Skip to main content

गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )


एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥



ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55)

वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ. भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ. हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे.

महाराष्ट्रात गौ. हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अति शहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ. बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौ. मांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ. बंदी असल्यामुळे गौ. मांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौ. बंदी उठल्यावर काय होईल, याची कल्पना देतो. अर्थातच धार्मिक भावनांना महत्व न देता शुद्ध व्यवसायिक आधारावर विवेचन.

गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल. सध्या ही गौ. मांस निर्यातीसाठी अनुदान दिले जाते. या गायी गावात मिळणारे शिळे अन्न, भाजीचा व अन्य कचर्या वर जगणार नाही. त्यांना अन्न ही भरपूर लागेल.

परिणाम भारतीय गौ. वंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड नसतात व भारतीय बैलांसारखे काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही). गौ. मांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. मांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल. .४-५ वर्षातच २० लाख टन पेक्षा गौ. मांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख टन गौ. मांसाचे निर्यात ही होऊ लागेल.

आता जगात सर्वात जास्त गौ. मांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौ. मांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात. तिथल्याच आंकड्यानुसार एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात. ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते. एक किलो मांसासाठी ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५००० चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn) साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात २5 किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा, ३० गहू ). महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी.

दुसर्या शब्दात गौ. मांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून). जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल.शिवाय देश्यात दुष्काळी वातावरण निर्माण होईल.

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. शिवाय यूएसला $८० बिलीयन विदेशी मुद्रा ही मिळेल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही.

या भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी आहे. त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही.

सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ. आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौ. मूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).

आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौ. हत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे . केवळ मांसासाठी जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे. लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे.
अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे. अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे.

http://ajcn.nutrition.org/content/78/3/660S.full
http://amor.cms.hu-berlin.de/~h1981d0z/pdf/2010-10-viedma/water-footprt…

'न'वी बाजू Sun, 12/04/2015 - 18:37

ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55)

ते शक्य वाटत नाही. मी गाय खातो. पुढच्या जन्मी मला खाण्यासाठी गायींना मनुष्यभक्षण करणे सुरू करावे लागेल, जे तूर्तास तरी शक्य वाटत नाही.

हं, आता, मला पुढला जन्म गवताचा मिळेल, असा जर मनुस्मृतिकारांचा दावा असेल, तर थोडी अडचण आहे खरी. त्या परिस्थितीत, (वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!!!!!) गायी गवत खातात हा गवतावर प्रचंड अन्याय आहे, हे मी एक सहृदय इसम म्हणून (आणि भावी गवत म्हणून) मान्य करतो. आणि, या अन्यायाच्या निवारणार्थ (आणि पुढील जन्मीच्या माझ्याच संरक्षणार्थ) दुनियेतील तमाम गायी शक्य तोवर याच जन्मी खाऊन संपवून टाकण्याचा पण करतो. तरी सर्व होतकरू भावी गवतांनी या सत्कार्यात हातभार लावावा, अशी नम्र विनंती.

..........

It has sometimes seemed to me (said Mr. Mulliner, thoughtfully sipping his scotch and lemon) that to the modern craze for dieting may be attributed all the unhappiness that is afflicting the world today.... This is what happened in the case of China and Japan. It is this that lies at the root of all the unpleasantness in the Polish corridor. And look at India. Why is there unrest in India? Because its inhabitants eat only an occasional handful of rice. The day when Mahatma Gandhi sits down to a good juicy steak and follows it up with a roly-poly pudding and a spot of stilton, you will see the end of all this nonsense of Civil Disobedience.

(वुड्डहौससाहेबाच्या कथेतून साभार.)

धर्मराजमुटके Mon, 13/04/2015 - 20:20

In reply to by 'न'वी बाजू

कल्पनाविस्तार करण्याच्या नादात लॉजिक पुर्णपणे गंडलय असे कळवू इच्छितो.

ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल.

हे वाक्य मनुष्य जातीला मनुने सांगितले आहे. त्यामुळे ते गाईला किंवा इतर प्राण्याला अ‍ॅप्लीकेबल नाही. शिवाय तुम्ही गाईला खाले तर तुम्हाला त्या गाईने खाण्यासाठी तुम्ही गवत बनणे आवश्यक नाही तर तीच गाई पुढील जन्मात मनुष्य बनेल आणि तुम्हाला खाईल असा कल्पनाविस्तार आहे.

विवेक पटाईत साहेबांनी एकाच लेखात मनु, गाय, शाकाहार असे अनेक ज्वलंत विषय आणलेत तसेच विदेशी लेखांचे दुवे दिले आहेत. त्यामुळे हा धागा खरेतर स्फोटक व्हायला हवा होता पण अगोदरच गोहत्याबंदी विषयावर अनेक चर्चा झडून गेलेल्या असल्यामुळे तसेच पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे हा धागा कदाचित २०-२५ प्रतिसादांच्या आतच राम म्हणेल अशी शंका वाटते.

अवांतर : 'न' वी बाजू साहेबांना विनंती.
तुमच्या स्वा़क्षरीमधून 'आईवडील हे उपयुक्त पशू आहेत'. हे वाक्य काढून टाकावे ही विनंती. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट (किंवा हवतर विथ नो रिस्पे़क्ट अ‍ॅट ऑल) ते मनाला खटकते आहे.

'न'वी बाजू Mon, 13/04/2015 - 00:31

मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. मांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल.

- केएफसी गोमांसाचे पदार्थ कधीपासून विकू लागले? (भारतात सोडा, कोठेही?)
- एखाद्यास जर गोमांसाधारित व्यंजनांचा आणि तोही आस्वादच घ्यायचा असेल, तर त्याकरिता जाण्याची मॅक्डी (भारतातलेच नव्हे; कोठलेही) ही खाशी जागा नव्हे. किंबहुना, मॅक्डी हे फडतूसांचे अन्न आहे, असे प्रतिपादण्याचे धारिष्ट्य या निमित्ताने करू इच्छितो.

..........

भारतात भले ही मॅक्डीमध्ये लोक पोरांचे वाढदिवस साजरे करत असतील नि डेटवर जात असतील, नि आपले तथाकथित ष्टेटस दाखविण्याचे ते स्थान असेल. आमचे येथे मॅक्डी हे स्थान टिपिकली (१) दुसरे काहीच परवडत नाही म्हणून आणि/किंवा (२) कारटी फारच हट्ट करू लागली म्हणून जाण्याचे ठिकाण मानले जाते. (मुलांचे कचरा आवडणे आणि आवर्जून कचराच खाण्याचा अट्टाहास हे बहुधा वैश्विक असावे. त्यापुढे गाढवे फिकी पडावीत.) आता यापुढे आम्ही कोणास डेटवर घेऊन जाणे असंभव आहे ते सोडा (आमचे वय आणि वैवाहिक स्थिती दोन्हीं आड येतात.), परंतु मी जर कोणास डेटवर मॅक्डीत नेलेच, तर माझी डेट 'कसला दळभद्री इसम आहे!' अशा अर्थीचा तुच्छतापूर्ण नि दयार्द्र कटाक्ष माझ्याकडे फेकून, तिच्या उर्वरित आयुष्यात माझ्याकडे ढुंकूनदेखील पाहणार नाही, याची खात्री आहे. असो.

पिवळा डांबिस Mon, 13/04/2015 - 23:29

In reply to by 'न'वी बाजू

केएफसी गोमांसाचे पदार्थ कधीपासून विकू लागले? (भारतात सोडा, कोठेही?)

पटाईतसाहेब कदाचित ख्रिस्तवासी कर्नल सॅन्डर्सच्या कर्तृत्वाला आकाश मोकळं करून देत असतील!
अज्ञानापुढती जिथे गगन ठेंगणे!!! :)

नंदन Tue, 14/04/2015 - 14:27

In reply to by 'न'वी बाजू

बाकी त्या शिंच्या केएफसीत बीफ मिळो वा न मिळो, आज चक्क एका अमेरिकन वृत्तपत्रात रोस्ट बीफ सँडविचच्या रेशिपीत आंब्याचे लोणचे एक थर म्हणून वापरले गेल्याचे पाहिले. भारतीय संस्कृतीचा प्रचार या थराला जाईल, असं वाटलं नव्हतं हो!

गवि Mon, 13/04/2015 - 10:06

तुम्ही अनेक वेगळे (खर्च, यिल्ड वगैरे) प्रॅक्टिकल मुद्दे मांडलेत याबद्दल अभिनंदन.

पण एक मुद्दा पटविण्यासाठी तुम्ही अ‍ॅलोपाथी, होमिओपथी, आयुर्वेद ते अंगारा असे चौफेर उपाय करुन पाहू.. याने नाही झाले तर त्याने काम होईल अशा मानसिकतेने लिहिल्यासारखा लेख वाटला.

म्हणजे मनुस्मृती, या जन्मीचे त्या जन्मी भक्षण वगैरे मुद्दे मांडून फोकस हरवला असं वाटतं.

सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ. बंदी असल्यामुळे गौ. मांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौ. बंदी उठल्यावर काय होईल

एखाद्या गोष्टीवर बंदी असल्याने ती वस्तू बेकायदेशीर अर्थात पुरवठ्यास तुलनेत जोखमीची आणि त्यामुळे महाग होते अशी सामान्य समजूत आहे. चुकीची असल्यास सांगावी. सर्वत्र बंदी उठल्यावर किंमती पडतील असं सामान्य तर्क सांगतो.

जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे.

अमेरिकेत गहू तांदूळ डाळी मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेर आहेत?

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल.

तुलना म्हणून ठीक आहे, पण अमेरिकेचे थांबवून आफ्रिकेची पोकळी भरुन निघण्याचा चॅनल नेमका कसा बनावा असं तुमचं मत आहे? मी हे इंटरनेट एक आठवडा वापरलं नाही तर समजा सोमालियातल्या एका मनुष्याचं एक जेवण होईल. पण इंटरनेटचे वाचलेले पैसे सोमालियात पाठवून जेवण देण्याची घाऊक व्यापक इ इ सोय कशी करणार ?

बाकी गोमूत्राचे जंतुनाशक उपयोग वगैरेवर प्रचंड दीर्घकालीन संशोधन का करत बसतात ते मलातरी कळत नाही. त्याज्य पदार्थाचा वापर अशा गोष्टींसाठी करण्यामागे शास्त्रीय कारणांपेक्षाही पौराणिक ज्ञानाचा अभिमानच आजपर्यंत जास्त दिसलेला आहे.

भाकड जनावरांचे मूत्र वगैरे वापरुन त्यांचा खर्च निघेल आणि त्यांना जगवावे ही कृतज्ञतेची भावना आहे, जी बाकीच्या लेखातल्या वस्तुनिष्ठ अप्रोचशी विपरीत आहे. बैलांना शेतीच्या कामाला जुंपण्यात कोणालाच क्रौर्य किंवा अनैसर्गिक काही दिसत नाही.

बाकी मुख्य मुद्दा - शाकाहारापेक्षा मांसाहाराच्या निर्मितीत अधिक पाणी, चारा खर्च होणे (इन्पुटच्या मानाने कमी बायोमास मिळणे) हा मुद्दा वेगळ्या पातळीवर वाद घालण्यायोग्य आहे. पण त्यातला विचार बरोबर आहे. म्हणजे मांसाहाराबाबत मधे एक एक्स्ट्रा एजंट (तो प्राणी) आल्याने चारा-पाणी यांच्यापासून अन्न बनण्याची एफिशियन्सी कमी होते हे खरंच आहे.

पण हे सर्वच प्राण्यांना लागू आहे. अगदी कोंबडीपासून बोकडापर्यंत. मग गायबैलांनी काय घोडे जगवलेत म्हणून त्यांच्याबाबत इतके डीटेलमधे सायंटिफिक बचाव मांडले जात असावेत?

गब्बर सिंग Tue, 14/04/2015 - 01:14

In reply to by गवि

मी हे इंटरनेट एक आठवडा वापरलं नाही तर समजा सोमालियातल्या एका मनुष्याचं एक जेवण होईल.

वाक्यामागील मुद्द्याशी एकदम सहमत.

इकॉनॉमी इज झिरो सम गेम - असा गैरसमज बाळगून असण्यामुळे हे असे विचार वैध मानले जातात.

बॅटमॅन Tue, 14/04/2015 - 02:11

In reply to by गब्बर सिंग

वैसे तो फिर आपण जन्मालाच आलो नसतो तरी इतरांची सोय झालीच असती, इनफ्याक्ट आपल्या निव्वळ अस्तित्वापोटी अनेकांना कमी रिसोर्सेस मिळताहेत. ;)

गब्बर सिंग Tue, 14/04/2015 - 14:36

In reply to by बॅटमॅन

इनफ्याक्ट आपल्या निव्वळ अस्तित्वापोटी अनेकांना कमी रिसोर्सेस मिळताहेत.

तुम्ही सिरियसली बोलत असाल तर तुमची विकेट पडलेली आहे. त्रिफळा असे समजा.

अजो१२३ Wed, 15/04/2015 - 14:12

In reply to by गवि

भाकड जनावरांचे मूत्र वगैरे वापरुन त्यांचा खर्च निघेल आणि त्यांना जगवावे ही कृतज्ञतेची भावना आहे, जी बाकीच्या लेखातल्या वस्तुनिष्ठ अप्रोचशी विपरीत आहे. बैलांना शेतीच्या कामाला जुंपण्यात कोणालाच क्रौर्य किंवा अनैसर्गिक काही दिसत नाही.

१. वस्तुनिष्ठतेत कृतज्ञता इम्प्लिसिट आहे.
२. कष्ट वेगळे, क्रौय वेगळे.

अजो१२३ Wed, 15/04/2015 - 14:17

In reply to by गवि

मी हे इंटरनेट एक आठवडा वापरलं नाही तर समजा सोमालियातल्या एका मनुष्याचं एक जेवण होईल. पण इंटरनेटचे वाचलेले पैसे सोमालियात पाठवून जेवण देण्याची घाऊक व्यापक इ इ सोय कशी करणार ?

तुम्ही इंटरनेट परमॅनेंटली सोडणार असाल तर अशी सोय करायला मी तयार आहे. इंतरनेटच्या भारतीय भावाने वाचलेले पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करायचा साधा प्रश्न आहे.

गवि Wed, 15/04/2015 - 14:22

In reply to by अजो१२३

घाऊक, व्यापक हे शब्द महत्वाचे आहेत. तिथे न लिहिलेला "पॉसिबल" आणि "व्हायेबल" हे शब्दही आता लिहितो.

एका देशातल्या कोणीतरी काहीतरी टाळल्याने वाचलेले रिसोर्सेस अन्य कोणत्यातरी देशात अन्य कारणासाठी वापरता आले असते हे आर्ग्युमेंट इतर देशबांधव / विश्वबांधव अर्धे उघडे असल्याने खुद्द आपण भारी ड्रेस परवडत असूनही पंचा नेसण्यासारखे आहे. तसे केल्यास आर्थिक चक्र चालणार कसं ?

गब्बरसिंग.. काहीतरी बोला.

गब्बर सिंग Wed, 15/04/2015 - 14:27

In reply to by गवि

मानव हा फक्त कंझ्युमर आहे प्रोड्युसर नाहीच - अशा गृहितकावर आधारलेला आहे तो प्रतिसाद. मानव हा फक्त घाण, प्रदूषण, शोषण, युद्धे, अत्याच्यार करतो व सृजनात्मक / सकारात्मक काही करीतच नाही - अशा आत्मनिंदात्मक गृहितकावर आधारलेले ऐकले की "चिंगम खाऊन निपचित पडून रहावेसे वाटते".

गवि Wed, 15/04/2015 - 14:32

In reply to by गब्बर सिंग

मानव हा फक्त कंझ्युमर आहे प्रोड्युसर नाहीच - अशा गृहितकावर आधारलेला आहे तो प्रतिसाद.

तो प्रतिसाद म्हणजे ?

गब्बर सिंग Wed, 15/04/2015 - 14:51

In reply to by गवि

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल.
- हा

अजो१२३ Wed, 15/04/2015 - 15:04

In reply to by गब्बर सिंग

पृथ्वीवर जो सूर्यप्रकाश वर्षभर पडतो व ज्याने आताचे (नि भविष्यातले) जीवचक्र चालू राहतो तो नियमित करून एकच घरात आणून तिथे रोषणाई करायचा प्रोजेक्ट चालू करा असे सुचवतो. तो प्रकाश सर्वांना उपलब्ध करून देणेबद्दल बोलणे देखिल कसे पाप आहे याबद्दल आपण चर्चा करू.
-------------------------------------------------------------------------------------------
एका विशिष्ट जिओग्राफिच्या लोकांच्या जीवनशैलीतील बदलामुळे दुसरीकडे चांगला फरक पडत असेल तर त्याबद्दल बोलूही नये?
------------------------------------------------------------------------------------------------
आणि तुमचा हा प्रतिसाद १००% मान्य केला तरी तो मांडण्याची उबळ अमेरिका जेव्हा आपले चलन जगभर वापरायला लावते तेव्हा कुठे जाते?

अजो१२३ Wed, 15/04/2015 - 14:19

In reply to by गवि

बाकी गोमूत्राचे जंतुनाशक उपयोग वगैरेवर प्रचंड दीर्घकालीन संशोधन का करत बसतात ते मलातरी कळत नाही.

जोपर्यंत दीर्घकालीन वा कितीही कालीन संशोधनाने काहीच सिद्ध होणार नाही असे सिद्ध होत नाही तोपर्यंत हा त्रागा आहे हे कळते.

गवि Wed, 15/04/2015 - 14:24

In reply to by अजो१२३

अहो.. अनेकदा सिद्ध झालंय की तो त्याज्य पदार्थ आहे आणि निर्जंतुकीकरणासाठी किंवा कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग नाही.

आता नेमके रिसर्च पेपर दाखवणे शक्य नाही. मिळाले तर संदर्भ देण्याचा प्रयत्न करता येईल.

नितिन थत्ते Wed, 15/04/2015 - 14:39

In reply to by गवि

गायीच्या मूत्राचे जे क्लेम्ड गुण असतात ते डुकराच्या, कुत्र्याच्या आणि माझ्या मूत्रातसुद्धा असतात.

पण "आंब्याच्या झाडावर जंतुनाशक म्हणून मी मुतलो" असं म्हटलं तर ग्राहकांना कसंसंच वाटेल. त्याऐवजी "आंब्याच्या झाडावर जंतुनाशक म्हणून गोमूत्र शिंपडले" असं म्हटलं तर भारी वाटतं. बाकी कै नै.

धर्मराजमुटके Wed, 15/04/2015 - 14:45

In reply to by नितिन थत्ते

तुमच्या मुत्राचा सँपल लॅबमधे नेऊन त्यातील रासायनिक घटकांचे पृथ्थकरण करुन घ्या. त्याला कसलेतरी अगम्य लॅटीन नाव द्या, भारीपैकी पॅकींग करा, आघाडीच्या सिनेतारकांना घेऊन त्याचे मार्केटींग करा आणि मग ते बाजारास विक्रीस आणा. तुफान विक्री झाली नाही तर मिशी ठेवणार नाही.

बॅटमॅन Wed, 15/04/2015 - 14:47

In reply to by धर्मराजमुटके

शिवाम्बु असे संस्कृत नाव आलरेडी आहे त्याला. सध्याच्या गर्वसे कहो वाल्या जमान्यात लॅटिन वगैरे म्लेच्छ भाषेचा आसरा घेण्याऐवजी देशी संस्कृत भाषेचा सहारा घ्या.

धर्मराजमुटके Wed, 15/04/2015 - 14:52

In reply to by बॅटमॅन

आय नो. बट इट इज क्वायट नोन टू एव्हरीबडी. 'गायमूत्र' ब्रॅंडनेम कसे वाटेल ? थोडे युनिक वाटेल. शिवाय कोणी आक्षेप घेतला तर इंग्रजी गाय + संस्कृत मुत्र अशी फोड करुन कायदेशीर पळवाट देखील ठेवता येईल.

नितिन थत्ते Wed, 15/04/2015 - 14:55

In reply to by धर्मराजमुटके

गो मूत्र सुद्धा म्हणता येईल. ऑब्जेक्शन आले तर गो म्हणजे गाय नै कै - (गो एअर सारखे आहे असे म्हणायचे).

धर्मराजमुटके Wed, 15/04/2015 - 15:00

In reply to by अनुप ढेरे

ऐसीवर कोणी शीघ्रकवी आहे काय ?
गो एअर, गो एअर, गो ऑल द वे (जिंगल बेल्स च्या तालावर) काव्य रचून देणारा ? आम्हाला 'गायमुत्र,' 'गो मुत्र' ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी जिंगल्स बनवायची आहेत.

बॅटमॅन Mon, 13/04/2015 - 16:34

ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55)

ते पञ्च पञ्चनखा: भक्ष्या: वगैरे बहुधा मनुस्मृति नामक दुसर्‍याच एका ग्रंथाच्या मनु नामक दुसर्‍या ग्रंथकर्त्याने लिहिले असावे.

इलियड हे होमरने लिहिलेले नसून त्याच नावाच्या दुसर्‍या कुणीतरी लिहिलेले असावे असे म्हणतात, तद्वतच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/04/2015 - 01:43

In reply to by राजेश घासकडवी

या ट्रोलिंगबद्दल घासकडवी यांवर चार दिवस बंदी घालण्यात येत आहे. जे कोण त्यांनी सकारात्मक श्रेणी देतील किंवा '+१' म्हणतील त्यांच्यावरही प्रत्येकी एकेक दिवस बंदी घालण्यात येईल.

गब्बर सिंग Tue, 14/04/2015 - 02:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तेरे आज़ाद बंदों की न ये दुनिया न वो दुनिया
यहाँ बोलने पर पाबंदी वहाँ मारने पर पाबंदी

-----

ओरिजिनल शेर खालीलप्रमाणे आहे - पण धाग्याचा विषय (गौहत्याबंदी) मद्द-ए-नजर रखते हुए मैने कुछ तब्दीलियां की है

तिरे आज़ाद बंदों की न ये दुनिया न वो दुनिया
यहाँ मरने की पाबंदी वहाँ जीने की पाबंदी

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/04/2015 - 05:01

In reply to by गब्बर सिंग

याबद्दल गब्बर सिंग यांच्यावर एक दिवसाची बंदी आणि घासकडवींवर वाढीव एक दिवसाची - एकूण पाच दिवसांची - बंदी लादण्यात येत आहे.

गब्बर सिंग Tue, 14/04/2015 - 06:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जुबां खामोश तो कर दोंगे उनकी
आंखोंसे दर्द फिर भी बयां होगा
बंदिशों और पाबंदियों की गर्दिश में
इश्क और मुश्क छिपाए नही छिपेगा ______ गब्बर सिंग रामगढी

--

बंदिश / पाबंदी = प्रतिबंध
मुश्क = सुगंध
--

मिस्रा हा आहे -> इश्क और मुश्क छिपाए नही छिपते. गालिबचा असावा बहुतेक. (काला पत्थर मधे परिक्षित सहानी च्या तोंडी असलेल्या गाण्यात आहे.)

--
(आज लै चढलेली आहे. न पिताच. त्यामुळे शेर नुसते धडाधड बाहेर पडत आहेत ....)

गवि Tue, 14/04/2015 - 10:49

In reply to by राजेश घासकडवी

मुश्क म्हणजे Musk चा मूळ शब्द म्हणजे कस्तुरीमृगाच्या बेंबीतल्या पदार्थाचं नाव आहे अशी माझी समजूत होती.

गब्बर सिंग Wed, 15/04/2015 - 04:55

In reply to by नंदन

जरा मुश्किल जागी निर्देश करतो

जो देखते मेरी नज़रों पे बंदिशों के सितम तो
ये नज़ारे भी मेरी बेबसी पे रो देते

पिवळा डांबिस Wed, 15/04/2015 - 09:51

In reply to by नंदन

मलाही मुश्क म्हणजे कस्तुरी असंच वाटलं होतं, पण इथे जाणकारांनी सुगंध (आणि मिशी!!) असे पर्याय सांगितल्यावर पुढे बोललो नाही....
बारावीत असतांना एक शेर गेला होता...

"मुश्क आनस्तकी, खुद बिगोयद,
न की अत्तार बिबोयद"

खरी कस्तुरी आपल्या सुगंधानेच जाहीर करते की ती कस्तुरी आहे. अत्तारियाला सांगावं लागत नाही की बाबा रे, ही कस्तुरी आहे!!!
(तात्पर्यः गुणवान माणसं त्यांच्या गुणांनीच जाहीर होतात, त्यांना कोणाकडून गुणवान म्हणून इंट्रोड्यूस करून घ्यायची गरज नसते)

पिवळा डांबिस Wed, 15/04/2015 - 23:11

In reply to by नंदन

जिथे तिथे लिंका चिटकवल्याच पाहिजेत का रे, लिंकाळ्या?
आता माझ्या 'शेरा'ला तुझ्या लिंकेचं शेपूट कशाला?
मराठीत अर्थ दिलाय ना मी?
वशाड मेलो!!
:)

बॅटमॅन Wed, 15/04/2015 - 23:26

In reply to by पिवळा डांबिस

अलीकडे लिंकिंगचंद्र ऊर्फ लिंकाळे हा किताब रा.रा. गब्बरसिंग यांना बहाल केल्या गेला आहे.

नंदन Wed, 15/04/2015 - 23:31

In reply to by पिवळा डांबिस

गुस्ताखी मुआफ, पण रा. रा. बॅटमॅनशास्त्री सध्या फारशीचं अध्ययन करत असल्याने मूळ म्हण वाचून इतर काही ज्ञानकण पदरात टाकतील, अशी एक आशा होती :)

[बाकी बोयाद = लक्षात असणे, असाही एक अर्थ वाचून हा याद/याददाश्तचा नातेवाईक असणार, हा एक किंचित माहितीठेवा मिळाला म्हणा.]

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 00:08

In reply to by नंदन

مشک: ماده ای سیاه و بسیار معطر که محتوی در یک قسم کیسه است در زیر شکم یک نوع حیوان شبیه به آهو که آن را آهوی
شک گویند. – فرهنگ دهخد

मुश्कः मादह ये सियाह व बसियार मअतर के महतवी/महतुई दर यक क़िस्म केसह् अस्त दर ज़ेर शिक्म यक नोअ हैवान शबीम ब आहो के आन रा आहो ये शक गुवीनद. फरहन्ग द हख़्द.

गुगलल्यावर लागलेले शोधः मादह = पदार्थ, बसियार = लैच, मअतर = सुगंधी. کیسه = ब्याग. (केस चा अपभ्रंश)? महतवी = वस्तू. शबीम = सारखा, आहो = हरीण, इ.इ.

"एक काळा व अतिशय सुगंधी पदार्थ. एकाप्रकारच्या ब्यागेत असतो. ही ब्याग एका प्रकारच्या हरिणासारख्या प्राण्याच्या पोटाखाली असते" इतका पार्ट कळाला. बाकीचे कळाले नाही.

उर्वरित वाचून पाहतो.

राजेश घासकडवी Tue, 14/04/2015 - 06:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्रोलिंग?? कोणीतरी कोणाशीतरी मयतर्री करतंय असं म्हटल्याबद्दल बंदी??? कुठे नेऊन ठेवलंय माझ्या ऐसीवरचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य???

अशा प्रतिसादांमुळे हा अक्ष असल्याची अधिकाधिक तीव्रतेने खात्री पटायला लागली आहे.

अजो१२३ Thu, 16/04/2015 - 14:49

In reply to by मेघना भुस्कुटे

अदिती = अरविंद केजरीवाल
घासकडवी + मेघना = प्रशांत भूषण + योगेंद्र यादव.
----------------------------------------------
आपल्याच संस्थळावरून असं बेदखल होत असताना पाहून ही साम्यस्थळं डोळ्यासमोर आली.

पिवळा डांबिस Mon, 13/04/2015 - 23:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांनी भले चांगल्या हिरव्यागार काड्या लावल्या असतील, पण गौ ने खाऊन टाकल्या असतील!!!
शिवाय जर त्या काड्यांना गौच्या (गव्हाच्या) लोंब्या लागलेल्या असतील तर त्याही गौ ने खाउन टाकल्यामुळे आता १० लाख लोकं उपाशी रहाणार!!!

विवेक पटाईत Mon, 13/04/2015 - 19:56

वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्याकरता लोकांना शाकाहार स्वीकार करावाच लागेल. एक ही प्रतिसाद मुद्धेसूद नाही, आश्चर्य आहे.

नगरीनिरंजन Mon, 13/04/2015 - 20:15

In reply to by विवेक पटाईत

शाकाहाराबरोबर किडे खाल्ले जातील. रातकिड्याची चव म्हणे काजूच्या जवळपास जाते आणि चिकनपेक्षा जास्त प्रोटीन्स असतात.
कॅलिफोर्नियात रातकिड्यांच्या पिठाची कुकी मिळते.

बॅटमॅन Mon, 13/04/2015 - 21:56

In reply to by नगरीनिरंजन

कॅलिफोर्नियात रातकिड्यांच्या पिठाची कुकी मिळते.

उगीचच 'निमकराच्या खाणावळीतील डुकराच्या मांसाची भजी' आठवून गेली.

बादवे, कुकी कशी असते काय की. पर्याय तरी रोचक वाटतो आहे. 'क्रिकेट'वेडी जन्ता इकडे लक्ष देईल काय?

धनंजय Mon, 13/04/2015 - 22:12

In reply to by बॅटमॅन

"क्रिकेटवेडी" कोटी आवडली आहे.

पुढील किचकट कीटक-अवांतरात ते हरवून जायला नको.
----
खातात तो क्रिकेट नव्हे तर सिकेडा नामक किडा असावा.
http://en.wikipedia.org/wiki/Cicada

(कमीतकमी यू एस अमेरिकेच्या पूर्वेकडील भागात हा किडा खाण्याबाबत ऐकले आहे. हा किडा सुद्धा त्याच्या मौसमात रातकिड्यासारखा वाटावा असा किर्र आवाज करतो. पण आवाज रात्रंदिवस करतो, फक्त रात्री नाही. जीवशास्त्रीय दृष्ट्या रातकिड्याचा अगदी जवळचा भाऊबंद नसावा.)

मी एकदा न्यू ऑर्लीन्स येथे कीटक-संग्रहालयात गेलो, तेव्हा मुद्दामून किड्यांची भजी वगैरे बनवतात ती चाखायला गेलो. परंतु संग्रहालयाचा तो विभाग काही कारणाने बंद होता. त्यामुळे जमले नाही.

लहानपणी साखरेत मुंग्या खाण्याची वेळ पुष्कळदा आली आहे. गोव्याच्या हवेत साखर पुष्कळदा ओलसर होई आणि प्रत्येक कणाभोवती पाकाचा सूक्ष्म थर तयार होई, त्यात मुंग्या चिकटून मरत. मग त्या झटकून-पाखडून वगैरे टाकता येत नसत. रेशनच्या साखरेचा काळ तो - तुम्हा लहानग्यांना ठाऊक नाही. पण मुंग्या आल्या म्हणून साखर टाकून देऊन नवी आणूया, अशी परिस्थिती नव्हती. असो. अगदी बारीक चपट्या मुंग्यांची एक जात होती - बारीक पण त्रासदायक चावत. त्यांना फॉर्मिक आम्लाचा जोरदार वास येत असे. तो मला विशेष आवडत नसे.

मोठे डोंगळे-मुंगळे निवडून बाजूला काढता येत असत. त्यामुळे त्यांचा वास किंवा चव मला ठाऊक नाही.

धन्यवाद!

बाकी मुंगी खाल्ली नसली तरी तो वास मात्र मुद्दामहून घेतला आहे. अतिशय असुखकर.

(सुरभि नामक दूरदर्शनवरील कार्यक्रमात कुठलीशी आदिवासी जमात मुंग्यांचे लोणचे खाते असे पाहिल्याने उत्सुकता निर्माण झाली होती, पण लहान असली तरी मुंगी खाण्याचे धैर्य झाले नाही. त्याची भूक वासावरच भागवली.)

आमच्या शहरात एका चिनी हाटिलात डीप-फ्राईड सिल्कवर्म्स् मिळतात. मुख्य भोजन येण्यापूर्वी तोंडात टाकायला बरे असतात. तळलेल्या बारक्या कोलमीची चव नसली, तरी बादरायणी संबंधाने मामला त्याच प्रकारातला.

'न'वी बाजू Tue, 14/04/2015 - 07:18

In reply to by नंदन

(कधी खाण्याचा योग आला नाही, पण...) डीप फ्राय केल्यावर कडकडीत नाही बनणार?

त्यापेक्षा सॉटे का करू नये?

पिवळा डांबिस Mon, 13/04/2015 - 23:35

In reply to by नगरीनिरंजन

कॅलिफोर्नियात रातकिड्यांच्या पिठाची कुकी मिळते.

हो. गेल्या वेळेस अदिती इथे आलेली असतांना तिला दिली होती.
तिने अतिशय आवडीने खाल्ली!!!

पिवळा डांबिस Mon, 13/04/2015 - 23:41

In reply to by विवेक पटाईत

वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्याकरता लोकांना शाकाहार स्वीकार करावाच लागेल.

त्यापेक्षा असं केलं तर?
शाकाहारी लोकांचीच सागुती बनवायला सुरवात केली तर? :)
नाय म्हणजे अन्नाचा एक नवीन स्त्रोतही उपलब्ध होईल,
आणि ती शिंची सतत वाढणारी जनसंख्याहि जरा थोडी आटोक्यात येईल!!!!

'न'वी बाजू Tue, 14/04/2015 - 07:18

In reply to by विवेक पटाईत

वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्याकरता लोकांना शाकाहार स्वीकार करावा लागेल.

हाइल हिटलर! (मराठीत) नमस्ते सदा वत्सले मातृभूमे!

आणि आपल्या गोमातेच्या सुपुत्रांना हार्दिक घो! (व्हॉटेवर 'घो' माइट बी.)

केएफसीतून गोमांसाचे पदार्थ आणायला निघालेत!

बाळ सप्रे Tue, 14/04/2015 - 10:58

In reply to by विवेक पटाईत

मांसभक्षणासाठी पशुपालन करुन पशुंची संख्या वाढवण्यासाठी जास्त नैसर्गिक स्त्रोत (आणि पैसा) वापरले जातात हा युक्तिवाद एकवेळ मान्य केला तरीपण नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले पशुंचे मांस खाण्यावर बंदीचे समर्थन होउ शकत नाही.
इथे मांसाहारासाठी नैसर्गिक स्त्रोत /पैसा जास्त खर्च होतो हा युक्तिवाद फोल ठरतो. कुठल्याही एखाद्या अन्नपदार्थाचे अतिरेकी उत्पादन (तुमच्या उदाहरणातील ब्राझील वगैरेचे उदाहरण) हे केव्हाही समर्थनीय नाहीच, म्हणून सरसकट बंदीही समर्थनीय नाही.

धार्मिक दृष्टिने विचार करता एखादा बीफ खाणारा मनुष्य गायीची पूजा करणार्‍याची गाय ओढून नेउन कापत नाही. त्या दृष्टीकोनातून सर्व धर्माचा सहानुभूतीपूर्वक विचार करायचा झाल्यास कुठलिही पशुहत्या बंदिस पात्र ठरेल. जैन लोकांत कुठल्याही प्राण्याची हत्या त्याज्य असते. काही लोक तर अशा धार्मिक विचारातून पायाखाली मुंगीदेखिल मरु नये इतके संवेदनाशील असतात.

बाकी मनु, पुढचा जन्म वगैरेवर पास !!!

अजो१२३ Thu, 16/04/2015 - 15:00

In reply to by विवेक पटाईत

विवेककाका, तुमी पन ना...!!! काय पन मंता.
शाकाहार स्वीकारावाच लागेल पण जर निसर्गाचं संतुलन ठेवायचं असेल तर. आता निसर्गाच संतुलन ठेवायची गरज आहे हे कुणी सांगीतलं? घेता येईल अ‍ॅडजस्ट करून. जंगलात एकाच आकाराच्या प्राण्यांची लोकसंख्या पाहिली तर शेकडो शाकाहार्‍यांमागे १-२ मांसाहारी प्राणी असतात. दुसरीकडे आजच महाराष्ट्रात १० कोटी लोक आहेत आणि २ कोटी कॅटल आहेत.

किमान इतके म्हणून तरी गप्प बसायचेत. "स्वीकार करावा लागेलच" ही काय भाषा आहे? अहो, भारतीय मुस्लिम देखिल शाकाहारी म्हणता येतील. १४ नाश्ते (तितका इंथू असल्यास) आणि १४ जेवणे (आठवड्यात) पैकी फार्तर ७ नाश्त्यांत अंडे असतील आणि २ जेवणांत मांस असेल.

मांसाहार सक्सेस्फूल करायची लोकांकडे स्किम असताना काही-बाही बोलून राहिले...

अंतराआनंद Tue, 14/04/2015 - 06:15
संपूर्ण देशात गौ. बंदी उठल्यावर काय होईल

गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल.

एवढ्या वर्षात कसं काय बुवा झालं नाही हे?

देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील

ती आधीच घेतली आहे पण ते गोमांसासाठी नसून दुधासाठी आणि दुधाची जास्त गरज्/मागणी शाकाहारी लोकांमध्ये असते.

.

(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).

यात त्यांच्या शेणामुतासाठी त्यांना पोसावे लागेल त्या पोषणाचा खर्च कुठे धरलाय हिशेबात?

लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे.

बरेचसे लोकं शाकाहारी आहेत तरी वाढती जनता अर्धपोटी आहेच मग उरलेलेही कट्टर शाकाहारी झाले तर त्यांच्या साठी घास आणायचा कुठुन? त्यात तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे कीट नाशक आणि खतांसाठी पोसलेले गायबैलही वाटेकरी होणार त्या घासफूस मध्ये मग कसं व्हायच?

तुम्ही गायबैल खाणारे किती गरिब बघितले आहेत? (बीफ खाणारे सोडा. तो विषय वेगळा) मी एकही बघीतलेला नाही. जर आपलं विश्वच एवढं मर्यादित आहे तर त्याच्या कसोट्या सर्वांना लावायचा अट्टाहास का?

मुळात आपल्याकडे कितीही कट्टर मांसाहारी असला तरी तो शाकाहार वाईट आणि मांसाहारच चांगला असं म्हणत नाही. हां फक्त शाकाहार पूरक नाही असं म्हणत असेल. त्यातून दिसली गाय की मार आणि खा असं होत नाही मग उगाचच हा कल्पनाविलास कश्यासाठी?

दुसरं म्हणजे माझ्या ताटात जे आहे त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? उद्या कांदे तामसी, बटाटे हे कंद म्हणून खाउ नये असं कोणी म्हणायला लागेल मग तसा कायदा करणार का?

अरविंद कोल्हटकर Tue, 14/04/2015 - 04:08

धाग्याच्या मूळ लेखात अनेक मुद्द्यांना एकाच वेळी न कवळता केवळ मांसाहार विरुद्ध शाकाहार इतकाच रोख ठेवला असता तर कदाचित चर्चा अधिक मुद्देसूद झाली असती असे वाटते.

जगातील सध्यातरी वाढत्या प्रजेला आणि सर्वत्र वाढत्या जीवनमानाची अपेक्षा असतांना त्याच वाढत्या जीवनमानाचा एक भाग म्हणून वाढणार्‍या मांसाहाराला उपलब्ध जमीन आणि गोडे पाणी पुरेल काय असा प्रश्न सुचतो आणि त्याला उत्तर म्हणून सर्वांनीच शाकाहारी-मत्स्याहारी बनायला हवे हा पर्यायहि सुचतो. १० एकर जमिनीत धान्य उगवून त्यावर जितकी प्रजा जगेल त्यापेक्षा कितीतरी कमी प्रजा त्याच जमिनीतून चारा काढून एक प्राणी पोसला तर त्याच्या मांसावर जगू शकेल असे विधान करता येईल काय? तसे असेल तर सर्वच मांसाहार थांबवून प्रजेच्या अन्नाच्या सवयी शाकाहार-मत्स्याहाराकडे वळवायला लागतील.

(असेहि वाचलेले आहे की जमिनीखाली राहणार्‍या मुंग्या, गांडुळे इत्यादि प्राणी प्रथिनांचे मोठे संग्रह असून सध्यातरी अन्न म्हणून ते पूर्णपणे वाया जात आहेत. त्यांची व्यापारी पद्धतीने उगवण केली आणि ते खाण्याची सवय लावून घेतली - कसे ते विचारू नका! -तर मांसाहाराला हा एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो.)

'न'वी बाजू Tue, 14/04/2015 - 07:35

In reply to by अरविंद कोल्हटकर

(असेहि वाचलेले आहे की जमिनीखाली राहणार्‍या मुंग्या, गांडुळे इत्यादि प्राणी प्रथिनांचे मोठे संग्रह असून सध्यातरी अन्न म्हणून ते पूर्णपणे वाया जात आहेत. त्यांची व्यापारी पद्धतीने उगवण केली आणि ते खाण्याची सवय लावून घेतली - कसे ते विचारू नका! -तर मांसाहाराला हा एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो.)

हा मांसाहाराला पर्याय कसा?

'न'वी बाजू Tue, 14/04/2015 - 07:33

साला आयुष्याची एक तमन्ना आहे. एकदा जुन्या दिल्लीत एखाद्या रस्त्याकडेच्या मुसलमानाच्या ढाब्यात जाऊन सकाळीसकाळी निहारी हाणायची आहे. थेट निहारीच्या माहेरघरात!

कधी पुरी होते ते पाहायचे.

बहुत सुना है| अब एक बारी चखना है|

..........

कॉण्ट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, निहारी हा रात्रभर शिजवत ठेवून सकाळीसकाळी हाणण्याचा प्रकार आहे, असे कळते. काय मस्त झोप उडत असेल!

शहराजाद Tue, 14/04/2015 - 08:01

In reply to by 'न'वी बाजू

पायधूळ झाडा गरीबखान्यात कधी.
याद राहील अशी निहारी खिलवू आपल्याला.

पिवळा डांबिस Wed, 15/04/2015 - 09:56

In reply to by 'न'वी बाजू

सकाळीसकाळी निहारी हाणायची आहे. थेट निहारीच्या माहेरघरात!

इन्शाल्ला!!
हमने तो यह ख्वाब पूरा किया हमारी लास्ट दिल्ली ट्रीपमें,
दुवा मांगते है की आपका भी यह ख्वाब पुरा हो जाय!!!!!

बॅटमॅन Wed, 15/04/2015 - 11:55

In reply to by पिवळा डांबिस

या निहारीबद्दल अधिक माहिती सांगितल्यास आभारी असेन. धन्यवाद. निहारी आणि न्याहारी असे कनेक्षन उगीच चमकून गेले.

वामन देशमुख Sat, 18/04/2015 - 12:04

In reply to by गवि

दगडांचेही (किंवा निष्ठुर पुरुषहृदयाचेही) मेण होईल इतका वेळ मंद आचेवर शिजवत ठेवलेले मटण.

कठीण कठीण कठीण किती
कठीण कठीण कठीण किती
बकरीचं हाडूक बाई…
;)

नंदन Wed, 15/04/2015 - 12:17

In reply to by बॅटमॅन

कनेक्षन आहेच. नहार म्हणजे दिवस (अरेबिक) वरून फारसीमार्गे न्याहारी मराठीत स्थिरावलेला दिसतो. विशेषनाम/सामान्यनाम इतकाच काय तो उपयोगात फरक.

नितिन थत्ते Tue, 14/04/2015 - 13:58

१. हिंदूंना गाय पूज्य म्हणून गायीच्या हत्येवर बंदी घातली असा ठपका येऊ नये म्हणून सरकारने न्यायालयात गोवंशाची वृद्धी करण्याची गरज म्हणून गायींच्या हत्येवर बंदी घातली आणि गरज पडल्यास इतर प्राण्यांच्याही हत्येवर बंदी घालू असा हास्यास्पद युक्तीवाद केला आहे.
या दुव्यावर असे दिसते की गायींची संख्या सातत्याने वाढते आहे. उलट घोडे, खेचर, उंट आणि गाढवे यांची संख्या कमी होत आहे.

२. "हो ! हिंदूंच्या भावनांसाठीच बंदी घातली आहे!" असे (५६ इंची) छाती पुढे काढून सांगणारे सरकार हवे म्हणून मागील वर्षी जनतेने सत्ताबदल केला असा आमचा समज होता.

"हो ! हिंदूंच्या भावनांसाठीच बंदी घातली आहे!" असे (५६ इंची) छाती पुढे काढून सांगितल्यास कोर्ट एका फराट्यात ते उडवून लावेल. कोर्टात दाद तर मागितली जाणारच. तेव्हा कायद्यातल्या फटी शोधून गनिमी काव्याने त्या फटींतून आख्खी गाय ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकार करु पाहात असेल. लोकांना काय? कोणत्याही चतुराईने शेवटी असा कायदा झाल्याचा आनंद होणार. थत्तेचाचा, सीग्राम्स इम्पिरियल ब्लू म्युझिक सीडीजची जाहिरात म्हणजे खरोखर म्युझिक सीडीजची आहे असं आपण समजतो का? त्या सीडीज आपल्या थोड्या नावापुरत्या काढून विकाव्या लागतात.

नितिन थत्ते Tue, 14/04/2015 - 14:34

In reply to by गवि

तसं नाय हो गविशेठ...
तशी तर गोहत्याबंदी पुष्कळ राज्यांत (२९ पैकी २४) गोवधबंदी आहेच आणि ती भाजप सत्तेवर नसलेल्या राज्यांत सुद्धा आहे.

सो गोवधबंदी करणे यात विशेष काही नाही. ते तर घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांतच आहे. त्यामुळे कोर्टाने ते फराट्यासरशी उडवून लावले नसते.

Prohibition of cow slaughter is a Directive Principles of State Policy contained in Article 48 of the Constitution. It reads, "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter of cows and calves and other milch and draught cattle.

On October 26 2005, the Supreme Court of India, in a landmark judgement upheld the constitutional validity of anti-cow slaughter laws enacted by different state governments in India.

शिवाय अशाच प्रकारे हिंदूंच्या भावना दुखावणार नाहीत अशी धोरणे "सेक्युलर असल्याचा डांगोरा पिटणारी" सरकारे राबवतातच. नव्या सरकारकडून जन्तेला अ‍ॅसर्टिव्हनेसची अपेक्षा होती.

वामन देशमुख Sat, 18/04/2015 - 12:01

In reply to by नितिन थत्ते

Prohibition of cow slaughter is a Directive Principles of State Policy contained in Article 48 of the Constitution. It reads, "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter of cows and calves and other milch and draught cattle.

बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाच सांगते आहे, संपूर्ण गोवंश (आणि बहुधा म्हैस वंश देखील)हत्या बंदी करा म्हणून!

अनुप ढेरे Tue, 14/04/2015 - 14:08

In reply to by नितिन थत्ते

२. "हो ! हिंदूंच्या भावनांसाठीच बंदी घातली आहे!" असे (५६ इंची) छाती पुढे काढून सांगणारे सरकार हवे म्हणून मागील वर्षी जनतेने सत्ताबदल केला असा आमचा समज होता.

तुम्ही जनता आहात का?

अजो१२३ Sat, 18/04/2015 - 22:54

In reply to by नितिन थत्ते

मी सत्ताबदलास हातभार लावला होता. (पण तो या कारणासाठी नाही).

शांतं पापम्. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हेती. अहो, निष्ठा म्हणून काही चीज आजे कि नाही?

अजो१२३ Sat, 18/04/2015 - 23:01

In reply to by नितिन थत्ते

२. "हो ! हिंदूंच्या भावनांसाठीच बंदी घातली आहे!" असे (५६ इंची) छाती पुढे काढून सांगणारे सरकार हवे म्हणून मागील वर्षी जनतेने सत्ताबदल केला असा आमचा समज होता.

निवडणूकीचा प्रचार नीट फॉलो करत जा नितिनजी. मंदिरे नंतर, टॉयलेट अगोदर इ इ मोदी अयोध्येतच म्हटले होते निवडणूकीत. असे उलटे सुलटे समज अनावश्यक आहेत.

राजेश घासकडवी Wed, 15/04/2015 - 05:26

वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्याकरता लोकांना शाकाहार स्वीकार करावाच लागेल. एक ही प्रतिसाद मुद्धेसूद नाही, आश्चर्य आहे.

यात अनेक त्रुटी आहेत. वाढत्या जनसंख्येबरोबरच मांसाहारही गेल्या काही दशकांत वाढलेला आहे. त्यामुळे 'अमुक व्हायलाच पाहिजे' हा निष्कर्ष बरोबर नाही.

एकंदरीतच लेखात अर्थशास्त्र (डिमांड-सप्लाय), नीतिमत्तात्मक गृहितकं (गायीला मारणं पाप आहे बरंका) यांची सरमिसळ झालेली आहे. त्यातून काढलेले काही चुकीचे निष्कर्ष कारणपरंपरेशिवाय येतात.

१. गाय/बैल मारण्यास असलेली बंदी उठली तर शेतीसाठी बैल उरणारच नाहीत, कारण सगळेच लोक जास्त मांस खाण्यासाठी बैल मारून खातील. कारण जास्त मांस उपलब्ध होऊन ते स्वस्त होईल.
- गंमत अशी आहे की ज्यांना शेतीसाठी बैल आवश्यक आहेत ते लोक बैल विकणार नाहीत, कारण त्यांना शेतीसाठी जास्त गरज आहे. त्यामुळे शेतीसाठी जितक्या बैलांची गरज आहे तितक्यांची निर्मिती झाली नाही, तर ते महाग होतील, आणि मांसासाठी विकले जाणार नाहीत.
- शेतीसाठी बैल आवश्यक आहेत हे गृहितकच इतकं गंडलेलं आहे की त्याबद्दल काय म्हणावं कळत नाही. अमेरिकेत बैल कापून खातात, त्यासाठी त्यांची पैदास होते, पण त्याचबरोबर यंत्रांच्या साह्याने शेती करून भारतापेक्षा दर एकरी कितीतरी अधिक प्रमाणात अन्नोत्पादन होतं.

२. गोहत्या हे पाप आहे, कारण गाय पवित्र आहे
- सावरकरांनी 'गाय हा उपयुक्त पशू आहे' असं म्हटलं होतं, त्याबद्दल काय म्हणणं आहे? अमेरिकेत गोहत्या सर्रास चालते - तिथल्या लोकांचं नक्की काय बिघडलं आहे? अमेरिकनांना पुनर्जन्म असतो का? अमेरिकनांचं जाऊदेत, मी गाय, बैल, बोकड, कोंबडी, मासे, डुक्कर असे अनेक प्राणी खातो. तसंच दह्यामधून, दुधामधून आणि इतर अनेक भाज्यांमधून अनेक बॅक्टेरिया माझ्या पोटात जातात. मग मला पुढचा जन्म नक्की कोणाचा मिळेल? आजच्या जीवशास्त्राला जे ज्ञान आहे ते मनुला होतं असं खरंच तुम्हाला म्हणायचं आहे का?

३. मनुने सांगितलं आहे ते ग्राह्य आहे
- सगळंच ग्राह्य आहे का? मनुने शूद्राने वेद ऐकले तर त्याच्या कानात राजाने उकळतं शिसं ओतावं असंही सांगितलं आहे. ते तुम्हाला ग्राह्य वाटतं का? इतरही अनेक क्रूर शिक्षा साध्या साध्या अपराधांबद्दल केवळ त्या माणसाच्या जातीनुसार सांगितल्या आहेत. त्या तुम्ही ग्राह्य धरता का? मग कुठचं ग्राह्य धरावं आणि कुठचं नाही, याचे तुमचे काय निकष आहेत?

म्हणजे या लेखनाला प्रत्यक्षात काय घडतं आहे याचं अधिष्ठान नाही, नैतिक अधिष्ठान नाही किंवा ऑथोरेटिव्ह पाया नाही. मग या लेखातून 'तुमचे विचार असे आहेत' यापलिकडे मला नक्की काय नवीन ज्ञान मिळतं?

गब्बर सिंग Wed, 15/04/2015 - 05:38

In reply to by राजेश घासकडवी

एकंदरीतच लेखात अर्थशास्त्र (डिमांड-सप्लाय), नीतिमत्तात्मक गृहितकं (गायीला मारणं पाप आहे बरंका) यांची सरमिसळ झालेली आहे. त्यातून काढलेले काही चुकीचे निष्कर्ष कारणपरंपरेशिवाय येतात.

ही सरमिसळ अजिबात इष्ट नाही असं म्हणायचंय का तुम्हास ?

दुसरे म्हंजे जरी ती जाणूनबुजुन केलेली नसेल, व त्यांच्याकडून झालेली असेल तर ते अनिष्ट का आहे ? Aren't the principles of "morality and ethics" (at least to a reasonable extent) subject to rules of economics ?? Are rules of ethics supplied more than demanded by society ??? Doesn't the demand for (better/more) governance grow with the growth in the economy ??

-----

संभाव्य आक्षेप -

गब्बर, Ok. The supply and demand concepts (of economics) apply to morality also. So what गब्बर ???

नितिन थत्ते Wed, 15/04/2015 - 07:55

In reply to by गब्बर सिंग

>>संभाव्य आक्षेप -

मुळात काय लिहिले आहे हेच कळले नाही त्यामुळे कुठलाच आक्षेप घेता येत नाही.

गब्बर सिंग Wed, 15/04/2015 - 09:08

In reply to by नितिन थत्ते

एकंदरीतच लेखात अर्थशास्त्र (डिमांड-सप्लाय), नीतिमत्तात्मक गृहितकं (गायीला मारणं पाप आहे बरंका) यांची सरमिसळ झालेली आहे.

x आणि y ची सरमिसळ झालेली आहे असे विधान आहे. पण - जर y हा x सापेक्ष असेल तर ??

Moral principles are also subject to laws of supply and demand. असा व एवढाच माझा मुद्दा आहे.

बरं मग ? पुढे काय ?? असा प्रतिप्रश्न असू शकतो. पण त्यास उत्तर नाही.

राजेश घासकडवी Wed, 15/04/2015 - 23:37

In reply to by गब्बर सिंग

सरमिसळ करणं इष्ट वा अनिष्ट या सर्वसाधारण प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही. मात्र इथे नक्की काय युक्तिवाद आहे हे कळायला या सरमिसळीमुळे गोंधळ होतो एवढंच मर्यादित विधान करायचं होतं

पिवळा डांबिस Wed, 15/04/2015 - 10:01

In reply to by राजेश घासकडवी

मी गाय, बैल, बोकड, कोंबडी, मासे, डुक्कर असे अनेक प्राणी खातो. तसंच दह्यामधून, दुधामधून आणि इतर अनेक भाज्यांमधून अनेक बॅक्टेरिया माझ्या पोटात जातात. मग मला पुढचा जन्म नक्की कोणाचा मिळेल?

व्यनि करा, मग सांगतो!!!
इथे सांगितलं तर तुमची उगाच बदनामी!!!!
:)

अजो१२३ Sat, 18/04/2015 - 23:03

In reply to by राजेश घासकडवी

अमेरिकेत बैल कापून खातात, त्यासाठी त्यांची पैदास होते, पण त्याचबरोबर यंत्रांच्या साह्याने शेती करून भारतापेक्षा दर एकरी कितीतरी अधिक प्रमाणात अन्नोत्पादन होतं.

अमेरिकन लोकांना तेल संपेपर्यंतच शेती करायची असेल. भारतीय शेतकर्‍यांना अनंत काळ करायची असेल.

अजो१२३ Sat, 18/04/2015 - 23:49

In reply to by राजेश घासकडवी

- गंमत अशी आहे की ज्यांना शेतीसाठी बैल आवश्यक आहेत ते लोक बैल विकणार नाहीत, कारण त्यांना शेतीसाठी जास्त गरज आहे. त्यामुळे शेतीसाठी जितक्या बैलांची गरज आहे तितक्यांची निर्मिती झाली नाही, तर ते महाग होतील, आणि मांसासाठी विकले जाणार नाहीत.

व्यवस्था इतक्या परफेक्ट फक्त अमेरिकेतच असतात. कारण व्यवस्था इतक्या व्यवस्थितपणे राबवायला त्यांना जगभरातून इतक्या प्रकारची रॉयल्टी मिळते. सरकारकडे नको तितके पैसे असतात.
आज इंदोरला संत्री ५ रु किलो आहेत. थोडी खराब संत्री फुकट आहेत. तिथल्या जनावरांची ऐश चालू आहे. दिल्लीत संत्री ६० रु किलो आहे. इंदोरचे शेतकर्‍यांचे दिवाळे वाजले आहे. हे संत्री जर दिल्लीत उपलब्ध झाले, मंजे १५ रुला किंवा २० रुला तर खपतील. पण असं होत नाहिए.
एरवी जेव्हा इतकं अफाट पीक येत नाही , तेव्हा इंदोरमधे भाव ४०-५० रु असतो आणि दिल्लीत ६०-७० असतो. मंजे प्रवास, मार्जिन्स हे सग्ळं २० रुच आहे.
भाव ५ चा २५ करायचा असो वा ५० चा ७० करायचा असो, मधल्या लोकांना काय फरक पडतो? उलट ५ चा २५ करून दिल्लीत विकला तर व्हॉल्यूम जास्त असल्याने त्यांचा फायदा अति होणार आहे.
पण असे होत नाहीए. इंदोरकर परेशान. दिल्लीकर परेशान. कारण ? ही अमेरिका नाही!
उगाच असं होईल तसं म्हणण्याआधी भारतात प्रत्य्क्ष काय होत असतं ते पहा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
दिल्ली आणि मुंबई शहरांणी बी आर टी आणि मोनोरेल प्रकल्पांवर बरीच उर्जा ओतलेली आहे. आत्ता नविन सरकारे आली. केजरीभाऊ म्हणाले - सगळ्या बी आर टी कॅन्सल. फडणवीसकाका म्हणाले - सगळ्या मोनोरेल कॅन्सल! अरे भावड्यांनो, चाल्लय काय? .... कारण ही अमेरिका नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे महानगरपालिकेचं कोणतंही टेंडर काढा. ५०कोटीच्या वरचा प्रकल्प असेल तर पहिले ४-५ वर्षे सतत कँसलच होतो. मग अवार्ड झालेलं पहिलं टेंडर १-२ वर्षे रखदतं. मग कैतरी तद्दन फालतू काम होतं. वेल, अगेन, बीकॉज धिस इज नॉट अमेरिका.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
जगातले सगळे हुशार लोक अमेरिकेत जाऊन तिथल्या व्यवस्था चालवतात. जिथे अशा लोकांचा अभाव असतो तिथे अमेरिकेचे उदाहरण देणे सयुक्तिक नाही. हा मुद्दा केवळ शासकीय, वाणिज्यिक यंत्रणांच्या सक्षमतेबद्दल मांडायचा आहे, अन्यत्र नाही.
=======================================================================================================================
आणि हो, गाय मारल्याने फरक पडत नाही म्हणता का? म्हणून गायी मारायच्या? तसं पाहिलं तर याचा प्रतिवाद करताच येत नाही. मान्य आहे. गायच का मारायची नाही? बिनकामाच्या गायीचं काय करायचं? ज्यांना बीफ खायचंय त्यांच काय? गायवादी फार कै बोलू शकत नाही. पण शेवटी मी निरुत्तर झालो तर मला एक नविन पोझिशन घ्यायला आवडेल. तुम्हाला जसं गाय कापायला आवडतं तसं मला झाडे कापायला आवडतं. मी म्हणेन कि असं केल्यानं काहीही फरक पडत नाही. वृझतोडीवर कायदेशीर बॅन एक मूर्खपणा आहे. ३००-४०० वर्षांपासून लोकसंख्या इतकी वाढली. इतकी बेसुमार वृक्षतोड झाली. औद्योगिक क्रांतीनंतर फॉरेस्ट कवर किती कमी झाले आणि फॉरेस्ट डेन्सिटी किती कमी झाली याचा हिशेबच नाही. शिवाय किती कर्बोदके जाळली गेली? काय फरक पडला? ऑक्सिजनचे प्रमाण ०.००१% ने कमी झाले? कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण ०.०१% ने तरी वाढले इतक्या वर्षांत? मग का बाऊ करायचा या झाडांचा? टाका ना तोडून. लोकांना ऑक्सिजन कमी पडू लागेल तेव्हा पैसे देऊन संरक्षण करतील ते. कमित कमी अमेरिकेत तरी करतीलच.

अस्वल Thu, 16/04/2015 - 00:24

आवडला धागा आपल्याला. भर्पूर मोकळी जागा, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि चरायला मोकळं कुरण.
और क्या चाहिये.