Skip to main content

२०१४ निवडणुका - एक्झिट पोल्स

भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी निकाल जाहीर करायला सुरूवातही केलेली आहे. त्यातून आकडेवारी काय दिसते, कुठच्या राज्यात अपेक्षित निकाल आले, कुठच्या राज्यात आधीच्या ओपिनियन पोलपेक्षा वेगळं चित्र दिसतं आहे, मतमोजणी या एक्झिट पोलशी मिळतीजुळती असेल का, शेवटी कोण जिंकेल, पंतप्रधान कोण होईल वगैरे विषयांवर चर्चा करण्यासाठी हा धागा काढलेला आहे.

नितिन थत्ते Mon, 12/05/2014 - 21:13

सध्या सर्व एक्झिट पोल्स एनडीए ला बहुमत मिळणार असे सांगत आहेत.

कमीत कमी आकडा २५० आहे बहुधा.

मोदी पंतप्रधान होणार असं या पोल्सवरून दिसतं आहे.

राजेश घासकडवी Mon, 12/05/2014 - 22:13

सुमारे सहा महिन्यांपूर्वी जी सर्वेक्षणं झाली होती त्यांचे निकाल - आठ पोल्सची सरासरी
युपीए १४३, एनडीए १८५, इतर २१५ अशी होती.
आताचे आकडे साधारण
युपीए ~११५, एनडीए ~२८० इतर ~१५० असे दिसतात.

नितिन थत्ते Mon, 12/05/2014 - 22:54

एक्झिट पोलच्या मेथडॉलॉजीविषयी काही कल्पना कुणाला आहे का?

एक लाख सहासष्ट हजार मतदारांनी दिलेल्या उत्तरांवरून हा कौल काढला आहे असे कुठेतरी वाचले.

एक्झिट पोलमध्ये मतदारसंघ वाइज निकाल काढतात का? दर मतदारसंघातल्या सुमारे तीनशे मतदारांचा कौल पाहून त्या मतदारसंघाचा निकाल काढून त्यांची बेरीज करतात की मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरून जागांचा अंदाज काढतात? तसा अंदाज काढत असतील तर पुन्हा अवघड आहे. मतदारसंघनिहाय निकाल काढत असतील तर २० लाख मतदार असलेल्या मतदारसंघात ३०० मतदार* हे सॅम्पल पुरेसे आहे का ते ठाऊक नाही.

(मतदार पुरेसे रॅण्डमली आणि वेल स्प्रेड गाठले होते आणि मतदार खरं सांगतात असं सध्या गृहीत धरलं आहे).

http://indianexpress.com/article/india/politics/exit-polls-more-misses-…

इथे ९८, ९९, २००४ आणि २००९ च्या एक्झिट पोलची तुलना आहे. एक्झिट पोलमध्ये नेहमी एनडीएला प्रत्यक्षापेक्षा जास्त जागा दिसतात. ९८ चा अपवाद. किंवा एक्झिट पोल्स नेहमी एनडीएसाठी फेवरेबल असतात. असे पाहिले तर आज गोपीनाथ मुंडे यांनी एनडीएला २५० जागा मिळतील असे म्हटले आहे ते बरोबर असू शकेल. (क्लिंटन २६० सीट म्हणत आहे).

नितिन थत्ते Tue, 13/05/2014 - 10:10

In reply to by अनुप ढेरे

>>evm, conspiracy वगैरे वगैरे

ईव्हीएम सर्वप्रथम २००४ च्या निवडणुकीत वापरली गेली. त्यावेळी एनडीए सत्तेत होती. त्याही वेळी एक्झिट पोल एनडीए जिंकणार असं म्हणत होते.

नितिन थत्ते Tue, 13/05/2014 - 12:17

In reply to by अनुप ढेरे

नाही नाही.... फ़क्त काँग्रेस करते असा ग्रह असावा जन्तेचा. म्हणून सांगितलं की २००४ मध्ये एनडीए सत्तेत होती.

अतिशहाणा Tue, 13/05/2014 - 20:11

In reply to by अनुप ढेरे

एक्झिट पोलमध्ये नेहमी एनडीएला प्रत्यक्षापेक्षा जास्त जागा दिसतात.

एक्झिट पोलमधील सँपल हे बहुदा शहरी मतदार असावेत. शहरांतील मतदारांमध्ये एनडीए व तत्सम विचारसरणीवाले अधिक असतात. काँग्रेस व इतर पुरोगामी धर्मनिरपेक्ष पक्षांचे बहुसंख्य मतदार हे ग्रामीण भागातील व गरीब परिस्थितीतील असतात त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज नेहमी एनडीएकडे झुकलेले दिसतात.

मन Wed, 14/05/2014 - 10:14

In reply to by अतिशहाणा

न्नो...
पूर्वी मलाही असेच वाटे. पण मागच्या दोन लोकसभा निवडणुकांत काय दिसते?
दिल्ली , मुंबै इथे एख्खादा अपवाद वगळता सरळ क्लीन स्वीप केलं होतं काँग्रेसने.
ही तरी सर्वात मोठी मेट्रो शहरे होत भारतातली.
मला वाटते मागच्या वेळी बेंगलोरलाही काँग्रेसने बाजी मारली होती.

अजो१२३ Tue, 13/05/2014 - 11:12

भारतातले विधानसभेची चयनभाकिते बर्‍यापैकी ठिक असतात. लोकसभेची पूर्ण गंडलेली असतात. २००४ मधे एन डी ए ला पूर्ण बहुमत येणार होते नि त्याची कंप्लीट वाट लागली. २००९ मधे ही असेच भाकित होते. तिथे अजूनच जास्त वाट लागली. १६ मे ला यू पी ए चे सरकार बनले, इ इ तर मला नवल वाटणार नाही.
खालिलप्रमाणे इच्छा आहेत.
१. एकट्या काँग्रेसच्या खूप सीटा याव्यात. तसेच बीजेपीचे व्हावे. रिजनल पार्ट्यांना जागा मिळूच नयेत. कोणत्याही परिस्थितीत तुटक्या पार्ट्यांची बेरीज एन डी ए वा यू पी ए पेक्षा जास्त होऊ नये.
२. कोणताही प्री-पोल अलायन्स पूर्ण बहुमतात यावा. त्यांना ठिगळे जोडायची गरज पडू नये. (मंजे ममताचा लहरीपणा नि डेरेक ओ ब्रायनचा माज एकत्र सहन करावा लागू नये. पॅकेजेस द्यावी लागू नयेत.)
३. एन डी ए चे सरकार आले तर जिथे भाजप नाही तिथे काँग्रेसला प्रचंड जागा मिळाव्यात. केरळ, तामिळ नाडू, बंगाल, काश्मिर, ईशान्य भारत, इ.
४. थर्ड फ्रंट ला लोकसभेत मते देण्यात अर्थ नाही असा संदेश जावा. असा जाऊ नये कि २०-२५ खासदार निवडून दिले कि मस्त पॅकेज मिळते.
५. बहुमत प्रि-पोल अलायन्सला मिळालेले असले तरी ३५० जागा होतील इतके लोक आतून बाहेरून जोडून घ्यावेत. सत्ताधारी पक्ष बॉर्डर मेजोरीटीवर नसावा. सगळे पाठिंबे शक्यतो आतून असावेत.
६. हारले तर मोदी विरोधी पक्ष नेते बनावेत. चहाचा धंदा करू नये. गुजरात मधे परत जाऊ नये.
७. काँग्रेसकडून निलेकनी, रघुराम राजन, सत्यव्रत चतुर्वेदी, (मोदीला जातीयवादी, हिटलर अशी राळ उठवून देशाचा वेळ वाया न घालवणारा) विपक्ष नेता असावा. राहुल नसावा, त्याला राजकारण, अर्थकारण कळत नाही.
८. मोदीं पंतप्रधान होणार नसतील तर राजनाथ, गडकरी, सुषमा, मु म जोशी इ होऊ नयेत. यशवंत सिन्हा, शिवराज चौहान, रवि शंकर प्रसाद, जेटली, इ व्हावेत. ('जमले तर' मुख्तार अब्बार नकवींना बनवावे. २००४ मधे सोनियांनी पंतप्रधान पदासाठी नकार देऊन २००९ चे रिझल्ट पक्के केले होते. काँग्रेस अचानक खूप महान बनली. लोकांना त्याग चांगलाच लक्षात राहिला. विरोधकांना सोनियावर टिकाच करता येईना. नकवी पी एम झाले तर नंतर बीजेपीला 'घेरणे' कर्मकठीण ठरावे.)
९. आआप ला ० जागा मिळाव्यात. केजरीवालांचा वाराणसीत जबरदस्त पराभव व्हावा*. दिल्लीत तर आआप ला ५% पेक्षा जास्त मते मिळू नयेत.
१०. कोणते का सरकार येईना, आक्रस्ताळे नसावे. विचार न करता मागच्या सरकारच्या निती त्यागल्या नाही पाहिजेत. 'देशात व्यवस्थांचे सातत्य आहे' अशी प्रतिमा राहिली पाहिजे.

*संसद नीट चालावी म्हणून. बाकी काही नाही.

नितिन थत्ते Tue, 13/05/2014 - 12:18

In reply to by अजो१२३

>>कोणताही प्री-पोल अलायन्स पूर्ण बहुमतात यावा. त्यांना ठिगळे जोडायची गरज पडू नये.

+१. नंतर कोअ‍ॅलिशन होतं म्हणून कठोर निर्णय घेता आले नाहीत अशी सबब सांगायला स्कोप नको.

मन Tue, 13/05/2014 - 13:22

In reply to by अजो१२३

मुद्दा क्र. ६ होणारच आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून बसलात तरच पी यम पोष्टवरचा क्लेम कायम राहतो.
परत गेलात तर पक्षांतर्गत स्पर्धक आहेतच तुमची जागा घ्यायला.
(पडत्या काळातही नेतृत्व ठेवलत तर सुगीच्या दिवशी राज्य तुम्हालाच सोपवलं जाइल.
पडत्या काळात पळ काढलात; नेतृत्व भलत्याकडेच गेलं; तर शीर्षस्थान तुम्हाला सुगीच्या दिवसात मिळवणं लै अवघड.
सत्तेचा हाच नियम आहे.
)

राजेश घासकडवी Tue, 13/05/2014 - 19:36

In reply to by अजो१२३

भारतातले विधानसभेची चयनभाकिते बर्‍यापैकी ठिक असतात. लोकसभेची पूर्ण गंडलेली असतात.

दोनदा साफ चूक, दोनदा साधारण बरोबर असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. तेव्हा इतकीच बरोबर उत्तरं मिळवायची असतील तर नाणं उडवून आपल्यालासुद्धा ठरवता येईल की.

चयनभाकित शब्द आवडला. हिंदी आहे, पण मराठीत स्वीकारायला हरकत नाही.

कोणताही प्री-पोल अलायन्स पूर्ण बहुमतात यावा. त्यांना ठिगळे जोडायची गरज पडू नये.

याला प्लस वन.

विवेक पटाईत Tue, 13/05/2014 - 19:23

घाबरता कशाला 'अच्छे दिन आने वालें हैं" मोदी येत आहेत. आणि येण्याचे श्रेय सर्व राजनेत्यांना आहे कारण प्रचारात भाग घेणाऱ्या १००% टक्के नेत्यांचे भाषण मोदी पासून सुरु होऊन मोदीवर संपायचे. ऐकून ऐकून जनतेचे कान पिकले आणि मोदी वर शिक्का मारला.

ऋषिकेश Wed, 14/05/2014 - 11:40

माझ्या अंदाजात नी मिडीयात सध्या प्रकाशित होताहेत त्यापैकी CNN-IBN CSDS च्या एग्झिट पोल्सवर मी लक्ष देतो आहे. CSDS चा पाया इतर यंत्रणांपेक्षा अधिक भक्कम असल्याचे माझे मत आहे.

यात मोठे फरक असे आहेतः

-- उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०% मते दाखवत आहेत. इतकी मते चौरंगी फाईट मध्ये मिळाली तर खरं तर ६०+ जागा मिळायला हव्यात. पण तसेही दिसत नाहिये. नक्की गडबड समजत नाही. माझ्या अंदाजावर ~३८ ते ४० जागा ३०-३२% मते, मी अजुनही कायम आहे. कारण भाजपा+ ला उप्रमध्ये ४०% मते मिळणे मला कठीण वाटते. दुसरे असे की बसपाची मते ही नेहमी विखुरलेली असतात. एग्झिट पोल्स, किंवा प्रीपोल्स सारख्या 'सँपल' बेस्ड प्रकारातही ती अनेकदा निसटतात. उत्तरप्रदेशाच्या एक्झिट पोल्समध्ये बसपा 'अंडर एस्टिमेटेड' आहे असे मला वाटते.

-- महाराष्ट्रः CSDS ने महाराष्ट्रात एन्डीएला ३३ ते ३७ जागा दिल्या आहेत आणि ४३% वोट शेअर दर्शवला आहे. ४३% इतक्या मोठ्या संख्येने मते एन्डीएला मिळाली तर (आणि तरच) हे आकडे शक्य वाटतात. युपीएने आपले ३३-३५% मतांचा आकडा राखलेला दिसतोय. जर हे अंदाज खरे मानले तर मनसेने मोदींना पाठींबा देऊन आपली मते वाढण्याऐवजी गमावली असा संदेश जातोय, ज्याच्याशी मी असहमत आहे. आआपचा प्रभाव काही पॉकेट्समध्ये आहे, तो या पोल्समधुन दिसत नाही. नव्या अंदाजानंतरही एन्डीए ३०च्या वर जाईल का याबद्दल मी साशंक आहे. (The sample size for Maharashtra is 1798 and the post-poll survey was conducted in 28 Lok Sabha seats. - हे बरेच बरे असले तरी सद्य परिस्थितीत मनसे व आआपचा प्रभाव मोजायला पुरेसे वाटत नाही)

-- दिल्लीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, हे भाकित कदाचित चुकेल असे अजुनही वाटते.

-- पंजाबमध्ये आआपचा वोट शेअर २१% इतका खरच असेल तर १-३ जागा हे प्रेडिक्शन योग्य वाटते. माझा अंदाज बहुदा तिथे चुकेल.

-- हरयाणात आआपचा वोट शेअर प्री-पोल्स मध्ये ७% होता जो एझिट पोल्समध्ये ४% दाखवला जातोय. मात्र हा सँपलिंगचा घोळ असायची शक्यता असली तर १ जागा (योगेंद्र यादव) जिंकतील असे अजुनही वाटते

-- तामिळनाडूत माझे अंदाज प्री-पोल्स सर्वेंशी तुलना करता चुकत होते. निवडणूकीआधी इथे भाजपाच्या वढत्या प्रभावाची बरीच चर्चा झाली. मात्र एग्झिट पोल्स माझ्या अंदाजाच्या बरेच जवळ आहेत :)

-- केरळचे माझे अंदाज व एग्झिट पोल्स पुर्ण उलटे आहेत. त्यांची कारणमिमांसा कळत नाही. तिथे काँङ्रेसची अंतर्गत बंडाळी, डाव्यांचा पुन्हा वाढता प्रभाव बराच आहे असे माझे गृहितक होते (शिवाय काही नगरपालिकांचे निकाल, पोटनिवडणूका वगैरे डाव्यांनाच फेवरेबल वाटताहेत). असो बघुया.

-- एक निरीक्षणः छत्तीसगढचा सँपल साईजः 577 and the post-poll survey was conducted in 9 Lok Sabha seats. त्यामनाने महाराष्ट्राचा अगदीच तुटपुंजा वाटतो)

-- आंध्रतील माझे अंदाज व एज्झिट पोल्स यात एन्डीएला मिळणार्‍या जागा बर्‍यापैकी सारख्या असल्या तरी टीआरएस, वाय्साअर काँग्रेस व काँग्रेस यांच्या जागा बर्‍याच वेगळ्या दिसतात. तिथे माझे अंदाज तेलंगाणात चुकतील असे वाटते., मात्र एक्झिटपोल्स इतका मार काँग्रेस खाईल असे वाटत नाही.

थोडक्यात, मी माझ्या प्रेडिक्शन्सवर अजुनही बर्‍यापैकी कायम आहे. :)

ऋता Wed, 14/05/2014 - 19:12

करमणूक सोडून एक्झिट पोल्सचा काही उपयोग आहे का ? जास्तीत जास्त प्रेक्षक मिळतील असे आकडे देणे असाच त्यांचा अजेंडा असावा असे दिलेले आकडे पाहून वाटले.

नितिन थत्ते Wed, 14/05/2014 - 21:27

In reply to by ऋता

थोडं सर्क्युलर रेफरन्स सारखं होतंय....

टिव्ही वाहिन्या जाहिरातींवर चालतात. म्हणून जाहिरातदारांच्या ग्राहकांनी जास्तीत जास्त टीव्ही पहायला हवा. म्हणून त्या ग्राहकांना आवडेल असं वाहिन्यांनी दाखवायला हवं म्हणजे ते तसं दाखवतात असं गृहीत धरायला हवं. म्हणजेच या ग्राहकांना एनडीए-भाजप-मोदी जिंकले असं पहायला आवडतं....

म्हणजे एनडीए-मोदी जिंकावेत अशी टिव्हीच्या जाहिरातदारांच्या ग्राहकांची इच्छा आहे.
[हे एक्झिट पोल चुकले असतील तर]

दोन शक्यता आहेत...

१. मजबूत प्रमाणात रिगिंग झालेले आहे.
२. संख्येने प्रचंड असलेला मध्यमवर्ग (ग्राहक) निवडणुकीच्या गणितात अजूनही अल्पसंख्य आहे.

विवेक पटाईत Tue, 17/05/2016 - 20:06

१३.५.२०१४ मी केलेली भविष्य वाणी खरी ठरी.

घाबरता कशाला 'अच्छे दिन आने वालें हैं" मोदी येत आहेत. आणि येण्याचे श्रेय सर्व राजनेत्यांना आहे कारण प्रचारात भाग घेणाऱ्या १००% टक्के नेत्यांचे भाषण मोदी पासून सुरु होऊन मोदीवर संपायचे. ऐकून ऐकून जनतेचे कान पिकले आणि मोदी वर शिक्का मारला.

आता पुढे जोतिष धंधा किंवा एक्स्पर्ट होण्याचे किती चान्स आहे.