नाही तर तिला "हॅरॅसमेन्ट" या गुन्ह्याखाली बॅन का करु नये?
(३) अरुणजोशी फाटे फोडतात
(४) मन शंकासुर आहे

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/12/2013 - 20:37

In reply to by ............सा…

(२) रुचि ने सर्वांना जेवायला बोलावले नाही तर तिला "हॅरॅसमेन्ट" या गुन्ह्याखाली बॅन का करु नये?

ती माझ्या घरी आली आणि जेवायला घातलं तरीही चालेल.

असो. मूळ धाग्याबद्दल बोलायचं तर, अशी लक्षणं बनवण्याचा प्रकार आवडला.