Skip to main content

'सोपा'चा निषेध

विकीपिडीयाचा ब्लॅक-आऊट

इंटरनेट वापरकर्त्यांनी वापरकर्त्यांसाठी वापरकर्त्यांच्या मदतीनेच बनवलेली साईट विकीपीडीया. याची इंग्लिशमधली आवृत्ती हे लिहायला सुरूवात केल्यापासून साधारण सात तासांत, चोवीस तासांसाठी बंद होणार आहे, करणार आहेत. कारण: सोपा आणि पिपा हे दोन कायदे. हे कायदे काय आहेत?

सोपा = Stop Online Piracy Act (SOPA)
पिपा = PROTECT IP Act (PIPA)

या दोन कायद्यांबद्दल पुरेशी माहिती इंटरनेट आणि विकीपीडीयावर आहेच. सात तासांनंतर आणि ३१ तासांआधी हा लेख उघडल्यास इंग्लिशमधला विकीपिडीया बंद असेल म्हणून इथेच थोडक्यात माहिती:
अमेरिकी सेनेटमधे हे दोन कायदे मांडण्यात आलेले आहेत. 'सोपा'चा उद्देश, इंटरनेटवरचे कॉपीराईट उल्लंघन थांबवणे हा आहे. The bill, if made law, would expand the ability of U.S. law enforcement and copyright holders to fight online trafficking in copyrighted intellectual property and counterfeit goods.
'पिपा'चा उद्देश डुप्लिकेट माल थांबवणे असा काहीसा आहे.ज्या वेबसाईट्सवर डुप्लिकेट, बेकायदेशीर नक्कल केलेला, anti-digital rights management तंत्रज्ञान वापरून बनवलेला माल वितरीत करत असणार्‍या साईट्सवर पिपा या कायद्याद्वारे बंदी घालण्यात येईल.

चीनने काही साईट्स ब्लॉक करण्यावरून त्यांना खडे बोल सुनावणारे अमेरिकन सरकार ज्युलियन असांजच्या मागे लागलेलं आहेच. पण आता फक्त एक विकीलीक्स नाही तर संपूर्ण इंटरनेट वापरकर्त्यांच्या हक्काच्या जागेवरच हल्ला करत आहे. जोपर्यंत इतरांची बदनामी सुरू होती तोपर्यंत फेसबुकाकडे ढुंकून न बघणारं काँग्रेसचं सरकार अचानक फेसबुकाबद्दल संवेदनशील झाल्याची घटना आपल्याला माहित आहेच.

विकीपीडीया फाऊंडेशनने याचा निषेध म्हणून इंग्लिश विकीपीडीया २४ तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची बातमी इथे पहा. विकीपीडीयाने हा टोकाचा निर्णय घेतला आहे का? आणि हा निर्णय तुम्हाला पटतो का?

राजेश घासकडवी Wed, 18/01/2012 - 08:29

अमेरिकेच्या राज्यघटनेची फर्स्ट अमेंडमेंट (पहिली घटना दुरुस्ती) हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मानदंड समजला जातो. आपल्याला हवं ते म्हणण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे.

अमेरिकेत त्याचबरोबर फ्री मार्केट ही संकल्पनाही जोपासलेली आहे. आपल्याला हवी ती गोष्ट हवी त्याला विकण्याचं स्वातंत्र्य त्यामुळे मिळतं. एखादी गोष्ट दुसरा कोणी बनवत असेल तर तीच गोष्ट मी कमी किमतीत बनवून विकणं हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक मानलं जातं.

अमेरिकेत मालमत्ता गोळा करण्याचा व बाळगण्याचा अधिकारही मूलभूत समजला जातो. माझी जमीन, माझी संपत्ती ही माझीच असण्याचा मला अधिकार आहे. तीवर अतिक्रमण करणारा हा गुन्हेगार ठरतो.

जेव्हा अभिव्यक्ती ही मालमत्ता व त्याचबरोबर मार्केटेबल कमोडिटी होते तेव्हा गंमत होते. कारण एकाने केलेली कलाकृती तो जर काही किमतीला विकत असेल, आणि मी जर ती निम्म्या किमतीला विकायला लागलो, तर त्यात अनेक बऱ्यावाईट गोष्टी होतात. समजा कोणी पुस्तक लिहिलं, प्रकाशकाने प्रकाशित केलं आणि १० डॉलर प्रत्येक प्रतीमागे विकलं. आता मी तेच पुस्तक कॉपी मारून ५ डॉलरमध्ये विकलं तर ते बरोबर की चूक? एका बाजूला मी फ्री मार्केटच्या दृष्टीकोनातून समाजाचं भलं करतो आहे. तर दुसऱ्या बाजूला मी चोरून माल विकतो आहे.

इंटरनेटच्या आगमनापासून हे प्रश्न खूपच व्यापक झालेले आहेत. त्यामुळे या चोरीवर बंधनं आवश्यक आहेत याबद्दल वाद नाही. मग विकीपीडियासारखी साइट याला विरोध का करते?

याचं मुख्य कारण म्हणजे चोरावर बंदी घालण्याच्या मिषाखाली समाजासाठी आवश्यक, हितकारक असलेल्या 'चोऱ्यां'वरही बंदी घालण्याचा हा प्रयत्न आहे असा संशय आहे. विकीलीक्ससारख्या साइट्स, कॅनडात विकली जाणारी स्वस्त औषधं अमेरिकन जनतेला विकणाऱ्या साइट्स, चोरून माहिती मिळवून सरकारविरोधी बोलणाऱ्या साइट्स... अशांवर मुख्यत्वे बंदी घालण्यात येईल, कडक कारवाई करण्यात येईल अशी भीती आहे. मग अनेक रास्त माहिती पुरवणाऱ्या साइट्सदेखील या कायद्याच्या बडग्याखाली येऊ नये यासाठी स्वतःवर बंधनं घालतील अशी भीती आहे. थोडक्यात फार्मास्युटिकल लॉबी, म्युझिक इंडस्ट्री, व अमेरिकन सरकार यांचा त्यांना सोयीस्कर असलेल्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीवर सर्वाधिकार गाजवण्यासाठी हा कायदा करण्यात येतो आहे ही भीती आहे.

मोनोपोली ही फ्री मार्केटसाठी नक्कीच वाईट. मोनोपोली जपण्यासाठी हा कायदा मदत करेल अशी भीती वाटून विकीपीडिया निषेध व्यक्त करत आहे. पण मोनोपोलीधारकांचा धंदा आणि तो धंदा करणारे (यात सरकारही आलं) यांना हा कायदा फायद्याचा आहे.

नितिन थत्ते Wed, 18/01/2012 - 10:51

In reply to by राजेश घासकडवी

WTO आणि डंकेल ड्राफ्ट १९९०च्या दशकात आला तेव्हा त्यात Trade Related Intellectual Property संबंधी बरीच कलमे होती. त्यामुळे पेटंटच्या आणि तत्सम कायद्यात मूलभूत बदल करणे भारतासारख्या देशांना भाग पडेल म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.

त्यावेळच्या विरोधात डावे लोक आघाडीवर होते आणि उजवे पेटंट वगैरेच्या बाजूने होते.

पेटंटचे आणि कॉपीराईटचे हक्क (मोनोपोलिस्टिक असले तरी) "इन्सेन्टिव्ह टु इनोव्हेशन" चे काम करतात असे साधारण मत आहे आणि ते योग्यही आहे. त्याची सहज होऊ शकणारी पायमल्ली ही रोखली जायलाच हवी असे वाटते.

विकिपीडियाला यात काय अडचण आहे ते कळत नाही. यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उद्भवतच नाही.

पिवळा डांबिस Wed, 18/01/2012 - 23:36

In reply to by राजेश घासकडवी

फर्स्ट अमेंडमेंट ही ओरिजिनल अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी आहे.
पायरेटेड बाय डेफिनिशन मीन्स चोरून, ढापून, मूळ मालकाची परवानगी न घेता त्याची मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी वापरणं. हे फर्स्ट अमेंडमेंडखाली संरक्षणात्मक होऊ शकत नाही.
आजही कुणाला स्वतःचं काही ओरिजनल वक्तव्य/ लेखन करायचं असेल तर त्याला या कायद्यानुसार बंदी येईल असं मला वाटत नाही. हां, हपापाचा माल गपापा करणार्‍यांची (नॅपस्टर वगैरे) पंचाईत होईल...

थोडक्यात फार्मास्युटिकल लॉबी, म्युझिक इंडस्ट्री, व अमेरिकन सरकार यांचा त्यांना सोयीस्कर असलेल्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीवर सर्वाधिकार गाजवण्यासाठी हा कायदा करण्यात येतो आहे ही भीती आहे.>>
यात भीती कसली?
कुणालाही नवीन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी निर्माण करण्यात या कायद्याची कसलीही आडकाठी नाही. भीती असलीच तर दुसर्‍याच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टीवर डल्ला मारून नफेखोरी करणार्‍यांच्या मनात आहे, आणि ते सहाजिक आहे.

Nile Wed, 18/01/2012 - 11:38

थोडक्यात सांगायचं तर 'सोपा'मुळे चोरी करण्याची नकळत संधी देणाराही फाशीवर टांगला जाऊ शकतो. सोपा जर लागू झाला तर 'युजर कंट्रिब्युटेड' वेबसाईट्स बंद पडतील. म्हणजेच युट्युब, फेसबुक, विकीपेडीया, डॉपबॉक्स, इमगुर अगदी जीमेलवर सुद्धा गदा येऊ शकते.

हे सगळं नीट कळण्याकरता संपूर्ण बील वाचावं लागेल. बील इथे: http://thomas.loc.gov/cgi-bin/query/C?c112:./temp/~c112Upt0lH

सेक्शन १०३ मधून

(a) Definitions- In this section:

(1) DEDICATED TO THEFT OF U.S. PROPERTY- An `Internet site is dedicated to theft of U.S. property' if--

(A) it is an Internet site, or a portion thereof, that is a U.S.-directed site and is used by users within the United States; and

(B) either--

(i) the U.S.-directed site is primarily designed or operated for the purpose of, has only limited purpose or use other than, or is marketed by its operator or another acting in concert with that operator for use in, offering goods or services in a manner that engages in, enables, or facilitates--

(I) a violation of section 501 of title 17, United States Code;

(II) a violation of section 1201 of title 17, United States Code; or

(III) the sale, distribution, or promotion of goods, services, or materials bearing a counterfeit mark, as that term is defined in section 34(d) of the Lanham Act or section 2320 of title 18, United States Code; or

(ii) the operator of the U.S.-directed site--

(I) is taking, or has taken, deliberate actions to avoid confirming a high probability of the use of the U.S.-directed site to carry out acts that constitute a violation of section 501 or 1201 of title 17, United States Code; or

(II) operates the U.S.-directed site with the object of promoting, or has promoted, its use to carry out acts that constitute a violation of section 501 or 1201 of title 17, United States Code, as shown by clear expression or other affirmative steps taken to foster infringement.

(2) QUALIFYING PLAINTIFF- The term `qualifying plaintiff' means, with respect to a particular Internet site or portion thereof, a holder of an intellectual property right harmed by the activities described in paragraph (1) occurring on that Internet site or portion thereof

.

अधोरेखित आणि ठळक केलेल्या ओळींवरून, युजर कंट्रीब्युशनची जबाबदारी साईट ओनर कडे आहे. तुमच्या साईटवर जर कमेंट देण्याची फील्ड असेल आणि आक्षेपार्ह मजकूर त्या कमेंटद्वारे तुमच्या साईटवर आला तर तुमची साईट ब्लॉक केली जाईल (असे दिसते). साईट जर अमेरीका बेस्ड नसेल तर ती साइट तुमच्या इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडरला ब्लॉक करावी लागेल. गुगल इ. सर्च इंजिनच्या रिझल्टसमध्येही ती साईट दिसणार नाही.

अशा प्रकारची सेन्सरशीप लावल्याने काय होऊ शकते याचे उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत, चायना आणि इराण. (उदा. http://sitemaker.umich.edu/infosurgentsiran/firewalls ) गर्व्हमेंटला जर एखादी बातमी द्यायची नसेल तर ती बातमी लोकांपर्यंत न पोहचवणे खुप सोपे होईल. चायनामध्ये तियानमेन स्केवरच्या २० वर्ष पूर्तीवेळी चायनाने त्याबद्दलच्या सर्व बातम्या चायनामध्ये ब्लॉक केल्या होत्या (माझ्या आठवणीत चूक नसेल तर ट्वीट्स सुद्धा दिसत नव्हत्या).

या शिवायही अनेक अडचणी आहेत. mashabale.com वरती ह्यावर लिहून आलेला लेख फार चांगला आहे.
http://mashable.com/2012/01/17/sopa-dangerous-opinion/

आजचे google.com पान.

राजेश घासकडवी Wed, 18/01/2012 - 20:51

In reply to by Nile

कोणीतरी चोरीचा माल एखाद्या साइटवर टाकल्याबद्दल साइटच्या मालकालाच वेठीला धरण्यातला भाग आधी लक्षात आला नव्हता. हा फारच भयंकर प्रकार आहे. माझ्या घराच्या अंगणात जर कोणी एखादा चोरीचा हिरा लपवून ठेवला तर मला कसं कळणार? त्याबद्दल मला शिक्षा का? त्यापेक्षा आधीची व्यवस्था (चोरीचा माल निदर्शनास आणून दिला तर काढून टाकण्याची जबाबदारी मालकाची) न्याय्य वाटते. इतके खडतर नियम घालण्यामागे सरकारचा हेतू पाक वाटत नाही.

मराठी संस्थळं इतकी चिमुरडी आहेत की त्यांना प्रत्यक्षपणे या कायद्याने काही फरक पडायचा नाही. पण गूगल, यूट्यूब, विकीपेडिया सारख्या साइट्सना आपलं अस्तित्वच धोक्यात आलं असं वाटलं तर नवल नाही.

Nile Wed, 18/01/2012 - 21:07

In reply to by राजेश घासकडवी

मराठी संस्थळं इतकी चिमुरडी आहेत की त्यांना प्रत्यक्षपणे या कायद्याने काही फरक पडायचा नाही. पण गूगल, यूट्यूब, विकीपेडिया सारख्या साइट्सना आपलं अस्तित्वच धोक्यात आलं असं वाटलं तर नवल नाही.

आपल्याला आज जे इंटरनेट माहित आहे ते भविष्यात दिसणार नाही. फोरम्स, Reddit, युट्युब, विकी, फेसबुक, ट्वीटर वगैरेंशिवायच इंटरनेट म्हणजे कल्पना करवत नाही!

ऋषिकेश Wed, 18/01/2012 - 17:34

In reply to by नितिन थत्ते

भारतातून मी प्रयत्न केल्यास आधी ते पान उघडले. मग मी विन्डो मिनिमाईज केली होती. आता उघडल्यावर एक काळे पान येते आहे आणि असा (काहिसा सेन्टी ;) ) मेसेज आहे:

Imagine a World
Without Free KnowledgeFor over a decade, we have spent millions of hours building the largest encyclopedia in human history. Right now, the U.S. Congress is considering legislation that could fatally damage the free and open Internet. For 24 hours, to raise awareness, we are blacking out Wikipedia. Learn more.

मी Wed, 18/01/2012 - 18:42

ह्या सर्व साईट्स जर स्विस/कंबोडिया/पाकिस्तान अशा देशातून *होस्ट केल्या गेल्यासही युएस अधिकृतरित्या काही करु शकेल काय?

*पायरेट बे बहुदा असेच होस्ट केले आहे.

Nile Wed, 18/01/2012 - 21:04

In reply to by मी

आयसपी कडून ती साईट ब्लॉक केली जाईल आणि पाच दिवसात ती साईट सर्च मधूनही वगळली जाईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/01/2012 - 22:52

विकीपीडीयाच्या विचारांशी सहमत आहे.

मी स्वतःच लिहीलेल्या पेपर्सचा कॉपीराईट, प्रकाशनासाठी इतर संस्थांना दिलेला आहे. त्याच्या मूळ प्रती मी कोणाला देणं कॉपीराईट भंग होणार का?

पिवळा डांबिस Wed, 18/01/2012 - 23:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी स्वतःच लिहीलेल्या पेपर्सचा कॉपीराईट, प्रकाशनासाठी इतर संस्थांना दिलेला आहे. त्याच्या मूळ प्रती मी कोणाला देणं कॉपीराईट भंग होणार का?>>
जर तुम्ही मूळ प्रती खाजगी वाचनासाठी देत असाल तर नाही. पण जर दुसर्‍या कोणाला प्रकाशित करून विकण्यासाठी देत असाल तर 'होय'.
आणि जरा सांभाळून! तुमच्या राज्यात तर डेथ पेनल्टी ही फास्ट लेनमध्ये आहे!!!:)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/01/2012 - 09:32

In reply to by पिवळा डांबिस

मग हरकत नाही. असे पेपर फारतर ओळखीचे लोकं त्यांच्या कामासाठी संदर्भ म्हणून वापरतात. अर्थात जर्नल्सही अशा बाबतीत कॉपीराईटबद्दल विचार करत नाहीत.

Nile Thu, 19/01/2012 - 08:08

खान अकॅडमी बद्दल बहुतेक तुम्ही ऐकले असेलच. खान अकॅडमी अनेक विषयांवर माहीतीपर व्हिडीओ बनवते. थोडक्यात तुम्ही वेगवेगळे विषय निवडून त्याविषयी फुकटात व्हिडिओ पाहून शिकू शकता. खान अकॅडमीचा संचालक आणि एमआयटीचा विद्यार्थी सलमान खान याने एकट्याने तासंतास घालवून बनवलेली त्याची वेवसाईट पाहण्यासारखी आहे. http://www.khanacademy.org/

त्यानेच बनवलेला सोपा आणि पिपाची माहिती देणारा हा व्हिडिओ: http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=tzqMoOk9NWc

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/01/2012 - 09:31

In reply to by Nile

हा सलमान खान उत्तम शिक्षक आहे. व्हीडीओ पहाते.

... व्हिडीओ पाहिला. विकीपीडीयाची कृती समर्थनीय वाटते. सलमान खानच्याच शब्दांत, "हे कायदे म्हणजे आधी फाशी द्यायची आणि नंतर समोरचा दोषी आहे का हे पहायचं, असं आहे."