Skip to main content

एक वेळ अशी येते कि

एक वेळ अशी येते कि

तुम्हाला झाडं जवळची वाटू लागतात

तुमच्याशी फुलं बोलू लागतात

सारे पक्षी तुमच्याकडेच बघून उडतायत

असं वाटू लागलं

कि समजा तुमची प्रेमळ पहाट झालीय

दूर मनाच्या आकाशात

एक प्रेमाची चांदणी उगवलीय

ती जशी टीम टीम करू लागेल

तसं प्रेम पसरेल चराचरी

नखशिखांत बनवेल प्रेम पुजारी

सुचतील रात्रीबेरात्री नवीन उखाणे

भल्या पहाटे द्याल कबुतरांस दाणे

गप्प घालाल विवेकानंदांची घडी

तोंडाचा होईल चंबू अन नजर सताड उघडी

मायबापास वाटेल जेव्हा

तुमचा काहीतरी बिघाड झालायं

दवा दारु देऊनही

चेहरा पार ओसाड पडलाय

तेव्हा त्यांनी समजावं

बाळ प्रेमाची पायरी चढलायं

एकतर घालून द्यावी कन्येची भेट

नाहीतर मारावी कानफाटात

न्यावे त्यास फरफटत, घरी थेट

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}