आजचे दिनवैशिष्ट्य
२९ ऑक्टोबर
जन्मदिवस : खगोलतज्ज्ञ एडमंड हॅले (१६५६), लेखक जेम्स बॉसवेल (१७४०), विचारवंत, लेखक ए. जे. एयर (१९१०), लेखक रा. ना. चव्हाण (१९११)
मृत्युदिवस : लेखक वॉल्टर रॅले (१६१८), लेखक व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे (१८९५), पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर (१९११), स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चटोपाध्याय (१९८८), विचारवंत वसंत पळशीकर (२०१६)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : तुर्किये (१९२३)
वर्धापनदिन : 'अॅस्टेरिक्स' कॉमिक (१९५९)
१६७५ : गणितज्ञ लाइबनित्झने कॅलक्युलसमधील 'इंटिग्रल' ह्या संकल्पनेसाठी ∫ हे चिन्ह प्रथम वापरले.
१८६३ : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या स्थापनेला मान्यता.
१९५८ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 'भारतरत्न' प्रदान.
१९७५ : स्पेनमधली जनरल फ्रँकोची हुकुमशाही संपुष्टात.
१९९९ : ओडिशास महाभयंकर चक्रीवादळाचा तडाखा. १०,०००हून अधिक लोक मृत्युमुखी
२००५ : दहशतवादी बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६०हून अधिक व्यक्ती ठार.
- 1 view