Skip to main content

एका बोक्याची गोष्ट-१

आमच्याकडे तीन वर्षापूर्वी मार्जार घराण्यातील एका राजपुत्राचे आगमन झाले.
शुभ्र पांढरा रंग आणि पाठीवर व शेपटीवर केशरी रंग.
फोटो टाकायचा आहे पण कसा टाकू ते समजत नाहीय.
असो... तर या राजपुत्राचे म्हणजे आमच्या बोक्याचे स्वभाव वैशिष्ट्य जरा वेगळे आहे.
म्हणूनच मी सुरूवातीला त्याचा राजपुत्र असा उल्लेख केला.
त्याचा मूड सारखा बदलत असतो. खाणे-पिणे, झोपणे, खेळणे, लाडात येणे या सगळ्याच बाबतीत त्याचं वागणं हे इतर मांजरांपेक्षा खूप वेगळं आहे..
म्हणूनच ते तुम्हाला सांगावं असं वाटतयं..

१. लहानपणी आमचा हा राजपुत्र दूध पित नसे...
तर नुसती भाकरी खात असे... फक्त भाकरी आणि पाणी.
अजून बरेच लिहायचे आहे.. पण बोक्याला भूक लागली आहे.
गेलच पाहिजे...