पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष
आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली.
"The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest. In some Native American legends (and the graphic novel by James O'Barr bearing the name) the crow could carry a person's soul back from the land of the dead."
(http://www.imdb.com/title/tt0435670/trivia?ref_=tt_trv_trv)
मला वाटायचं पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष वगैरे भोंदूगिरी आपल्यातच आहे. पण ही भोंदूगिरी युरोपातदेखिल आहे हे वाचून सखेद आश्चर्य जाहले. जगातला सगळ्यात टाकाऊ, निरर्थक गोष्टींनी भरलेला, मागासलेला आपला समाज आहे असं वाटायचं. बुध्दीप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ वगैरे लोकांची तशी ठाम समजूत असते.
तसाच http://perspectiveszine.webnode.sk/news/ravens-and-crows-in-mythology-fo... या इथे आणखी थोडे वाचायला मिळाले. इंग्रजी थोडी कच्ची असल्याने सगळे काही समजले नाही.
आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे "कावळा" हा समान धागा आहे. इतर कुठलाही पक्षी किंवा प्राणी नाही, कावळाच. हे कावळ्याचं दोनहीकडे समान असणं काही लक्षात नाही आलं. कुणी जाणकार यावर प्रकाश टाकतील का?
बिनडोकपणाची वैश्विकता !
आपल्यातील बिनडोकपणाचे काही पुरावे! (व हा बिनडोकपणा वैश्विक आहे.)
पाश्चात्य मान्यवर वैज्ञानिकांनी संशोधनांती सिद्ध केले आहे की आपल्या शरीरात आत्मा आहे व तो 'ईथर' ह्यासदृश रासायनिक घटकाचा बनला असून रक्तातील प्लाझ्मा अवस्थेतील एक्टोप्लाझ्म हा घटक पदार्थ त्याचा मूळ आधार असतो. प्रयोगांती आढळले की धार्मिकविधी, योगासने आणि सूर्य किरणात एक्टोप्लाझ्म दाट होते तर अमावास्येस व विवक्षित स्थळी ते विरळ होते. तपस्वी व्यक्तीभोवती एक्टोप्लाझ्म तेजस्वी सोनेरी छटा निर्माण करते तर मृत्युपंथावरील अत्यवस्थ व्यक्तीभोवती ते काळी छटा निर्माण करते. ह्या आत्म्याचे फोटो इन्फ्रा-रेड कॅमेराद्वारे घेतले गेले असून त्यात ते धुरकट भासतात. आत्म्याला मुक्ती देणे म्हणजे एक्टोप्लाझ्मच्या भोवताली जमलेली वलये, ज्यांना वासनादेह म्हणतात त्यातून त्यास, पूर्णत: मोकळे करणे.
सप्त वासनादेहामध्ये अडकून पडलेले अतृप्त आत्मे अनेक बंधनामध्ये अडकलेले असतात. शारीरिक नव्हे तर मानसिक भूक त्यांना त्रस्त करते. अन्न, पाणी दिसले तरीही अन्न खाता येत नाही, पण अन्नाचा वास मात्र त्यांना पोहोचू शकतो. त्यांच्या नावे ठेवलेल्या अन्नाच्या वासनादेहावर ताबा मिळवून त्यास पितर ग्रहण करतात. श्राद्धविधी हा मुख्यत्वे अन्नदानाचा विधी आहे. सर्वच धर्मामध्ये अन्नदान हे सर्वोच्च मानले गेले आहे. विशिष्ट प्रकारे अन्नदान करून आत्म्यास कमी पडणारे पुण्य मिळवून देण्याचा प्रकार श्राद्धविधी अंतर्गत पार पाडला जातो. ह्यामध्ये कधी नव्हे तो कावळ्याला मोठा मान दिला जातो. कारण एक तर सर्व पशू - पक्षींपैकी कावळाच एक सहजपणे सापडतो व दुसरे म्हणजे त्याच्या काळ्या रंगामुळे पितरांना त्यावर पकड घेणे सोपे जाते. कारण सर्पाकारात पितरांचे मुख मानलेल्या राहूचा रंग काळा आहे.
विपश्यनेचे गोयंका नेहमीच एक वाक्य घोळत होते: "नेहमीच्या व्यवहारातील गोष्टीसाठी तुम्ही बुद्धी वापरा. परंतु धर्म व अध्यात्म या गोष्टी बुद्धीच्या पलिकडे आहेत."
त्यामुळे बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक इत्यादींना गुंडाळून ठेऊनच अशा गोष्टींना सहमती दाखवायला लागेल.
मी पाहिलेल्या पक्षांत कावळा
मी पाहिलेल्या पक्षांत कावळा हा इतर पक्ष्यांच्या तुलनेने अधिक हुशार पक्षी असावा असे वाटते.
जगभरात अनेक भागांत कावळा, मांजर, घुबडे, वटवाघुळे, कोल्हे इत्यादी अनेक प्राण्यांशी अनेक मानवी भावनांचे आरोपण केलेले- संबंध जोडलेला आढळेल. यामागे निव्वळ मानवी शोधक/चिकित्सक प्रवृत्ती आहे. बाकी कोणतेही गूढ कारण नव्हे
सहमत
कावळा हा पक्षी नक्कीच वेगळा असावा. मागे कुठेतरी वाचल्याप्रमाणे "काकद्रुश्टी" म्हणजे कावळ्याची नजर अन्य प्राण्यापेक्षा निराळी आहे. पाहताना त्यची नजर एका विशिश्ट कोनात एकाग्र होते की त्याला मानवी नजरे पलीकडचे दिसू शकत असावे. उदा. इन्फ्रा-रेड किम्वा फोर्थ डायमेन्शन मधील इत्यादी!